अस्मादिक एका सहकारी गृहनिर्माण संस्थेत अध्यक्ष आहेत. आमच्याकडे संस्थेत ‘सहकार’ फक्त नावातच आहे. तस बघाल तर हि करोना पूर्व काळात सुरु झालेली गोष्ट आहे. सगळ्या सहकारी गृहनिर्माण संस्थेत ज्याप्रमाणे वीज वापर नोंदणी करता कर्मचारी येतात त्याप्रमाणे आमच्या संस्थेत देखील वीज कंपन्या त्यांचे कर्मचारी दर महिन्याला पाठवतात. मार्च २०२० मधील गोष्ट आहे, वीज कंपनीने नवीन नियुक्त्यांवर पाठवलेल्या कर्मचार्यांनी संस्थेच्या कार्यकारिणीला कळवले कि, तुमच्या संस्थेत मीटर पेक्षा DP जास्त आहेत, तरी तपासणी करून घ्या. त्या प्रमाणे आम्ही तपासणी केली असता असे आढळले कि एका सदस्याचा मीटरच गायब आहे. त्या सदस्याला याबाबत विचारले असता त्याने आपल्या काखा वर करून आपल्याला याबाबत काहीच माहित नाही असा आव आणला. सदर प्रकरण वीज चोरीचे आहे आणि हा एक दखलपात्र फौजदारी गुन्हा आहे याची जाणीव सदर सदस्याला करून दिल्यावर त्याने हा विषय एका महिन्यात निस्तरतो असे सांगीतले. संस्थेच्या कार्यकारिणीने याबाबत त्याला लेखी पत्र देऊन आपली बाजू मांडण्यास सांगितले.
नंतर करोना आला, लॉक-डाऊन आले, त्यामुळे संस्थेच्या कार्यकारिणीतील काही कनवाळू सदस्यांच्या आग्रही विनंतीमुळे सदर सदस्याला Time – Please दिला. मग मार्च पासून अगदी आज पर्यंत सदर सदस्य सुखनैव फुकट विजेचा उपभोग घेत आहे. त्याने सगळीकडे उत्तम setting लावली आहे. त्यामुळे वीज कर्मचारी वापराची नोंदणी करताना त्याचा DP बंद करतात आणि थोड्याच वेळात त्याची वीज पूर्ववत होते. आम्ही वीज कंपनीला याबाबत तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी आम्हाला पोलिसात जायला सांगीतले. बर गंमत अशी कि कंपनीकडून जे काही आहे ते तोंडी आहे लेखी काहीच नाही, वर वीज नोंदणी कर्मचारी आम्हालाच सांगतात कि उद्या इथे आग लागली तर आम्ही अध्यक्ष आणि सचिवांना पोलिसांच्या ताब्यात देऊ.
आणि या सगळ्यात सदर सदस्य दोन Air Conditioner, Heater आणि Microwave मुक्तहस्ते वापरत आहे. काळाला अस सोकावताना बघून उगाच Frustration वाढत. अस काही आहे का, ज्याने साप तर मरेल आणि लाठी पण वाचेल.
PS
संस्थेच्या कार्यकारिणीतील काही कनवाळू सदस्य संस्थेचा सार्वजनिक परिसर आपल्या वडलांचा असल्यासारखा वापरतात. सदर सदस्य कनवाळू असून संस्थेच्या कार्यकारिणीत असल्याने त्यांचे अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी काय करता येईल??
प्रतिक्रिया
9 Dec 2020 - 5:52 pm | वामन देशमुख
माझ्या माहितीनुसार आणि समजुतीनुसार लिहीत आहे, खरे-खोटेपणाची / योग्य-अयोग्यतेची जबाबदारी नाही.
१. घरगुती (एकेका फ्लॅटला) वीज पुरवठ्याच्या बाबतीत, उपभोक्ता आणि वीज कंपनी हे थेट व्यवहार करतात, सोसाइटीचा काही संबंध नाही.
२. त्या सदस्याला पूर्वीच्या लेखी पत्राचा संदर्भ देऊन अजून एक लेखी पत्र (गरज पडल्यास अजून एक, एकूण तीन पत्रे) द्या. मग सोसाइटीची सामाजिक जबाबदारी संपली.
३. वीज कर्मचाऱ्यांना वरील मुद्दा क्रमांक १ ठामपणे सांगा, आणि सोसाइटी या प्रकरणात पार्टी होऊ शकत नाही हे स्पष्ट सांगा.
४. पोलीस निरीक्षक किंवा वरच्या दर्जाच्या अधिकाऱ्याला प्रकरणाची लेखी माहिती देऊन ठेवा.
५. सोसाइटीसंबंधित या आणि इतर कोणत्याही प्रकरणात रहिवाश्यांना नोटीस बोर्ड, व्हाट्सऍप ग्रुप वगैरे माध्यमांतून वेळोवेळी माहिती देत चला.
