शिवसेना भाजप नेमका सुरा कोणी खुपसला ?

हस्तर's picture
हस्तर in काथ्याकूट
14 Nov 2020 - 4:58 am
गाभा: 

माझे उत्तर आहे भाजप
१) २०१४ मध्ये राष्ट्रवादी कडून छुपा पाठिंबा घेतला ,नाकारू शकले असते
२) शिवसेने ला दुय्यम मंत्रीपदे दिली ,आठवले साहेबांना मात्र काही झाले तरी मंत्रिपद
३) २०१९ ,पहिल्यांदा राष्ट्रवादी बरोबर युती भाजप ने केलीये ,शिवसेना बोलली असेल कि पाठिंबा आहे काँग्रेस चा पण त्यांनी पहिल्यांदा युती केली नाही ,
४) शिवसेनेच्या कट्टर वैरी नारायण राणे यांना पक्षात घेतले

शिवसेनेने सामना मध्ये आदळ आपट केली वगैरे वगैरे छोटी गोष्ट आहे ,युती तोडली नाही व पहिले पाऊल उचलले नाही काँग्रेस बरोबर

प्रतिक्रिया

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

14 Nov 2020 - 8:36 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

असे काही नसते रे हस्तर्या. खंजीर खुपसला आहे हे कळण्यास एवढा वेळ लागत असेल तर शिवसेना मूर्ख आहे असेच म्हणावे लागेल.

बाप्पू's picture

14 Nov 2020 - 11:30 pm | बाप्पू

बास ना आता.. वर्ष होऊन गेले तरी तिथेच कोलमडताय??
संपादक साहेबांचे अग्रलेख जास्तच मनावर घेता असे वाटते.

रामदास२९'s picture

15 Nov 2020 - 12:25 am | रामदास२९

आता हा विषय कधीच संपला आहे...... पुन्हा उकरून काढायला नको.. दोघांपैकी कोणीही तयार असेल तरीही

अनिरुद्ध.वैद्य's picture

15 Nov 2020 - 7:00 am | अनिरुद्ध.वैद्य

मात्र दोन्ही पक्षांनी केला.

माझ्या मते सुरा वगैरे कुणी खुपसलेला नाही. शिवसेना भाजप युती म्हणजे सैफ अली खान (भाजप) आणि अमृता सिंग (शिवसेना) ह्यांचा लग्नाप्रमाणे होती. बालिश बायकी चेहेऱ्याचा सैफ, प्रौढ पण जास्त यशस्वी अमृताशी लग्न करता झाला. त्यांच्या लग्नात अमृता पुरुष तर सैफ बायको वाटत होता. काही दशकांत सैफ माचो बनला तर अमृता चे शेल्फ लाईफ संपले. मग सैफ ला अमृता अडगळ वाटू लागली. तिथे घटस्फोट अतिशय प्रेडिक्टेबल होता.

सत्ता कशी वापरायची हे काँग्रेसला पुरेपूर ठाऊक आहे. फोटोला थोबाड आणि हाराला गळा म्हणून उद्धव ला मुख्यमंत्री आणि इतर सर्व खाती आपल्या हातांत हे प्रकरण काँग्रेस व्यवस्थित चालवेल आणि कधी उद्धवची गरज संपली कि ढुंगणावर लत्ताप्रहार करून उद्धव ह्यांना "बोहोत बेआबरू होकार तेरे कुचे से हम निकले" करतील. ह्या अपमानातून उद्धव ठाकरे पुन्हा काडीही सावरणार नाहीत.

शिवसेना ह्या पक्षाची उपयुक्तता संपली आहे आणि रेलेवंट राहण्याची उद्धव ह्यांची हि धडपड आहे. मी उद्धव ह्यांची चूक अजिबात म्हणत नाही. त्यांच्यासाठी हाच सर्वांत जास्त चांगला पर्याय होता. शिवसेना मोडकळीस आली कि अमित शाह हळू हळू शिवसेनेच्या बालेकिल्य्यांवर कब्जा करतील. संधीसाधू "मावळे" हळूच "भक्त" बनतील.

