ट्रंम्फ तात्या निवडणुकीत पडले त्याचं वाईट वाटलं , कसा का असेना त्याचा रोकठोक मतामुळे , किंवा दशहतवादा वरच्या स्पष्ट भूमिकेमुळे म्हणा ,मला आवडायचा राव. अर्थात हे आपलं गरीबाच व्यक्तीगत मत आहे त्यामुळे काही वाद होणार नाहीत अशी अशा...
खरं म्हणजे दिवाळी हा सण कधी पाकिस्तानात साजरा होत नाही पण ह्या वर्षी मात्र तिकडे दिवाळसण अगदी जोरात होणार , त्यांचा लाडला ज्यो , उर्फ हिलाल-ए -पाकिस्तान अध्यक्ष पदावर बसणार. भागो रे... अब और खैरात मिलेगी . अभी मंदिर खुला भी नही और पाकिस्तान कटोरा लेकर खडा ( अगले साल ज्यो भाई का "निशान- ए-पाकिस्तान " एकदम पक्का ).
कुणी म्हणतं की अध्यक्ष कोणीही असला तरी अमेरिका आपली परराष्ट्र धोरण कधी बदलत नाही. झारीतले शुक्राचार्य ती धोरणं ठरवतात म्हणे बुवा पण शेवटी अध्यक्षांकडे काही पॉवर्स असतीलच की..
है साला तुम लोग... पॉवर्स सबके पास होती है ,लेकिन उसे ईस्तमाल करनेवाला चाहिये (हे वाक्य अमिताभ बच्चन च्या टोन मध्ये म्हणावे ही विनंती ) . अचानक मनमोहन जी आठवले.
तो मेहेरबान और कदरदान , नवीन अमेरिकी अध्यक्ष आणी त्यांचा अमेरिका-भारत संबंधांवर होणारा परीणाम ह्या मुद्यावर जाणकार मंडळी ची मतं ऐकायला आवडेल
प्रतिक्रिया
8 Nov 2020 - 12:51 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
छान मुद्दा आहे हो वडगावकर.
जो बायडेन ह्यांना सल्ला/ईशारे देण्याचा पहिला हक्क खरे तर 'सामना'चे संपादक संजय राउत ह्यांचा पण येथे चर्चा करायला हरकत नाही.
8 Nov 2020 - 1:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भारी होता..!
-दिलीप बिरुटे
8 Nov 2020 - 1:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लोकांनी निवड करायची ठरवली की बदल हे अपरिहार्यपणे होतच असतात. आपण कायमच या पदावर राहु अशा संभ्रमात कोणीच राहू नये, हा धडा निवडणूक देत असते. (बाण का आला का ? ) ट्रंप तात्याबंदल असं म्हटल्या जातं की प्रशासकीयपातळीवरील कारभार, पोलिसांनी कृष्णवंशीयावर केलेले अत्याचार, उसळलेल्या दंगली, आणि लहरी कारभार, तोंडाला आवर नाही. आणि दुसरीकडे कृष्णवंशीय कमला हॅरीस यांना उमेदवारी देऊन डेमोक्रॅटीक पक्षाने खेळी केली आणि जोसेफ आर बायडेने यांनी कळस चढवला.
आपण या विषयातले जाणकार नसलो तरी, मिपाकर म्हणुन चराचर सृष्टीतल्या कोणत्याही विषयावर बोलू शकतो तो आपला हक्क आहे. आपल्याला भारतीय म्हणून अमेरिका सर्वच क्षेत्रात किती मदत करेल, सपोर्ट करेल. चीन-पाकिस्तान यांची किती कोंडी करेल यावर आपलं नव्या निवडीबद्दल मत असतं. मला व्यक्तीश वाटतं की बायडेन चीनबाबत जरा नरमाइचं धोरण घेतील. संयमी भूमिका घेतील तसे झाले तर आपले हे दोन्ही शेजारी आपल्याला कोरत राहतील, त्यामुळे आपल्याला आत्मर्निभरतेशिवाय काही पर्याय राहणार नाही असे वाटते. आपण म्हणता तसे नव्या अध्यक्षांमुळे त्यांच्या आंतरराष्ट्रीय धोरणात फार बदल होणार नाही, ते त्यांच्या धोरणाने पुढे जात असतात.
