एक तेजश्वी तारा उदयाला आला

Primary tabs

शूकरोपम's picture
शूकरोपम in काथ्याकूट
12 Nov 2020 - 9:52 am
गाभा: 

एक तेजश्वी तारा उदयाला आला आहे. एक नवा भारतीय राजकारणी आपल्याला मिळाला आहे!

तेजस्वी यादव यांनी बिहारमधील चुकीच्या दिशेने जाणारी लाट थांबविली आहे. सर्वात तरुण विरोधी पक्षनेते आज मध्ये बिहार विधानसभा येथे उगवले आहेत ते आहेत राहुलजी गांधीजी यांच्या सारखे तेजश्वीजी यादवजी! हा माजी क्रिकेटपटू राजकारणाचा खेळ बदलणारा आहे. तुम्ही पाहात रहाल एक दीवस तेजश्वीजी माननिय सोनियाजी यांच्या नेत्रुत्त्वाखाली मोठ्या पादावर असतील.
आजचे हे यश तेजश्वीजीने राष्ट्रीय जनता दलासाठी फार पुरवी पासून प्रचार सुरू केला होता तेथून आले आहे. आणि प्रत्यक्ष या खेळाडूने राजकारणात प्रवेश केल्यावर, प्रचाराच्या रणनीती यशस्वीपणे आधुनिकी पद्धतीने राबवली आहे. आज पक्षासाठी डिजिटल प्रसार सुरू केल्याचे श्रेय फक्त आणि फक्त तेजश्वीजी यादवजी यांचे आहे.

या बळावर बिहार त्यांनी आज घेतला आहे. ते उद्या राहुलजी गांधीजी यांच्या माग्रदर्शनाखाली देश घेणार यात संन्शय नाही हे लक्षात ठेवा. जनता दल (युनायटेड), राष्ट्रीय जनता दल आणि भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस हे भारताचे भवितव्य आहे. म्हातारे नेते संपले आहेत. तरुनांचे राज आता उगवले आहे. आता धर्मनिरपेक्ष सत्ता पुन्हा बिहारवर राज्य करण्याचे शक्यता येउ शकतात. पक्शाच्या पोर्टलच्या माध्यमातून राज्यात बेकरी या विषयावर डेटाचा बँक तयार झाला आहे. बेरोजगार तरुणांसाठी आरजेडीच्या नव्या जॉब पोरटलवर लाखांहून जास्त नोंदणी आहे. म्हणजे लाखांनी लोक आता तेजश्वीजी यादवजी यांच्या मागे उभे आहेत.

बिहारमधील तरुणांमध्ये बेरोजगारीचा प्रश्न मोथा आहे. त्याला कोन जबाबदार आहे. त्यांना जाग आली पाहिजे.
जाग येत नसेल तर त्यांना निवदनुकीत फटके पडले पहिजे. जे आज राहुलजी गांधीजी यांच्या नेत्रुत्त्वाखाली तेजस्वीजी यादवजी यांनी यशश्वीपने दिले आहेत.

प्रतिक्रिया

निनाद's picture

12 Nov 2020 - 10:03 am | निनाद

आवरा...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Nov 2020 - 12:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवरा...

का बरं म्हणे ? तेजस्वी यादव आणि त्यांच्या पक्षाने ज्या जागा मिळवल्या ते सहन होत नै ये का ? तेजस्वी यादव याचा १११ हा खूप मोठा आकडा आहे. नितीशकुमार विजयी होऊनही पराभव भासावा असा तो स्कोर आहे. दणदणीत पराभवाचे स्वप्न पाहणा-यांना त्या स्कोरचा त्रास होणे समजू शकतो.

नितेशकुमारांच्या सुशासनाने बिहारचं चित्र बदलविले, चौथ्यांदा लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकला असे म्हटले पाहिजे, त्याचंही योग्य विश्लेषण झालं पाहिजे. नितीशकुमार यांनी बिहारमधे रस्ते,वीज,पाणी याबाबत काम केलं आहे, मात्र बेरोजगारीचा मुद्दा तेजस्वी यादवने पकडला आणि तरुणांच्या मनात एक आशावाद निर्माण केला.

तेजस्वी यादव आता वयाची तीशी पूर्ण करतोय. बिहारच्या निवडणूकीत नवे नेतृत्व म्हणून तेजस्वी यादव यांनी आपली छाप उमटवली आहे, हे मान्य केलं पाहिजे. बेरोजगारीच्या मुद्द्यांवर हा तरुण लढला आणि त्यांना निवडणूकीत पाठींबा मिळाला. तेजस्वी यादव यांनी आमचं सरकार आल्यास दहा लाख नोक-या देऊ असे म्हटले की जेडीयू आणि भाजपने आम्हीही १९ लाख नोक-याची घोषणा केली.