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Nov 2020 - 10:15 pm | अमरेंद्र बाहुबली

@साहना- स्वप्नरंजन छान आहे. पण अशी अनेक स्वप्ने पाहीली गेली. आणीबाणीवेळी आणी भुजबळ, राणे, राज हे सोडून गेले तेव्हाही. सेना संपली तर नाहीच पण आज मुख्यमंत्री पद बाळगून आहे. हे महाराष्ट्रातील नेते सेनेचं काही वाकडं करू शकले नाहीत तर गुजरात चे शहा काय करनार?? (२०१४ ला मोदी लाटेत ६३ जागा जिंकवून आणणार्या ऊध्दव ठाकरेंना कमजोर समजनार्यांची किव येते.)

अनन्त अवधुत's picture

17 Nov 2020 - 11:56 pm | अनन्त अवधुत

समर्थन दिले होते. भुजबळ , राणे, राज सोडुन जाणे आणि आपली आयडियालॉजी (नेमका मराठी शब्द चटकन सुचत नाहिय:() सोडणे ह्यात फरक आहे.

शिवसेना किंवा महाराष्ट्राचे भवितव्य ह्यांत मला काडीचाही इंटरेस्ट नाही. ह्या भांडणात माझा कुठलाही कुत्रा नाही ! त्यामुळे मला स्वप्नरंजन वगैरे करायची गरज नाही.

उद्धव ठाकरे हे फोटोला थोबाड आणि हाराला गळा पाहिजे म्हणून मुख्यमंत्री आहेत असेच बाहेरून तरी वाटते. शिवसेना नामशेष नाही झाली तरी आजची शिवसेना आणि १० वर्षें मागची शिवसेना ह्यांत आमूलाग्र बदल आहे हे मात्र नक्की.

अमरेंद्र बाहुबली's picture

20 Nov 2020 - 7:57 pm | अमरेंद्र बाहुबली

भाजपची साथ सोडली म्हणऊण १० वर्ष आधीच्या आणी आताच्या सेनेत “अमुलाग्र“ बदल होतो. व्वा.

शिवसेनेवर टीका केली म्हणून मला भाजपशी साहना-भूती असे असे तुम्हाला वाटते त्यांत आपली विचारशून्यता आहे. डेव्ह फर्नांडिस वर मी मागे टीकेची झोड वगैरे म्हणतात ती उठवली आहे. वृद्धा नारी पतिवृता न्यायाने चालणाऱ्या भाजपाला आता अचानक ७६ अप्सरा हाती लागल्या आहेत, त्यांचा ऱ्हास आणि विनाश वेगळ्या प्रकारचा आहे.

राणे भुजबळ गेले तेव्हा बाळा साहेब होते ,२०१४ ला पण त्यांच्या शोकाची सहानुभूती होती

त्या ६३ सुद्धा मोदी लाटेमुळेच मिळाल्या होत्या. शिवसेनेची लायकी च नाही तेवढी. उद्धव ने ही सर्कस करून होती नव्हती ती सुद्धा घालवली च आहे. आता आयुष्यभर फोटो काढायला मोकळा होईल थोड्याच दिवसांत.

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Nov 2020 - 1:16 pm | अमरेंद्र बाहुबली

अरे वा. मोदींविरोधआत लढून मोदींचे ऊमेदवार पाडून मोदीलाटेमुळे सेनेचे ६३ जिंकले.ख:) ( खदखदून हसनारी ईमोजी)
रच्याकने ऊद्या म्हणा केजरीवाल नेही दिल्ली मोदीलाटेमुळेच जिंकली. ( आणखी एक खदखदून हसनारी ईमोजी)

कळेल लवकरच.. तेव्हा खद्खदून हसा

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Nov 2020 - 9:53 pm | अमरेंद्र बाहुबली

