फ्लॅट मध्ये चुलीचा स्वाद

साहना's picture
साहना in पाककृती
22 Dec 2020 - 3:12 am

चुलीवर आपण जेंव्हा काही ऍन बनवतो तेंव्हा लाकडाच्या धुराचा वास त्या अन्नात आपसूक घुसतो. आधुनिक मुलांना कदाचित हा वास आवडणार नाही पण गावांतून शहरांत गेलेल्या अनेक लोकांना हा वास मिस होतो. मक्याचे कणीस, पापड किंवा अगदी "नुस्तें" जरी गॅस वर बनवले तरी त्या लाकडाच्या धुराच्या वासाच्या शिवाय त्याची चव तेव्हडी चांगली वाटत नाही. ह्या शिवाय बिर्याणी, मटण, जंगली गेम मांस ह्याला जर तो थोडा धुराचा वास नाही तर त्याला अजिबात मजा येत नाही.

त्यामुळे खालील ट्रिक वापरून आपण अगदी फ्लॅट मध्ये सुद्धा लाकडी धुराच्या वासाचे अन्न बनवू शकता.

सर्वप्रथम एक कोळसा घ्यावा (चार-कोल), कधी गावांत गेला असला तर साधा लाकडी कोळसा सुद्धा चालेल पण हा अतिशय ड्राय असला पाहिजे.

जे काही अन्न बनवायचे असेल, बिर्यानी वगैरे ते बनवावे. मग एका वाटींत शुद्ध घी मेल्ट करून ठेवावे. बटर वगैरे चालणार नाही चांगले घी च पाहिजे. मग कोळसा गॅस वर चांगला लाल करावा. मग ती घी असलेली वाटी आपल्या पदार्थांत ठेवावी आणि कोळसा त्यांत टाकून झटपट आपले भांडे झाकावे. घी जळून एक पंधरा शुभ्र धूर अप्लाय भांड्यांत पसरेल. एक १० मिनिटे जर भांडे झाकून ठेवले तर तो धूर अन्नात चांगला मिक्स होतो.

प्रत्येक धूर वेगळा असतो घी आणि कोळसा जळून निर्माण होणारा धूर थोडा यज्ञाच्या धुराच्या प्रमाणे असतो. पण तुम्हाला जर वेग वेगळा धूर हवा असेल तर मक्याच्या कणसाला जे केस सदृश्य घडे असतात ते जाळून सुद्धा येणार धूर चांगला असतो. त्याशिवाय नारळाच्या "कट्टी" चा धूर, "सोन्ना" चा धूर आणि "पिड्या" चा धूर सुद्धा वेगवेगळा असून त्याची चव वेगळी असते.

माशांना थोडा समुद्री धूर द्यायचा असेल तर थोडी रेती वाटींत ठेवावी आणि त्यांत खारे पाणी ठेवावे. मग हि वाटी मायक्रो वेव्ह मध्ये गरम करून नंतर अन्नात ठेवली तरी चालेल.

विविध प्रयोग करून पहा. ज्यांना हि ट्रिक ठाऊक नसते असे लोक अगदी थक्क होतात.

उदाहरण : https://www.youtube.com/watch?v=FG2y-QrpYz8&t=8s

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

22 Dec 2020 - 3:16 am | कपिलमुनी

घी काय ?
तूप लिहा.

कंजूस's picture

22 Dec 2020 - 4:40 am | कंजूस

सिजलर हेच असते ना?
धूर पिशव्यांत भरून ठेवल्यास तो हवा तेव्हा पदार्थांत सोडता येईल का?

अजिबात नाही. सिजलऱ हा प्रकार जपानी व्यंजनापासून प्रेरित आहे (ह्याचा शोध मुंबईत लागला असे म्हटले जाते. पारसी आणि जपानी दाम्पत्याने आपल्या खाणावळींत हा पदार्थ सर्वप्रथम सिजलऱ म्हणून विकला). इथे अन्न कास्ट आयरन च्या गरम गरम तव्यावर सर्व केले जाते त्यामुळे ते खूप वेळ गरम राहते आणि पाण्याशी संपर्कयेताच त्यातून हिस्सस्स्स हा आवाज येतो म्हणून सिजलऱ. इथे धुराचा वास ह्याचा संबंध नसतो.

नाही धूर जास्त काळ स्टेबल राहू शकत नाही त्यामुळे पिशवीत भरून नंतर वापरला जाऊ शकत नाही. धुरांत जे विविध वायू निर्माण होतात ते प्राणवायूच्या संपर्कांत येऊन आपला नेचर बदलतात. नाहीतर लोकांनी तंबाखू जाळून त्याचा धूर विकला असता (फिल्टर करून).

चौथा कोनाडा's picture

23 Dec 2020 - 1:19 pm | चौथा कोनाडा

व्यंजन हा शब्द वापरलात म्हणजे लेखनात चांगलाच स्वर लागलाय म्हणायचा !
😎

भुजंग पाटील's picture

25 Dec 2020 - 11:58 am | भुजंग पाटील

वेगवेगळ्या फ्लेवरच्या लिक्विड धूराच्या बाटल्या मिळतात.