तेजस्वी यादव यांनी एकवीस दिवसात २५१ सभा घेतल्या, सरासरी एका दिवसात १२ सभा घेतल्या, त्यांच्या मेहनतीला प्रचाराला नाकारता येत नाही. भ्रष्टाचाराच्या आरोपात असलेल्या लालू आणि राबडी यांचा चेहरा न वापरता तेजस्वी यादव यांनी आपला चेहरा पुढे आणला, हेही विसरता कामा नये. बुडत्या काँग्रेसचे हात बळकट केले. नितीश कुमार यांनी तेजस्वीची धामधुम पाहता ' ही माझी शेवटची निवड्णूक' अशी घोषण करुन इमोशन गेम खेळला गेला. त्याचवेळी आपले आदरणीय पंतप्रधान, तपस्वी, मा. मोदीसेठ यांना फेकंफाक करीत सभा घ्याव्या लागल्या, धावाधाव करावे लागली.

नितीशकुमार यांच्या ही माझी शेवटची निवडणूक प्लीज प्लीज मुझे वोट दो... असे म्हणन्यावरुन त्यांचा कॉन्फीडन्स लूज पडलेला दिसतो. तेजस्वी यादव याने त्या वक्तव्यावर आम्ही तर किती दिवसापासून म्हणतोय की नितीशकुमार थकले आहेत, त्यांनी आता थांबायला हवे असे म्हणून निवडणूकांच्या सभांमधे मजा आणलेली दिसते.

एकून काय, एक तरुण नवा बिहारचा चेहरा पुढे काय काय करीत राहील ते पाहणे रोचक ठरेल. मा.नितीशकुमार यांच्या विजयाबद्दल त्यांचंही मन:पूर्वक अभिनंदन स्वतःच्या पक्षाची वाताहात होत आहे, तरी त्यांच्या भावी विकासाच्या वाटचालीला शुभेच्छा...!

-दिलीप बिरुटे

सोत्रि's picture

12 Nov 2020 - 2:10 pm | सोत्रि

सहमत!

- (बिरूटेसरांशी चक्क सहमतीची वेळ आलेला) सोकाजी ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Nov 2020 - 2:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आभार....! :)

-दिलीप बिरुटे

कांदा लिंबू's picture

12 Nov 2020 - 3:48 pm | कांदा लिंबू

१. तेजस्वी यादव यांनी एकवीस दिवसात २५१ सभा घेतल्या, सरासरी एका दिवसात १२ सभा घेतल्या, त्यांच्या मेहनतीला प्रचाराला नाकारता येत नाही.

आणि

२. आपले आदरणीय पंतप्रधान, तपस्वी, मा. मोदीसेठ यांना फेकंफाक करीत सभा घ्याव्या लागल्या, धावाधाव करावे लागली.

खरंच, विश्लेषणाला घाबरायचं नाही.

सागर गुरव's picture

12 Nov 2020 - 4:18 pm | सागर गुरव

फेकंफाक करीत

हे शब्ददेखील अधोरेखीत करायला हवे होते असे वाटते.

असो....विश्लेषणाला सलाम ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Nov 2020 - 7:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मूळ धागा हा तेजस्वी यादव बद्दल आहे, म्हणून त्यांच्याबद्दल लिहिलं. कारण आपले आदरणीय, आधुनिक भारताचे जनक मा. पंतप्रधान यांनी केवळ चार दिवसात बारा सभा उरकल्या. सरासरी एका दिवसात तीन. आता वयोमानानुसार आणि त्यांच्यामागील देशाचा व्याप पाहता खरं तर त्याही खूप आहे. आता नवीन नेता घडवणे गरजेचे आहे, असे वाटते. भाजपाकडे पूर्वी सभा गाजवणा-यांची एक मोठी फळी होती. आता यत्र तत्र फक्त दोघेच सर्वत्र असतात. आता त्याचंही कौतुक करायचे असेल तर काही हरकत नाही.

फेकंफाक यासाठी म्हणालो की मा.पंतप्रधानांच्या भाषनात नवं काही नसतं. टीव्हीवर काही वाहिन्यांवर विविध बापू लोक जसे प्रवचन करीत असतात तसे ते सतत अधून मधून टीव्हीवर दिवसाआड काही ना काही विचार पेरतच असतात, त्यामुळे तसं म्हणालो. असो, आपणास माझ्या प्रतिसादामुळे जो त्रास झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. :)

-दिलीप बिरुटे

महासंग्राम's picture

13 Nov 2020 - 9:47 am | महासंग्राम

भाजपाकडे पूर्वी सभा गाजवणा-यांची एक मोठी फळी होती.