काय कळनार?? कधी कळनार?? लवकरच म्हकजे किती वर्षानी?? ख्या ख्या ख्या

वैचारीक दृष्ट्या भाजप, कॉग्रेस आणि सेना असे तीन भिन्न गट आहेत मतदारांचे. तिघांचाही पैस बराच मोठा आहे. राजकीय सोयीनुसार भाजप, काँरेस, राष्ट्रवादी, आणि सेना असे चार गट आहेत. सेनेने सत्ता स्थापन करुन आपल्या गटाचा ठाशीवपणा अधोरेखीत केला, प्रसंग बघुन आघाड्या करुन सत्ता स्थापन करायची आपली सिद्धता स्पष्ट केली.
त्यामुळे मतदार आणि राजकीय नेते, दोघंनाही भरपूर ऑप्शन्स उपलब्ध झालीत. त्यामुळे नजीक भविष्यात तरी सेना भवनाला कुलुपं लागायचे चान्सेस नाहित. युवराज आदित्यने अजुन जरी फार काहि पराक्रम गाजवला नसला तरी तो राजकारणात स्वत:हुन सक्रीय झाल्याचा वाटतो. तेंव्हा सेनेत नेतृत्वाचा प्रश्न येणार नाहि. नेतृत्व आहे, मतदार आहे, निबडुन येण्याची शक्यता असलेले नेतेमंडळी आहेत... या भांडवलावर सेना जगेल.

Rajesh188's picture

17 Nov 2020 - 1:38 am | Rajesh188

सेना समजा कमजोर झाली असे समजले तरी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात मजबुत होईल असा त्याचा अर्थ नाही.. .
भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्र मध्ये स्वा बळावर कधीच सत्ता मिळणार नाही.. .
फडणवीस बोलले होते आता कोण पैलवान च शिल्लक नाही लढायला आणि स्वतः च चारी मुंड्या चित झाले.

अनन्त अवधुत's picture

17 Nov 2020 - 4:08 am | अनन्त अवधुत

एक भाग असाहि आहे कि ज्यांना काँग्रेस नकोच. पूर्वी तो मतदार सेना, भाजप, स्थानिक उमेदवार, आणि इतर छोटे पक्ष असा विभागला होता. अर्थात ह्यात मोठा वाटा सेना-भाजपचा होता. तो सेनेचा मतदार आता भाजप कडे वळेल. स्थानिक उमेदवार, आणि इतर छोटे पक्ष हा पर्याय आधी पण होता, त्यामुळे त्यांच्याकडे हा मतदार वळणार नाही.
महाराष्ट्रात जर एकाच पक्षाला बहुमत मिळणार असेल तर तो भाजप असण्याची शक्यता जास्त आहे कारण सेना, आणि दोन्हि काँग्रेस एकत्र आल्यामुळे त्यापैकि कोणिही एक १४५ जागा लढवू शकत नाही, निवडून येणे तर लांबची गोष्ट आहे.

रामदास२९'s picture

19 Nov 2020 - 12:19 pm | रामदास२९

चारी मुंड्या चित

.. मान्य आहे त्यान्च्या जग १२२ वरुन १०५ आल्या.. पण त्याचा अर्थ हा नाहि..
४१ वरुन ५४ आणि ४२ वरुन ४४ = प्रचन्ड यश
१२२ वरुन १०५ - सपशेल पराभव .. वा रे वा

हा आपल्या इथल्या प्रसारमाध्यमान्नी सेट केलेला नरेटिव्ह( पर्यायी शब्द आठवत नाही)

शिवसेनेच म्हणाल तर त्यान्नी व्यवहारिक द्रुष्टीकोन पाहिला, जो त्यान्च्या पक्शासाठी चुक नाही, फक्त त्यान्नी निवडणूकीच्या आधी हे करायला पाहीजे होता..

दिगोचि's picture

18 Nov 2020 - 5:23 am | दिगोचि

आयडियोलोजीला विचारसरणी हा मराठी शब्द योग्य आहे का?

अनन्त अवधुत's picture

18 Nov 2020 - 6:42 am | अनन्त अवधुत

मला हाच शब्द हवा होता पण तेव्हा आठवला नाही. धन्यवाद!

फडणवीस ----- चारी मुंड्या चित झाले.>>> ते मुख्यमंत्री झाले नाहीत हे खरे परंतु त्यांचा पक्ष महाराष्ट्र विधानसभेत सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे ते चारी मुंड्या चित झाले असे म्हणता येणार नाही.

Rajesh188's picture

18 Nov 2020 - 9:36 am | Rajesh188

पक्षाची विचारसरणी वैगेरे काही नसते सर्व सत्तेचा खेळ असतो.
सर्वधर्म समभाव वाले नितीशकुमार बीजेपी ला चालतात.
एकदम विरुद्ध विचाराची मेहबूबा मुफ्ती चालली ना.
नितिकुमार आणि मेहबूबा मुफ्ती दोघे ही हिंदुत्व वादी नाहीत तरी सत्तेसाठी भारतीय जनता पक्ष आहे आणि होता ना त्यांच्या बरोबर.
बिहार मध्ये हिंदुत्व आणि राम मंदिर हे मुद्दे निवडणुकीत कधी असतात का.