६. सदर माहिती दिल्याचे पुरावे जतन करून ठेवत चला.
७. सज्जन / पांढरपेशे / ममव वगैरे लोक ऐनवेळी साथ देत नाहीत याची जाणीव ठेवा.
८. सोसायटी चालवणे हे एका गावाची नगरपालिका चालण्यासारखे आहे. साम-दाम-दंड-भेद या सर्व मार्गांचा योग्य तो वापर करावा लागतो.
९. एकूणच, सोसायटीच्या कार्यकारिणीने पोलीस अधिकाऱ्यांच्या ओळखी ठेवाव्यात. (ओळख पुरे, फार मैत्री नको). त्याशिवाय स्थानिक मीडिया, महसूल अधिकारी, पालिका अधिकारी, राजकीय पुढारी वगैरे यांच्याही ओळखी असाव्यात, आणि गरज पडल्यास कामे व्हावीत असे संबंध हवेत.
ही नुसतीच दमदाटी आहे, त्यात काही दम नाही, घाबरू नका. हवे तर लेखी मागा, नाहीतर त्यांच्यासोबत त्यांच्या परवानगीने संपूर्ण संभाषणाचा सेल्फी व्हिडीओ करा.
पंधरा दिवसांची नोटीस देऊन, रहिवाश्यांना विश्वासात घेऊन सोसाइटीच्या खर्चाने अनधिकृत बांधकाम पाडून टाका. मग नोटीस देऊन त्या सदस्यांकडून पाडकामाचा खर्च वसूल करा.
मिपाकर बंधू म्हणून एक सल्ला -
सोसाइटीच्या किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक कामात, स्वतःला सुरक्षित ठेवून काम करावे नाहीतर हुतात्मा होण्याची तयारी ठेवावी.
- (सोसाइटीचा एकमेव सेक्रेटरी) वामन देशमुख
9 Dec 2020 - 8:27 pm | बाप्पू
माझ्यामते हे बरोबर आहे.
तुम्ही सरळ वीज महामंडळाला लेखी तक्रार / अर्ज दया कि अमुक अमुक व्यक्ती आमच्या सोसायटी मध्ये विना मिटर वीज वापरत असून त्यावर ऍक्शन घ्या.
तसेच हे देखील नमूद करा कि त्यामुळे आग अथवा काही जीवितहानी होण्याची शक्यता आहे असे काही झाल्यास सोसायटी जबाबदार नाही.
याचसोबत सोसायटी कमिटी ने त्या व्यक्तीस पाठवलेल्या सर्व लेखी नोटिसांची प्रत अटॅच करा. आणि हे क्लिअर करा कि आमच्या सोसायटी मध्ये आम्ही अशा नियमबाह्य आणि बेकायदेशीर घटना होणे आम्ही कटाक्षाने टाळत असतो त्यामुळे अमुक अमुक यांस आम्ही बर्याच वेळेला तोंडी व लेखी समज दिली आहे. सदरच्या सर्व नोटिसा अटॅच करा.
तसेच या कॉपीची एक प्रत जवळच्या पोलिस ठाण्यात देखील देऊन ठेवा, कारण तेच दया कि - अश्या प्रकारामुळे आग लागून आर्थिक किंवा जीवितहानी होण्याची शक्यता.
बाकी वीजचोरी हा कायद्याने गुन्हा आहे त्यामुळे पोलिस या प्रकराची दाखल घेतील but इन केस काहीच नाही झाले तरी तुम्ही सोसायटी अध्यक्ष किंवा मेंबर्स म्हणून सर्व गोष्टी try केल्या आहेत आणि त्याचे पुरावे तुमच्याकडे असतील. त्यामुळे तुम्हाला घाबरण्याचे काही कारण नाही.
सर्व गोष्टी लेखी स्वरूपात करा. प्रत्येक अर्जावर सर्व सोसायटी कमिटी मेंबर्स ची नावे आणि सही घ्या. (हे महत्वाचे आहे, कारण लोकं नंतर पलटी खातात. त्यामुळे लेखी पुरावा असू दया ) आणि दाखल केलेल्या प्रत्येक अर्जाची पोहोच पावती घ्या-( हे मस्ट आहे )
बाकी जाणकार व्यक्ती ( सोसायटी अध्यक्ष किंवा मेंबर्स ) अजुन सांगतीलच.
9 Dec 2020 - 8:49 pm | कानडाऊ योगेशु
मित्रत्वाचा सल्ला द्यायचा झाला तर हेच सांगेन कि आधी तुम्ही आणि ज्याविरूध्द तक्रार करायची हे किती पाण्यात आहात ह्याचा अंदाज घ्या. वीजचोरी आणि बेकायदा बांधकाम ही गंभीर प्रकरणे आहेत आणि सरकारी कर्मचारी देखील कानाडोळा करताहेत ह्याचा अर्थ दोघांच्या मागे असामाजिक शक्तींचे पाठबळ असू शकते.वेळ पडली तर सोसायटीतली किती मंडळी तुमच्यासोबत असु शकतील ह्याचाही अंदाज घ्या.
