पायनॅपल स्वीट करी Pineapple sweet curry

Gk's picture
Gk in पाककृती
22 Sep 2020 - 12:24 pm

लागणारा वेळ:
१ तास
लागणारे जिन्नस:
1 अननस बारीक चिरून

तिखट , मीठ

कांदा कापून

फोडणी साठी तेल , मोहरी , जिरे , हिंग , आले किस, सुक्या मिरच्या 4 , कढीपत्ता

अर्धी वाटी गूळ

क्रमवार पाककृती:
अननस बारीक चिरून थोडेसे पाणी , मीठ व भरपूर लाल तिखट घालून कुकरच्या भांड्यात ठेवून कुकर मधून शिजवून घ्यावे

P

शिजल्यानंतर फोडी एका ताटात गार करून घ्यावे , पाणी बाजूला काढून ठेवावे , फेकू नये , मग मिक्सरमधून बारीक फिरवून घ्यावे .

मग फोडणी करावी - तेल , मोहरी , जिरे , हिंग , कढीपत्ता , मिरच्या , आल्याचा किस व कांदा वापरून

त्यात अननस गर घालावा , थोडे शिजवावे , मग उरलेले पाणी व गूळ घालून दाट शिजवावे , गूळ कमीजास्त वापरून चव बदलता येते

Pp

खोबरे , नारळ दूध वापरले नाही , मी जी युट्युब पाहिली , त्यातही नव्हते , पण 2,3 चमचे ओला नारळ किंवा नारळ दूध वापरले तर चालू शकेल

अननसpineapplecurry

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

22 Sep 2020 - 8:05 pm | तुषार काळभोर

अशी कैरीची गोडसर आमटी एकाच्या डब्यात खाल्ली होती. मस्त आंबटगोड होती. कोणीतरी अशी अननस आमटी करून द्यायला हवी.