सॅगी's picture

18 Nov 2020 - 1:53 pm | सॅगी

एकदम विरुद्ध विचाराची मेहबूबा मुफ्ती चालली ना

जोवर चालली तोवर चालवली, नंतर सरकार मधुन बाहेरही पडली भाजप...निदान "खाटा कुरकुरण्याचे" अ(ह)ग्रलेख तरी नाही पाडले..

बाकी एकदम विरुद्ध विचाराची शिवसेना महाराष्ट्रात तुमच्या आवडत्या पक्षाला चालते की धावते हो? त्यावेळी तुमच्या आवडत्या पक्षाची "Idology" कुठे जाते? की तो समाजसेवेचा "खेळ" असतो??

आपला तो बाब्या, दुसर्याचं ते......

सचिन's picture

18 Nov 2020 - 6:39 pm | सचिन

मतदाराने स्वत:च सुरा खुपसला आहे स्वतःच्याच पोटात.
संपूर्ण महाराष्ट्रात ६०% च्या आसपास आणि पुण्यामुंबईत ५०% मतदान !!
हे म्हणे सर्वात प्रगतिशील राज्य आणि २०% जनता रहाते पुण्यामुंबईत !
याच काळात पूरग्रस्त कोल्हापूराने ७५% करून स्पष्ट निकाल दिलाय ...
आन्ध्र, आसाम, अरुणाचल, मणिपूर, सिक्किम ८०% आणि लक्षद्वीप ८५%
करू शकतात ... पण आम्ही जातो long weekend ला !!

देशाच्या इतिहासात पक्ष फुटून सत्तेसाठी वेगळे झालेलं आहेत ,पक्षांतर होवून सरकार बनली आहेत,सरकार पडली आहेत
किती तरी उदाहरणे आहेत.
म्हणून पक्षांतर बंदी कायदा आला पण ठराविक टक्के लोकांना पक्ष सोडायचा असेल तर आज पण ते सोडून दुसऱ्या पक्षाला मिळू शकतात.
त्या मुळे खूप तोफ, बॉम्ब एकमेकावर टाकले आहेत.
युती असून सेना वेगळी झाली ही काही खूप मोठी घटना नाही.
कोणी कोणाच्या पाठीत सुरी खुपसली नाही सर्वांनी स्वतःचा फायदा बघितला एवढंच त्याचा अर्थ आहे.
लोकशाहीत जनहित विरूद्ध काम होत असेल तर सत्ता धारी पक्षातील आमदार,खासदार नी सुद्धा स्व बुध्दी नी स्व सरकार विरूद्ध मतदान करणे अपेक्षित आहे.
आणि त्यालाच mature लोकशाही म्हणता येईल.

शूकरोपम's picture

20 Nov 2020 - 4:47 pm | शूकरोपम

नेमका सुरा कोणी खुपसला ?
उत्तर आहे भिजेपि आनि भिजेपि

म्हनुइन इतके पक्श आता त्यांना सोदून चालले आहे. आजला एन्दिए मदे किती पक्श शिल्लक रहिले आहे?
कारन तेच आहे वेळ भेटली की सुरा भोसक्ला जातो!

अथांग आकाश's picture

20 Nov 2020 - 5:35 pm | अथांग आकाश

तुमचे पुढील प्रतिसाद अजुन सुवाच्य करण्यासाठी खालची लींक वाचा, उपयोगी पडेल!
https://www.misalpav.com/node/6332

अहो महाराज, कोणाला सांगताय?

बकरीच कातडं पांघरले तरी लांडगा बकरी म्हणून बकरीसारखं ओरडू शकत नाही ☺️☺️

लेखाचे शिर्षक चुकले आहे त्यामुळे त्यातील प्रश्नांची उत्तरे देण्यासारखी नाहित.
राजकारणी खंजीर खुपसतात. सुरा नव्हे. त्या खंजीराला गंज लागू नये म्हणून अधूनमधून तो कोणाच्या तरी पाठीत खुपसावा लागतो. महाराष्ट्रात याचा प्रयोग जाणत्या राजाने प्रथम केला असे ऐकीवात आहे. त्यानंतर त्याचा अधून मधून प्रत्यक्ष प्रयोग करता येण्याजोगा नसला तर त्याचा उपयोग एका महा-आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्राद्वारे विरोधकांचा कोथळा काढण्यासाठी केला जातो.