याबाबत लैच कडकडून सहमत. भाजपमध्ये प्रमोद महाजन, अटलजी सारख्यांची उणीव आहे. काही प्रमाणात नितीन गडकरी यांच्याकडे वक्तृत्व आहे पण त्यांना अत्यंत लिमिटेड ठेवलंय.

फेकंफाक यासाठी म्हणालो की मा.पंतप्रधानांच्या भाषनात नवं काही नसतं

त्यांच्याकडून नवीन काही ऐकलं कि भीती वाटते. नोटबंदी आणि अचानक केलेला लॉकडाऊन नंतर मी नवीनचा धसका घेतलाय. बाकी आपली जनता तेच डिझर्व करते आणि त्यामुळे ते हि तीच कॅसेट वाजवतात.

सागर गुरव's picture

13 Nov 2020 - 10:41 am | सागर गुरव

मा.पंतप्रधानांच्या भाषनात नवं काही नसतं.

नवं जुनं काहीही असलं तरी जी काही भाषणे केली त्यामुळे भाजपाला एवढी मते मिळाली हे दुर्लक्षुन चालणार नाही असे आपले माझे मत...

बाकी आपल्या मताचा आदर आहेच.

निनाद's picture

16 Nov 2020 - 10:21 am | निनाद

ते सतत अधून मधून टीव्हीवर दिवसाआड काही ना काही विचार पेरतच असतात, त्यामुळे तसं म्हणालो.

त्या मौनमोहनपेक्षा बरं आहे ना की काही तरी बोलतात तरी!
त्यांना तर तोंड उघडायलापण हाय कमांड कडे जावे लागायचे. त्यापेक्षा हा नेता चांगला ना?

प्रसाद_१९८२'s picture

13 Nov 2020 - 11:54 am | प्रसाद_१९८२

त्या 'चारा चोर' फॅमिलीतील तेजस्वीला सभा घेण्याशिवाय दुसरे काम काय होते ? रिकाम टेकडा तो, त्याने सभा घेतल्या तर त्यात कौतुक करण्यासारखे काय आहे ??

आनन्दा's picture

12 Nov 2020 - 10:07 am | आनन्दा

बारश्याच्या आणि पुनर्जन्माच्या शुभेच्छा!!

स्वलेकर's picture

12 Nov 2020 - 10:15 am | स्वलेकर

छान लिहिता. असेच लिहित रहा.

अरे देवा! तेजस्वीजी यादवजी यांचे यश राहुलजी गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली ? मग काँग्रेस का झोपली बिहार मध्ये?

चौथा कोनाडा's picture

12 Nov 2020 - 5:23 pm | चौथा कोनाडा

म्हणूनच झोपली !
नको रागांना क्रेडिट द्यायला ?

पिनाक's picture

12 Nov 2020 - 11:33 am | पिनाक

काय भाषा! काय शुद्धलेखन !! आनंद आहे !!!

कंजूस's picture

12 Nov 2020 - 11:37 am | कंजूस

उद्या राहुलजी गांधीजी यांच्या माग्रदर्शनाखाली देश घेणार यात संन्शय नाही हे लक्षात ठेवा

राहुल कधी निवडून आलेल्यांना डोक्यावर बसवत नाही कौतुक दूरच राहिलं. . कांग्रेस इलेक्शन समितीचं कौतुक करतात आणि पुढच्या राज्यात दौऱ्यावर म्हणजे केरळमधील वाईनाडला जातात. पण यावेळेस जैसलमेरला कसे काय गेले?

उपयोजक's picture

12 Nov 2020 - 11:58 am | उपयोजक

ना! प.पु.रागा वायनाडला गेले तर.सध्या थंडीचे महिने सुरु आहेत. राजस्थान जरा उबदार प्रदेश आहे.वाळवंट आहे.ऊन बर्‍यापैकी असतं केरळच्या तुलनेत.

अनिरुद्ध.वैद्य's picture

12 Nov 2020 - 1:10 pm | अनिरुद्ध.वैद्य

साहेबांनी घेतलेल्या परिश्रमांच चीज झालं.

आता फक्त पवारसाहेब अन रौतसाहेब ह्यांनी जोर लाउन नीतिशजींना फोडावे, अन मस्तपैकी तेजस्वींना मुख्यमंत्री बनवण्यास हातभार लावावा!

