नरेंद्र मोदींचे घवघवीत यश

क्लिंटन's picture
क्लिंटन in काथ्याकूट
23 Dec 2007 - 8:02 pm
गाभा: 

नरेंद्र मोदी या नावाची जादू गुजरातेत परत चालली आणि बेगडी धर्मनिरपेक्षतावादी काँग्रेस पालापाचोळ्यासारखी उडून गेली.भारतीय जनता पक्षाने १९९८ इतक्याच म्हणजे ११७ जागा जिंकल्या. वयाच्या ८०व्या वर्षी सत्तेची हाव धरून मोदींना अपशकून करायचा प्रयत्न करणारे केशुभाई पटेल, जनतेत स्वतःचा जनाधार केव्हाच गमावून बसलेले सुरेश मेहता आणि त्यांचे बंडखोर जनतेने पूर्णपणे नाकारले. मोदींच्या विकासाभिमुख धोरणांवर जनतेने शिक्कामोर्तब केले.त्याबद्दल मोदीचे हार्दिक अभिनंदन.

मोदींच्या विजयावर आपले मत काय?

----विल्यम जेफरसन क्लिंटन (मोनिकाचा पूर्वीचा प्रियकर)

प्रतिक्रिया

मोहन's picture

23 Dec 2007 - 9:15 pm | मोहन

गुजराथी जनतेचे हार्दिक अभिनंदन. महाराष्ट्राचा विकास हा निष्क्रिय राज्यकर्ते व कुपमंडूक विरोधी पक्ष असूनही होतो आहे. नरेंद्र मोदींसारखा नेता गुजराथ राज्याचे भाग्य उजळेल. अंतर्गत दूफळी, बेगडी धर्मनिरपेक्षतावाद्यांचा ससेमीरा,पक्षपाती मिडीया या सर्व विरोधी माहोल मधे कसे जिंकता येते हे मोदींनी सप्रमाण दाखवून दिले.

मोदीचे हार्दिक अभिनंदन.

आपला

मोहन

व्यंकट's picture

23 Dec 2007 - 9:20 pm | व्यंकट

भा.ज.प. आणि मोदींच अभिनंदन.
मोदींनीं अजून जोरदार विकास कार्य करून गुजरातेत सुख, यश, स्थिरता आणि भरभराट आणावी. प्रत्येक दु:ख, दारिद्र्यानी पिचलेले आयुष्य उत्तम प्रकारे बदलून टाकावे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Dec 2007 - 9:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मोदींनी बहूमत मिळाले याचा काहीएक अर्थ जनता पाठीशी आहे. विकास असो की, कट्टरहिंदूत्व असो, कॉग्रेसच्या विरोधात मतदान करणे म्हणजे, अल्पसंख्याकांच्या विरोधात मतदान करणे असाही त्याचा अर्थ असू शकतो. ढोंगी धर्मनिरपेक्षता, तसेच सच्चर अहवालातील मुद्देही इथे चघळले गेले असतील.त्याचाही फायदा मोदींना झाला असेल.आणि येत्या काळात भाजपा ला इतर राज्यात सत्तेची स्वप्ने पडावी असे वाटत असेल तर मोदी फॉर्मूला हीट चालेल असेल असे वाटते. अर्थात हे मोदींचे यश की भाजपाचे यश असे प्रश्न निर्माण झाले तर मग मात्र कठीण आहे, भाजपाला एका टेरर नेत्याची गरज आहे, आणि येत्या काळात सर्वेसर्वा मोदी जर असतील तर त्यांच्यासाठी दिल्ली दूर नसावी !

अवांतर :-) मोनिकाच्या पुर्व प्रियकराला ब-याच दिवसात इथे लिहितांना पाहून बरे वाटले !!!

विसोबा खेचर's picture

23 Dec 2007 - 10:41 pm | विसोबा खेचर

म्हणतो!

तात्या.

आनन्दा's picture

14 Mar 2016 - 9:24 pm | आनन्दा

बिरूटे सर, तुमच्याअ भविष्यवाणीला मानले बुवा.