एखादं कार्टं असतं ना ज्याला उगाचच एक मुस्काटात ठेवून द्यावंसं वाटतं. उद्धव ला बघून अगदी हेच फीलिंग येतं :)

प्रेमाच्या आणाभाका ते खंजीरसूराच्या भावना सामान्य नागरीक जपत असतात, राजकारण्यांसाठी राजकारणात खंजीरसूरा वगैरे पेक्षा अंतर्निहीत गुंतवणूक आणि संबंधांची गणित अधिक महत्वाची असतात. मागच्या विधानसभेच्या पाठोपाठ शिवसेनेशी वाटाघाटींच्या हिशेबात भाजपा हुकली, नितीश कुमार सोबत चुकली होती नंतर परत एकत्र आले हा एक भाग झाला, नितीश सोबतचा अनुभव नवा नव्हता तरीही भाजपा महाराष्ट्रात का चुकली. व्यक्तिगत आणि पक्षाची प्रतिष्ठा हा एक भाग झाला मोदींची आणि भाजपाची प्रतिष्ठा बिहार मध्येही होती पण नितीश सोबत तडजोडी शिवाय पर्यायही नव्हता. मग भाजपाने महाराष्ट्रात शिवसेनेसोबत डाव मोडण्याची जोखीम का घेतली? पाटणा आणि मुंबईत फरक काय आहे ? यात मुंबईचे भारताची आर्थिक राजधानी आहे जिथून राजकारणात लागणारा कॉर्पोरेट दानशूरत्व सप्लाय होते खासकरून विरोधीपक्षाच्या नाड्या आवळण्यासाठी ते अगदी महत्वाचे ठरते. त्यावरच्या नियंत्रण शक्यतोवर भाजपायी नेत्याचे पुर्ण नियंत्रण असावे खासकरून मोदींच्या नावाची लाट असताना नियंत्रणाचा प्रयत्न स्वाभाविक होता. एन्रॉनला समुद्रात बुडवतात बुडवता तारून नेणारा सेना नेतृत्वही अगदीच अपेक्षा कमी ठेऊन असणार नव्हते. सेना अगदी खूप ताणणार नाही हा हिशेब कशाच्या भरावर होता ? जर सेना काँग्रेस सोबत गेली तर दोन्हीपक्षांचे वैचारीक वेगळेपण संपून जाते आणि जेव्हा पुढच्या निवडणूका येतील तेव्हा स्थानिक तिकीट वाटपाची गणिते जुळवणे दोघांनाही सोपे असणार नाही. त्यामुळे एकत्र आले तरी स्थानिक निवडणूकांच्या वेळा आल्या की वेगळे होण्याची प्रक्रीया चालू होईल हा भाजपा नेतृत्वाचा हिशेब चुकला ते कोविडचे कारण देऊन स्थानिक प्रशासनांच्या निवडणूकांची प्रक्रीया सेना नेतृत्वास चुकवता आली. पण पुन्हा पुढच्या विधानसभा निवडणूका येतील तेव्हा या प्रश्नांची उत्तरे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेनेस द्यावीच लागतील पण तुर्तास कॉर्पोरेट देणग्यांची सोय होऊन गंगाजळीत सुधारणा होणे खासकरून काँग्रेससाठी महत्वाचे होते.

