भोपाळ गॅस दुर्घटना : दुसरी न पाहिलेली बाजू

साहना's picture
साहना in काथ्याकूट
7 Dec 2020 - 2:49 pm
गाभा: 

टीप : लेखिकेने हे भाषांतर केले आहे. पण हे भाषांतर खूप स्वैर प्रकारचे असून लेखिकेचे स्वतःचे मत सुद्धा ह्यांत कदाचित दिसून येईल. त्यामुळे भाषांतरात काहीही तफावत हि लेखिकेची त्रुटी समजावी मूळ लेखाची नाही. मूळ लेख तुम्ही इथे वाचू शकता. https://medium.com/@ravithinkz/before-you-say-may-warren-anderson-rot-in...

टिप २: हा लेख सर्वप्रथम मिपावर टाकला आहे पण प्रूफरिडींग केले नाही. चूकभूल द्यावी घ्यावी. थोडफ़ेरफ़ार आणि शुद्धी करून खूप ठिकाणी पसरवण्याचा इरादा आहे.

युनियन कार्बाईड चे सीईओ वॉरेन अँडरसन ह्यांचा मृत्यू ४ वर्ष मागे झाला. न्यू यॉर्क टाईम्स ने त्यांची शोकवार्ता आपल्या पेपर मध्ये प्रकाशित केली. एक्का सामान्य गरीब घराण्यात त्यांचा जन्म झाला. हळू हळू जगांतील तिसऱ्या नंबरची सर्वांत मोठी रासायनिक कंपनी त्यांनी स्थापन केली. भारतीय लोकांना मात्र ह्या मृत्यूचे अजिबात वाईट वाटले नाही. भारतभर लोकांनी त्याला शिव्यांच्या लाखोल्या पहिल्याच पण भारतीय वर्तमानपत्रांनी सुद्धा वॉरेन ह्यांच्यवर सडकून टीका केली. ह्याचे कारण सोपे होते. भोपाळ गॅस दुर्घटना. आधुनिक भारताच्या इतिहासानं हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या अश्या घटना आहेत ज्या संपूर्ण समाजाच्या मनावर एक घर करून आहेत. लातूर भूकंप, भुज भूकंप, मुबई पूर, २६/११ इत्यादींच्या यादींत भोपाळ गॅस दुर्घटना खूप वर आहे. एका सामान्य परिवाराने दिवसभर थकून काम करून रात्री आपल्या हक्काच्या घरांत सुरक्षित पणे झोपावे पण पुन्हा उठू नये ह्यापेक्षा भयावह ती गोष्ट काय आहे ? भारतीय जनतेने वॉरेन अँडरसन ह्या व्यक्तीला ह्या गोष्टीसाठी दोषी धरले. ह्या आयुष्यांत नाही तर पुढील आयुष्यांत ह्या कुकर्मी माणसाला ईश्वर शिक्षा करो असेच भारतीयांनी म्हटले.

काँग्रेस विरोधी मंडळी आज सुद्धा राजीव गांधी आणि त्यांच्या इतर चमच्यांना दोषी ठरवतात. अमेरिकन सरकारच्या दबावाखाली त्यांनी अंडरसनला भारतातून पळून जायला मदत केली असे त्यांचे मत आहे. पी साईनाथ आणि असंख्य डाव्या मंडळींनी भोपाळ दुर्घटनेचे भय घालून देशांतील कुठल्याही खाजगी प्रकल्पाला विरोध केला आहे. आज देशांत काहीही नवीन प्रकल्प म्हटला कि विरोध करायला असंख्य लोक उभे राहतात आणि भोपाळ दुर्घटनेची चित्रे पुन्हा आमचं डोळ्यापुढे येतात. भोपाळ जे दुर्घटना देशांतील सर्वांत मोठी औद्योगिक दुर्घटना आहेच पण जगांतील सर्वांत मोठ्या औद्यीगिक दुर्घटनांपैकी एक आहे.

"Bhopal marked the horrific beginning of a new era, one that signaled the collapse of restraint on corporate power," - साईनाथ

सर्व भारतीयांची अशीच समजूत आहे कि नफ्याच्या मागे लागलेली दुष्ट गोऱ्या लोकांच्या कंपनीने भारतीय सरकारच्या नियमाचे उल्लंघन केले आणि फायद्यासाठी भारतीय गरीब लोकांचा बळी दिला. ह्या लोकांच्या जीवनाची किंमत त्यांचं दृष्टीने सुरक्षा मापदंडाच्या खर्चा पेक्षा कमी होती.

पण ह्या सर्व आरोपांत तथ्य आहे का ? ह्याची दुसरी बाजू काय ? व्हर्जिनिया मध्ये युनियन कार्बाईड चा सेविन प्लांट भोपाळ मधील प्लांट प्रमाणेच होता पण किमान ७ पटीने मोठा होता. सेफ्टी फर्स्ट (सुरक्षा सर्वप्रथम) हा ह्या कंपनीचा मोटो होता. इथं कधीही मोठे अपघात झाले नाहीत. कमल पारीख हे तरुण भारतीय अभियंते इथे अभ्यासासाठी गेले होते. त्यांनी तेथील सुरक्षा प्रक्रियांची खूप स्तुती केली होती. तेथील कार्यकुशलता आणि सुरक्षा ह्यांना कंपनीने दिलेले महत्व ह्यावर त्यांनी लिहिले आहे.

“It was a pleasure working with those American engineers. They were so professional, so attentive to details, where as we Indians often have a tendency to overlook them. If they weren’t satisfied, they wouldn’t let us move on to the next stage. For weeks on end, we made a concerted effort with our American colleagues to imagine every possible incident and its consequences.”

(अमेरिकन अभियंत्यासोबत काम करणे आनंददायक अनुभव होता. ते अत्यंत कार्यकुशल होते आणि प्रत्येक बारीक गोष्टीकडे त्यांचे नेहमीच ज्ञान असायचे ह्याउलट आम्ही भारतीय अनेक वेळा अश्या गोष्टींना नजरअंदाज करायचो. त्यांचे समाधान झाले नाही तर ते आम्हाला पुढील कमला जाऊ द्यायचे नाहीत. खूप आठवडे आम्ही खूप प्रयत्न करून केले आणि आमच्या अमेरिकन अभियंत्यासोबत प्रत्येक अपघात आणि त्याचे परिणाम ह्यावर सखोल विचार केला).

सुरक्षेला इतके प्राधान्य देणाऱ्या ह्या कामापनीकडून टिचकी मोठी चूक कशी घडली ? जर अभियंत्यांनी इतका खोल विचार केला होता तर मग नक्की अपघात कसा घडला ? नक्की चूक कुठे घडली ? निव्वळ हलगर्जीपणा इथे कारणीभूत होता कि भारतीय व्यवस्थेत काही तरी मूलभूत कमतरता होती ?

कार्बाइड चे भूत

सर्वप्रथम शाळेंत आम्ही isocyanate ह्या रासायनिक ग्रुप बद्दल शिकतो आणि कधी कधी पाठयपुस्तकांत भोपाळ गॅस दुर्घटनेची नोंद सुद्धा असते. Methyl Isocyanate (MIC) हे प्रचंड विषारी द्रव्य आहे. ह्याचा उत्कलनांक म्हणजे बाष्पीभवन होण्याचे तापमान खूप कमी असते आणि हे रसायन फक्त स्टील किंवा ग्लास मध्ये ठेवले जाऊ शकते. १९७० मध्ये भारतांत MIC सारखे विषारी द्रव्य सुरक्षित पणे ढेवण्याची क्षमता (तंत्रज्ञान आणि कार्यकुशल अभियंते) होती का ? MIC चा संबंध पाण्याबरोबर आला कि विस्फोटक पद्धतीने त्यातून विषारी वायू निर्माण होतात. हेच नेमके भोपाळ मध्ये घडले.

मुळांत एका अमेरिकन कंपनीने इतक्या अत्याधुनिक आवश्यकतेचा प्रकल्प भारतांत आणि त्यांतल्या त्यांत भोपाळ मध्ये घातलाच का ? ह्याची गरज काय होती ? दुर्घटनेची पार्शवभूमी समजून घेण्यासाठी हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

इतिहास

१९३४ मध्ये युनियन कार्बाईड ने भारतांत प्रवेश केला. ब्रिटिश राज मध्ये हि कंपनी बॅटरी म्हणजे ड्राय सेल आयात करून विकत होती. हळू हळू त्यांनी भारतांतच बॅटरी निर्माण प्रकल्प सुरु केला. एव्हररेडी हा त्यांचा ब्रँड भारतांत तुफान लोकप्रिय होता. त्याकाळी ८६% भारतीय जनता हि खेडेगावांत आणि ब्रिटिश गुलामीत खितपत पडली होती आणि त्यांनी वीज पाहिली सुद्धा नव्हती. बॅटरी सुद्धा महाग असली तरी त्याकाळी तिचा फायदा प्रचंड होता.

