काडीमोड घेताना दुसरा नवरा व कुटुंबाची निवड

माईसाहेब कुरसूंदीकर's picture
माईसाहेब कुरसूंदीकर in काथ्याकूट
23 Nov 2020 - 6:09 pm
गाभा: 

आमची प्रेरणा- http://www.misalpav.com/node/47886

सध्या नवीन नवरा शोधत आहे. स्थळे पाहत आहे. एकाने होकार दिला आहे. त्यानंतर सध्याच्या नवर्याला नारळ दिला. सध्या सामानाची बांधाबांध करत आहे .
माझ्या आजपर्यंतच्या वैवाहिक जीवनात अगोदर होकार देऊन स्थळे शोधायचा प्रकार केला नाही ; पण भरपूर बायका असे करताना दिसल्या.
कमी कालावधीत नववधू सेटल होईल अशा मुलीला पुरूष प्राधान्य देतात असे ऐकून आहे . लवकरात लवक्र लग्न करणे हा जास्त दागिने मिळवण्यचा ही एक मार्ग आहे असे ऐकले आहे पण प्रत्यक्षात असा अनुभव नाही.
आता डेटिंगसाठी भरपूर कॉल्स येतात. जेंव्हा नवर्याशी काडीमोड घेत आहे असे सांगते, तेंव्हा लोक “दुसरा कुणी तयार झाला आहे का”? असे विचारतात . होकारार्थी उत्तर दिल्यावर डेट अरेंज करतात. सतत कॉल करत राहतात पण पत्रिका जमली आहे की नाही ते सांगत नाहीत, पुनः पुनः कॉल करत राहतात . तर अशा परिस्थितीत नेमके होणार्या नवर्याला काय सांगावे ? नविन स्थळ येत आहे की नाही? एका मुलाच्या मामीने मला तुम्ही हे अन एथीकल करत आहात असे वाटत नाही का तुम्हाला असे म्हणाली . त्यावेळी मला काय सांगावे हे खरेच कळत नव्हते.
समजा, नवीन स्थळ आकर्षक वाटलेच तर होणार्या नवर्याच्या लोकाना काय सांगावे ? हे हातळताना सगळा गोंधळ होतो आहे. याबाबतीत मला मदत हवी आहे . शिवाय वराची निवड कोणत्या निकषावर करावी ? आर्थिक हा मुद्दा आहेच पण आतापर्यंत २ बी एच के , एमएनसी वैगेरे फुगा मी पाहिला आणि चुटकीसरशी फुटला पण . शिवाय लहान कुटुंबातील भरपूर काम , धुणी भांडी,गॅस गेला तर चुलीवर जेवण ह्यातुन नवर्याने सोडण्याची भीती हे ही अनुभवून झालेय .
पूर्वी सतत नवरे बदललेले नाहीत पण बराच अनुभव गाठीशी आहे. नवरेही दागिने किती देणार ह्यापेक्षा तुम्हला माहेरून किती मिळाले ह्यावर आग्रही असतात तर नक्की कोणती भूमिका घ्यावी ?

प्रतिक्रिया

उपयोजक's picture

23 Nov 2020 - 6:38 pm | उपयोजक

अजून येऊ द्या! ;))))

इथूनपूढे मिसळपाववर काहीच लिहायचे नाही हे आता नक्की झाले , अर्थात त्यामुळे खूप नुकसान होणार नाहीच पण गट तट पाडून इथे कसा कंपू आहे हे सिद्ध केल्याबद्दल धन्यवाद

विजुभाऊ's picture

23 Nov 2020 - 7:52 pm | विजुभाऊ

जे डी भाऊ एन्जॉय करा हो.
एखाद्या लेखाचे विडंबन येणे हे मिपाच्या हॉल ऑफ फेम मधे एन्ट्री मधे मिळाल्या सारखे आहे.
लेख कविता यांचे विडंबन हे मिपावर हे चालतेच. त्यामुळे तर मिपा जिवंत आहे.

जेडी's picture

23 Nov 2020 - 8:23 pm | जेडी

ताई आहे... असो....

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

23 Nov 2020 - 8:57 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

जेडे,अग केवळ मनोरंजन म्हणून ते आहे. कंपू वगैरे काहीही नाही.
लिहित रहा

चौथा कोनाडा's picture

27 Nov 2020 - 5:40 pm | चौथा कोनाडा

जेडीताई,

एकाद्या धाग्याचे विडंबन होणे हा मिपाचा विशेष पुरस्कार समजला जातो !
मिपाचा असा विशेष पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन & आणी पुढील वाटचालीस हसतहसत शुभेच्छा !

