दिवाळी अंक २०२० - आवाहन

यंदाचा मिपा दिवाळी अंक असणार आहे 'प्रेम - शृंगार - रोमान्स विशेषांक'!. प्रेमाची, शृंगाराची, रोमान्सची इतकी रूपं, इतक्या छटा, इतके रंग... तर या प्रेमावर तुमच्या लेखांची, अनुभवांंची, कथांची, कवितांची आम्ही वाट पाहतोय.

लेखन देण्याची मुदत : २५ ऑक्टोबर, २०२०.

दिवाळी अंक २०२० - आवाहन

पगार मज पामराचा

Primary tabs

एस.बी's picture
एस.बी in जनातलं, मनातलं
16 Oct 2020 - 8:17 pm

लॉक डाऊन मध्ये ज्याच अनन्यसाधारण महत्त्व पुरेपूर समजून आलं
असा तुमचा आमचा लाडका पगार!

नोकरीला लागल्यावर आलेले पगाराबाबत मला आलेले अनुभव यावरून हे लिहीत आहे.

मी आणि माझा आवडता पगार..

माझा पगार मला खूप आवडतो.कारण तो नेहमी वेळेवर येतो.तो आल्याने माझ्या सर्व पार्टी-दार मित्रांना खूप आनंद होतो.पार्टी-दार म्हणजे असे महाशय जे पार्टी असेल की दारात प्रकट पावतात किंवा जे दारात प्रकट झाले की पार्टी द्यावी लागते.या दोन्ही नियमांना धरून त्यानुसार ज्यांच्यासोबत वागावे लागते असे लोक..
माझा पगार खूप चांगला आहे,त्या भोपळ्याच्या म्हातारी सारखा मुळीच्च नाही...ती शहाणी म्हणते कशी "मी मुलीकडे जाते ,तूप रोटी खाते ,जाडजूड होते आणि मग तुझ्याकडे येते.. खोटारडी कुठली..."
आमचा पगार असली फाजिल्पण बिलकुल करीत नाही..तो येतानाच जाडजूड होऊन येतो..

( माझं आर्थिक शहाणं मन: नंतर त्याची मर्तुकडी अवस्था होते तो भाग वेगळा !
माझं दुष्ट खर्चिक मन : आमचा पगार आम्ही काहीही करू त्याच्यासोबत..त्याला जाडजूड ठेवू नाहीतर मर्तुकडा..)

पगार नेहमी १ तारखेला येतो असे सगळे म्हणतात.

(सगळे म्हणतात ते सगळेच खरे नसते हे सगळयाना सांगायला पाहिजे एकदा.)

मग एकदा का तो आला की मग काय थाट विचारू नका.. पहिले २-३ दिवस तर रोज दिवाळी असते..बस स्टॉप वरती जाऊन बस येऊन थांबली ती आणि तिच्या सुट्ट्या पैश्यासाठी रोज हैदोस घालणाऱ्या कंडक्टर या दोघांच्या नाकावर टिच्चून ,तोऱ्यात ," टॅक्सी! " असा आवाज देऊन आपण टॅक्सी मध्ये जग जिंकायला निघतो बुवा..चहा टप्रीचा रोजचा कोपरा जिथे हळूच उभे राहून ,"एक कटिंग,एक बडा,आणि एक पारले " अशी हळूवार ऑर्डर देत असतो ..तिथे ," सबको स्पेशल चाई, साथ मे १-१ बन मस्का प्लेट,मस्का खारी,क्रीम रोल..बिल अपन भरेगा.."अशी गर्जना आपसूक फुटते ती माझा आवडता पगार आला तरच...

नव्या नवरीचे नऊ तसे नव्या पगाराचे पाच दिवस सरले की मग ह्या फुगीर फुग्याला टाचण्या लागायला लागतात.
घर भाडे,लाईट बिल,वायफाय बिल, क्रेडिट कार्ड बिल,प्रीमियम ,हप्ते वगैरे वगैरे..