चौथा कोनाडा's picture

12 Nov 2020 - 1:14 pm | चौथा कोनाडा

आपल्याला आगामी तेजश्वी सॉरी, तेजस्वी लेखनाला हार्दिक शुभेच्छा !

महासंग्राम's picture

12 Nov 2020 - 2:11 pm | महासंग्राम

आता हा कोणाचा डू आयडी आहे :)

ज्ञानोबाचे पैजार's picture

12 Nov 2020 - 2:50 pm | ज्ञानोबाचे पैजार

राजा का बेटाही राजा होता है
पैजारबुवा,

माझा प्रतिसाद इथे थोडा मोठा होईल.. अंगापेक्षा बोन्गा जास्त मोठा नको म्हणून वेगळा धागाच काढला..

https://www.misalpav.com/node/47850

झैरात म्हणा हवं तर.. :D :D

कांदा लिंबू's picture

12 Nov 2020 - 3:45 pm | कांदा लिंबू

शूकरोपम,
मिपावर नव्या रूपात, पुन्हा एकदा (, म्हणजे कितव्यांदा?) स्वागत!

बिहारमधील बेरोजगारीला मुंबै जबाबदार आहे. मुम्बैमधे रोजगार मिळतो म्हणून बिहारमधील लोक इकडे येतात आणि तिकडे उद्योग उभे रहात नाहीत. म्हनून तिथे बेरोजगारी वाढते.
उत्तरप्रदेश आणि बिहारमधील बेरोजगारीसाठी कोणताही बिहारी नेता ( लालू यादव ,राबडीदेवी मुलायम, मायावती, पासवान) हे अजिबात जबाबदार नाहीत.
असा एक शिलालेख लिहून नालंदा येथे बसवावा

अर्धवटराव's picture

12 Nov 2020 - 8:48 pm | अर्धवटराव

बिहारमधे, किंबहुना देशात सर्वत्रच, बेरोजगारी सारखे मुद्दे राजकारणात केंद्रस्थानी आणणारं युवा नेतृत्व उदयाला यायलाच हवं. काहि कुत्सीक लोकं म्हणतील कि म्हणुनच बेरोजगार राहुलजी तेजस्वीकडे गेले वगैरे.. तिकडे दुर्लक्ष करावं.

प्रादेशीक पक्षांनी स्थानीक पातळीवर योग्य राजकारण केलं तर देशपातळीवर त्याची दखल घेतली जातेच. एकदम केजरीवाल टाईप घाई न करता प्रथम बिहारच्या विकासावर लक्ष केंद्रीत केलं तर तेजस्वी यादवांना उज्वल राजकीय भविष्य आहे असं दिसतय.

रमेश आठवले's picture

12 Nov 2020 - 10:52 pm | रमेश आठवले

बिहारमध्ये ' anti incumbency ' या जन मानसिकतेमुळे १५ वर्षे सत्तेवर असलेल्या नितीश कुमार यांच्या विरुद्ध मते पडली. मध्य प्रदेश आणि छत्तीसगगढ मध्ये नववी नापास तेजस्वी सारखे विरोधी नेते नसताना सुद्धा भाजपाने सत्ता गमावली होती.

या बाबतीत मी पूर्णपणे असहमत आहे.
बिहारचे राजकारण पूर्णपणे जातीभोवती फिरते. लोजपाने नितीशाचे किमान 20-25 आमदार पाडले, आणि ज्या सीट आल्या त्या पण खूप काठावर आल्या.

लोजपा फॅक्टर नसता तर या निवडणुका एकतर्फी झाल्या असत्या.
भाजपाला एक धडा आहे - विकास विकास करून देखील भाजपचा जनाधार वाढताना दिसत नाही. एक विशिष्ट वर्ग सोडल्यास आजही भाजप 30 टक्के मतांच्या वर जाताना दिसत नाही. म्हणजे चौरंगी लढत झाली तर भाजप जिंकू शकतो , पण दुरंगी तिरंगी लढत झाली तर भाजप जिंकेल याची खात्री नाही.

सुबोध खरे's picture

13 Nov 2020 - 10:23 am | सुबोध खरे

काही मतभेद

भाजप ने केवळ १२१ जागा लढवल्या होत्या त्यामुळे त्यांच्या मतांचा टक्का १९ % आला आहे. जर २४३ जागा लढवल्या असत्या तर हा टक्का बराच जास्त झाला असता.
कबाकी टक्केवारीत भाजप बराच उत्तम आहे. १२१ पैकी ७४ जागा आल्या.