😆

बाप्पू's picture

23 Nov 2020 - 6:52 pm | बाप्पू

Lol.. मस्त विडंबन.

कोणता नवरा किती ग्रॅच्युईटी देतो, पेन्शन काय मिळेल याची कम्पॅरिझन त्या त्या कंपनीच्या एच आर सोबत डिस्कस करत रहा.
प्रोफेशनल एथिक्स ठेवायलाच हवेत

आनन्दा's picture

23 Nov 2020 - 9:21 pm | आनन्दा

आयला जाम हसलो..

जेडीताई वाईट वाटून घेऊ नका.. प्रत्येक वेळेस विडंबन म्हणजे खिल्ली नसते.. खिळाडूपणाने घ्या असे सुचवेन.
इथले प्रतिसाद बघा, त्यातला एकही प्रतिसाद जर तुमची खिल्ली उडवणारा आला तर जरूर परत न लिहायचा विचार करा..

नाहीतर विडंबनाचा आनंद घ्या!

गवि's picture

23 Nov 2020 - 9:34 pm | गवि

+१

अगदी एखादा आलाही खिल्ली उडवणारा, तरी लिहीत राहा. आणि विडंबनाची केवळ मजा घ्या.

श्रीरंग_जोशी's picture

24 Nov 2020 - 2:06 am | श्रीरंग_जोशी

असे फर्मास विडंबन 'एक अरसे बाद' वाचायला मिळाले.

जेडीतै - विडंबनासाठी तुमचा धागा कच्चा माल म्हणून वापरला जाणे हे एक निमित्त असते. विडंबनाची प्रेरणा विडंबकाच्या आत खोलवर दडलेली असते. मिपावर बागडण्याचा मनसोक्त आनंद मिळवायचा असेल तर 'विडंबकाचा आयडी असावा ऑनलाइन' हे ब्रीदवाक्य जाणून असावे.

माहितगार's picture

24 Nov 2020 - 4:26 pm | माहितगार

जेडीतै - विडंबनासाठी तुमचा धागा कच्चा माल म्हणून वापरला जाणे हे एक निमित्त असते. विडंबनाची प्रेरणा विडंबकाच्या आत खोलवर दडलेली असते.

अगदी सहमत, विडंबनाची प्रेरणा म्हणण्यापेक्षा अभिव्यक्तीची प्रेरणा किंवा लेखन विषय आधीच कुठेतरी डोक्यात घोळून गेलेला असतो. काही कारणाने लगेच लेखन झालेले नसते किंवा फॉर्मॅट मिळालेला नसतो. एखादे लेखन समोर येते तेव्हा मागचे घोळलेले विचार त्याच फॉर्मॅटला वापरून लिहिता येईल हे लक्षात येते तेव्हा विडंबनाचा जन्म होतो.

बाकी माई कदाचित वैचारीक राजकीय कंपुत असतीलही पण त्यांच्या राजकीय वैचारीक कंपुपणाचा या विडबंनाशी संबंध नाही. काही असलेच तर लेखनास स्त्रीवादी कंपुत्वाची अल्पशी लागण झालेली असू शकते पण तेवढे चालायचेच.

त्यामुळे यावेळी गटतट बाजूस पडून खुमासदार विडंबनासाठी माईंचे सार्वत्रिक अभिनंदन होणार यात शंका नाही, (तुर्तास राजकीय गट बाजूस ठेऊन) आम्हीही माईंच्या लेखनाचे अभिनंदन करतो.

चलत मुसाफिर's picture

23 Nov 2020 - 9:55 pm | चलत मुसाफिर

कोणत्याही नवऱ्याला होकार देण्याअगोदर त्याच्या याआधीच्या बायकांशी चर्चा जरूर करा.

टवाळ कार्टा's picture

23 Nov 2020 - 11:58 pm | टवाळ कार्टा

हेच लिहायला आलेलो
नोकरी असो किंवा छोकरी....अनुभव फार महत्वाचा असतो =))

विजुभाऊ's picture

24 Nov 2020 - 8:03 am | विजुभाऊ

हो ना.
Lessons learned हे सर्वात महत्वाचे क्रायटेरिया

टवाळ कार्टा's picture

23 Nov 2020 - 11:59 pm | टवाळ कार्टा

आयला....माईंचा षटकार थेट स्टेडियमच्या बाहेर...ख्या ख्या ख्या

माईसाहेबाना साष्टांग दंडवत !

इथे कदाचित बायको म्हणून राहण्यापेक्षा ष्टेपणी म्हणून राहण्याचे सुद्धा काही फायदे तोटे असतील तर तेही पाहावेत म्हणे !