क्लिन्टन साहेब,

आज दिवसभर दूरचित्रवाणी पाहु शकलो नाही.

आपण दिलेली बातमी ऐकून भरुन पावलो!

संजय अभ्यंकर

नरेंद्र मोदींविरूध्द काँग्रेसने २००२ पासून आकाशपाताळ एक केले.त्यांच्या मते मोदी खलनायक होते तर काँग्रेसने २००४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर त्यांचे सरकार बरखास्त करून तुरूंगात का टाकले नाही?काँग्रेस आघाडी आणि कम्युनिस्टांना लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये बहुमत असल्यामुळे मोदी सरकार बरखास्त करायचा प्रस्ताव सहज संमत झाला असता.जर का मोदी खलनायक असतील किंवा देशद्रोही असतील तर मे २००४ पासून त्यांना सत्तेत राहू देणारी काँग्रेसही दोषी नाही का?

त्याउलट अमेरिकेने २००५ मध्ये मोदींना व्हिसा नाकारल्यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी तर लोकसभेत सांगितले की मोदी भारतातील घटनात्मक पद भूषवित आहेत आणि त्यांच्याविरूध्द आरोप असले तरी एकही आरोप न्यायालयात सिध्द झालेला नाही. आणि त्यांचाच पक्ष मोदींविरुध्द आरोप सिध्द झालेले नसताना त्यांना खलनायक ठरवायला निघतो.उलटपक्षी महंमद अफझलविरूध्द तीन स्तरीय न्यायालयीन सुनावणीनंतर आरोप सिध्द होऊनही आणि फाशीची शिक्षा ठोठावली जाऊनही त्याला पाठीशी घालतो. मागच्या वर्षी संसदभवनावरील अतिरेकी हल्यात मारल्या गेलेल्या सुरक्षारक्षकांच्या नातेवाईकांनी आपल्या नातेवाईकांना मिळालेली पदके जाहिरपणे परत केली आणि तरीही छत्रपतींच्या महाराष्ट्रात जन्मलेल्या आमच्या गृहमंत्र्यांची मान शरमेने खाली गेली नाही. इतकेच नव्हे तर त्यात त्यांना भाजपचा हात दिसला! गुजरातमधील दंगली या गोध्रा प्रकरण झाले म्हणून झाल्या याकडे दुर्लक्ष करायचे आणि त्या रेल्वेगाडीवरील नृसंश हल्ल्यात मारल्या गेलेल्यांना पूर्णपणे विसरून जायचे आणि त्यानंतरच्या प्रतिक्रियेत 'genocide' झाले म्हणून आकाशपाताळ एक करायचे यासारख्या ढोंगी धोरणांमुळे जर गुजराती जनतेने मोदींना भरभरून मते दिली तर त्यात चूक ते काय?

---विल्यम जेफरसन क्लिंटन (मोनिकाचा पूर्वीचा प्रियकर)

अवांतर-- प्रा.बिरुटे आपल्या स्वागताबद्द्ल धन्यवाद

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Dec 2007 - 1:23 pm | बिपिन कार्यकर्ते

मोदींचा विजय ऐतिहासिक तर आहेच, पण पूर्णपणे स्वकष्टार्जित आहे असे वाटते. त्यांनी खरोखर विकासाची कामे केली आहेत असे ऐकतो. नुसत्या भावनिक मुद्यांवर सतत ३ वेळा जिंकवण्या एवढे मतदार मूर्ख नाहित. आणि खरेच जर मोदी एवढे जात्यन्ध आहेत तर त्यांना गेली ५ वर्षे मुसलमानांना त्रास देणे सहज शक्य होते. तसे तर काही झाले नाही.

बिपिन.

