नमस्कार, गेल्या काही दिवसांपासून राजकीय धाग्यावरील धुळवड पाहता, चर्चा खेळीमेळीच्या न राहता व्यक्तिगत होतांना दिसत आहेत. सदस्यांवर व्यक्तिगत टीका करणे, शिवराळ भाषा वापरणे, अवांतर प्रतिसादांचा जाणीवपूर्वक रतीब घालणे, या आणि अशा अनेक गोष्टी निदर्शनास येत आहेत. मौज-मजा, हलक्या फुलक्या टपल्या यांचं स्वांतत्र्य मिपावर नेहमीच राहिलं आहे. तरीही त्याचा गैरफायदा घेतला जाऊ नये या हेतूने या सूचनेद्वारे सर्वांना कळविण्यात येते की यानंतर अशी वर्तणूक ठेवल्यास त्या त्या सदस्यांना व्यक्तिगत सूचना न देता अशा सदस्यांवर थेट कार्यवाही करण्यात येईल. सर्वांनी सहकार्य करावे. - मिपा व्यवस्थापन

हे फिजिक्स शिकायचं तरी कशाला - पहिला फिजिक्स्ब्लॉग विडिओवर

Primary tabs

अनिकेत कवठेकर's picture
अनिकेत कवठेकर in तंत्रजगत
5 Nov 2020 - 12:27 pm

नमस्कार दोस्तांनो,

मिसळपाव साईट्वर माझे फिजिक्स ब्लॉग तुम्ही 'न्यून ते पूर्ण करोनि' वाचत आहात. पण आताची आपलीच शिकण्याची पद्धत ऑडिओ विडिओ झाल्याने मिसुद्धा ब-याच खटपटीने पहिला फिजिक्स ब्लॉग युट्यूब वर पोस्ट केलाय. मी तो Camtesia हे सॉफ्ट वेअर वापरून केलाय. फार काही ग्रफिक नाही कारण मला माफक ग्राफिक येते. शिवाय मुलं ऑलरेडी बराच काळ सध्या मोबाईल-टीवी- लॅपटॉप यांवर घालवत असल्याने माझा विडिओ ब्लॉग अजून त्यांच्या त्रासात भर नको म्हणून कमी/माफक इमेजेस आणि काळी बॅकग्राऊंड ठेवलीय. जेणेकरून बघितलं तरी काळ्यारंगामुळे रेडिएशन चा किमान त्रास व्हावा..असो.. नमनाला घडाभर तेल झाले..

कुणाला आवडो किंवा नावडो प्रत्येकाला शाळेत, कॉलेजात फिजिक्स च्या कन्सेप्ट शिकाव्या लागतात. अंतर distance , वेग speed , विस्थापन displacement.. झालंच तर न्यूटनचे नियम, मोशन्स चे इक्वेशन्स वगैरे.. पण हे सगळं का शिकायचं हे कळत नाही.. मुळात फिजिक्सच का शिकायचं हे कळत नाही.. त्याचाच उहापोह करणारा हा व्हिडीओ.. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे विक्रम वेताळाच्या गोष्टीच्या रूपात..

why do we need to study physics? का शिकायचं फिजिक्स?

युट्यूबवर मी कॉमेंट्स ब्लॉक केल्या आहेत कारण तिथे विषयाला संबंध नसलेल्या कॉमेंट्स येण्याची आणि निष्कारण वाद निर्माण होण्याची शक्यता जास्त..त्यामुळे युट्यूब विडिओ पाहून तुमच्या कॉमेंट्स मला इथे कळ्वा..जेणेकरून पुढील विडिओ करताना मला त्याचा उपयोग होईल.

कळावे लोभ असावा ही विनंती.

कॅमटेशिया सॉफ्ट्वेअर कसे वापरावे याविषयी माहिती हवी असल्यास जरूर संपर्क करा.

प्रतिक्रिया

कंजूस's picture

5 Nov 2020 - 12:47 pm | कंजूस

विडिओ पाहीन आणि सांगेन इथे नक्की.
----------
बाकी विक्रम वेताळ स्वरुप याबद्दल इथे मागच्या लेखात एकदा प्रतिक्रिया दिली होती.

अनिकेत कवठेकर's picture

5 Nov 2020 - 1:11 pm | अनिकेत कवठेकर

ही पोस्ट टाकताना काही निवडक मिसळ्पावकर नावे डोळ्यांसमोर होती..तुम्ही अगत्याने प्रतिक्रीया दिलीत त्याबद्द्ल आभार

कंजूस's picture

5 Nov 2020 - 5:07 pm | कंजूस

कथा ऐकवताही येईल.
Mp3 file
jumpshare.com
इथे अपलोड करून लिंक द्या.
किंवा clyp.it
किंवा Drive google

जेव्हा केव्हा ट्राय करीन तेव्हा तुम्हाला सॅम्पल टाकीन

Rajesh188's picture

5 Nov 2020 - 8:34 pm | Rajesh188

तुम्ही लिहीत जा भौतिक शास्त्र विषयी.
ह्या विषयात अनेक प्रश्न लोकांच्या मनात असतात.
पण व्हिडिओ पेक्षा लिखाण जास्त मनावर परिणाम करते ह्याचे पण काही भौतिक शास्त्रात च उत्तर असेल.
तर विनंती आहे व्हिडिओ पेक्षा लिखाण करा.

अनिकेत कवठेकर's picture

30 Nov 2020 - 10:15 am | अनिकेत कवठेकर

धन्यवाद राजेशजी. लिखाणातल्या तोच तोच पणाला मी घाबरतो..म्हणून असे प्रयत्न करत असतो..मूळ वाट लिखाणाचीच आहे माझी..डोन्ट वरी..

गोंधळी's picture

5 Nov 2020 - 9:10 pm | गोंधळी

व्हिडीओ ऐकला.
प्रत्यक्ष वाचन चांगल की ऐकनं या वादात नाही पडायच. पण मला तरी प्रत्यक्ष वाचन करायला आवडेल.

अनिकेत कवठेकर's picture

30 Nov 2020 - 10:21 am | अनिकेत कवठेकर

मी वर म्हटलं तसं नवनवे फॉर्मॅट ट्राय करावे म्हणून असे प्रयत्न करतो..बाकी काही विशेष प्रयोजने नसतात..

चौथा कोनाडा's picture

30 Nov 2020 - 1:10 pm | चौथा कोनाडा

व्हिडीओ पाहिला, आवडला.
तिथे कमेंट टाकता येतेय बहुतेक (एक दिसते आहे तिथे)
पुभाप्र !

अनिकेत कवठेकर's picture

30 Nov 2020 - 2:50 pm | अनिकेत कवठेकर

चौथा कोनाडाजी,
विडिओ आवडल्या बद्दल आनंद आहे.

हो कॉमेंट टाकता येतायत माझ्या विडिओवर. काही मित्रांनी 'समजावल्यामुळे' कॉमेंट एनॅबल केल्या.

पिंगू's picture

24 Jan 2021 - 6:59 pm | पिंगू

निवांतपणे व्हिडीओ बघतो. युट्युब चॅनेल सुरू करून चांगली सुरूवात केली आहे.