9 Dec 2020 - 9:46 pm | शेर भाई
हा मुद्दा मनापासून पटला आहे.
9 Dec 2020 - 9:02 pm | जानु
या बाबतीत तुमच्याशी दोन अथवा तीन व्यक्ती जरी सोबत असल्या म्हणजे फक्त बोलणे नाही तर कायदेशीर बाबीत सहभागी असलेले म्हणातो, तरी तुम्ही जपुन रहावे ही देशसेवा नाही. वामनरावांचे ठळक केलेले आणि योगेश यांचे असामाजिक तत्वांचा कोन कायम लक्षात ठेवा. आपली ओळख किती? राजकीय, सामाजिक, पोलिस खात्यातील, याची खात्री नसेल तर पदाचा राजीनामा देणे हा सर्वात सुरक्षित उपाय.
9 Dec 2020 - 9:29 pm | बाप्पू
Yes. वर कानडाऊ योगेश यांनी सांगितल्याप्रमाणे तुमची आणि xyz व्यक्ती यांची पोहोच कम्पेर करा आणि मगच हे सर्व सोपस्कर कने योग्य राहील.
विनाकारण सोसायटी अध्यक्ष किंवा मेंबर या नात्याने वयक्तिक दुष्मनी ओढवून घेऊ नका. त्यापेक्षा या सर्व काटकटीपासून लांब राहून निवांत जिवन जगा. तसेही तुम्हाला वयक्तिक काही त्रास होत नसेल तर फालतू फंदात पडू नका. आणि पडणार च असाल तर सर्व कम्युनिकेशन लेखी आणि सर्व कमिटी मेम्बर्स ना सोबत घेउन करा.
9 Dec 2020 - 10:00 pm | शेर भाई
आमच्या कार्यकारिणीच्या याच बुजुर्ग सदस्यांनी आवाहन केल्यामुळे या लष्कराच्या भाकऱ्या भाजायला बसलो. आता लक्षात येत आहे कि पद सोडून देखील हे सगळे कार्यकारिणीत का राहिले. सगळ्याच गोष्टी Documentation करून ठेवत आहेच. पण नियम-बाह्य गोष्टी बिन-बोभाट चालतात हे बघून खूप चीड चीड होते
9 Dec 2020 - 9:41 pm | शेर भाई
|वीज कर्मचाऱ्यांना वरील मुद्दा क्रमांक १ ठामपणे सांगा, आणि सोसाइटी या प्रकरणात पार्टी होऊ शकत नाही हे स्पष्ट सांगा.
नमूद केल्या प्रमाणे सदस्याने सगळ्यांना चांगल्या प्रकारे Manage करून ठेवलं आहे. तसच सोसाइटी या प्रकरणात पार्टी होऊ शकत नाही हे ही त्याला चांगलंच ठाऊक आहे. असा काही उपाय आहे का ज्याने त्याच राजरोसपणे चोरी करण थांबू शकेल
|पंधरा दिवसांची नोटीस देऊन, रहिवाश्यांना विश्वासात घेऊन सोसाइटीच्या खर्चाने अनधिकृत बांधकाम पाडून टाका. मग नोटीस देऊन त्या सदस्यांकडून पाडकामाचा खर्च वसूल करा.
सदर सदस्य फार काळापासून कार्यकारिणीत आहेत, त्यामुळे जेव्हा केव्हा हा मुद्दा चर्चेला येतो तेव्हा फक्त चर्चा होते कृती होऊ देत नाहीत.
9 Dec 2020 - 10:35 pm | कानडाऊ योगेशु
जर हे लिखित असेल अथवा सरकारी प्रक्रियेचा भाग असेल तर व्यवस्थित ऑडिट वगैरे करुन वीजकंपनीलाच ऑफिशियली कळवा. ह्याने चेंडु वीज कंपनीच्या क्षेत्रात पडेल. आणि पुढची जबाबदारी वीजकंपनीचीच असेल.पुढेही काही समस्या उद्भवली तर ही कागदोपत्रे उपयोगी पडतील.पण इथेही सामोपचारच मार्ग अवलंबणे उत्तम ठरेल.
पण इथेही खबरदारी घेणे उत्तम ठरेल.
डोंबिवलीत काही वर्षांपूर्वी एक घटना घडली होती. असेच काही जागरुक सोसायटी सदस्यांनी सरकारने द्यावयाच्या असलेल्या पण मिळत नसलेल्या सोयींबाबत तक्रार केली तेव्हा तत्सम विभागाने सोसायटीचा सर्व कच्छचिट्टा काढला व त्यात असे आढळले कि इमारत अनिधिकृत(/नियमांत ब्सत नाही) आहे. तेव्हा ती इमारत कमीत कमी दिवसांची नोटीस देऊन लगोलग पाडली होती. सरकारी व्यवस्था एरवी कासवासारखी सुस्त असते पण वेळ येताच सश्यासारखी पळायला लागते.(संदर्भ :उखाड दिया)
10 Dec 2020 - 9:33 am | मराठी_माणूस
कोणते शहर ?