१९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि राजकीय तसेच औद्योगिक समीकरणे बदलली. १९४८ आणि नंतर १९५६ चेरमन नेहरू (प्लॅनिंग कमिशन) ह्यांनी नवीन समाजवादी औद्योगिक पॉलिसी आणली. खाजगी आणि सार्वजनिक उद्योग ह्या दोघांना तडा देऊन त्यांनी एक नवीन प्रकारची प्रणाली आणली जाते सरकारला प्रत्येक गोष्टीं ढवळाढवळ करण्याची अमर्याद शक्ती होती. त्याशिवाय मोहनदास गांधी ह्यांची स्वदेशी विचारसरणीचा प्रभाव सुद्धा भारतीय राज्यकर्त्यांवर होता ज्याच्या अंतर्गत त्यांनी विदेशातून कुठलेही तंत्रज्ञान भारतात आणायला बंदी घातली आणि आणलेच तर ते भारतीयांच्या स्वाधीन करण्याची ताकीद दिली. मग भारतीयांत ती क्षमता असो व नसो.

Where technology is available in India, it must be preferred to foreign technology (regardless of the quality). All technology, once imported into India, is Indian technology. It should not be paid for beyond a period of five years. — Industrial Policy, 1948

(भारतात जे तंत्रज्ञान उपलब्ध आहे त्यालाच नेहमी प्राधान्य दिले पाहिजे ( विदेशी तंत्रज्ञानापेक्षा) आणि त्याचा दर्जा कीतीही खालचा असला तरी चालेल. सर्व तंत्रज्ञान भारतात आले कि ते भारतीय तंत्रज्ञान बनेल. त्याच्यासाठी ५ वर्षापेक्षा जास्त काळ पैसे देऊ नयेत. )

१९५६ मध्ये ह्याच्या अंतर्गत कंपनी कायदा आला आणि युनिअन कार्बाईडला ४०% भाग जबरदस्तीने भारतीय संस्थांना विकावा लागला. ह्यातील सुमारे २५% भारतीय सरकारने तर इतर भारतीय सरकारी बँकांनी विकत घेतला. आणि युनियन कार्बाईड इंडिया लिमिटेड हि कंपनी निर्माण झाली.

१९५७ साली अमेरिकेत एक विशेष शोध लागला. युनियन कार्बाईड कंपनीने अमेरिकेत सेविन ह्या रसायनाचा शोध लावला. त्याकाळी DDT हे कीटकनाशक प्रसिद्ध होते पण ते मानवी आरोग्यासाठी प्रचंड हानिकारक आहे हे जगाला ठाऊक झाले होते. त्याशिवाय निसर्गांत DDT चे प्रमाण इतके वाढले होते कि कीटक सुद्धा त्याला दाद देत नव्हते.
ह्या मोक्याच्या वेळी सेविन चा शोध म्हणजे मानवी क्षमतेचे एक उत्तम उदाहरण होते. सेविन हे मानवी आरोग्यासाठी अपायकारक नाही हे सिद्ध करण्यासाठी युनियन कार्बाईड च्या वैज्ञानिक मंडळींनी त्याचे सेवन सुद्धा करून त्याचे फोटो पेपर मध्ये छापून आणले होते. MIC हा सेविन चा एक प्रमुख घटक असला तरी सेवींन हे विषारी नव्हते.

इजिप्त देशांत कापूस पिकवला जातो आणि त्यांचे बहुतेक उत्पन्न त्यातून येते १९६१ साली तिथे प्रचंड कीटकांचा प्रादुर्भाव झाला पण सेवीन मुळे इजिप्त देशाने एक मोठे संकट टाळले. ह्याला इतकी प्रसिद्धी मिळाली की जगभर सेविन अत्यंत लोकप्रिय झाले.

भारतीय हरित क्रांती

१९६० च्या दशकांत भारतांत अन्नधान्याचा प्रचंड तुटवडा झाला. परिस्थती इतकी गाम्भी होती कि तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री ह्यांनी भारतीय जनतेने आठव्यातील एक दिवस उपास करावा अशी विनंती केली होती. भारतीय जनता आणि शेतकरी ह्यातून मार्ग शोधत होते. त्याकाळी अमेरिकेने पब्लिक लॉ ४८० च्या अंतर्गत रेड क्रॉस कडून भारतीय शेतकऱ्यांना सुमारे ८०० टन सेविन पाठवून दिले. भारतीय हरित क्रांतीत ह्याचा फार मोठा हातभार होता. सेविन ला भारतांत मागणी आहे म्हणून युनियन कार्बाईड इंडिया लिमिटेड ने भारतीय सरकारकडून सर्व प्रकारच्या परवानग्या घेऊन शेती क्षेत्रांत प्रवेश केला. आणि अमेरिकेतील सेविन आयात करून त्याला थोडे सौम्य करून पॅकेज करून विकायला सुरुवात केली.

भारतीय सरकार हिट्स बॅक

भारतीय औद्योगिक धोरण ह्या दृष्टीने फारच कुचकामी होते. युनियन कार्बाईड ला डॉलर देऊन युनियन कार्बाईड लिमिटेड सेविन आयात करत होतीस्वातंत्र्याच्या कालावधीपासून भारतीय आर्थिक धोरण हे विविध आर्थिक थोतांडावर आधारित आहे. त्यातले एक महत्वाचे थोतांड म्हणजे सरकार मार्केटला पूर्णपणे फाटा देऊन कुठल्याही गोष्टीचे दर जबरदस्तीने ठरवू शकते हे आहे. त्यामुळे भारत सरकार रुपया आणि डॉलर चा रेट स्वतःच जबरदस्तीने ठरवू पाहत होते. त्यामुळे कुणीही भारत सरकारला डॉलर देऊन रुपये घेऊ पाहत नव्हते त्यामुळे भारतीय गंगाजळी संपायला आली होती. भारतीय सरकारचा आडमुठेपणा आंतरराष्ट्रीय स्तरावर हास्यसपद ठरला होता.

When a currency is overvalued by decree (rupee, in this case), people rush to exchange it for the undervalued currency(US dollar, in this case) at the bargain rates; this causes a surplus of overvalued currency (rupee), and a shortage of the undervalued currency (dollar). The rate, in short, is prevented from moving to clear the exchange market. In the present world, foreign currencies have generally been overvalued relative to the dollar. The result has been the famous phenomenon of the “dollar shortage”. — Murray Rothbard, 1961 (ह्याचे भाषांतर करणे माझ्या आवाक्याच्या बाहेर आहे. क्षमा असावी).

मुक्त आर्थिक व्यवस्थेत डॉलरचा तुटवडा झालाच नसता. भारत सरकारने फतव्याद्वारे रुपयाचा दार ठरवलं नसता तर तो मार्केटने ठरवलं असता आणि तो सत्य दर असल्याने कुणीही त्या दराने डॉलर देऊन रुपये घेतले असते. पण रुपयाचा दर हा भारत सरकारने प्रतिष्ठेचा विषय बनवला होता. त्याशिवाय भारतीय जनतेचे आर्थिक स्वातंत्र्य हिरावून घेणे आणि सर्व लोकांची शेंडी दिल्लीत हातात धरून बसणे हा त्याचा मूळ उद्देश होता. त्या काळी तुम्हाला भारत सोडून विदेश प्रवास सुद्धा करायचा असेल तर RBI कडून आधी परमिशन घेणे आवश्यक होते.

Friedrich Hayek says, "to be controlled in our economic pursuits means to be controlled in everything"
(एकदा तुमच्या आर्थिक स्वातंत्र्यावर बंधने घातली कि तुमच्या इतर सर्व स्वातंत्र्यावर आपोआप बंधने निर्माण होतात ) - हाईक

युनियन कार्बाईड चे एकूण प्रकल्प ३८ देशांत होते पण भारत सोडून कुठल्याही देशांत त्यांनी सेविन प्रकल्प सुरु केला नव्हता. डॉलर वरच्या सरकारी नियंत्रणामुळे त्यांना तो भोपाळ मध्ये बांधणे भाग पडले. ह्या शिवाय भारत तो निर्माण करणे त्यांच्या साठी सुमारे तिप्पट महाग पडत होते त्यामुळे भारतीय शेतकऱ्याच्या दृष्टीने आणि ते अन्न विकत घेणाऱ्या सर्व भारतीयांच्या साठी तो एक मोठा पांढरा हत्ती होता.

सरकारी हस्तक्षेप

मुक्त अर्थव्यवस्थेंत जो माणूस स्वतः पैसे घालतो तो ते कसे खर्च करावेत हे सुद्धा ठरवतो. फॅक्टरी कसली घालावी, कुठे घालावी, त्यांत मशिन्स काय असावीत आणि तत्यातून कोणती गोष्ट किती प्रमाणात निर्माण करावी हे पैसे गुंतवणारा उद्योजक ठरवतो. पण भारतांत ह्या प्रकाराला मुभा नव्हती. प्लॅनिंग कमिशन काय ठरवते ह्यावरून उद्योजकाला पैसे घालावे लागत होते. प्लॅनिंग कमिशन मधील पोटार्थी कारकून जे गणित करतील ते मुकाट्याने मानून कोट्यवधींची गुंतवणूक करते युनियन कार्बाईडला भाग होते. त्यामुळे प्लॅनिंग कमिशन ने त्यांना 5000 मेट्रिक टॅन ची फॅक्टरी घालायला सांगितले. आणि हे परमिशन देताना सरकारने फॅक्टरीच्या सर्व गोष्टींत आपला हस्तक्षेप असेल हे सुद्धा ठरवले.