अवलिया's picture

24 Dec 2007 - 2:29 pm | अवलिया

गुजराथेत मोदींनी ज्या प्रकारे प्रशासन तसेच लोकप्रतिनीधींमधे जरब बसविली आहे ते पहाता मोदींचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात होता व आहे. सर्वसाधारण पणे गुजराथी मनुष्य उद्यमशील असतो व त्याला उद्योगामधे जास्त स्वारस्य असते. मोदींनी विविध प्रकारच्या उद्योगांना ज्या पद्धतीने चालना दिल्या आहेत हे पहाता महाराष्ट्रा विषयी थोडी खंत वाटते कारण आपले राज्यकर्ते अजुनही उस व कापुस यापलिकडे सरकत नाहित.

सेझ च्या नावाखाली पिकावु जमीन बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या घशात घालुन स्वतःच्या तुंबड्या भरण्याचे काम ज्या पद्धतीने चालु आहे ते पहाता महाराष्ट्रातील मुळ निवासी देशोधडीला लागणार यात शंकानाही.

सातारा भागातील जमिनी ज्या अवघ्या सहा महीन्या पुर्वी पन्नास हजार एकर भावाने कुणीहि घेत नव्हते तिथे सत्तेतील काही मंत्र्यानी चाळीस हजार एकरी भावाने खरेदी करुन (फक्त स्टेंप डयुटीचे पैसे भरुन) पाच लाख ेकरी भावाने विकणे चालु आहे.
सेझ ची मर्यादा यांच्या मालकीच्या जागांपुरतीच आहे
असा आमचा शिवाजीचा महाराष्ट्र

स्वतःला फार हुशार, व्यावसायिक , पारदर्शी समजणा-या व येता जाता तीच तीच पुंगी वाजविणा-या एका माहिती तंत्रज्ञानातील सेवा सुविधा पुरविणा-या कंपनीने नाशिकमधे द्राक्ष बागायती जमीन ५०० एकर सेझ करुन मागितली. कलेक्ठरांनी नक्की काय करणार म्हणुन विचारणा केली तर ५ एकरात इमारत, ७ एकरात रहिवासी , १५ एकर तळे, फुटबोल मैदान वगैरेए १५० एकर गोल्फ व २०० एकर बाग व हिरवळ असा तपशील दिला. कलेक्टरांनी ५०० एकर बागायती ऐवजी १००० एकर कोरडबाहुचा प्रस्ताव दिला. कंपनीने एक दशांश किमतीत दुप्पट जागा मिळत असतांना कल्पना रद्द केली . का? तिच्या अमेरीकन मालकांना बागायतीच जमीन का काढुन घ्यायची होती ?

नाव मोठे लक्षण खोटे
त्यापेक्षा गुजराथ बरा ...मोदी बरा ....भाजपा बरा....

नाना

मेडियाने मोदींच्या विजयाचे विश्लेषण मात्र चुकीच्या पध्दतीने केले. केवळ प्रो-हिंन्दू म्हणुन हा विजय झाला नाही तर त्या मागे अत्यंत नियोजनाने केलेला विकास पण मह्त्वाचा आहे.

आपलाच,
मन्या

देवदत्त's picture

25 Dec 2007 - 8:16 pm | देवदत्त

अहो, मिडीयाने केलेले विश्लेषण कुठे बघताय? प्रत्येक जण आपापल्याप्रमाणे लिहीणार.. त्यात नेहमी खरे असेलच असे थोडेच :)

