चटणी रोल

जागु's picture
जागु in पाककृती
25 Nov 2008 - 11:58 am

अर्धा किलो बटाटे उकडुन
पाव वाटी कणिक किंवा ब्रेड कुस्करुन
मिठ चविपुरते.
चटणी साठी
अर्धा नारळ खवुन
४ मिरच्या, तिखट आवडत असेल तर जास्त घ्याव्या
अर्धे लिंबु
चविपुरते मिठ

तळण्यासाठी तेल.

क्रमवार पाककृती:
उकडलेले बटाटे स्मॅश करावेत. मग त्यात पाव वाटी कणिक किंवा ब्रेड क्रम्स आणि चविपुरते मिठ मिसळुन एकजिव करावे.
वरील चटणीचे सर्व साहित्य एकत्र करुन मिक्सरमध्ये चटणी करावी. आता बटाट्याच्या तयार केलेल्या मिश्रवाची चपातीपेक्षा थोडा मोठा गोळा घेउन पोळी लाटावी. पोळी लाटताना प्लॅस्टीक चा कागद किंवा प्लॅस्टीकची पिशवी फाडुन गोळ्याच्या खाली व वरती ठेवावी आनी पोळी लाटावी म्हणजे पोळीपाटाला व लाटणीला चिकटत नाही. पोळी लाटल्यावर त्यावर चटणी पसरवावी. मग पोळीची हळू हळू गुंडाळी करावी, शेवटी थोडा चिकटण्या एवढाच दाब द्यावा. मग त्याचे १ ते १.५ इंच तुकडे करुन गरम तेलात लालसर होईपर्यंत तळावेत. व सॉस बरोबर सर्व्ह करावेत. लहान मुलांना खुपच आवडतात.

प्रतिक्रिया

सुनील's picture

25 Nov 2008 - 1:50 pm | सुनील

फक्त पोळी लाटण्याची अवघड कृती सोडली तर बाकी सोपी आणि मस्त दिसतेय, मधल्या वेळच्या खाण्यासाठी.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.