सेविन चे रासायनिक नाव होते Carbaryl. Carbaryl हे MIC आणि α-naphthol ह्यांच्या प्रक्रियेतून बनते. त्यामुळे ह्यासाठी तीन प्रकल्प हवे होते. MIC निर्माणासाठी एक. α-naphthol निर्माणासाठी एक आणि दोघांच्या प्रक्रियेसाठी तिसरा प्रकल्प. सेविन हे खूप लोकप्रिय असल्याने त्याचा वापर जगांत सर्वत्र होत होता. त्यामुळे कीटक सुद्दा त्याला अड्जस्ट होत होते त्यामुळे पुढील ५ वर्षांत सेविन बदलून त्याजागी दुसरे एखादे कीटक नाशक आणायचा युनियन कार्बाईडचा हेतू होता. ह्यांत MIC चा वापर झाला असता पण α-naphthol चा वापर होण्याची शक्यता शून्य होती. त्याशिवाय α-naphthol चा उपयोड आणखीन कुठल्याही उद्योगांत होत नव्हता. त्याशिवाय α-naphthol चा प्रचंड मोठा साठा विविध देशांत होता आणि तो आयात करणे जवळ जवळ फुकट α-naphthol मिळवण्याइतके सोपे आणि स्वस्त होते. त्यामुळे α-naphthol चा प्रकल्प भारतांत बनवायची गरजच नव्हती. पण बाबू मंडळी आणि भारतीय राजकारणी ह्यांना आपले डाव खेळायचे होते. त्यामुळे त्यांनी हि परवानगी नाकारली. α-naphthol सुद्धा भारतांतच बनवायला पाहिजे अशी जबरदस्ती त्यांनी युनियन कार्बाईड इंडिया लिमिटेड वर केली. α-naphthol बनवायचे तर त्यासाठी भारतीय तंत्रज्ञान आवश्यक होते आणि भारतीय समाजांत हि क्षमताच नसल्याने शेवटपर्यंत α-naphthol तयार करण्याची फॅक्टरी युनियन कार्बाईड बनवूच शकली नाही आणि दुर्घटनेचा पाया ह्यातूनच घातला गेला.

विदेशी वित्त विनिमय कायद्याचा आघात

१९७४ हे वर्ष इंदिरा गांधी ह्यांचे "आत्मनिर्भरता" वर्ष होते. त्यांनी विदेशी गुंतवणुकीवर प्रचंड बंधने आणलीच त्याशिवाय भारतात विदेशी लोकांना कामासाठी यायला सुद्धा बंदी घातली. विदेशी कंपनीनं भारतातून गाशा गुंडाळावा लागला. त्याकाळी कोका कोला आणि IBM सारख्या कंपनीनी सरळ भारताला राम राम ठोकला. सुमारे ४०% भारतीय कंपन्या काही वर्षातच बुडीत गेल्या. युनियन कार्बाईडला सुद्धा आपला भाग ६०% वरून ५०.९% वर आणावा लागला. पण सर्वांत महत्वाचा आघात म्हणजे प्रकल्प कामासाठी जेव्हा जेंव्हा एखाद्या विदेशी तज्ज्ञाला भारतांत आणावे लागायचे त्या प्रत्येक वेळी दिल्लीला जाऊन विविध खात्यांतून परवानगी आणावी लागत असे.

आज भारतांत गुंतवणूक करा म्हणून आमचे प्रधान मंत्री छोट्या छोट्या टीचभर देशांत वणवण करत फिरतात पण त्याकाळी सरकारी मग्रुरता इतकी होती कि बहुतेक भारतीयांना पोटभर अन्न सुद्धा मिळत नसताना गुंतवणूकदारांना आपला देश हाकलून लावत होता.

युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड ला युनियन कार्बाईड कडून त्यांचा प्लांट डिसाईन आणायची परवानगी थोर मनाने भारतीय बाबूंनी दिली तरी संपुन प्रकल्प भारतीय वस्तू वापरून भारतीयांची बनवायला पाहिजे अशी अट घातली. त्याशिवाय आपण जणू काही पुष्पक विमानाच बनवत आहोत ह्या आवाने भारतीयानी युनिअन कार्बाईडला (अमेरिकन) ला सर्व गोष्टीपासून दूरच ठेवावे अशी ताकीद दिली होती.

युनियन कार्बाईडने ह्याच मुळे तंत्रज्ञान भारतीयांना देताना काहीही अपघात झाल्यास त्याची कुठलीही जबाबदारी युनियन कार्बाईड वर असणार नाही हा करार सुद्धा भारतीय सरकार सोबत केला होता. जर भारत सरकारने वॉरेन अँडरसन ला पकडले असते तर सहज पणे तो सुटला तर असताच पण त्याच्या ओघांत युनियन कार्बाईड आणि अमेरिकन सरकारने भारतीय सरकारची अब्रूची लक्तरे जाहीरपणे जगाला दाखवली असती. त्यामुळे अँडरसन ला देश सोडून जायला भारत सरकारनेच मदत केली आणि कायद्या पेक्षा कोर्टाबाहेर प्रकरण मिटवण्यावर जोर दिला. शेवटी काय तर झाकली मूठ सव्वा लाखाची.

सरकारी लुडबुड

१९७० च्या शेवटी भारतीय सरकारने अनेक छोट्या उद्योजकांना निकृष्ट दर्जाची कीटक नाशके निर्माण करण्याची परवानगी दिली. ह्यांची किंमत सेवींन पेक्षा अर्धी तर होतीच पण सरकार वरून शेतकऱ्यांना सबसिडी सुद्धा देत होते. त्यामुळे ह्या कीटकनाशकांचा खप जास्त झाला आणि फक्त १००० टन सेवींन विकले गेले पण प्लॅनींग कमिशन ने भोपाळ प्रकल्पाला ५००० टॅन सेविन बनवायचा आदेश दिला होता.

मुक्त अर्थव्यवस्थेंत कंपनी आधी मार्केट रिसर्च करते, त्यावरून गुंतवणूक केली जाती. त्यामुळे कंपनी आपली रिस्क मॅनेज करू शकते पण तिचे प्लॅनिंग कमिशनचे कारकून सर्व काही ठरवत असल्याने युनियन कार्बाईड इंडिया लिमिटेड ला काहीही स्वातंत्र्य नव्हतं. मुक्त अर्थिव्यवस्थेंत कुणी चहाचा कप सुद्धा विकत घेतला तर तिथल्या आर्थिक स्थितीवर त्याचा परिणाम होतो त्यामुळे एखाद्या आर्थिक घटनेचा परिणाम संपूर्ण आर्थिकव्यवस्थेवर कसा पडेल हे सूक्ष्म स्तरावर कुठलाही विद्वान ठरवू शकत नाही. पण तर्क आणि भारत सरकार ह्यांचे आधीपासूनच वाकडे आहे.

भोपाळ प्रकल्प ने युनियन कार्बाईड लिमिटेड ला पैश्याचा सुद्धा फायदा केला नाही. १९८४ मध्ये कंपनीला ४ दशलक्ष डॉलर्स चे नुकसान झाले. बहुतेक उच्चशिक्षित कर्मचारी सोडून गेले आणि राहिलेल्या कामगारांचे मनोबल आणखीन खालावले.

युनियन कार्बाईड इंडिया आणि युनियन कार्बाईड अमेरिका ह्यातील शेवटचा दुवा होता वॉरेन उमर हा अमेरिकन अभियंता भारतात प्रकल्पाचा मुख्य अधिकारी होता. प्रकल्पाने काम सुरु केले १९८० आणि १९८२ पर्यंत ह्याने भारतांत काम केले. वर लिहिलेल्या फेरा कायद्याप्रमाणे सरकारने त्याला भारत सोडून जायला भाग पाडले. ह्यांचे प्रचंड मेहनत घेऊन भारतीय अभियंत्यांना ट्रेन केले होते.

हा माणूस गेला कि प्रकल्पाचे काम रखडू लागले त्यावरून प्रचंड तोटा त्यामुळे मॅनेजमेंटला (युनियन कार्बाईड इंडियाला) प्रकल्प चालविण्यात काहीही रस राहिला नाही. ह्यांत वरून भारत सरकारने आदेश दिला कि युनियन कार्बाईड इंडिया लिमिटेड ने युनियन कार्बाईड सोबत काहीही सहयोग करू नये. जानेवारी १९८५ पर्यंत सर्व संपर्क तोडावा असे आदेश साराने दिले होते. डिसेंबर १९८४ मध्ये अपघात घडला.

उमरची हकालपट्टी केल्यांनतर एव्हररेडी बॅटरी प्लांट मधील एकाला तिथे नियुक्त केले आणि तोटा कमी करण्याचे काम त्याच्यावर संपवले. त्याने हळू हळू सुरक्षा नियमाना दुर्लक्षित केले.