विसुनाना's picture

26 Dec 2007 - 11:45 am | विसुनाना

मोदींचा (आणि पर्यायाने भाजपचा) विजय हा समाजमानसिकतेचा आरसा आहे.
एखाद्या नेत्यामागे प्रभावळ असण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्याच्याबद्दल वाटणारी आदरयुक्त भीती किंवा भीतीयुक्त आदर!
मोदींच्या अखिल भारतीय लोकप्रियतेत भर पडत आहे हे नि:संशय! यात त्यांच्या विकासकार्याचा, कर्तव्यदक्षतेचा, स्वच्छ प्रतिमेचा आणि कडव्या हिंदुत्त्वाचा सारखाच वाटा आहे.(नेत्यांच्या आख्यायिका निर्माण होणे हे त्यांच्या जनमान्यतेचे प्रमाण. मोदी म्हणे कोणत्याही वार्तालापाच्या ठरलेल्या वेळेआधी पाच मिनिटे उपस्थित असतात. ) कमीजास्त फरकाने अत्यंत शिस्तप्रिय, काहीशी रागीट भासणारी, झटपट कठोर निर्णय घेणारी , स्वतःला जनतेचा विनम्र सेवक म्हणवणारी छबी सामान्य जनतेला भुरळ घालण्यासाठी अत्यंत योग्य ठरते.
हिटलर, इंदिरा गांधी, फिडेल कॅस्ट्रो इ. नेत्यांमध्ये हेच गुणदोष होते.
या बाबतीत नरेंद्र मोदी एकाधिकारशाही निर्माण करणार्‍या अनेक जागतिक नेत्यांच्या पंगतीत बसतात.मोदींची वाटचाल अशीच एका सर्वसत्ताधीश निरंकुश नेत्यापर्यंत होते की कसे? हे काळच ठरवेल.

आजच्या घडीला मोदींना समांतर नेता कोणी असेल तर तो म्हणजे पुतिन.
जगाच्या दबावाला आणि अमेरिकाप्रणित प्रचारयंत्रणांच्या विरोधी प्रचाराला न जुमानता रशियन जनतेने पुतिन यांना आपले सर्वेसर्वा करून टाकले. यातही एकाधिकारशाहीची बीजे आहेतच!
पण एक मोठा फरक आहे. मोदींनी (पुतिन यांच्याप्रमाणे ) प्रचंड संपत्ती जमा केली असा आरोप अजूनही कोणत्याच प्रसिद्धी माध्यमांनी केलेला नाही.

जनतेने मोठ्या विश्वासाने मोदींना निवडून दिले आहे. त्यांची यापुढची वाटचाल हा विश्वास सार्थ ठरवणारी होवो ही सदिच्छा!

इनोबा म्हणे's picture

29 Dec 2007 - 4:23 pm | इनोबा म्हणे

सर्वप्रथमः मोंदींच्या विजयाचे मी अभिनंदन करणार नाही आणी न केल्याने त्यांचे काही बिघडणार नाही,त्यामुळे असल्या फालतू कामांत वेळ न घालवता मुद्याला हात घालतो...

नरंद्र मोदींसारख्या लांडग्याच्या विजयाने काँग्रेस नावाच्या कोल्ह्याचे पितळ उघडे पडले आहे हे खरे,पण काँग्रेस आणी गुजरात या महाराष्ट्रविरोधी सत्तांचे फार जुने साटेलोटे आहे.
स्वातंत्र्यपुर्व काळापासून काँग्रेसचे आणी पर्यायाने गुजराती नेत्यांचे भारतीय राजनितीवर वर्चस्व राहिले यामुळेच लोकमान्य टिळक आणी सावरकर यांच्यासारख्या मराठी नेत्यांना काँग्रेसने डावलले.(सुभाषचंद्र बोस आणी भगतसिंग यांनाही विसरू नये)

कोणतेही कर्तुत्व नसताना आणी इंग्रजी 'लाईफस्टाईल' जगणा-या नेहरूंना पंतप्रधानपदाचा मान मिळाला.याच नेहरूंनी नंतर मुंबई गुजरातच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला होता.त्यांच्यानंतर ही परंपरा मोरारजी देसाई नामक हरामखोराने इमाने इतबारे पुढे नेली,आणी त्यांच्या आदेशानुसार संयुक्त महाराष्ट्र चळवळी दरम्यान निघालेल्या मोर्च्यावर गोळीबार करून १०५ मराठी माणसांचे रक्त सांडले पण "मराठी माणूस भडकला आणी मुंबईत भगवा झेंडा फडकला".या पराभवाचा वचपा गुजरात्यांनी बेळगाव,कारवार्,निपाणी आणी भालकी सारख्या मराठी जनसंख्या असलेल्या प्रदेशांना महाराष्ट्रापासून वेगळे करत काढला.(संदर्भः संयुक्त महाराष्ट्र डॉट ऑर्ग)