10 Dec 2020 - 12:18 pm | शेर भाई
मुंबई उपनगर Central Line
10 Dec 2020 - 9:55 am | सनईचौघडा
सदस्य दोन Air Conditioner, Heater आणि Microwave मुक्तहस्ते वापरत आहे>>>>
हे सगळं आहेच पण किमान 15 ट्यूबलाईट आणि आणि घराताल्या घरात शो म्हणून पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी काचेची लिफ्ट आहे.
सदर बंगल्याचा मालक 5 ठिकाणी दारूचे दुकानातून रोजज लाखो रु कमावतो.
पण वरील सर्व गोष्टी वापरूनही वीज बील दरमहा 150 रुपये होय फक्त दीडशे रुपये.
आणि आपण मध्यम वर्गिय शु. मा.
1000 पासून पुढे मुकाट भरत असतो.
10 Dec 2020 - 10:18 am | सुबोध खरे
आपण मध्यम वर्गिय शु. मा.
1000 पासून पुढे मुकाट भरत असतो.
कारण तुम्हाला पर्याय नसतो. आणि म्हणूनच तुम्ही आम्ही मध्यमवर्गीय पापभिरू इ इ असतो.
वाईट वाटून घेऊ नका.
आपल्या आजूबाजूचे सरकारी खाबू अधिकारी, सोशल वर्कर (समाजसेवक म्हणायचं नाही) आमदार खासदार मंत्री हे लोक काम काय करतात आणि त्यांची मालमत्ता किती असते/ याचा कधीही मेळ लागणार नाही.
आपण ते करू शकत नाही कारण एक तर संधी नसते किंवा हातात सत्ता नसते आणि असली तरी काही लोकांना ते करण्याची हिम्मत होत नाही.
फार तर एक टक्का लोक असे आहेत कि ज्यांना संधी असून ते भ्रष्ट नाहीत.
माणूस हा स्वार्थी आहे हे मूळ.
10 Dec 2020 - 8:40 pm | रामदास२९
खर आहे ..
10 Dec 2020 - 11:22 am | साहना
ऊर्जा विभागाचे १००% खाजगी कारण झाल्यास अंबानी अडाणी इत्यादी आम्हा सर्वाना लुबाडतील म्हणून सरकारने हि कृपा केली आहे.
10 Dec 2020 - 8:41 pm | रामदास२९
खर आहे .. नाहीतरी आता .. राजकारणी लुबाडतातच की ... हजारो कोटीन्चे घोटाळे ..
10 Dec 2020 - 11:05 pm | बाप्पू
खाजगीकरण म्हणजे लुबाडणूक..
उद्योगपती म्हणजे लुबाडणूक..
आणि आता नवीन नवीन आलेले..
उद्योगपती म्हणजे फक्त अदानी आणि अंबानी.
हा देश अँटी उद्योजक आणि अँटी श्रीमंत आहे हेच खरे. इथे फक्त हमाल, शेतकरी, कष्टकरी, आणि राजकारणी हेच ते खरे प्रामाणिक. आणि उद्योजक / उद्योगपती हे त्यांच्या जीवावर बसून आणि लुबाडून खातात..
धन्य ते डावे लोकं आणि धन्य त्यांची विचासरणी..
12 Dec 2020 - 4:43 am | साहना
अहो वीज वापर हाच मुळी चंगळवाद आहे. वीज वापरून श्रीमंत लोक करतात काय तर मिक्सर लावतात आणि AC लावतात. रगड्यावर वाटून केलेल्या आमटीची सर मिक्सर वाल्याना कुठे येणार ? आईच्या पदराचे प्रेम जीन्स घातलेली मम्मी कशी देईल ?
त्यामुळे वीज नसेल तरच बरे आहे ! शेतांत उन्हात काम करणारा शेतकरी तोच काय तो बिचारा हार्ड-वर्किंग आणि हाड-नॉन-वर्किंग , हि पुण्य मुंबईची माणसं पैश्यांच्या मागे धावून माणूसपणा विसरली आहेत इत्यादी इत्यादी ...
10 Dec 2020 - 11:27 pm | शेर भाई
मुळात मीटरच नाही तर १५० रुपये बिल कस काय येईल? आणि तस हि आमची गृहनिर्माण संस्था आहे. बंगले नाहीत
11 Dec 2020 - 10:11 am | सनईचौघडा
काहीतरी गफलत होते आहे.