त्याशिवाय अमेरिकन प्लांट हा स्वयंचलित होता. पण भारताकडे तासली यंत्रणा निर्माण करण्याची क्षमता नव्हती आणि आयातीवर सरकारने बंदी घातली त्याशिवाय "रोजगार" जास्त महत्वाचा आहे म्हणून स्वयंचलित सुरक्षा यंत्रणा बदलून त्याजागी मानवी कामगारांना ठेवले. ह्याला लोकांना इंग्रजी वाचता सुद्धा येत नव्हते त्यामुळे धोक्याच्या क्षणी काय करावे ह्याचे काहीही ज्ञान ह्या लोकांना नव्हते.

फॅक्टरीच्या बाहेर

जेंव्हा सरकारने प्लांट साठी जमीन निर्धारित करून दिली तेंव्हा फॅक्टरीच्या बाहेर काहीच नव्हते. जमीन सरकारी असल्याने प्लांट च्या बाहेर बफर झोन सरकारला ठेवणे आवश्यक होते. प्लांट चे काम सुरु झाले तसे अनेक गरीब लोक तिथे वळले. कंपनीने अनेकदा तक्रार करून सुद्धा स्थानिक सरकारनी जमीन बळकावून बसलेल्या लोकांना जमिनीचे मालकी हक्क दिले. ह्यावर विधानसभेत गदारोळ सुद्धा माजला होता पण तत्कालीन राज्य सरकारने काहीही हालचाल केली नाही.

काळरात्र होता होता

टॅंक इ ६१० मध्ये पाणी शिरले. त्यांत ४७ टन MIC होते. पाण्याशी संपर्क येताच विषारी वायू निर्माण झाला आणि त्याने हजारो लोकांचे बळी घेतले.

तात्काळ स्थानिक सरकार, CBI , CSIR इत्यादींनी आपली शोधपथकें पाठवली. अमेरिकेतून युनियन कर्बाईड कंपनीने सुद्धा आपले पथक पाठवले. कंपनीच्या पथकाने शोधानंतर असा निष्कर्ष काढला कि कुणा तरी वैफल्यग्रस्त कामगाराने मुद्दामहून सूडबुद्धीने हि घटना घडवून आणली होती. CBI किंवा CSIR हा दावा फेटाळू शकले नाही पण सरकारने अमेरिकन कंपनीचा निष्कर्ष मानण्यास नकार दिला. भारत सरकारने दावा केला कि टॅंक मध्ये खराबी होती आणि त्यामुळे त्यांत पाणी घुसले पण टॅंक ची पाहणी करून ते सिद्ध झाले नाही.

राज्य सरकारचे सिंग कमिशन ला अचानक गाशा गुंडायला भारत सरकारने भाग पडले. अशी बातमी होती कि अपघाताची भारत सरकार आणि युनियन कार्बाईड इंडिया हे जबाबदार आहेत असा त्यांचा शोध होता. हा रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला नाही.

भारत सरकारचे सर्वांत निर्ल्लज पानाचे कृत्य होते ते म्हणजे "The Bhopal Gas Leak Disaster Act, 1985" कायद्याचे निर्माण. ह्या कायद्याच्या अंतर्गत भारत सरकारने स्वतःला (जे ह्या कमानीचे २५% मालक होते, आणि ज्यांनी युनियन कार्बाईड इंडिया च्या प्रत्येक कारभारांत प्रचंड प्रमाणात नाक खुपसले होते) ह्या दुर्घटनेचे बळी ठरवले आणि सर्व मृतांच्या तर्फे युनियन कार्बाईडला कोर्टांत खेचण्याचा अधिकार दिला. अश्या प्रकारे मृत आणि इतर बळींना काहीही पैसे किंवा नुकसान भरपाई देण्याच्या जबाबदारीपासून हात झटकले. युनियन कार्बाईड बरोबबर कोर्टाच्या बाहेर सरकारने ७५० कोटी रुपये उकळले.

निष्कर्ष

भारतीय सरकारची विविध धोरणे ह्या अपघातास कारणीभूत होती. प्रत्येक ठिकाणी नाक खुपसून प्रत्येक गोष्ट लोकांनी कशी करावी आणि कशी करू नये हे सांगण्याचे भारत सरकारचे धोरण ह्या अपघातास कारणीभूत आहे. एक चांगले तर्कशुद्ध आर्थिक धोरण करणे आणि कमीत कमी व्यत्यय आणून इतरांना त्यांचे धंदे करू देणे इतकेच भारत सरकारने केले असते तर हि दुर्घटना घडली नसती.

भारत सरकारचे धोरणच चुकले असे नाही तर ह्या संपूर्ण घटनेतून भारतीय समाज आणि सरकार अतिशय अकार्यक्षम आहे असे आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध झाले. हा डाग पुसून काढायला भारतीयांना खूप दशके लागली. काही प्रमाणात आज सुद्धा आम्ही ह्या भारत सरकारच्या अकार्यक्षमतेचा बाली ठरत आहोत.

न्यू यॉर्क टाइम्स ने १९८५ मध्ये भारतीय सरकारच्या औद्योगिक धोरणाचे वाभाडे खालील शब्दांत काढले.

Under (India’s) industrial policy, business and government are seen as “partners” in joint ventures to promote “national goals.” What does business bring to such a “partnership”? Basically, every creative element: vision, ideas. effort, know-how, capital. What does government bring to such a partnership? Basically, every coercive element: favors, dispensations. subsidies and other “carrots” for politically approved businesses, on the one hand — and on the other, prohibitions, regulations. punitive taxes and other “sticks” against politically unpopular businesses.

ह्यानंतर भारतांत औद्योगिक सुरक्षा ह्यावर बरीच चर्चा झाली. पण मुख्य प्रश्न समाजापुढे हा असला पाहिजे कि सुरक्षेचे निकष कुणी ठरवावेत ? मुक्त आर्थिक व्यवस्थेंत युनियन कार्बाईडला आधी जमीन विकत घ्यावी लागेल आणि स्थानिक सरकारकडून परवानगी. थोडी सुद्धा शंका असल्यास लोक परवानगी देणार नाहीत. पण आपला प्रकल्प कसा १००% सुरक्षित आहे हे कंपनीला लोकांना सिद्ध करून दाखवावे लागेल (ह्यासाठीच सेविन चे सेवन करून युनियन कार्बाईड च्या संशोधकांनी अमेरिकेत लोकांना पटवले होते). मग हे सिद्ध करण्यासाठी त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान निर्माण करावे लागेल आणि तटस्थ तृतीय कंपनीकडून ऑडिट वगैरे करून घ्यावे लागेल. (IT इंडस्ट्रीत आज सुद्धा लोक ISO, CMM इत्यादी च्या मागे ह्यासाठीच असतात, सरकार जबरदस्ती करते म्हणून नाही). शेवटी ह्या ऑडिट कंपनी सुद्धा काही संत मंडळी असणार नाहीत, त्यांना सुद्धा लांच वगैरे देऊन लोकांची दिशाभूल करता येते पण, हळू हळू लांच घेणाऱ्या कंपनी बुडीत निघेल. ह्याउलट सरकारी बाबू किंवा राजकारणी मंडळी आहेत. कितीही लोक कुठेही मेले म्हणून त्यांना फरक पडत नाही त्यामुळे हि मंडळी निर्लज्ज पणे लांच घेऊन कुठेही सही करतात.

जे सरकार खराब दर्जाचे रस्ते बांधून आणि आणखीन खराब पद्धतीने त्यांची डागडुज्जी करून शेकडो लोकांचा बळी दररोज घेते त्या सरकारला कुठल्याही कारखान्यातील सुरक्षेची खरीच काही चिंता पडून गेली असेल का ?

apple चा इफोन वर कुठेही ISI चा शिक्का नाही पण तो अत्यंत उत्कृष्ट दर्जाचा आहे कारण अँपल ने आपली छबीच तशी निर्माण केली आहे आणि एक जरी फोन खराब निघाला तर त्यांचे अब्जावधींचे नुकसान होते (सॅमसंग ला विचारा) त्यामुळे निव्वळ नफाखोरीसाठी ते उत्कृष्ट दर्जाचा फोन निर्माण करतात. एकदा कंपनीने अश्या तत्वांशी फारकत घेतली कि त्यांच्या कर्मचाऱ्यांचे मनोबल खालावते ( किंगफिशर ला विचारा) चतुर आणि चांगले कर्मचारी सर्वप्रथम सोडून जातात, काही जण कोर्टांत जातात मग कंपनीला आणखीन नुकसान होते.

भोपाळ दुर्घटना नफ्यासाठी युनियन कार्बाईड ह्या विदेशी कंपनीने केली हे त्याच मुले तर्कशुद्ध वाटत नाही. दुर्घटनेने त्यांचा काहीही फायदा नव्हता उलट दुर्घटने नंतर त्यांच्या कंपनीची प्रचंड बदनामी झाली आणि शेवटी ती कंपनी जवळ जवळ नामशेष झाली. सुरक्षेशी तडजोड हि कुठल्याही कंपनीसाठी प्रचंड मोठी रिस्क असते त्यामुळे निव्वळ स्वार्थासाठी सुद्धा कुठलीही मोठी कंपनी अशी रिस्क घेत नाही.