सध्या आपण फक्त काय काय घडत राहील ते पाहात राहु, तो वर नव्या अध्यक्षांना आपल्या मिपाकडून शुभेच्छा....!
-दिलीप बिरुटे
8 Nov 2020 - 1:18 pm | वडगावकर
हांगा आश्शी , शेवटची ओळ आवल्डी , आखिल भारतीय मिपा संघटने कडुन ज्यो आन्ना चा झाईर सत्कार , ए पोरान्नो ,लावा रे डीजे
8 Nov 2020 - 5:37 pm | सुमो
8 Nov 2020 - 1:26 pm | गणेशा
परराष्ट्र धोरण यावर बोलायला सुरुवात करायच्या आधीच तुमची हि मते बघितली..
अवघड आहे, वयक्तिक ट्रम्प, त्यांची धोरणे आवडणे काही गैर नाही..
पण त्याला हरवून कोण अध्यक्ष झाला तर तो पाकिस्तान धार्जिणा?
नशिब कमला हॅरिस कसे का होईना भारताशी संबंधित आहेत, त्या पाकिस्तानी वंशाच्या नाहीत, नाही तर ज्यो ने पार इस्लामच कबूल केला असता अशीच post आली असती..
उद्या जर भारतात श्री मोदी यांनां हरवून कोणी पंतप्रधान झाल्यास तो पाकिस्तान धार्जिणा, त्यांची खैरात करणारा, भारतीय देशद्रोही असे पण म्हंटले जाईल काय?
हि मानसिकता चुकीची आहे.. आणि या मानसिकतेने राहिल्यास कोणी काही म्हंटले तरी ट्रंम्प च दहशवादाचा सामना करू शकत होता बाकी नाही असेच मत राहणार असेल तर काय उपयोग...
8 Nov 2020 - 2:09 pm | सतिश गावडे
दादा, या ठिकाणी तुमची गडबड झाली आहे. धागाकर्त्याने इतिहास विचारात घेऊन हे लिहीलं असावं. मात्र तुम्ही ते आपल्याकडील परीप्रेक्ष्यातून पाहील्याने असे विधान केले असावे असे वाटते.
तुम्ही अवतरणात दिलेल्या वाक्यात इतिहास आहे; जो तुम्हाला बहुतेक माहिती नाही.
8 Nov 2020 - 2:47 pm | गणेशा
हो, मला तो इतिहास माहिती नव्हता...
:-)
तु सांगितल्यावर पाहिले..
मग पाकिस्तानात जास्त आनंद असेलच.. :-)
8 Nov 2020 - 2:44 pm | वडगावकर
अंपायर ने बॅट आपली असली तरी शक्यतो क्रिकेट खेळू नये म्हणून क्रीझ वर चुळबुळ करत पण चुपचाप उभा आहे आणी मुख्य म्हणजे माझे व्यक्तीगत विचार काहीही असले तरी ह्या मुद्यावर जाणकार मंडळी ची मतं ऐकायला आवडेल त्यामुळे.... डीजे चालू आहे नाचायला या
8 Nov 2020 - 7:51 pm | भीमराव
भारतातल्या लोकांना भारतापेक्षा अमिरेकेचीच लय काळजी राव, काय तर म्हणे बायडेन आण्णा निवडुन आल्या आल्या अमुक तमुक रस्ता बनवणार, गुलाल लागला आण्णाला, बायडेन आण्णा जिंदाबाद. साला तिकडची लोकं आपापल्या कामाला सुद्धा लागली असतील. आपलेच दुसऱ्या च्या बायकोला पोरं झाल्यावर नाचायला लागलेत बिना बोलावता, दहा दहा च्या नोटा गोळा करायच्या असल्यागत. भारतीय लोकं जोवर अमेरीकेची, तीथल्या संस्कृतीची मानसिक गुलाम आहेत तोपर्यंत असंच राहणार आहे बघा. चीन आणि पाकिस्तान सोबतचं वैर आपलं आहे आणि त्यावर लढा सुद्धा आपलाच आहे. डोलांड ट्रंपच्या किंवा बायडेन च्या जिवावर उड्या मारता येणार नाहीत. दोन बोक्यांच्या भांडणात माकड जसं सगळं लोणी खातं ना तसंच आहे अमेरिका वाल्यांच. ते कधीच कुणाचे दोस्त नाहीत. अगदी कुठलाही देश कोणत्या देशाचा दोस्त नाही. फक्त फायदे बघुन धोरणं ठरतात.