>>>>>>>>>>>>>>>>>>
10 Dec 2020 - 11:27 pm | शेर भाई
मुळात मीटरच नाही तर १५० रुपये बिल कस काय येईल? आणि तस हि आमची गृहनिर्माण संस्था आहे. बंगले नाहीत .>>>>>>>>>>>>>
अहो मी जे सांगितले ते आमच्या इथे असं घडतंय ते सांगत आहे. त्या माणासाने एम.ए.सी.बी च्या माणसाशी काहीतरी संधान बांधले आहे असं मी म्हटंलं आहे
आणि तुम्ही काहीतरी वेगळं समजंत आहात.
11 Dec 2020 - 8:32 pm | शेर भाई
तुम्ही संदर्भ दिला नसल्याने गल्लत झाली.
आमच्याकडून एक Sorry घ्या!!
10 Dec 2020 - 10:23 am | कंजूस
बिनबोभाट.
प्रकरण तुमच्याच अंगावर शेकणार नाही हे पाहा.
सोसायटीच्या कमिटीच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. इतर मेंबरस सह्या करायला तयार आहेत का?
10 Dec 2020 - 12:42 pm | शेर भाई
एका कार्यकारिणी सभासदाने अशी माहिती आणली आहे कि नवीन वीज मापन पद्धतीनुसार आता वीज मापन दोन ठिकाणी होते. उदा. संस्थेत २० गाळे आहेत तर प्रत्येक गाळा धारकाचे वीज मापन संस्थेच्या मीटर रूम मध्ये होते, आणि त्या उपर २० गाळ्यांचा मिळून एक मीटर जंक्शन बॉक्स मध्ये असतो. जर २० गाळ्यांचे मापन १०० यूनिट आले. आणि जंक्शन बॉक्समधला मीटर ११० यूनिट दाखवत असेल तर वरचे १० यूनिट सगळ्या गाळ्यांमध्ये ०.५ या हिशेबाने सगळ्या २० गाळ्यांमध्ये विभागला जातो.
हे जर खरं असेल तर वीज मंडळाच्या निष्क्रियतेचे कारण लक्षात येते. म्हणजे सध्या अतिरिक्त वीज वापराचे पैसे आम्ही भरत आहोत, आणि जेव्हा केव्हा ते action घेतील तेव्हा सदर सदस्याकडून सगळं व्याजासकट मिळणार आहेच.
हा मुद्दा लक्षात येताच कार्यकारिणीचे इतर सभासद सह्या करायला तयार आहेत.
पण ही माहिती खरी आहे का, जाणकारांनी आपले मत मांडावे
12 Dec 2020 - 4:55 am | साहना
- कॉमन एरिया ची जबाबदारी सोसायटीवर असते. तेथून कुठलीही गोष्ट उदाहरणार्थ मीटर गायब झाला तर सोसायटीला हस्तक्षेप करण्याचा संपूर्ण अधिकार आहे.
- वीज मीटर गायब आहे हि वीज कंपनीची हलगर्जी आहे. वीज चोरीचा सर्वांत मोठा दुष्प्रभाव म्हणजे आगीची शक्यता. आग फ्लॅट मध्ये लागली तरी संपूर्ण बिल्डिंग च्या सुरक्षेची जबाबदारी सोसायटीची आहे. अर्थात 'due diligence' दाखवण्यापुरती. उद्या आग लागून ४ लोक मेले तर शंभर टक्के सोसायटी वर गुन्हा दाखल होईलच. अश्या वेळी हे due डिलिजन्स महत्वाचे ठरेल.
- आग लागली तर वीज कंपनी सुद्धा इथे जबाबदार ठरते त्यामुळे सोसायटीने रीतसर पणे हे वीज कंपनीच्या उच्च अधिकाऱ्यांना पत्र पाठवून कळवावे त्याशिवाय इतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सुद्धा CC करावे.
वीज चोरीमुळे आग लागून फ्लॅट होत्याच नव्हता होऊ शकतो असे भय संपूर्ण सोसायटीला घातले तर अनेक मंडळी हा आपला स्वतःचा विषय बनवतील.
10 Dec 2020 - 1:19 pm | कंजूस
तुमच्या संस्थेच्या दप्तरात - सोसायटी नोंदणीपासून इतर पोर्टफोलिओ ठेवलेले असतात. बँक खाते, पाणी कनेक्शन कागदपत्रे, एनए, तसेच वीज मंडळाशी पत्रव्यवहार. त्यात तारखेप्रमाणे
१) वीज मंडळाकडे सोसायटीने /सोसयटीतर्फे बिल्डरने केलेली कनेक्शन केबल आणि गाळ्याप्रमाणे जोडणीच्या मागणीचे पत्र.
२) क्रमांक (१) ला आलेले मंडळाचे उत्तर - की अमक्या लांबीची केबल आणि इतके मीटर्स लावण्याचा खर्च अधिक पहिली जोडणी म्हणून इतके डिपॉझिट अमुक ठिकाणी इतके रुपये जमा करा.
३) पैसे चेकने भरल्याच्या दोन पावत्या. - चार्जेसची एक आणि डिपोझिटची एक.
४) जोडणी करून गेल्यावर मंडळाने पाठवले अधिकृत जोडणी झालेले पत्र.