मग बिचारा माझा पगार अक्रसायला लागतो..दुष्काळ मध्ये जशी झाडे पानगळ होऊन खुरटी होतात आणि त्यांच्या निष्पर्ण फांद्या डोळ्यांना भेडसावतात तसे पगारातून कटणारी एकेक रक्कम पाकिटाला भेडसावत असते.मग एकामागून एक नवनवीन संकल्प सुरू होतात. थेंबे थेंबे तळे साचे ही म्हण एकदम जिव्हाळ्याची वाटायला लागते.मग रिक्षा तून उतरताना ," ए भाई वो ३ रुपया देव.. भाडा सिर्फ १७ रुपया होता है ना..अभी चिल्लर नै है तो हमारा क्यू नुकसान करता है तुम...पगार क्या फोकट मे आता है क्या??" अशी चकमक जेव्हा रोज नाक्यावर १-२ दिवसाच्या फरकाने घडते तेंव्हा माझा पगार केवळ दुःखाने उसासे टाकत असतो..," कोण होतास तू नी काय झालास तू...?" अशी केविलवाणी नजर त्याची मला घायाळ करून जाते...मग भरल्या काळजाने आणि रिकाम्या पाकिटाने पुढच्या महिन्यात असा बेफिकिरी बिलकुल करायची नाही.. पहिले सर्व बचत करून उरलेले खर्च करायचे ,investment हा जादुई शब्द कानात रुंजी घालायला लागतो..जुने lic वाले मित्र ज्यांची तोंड रोज चुकवण्यासाठी नेहमी दुर्मिळ आणि दुर्लभ शक्कल लढविली होती अशा मित्रांना कॉल करून ," अरे काय भावा कुठाय तू??? जरा भेट बोलुयात निवांत " म्हणून आमंत्रणे धाडली जातात..
पण अशा दुःखद वेळी पण माझा पगार माझी साथ सोडत नाही. तो त्याच्या मित्रांना साद घालतो..त्याचे मित्र मला बघून एक दमडी पण द्यायचे नाहीत पण पगारातले एकूण शून्य बघून लैच हरखून जातात त्याचे मित्र!!!
(लूच्चे कुठले,चेहरा बघून माणूस परखायला हे पण काही कमी पडत नाहीत..) माझ्या पगाराचे मित्र म्हणजे क्रेडिट कार्ड !!
हे माझ्या पगाराच्या प्रेमात १तारखेलाच पडतात..पण तेंव्हा माझा पगार ह्यांना कसला भाव देतो!!... हुड्ड करून पिटाळून देतो ....पण बिचारे क्रेडिट कार्ड त्याच पण अगदी खर्र‌ खर्र‌ म्हणजे अगदी खर्र‌ वाले प्रेम असतं माझ्या पगारावर त्यामुळे ते वाट पाहत फक्त एका हाकेची...आणि ती हाक महिना अर्धा झाला की नक्कीच जाते...मग तेंव्हा घायाळ झालेल्या माझ्या पगाराची काळजी घ्यायला आणि मला रोज इंटरेस्ट रेट ची धमकी देऊन ...पगाराची काळजी घेत जा जरा...तुझा स्वतचा आहे ना?? की कोण परक्याचा आहे...का असा सावतेपणा करीत असतो त्याच्यासोबत ...बघ ह्या वेळी करतो मदत पण त्याचा इंटरेस्ट भरावा लागेल ...वगैरे वगैरे मुक्ता फळे उधळत क्रेडिट कार्ड अलगद पने हातात हात घेऊन मला आणि माझ्या पगाराला दोघांना पुन्हा आपल्या पायावर उभे करते..
मग एकेदिवशी दिवसभर कार्यालयात मन आणि मान दोन्ही मोडून काम करून लोकलचे धक्के खात अंगे भिजली जल धारानी अशी अवस्था घेऊन आपण घरी जाताना मोबाईल किणकिण करून खिशात आपली अस्तित्वाची जाण करून देतो...
आणि तो स्वर्गीय मेसेज आपल्या स्क्रीन वर झळकत असतो...your account xxxxxxxx556 is credited with.....
मग काय !!!रुसलेल्या प्रेयसीने रात्री उशिरा ," झोपलास का रे ?? बोलायचं होते!!" असं मेसेज पाठविल्यावर ज्या प्रेमाने मोबाईल जवळ घेतो कोणी...तसा मोबाईल वरचा हा माझा पगार आलेला मेसेज पाहून अगदी तशीच अवस्था होते...

मग काय सुरू पुन्हा खर्च...
होऊदे खर्च...
भाऊ आहे मोठा...
वगैरे वगैरे....
(हम नई सुध्रने वाले...
ओये चीचा ...कटिंग किस्कु दे रैले...मेरेकु एस्पेशल फुल और बन मस्का पाव, मस्का खारी ,एक बड़ा ,,,,बाकी दोस्त लोगोकु जो मंगताय वोईच दे !!!!)

एस.बी
बिनपगारी
फुल अधिकारी

प्रतिक्रिया

डॅनी ओशन's picture

17 Oct 2020 - 9:28 am | डॅनी ओशन

यावर काय चर्चा पायजे ?

(काथ्याकूटका चक्कर बाबू भय्या, काथ्याकूटका चक्कर.)

एस.बी's picture

17 Oct 2020 - 9:41 am | एस.बी

नवा सदस्य आहे..हे असलं लिखाण इकडे टाकत नाही का?? ह्यावर चर्चा पायजे म्हणून नाय टाकलं... इथे टाकत नसतील तर कुठे टाकतात ते पण सांगा..धन्यवाद!

डॅनी ओशन's picture

17 Oct 2020 - 9:57 am | डॅनी ओशन

इतका काय प्रॉब्लेम नाय.

पुढच्या वेळेस "जनातलं, मनातलं" म्हणजेच लेख सदराखाली काढा.

एस.बी's picture

17 Oct 2020 - 10:02 am | एस.बी

इथली delete करून तिकडे टाकू का मग?

शाम भागवत's picture

17 Oct 2020 - 12:09 pm | शाम भागवत

संपादक मंडळींना विनंती करा.
लेख डिलीट वगैरे करता येत नाही. बाण एकदा सुटला की सुटला.
😀

एस.बी's picture

17 Oct 2020 - 2:09 pm | एस.बी

चालेल आता पुढच्या वेळी काळजी घेईल

महासंग्राम's picture

17 Oct 2020 - 2:16 pm | महासंग्राम

आपला लेख सासं ने वर्ग केला आहे

पुलेशु

एस.बी's picture

17 Oct 2020 - 2:26 pm | एस.बी

आता मला दुसऱ्या ठिकाणी म्हणजे जनातलं मनातलं मध्ये पुन्हा जाऊन पुनः प्रकाशित करावा लागेल ना ? की वर्ग केला म्हणजे इकडून तिकडे ट्रान्स्फर केला थेट?

महासंग्राम's picture

17 Oct 2020 - 3:07 pm | महासंग्राम

तुम्हाला आता पुन्हा प्रकाशीत करावा लागणार नाही. सध्या लेख जनातलं मनातलं मध्ये वर्ग झाला आहे.

एस.बी's picture

17 Oct 2020 - 3:15 pm | एस.बी

धन्यवाद!!!!