शेवटी काय तर "आत्म निर्भरता", "स्वदेशी" हे दुसरे काही नसून एक प्रकारचा वंशभेदच आहे. सरकारी बळजबरी वापरून एखाद्या सामान्य ग्राहकाला विनाकारण भौगोलिक स्थानावरून भेदभाव करण्यास भाग पडायचे असा हा तर्क आहे. ह्यातून ग्राहक किंवा समाजाचा काहीही फायदा नसतो तर फक्त भौगोलिक सीमांवर ज्यांची सत्ता आहे म्हणजे सरकार आणि बाबू लोक ह्यांचा फायदा असतो. ह्या बळजबरीने ग्राहकाला कमी पैश्यांच्या चांगली सेवा घेता येत नाही तर स्थानिक आळशी आणि निकृष्ट काम करणाऱ्यांचे फावते.

स्थानिक समाजांत क्षमता असेल तर विदेशी कंपनी सुद्धा स्थानिक फॅक्टरी उघडून स्थानिक लोकांना रोजगार देते कारण त्यांत त्यांना जास्त नफा मिळतो. विदेशी गुंतवणूकदारांना फक्त येण्याचे स्वातंत्र्य पाहिजे. आणि कुणीही विदेशी कंपनी येत नाही तर नक्की का येत नाही ह्यावरून आम्हाला आमच्या समाजांत काय दोष आहेत हे समजते. (एलोन मस्क ने आपण भारतांत का गुणतंवणूक करत नाही हे सांगितले आहे).

कुठल्याही गोष्टीचा दर्जा हा फक्त स्पर्धेमुळे वाढतो आणि स्पर्धेवर आपण विनाकारण बंधने आणली तर मग दर्जा सुद्धा खालावतो.

“I believe, as a practical proposition, that it is better to have a second rate thing made in our country, than a first rate thing that one has to import.” — Jawaharlal Nehru (From a speech in the 1950s)

प्रतिक्रिया

अनुप ढेरे's picture

7 Dec 2020 - 3:40 pm | अनुप ढेरे

उत्तम लेख. सरकारचे समाजवादी धोरण हेच मूळ व्हिलन दिसते या प्रकारात. पण विदेशी माणसाला व्हिलन बनवणे सरकारी कर्मचाऱ्यांना आणि राजकारणी लोकांना सोयीचे होते. सध्याचे आत्मनिर्भर धोरण याच मार्गाने जाईल वाटते.

शा वि कु's picture

7 Dec 2020 - 6:28 pm | शा वि कु

खूप माहितीपूर्ण लेख, मुद्दा पटला.
शेवटच्या परिच्छेदाबद्दल हा लेख वाचलेला-
तुम तो ठहरे स्वदेशी , अर्थात ‘साले आमची संपत्ती भारताबाहेर नेतात !

आदूबाळ ह्याचा तो लेख खरोखर उत्तम आहे ! दर्दैवाची गोष्ट म्हणजे ह्यांत काहीही अगम्य नाही, बहुतेक समृद्ध देशांनी हे २०० वर्षे आधीच ओळखले होते आणि त्याच्या जोरावर हे देश समृद्ध झाले आहेत. आम्हीच विश्वगुरू ह्या अविद्येच्या घाणीत विनाकारण लोळत पडलो आहोत. अत्यंत दुःखद अशी हि परिस्थिती आहे.

आदूबाळ ह्यांच्या लेखांत एक दुसरा मुद्दा आलेला नाही तो मी इथे मांडते.

समजा युनिलिव्हर ने ३ रूपये आपल्या मूळ देशांत नेले तरी सुद्धा ह्याचा अर्थ ३ रुपयाचे देशाला नुकसान झाले असे अजिबात होत नाही. आपले चलन जर कन्व्हर्टिबल असले तर जसा जसा रुपयांचा साठा अमेरिकन कंपनीकडे वाढत जातो तसे तसे तसे त्या रुपयांचे मूल्य घटत जाते त्यामुळे हे रुपये घेऊन ते पुन्हा भारतांत नवीन प्रकारच्या सेवेंत गुंतवतात आणि त्यातून देशाचा आणखीन प्रचंड मोठा फायदा होतो. अमेरिकन चलन कन्व्हर्टिबल असल्याने त्या देशाने अद्वितीय अश्या प्रकारची आर्थिक कामगिरी केली आहे.

उदाहरण म्हणजे सोनी कंपनी. सोनी चे वॉकमन इत्यादी अमेरिकेत तुफान लोकप्रिय ठरले. हा हा म्हणता टीव्ही पासून vhs पर्यंत सोनी कंपनी आणि तीर जापनीज कंपन्यांनी अमेरिकन मार्केट काबीज केले. आता जसे आमचे स्वदेशी वाले हंबरडा फोडतात त्याच प्रमाणे अमेरिकेतील राजकारण्यांनी सुद्धा जपानवर निर्बंध लावण्याच्या बाता केल्या. सुदैवाने त्यांची डाळ शिजली नाही.

इतके डॉलर घेऊन सोनी करणार काय ? त्यामुळे हा पैसा सोनीने इतर अमेरिकन गोष्टीं गुंतवायला सुरुवात केली. त्यातून दोन खूप महत्वाचे धंदे अमेरिकेत उभे झाली सोनी चित्रपट कंपनी ज्याने शेकडो चित्रपट अमेरिकेत निर्माण केले. आणि सोनी प्लेस्टेशन ज्याने एक नवीन प्रकारच्या गेमिंग धंद्याचा पाया घातला. अरब, चीन इत्यादी देशांची परिस्थिती सुद्धा हीच आहे. चीन आज अमेरिकेत पाण्याप्रमाणे पैसा ओतत आहे.

https://www.youtube.com/watch?v=j0pl_FXt0eM

टर्मीनेटर's picture

8 Dec 2020 - 12:10 pm | टर्मीनेटर

आपण दिलेल्या लिंक वरचा लेख वाचला.
लेख म्हणून तो नक्कीच आवडला, पण त्यात दिलेली आकडेवारी दिशाभूल करणारी आहे असे नमूद करून खाली बसतो.

गामा पैलवान's picture

7 Dec 2020 - 8:26 pm | गामा पैलवान

साहना,

अनुवादाबद्दल धन्यवाद. मी ऐकल्याप्रमाणे दुर्घटना घडल्यावर वॉरन अँडरसनला ताबडतोब अटक केली होती. हा घातपात होताच अशी त्याची खात्री होती, म्हणून तो निश्चिंत होता. मात्र भारत व मध्यप्रदेश दोन्ही सरकारांची नियत काही वेगळीच होती. त्यामुळे त्याने अमेरिकी राजदूताकडून दबाव आणवला. त्यामुळे त्याला तत्कालीन मुख्यमंत्री अर्जुनसिंग यांनी सरकारी विमान देऊन दिल्लीस रवाना केलं. पुढे तो दिल्लीहून सरळ अमेरिकेत गेला तो परतून न येण्यासाठीच.

राजीव गांधीं नवे पंतप्रधान होते. नुकतीच इंदिरा गांधींची हत्या झालेली होती. बहुतेक राजीव गांधीस कोंडीत पकडून अँडरसनने सुटका करवून घेतली. अन्यथा त्याला खोटे पुरावे उभे करून बळीचा बकरा बनवला असता.

सरकारी बाबूशाहीचं हे दुष्कृत्य उजेडात येऊ नये म्हणून पुढची पावलं उचलली असावीत असं दिसतं. ही पावलं म्हणजे सिंग कमिशन अचानक गुंडाळणं, नीट तपास न करणं, सगळा दोष अँडरसनवर ढकलणं, नुकसानभरपाई नाकारणं, इत्यादि.

आ.न.,
-गा.पै.

महेंद्रसिंग साथी's picture

8 Dec 2020 - 10:18 am | महेंद्रसिंग साथी

राजीव गांधीं नवे पंतप्रधान होते. नुकतीच इंदिरा गांधींची हत्या झालेली होती. बहुतेक राजीव गांधीस कोंडीत पकडून अँडरसनने सुटका करवून घेतली. अन्यथा त्याला खोटे पुरावे उभे करून बळीचा बकरा बनवला असता.

वॉरन अ‍ॅन्डरसनला बळीचा बकरा बनवणार हे लक्षात येताच पडद्याआड भराभर सूत्रे हलली. राजीव गांधींचा मित्र आदिल शहरयार फ्लोरिडातील तुरूंगात होता. त्याने एक ट्रक जाळला हा गुन्हा त्याच्यावर शाबित झाला होता. भोपाळ दुर्घटनेनंतर सहा महिन्यांनी राजीव गांधी अमेरिकेला गेले होते त्यावेळी 'गुडविल गेस्चर' म्हणून अमेरिकेच्या अध्यक्षांनी या आदिल शहरयारला स्वतःच्या अधिकारात माफी देऊन सोडले. त्याने एक ट्रक जाळला होता पण कोणाचाही मृत्यू त्या घटनेत झाला नव्हता. त्यामुळे त्याच्याकडून दंड घेऊन त्याला सोडून देण्यात आले.

आम्ही अँडरसनला सोडतो तुम्ही आदिल शहरयारला सोडा हे डील बहुतेक भारत आणि अमेरिका सरकारमध्ये हे डील डिसेंबर १९८४ मध्येच झाले असावे पण ते अगदीच उघड होईल म्हणून आदिलला जून १९८५ मध्ये सोडण्यात आले. सुषमा स्वराज यांनी लोकसभेत केलेल्या एका भाषणात या घटनेचा उल्लेख होता.