ही एक वेबसाईट, भारतात असाल तरः
https://urbanplatter.in/product/urban-platter-hickory-bbq-liquid-smoke-f...

कालच बाटली विकत घेतली हिकारी वासाची. दोन तीन थेम्ब टाकले तर चांगला हिकरी लाकूड चा वास येतो.

कंजूस's picture

22 Dec 2020 - 8:32 am | कंजूस

निखाऱ्यावर तूप टाकून फ्यानसमोर धरायचे.

दिपक.कुवेत's picture

22 Dec 2020 - 4:21 pm | दिपक.कुवेत

शुद्ध घी कसे ओळखायचे? शिवाय कोळसा घालुन एवढं घी वेस्ट करण्यापेक्षा कोळश्यावर तुपाची धार सोडली तर सेम इफेक्ट येईल का?

उपयोजक's picture

26 Dec 2020 - 11:49 pm | उपयोजक

तूप

कंजूस's picture

22 Dec 2020 - 5:56 pm | कंजूस

वाटीभरून घी घ्या असं कुठे लिहिलय?

एका वाटींत शुद्ध घी मेल्ट करून ठेवावे. पाच एमेलसुद्धा चालेल. कारण एक एमेल द्रवाची एकोणीस एमेल वाफ ( धूर) होतो असं शाळेत शिकलो. दोनतीन प्लेटींना पुरतोय शंभर एमेल धूर॥

वाटी अश्यासाठी घ्यायची कि कोळसा अन्नात मिक्स होऊ नये. तूप अतिशय कमी असले तरी चालेल. साधारण एक छोटा चमचा.

शुद्ध तूप कसे ओळखावे हे आपले एक शास्त्र आहे. कॅलिफोर्निया मध्ये उत्तम दर्जाचे भारतीय पद्धतीने बनवलेले शुद्ध घी मिळते, येथील गायी सुद्धा जुन्या भारतीय पद्धतीने वाढवल्या जातात (म्हणजे मारहाण न करता) आणि उघड्या मैदानात चरतात. ह्या कंपनीचा मोटो आहे "आयुर्घितां" (घी हेच जीवन). माझी आई आणि आणि आजी सोडून तूप हा प्रकार इतका सिरियसली कोणी घेतला आहे असे आठवत नाही (घृत पिबेत म्हणणाऱ्या चार्वाकाला सोडून).

https://www.ancientorganics.com/faq/

रमेश आठवले's picture

22 Dec 2020 - 8:55 pm | रमेश आठवले

आमच्या ओळखीच्या एका उत्तर भारतीय कुटुंबात रायते तयार झाले कि गॅस वर एक कोळशाचा लाल निखारा करून तो रायत्याच्या पातेल्यात टाकून वर थोडावेळ झाकण ठेवत असत आणि नन्तर कोळसा काढून टाकत असत.

मॅगी आणि नुडल्स वर दिवस ढकलले जातात किंवा वडा पाव , टोस्ट वर भूक भागवली जाते.
ती भारतीय अत्यंत आळशी समाज असेल धुराचे उद्योग कधीच करणार नाही
दुसरे कोणी आयते करून दिले तर फक्त चव घेतील.

गामा पैलवान's picture

23 Dec 2020 - 2:27 am | गामा पैलवान

Rajesh188,

मी आळशी आहे. मी असलं काही बनवायची स्वप्नातही कल्पना करू शकंत नाही. पण सरसकट सर्व भारतीय समाजाबद्दल केलेलं विधान अमान्य आहे.

आ.न.,
-गा.पै.

स्वतः वरून दुसऱ्यांची परीक्षा करू नका. भारतीय समाज अत्यंत खादाड आहेच पण त्याशिवाय चविष्ट आणि अत्यंत मेहनत घेऊन जेवण बनवणारा आहे !

> दुसरे कोणी आयते करून दिले तर फक्त चव घेतील.

भारतीय समाजांत आयते करून द्यायला मेक्सिकन लोक येणार आहेत का ?

चामुंडराय's picture

23 Dec 2020 - 3:16 am | चामुंडराय

>>> दुसरे कोणी आयते करून दिले तर फक्त चव घेतील. >>>

"आयते" दिले तर जरूर खाऊ. 😄

लसूण पातीचे "आयते" आवडीचा प्रकार आहे.

मराठी_माणूस's picture

23 Dec 2020 - 12:08 pm | मराठी_माणूस

ती भारतीय ?????
असेल धुराचे ?????

Rajesh188's picture

23 Dec 2020 - 1:02 pm | Rajesh188

इथे चुकीला माफी नाही.
एकदा कमेंट पोस्ट झाल्या नंतर चुका दुरुस्त करायची सोय नसल्या मुळे.
अशुद्ध शब्द पोस्ट मध्ये तसेच राहून जातात.
शेवटी चूक ती चूक च .
अशुद्ध शब्द वापरल्या बद्द्ल मोठ्या मनाने माफ करावे.
आणि हा विषय इथेच संपवावा.