साधारणपणे एक ते दिड वर्षापुर्वी अमेरीकास्थीत एका मराठी महिलेने एका मराठी दैनीकात लेख लिहून महाराष्ट्र सरकारला आणी मराठी जनतेला मुंबई धोक्यात असल्याची जाणीव करून दिली होती,या लेखात असे लिहीले होते की जरी मुंबई आज महाराष्ट्रात असली तरी बिल्डर लॉबीला हाताशी धरून हे लोक मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर घालवत आहेत .आणी ज्यावेळी मराठी मते इथे राहणार नाहीत त्यावेळी हे आरामात मुंबई खिशात घालणार्.शिवाय मुंबईतील/महाराष्ट्रातील आणी परदेशातून इथे येऊ पाहणार्‍या उद्योगधंद्याना गुजरातेत पळवण्याचे काम ही राजरोसपणे चालू आहे(मोदींच्या कारकिर्दीत) आणी दुर्दैवाने आपले 'सोनीयाची' पावले चालणारे काँग्रेसी नेते ही त्यांना हातभार लावत आहेत.

अवलिया's picture

29 Dec 2007 - 6:28 pm | अवलिया

स्वातंत्र्यपुर्व काळापासून काँग्रेसचे आणी पर्यायाने गुजराती नेत्यांचे भारतीय राजनितीवर वर्चस्व राहिले

ये पैसा बोलता है...
राजकारण करायला पैसा लागतो प्रचंड पैसा फक्त उद्योगातुन येतो
नोकरीतुन नाही

मराठी माणूस म्हणजे ९ ते ५ नोकरी
६ वाजता घरी बायकोच्ञा हातचा चहा
७ वाजता पोरासोरासमवे बायकोच्या हातात हात घालुन फिरायला जाणे
कुठेतरी बाहेरच खाणे रात्री परत बायकोला .....
सकाळी उठुन परत तेच...
राजकारण करायला घरदार विसरावे लागते

शिवाजी जन्माला यावा पण माझ्या घरात नको हि प्रवृत्ती मराठी माणसाची असताना राजकारणात कसे टिकुन रहाता येईल

आणि दुसरे महत्वाचे म्हणजे मराठी असल्याचा न्युनगंड सतत इंग्रजीचा आधार घेणै
भारतात राष्ट्रीय स्तरावर राजकारण करायचे तर हिंदी नीट येणे गरजेचे पण ते कुणालाच येत नाही

मग कसा ठसा उमटणार.....

मुंबई घशात घालण्याची गोष्ट असेल तर लक्षात घ्या उस व कापुस यापलिकडे झाट काहि अक्कल नसणा-या राने मुंडे देशमुख यांच्यापेक्षा धंदा करणारा व समजनारा गुजराथी बरा निदान मुंबइत रोजगार तरी नीट राहील

मराठी मराठी कराल तर पस्तावाल
अर्थ प्रधान

नाना

इनोबा म्हणे's picture

30 Dec 2007 - 12:48 am | इनोबा म्हणे

नाना तुमची भाषाशैली सुधारा...
आपण एका सुसंस्कृत आणी सुशिक्षीत समाजाचे घटक आहात त्यामुळे शिवराळ भाषेचा सार्वजनीक ठिकाणी वापर टाळा.अशा प्रकारची भाषा मी सुद्धा वापरू शकतो परंतू याचा परीणाम म्हणून आपणा दोघानाही या संकेतस्थळातून बाहेर पडावे लागेल्,आणी या संकेतस्थळाचे वातावरण ही बिघडेल.

मराठी माणूस म्हणजे ९ ते ५ नोकरी
६ वाजता घरी बायकोच्ञा हातचा चहा
७ वाजता पोरासोरासमवे बायकोच्या हातात हात घालुन फिरायला जाणे
कुठेतरी बाहेरच खाणे रात्री परत बायकोला .....
सकाळी उठुन परत तेच...
राजकारण करायला घरदार विसरावे लागते
मराठी माणूस म्हणजे केवळ नोकरी करणारा,संसाराने पिचलेला आणी भोग विलासात रमलेला असा जो तुमचा समज आहे आधी तो मनातून काढून टाका.