एक प्रश्न असाही पडतो की उद्धव ठाकर्‍यांनी राजकीय कोलांट उडी मारली पण कार्यकर्त्यांना कशी झेपली ? याचे उत्तर बरेच मागे शरद पवारांनी बर्‍याच वर्षांपुर्वी सांगितले सेना असो वा भाजपा त्यात जाणारी स्थानिक कार्यकर्तेही आमच्याच नेत्यांचे कुटूंबीय आहेत. त्यांना समजावून वापस आणण्याची कढी बाजूला ठेवली तरी लोकसंख्या वाढल्या नंतर राजकीय आकांक्षा असलेल्या नव्या पिढ्या नवे उपलब्ध मार्ग शोधणार हे स्वाभाविक होते, त्यांनी सेना भाजपाच्या दिशेने वारे वहाते म्हटल्यावर त्यांना आपलेसे केले. सत्तेत वाटा मिळतो तो पर्यंत तेव्हा प्रश्न वैचारीक बांधीलकीचा नसताना वरचे नेते कोणते नेतृत्व एकत्र आले कोणते नाही याने लगेच फरक पडत नाही. पुढच्या विधानसभा निवडणूकांच्या एखाद वर्ष आधी म्हणजे अजून तीनेक वर्षांनी या एकत्र आलेल्या पक्षांना वेगळे व्हावे लागेल किंवा राजकीय अस्तीत्वासाठी (तिकिटांसाठी) आज शांत असलेल्या तिन्ही पक्षांच्या बर्‍याच कार्यकर्त्यांना आपापल्या पक्षांना सोडचिठ्ठीतरी द्यावी लागेल.

गूगल शोधप्रीयता अगदी लोकप्रीयतेत बदलेल असे नक्की गणित मांडता येत नाही पण वारे कोणत्या दिशेने वहाताहेत याचा अंदाजा येतो. होऊन गेलेल्या निवडणूकांच्या आधी महाराष्ट्रपातळीवरील नेत्यात शरद पवारांबद्दलची गूगलशोधप्रीयता वाढत असल्याचे मी नोंदवले होते. आणि शरद पवारांच्या वाढल्या लोकप्रीयतेच्या निकालच नव्हे महाराष्ट्रीय राजकारणावरील प्रभावाचे आपण सारेच साक्षी आहोत.

विधानसभा निवडणूका होऊन गेल्या नंतर मागच्या वर्षाभरात गूगलशोध प्रियतेबाबत राज्यपातळीवरील नेत्यात सर्वाधिक नुकसान राज ठाकर्‍यांचे झाले केवळ लोक प्रियता असून चालत नाही राजकीय सोंगट्या वेळच्या वेळी खेळणे आणि दुसर्‍या फळीतील नेतृत्व उभे करण्यात राज ठाकरे सातत्याने कमी पडल्यासारखे वाटतात. असो. मागच्या वर्षाभरातील सर्वाधिक फायदा उद्धव ठाकरेंचा झाला, माझ्या गूगल ट्रेंड्सच्या पुर्वींच्या अभ्यासात उद्धव ठाकरे व्यक्तीगत लोकप्रीयते पेक्षा बाळ ठाकरेंच्या आठवणी आणि त्यांनी बनवून ठेवलेल्या सेनेच्या ब्रँडवर टिकून होते, कोलांटउडी कशी का मारेनात राज्यस्तरीय राजकारणात ओळख बनवण्यात उद्धव ठाकरेंना यश आल्याचे दिसते त्या शिवाय मागच्या वर्षाभरात त्यांची बाळ ठाकरेंनी बनवलेल्या ब्रँडवरचे अवलंबीत्व कमी झाले. उद्धव ठाकरेंनी मारलेल्या कोलांट उडीत (राजकीय) स्वार्थाची गणिते असतील ते स्वाभाविक असेल. त्यांचे एक राजकीय गणित मुंबईतील लोकसंख्येतील बदला सोबत बदलत आहे हे बर्‍याच जणांच्या नजरेतून कदाचित त्यांच्या स्वतःच्याही नजरेतून सुटत असावे. मुंबई पुर्वीपेक्षाही अधिक कॉस्मोपॉलीटन म्हणजे (हिंदीभाषी) झाली असणार हे स्वाभाविक आहे. त्यातील हातात पाटी घेणार्‍या फिल्मी एनडीटीव्ही जनरेशनशी सध्याच्या ठाकरे पितापुत्रांची नाळ जु़ळू लागली आहे त्याही साईडची कॉर्पोरेट गणिते आहेतच. आणि त्याच गणिताने काँग्रेसशी वैचारीक शिफ्टचे प्रयत्न शिवसेनेने केलेले दिसतात, मुंबई शिवायच्या कार्यकर्त्यांना तिकीटांसाठी हाणामारी करावी लागेल तो पर्यंत म्हणजे अजून चारेक वर्षे फायदा नाही. अर्थात उद्धव ठकरेंच्या एक गोष्ट लक्षात आली नाही जो घ्यायचा तो पुर्ण फायदाही त्यांनी घेतला नाही. कोविड काळात महाराष्ट्रातील हिंदीभाषी मजुरांचे स्थलांतर होऊ नये या साठी त्यांना त्यांच्याशी अधिक व्यक्तीगत संवाद साधता आला असता किंवा हिंदीभाषिक मजूरांना केलेली आवाहने हिंदीतून करता आली असती. त्यांना मराठी शिकवण्याचे काम नंतर करा जेव्हा त्याच्यापुढे जगण्या मरण्याचा प्रश्न आहे तेव्हा तुम्ही मराठीतून मोठ्या मदतीच्या गप्पा केल्या तरी हिंदी जनतेस कळण्यास मार्ग नव्हता सांगण्याचा मुद्दा मुंबईतील नव्या जनरेशनच्या काँग्रेसी उच्चभ्रूंशी वैचारीक जुळवणूक उद्धव ठाकर्‍यांनी साधली तरी हिंदीभाषी मजूर मतदार वर्ग ज्याचे मुंबईतील बदललेल्या मतदान गणितात महत्व असेल तो मतदार वर्ग काँग्रेस आणि भाजपा कडून स्वतःकडे वळवून घेण्याकडे उद्धव ठाकरेंचे लक्ष नव्हते आणि नाही. असो जसे आहे तसे स्वतःची काही एक ओळख स्वतःच्या मतदारांशिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतदारांपर्यंतही पोहोचवण्यात उद्धव ठाकरेंना या निमीत्ताने यश येत असावे. पुढच्या विधानसभे पर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील पवारेतर नेत्यातून उद्धव ठाकरेंना मागे सारणारा नेता त्यांना पुढे आणता आला नाहीतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उद्धव ठाकरेंवरील अवलंबित्व पुढच्या विधानसभा निवडणूकी नंतर टिकून राहण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण त्यासाठी उद्धव ठाकरे मतदारांना राजी करणारे काय चमत्कार करू शकतात ते महत्वाचे असावे कारण पुढच्या निवडणूकीच्या वेळी मोदींचे कार्ड त्यांच्या सोबत असणार नाही आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी जुळवून घेण्याच्या नादात त्यांचे स्वतःचे काही मोहोरे तिकिटांसाठी कोलांट उड्या मारू लागतील किंवा राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या राजकारणात मागे तरी पडतील.