रा ज द ने १४४ जागा लढवल्या पण त्यांचे ७५ उमेदवार निवडून आले.
तेजस्वी यादव चे मारे एवढे कौतुक चालू आहे कि त्याने आपल्या बापाचे नाव किंवा फोटो कुठेही लावलेले नाही. लोक अजून लालू चे गुंड राज्य विसरलेले नाहीत. लालूंच्या मुलीचे( बहुधा मिसा भारतीचे) लग्न झाले.तेंव्हा बिहार मधील सर्व शोरूम मधील नव्या कोऱ्या गाड्या उचलून आणल्या होत्या आणि सगळीकडे ताबडवल्या होत्या. नंबर प्लेट न लावता आणि फुकट वापरल्या. यानंतर पुढचे सहा महिने टाटा सफारी सुमो आणि महिंद्राच्या स्कॉर्पियो नवीन गाड्या कोणीही विकत घेत नव्हते. त्या गाड्या शेवटी त्यांना अर्ध्या किमतीत विकाव्या लागल्या होत्या.

कोणत्याही मुलीला/ सुनेला उचलून नेणे हवे तसे हवे तितके दिवस भोगून सोडून देणे हे सर्रास होते.विशेषतः उच्च जातीतील.

पैसेवाल्या माणसांचे अपहरण करून पैसे उकळणे हेही सर्रास होते. बिहार मध्ये व्यवसाय करायचा तर सतत गुंड आणि राजकारण्यांनाखंडणी द्यावी लागत असल्याने कोणीही आपला उद्योग सुरु करत नव्हते. बिहार प्रत्यक्ष न पाहिलेल्या लोकांनी वाटेल ते टंकणे पाहून हसावे कि रडावे कळत नाही.
बिहार मध्ये जाऊन पहा मैलोगणती केवळ खेडी आणि शेती दिसते. कुठेही उद्योगधंदे कारखाने दिसतच नाहीत.

१० लाख नोकऱ्या तेजस्वी कुठून देणार होता? उगाच रोजगार रोजगार म्हणून खुश व्हावे इतके बिहारी लोक मूर्ख नाहीत.
अख्या बिहार मधेय सरकारी नोकर केवळ ३ लाख १० हजार आहेत. सगळ्यांना निवृत्त केले तरी १० लाख नोकऱ्या उपलब्ध होणार नाहीत.

हुशार लोक चार पाच वर्षे कष्ट करून कोणती तरी सरकारी नोकरी मिळवतात आणि बिहारला कायमचा रामराम ठोकतात.
माझे कित्येक लष्करातील मित्र निवृत्त झाल्यावर परत बिहार मध्ये जातच नाहीत. पुणे दिल्ली अशाच ठिकाणी कायमचे स्थायिक होतात.

बिहार मध्ये श्री नितीश कुमार यांनी गुंड राज्य संपवले आहे हि वस्तुस्थिती आहे. विकास करण्याच्या अगोदर स्थिर राजकीय आणि सामाजिक परिस्थिती असणे किती आवश्यक आहे हे महाराष्ट्र्रात वातानुकूलित खुर्चीत बसून टिप्पणी करणार्यांना कधीच समजणार नाही.

केवळ मुसलमान आणि यादव हे समीकरण त्यावर जागा जिंकण्याचा हिशेब चुकला. As per the Election Commission data, 16 per cent of voters are Yadav and 17 per cent are Muslim in the state. These two communities dominate in 110 seats.

मुसलमान मतांसाठी श्री अडवाणी याना रथ यात्रा अडवून अटक करण्याचा विक्रम लालू प्रसादने केला होता.

पुढे राम मंदिराचा भूमी पूजन समारंभ झाला तेंव्हा श्री अडवाणी तेथे सन्माननीय आमंत्रित होते आणि लालू प्रसाद तुरुंगात दिवस कंठत आहेत.

आपली पापे याच जन्मात फेडावी लागतात हि वस्तुस्थिती.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Nov 2020 - 2:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

१० लाख नोकऱ्या तेजस्वी कुठून देणार होता? उगाच रोजगार रोजगार म्हणून खुश व्हावे इतके बिहारी लोक मूर्ख नाहीत.
अख्या बिहार मधेय सरकारी नोकर केवळ ३ लाख १० हजार आहेत. सगळ्यांना निवृत्त केले तरी १० लाख नोकऱ्या उपलब्ध होणार नाहीत.