तर क्रमांक (४) प्रमाणे मीटरस दिसत नसल्याने म्हणजे मीटर चोरीला गेलेल्याची तक्रार पोलिसांत देण्यासंबंधी कमिटी मिटिंग बोलावण्याची नोटीस बोर्डावर लावा. ( तीन दिवसांत मीटर आपोआप हजर होईल)
10 Dec 2020 - 1:45 pm | शेर भाई
म्हाडाने आमची इमारत बांधली १९७० च्या सुमारास, आमची गृहनिर्माण संस्था २००० साली स्थापन झाली.
त्यामुळे "मीटर चोरीला गेलेल्याची तक्रार पोलिसांत देण्यासंबंधी कमिटी मिटिंग बोलावण्याची नोटीस बोर्डावर लावणे" हा पर्याय वापरून पाहतो.
10 Dec 2020 - 2:56 pm | कंजूस
मीटर आपल्या नावे करत नाहीत. सोसायटीच्याच नावावर असतात. मग काय तक्रार दाखल करण्यात कमिटीला काहीच अडचण नाही.
10 Dec 2020 - 3:12 pm | शेर भाई
वर नमुद केलेली नवीन मापन पद्धत योग्य आहे का?
11 Dec 2020 - 5:54 am | कंजूस
डबल मीटर ठीक आहे वीज चोरी किंवा गळती शोधण्यासाठी.
समजा मेन ट्रानसफरमर गल्लीच्या तोंडाशी आहे त्याचे मापन हे साधारण वीज पाठवलेल्या उप ग्राहकांच्या वापराशी बेरीज करून जवळपास मेळ होत नसेल तर वीज गळते हे समजते.
10 Dec 2020 - 8:39 pm | रामदास२९
स्वानुभव सान्गतो .. आमच्या सोसायटी मध्ये एक उद्योजक(माहित नाही, कसला .. काळ्याचा पान्ढरा करणारा असावा) .. पदाधिकारी झाला .. मेन्टेनन्स चे हिशोब आम्ही online देत होतो तर म्हणे रोख द्या.. आणि जे सदस्य online देत होते त्यान्ना टोमणे मारणे, माझ्यावर विश्वास नाही बोलणे, वार्षिक हिशोब न देणे असे करत होता.. काही सद्स्य तोन्डावर एक आणि त्याच्या समोर गोड गोड .. अस दुट्प्पी वागतात ... आता सोसायटी च पुनर्निर्माण झाले आहे तर त्याच घर बान्केकडे तारण आहे अस कळाल.. तरी मग्रुरी .. कोणी ( जे सद्स्य थोडाफार तरी विरोध करतात ते) काहिही बोलले तर शिव्या देणे, माझे राजकिय (सध्या सत्तेवर आलेल्या) सम्बन्ध आहेत, बघून घेइन अस बोलणे अस चालू असत..
जरी एकट्याच नुकसान नसल तरी हि असली मग्रुरी चीड आणते ..
11 Dec 2020 - 1:56 pm | पिनाक
एक दिवस सोसायटी तली लाईट बंद करा आणि पकडून, अंगावर कांबळे टाकून काठी ने बडवा.
11 Dec 2020 - 8:36 pm | शेर भाई
अंगावर कांबळ असेल तर बडवून मार लागेल का?
अस काही तरी सांगा ज्यामुळे त्याच्या मनाला यातना होतील आणि तो स्वत: आपली चुक सुधारेल
10 Dec 2020 - 9:38 pm | Rajesh188
मुंबई महाराष्ट्र विद्युत मंडळ वीज वितरण करत नाही.
टाटा,बेस्ट आणि रिलायन्स करते.
वीज मीटर न वापरता विजेचा वापर होतो म्हणजे तो फुकट असतो असे नाही.
सर्व संबंधित लोकांना पैसे दिल्या शिवाय ह्या गोष्टी शक्य नसतात.
आपण कसे सिग्नल तोडला की 10 ते 20 देतो तसे आहे.
10 Dec 2020 - 9:45 pm | कानडाऊ योगेशु
खरे आहे.पण हा खर्च नेहेमीच्या वीजबिलापेक्षा कमी कसा असु शकतो हा हिशोब लागत नाही.
म्हणजे मीटर वापरुन व त्यात गडबड करुन वीजबिल कमी दाखवणे एकवेळ समजु शकतो पण चक्क मीटरच गायब करणे हे माझ्या आकलना पलिकडचे आहे कारण हा अतिशय गंभीर गुन्हा आहे ज्यात वीजकर्मचारी व ग्राहक(?) दोन्हीही फसु शकतात.
18 Dec 2020 - 8:11 am | रामपुरी
फसु शकतात??? म्हणजे काय?
हिंदी मिश्रित मराठी वाचून प्रचंड चिडचीड झालेली आहे.
10 Dec 2020 - 11:33 pm | शेर भाई
अदानी आणि टाटा आहेत.