उद्धव मोदी अशी तुलना महाराष्ट्रातील गूगल शोधप्रीयतेच्या नजरेतून केली तर मगच्या पाच वर्षाचे एकुण गुणोत्तर काढले तर उद्धव १ तर मोदी सोळा म्हणजे मोदी सोळा पटीने पुढे होते, मागच्या वर्षाभरात मोदींची महाराष्ट्रातील तौलनीक शोधप्रीयता दुप्पट झाल्याचे दिसते पण उद्धव ठाकर्‍यांची आठपट वाढली म्हणजे सध्याचे गुणोत्तर उद्धव आठ तर मोदी बत्तीस असे दिसते. तर असा उद्धव ठाकरेंना म्हटले तर फायदाच झाला आहे अर्थात निवडणूकींची गणिते राजकारणार्‍या प्रत्यक्ष खेळलेल्या सोंगट्यांवर अवलंबून असतात लोक प्रियतेचे गणित राज ठाकरेंना मतपेटीत रुपांतरीत नीटचे करता आले नाही वाढत्या स्विकार्यतेचे गणित मतपेटीत उद्धव ठाकरेंना बदलता येईल का हे पुढची विधानसभा निवडणूकच सांगू शकेल. अजून चार वर्षांनी बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूस एक तप उलटले असेल आणि बाळा साहेब ठाकरेंचा पुरेसा प्रभाव नसलेला नवा बराच नवा मतदार वर्ग जॉईन होईल त्यांच्यावर स्वतःची प्रतिमा उठवण्यात उद्धव ठाकरेंना सध्या संधी आहे ते तिचे सोने कसे बनवतात कि केवळ सेनेच्या खजीन्याचे गणित बघतात यावर बरेच काही अवलंबून असेल.

बाकी चालू द्या...