मग भाजपाने १९ लाख नोक-याचं दिलेलं आश्वासन आणि आयटी क्षेत्रात ५ लाख नोक-या ही सुद्धा बिहारी जनतेला मारलेली उच्च थाप आहे असेच म्हणावे लागेल. (सन्दर्भ बातमी)

-दिलीप बिरुटे

प्रसाद_१९८२'s picture

13 Nov 2020 - 3:17 pm | प्रसाद_१९८२

प्राध्यापक सर,
तुमच्या वाचण्यात अथवा माहिती घेण्यात काहीतरी गफलत झाली आहे. भाजपाने कधीही म्हटले नव्हते की ते १९ लाख "सरकारी" नोकर्‍या ते देणार म्हणून, तेच तेजस्वी यादवने दहा लाख सरकारी नोकर्‍या देण्याचे आश्वासन दिले होते.

---
अगले पांच साल में 19 लाख युवाओं को रोजगार मिलेगा: संजय जायसवाल
बीजेपी प्रदेश अध्यक्ष डॉ. संजय जायसवाल ने कहा कि अगले पांच साल में हमारी योजना से 19 लाख युवाओं को रोजगार मिलेगा। इसके अलावा बिहार की एक करोड़ और महिलाओं को स्वावलंबी बनाएंगे। आईटी के क्षेत्र में 5 लाख युवाओं को रोजगार। बिहार में अब तक पीएम आवास योजना के तहत अब तक 28 लाख आवास बने हैं, अगले पांच साल में 30 लाख और आवास बिहार में बनाने का लक्ष्य है।

--

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Nov 2020 - 4:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिहारी रोजगारालाच नौकरी म्हणतात, आयटीत ५ लाख रोजगार देणार म्हणजे काय 'झाड़ू पोछा' करण्याचं काम तर नसेल ना ?

ही चर्चा पाहावी https://youtu.be/R1lVmSIj02s

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

13 Nov 2020 - 6:38 pm | सुबोध खरे

बिरुटे सर

मी खाली दिलेला दुवा एकदा वाचून पाहावा अशी विनंती आहे.

तेजश्वी ताऱ्याच्या बापाच्या काळात असलेली हि परिस्थिती मी प्रत्यक्ष बिहार मध्ये राहून अनुभवलेली आहे.

मिपा वर एक दोन ठिकाणी मी लिहिलेलं सुद्धा आहे कि शेती मधील मजुराला दोन वेळचा लिट्टी चोखा (आपल्याकडे झुणका भाकरी सारखे त्यांचे अन्न आहे ते) आणि वर्षाला १८०० रुपये पगार महिना १५० रुपये मिळत असे. इतकी भयानक गरिबी असल्यामुळे बिहारी माणसे बाहेरच्या राज्यात जगायला म्हणून जातात. परंतु आया बहिणींच्या अब्रूची कोणतीहि शाश्वती नसे.

इतकेच कशाला मी बिहटा या वायुसेनेच्या तळावर प्रथम गेलो तेंव्हा माझ्या वायुसेनेतील मित्राने सांगितले कि सूर्यास्त झाल्यावर बाहेर फिरू नको. मी त्याला म्हणालो कि माझ्या खिशात काहीही नाही आणि गळ्यात लष्कराचे ओळख पत्र आहे. त्यावर तो म्हणाला कि तुझ्या अंगावरचे कपडे सुद्धा काढून घेतील इतकी गरिबी आहे. केवळ कॅन्टोन्मेंट मध्ये सुरक्षित आहेस

नितीश कुमार आल्यावर त्यानी हे गुंड राज्य संपवले. यामुळे लोकांनी त्यांना गेली वीस वर्षे निवडून दिले आहे.

काहीही झालं तरी परत लालू किंवा तेजश्वी नको हि मनोवृत्ती लोकांची अजूनही आहे.

आपल्याला बहुधा रा ज द आणि गुंड राज्य याबद्दल काहीही माहिती नाही.

केवळ मोदी द्वेष आणि भाजपला विरोध म्हणून आपण असे लिहीत आहात असेच मला वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Nov 2020 - 8:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नितेशकुमारपूर्व बिहारबद्दल आणि त्या पूर्वीचा बीहार थोड़ा फार समजून आहे, आपण जे मत व्यक्त केलं आहे ते मत मला मान्य आहे.

फक्त 'तेजश्वी नको' ही मनोवृत्ती लोकांची अजूनही आहे, या वाक्याबद्दल असे म्हणावे वाटते की तसेच असते तर इतका प्रतिसाद त्यांना मिळाला नसता. १११ इज गुड़ स्कोर. लालू राबड़ीपेक्षा मतदारांना हे पोरगं वेगळं वाटलं असावे.