टिप: १. वरचं कुणाच्या वैयक्तिक प्रतीसादाला अथवा धाग्याला विरोध म्हणून लिहिलेर नाही.
२. आपण जर अमेरीकेचे माणसीक गुलाम नसतो तर मिसळपाव, मायबोली यांसारखे कोण तरी आज फेसबुक, इन्स्टा व कायाप्पा च्या जागी असतं.
9 Nov 2020 - 9:03 am | मराठी_माणूस
बेगानी शादी मे .....
9 Nov 2020 - 10:14 am | चौकटराजा
चीन आणि पाकिस्तान सोबतचं वैर आपलं आहे आणि त्यावर लढा सुद्धा आपलाच आहे. डोलांड ट्रंपच्या किंवा बायडेन च्या जिवावर उड्या मारता येणार नाहीत. दोन बोक्यांच्या भांडणात माकड जसं सगळं लोणी खातं ना तसंच आहे अमेरिका वाल्यांच. ते कधीच कुणाचे दोस्त नाहीत. अगदी कुठलाही देश कोणत्या देशाचा दोस्त नाही. फक्त फायदे बघुन धोरणं ठरतात. हे ज्याला कळले त्याला अमेरिका खरी कळली ! याबद्दल तुम्हाला धन्यवाद !
9 Nov 2020 - 1:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
'हाऊडी मोदी' हा कार्यक्रम अमेरिकेतील भारतीय लोकांनी आयोजित केला असला तरी तिथे जसे ट्रंप तात्याचं बखोटं धरुन आमचे सर्वांचे प्राणप्रिय मा.मोदीसेठ अमेरिकेत फ़िरले ते काही हौस म्हणून नाही, तर तेव्हा असं म्हटल्या गेलं होतं की केवळ व्यापार आणि तत्सम गोष्टीच नव्हे तर सुरक्षा आणि दहशतवादी यांच्या धोरणावर या निमित्ताने एक नवी रणनिती ठरवल्या जाणार होती वगैरे त्याबाबतीत संबंध सुधारतील वगैरे त्या अनुषंगाने अशा भेटीचं नियोजन होतं, असे म्हटल्या जात होतं. ’अब की बार ट्रंप सरकार’ साठी भारतीय मतदारांचा फ़ायद्याची एक शक्यताही तेव्हा व्यक्त केली जात होती.
’नमस्ते ट्रंप’ या बहुचर्चीत कार्यक्रमात आम्ही करोडो रुपये खर्च करुन ट्रंप तात्याचं स्वागत केलं. रस्ते सुशोभीकरण वगैरे आम्ही केलं. खर्च कोणी केला त्यावरही अनेक चर्चा झडल्या आहेत. ’मेरे दोस्त’ म्हणून सुरुवात झालेल्या भाषणांचा उद्देश अमेरिकेशी आपली मैत्री आणि वगैरे आणि त्यांना चिटकण्याचा एक तो प्रयत्न होता असे म्हणालो, तरी दोन्हीही देशांना आपल्या एकमेकांची काळजी आहे, असे दाखवल्या गेले होते.
वरील दोन्ही गोष्टीवरुन आपल्या असे निदर्शनास एक गोष्ट लक्षात येते की, अजूनही आपण ’आत्मनिर्भर’ नसल्यामुळे आपल्याला कोणत्या तरी भरभक्कम पाठींबा देणा-या मित्राची गरज आहे, म्हणून अमेरिकेची काळजी बाकी काय नाय. बाकी ते कोणाचे दोस्त वगैरे नसतात हे शंभर टक्के मान्य.