लेखात नमूद केल्याप्रमाणे सगळं setting व्यवस्थित आहे. प्रश्न हा आहे का स्वत: नामा निराळ राहून काही करता येईल का?
चर्चा योग्य रस्त्यावर ठेवल्याबद्दल आभार
10 Dec 2020 - 9:39 pm | Rajesh188
असे वाचावे.
10 Dec 2020 - 10:00 pm | Rajesh188
ह्या सर्व नगरसेवक,गुंड अधिकारी ह्यांच्या संगनमत नी ह्या सर्व गोष्टी घडतात.
पाण्याच्या मूळ लाईन मधून पानी चोरणे,वीज चोरणे ,हे सर्रास घडते.
झोपपट्टी कशी उभी राहते.
गुंड,नगरसेवक,सरकारी अधिकारी ह्यांच्या संगनमताने.
पाणी चोरून विकले जाते वीज चोरून विकली जाते .
ज्यांना विकतात त्यांचा पण फायदा आणि जे चोरून विकतात त्यांचा पण फायदा ह्यांच्या कोणाच्याच बापाचे काही जात नाही.
आणि सर्रास घडते दुर्मिळ घटना म्हणून ह्या प्रकार कडे पाहू नका .
मध्यम वर्गीय माणूस सरळ ,साधा ,सरळ रेषेत चालणारा असतो त्याला जेव्हा हे माहीत पडते तेव्हा त्याला आश्चर्य वाटते.
पण भारत असाच चालतो.
10 Dec 2020 - 11:39 pm | शेर भाई
आपले आवडते रंग आपल्या जवळ ठेवून, आपल्याकडे असच असत हे मान्य करून, चर्चा योग्य रस्त्यावर आणून, समस्येवर काही उपाय असेल तर सांगा
Infection झाल आहे कुठला Anti – virus आहे का ते सांगा?
10 Dec 2020 - 11:45 pm | कानडाऊ योगेशु
एकुण हे लांब चालणारे प्रकरण दिसतेय.ह्यात जितके कागदी घोडे नाचवता येतील तितके नाचवावेत.देव न करो पण प्रकरण कोर्टात गेलेच तर पुढे ह्याला कायदेशीर दस्ताऐवजांचे स्वरूप देता येईल.
12 Dec 2020 - 4:39 am | साहना
ज्याच्या कडे सत्ता आहे तो माणूस ती वापरून वाट्टेल तिथे आपले "रेंट" घेणारच, त्यात कुणालाही दोष देऊन फायदा नाही. मूळ प्रश्न हा आहे कि ह्या भलत्या लोकांच्या हातात मुलांत सत्ता हवीच का ?
खरें तर कोण वीज चोरत असेल तर सोसाईटच्या व्यवस्थापनाचा तिथे काहीही संबंध नाही आणि त्यांना ह्यांत नाक खुपसण्याची गरज सुद्धा नाही. उदाहरण द्यायचे झाले तर हि व्यक्ती शेजाऱ्याचे wifi वापरत असेल किंवा आणखीन कुणाचे केबल कनेक्शन चोरत असेल तर इथे सॊसायटी मंडळाने लक्ष घातले असते का ? विजेच्या बाबतीत वीज कंपनीला इथे तोटा होत आहे त्यामुळे आपल्या संपत्तीचे रक्षण करायची सर्वस्वी जबाबदारी त्याच लोकांची आहे.
सोसायटी मंडळाला वीज कंपनी धमकी देत आहे हेच इथे मूळ प्रॉब्लेम आहे. वीज कंपनीच्या म्हशींचे दूध आणखीन कोणी काढत असेल तर सोसायटीला का बरे उठाबशा काढाव्या लागतील ? हि जबाबदारी १००% वीज कंपनीची आहे. वरून ह्या वीजचोरीमुळे उद्या आग वगैरे लागली तरी वीज चोर आणि वीज कंपनी दोघांनाही संपूर्ण पणे जबाबदार ठरवले पाहिजे.
टीप : इथे वीजकंपनी डबघाईस आली की करदात्यांचा पैसा टाकून सरकार असल्या भ्रष्ट कंपन्यांना पुन्हा वर काढते. त्यामुळे करदात्यांना वाईट वाटते. पण झोपा बैल जाण्याच्या आधीच केला पाहिजे नंतर नाही.
10 Dec 2020 - 11:53 pm | Rajesh188
कधी मानसिक त्रास पण होतो.
विजेचे कनेक्शन हे वैयतिक असते त्याचा सोसायटी शी काही संबंध नसतो हे मत व्यक्त झालेले च आहे ते योग्य च आहे.
तो व्यक्ती मीटर वापरत नाही मग वीज कधी कशी वापरतो मीटर ला त्यांनी बायपास connection देवून डायरेक्ट वीज घेतली आहे का?
असे केले असेल तर आधुनिक सिस्टम असलेल्या वीज कंपन्यांना ते सहज माहीत पडत .