>>आपल्याला बहुधा रा ज द आणि गुंड राज्य याबद्दल काहीही माहिती नाही.

ब्वॉरं !!

>>>केवळ मोदी द्वेष आणि भाजपला विरोध म्हणून आपण असे लिहीत आहात असेच मला वाटते.
आपल्या मतांचा नेहमीच आदर राहिला आहे.

डॉक्टरसाहेब दीपावलीच्या मनापासून शुभेच्छा....!! _/\_

-दिलीप बिरुटे

आनन्दा's picture

13 Nov 2020 - 9:07 pm | आनन्दा

120 जागांमध्ये 19 टक्के, उफलेल्या 120 पैकी काही जागा विरोधकांचे बालेकिल्ले असतील, त्यामयले मी अजून 10टक्के वाढतील अश्या हिशोबाने 30टक्के म्हणालो..

मागच्या वेळेस भाजप हरला तेव्हा देखील मी हेच म्हणलेलो की भाजप जिंकतो किंवा हरतो हे महत्वाचे नाही, तर बिहार जातीच्या राजकारणातून बाहेर पडतो का हे महत्वाचे आहे..
आजमितीला बिहारमधील सगळे पक्ष आपली मते टिकवून आहेत, अपवाद कदाचित काँग्रेस असेल, त्यांची काही मते मीम ला जातायत.. पण आज बिहारची सत्ता केवळ निवडणुकीपूर्वी कोण कोणाशी युती करते यावर ठरते आहे हे वास्तव आहे.

ज्या दिवशी यावर घाव बसेल तो दिवस लोकशाहीसाठी सुदिन असेल.

चौकटराजा's picture

13 Nov 2020 - 9:52 am | चौकटराजा

भारत देशात नव्हे जगात जात ही असतेच ! ते निदान आतापर्यन्तचे वास्त्व आहे ! आता कोठेतरी डोसावाले- पराठावाले ,शाकाहारी- मांसाहारी या पातळीपासून नवी संकीर्ण जात निर्माण होत आहे त्याला आणखी १०० वर्शे जावी लागतील. आता अगदी नैसर्गिक पातळीवरील जातीचे पाहू की ज्या जातीपातीचे निर्मूलन माणसाला अशक्य आहे .त्या जाती कशा : आळशी-उद्योगी, कल्पक- अकल्पक कलेची आवड असणारे -नसणारे, बुद्धीमान -निर्बुद्ध ई ई . निसर्गच व्यक्ती व्यक्तीत भेद निर्माण करीत असतो. सबब त्यामुळे होणारा श्रीमन्त-मध्यम- गरीब हा भेद जगाच्या अन्तापर्यन्त कुणालाही मिटविता येणार नाही. केवळ सन्धी मिळाली नाही म्हणून श्रीमंत होता आले नाही हे विधान १०० टक्के खरे नाही व नसतेच !

भारत देशात लोकशाही आहे व जगात कुठेही नाही इतकी व्यामिश्र जातीव्यवस्था आहे ! लोकशाहीत लोकालोकात मतभेद निर्माण करून " मत" मिळवावे लागते ! भारत देशात कामगार विरूद्ध मालक, शेतकरी विरूद्ध ग्राहक असे वर्गयुद्ध खेळून निवडणूक जिन्कण्यपेक्षा जातीजातीचा फरक लोकान्च्या लक्शात आणून देऊन फरकत घडवून व्होट बॅन्क बनविण्याचे राजकारण खेळावेच लागते. भा जपा आज जरी विकास नीतीचा उच्चार वारंवार करीत असला तरी तो एका बाजूने हिंदू ( जात व्यवस्था नव्हे ) अशा
फॅक्टरचा लाभार्थी ठरत आहे कारण एम आय एम सारखे पक्ष निर्माण होत असल्याने भटजी व शेटजी ची पार्टी असणारा भाजपा मवाळ हिदून्ची देखील मते खेचण्यात यशस्वी होत आहे. विकासामुळे नोकरदार यान्ची मत मिळवायची ,मुक्त अर्थव्यवस्थेचा पुरस्कार करून धनिकान्ची मते मिळवायची असे करीत बाकी सर्व पक्षाना सक्तीने दलित व मुस्लीमान्चे लांगूलचालन करायला लावायचे व त्याचा फायदा हिंदू मते गोळा करीत जायचे हे भा ज पा चे तन्त्र ठरत आहे. बिहार मधे सर्व लोक तेजस्वी यादव यान्चा उदोउदो करीत असताना १९ जागा लढवून ५ जागा जिंकत उत्तम स्ट्राईक रेट गाठाणार्‍या ओवेसी यान्चे कौतुक मुक्त कन्ठाने कोण करणार ?