माईसाहेब,
राजकीय चर्चांमधून थोडा वेळ काढून असे फर्मास विडंबन लिहून विरंगुळ्याचे चार क्षण आम्हाला मिळवून दिल्याबद्दल तुमचे आणि तुम्हाला त्यासाठी प्रेरित करणाऱ्या जेडी ताईंचे मनःपूर्वक आभार 🙏
जेडी ताईं वरती अनेक मान्यवरांनी लिहिल्याप्रमाणे एक विनोद म्हणूनच ह्या विडंबनाकडे पहा आणि आनंद घ्या अशी तुम्हाला आग्रहाची विनंती!
आणि माईसाहेब तुम्हीपण तुमच्या प्रतिभेला न्याय देत खुमासदार लेखन करत रहा असा तुम्हाला विनंतीवजा आग्रह!

प्रसाद गोडबोले's picture

24 Nov 2020 - 11:27 am | प्रसाद गोडबोले

+१
अगदी हेच लिहिणार होतो.

योगी९००'s picture

24 Nov 2020 - 9:35 am | योगी९००

बर्‍याच दिवसांनी गंमत आली. माईंना (पहिल्यांदाच) दंडवत...!!

बाकी नानांची काळजी वाटते. त्यांच्याशी जाता जाता भांडू नका. परतीचा मार्ग मोकळा ठेवा.

Bhakti's picture

24 Nov 2020 - 11:18 am | Bhakti

मला माझ्या 'अशाच 'काडीमोड घेतलेल्या नवर्‍याची आठवण आली..सध्या नवराच नको..हा हा!!

कंजूस's picture

24 Nov 2020 - 2:14 pm | कंजूस

'असं अमचे हे म्हणतात' असं हल्ली येत नाही ते का समजलं.

ज्ञानोबाचे पैजार's picture

24 Nov 2020 - 4:55 pm | ज्ञानोबाचे पैजार

या भलत्याच माडर्न माईसाहेब निघाल्या.

"आमच्या यांचे असे मत आहे " या पालुपदावरुन आमचा असा समज झाला होता की माइसाहेबांची आणि "यांची" साताजन्माची गाठ मारली गेली आहे, अगदी सरकारी नोकरी सारखी. पण कसचे काय?

आज आमच्या डोळ्यासमोरील अजून एक आदर्श उन्मळून पडला.

पैजारबुवा,

माहितगार's picture

24 Nov 2020 - 5:49 pm | माहितगार

:))

योगी९००'s picture

25 Nov 2020 - 9:58 am | योगी९००

मस्त प्रतिसाद... हहपुवा.

निनाद's picture

25 Nov 2020 - 10:36 am | निनाद

आज आमच्या डोळ्यासमोरील अजून एक आदर्श उन्मळून पडला.
लेखच नाही तर प्रतिसाद पण भारी... :)

ताजे प्रेत's picture

24 Nov 2020 - 10:57 pm | ताजे प्रेत

अशीच आमची माई असती
तर आम्ही ही आंचरट झालो असतो

भीषण हसलो

आनन्दा's picture

24 Nov 2020 - 11:57 pm | आनन्दा

आहात ते कमी आहे का?
तुमच्या चुरचुरू बोलणाऱ्या जिभेला डाग द्यायला पाहिजे!!

निनाद's picture

25 Nov 2020 - 10:36 am | निनाद

सही आहे हा!

विजुभाऊ's picture

25 Nov 2020 - 7:58 am | विजुभाऊ

डाग अच्छे होते है---- माई एक्सेल

Rajesh188's picture

25 Nov 2020 - 9:30 am | Rajesh188

नवरा बदलून मिळेल अशी बिझनेस आयडिया लोकांच्या डोक्यात येवू शकते आणि तशी वेबसाईट भविष्यात चालू झाली तर आश्चर्य वाटून घेवू नका.

आनन्दा's picture

25 Nov 2020 - 4:30 pm | आनन्दा

हब्बीजान.कॉम

हलाला कि काय म्हणतात ते हेच प्रकरण आहे. !

शा वि कु's picture

26 Nov 2020 - 7:58 am | शा वि कु

आजिबात आश्चर्य वाटून नाही घेणार.

अनिरुद्ध.वैद्य's picture

26 Nov 2020 - 8:11 am | अनिरुद्ध.वैद्य

खुमासदार!!

(प्रेरणेपेक्षा विडंबनावर जास्त प्रतिसाद आल्याने विडंबन कमालीचे यशस्वी)

चौकटराजा's picture

26 Nov 2020 - 9:17 am | चौकटराजा

ए माई तुझे हे विडंबन पाहून तू नवर्याला सोडण्याचा आणभाव घेतलेला दिसतोय ! फर्मास विडंबन व प्रतिसाद तर एक्सो एक भारी ! मस्त !