तो व्यक्ती स्वतः च मीटर न वापरता सोसायटी chya मिटर मधून वीज घेत असेल तरच सोसायटी चा त्याच्या शी संबंध येईल.
बाकी कमीत कमी बिल हे तुम्ही राहत असलेल्या फ्लॅट chya आकारावर असते .आणि मीटर बंद असेल तरी ते भरणे गरजेचे असते.
उच्च पातळी वर निनावी तक्रारी तुम्ही करू शकता.
त्याची दखल कोणी तरी घेईलच.
11 Dec 2020 - 1:19 am | शेर भाई
आधुनिक सिस्टम असलेल्या वीज कंपन्यांना ते सहज माहीत पडत
माहित असून सुद्धा काहीच होत नाही आहे. Vigilance ला स्वत: नामा निराळ राहून कस हलवता येईल. Escalation समजत नाही आहे.
11 Dec 2020 - 1:26 am | कपिलमुनी
त्याच्या फ्लॅट ला जाणाऱ्या वायरला आकडा टाकून तुमची वीज सुरू करा.
१. तो फुकट वीज वापरतो याबद्दल तुम्हाला वाईट वाटणे बंद होईल
२. मग हा प्रॉब्लेम बाकीच्याचा होईल , तुम्ही निवांत राहा
11 Dec 2020 - 12:41 pm | कानडाऊ योगेशु
ती व्यक्ती च्या जागी तो व्यक्ती असे लिहिलेले वाचुन प्रचंड चीडचीड झाली.;)
11 Dec 2020 - 8:57 pm | सतिश गावडे
ती व्यक्ती की तो व्यक्ती या प्रश्नाचा सखोल उहापोह भूगोलची बूक सापडत नाही या लेखात केला आहे. :)
11 Dec 2020 - 8:29 pm | शेर भाई
@ कपिलमुनीG
त्याच्या फ्लॅट ला जाणाऱ्या वायरला आकडा टाकून तुमची वीज सुरू करा, हा मुद्दाच इथे गैर लागू आहे. त्यामुळे वाईट वाटणे हा विषयच नाही.
@ कानडाऊ योगेशुG
ती व्यक्ती च्या जागी तो व्यक्ती असे लिहिलेले वाचुन प्रचंड चीडचीड झाली:)
चीडचीड झाली तर सप्त-चटणी वडा-पाव खा आणि वर तुमच्या आवडीचा अमृततुल्य प्या
बाकी चर्चा योग्य रस्त्यावर आणून द्यालच .
12 Dec 2020 - 8:16 am | Rajesh188
निनावी तक्रारी सर्व स्तरावर करत रहा.कोणीतरी दखल घेईल च.
पण अशा प्रकरणाचा फांडफोड करायचा असेल तर उघडपणे समोर यावच लागेल.
बाकी चोरी च म्हणाल तर चोरी सर्व ठिकाणी चालू आहे.
वीज चोरी,टॅक्स चोरी,पाणीचोरी,बँका मध्ये फसवणूक,रस्ते चोरी,धरण चोरी,जंगल चोरी.
चहू बाजूला चोरांचा सुळसुळाट झालेला आहे.
जो पर्यंत आपल्याला काही नुकसान होत नाही तो पर्यंत बघत राहणे.
आणि मन शांती टिकवणे.
12 Dec 2020 - 9:18 am | मराठी_माणूस
मग आपल्याला जेंव्हा नुकसान होते तेंव्हा इतर बघत बसतात.
12 Dec 2020 - 10:41 am | तुषार काळभोर
मागील दोन महिन्यात दोन प्रसंगात एकूण तीन अनुभव घेतलेत.
पहिल्या प्रसंगात एअरटेल पेमेंट बँक आणि महावितरण.
दुसऱ्या प्रकरणात एअरटेल पेमेंट बँक.
ईमेल वगैरे करून दहा दिवस नुसतं कॉपी पेस्ट तयार उत्तरं मिळत होती.
ट्विटर च्या चव्हाट्यावर मांडलं आणि काही तासात प्रॉब्लेम सुटला.
महावितरण च्या नावाने ट्विट करताना ऊर्जा मंत्र्यांना नक्की टॅग करा. (सध्या श्री नितीन राऊत आहेत.)
पोलिसांना ट्विट करताना गृह राज्यमंत्री, गृहमंत्री यांना नक्की टॅग करा.
यदाकदाचित नाहीच झालं, तर पुढच्या ट्विट मध्ये एबीपी माझा, लोकमत, सकाळ, लोकसत्ता, झी 24 तास, यांना टॅग करायचं.
दुर्दैवाने ट्विटर हे अनधिकृत आणि जास्त कार्यक्षम ' ग्राहक सेवा केंद्र ' झालं आहे.
12 Dec 2020 - 5:52 pm | कंजूस
सभासदाच्या नावावर असेल तर सोसाइटी कशी तक्रार करणार ?