सध्या मी काय पाहतोय ?

Primary tabs

मदनबाण's picture
मदनबाण in काथ्याकूट
20 Oct 2020 - 9:26 pm
गाभा: 

जालावर मुक्तसंचार करताना विविध विषयांवरील व्हिडियो माझ्या पाहण्यात येतात, बर्‍याच वेळी अश्या व्हिडियों मध्ये उत्तम माहिती तर असतेच परंतु एखाध्या गोष्टी मागच खरं कारण किंवा आपल्या माहित नसलेली माहिती या व्हिडियोतुन आपल्या मिळते. मी जे व्हिडियो पाहत जाणार आहे ते मी या धाग्यात देत जाणार आहे.

हिंदूस्थान हा लष्करी सामुग्री आयात करणार जगातील दुसर्‍या क्रमांकाचा देश आहे ! कोणी एके काळी आपण मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे निर्यात करायचो पण मग आता आपण आयात का करतो ? शस्त्रास्त्रे आणि त्यांचे सौदे + घोटाळे हे आपल्या देशासाठी नवे नाही, मग नक्की आपण जी शस्त्रे विकत घेतो ती उत्तम दर्जाची असतात का ? वेगवेगळी विमाने घेतो, त्या विमांनाच्या देखभालीची करार करतो तेव्हा नक्की कोण निर्णय घेतो,किंवा कोणी निर्णय घ्यायला हवा असा विचार अनेकांच्या मनात येतात तसे माझ्या मनात येत राहिले आहेत, या विचारात निर्माण होणार्‍या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याच्या प्रयत्नात माझ्या पाहण्यात हे २ व्हिडियो आले.

मदनबाण.....

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

21 Oct 2020 - 4:30 pm | मदनबाण

व्हॉट्सअ‍ॅप वर अधुन मधुन गायकीचे व्हिडियो येत असतात आणि त्यातले काही मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होत असतात. रानु मंडल अश्याच प्रकारे प्रसिद्धी पावल्या होत्या हे आपणास ठावूक असेलच.
याच प्रमाणे माझ्या पाहण्यात २ गायकीचे व्हिडियो आले आहेत. एक गायक वृद्ध तर एक तरुण परंतु त्यांचे गाणे सुंदरच आहे. गायकाचा व्हायरल व्हिडियो आणि नंतर त्याच गायकाची मुलाखत असे व्हिडियो खाली देत आहे.
गायक :- मदललाल गंधर्व [ साधारण १ वर्षा पुर्वी हा त्यांचा व्हिडियो व्हायरल झाला होता.] [ माझ्या पाहण्यात मात्र मागच्या आठवड्यात आला. ]

गायक :- चंदन कुमार गुप्ता [ याला ९ भाषा येतात. ]

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Afsana Banake Bhool Na Jaana [Full Song] | Dil Diya Hai

जेम्स वांड's picture

22 Oct 2020 - 9:06 am | जेम्स वांड

एके काळी आपण मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे निर्यात करायचो पण मग आता आपण आयात का करतो ?

****

ह्याबद्दल कधीच ऐकले नाही मला वाटत असे की आपण कायमच आयात करतो शस्त्रे, ह्यावर डिटेल काहीतरी वाचायला आवडेल

कपिलमुनी's picture

22 Oct 2020 - 9:46 am | कपिलमुनी

>>कोणी एके काळी आपण मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे निर्यात करायचो?
कोणे काळी म्हणे ?
औद्योगिक क्रांती झाल्यापासून असे काही ऐकिवात नाही.
तलवारी , भाले निर्यातीची आकडेवारी असेल तर दाखवा

यंत्र,मंत्र आणि तंत्र ही आपण जगाला दिलेली देणगी आहे, या बद्धल माझा जालिय शोध अधुन मधुन चालु असतो. भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या दोघांच्या चर्चेतुन तंत्र,यंत्र आणि अनेक स्तोत्रांची उत्पत्ती झालेली आहे असे मला आत्ता पर्यंतच्या शोधातुन समजले आहे. यंत्र आणि मंडल यावर आधीही मिपावर उल्लेख केले गेलेले आहेत.
राजस्थानातुन अनेक यंत्रांचे संदर्भ मिळाल्याचे किंवा तशी माहिती मला समजली, परंतु हल्ली यंत्रांवर किंवा यंत्र या विषयावर आपल्या देशात काय शोध चालु आहे यावर मात्र अधिक माहिती मला समजलेली नाही. दिवाळीत लक्ष्मी पुजनाच्या वेळी श्रीयंत्र पुजनाची प्रथा आजही अनेक घरात केली जाते, तसेच श्रीयंत्राची / तसेच अनेक यंत्रांची विक्री आजही आपल्या देशात सर्रास होते. परंतु मुख्येत्वे ही यंत्रे तांब्याच्या पत्र्यावर उमटवलेली असतात.तसेच पुरातन काला पासुन भुर्ज पत्रावर / भोज पत्रावर काढली जातात.
या यंत्र विषयावर शोध घेताना माझ्या लक्षात आले ही यंत्र आणि यंत्र काढण्याची विध्या तिबेट मध्ये पोहचली होती आणि आजही यंत्रांचे /मंडलांचे विविध प्रकार तिथील बौध भिक्कु शिकतात आणि त्यावर ध्यान केंद्रीत करुन ते यंत्र नंतर नष्ट देखील करुन टाकतात. या विषयावर मी पाहिलेले २-४ व्हिडियो इथे देत आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Final user trial of Anti tank guided missile NAG tested at pokhran range Today

