पनीर पराठा (व्हिडिओ सोबत)

मी_देव's picture
मी_देव in पाककृती
18 Dec 2020 - 7:06 pm

मागील दोन्ही पाकृ नॉन-व्हेज होत्या, म्हणून खास, पनीर प्रेमींसाठी.. सोप्पा आणि झटपट होणार पदार्थ

साहित्य:

  • मल्टि ग्रेन / गव्हाचे पीठ - १ १/२ कप
  • मीठ
  • तेल

पनीरचे सारण:

  • पनीर - २०० ग्रॅम्स
  • कांदा - १ मध्यम आकाराचा बारीक चिरून
  • हिरवी मिरची - १ बारीक चिरून
  • पुदीना पाने - १२ ते १५ बारीक चिरून
  • कोथंबीर - १/२ कप बारीक चिरून
  • आले-लसूण पेस्ट - २ टिस्पून
  • ओवा - १/२ टिस्पून
  • धणे पावडर - १ टेबलस्पून
  • काळी मिरी पावडर - १ टिस्पून
  • लाल तिखट - १ टिस्पून
  • अमचूर पावडर - १ टिस्पून (ऐच्छिक)
  • कसुरी मेथी - २ टिस्पून
  • मीठ - चवीनुसार
  • तूप

पाककृती:

  • एका भांड्यात गव्हाचे पीठ, तेल, मीठ आणि पाणी एकत्र करून पीठ चांगले मळून घ्या आणि १५ मिनिटे झाकून ठेवा.
  • पनीरचे तुकडे करून १० मिनिटे थोड्या पाण्यात घालून ठेवा.
  • पनीर पाण्यातून पिळून घेऊन एका भांड्यात छान चुरून घ्या.
  • त्यामध्ये वरील सर्व साहित्य एकत्र करून सारण बनवून घ्या.
  • कणिक थोडी मळून, कणकेचे समान आकाराचे गोळे करून त्याची पोळी थापून अथवा लाटून घ्या.
  • त्यावर पराठ्यात मावेल एव्हढं सारण घाला.
  • वरून अजून एक लाटलेली पोळी ठेऊन कडा घट्ट दाबून घ्या.
  • तवा गरम करून त्यावर काही तेलाचे थेंब टाकून टिश्यू पेपर किंवा कापडाने पुसून टाका.
  • गरम तव्यावर लाटलेला पराठा घाला आणि कडेने थोडे तेल / तूप सोडा. एका बाजूने भाजून झाला कि पराठा परता आणि सोनेरी होईपर्यंत दोन्ही बाजूंनी भाजून घ्या.
  • गरम पनीर पराठे दही/ राईत्या सोबत सर्व्ह करा.

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

18 Dec 2020 - 7:47 pm | तुषार काळभोर

मार्गशीर्ष महिन्यात घरात वशाटाला बंदी असते. हा झक्कास पर्याय आहे.
रैवारचा नाश्ता पण मस्त होईल.

MipaPremiYogesh's picture

21 Dec 2020 - 9:43 pm | MipaPremiYogesh

वाह मस्तच...खुशखुशीत दिसत आहेत एकदम . पनीर आपला विकपॉईंट, करून बघतो एकदा.

मदनबाण's picture

3 Jan 2021 - 10:28 am | मदनबाण

आहाहा... पनीर पराठा हा माझा फेवरेट पराठा आहे, यात वरती चीझ किसुन टाकले की अजुन भारी लागते.
व्हिडियो देखील मस्त आहे, पिवळसार रंग असलेले पनीर मी पहिल्यांदाच पाहिले !

जवानी

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chabidar Chabi | Girlz | Praful-Swapnil | Sagar Das | Naren Kumar | Vishal Devrukhkar

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Jan 2021 - 12:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पनीर पराठा आवडला. व्हीडियोही आवडला, चांगला एडिटींग आहे. धन्यवाद.
और भी आने दो....!

-दिलीप बिरुटे