साखरेचे पर्याय

Primary tabs

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in काथ्याकूट
23 Sep 2020 - 10:55 pm
गाभा: 

नमस्कार
सर्वप्रथम सांगतो, मला मधुमेह नाही. मी लठ्ठही नाही (उंची ५'६" वजन ६७ किलो).
पण एकतर साठीकडे वाटचाल, दुसरं म्हणजे पोट कमी करायचं तर गोड कमी केल्याशिवाय नुसतं चालुन उपयोग नाही असा सर्रास मिळणारा सल्ला आणि गोडाची आवड. शिवाय असं वाचनात आलं की पिष्टमय पदार्थांमधुन मिळणार्‍या शर्करे पलिकडे दिवसाला जास्तीत जास्त ३०-३५ ग्रॅम पलिकडे थेट साखर निषिद्ध. मी बिनसाखरेचा चहा पीतो, रात्री कॉफीमध्ये मात्र आवर्जुन साखर घालतो. (हो, ऐकायला चमत्कारिक वाटलं तरी मी गेली अनेक वर्षे रात्री झोपण्यापूर्वी मस्त कपभर कॉफी घेतो आणि झोपतो)
गोड खाता यावं (अर्थात फार नाही) आणि साखरेचे दुष्परिणाम नकोत म्हणून सुक्रालोजचा वापर सुरू करावा अशा विचारात आहे. एका नामांकित डॉक्टरांनी हरकत नाही असा सल्ला दिला आहे, पण मला प्रत्यक्ष वापरकर्त्यांचे अनुभव ऐकायची उत्सुकता आहे तेव्हा मला कृत्रिम साखर/ पर्यायी साखर घेणार्‍या मिपाकरांचे अनुभव ऐकायला आवडेल.

धन्यवाद
साक्षी

प्रतिक्रिया

कंजूस's picture

24 Sep 2020 - 6:23 am | कंजूस

गोड खाणे ,साखर खाणे,वेगळ्या प्रकारची साखर खाणे याचा मधुमेहाशी काही संबंध नसतो.

खाल्लेल्या अन्नाची ( कारबोहाइड्रेट्स म्हणतात ) त्याची साखर ( ग्लुकोज) शरीरात केली जाते ती पेशिंना घेता येते.

१- कमी पडली की भूक लागते,
२- अन्नाची रुपांतरीत साखर पेशिंना पुरवली जाते.
३- वापरून उरली की त्याची चरबी करून साठवली जाते,
४- नाहीच केली तर मूत्रातून बाहेर टाकली जाते.

क्रमांक (२) कार्य बिघडते, नंतर क्र (३)ही बिघडते.
ते ओटोकन्ट्रोल औषधाने कायमचे नियमित करता न येणे म्हणजे मधुमेह हे सर्वांनाण माहिती आहे.

पण त्यासाठी कोणत्या प्रकारची साखर खावी असा काही नियम नाही असा माझा समज आहे.
समजा साखरेचा ओटोकन्ट्रोल बिघडतो कसा हे समजले असते तर मधुमेह होणे थांबवता आले नसते का?

Gk's picture

24 Sep 2020 - 6:42 am | Gk

मुळात साखर कृत्रिम

त्याला अजून एक पर्याय , तोही अजून कृत्रिम

त्यापेक्षा आता आहे ते सुरू ठेवा,

चौकटराजा's picture

24 Sep 2020 - 9:35 am | चौकटराजा

साठीला आलात तरी मधुमेह नाही यात बरेच काही आहे. ज्याना अनुवांशिक कारणाने मधुमेह होणार असतो त्याना साठीची वाट पहावी लागत नाही. जर मधुमेह नसेल तर कितीही साखर खाल्ली तरी चालेल जर अनुवंशात रक्तदाब नसेल तर ! माझे एक नातेवाईक स्थूल असून ४० वर्शाचा मधुमेह असून ९१ वर्षे जगले. पण लठ्ठपणा म्हणजे तुलनात्मक कमी आयुष्य हा नियम खरा आहे ! माणसात मधुमेह निर्माण करणारी वा ह्रद्यरोग निर्माण करणारी जशी जनुके असतात तशी त्याला काही झाले तरी विरोध करणारी जनुकेही काहींना लाभतात की कसे यावर काही वाचनात आले आहे ! काही संशोधक म्हणतात असे असतेच !