आणि दुसरे महत्वाचे म्हणजे मराठी असल्याचा न्युनगंड सतत इंग्रजीचा आधार घेणै
भारतात राष्ट्रीय स्तरावर राजकारण करायचे तर हिंदी नीट येणे गरजेचे पण ते कुणालाच येत नाही

दक्षीणेतल्या किती लोकांना हिंदी येते आणी किती लोक इंग्रजीचा आधार न घेता नोकर्‍या मिळवतात ते जरा सांगा.असे असताना ही दक्षीणेतले कित्येक पंतप्रधान झाले पण मराठी माणसाच्या नशीबात हा 'योग' नाही.हा निव्वळ कुटील राजनीतीचा भाग आहे.

मुंबई घशात घालण्याची गोष्ट असेल तर लक्षात घ्या उस व कापुस यापलिकडे झाट काहि अक्कल नसणा-या राने मुंडे देशमुख यांच्यापेक्षा धंदा करणारा व समजनारा गुजराथी बरा निदान मुंबइत रोजगार तरी नीट राहील
मुंबई महाराष्ट्राच्या हातुन निसटल्यानंतर मुंबईतील कामगार मात्र मराठी असेल असे तुम्हाला वाटत असेल तर ही तुमची वैचारीक दिवाळखोरी म्हणावी लागेल्.मारवाड्याच्या दुकानातील कामगार ही मारवाडीच असतो हे लक्षात ठेवा.

पैशापेक्षा स्वाभीमान मोठा हे आमच्या 'शिवाजी महाराजांनी' आम्हाला शिकवले आणी आमच्या पुढच्या पिढीलाही आम्ही हेच शिकवणार.लाजीरवाने आयुष्य जगण्यापेक्षा मरण बरे!

अवलिया's picture

30 Dec 2007 - 3:43 pm | अवलिया

नाना तुमची भाषाशैली सुधारा...

जरुर आपल्यासारख्यांचे मार्गदर्शन लाभल्यास हे ही करुः)


मराठी माणूस म्हणजे केवळ नोकरी करणारा,संसाराने पिचलेला आणी भोग विलासात रमलेला असा जो तुमचा समज आहे आधी तो मनातून काढून टाका
.

माझे हे एक सर्वसाधारण निरिक्षण होते. कोणावरही वर वैयक्तीक काहिही रोख नव्हता. मी पण मराठी आहे व आयुष्यात एकदाही नोकरी केलेली नाही.

मारवाड्याच्या दुकानातील कामगार ही मारवाडीच असतो हे लक्षात ठेवा.

नोकरी करणा-यांचे माहित नाही. पण माझ्या कंपनीचे ८० टक्के ग्राहक मारवाडी व गुजराथी आहेत. विशेष नैपुण्य मिळवा. काम करा. लोक तुमच्या भाषेचा , स्थानिकत्वाचा , रहिवासी कुठले, जात काय , धर्म काय याचा अजिबात विचार करत नाहीत. त्यांना काम हवे असते तुम्हाला पैसा.

पैशापेक्षा स्वाभीमान मोठा हे आमच्या 'शिवाजी महाराजांनी' आम्हाला शिकवले आणी आमच्या पुढच्या पिढीलाही आम्ही हेच शिकवणार.लाजीरवाने आयुष्य जगण्यापेक्षा मरण बरे!

अगदी बरोबर. पण पैसे मिळवुन सुद्धा स्वाभिमानी रहाता येते हे स्वराज्यासाठी लागणा-या पैशाची जुळवाजुळव सुरत मोहिमेच्या सहाय्याने करणारे, कल्याण मोहीम आखणारे शिवाजी महाराज तुमच्या क्रमिक पुस्तकातुन वगळले होते काय?

असो. माझ्या बाजुने हा विषय मी बंद करित आहे. तुम्हाला मनाला लागेल असे चुकुन लिहिले असेल तर कृपा करुन माफ करा.