राजीव गांधी असे 'क्वीड प्रो को' करणारे पंतप्रधान होते.

भोपाळच्या दुर्घटनेमागचा कळीचा मुद्दा..." टॅंक इ ६१० मध्ये पाणी शिरले. त्यांत ४७ टन MIC होते."

युनिअन कार्बाइडच्या जगभरच्या इतर कुठल्याही प्रकल्पात MIC चा in process मोठा साठा करण्याची तरतूद नसतानाही, भारतातल्या प्रकल्पात MIC चा साठा ठेवला होता कारण युनिअन कार्बाइडच्या अन्दाजाप्रमाणे भारतातले सेविनचे उत्पादन भविष्य काळात वाढवता येणे शक्य होते.

जर MIC चा असा in process मोठा साठा ठेवला गेला नसता तर हा अपघात टळला असता.

मराठी_माणूस's picture

8 Dec 2020 - 10:06 am | मराठी_माणूस

चांगली माहाती.

"काळरात्र होता होता" ह्या परीच्छेदाची सुरुवात "टॅंक इ ६१० मध्ये पाणी शिरले." अशी झाली आहे. हे काहीच कळले नाही.

बाकीचे परीच्छेद खुप सविस्तर आहेत. हाच मह्त्वाचा परीच्छेद मात्र त्रोटक वाटला. कोणता दिवस, वेळ, नेमके काय घडले ते काही कळले नाही.

बरीच मवीन माहिति मिळाली आज.

टर्मीनेटर's picture

8 Dec 2020 - 11:48 am | टर्मीनेटर

लेख आवडला.
दुर्घटनेची दुसरी बाजू दाखवलीत त्याबद्दल आभारी आहे. भारताचे (देशी असो कि विदेशी) उद्योग विषयक धोरण हे कायमच विचित्र राहिले आहे, दुर्दैवाने आजघडीला सुद्धा!
त्याच मुळे एलोन मस्क भारतांत गुणतंवणूक करत नाही. परंतु मस्क सारखी हुशारी वॉरेन अँडरसने त्यावेळी का नाही दाखवली हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. वॉरेन अँडरसन हा कोणी संत महात्मा किंवा समाजसेवक नक्कीच नव्हता, की भारतात लोकसेवेसाठी त्याने प्रकल्प उभा केला नव्हता. व्यवसायवृद्धी साठी वाट्टेल त्या तडजोडी करून अतिरिक्त नफा कमावणे हाच त्याचा उद्देश होता आणि कालौघात तो गोरख धंदा ठरला हे वास्तव आहे. त्याच्यापेक्षा एलोन मस्कचे विचार नक्कीच शहाणपणाचे वाटतात.
आपल्या अक्कल-हुशारीने सगळ्या राजकारण्यांना, प्रतिस्पर्ध्यांना, बाबूशाहीला, लायसन्स राजच्या प्रतिकूल परिस्थितीतही पुरून उरलेले आणि यशस्वी झालेले स्व.धीरूभाई अंबानी मला त्यामुळेच सगळ्या उद्योजकांत खूप उजवे वाटतात.

> व्यवसायवृद्धी साठी वाट्टेल त्या तडजोडी करून अतिरिक्त नफा कमावणे हाच त्याचा उद्देश होता

हा उद्देश सर्वांचाच असतो पण ह्या तडजोडी युनियन कार्बाईड किंवा वॉरेन अँडरसन च्या नसून भारतीय सरकारच्या लुडबुडीचा परिणाम होता. भारतीय सरकारने युनियन कार्बाईड कॉर्प बरोबर काहीही कोलॅबोरेशन करण्यास युनियन कार्बाईड इंडिया वर बंदी घातली होती त्यामुळे कार्यक्षम पणे प्रकल्प चालविणाऱ्या वॉरेन उमर ला नोकरीवरून काढण्यात आले.

युनियन कार्बाईड इंडिया पासून वॉरेनला काडीचाही फायदा नव्हता आणि काही विशेष फायदा होण्याची शक्यता सुद्धा नव्हती त्याशिवाय भारतातील वातावरण प्रत्येक वर्षागणिक इतके खराब होईल ह्याची कल्पना सुद्धा वॉरेन ने काय आणखीन कुणीच केली नव्हती.

अर्थांत हा माणूस संत होता किंवा त्याच्या कंपनीची काहीच चूक नव्हती असे नाही.

अपघात होताच अमेरिकेतील शेकडो वकिलांनी भारतीय मृत लोकांची ची केस अमेरिकेतील कोर्टांत विनामूल्य लढविण्याची तयारी दाखवली होती. ह्या केस मधून कदाचित वॉरेन आणि त्याने काँग्रेसी लोकांना चारलेले पैसे इत्यादी उघडकीस आले असते आणि ते लपविण्यासाठी त्याने कोट्यवधी रुपये गरीब भारतीय लोकांना नुकसान भरपाई म्हणून दिले असते.

हे टाळण्यासाठी भारत सरकारने निर्लज्जपणे नवीन कायदा आणून कुठल्याही बळीला (आणि त्याच्या परिवाराला) कोर्टांत जाण्यापासून वंचित केले. त्यामुळे ह्या गरिबांना नुकसान भरपाई सुद्धा मिळाली नाही. भारत सरकारने इतक्या निर्ल्लजपणे मढ्याच्या टाळू वरचे लोणी खाल्ले त्याचे पाप अजून भारतीय जनतेपुढे आलेले नाही.

मराठी_माणूस's picture

8 Dec 2020 - 2:33 pm | मराठी_माणूस

हे टाळण्यासाठी भारत सरकारने निर्लज्जपणे नवीन कायदा आणून कुठल्याही बळीला (आणि त्याच्या परिवाराला) कोर्टांत जाण्यापासून वंचित केले

कोर्टांत जाण्यापासून परावृत्त करण्यासारखे असे काय होते ह्या कायद्यात

ह्या कायद्याप्रमाणे युनियन कार्बाईडला कोर्टांत खेचण्याचा अधिकार फक्त युनियन कार्बाईड इंडिया लिमिटेड आणि भारत सरकार ह्यांना होता. त्यामुळे एखाद्या मृताच्या परिवाराने स्वतः कोर्टांत दाद मागणे बेकायदेशीर ठरले असते.

तुषार काळभोर's picture

9 Dec 2020 - 8:04 am | तुषार काळभोर

4. Claimant’s right to be represented by a legal practition.—Notwithstanding anything contained
in section 3, in representing, and acting in place of, any person in relation to any claim, the Central
Government shall have due regard to any matters which such person may require to be urged with respect
to his claim and shall, if such person so desires, permit at the expense of such person, a legal practitioner
of his choice to be associated in the conduct of any suit or other proceeding relating to his claim.

साहना's picture

9 Dec 2020 - 9:18 am | साहना

खोलात जायचे असेल तर

https://papers.ssrn.com/sol3/papers.cfm?abstract_id=2532789

> The fundamental feature of BGLDA was that the Central Government
had the exclusive right to represent and act in place of all the claimants in
order to protect them from high legal fees and provide them a speedy, fair
and equitable judicial process.14 The BGLDA authorized the establishment of
a ‘Claims Scheme’15 and created the office of a Commissioner whose function
would be to administer the scheme - registering, recording, and processing
individual claims.16

> It is ironic that that BGLDA was passed specifically to prevent lawyers
working on contingency fees to represent the victims of the BGL. In India,
where the victims suffered from asymmetric information, and wealth and
liquidity constraints, it is even more crucial to have a system where lawyers
can represent clients through a contingency-fees system.

सेक्शन ४ चा अर्थ इतकाच आहे कि सरकार चालवणाऱ्या कुठल्याही खटल्यांत एखादा बळी आपला वकील इन्व्हॉल्व्ह करू शकतो पण त्याला बळीच्या वतीने मागणी करण्याचा कोणताही अधिकार असणार नाही !

लोनली प्लॅनेट's picture

13 Dec 2020 - 2:00 pm | लोनली प्लॅनेट

राहुल बजाज पण असेच एक, सरकार च्या दरिद्री धोरणामुळे प्रचंड मागणी असून सुद्धा बजाज ला त्या प्रमाणात उत्पादन करता येत नव्हते, आणि लोकांनाही स्कूटर साठी 4,5 वर्ष वाट पहावी लागायची ,हे मला आजच बाबांनी सांगितले होते आणि आजच मिपावर हा लेख दिसला आणि याचे कारण समजले, या मागे आपले निष्क्रिय आणि निर्लज्ज सरकार होते

Marathi_Mulgi's picture

9 Dec 2020 - 7:49 pm | Marathi_Mulgi

दुर्दैवाने भारतात अशी परीस्थिती होती हे मान्य करावेच लागेल.