चौथा कोनाडा's picture

24 Sep 2020 - 12:22 pm | चौथा कोनाडा


एकतर साठीकडे वाटचाल, दुसरं म्हणजे पोट कमी करायचं


या टप्प्यावर पोट का कमी करायचे असेल याचे कुतुहल वाटते.

सामान्यनागरिक's picture

30 Sep 2020 - 2:28 pm | सामान्यनागरिक

आपण आहार तज्ञाचा सल्ला घ्यावा.

काहीही अडचण नसतांना उगीचच काळजी करणारे पेशंट त्यांना हवेच असतात.
तुमचे पोट कमी नाही झाले तरी त्यांचे पोट नक्कीच भरेल !

सुबोध खरे's picture

1 Oct 2020 - 7:17 pm | सुबोध खरे

वाढलेले पोट हे अनेक आजारांना निमंत्रण देते.

https://en.wikipedia.org/wiki/Abdominal_obesity

पोट असलं की कोट चांगला बसतो.

Gk's picture

24 Sep 2020 - 1:52 pm | Gk

डॉकटर - तुमचे 3 ब्लॉक आहेत

पेशन्ट - नाही 4 आहेत , 2 दादरला , 1 ठाण्यात , 1 लोणावळ्यात

डॉकटर - त्यातला 1 विका, तुमच्या करोनरीत 3 ब्लॉक आहेत , बायपास करावा लागेल

नीलस्वप्निल's picture

24 Sep 2020 - 2:06 pm | नीलस्वप्निल

हा हा हा

Rajesh188's picture

24 Sep 2020 - 2:23 pm | Rajesh188

साखर आणि कृत्रिम साखर sucralose .
Sucralose च शोध मराठी संशोधकांनी लावला आहे.
शशिकांत फडणीस ह्यांनी.
Sucralose जास्त वेळ उकळले तर त्याचे विघटन होवून शरीराला घातक पदार्थ मध्ये त्याचे रूपांतर होते.
असे वाचले आहे.

चौथा कोनाडा's picture

25 Sep 2020 - 5:50 pm | चौथा कोनाडा

Sucralose च शोध मराठी संशोधकांनी लावला आहे.

म्हणून मराठी भाषिकांनी कृत्रिम साखर खायला हरकत नाही असे म्हणायचं आहे का ?

गोंधळी's picture

24 Sep 2020 - 6:15 pm | गोंधळी

गुळ पावडर (jaggery powder) हा उत्तम पर्याय आहे साखरेला असे वाचुन आहे.

एथे कोणी वापरत असतील तर ते जास्त सांगु शकतील.

सर्व कॉल्ड ड्रिंक्स,आईस क्रीम केक,मिठाई,आणि चहा मधील साखर सर्व च टाळणे उत्तम.
आपल्या आहारातून आवश्यकता असते तेवढे ग्लुकोज शरीराला मिळते .
वेगळे गोड पदार्थ घेण्याची गरज नाही.
Glucose,म्हणजेच साखर शरीराला अत्यंत आवश्यक असते ते इतर पदार्थ मधून मिळेल च.
ऊसा मध्ये असणारी साखर ही नैसर्गिक आहे कृत्रिम साखरे ही लॅब मध्ये केमिकल वापरून बनवली जाते.
आता तुम्हीच विचार करा काय करायचे ते.

सर्वसाक्षी's picture

1 Oct 2020 - 5:40 pm | सर्वसाक्षी

आभारी आहे