यापुढे तुमच्याशी चर्चा करुन तुमचा वेळ घेणार नाही.

नाना

विसोबा खेचर's picture

30 Dec 2007 - 4:49 pm | विसोबा खेचर

अगदी बरोबर. पण पैसे मिळवुन सुद्धा स्वाभिमानी रहाता येते हे स्वराज्यासाठी लागणा-या पैशाची जुळवाजुळव सुरत मोहिमेच्या सहाय्याने करणारे, कल्याण मोहीम आखणारे शिवाजी महाराज तुमच्या क्रमिक पुस्तकातुन वगळले होते काय?

हा प्रश्न आवडला...

तात्या.

विसोबा खेचर's picture

30 Dec 2007 - 12:55 am | विसोबा खेचर

अरे नाना आणि विनायक,

शाब्दिक, वैचारिक वाद हवा तितका घाला, चर्चाही भरपूर करा, परंतु एकमेकांशी भांडू नका रे!

असो, हा आमचा आपला एक प्रेमळ सल्ला हो! बाकी चालू द्या.. :)

तात्या.

सखाराम बाइंडर's picture

30 Dec 2007 - 4:10 pm | सखाराम बाइंडर

शाब्दिक, वैचारिक वाद हवा तितका घाला, चर्चाही भरपूर करा, परंतु एकमेकांशी भांडू नका रे!

आणीबाणि चालु असतांना भाडण ... !
आपण नाही रे बाबा .... आळीमिळी गुप बसलो असतो ...

तात्या .... भिवु नका ... तुमच्या पाठीशी कोणि नाही ... उडवा बंदुक मागे न पहाता...

ढिशक्याव......

खरा डॉन (बाकीचे क्लॉन)

सखाराम बाइंडर's picture

30 Dec 2007 - 4:07 pm | सखाराम बाइंडर

विषय काय चर्चा काय
काहिच ताळ्मेळ नाही तुम्हा सभ्य लोकांना ....

छ्या त्यापेक्षा भाई बरा
फाटकन गोळी घालुन मोकळा

गोली मार भेजे मे........

खरा डॉन (बाकीचे क्लॉन)

इनोबा म्हणे's picture

31 Dec 2007 - 2:48 pm | इनोबा म्हणे

अगदी बरोबर. पण पैसे मिळवुन सुद्धा स्वाभिमानी रहाता येते हे स्वराज्यासाठी लागणा-या पैशाची जुळवाजुळव सुरत मोहिमेच्या सहाय्याने करणारे, कल्याण मोहीम आखणारे शिवाजी महाराज तुमच्या क्रमिक पुस्तकातुन वगळले होते काय?
तुमच्या या विधाना बरोबर मी सहमत आहे,आणी मी तेच सांगण्याचा प्रयत्न केलाय्,पण सुरतेवरील स्वारी आणी कल्याण मोहिम या स्वराज्याचा पैसा लाटणार्‍या लांडग्यांना लुटून स्वराज्य भक्कम करण्यासाठी केल्या गेल्या होत्या.शिवाजी महाराज्यांनी पैशासाठी गनिमाबरोबर हातमिळवणी केली नव्हती.त्यांनी जर तुमच्या सारखाच 'धंदा करणारा गुजराती बरा' म्हणत 'बिझनेस' केला असता तर स्वराज्य अस्तिवात आले नसते.

ज्या गुजरात्यांकडे आज इतका पैसा आहे ते हवे तर अशा कितीतरी मुंबई गुजरात मध्येच तयार करू शकतात्,अहमदाबाद सारख्या शहराला आज 'दुसरी मुंबई' म्हणून संबोधले जाते ते याच करणामुळे पण गुजरात्यांना मुंबई हवी ती केवळ पैशासाठी नव्हे तर मराठी माणसाचा आणी महाराष्ट्राचा आर्थिक पाया तोडण्यासाठी.

जेनी...'s picture

14 Mar 2016 - 9:10 pm | जेनी...

.

मस्त लेख!
मारामारी स्पेशल!