लोनली प्लॅनेट's picture

13 Dec 2020 - 1:54 pm | लोनली प्लॅनेट

या दुर्घटनेबद्दल लहानपणापासून एक कुतूहल होते nat geo वर seconds from disaster मध्ये माहितीपट पहिला होता पण याची दुसरी बाजू अजिबात माहीत नव्हती, खूप धन्यवाद या लेखाबद्दल
खराब रस्त्यामुळे रोज हजारो लोक जसे मरतात पण निर्लज्ज सरकार ला काही देणे घेणे नसते, आतासुद्धा corona मुळे लोक मरतील याची काळजी सरकार ला आहे असे समजणे सुद्धा हास्यास्पद आहे corona च्या नावाखाली लोकांच्या देणगीच्या पैश्याची प्रचंड लूट झालेली आहे

भारताची अर्थ व्यवस्था खुली करण्याचे श्रेय मनमोहन सिंग ह्यांना च जाते.
त्यांनी अनेक सुधारणावादी निर्णय घेवून देशाची अर्थ व्यवस्था रुळावर आणली.
रशिया शी मैत्री असल्या मुळे समाजवादी विचाराकडे भारत सरकार च ओढा असावा.
त्या मधून काही चांगले घडले तर काही वाईट गोष्टी पण घडल्या.
बँकांचे राष्ट्रीयीकरण ही देशासाठी चांगली च घटना होती.
घडून गेलेल्या अपघात मधून शिकून पुढे असे घडू नये ही काळजी घेणे हेच आपल्या हातात आहे.

> त्या मधून काही चांगले घडले तर काही वाईट गोष्टी पण घडल्या.

कोट्यवधी लोकांची उपासमार, कोट्यवधी लोकांनी भीक मागत जनावरा प्रमाणे जगणे, तथाकथित स्वतंत्र भारतात काहीही हालचाल करण्यासाठी सरकारी गाढवांच्या पायाशी लोळण घालणे आणि आज सुद्धा २०२० मध्ये १७०० असल्या प्रमाणे शेती आणि वेठबिगारी करणे ह्याला "काही वाईट" गोष्टी म्हणणे म्हणजे पानिपतला लुटुपुटीची लढाई म्हणण्यासारखे आहे.

भारतीय समाजवाद हि चूक नसून महाभयंकर अपराध आहे !

मनमोहन सिंग म्हातारे आणि निवृत्त असल्याने मी त्यांना काहीही म्हणणार नाही पण नेहमीच्या खेचरांना आता अचानक त्यांच्या मुक्त आर्थिक व्यवस्थेची स्तुती करावीशी वाटली तर आनंदच आहे. मनमोहन सिंघापासून प्रेरणा घेऊन सर्व राज्ये आणि आताचे राज्यकर्ते आणखीन सुधार घडवून भारत सरकार आणि एकूणच सरकार ह्या कर्करोगाचा भारतीय जीवनावरील प्रभाव कमी करतील अशी अशा करण्यास हरकत नाही.

> बँकांचे राष्ट्रीयीकरण ही देशासाठी चांगली च घटना होती.

ह्यांत काहीही चांगले नव्हते. खाजगी संपत्तीवर हावरटा प्रमाणे डोळा ठेवून ते चोरणे ह्याला आमच्या सभ्य भाषेंत दरोडा म्हणतात "राष्ट्रीयीकरण" जनतेला मूर्ख करण्याचे गोंडस नाव आहे. ह्या "राष्ट्रीय" बॅंकांनी हजारो कोट्यवधींची माया गरीब जनतेकडून सरकार आणि इतर दरोडेखोरांच्या घशांत घातली आहे !

राष्ट्रीयीकरणाची पॉन्झी स्कीम सध्या पूर्ण पणे गायब झाली आहे .

सतत भारत सरकार , भारत सरकार असं म्हणण्यापेक्षा काँग्रेस चं सरकार हा शब्दप्रयोग बरोबर आहे. बदनामी भारताची होण्यापेक्षा ज्या पार्टीने हे सगळं घडवलं तिची व्हायला हवी. आणि या सगळ्या पापाचा परिणाम म्हणजे राहुल गांधींचा जन्म. माणसांप्रमाणेच कोणत्याही पार्टीला पापं सुद्धा इथेच फेडावी लागतात हेच खरं.

माझ्या मते इथे पार्टी पेक्षा 'भारत सरकार' हेच जबाबदार आहे. (भारत सरकार != भारत देश). भारत सरकारच्या पॉलिसी ह्या फक्त काँग्रेस सरकारच्या पॉलिसी नव्हत्या तर इतर पार्ट्या सुद्धा ह्याला तितक्याच सपोर्टिव्ह होत्या. देशाची आर्थिक नीती काय असावी ह्यावर कम्युनिस्ट, संघी, काँग्रेस ह्या सर्वांचे जवळ जवळ एकमत आहे. आज भाजप सरकार सुद्धा "आत्मनिर्भरतेच्या बाता" करून त्याच दिशेने पावले उचलायला पाहत आहे पण सुदैवाने काळ बदलला आहे आणि त्यांना त्यांत विशेष यश मिळणार नाही.

काँग्रेस सरकार भ्रष्ट होते ह्यांत शंका नाही पण भोपाळ दुर्घटनेला भ्रष्टाचार नाही तर उलट कायदेपालन जबाबदार आहे, कायदे जबाबदार आहेत आणि ह्या सर्व गोरखधंद्याला लेजिटिमसी देणारी घटना सुद्धा जबाबरदार आहे, त्यामुळे म्हणूनच "भारत सरकार" हा शब्दप्रयोग केला आहे.

टीप : हिंदू हृदय सम्राट बाळ ठाकरे ह्यांनी मार्मिक मध्ये कंप्यूटर विरुद्ध प्रचंड विषारी लेखन केले होते. "आला, बेकारी वाढवणारा कंप्यूटर आला" असा मथळा देऊन त्यांनी काँग्रेस सरकारने कसे कॅम्युटर देशांत आणून बेकारी वाढवण्याचे संधान बांधले आहे ह्यावर लेखन केले आहे. देशाला दाळीद्रयांत फेकणाऱ्या आर्थिक नीतीच्या बाबतीत खांग्रेस, मूर्ख कम्युनिस्ट आणि संघीय सर्व ह्या हमामात नगूपंगूच आहेत.

त्या वेळची जागतिक परिस्थिती कशी होती ह्याचा विचार होणे पण गरजेचे आहे.
त्या वेळी सर्व च देश बंदिस्त अर्थव्यवस्थेत होते.देशांना भीती वाटतं होती .
व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते झाले ह्याचा अनुभव भारताने घेतला होता.
नाही म्हटलं तरी त्याचा परिणाम सरकार chya मानसिकतेवर होता.
आता सुद्धा AI प्रगत होत आहे आणि ते जवळ जवळ सर्वच माणसाची काम करण्यास सक्षम असणार आहे .
तेव्हा त्याचा वापर कितपत करायचा ह्या बद्द्ल सर्वच देश सावध पावलं uchaltil .
काही प्रतिबंध घालतील मुक्त अर्थ व्यवस्थेचे नियम AI साठी वापरले जाणार नाहीत.
ड्रायव्हर लेस car ल भारतात परवानगी दिली तर किती ड्रायव्हर बेकार होतील .
हे एक उदाहरण.
त्या मुळे त्या वेळच्या सरकार च्या निती वर टीका करताना सर्व बाजू पण लक्षात घेणे जरुरी
आहे.
जागतिक दबाव जसा वाढेल तसे सरकारच्या पॉलिसी बदलतील.
भारताची मुक्त अर्थ व्यवस्था जागतिक रेट्या मुळेच स्वीकारली.
पण सावध पना तर हवाच.
दारे सताड उघडे ठेवणे पण धोकादायक च असते.

साहना's picture

14 Dec 2020 - 12:52 pm | साहना

साष्टांग दंडवत !

भोपाळ गॅस दुर्घटना फक्त ह्या घटने पुरताच ह्या लेखाचं संबंध आहे आणि त्या लेखात सांगितलेली कारण गृहीत धरता येतील आणि चूक की बरोबर ठरवत येईल.
परंतु त्या वरून सरकार ची धोरण कशी चुकीची होती .
अशी टीका करायची असेल तर समतोल विचार करावाच लागेल.
1983 च्या अगोदर जगातील किती देशांनी मुक्त अर्थव्यवस्था स्वैकरली होती.
किती देशांनी नियंत्रित अर्थ व्यवस्था स्वीकारली ज्या अर्थ व्यवस्थेवर सरकारी नियंत्रण ह्याची माहिती पण घेणे गरजेचं आहे तेव्हा समतोल विचार होईल आणि दोषारोप करता येतील.
अर्थ व्यवस्थेवर सरकारी नियंत्रण हवं असे तेव्हा राज्य कर्त्यान का वाटत होते त्याची पण काही कारण असतील ना.
तो कोण देणार.
देशाचे नुकसान च करायचा हेतू सरकार चा होता असे निष्कर्ष फक्त राजकीय हेतू नी प्रेरित व्यक्ती काढतील.
सुजाण नागरी असा विचार करणार नाहीत.

इथे उद्योगपतीच्या बाबतीत तुम्ही असं म्हणताय,

देशाचे नुकसान च करायचा हेतू सरकार चा होता असे निष्कर्ष फक्त राजकीय हेतू नी प्रेरित व्यक्ती काढतील.
सुजाण नागरी असा विचार करणार नाहीत.