सुबोध खरे's picture

13 Nov 2020 - 11:57 am | सुबोध खरे

https://twitter.com/shwetapriya_/status/1326818665384218624?s=08

हे वाचून घ्या

माझ्या मुलूंड मधील स्त्रीरोग तज्ज्ञाने मला पाठवलेला स्वतःचा अनुभव
Shocking.

We had a patient who came with her MIL . She was 16 to 18 weeks pregnant
Requested MTP.
We refused saying it was your first child.

Later the entire story came out.
The bride was kidnapped and kept for 6 months before returning her to her in laws.
She underwent MTP and went back to her place.
They said all this is common.

They were very stoic and still remember their eyes.

सुबोध खरे's picture

13 Nov 2020 - 7:23 pm | सुबोध खरे

लालू प्रसाद यादव यांचे उजवे हात सय्यद शहाबुद्दीन यांच्या सुरस आणि चमत्कारिक कथा पण वाचून पहा.

https://en.wikipedia.org/wiki/Mohammad_Shahabuddin

In April 2005, a police raid led by then Siwan S.P. Ratna Sanjay with the support of D.M.Siwan C. K. Anil on Shahabuddin's house in Pratappur helped recover illegal arms such as AK-47s, and other military weaponry authorized for possession only by the army, including night-vision goggles, Laser-guided guns, etc.[22] Some of the arms had the markings of Pakistan ordnance factories, and the then Chief of Police (DGP), Bihar, D.P. Ojha alleged in a report[23] that Shahabuddin had ties with the Pakistan intelligence agency Inter-Services Intelligence (ISI). Subsequently, eight non-bailable warrants were issued for arresting Shahabuddin.

However, his party was part of the United Progressive Alliance headed by Manmohan Singh, and clearly he had considerable clout. Thus, although he was living in his official assigned quarter in Delhi, and attending parliament, the Delhi police and a special team sent from Bihar could not arrest him for over three months.[24] However, a team from Bihar, without informing anyone, was finally able to arrest him from his official residence in New Delhi in November 2005. Subsequently, he was refused bail by the Supreme Court of India,[25] where he was asked at one point:

By virtue of being an MP, are you entitled to keep these weapons, including a night vision device, when even the police, CRPF and other security agencies do not have it and only the army possesses it?[26]

In July 2009, one of the session judges trying the cases, V.B. Gupta, was threatened by lawyer Mahtab Alam, who initially offered "allurements" for "rescuing" Shahabuddin. When this did not work, he threatened to eliminate the judge.[33] Subsequently, the Patna High Court ordered that a charge be registered against the lawyer Mahtab Alam.[34]

रामदास२९'s picture

15 Nov 2020 - 12:40 am | रामदास२९

बापरे.. दिवट्या आला असता तर यांनां मोकळा रान मिळालं असता.. प्रसार माध्यमे यावर बोलत नाहीत..

रामदास२९'s picture

15 Nov 2020 - 12:37 am | रामदास२९

प्रसार माध्यमांनी भाजप च कौतुक करावे असा नाहीच उलच चुका दाखवाव्यात, टीका करावी.. पण मला हा चौथा स्तंभ किती विकला गेलाय त्याचा नवल वाटत..
भाजप ७४(५३)
राजद ७५(८०) ..कंसातील आकडे मागच्या निवडणुकीतील

जो तेजस्वी हेलिकॉप्टर ने प्रचार करत होता, बाप ज्याद्यांनी चाऱ्यापासून, हॉटेलमध्ये राजरोस पैसे खाल्ले..उघड उघड घराणेशाही केली त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव.. केवळ नितीश कुमारांनी मागच्या वेळेला त्यांच्या बरोबर जाऊन चूक केली त्याचे परिणाम त्यांच्या पार्टीला भोगायला लागले नाहीतर या तेजस्वी कडे काहीही नव्हता

मुक्त विहारि's picture

23 Nov 2020 - 10:54 pm | मुक्त विहारि

तेजस्वी यादव....

यांच्यावर पण लेख येऊ शकतो...

घराणेशाही जिंदाबाद....

रामदास२९'s picture

25 Nov 2020 - 12:31 pm | रामदास२९

विकाऊ माध्यम जिन्दाबाद .. घराणेशाही जिन्दाबाद.. करा अजून खुश मालकान्ना ..