पाषाणभेद's picture

24 Oct 2020 - 1:38 pm | पाषाणभेद

अच्छा! ही आपली यांत्रीक प्रगती आहे तर!

ओंमकार चौधरी यांना मी काही काळा पासुन ऐकतो आहे. यांचे मुंबई मधील ड्रग्स विषयावर आणि नवरात्रीत Eros ने अभद्र ट्विट करणे, या दोन विषयांवर पाहिलेले व्हिडियो देत आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India test fires 12 missiles in 45 days, sends strong message to China, Pakistan

मदनबाण's picture

27 Oct 2020 - 9:14 pm | मदनबाण

काही काळा पासुन The Jaipur Dialogues या चॅनल चे नाव माझ्या नजरेत इतर व्हिडियो पाहताना येत होते, आज या चॅनलचा खालचा व्हिडियो दिसला आणि तो आता पाहत आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India, US to sign landmark defence pact to share high-end military technology, logistics today

मदनबाण's picture

29 Oct 2020 - 8:39 pm | मदनबाण

मला व्हॉट्सअ‍ॅपवर NEWJ या चॅनल चे मराठीतील [ लोगो मध्ये मराठी नाव दिसते ] काही व्हिडियो आले होते. हा चॅनल युट्युबवर आहे आणि त्याचे उप-चॅनल देखील आहेत, परंतु मराठी चॅनलचा शोध घेउन देखील मला तो दिसलेला नाही.
असो... या चॅनलवरचा १ आणि उप-चॅनलचा पाहिलेले व्हिडियो :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Twitter apologises for showing Leh, Jammu and Kashmir in China

मदनबाण's picture

30 Oct 2020 - 12:38 pm | मदनबाण

ट्विटर नंतर आता सौदीची २० रियाल ची नोट !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Pak should be blacklisted by FATF, India stands vindicated after Islamabad’s admission on Pulwama: VK Singh

मदनबाण's picture

1 Nov 2020 - 12:51 pm | मदनबाण

Shiv Aroor यांच्या चॅनल ला मी अधुन मधुन भेट देत असतो.

==============================================================================================

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Watch: Anti-ship missile fired by INS Kora hits target with precise accuracy

मदनबाण's picture

4 Nov 2020 - 10:54 pm | मदनबाण

आज डीआरडीओ ने पिनाका रॉकेट्सची यशस्वी चाचणी घेतली. ही बातमी वाचल्यावर मला मागच्या काळात BM-21 Grad [ 122 mm multiple rocket launcher ] च्या चाचण्यांची आठवण आली आणि त्यांचे व्हिडियो परत पाहिले. [ एका व्हिडियोचे नाव पिनाका असे चुकीचे जरी दिले असले तरी व्हिडियोत BM-21 आहे. ]

=========================================================================================

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- DRDO testfires advanced version of Pinaka rockets | pinaka missile | pinaka missile test

मदनबाण's picture

7 Nov 2020 - 2:17 pm | मदनबाण

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Watch: 2nd batch of 3 IAF Rafale jets arrive in India from France

मदनबाण's picture

8 Nov 2020 - 10:28 pm | मदनबाण

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India launches earth observation satellite EOS-01, nine other satellites

काल-परवाच्याला मी दोन गाणी ऐकली एक छोट कोकणी [ गोवन कोकणी ?] गाणं आणि एक मालवणी. कोकणी गाण्याचा अर्थ इतका कळला नसला तरी ते फार आवडले.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Jennifer Lopez - If You Had My Love (Official Video)

मदनबाण's picture

14 Nov 2020 - 2:08 pm | मदनबाण

बदललेली युद्ध निती आणि तंत्रज्ञान याचा युद्धात दिसुन आलेला परिणाम

अंबरीष फडणवीस :- शिवछत्रपती का हिन्दवी स्वराज्य

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- J&K: Indian Army Retaliates Against Pakistan Over Ceasefire Violation At LoC
[ नापाकिस्तान दरवर्षी आपली दिवाळी खराब करतो आणि आपल्या काही सैनिकांना वीरगती प्राप्त होते. :( ]