तिथं कृषी कायद्याच्या लेखावर तुमचे विचार वेगळेच आहेत. तिथे सरकारचा हेतू तुम्हाला शेतकऱ्यांच वाटोळा करून जमिनी उद्योगपतींच्या घशात घालायचा वाटतोय. मग तिथला तुमचा निष्कर्ष फक्त राजकीय हेतू नी प्रेरित आहे असे समजू काय? असंबद्ध आणि परस्पर विरोधी प्रतिसाद कसे काय देऊ शकता तुम्ही? अवघड आहे राव.

> अर्थ व्यवस्थेवर सरकारी नियंत्रण हवं असे तेव्हा राज्य कर्त्यान का वाटत होते त्याची पण काही कारण असतील ना.

मेंढरांच्या कळपावर लांडग्यांना नियंत्रण हवे ह्याला काय बरे कारण असू शकेल ? ह्यावर खोल विचार मंथन करणे अतिशय आवश्यक आहे.

> देशाचे नुकसान च करायचा हेतू सरकार चा होता असे निष्कर्ष फक्त राजकीय हेतू नी प्रेरित व्यक्ती काढतील.

सरकार म्हणजे व्यक्ती ज्या सरकार सध्या चालवतात. तुमच्या आमच्या प्रमाणेच त्यांचा एकच हेतू असतो, स्वतःचा वैयक्तिक फायदा. ह्यांत गैर काहीही नाही, माणुसकी हि अशीच चालते. वैयक्तिक फायदा म्हणजे फक्त पैसे नव्हेत. प्रत्येक व्यक्तीची महत्वाकांक्षा वेगळी असते. काहींना फक्त बॅलन्स, बाई, बाटली हवी असते तर काहींना इतिहासांत आपले नाव करायचे असते. काहींना धर्म प्रिय असतो तर काहींना आपल्या मुलांचे प्रेम सर्वांत महत्वाचे असते. भारत देशाचे नुकसान करावे असा हेतू कुणाचाही नसतो पण जो पर्यंत जास्तीत जास्त नियंत्रण आपल्या हातांत असेल तर आपला फायदा जास्त होईल हे सर्वच पक्षांचे नेते जाणून असतात. त्यामुळे काही तरी मोठे प्रकरण घडल्याशिवाय हे नियंत्रण ते जाऊ देत नाहीत. इथे राजकीय हेतू वगैरे काहीही नाही, माणुसकी हि अशीच चालते सगळीकडे.

भोपाळ दुर्घटना घडली तेंव्हा मृत व्यक्तींना पाहून भारतीय बाबू किंवा राज्यकर्त्यांना आनंद झाला असेल असे नाही. किंवा आयात नियंत्रण किंवा इतर अर्थशास्त्रीय थोतांड वापरून विविध नीती ठरवत असताना भोपाळ मधील गरिबांचा जीव घ्यावा ह्या हेतूने RBI प्रेरित होती असे नाही. दिल्ली मधील सरकारी पगारावर जगणाऱ्या आणि सरकारी गाडीने फिरणाऱ्या लोकांना ह्यांचे काहीही सुतक नव्हते.

नेहरूंच्या समाजवादीराष्ट्रीयीकरण इत्यादी नीती मुळे श्रीमंत लोकांचे येणे दिल्लीत वाढले. विविध बाबू लोकांना मिळण्यासाठी मोठे मोठे लोक लाईन लावू लागले. एका पेनाचं फाटकार्यांत हि मंडळी होत्याचे नव्हते करत होती. त्यामुळे सर्वत्र ह्या मंडळींना समर्थाघरच्या श्वाना प्रमाणे मान आणि सन्मान मिळत होता. ज्या काळी बसने सुद्धा फिरण्याची औकात सामान्य माणसाची नव्हती तेंव्हा हि मंडळी सरकारी अँबॅसिडर गाडीने ड्रायवर सोबत फिरत होती. मिळेल तो मार्ग वापरून आणि कुठलाही मूर्खपणाचा तर्क वापरून ह्या नियंत्रणाची शक्ती आपल्या हातांत ठेवावी ह्यासाठी हि मंडळी धडपड करेल ह्यांत काहीच शंका नव्हती. आज सुद्धा भारतांत तीच परिस्थिती आहे. भारतांतच का जगांत सगळी कडे हेच चालते फरक फक्त इतका आहे कि प्रगत देशांत सामान्य जनतेने ह्या गोष्टीवर विचार केला आहे आणि अश्या संस्था निर्माण केल्या आहेत ज्यांनी सरकार विरुद्ध वारंवार लढा पुकारला आहे.

ट्रम्प साहेबांचेच उदाहरण घेऊ. हा माणूस अत्यंत बेभरवशाचा आहे, निर्लज्ज आहे आणि सगळीकडे सर्व लोकांनी आपले चमचे असावे अशी त्याची मानसिकता आहे. पण जेंव्हा सुप्रीम कोर्ट मधील निवडीची गोष्ट येते तेंव्हा हा माणूस ताटाखालचे मांजर होतो. हेरिटेज फौंडेशन, कॅटो, वोलोख इत्यादी अनेक संस्था सर्व जजवर बारीक नजर ठेवून असतात आणि ट्रम्प ने ह्या संस्थांनी दिलेल्या लिस्ट मधूनच आपले जज निवडले आहेत. अश्या प्रकारचे बारीक काम करणाऱ्या संस्था फक्त प्रगत समाजांत असू शकतात. दुर्दैवाने भारत त्यांत मोडत नाही.

आनन्दा's picture

16 Dec 2020 - 10:59 am | आनन्दा

सरकार म्हणजे व्यक्ती ज्या सरकार सध्या चालवतात. तुमच्या आमच्या प्रमाणेच त्यांचा एकच हेतू असतो, स्वतःचा वैयक्तिक फायदा. ह्यांत गैर काहीही नाही, माणुसकी हि अशीच चालते. वैयक्तिक फायदा म्हणजे फक्त पैसे नव्हेत. प्रत्येक व्यक्तीची महत्वाकांक्षा वेगळी असते. काहींना फक्त बॅलन्स, बाई, बाटली हवी असते तर काहींना इतिहासांत आपले नाव करायचे असते. काहींना धर्म प्रिय असतो तर काहींना आपल्या मुलांचे प्रेम सर्वांत महत्वाचे असते. भारत देशाचे नुकसान करावे असा हेतू कुणाचाही नसतो पण जो पर्यंत जास्तीत जास्त नियंत्रण आपल्या हातांत असेल तर आपला फायदा जास्त होईल हे सर्वच पक्षांचे नेते जाणून असतात. त्यामुळे काही तरी मोठे प्रकरण घडल्याशिवाय हे नियंत्रण ते जाऊ देत नाहीत. इथे राजकीय हेतू वगैरे काहीही नाही, माणुसकी हि अशीच चालते सगळीकडे.

आपल्याकडच्या जनतेला ज्या दिवशी हे कळेल त्या दिवशी ते एकांगी विचर करण्याच्या मानसिकतेतून बाहेर येतील.. २०टक्की जनता जरी या मानसिकतेतून बाहेर आली तरी बदल दूर नाही

हो म्हणून मी प्रत्येक फोरम वर ह्या विषयावर वारंवार लिहिते ! बहुतेक वेळा पल्ठय घड्यावर पाणी पडले तरी हळू हळू लोकांना जाग येते असे वाटत आहे .

दुर्गविहारी's picture

16 Dec 2020 - 12:42 am | दुर्गविहारी

खूपच छान माहिती आहे. या घटनेवर एका वेगळ्या दृष्टीकोणातुन वाचायला मिळाले.

चौथा कोनाडा's picture

17 Dec 2020 - 8:53 pm | चौथा कोनाडा

+१ भारी लेख !

असे लेख वाचले की आपल्या सारखे सामन्य नागरिक सत्ताधार्‍यांच्या हातातले खेळणे आहोत हे जाणवुन आगतिक व्ह्यायला होते.
देशातील सत्ताधार्‍यांचा भोंगळ कारभार, भ्रष्टाचार करण्याचा प्रचंड हव्यास आणि तळागाळातील दारिद्द्र्य यामुळे लक्तरे झालेल्या यंत्रणा, समाजाची उध्वस्त झालेली स्वप्ने याने वेळोवेळी कण्हायला होते.

आपण जीवंत आहोत ही परमेश्वराचीच कृपा हे सतत जाणवत राहते !

अनुप ढेरे's picture

18 Dec 2020 - 2:09 pm | अनुप ढेरे

इथे भ्रष्टाचारही आहे/नाही हे महत्त्वाचे नाही. सरकारी बाबू आणि लोकांच्या डोक्यात भरलेली समाजवादी कीड (ज्यात सरकार वाट्टेल त्या गोष्टी स्वत:च्या नियंत्रणात आणू पाहते, फायदा कमावणार्‍याला गुन्हेगार समजते) हे जबाबदार आहेत.

चौथा कोनाडा's picture

18 Dec 2020 - 3:42 pm | चौथा कोनाडा

+१
आणि हे जबाबदार लोक साम, दाम, दंड, भेद वापरून कसे ही करून यातून सुटून जातात यातुनच आगतिकता येते.