-दिलीप बिरुटे
9 Nov 2020 - 3:50 pm | संजय क्षीरसागर
वरील दोन्ही गोष्टीवरुन आपल्या असे निदर्शनास एक गोष्ट लक्षात येते की, अजूनही आपण ’आत्मनिर्भर’ नसल्यामुळे आपल्याला कोणत्या तरी भरभक्कम पाठींबा देणा-या मित्राची गरज आहे, म्हणून अमेरिकेची काळजी बाकी काय नाय
आता किमान पुढची चार वर्ष, बायडन या भंपकपणाला नेमका काय रिस्पाँन्स देतात, यावर देशाचं भवितव्य अवलंबून आहे.
9 Nov 2020 - 12:53 pm | अनन्त अवधुत
जो अण्णा त्यांच्याजाहिरनाम्यात म्हणतात.
त्यासाठी भारतावर दबाव आणु असे काही थेट बोलले नाहि. पण मुस्लिमांसंदर्भात त्यांनी चीन, ब्रह्मदेश, आणि भारत ही तिन्ही नावे एकत्रच घेतली आहेत.
9 Nov 2020 - 1:30 pm | विनायक प्रभू
के. हरीश ह्यांच्या निवडून येण्याबद्दल त्याच्या चुलत काकाच्या मामेभवाच्या नातवाने चेन्नई मध्ये सत्यनारायणाची पूजा घातलीय. सर्वांना हार्दिक निमंत्रण. तीर्थावर भर देण्यात येईल हे नम्रपणे नमूद करतो.
9 Nov 2020 - 2:57 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
मस्त हो विनायक राव.
मागे बॉबी जिंदाल नामक एक तेथील सिनेट्/कॉन्ग्रेसमध्ये निवडून गेला होता. त्यावेळी "पंजाबदा पुत्तर आता होणार लुझियानाचा गवर्नर" अशी बातमी आपल्या वर्तमानपत्रानी दिली होती. नंतर हा पंजाबदा पुत्तर अमेरिकेतच जन्मला असून, त्याने लहान्पणीच ख्रिस्ती धर्माची दी़क्षा घेतली आहे हे कळले व अनेकांचा भ्रमनिरास झाला. त्यात "मला माझ्या भारतिय वंशाची आठवण करून द्यायची गरज नाही" असे म्हणून अधिकच भ्रमनिरास केला.
10 Nov 2020 - 4:51 am | दिगोचि
जो अण्णा भारतावर दबाव आणु असे जरी काही थेट बोलले नसले तरी त्यानी मुस्लिमांसंदर्भात चीन, ब्रह्मदेश, आणि भारत ही तिन्ही नावे एकत्रच घेतली आहेत. तसेच कमलाबाई पण मुस्लीमान्च्यावतीने बोलल्या आहेत. यावरून असे दिसते की पुढची ४ वर्शे भारताच्या द्रुश्टीने कठीण जातील. पाहुया काय होते ते.
10 Nov 2020 - 10:07 pm | उपयोजक
ट्रम्प हरून बायडन जिंकतोय त्यामुळे पाकिस्तानी मुसलमान आणि भारतीय पुरोगामी खुश होत आहेत . 370 ते काश्मीर बाबतीत बायडेन यांचा पक्ष मुस्लिम धार्जिणा आहे असे या खुशमस्कऱ्याना वाटते आहे.
डाव्या विचाराचा फ्रेंच अध्यक्ष मॅक्रोन विजयी झाला तेव्हाही पुरोगामी खुश झाले होते . फ्यासिझम चा पराभव - आता मोदी सुद्धा हरणार असे चेकाळून फिस्कारत होते . पुढे त्याच मॅक्रोन ने इस्लामशी उभा दावा मांडला....
तेव्हा पुढचा काही काळ पाकिस्तानी आणि पुरोगामी या दोघांनीही आनंदी व्हायला हरकत नाही . असे दिवस त्यांना कमीच मिळतात . मॅक्रोन आणि बायडन हे एकाच नावेतले प्रवासी आहेत.
अभिराम दिक्षित
11 Nov 2020 - 3:32 am | श्रीरंग_जोशी
काहीच्या काही तर्क लावले आहेत.
12 Nov 2020 - 2:20 pm | महासंग्राम
त्यांना तिकडे एखाद्या दुसरा मार्क्स ची दीक्षा देत असतील ज्यात राष्ट्रप्रथम असं लिहिलं असेल :)
12 Nov 2020 - 3:55 pm | शा वि कु
मार्मिक