ऑक्सीमीटर कोणता घ्यावा

महासंग्राम's picture
महासंग्राम in काथ्याकूट
21 Sep 2020 - 11:50 am
गाभा: 

सध्या कोरोनाच्या काळात ऑक्सिजन पातळी खालावल्यामुळे बऱ्याच रुग्णांना आयसीयू मध्ये दाखल केल्याच्या घटना घडल्या आहेत. बरेच जण रोज ऑक्सिजन पातळी तपासून पाहण्याचा सल्ला देतात, हि पातळी ऑक्सिमीटर च्या साह्याने तपासता येते, सुरवातीच्या काळात या ऑक्सिमीटर ची किंमत डिड-दोन हजाराच्या आसपास होती, सध्या अमेझॉन तत्सम संकेतस्थळांवर पाहिलं तर बरेच ऑक्सिमीटर उपलब्ध आहेत, आणि त्यांची किंमत हि अगदी पाचशे रुपयांपासून सुरु होते. आता सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाची मानसिकता अशी असते कि जे जे महाग ते उत्तम. आता मला सुद्धा हाच प्रश्न पडला आहे कि इतक्या स्वतःत विकत असलेले ऑक्सिमीटर खरच काही कामाचे असतील का ? त्यातून येणारे रिझल्ट कितपत अचूक असतील ?

कोणी असे ऑक्सिमीटर वापरत असतील तर त्यांनी त्यांचे ऑक्सिमीटर बाबत अनुभव सांगितले आणि ऑक्सिमीटर बद्दल तांत्रिक माहिती दिली तर उत्तमच होईल

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

21 Sep 2020 - 6:48 pm | प्रचेतस

मी ईगल कंपनीचा वापरतोय (भारतीय बनावटीचा) साधारण १६००/१७०० ला पडला, स्वस्तातलेही उपलब्ध आहेत पण क्वालिटी खास नाही.

टीप: कोविड पॉझिटीव्ह असलात तरच विकत आणणे उत्तम अन्यथा ऑक्सिजन रिडींग कमी आल्यास अनावश्यक पॅनिक निर्माण होते. मी सध्या पॉझिटिव्ह असून जवळपास कोविडमधून बाहेर पडतोय.

बाप्पू's picture

21 Sep 2020 - 7:32 pm | बाप्पू

प्रचेतस..
लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा.. !!!

महासंग्राम's picture

21 Sep 2020 - 7:48 pm | महासंग्राम

दादा लौकर बरे व्हा !

काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा!

- (हितचिंतक) सोकाजी

अनिरुद्ध.वैद्य's picture

21 Sep 2020 - 9:54 pm | अनिरुद्ध.वैद्य

लवकर.

लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा.. !!!

अशक्तपणा खूप येऊ शकतो.

निदान २८ दिवस काळजी घ्या.

धर्मराजमुटके's picture

21 Sep 2020 - 7:46 pm | धर्मराजमुटके

मी 'Trueview' या भारतीय कंपनीचा ऑक्सिमीटर वापरतो आणि विकतो देखील. आतापर्यंतचा अनुभव चांगला आहे. २ वर्षांची वॉरंटी आहे. त्याच कंपनीचे दोन वेगवेगळे ऑक्सिमीटर वापरुन रिडिंग घेतली असता तफावत आढळली नाही. किंमत रु. १०००.०० फक्त. टपालखर्च वेगळा पडतो. (युनिट खराब झाल्यास बदली युनिट/ रिपेअर करण्यास वेळ लागतो कारण कोवीडमुळे त्यांच्याकडे देखील मनुष्यबळाची कमतरता आहे.) यात ऑक्सीजन लेवल आणि ह्रदयाच्या ठोक्यांचे रिडींग मिळते.

माझे असे मत आहे की ऑक्सीजन लेव्हल फक्त कोवीड मुळे कमी होत नाही तर आपल्या कार्यशैलीवर देखील अवलंबून आहे. आपण जर शारीरीक हालचाल जास्त करत नसू किंवा अंगमेहनतीची कामे करत नसू तर आपल्या शरीराला ऑक्सीजन ची जास्त गरज पडत नाही त्यामुळे देखील शरीरातील ऑक्सीजनची मात्रा कमी होऊ शकत असेल. अर्थात हा फक्त कयास आहे. डॉक्टर मंडळी यावर योग्य ते सांगू शकतील.

प्रसाद भागवत १९८७'s picture

21 Sep 2020 - 8:29 pm | प्रसाद भागवत १९८७

DR VAKU® DS301 Swadesi Finger Tip Pulse Oximeter, Multipurpose Digital Monitoring Pulse Meter Rate & SpO2 with OLED Digital Display [With 2x AAA Battery]

फायदे

१ कमी किंमत
२ योग्य रेड़ीन्ग
३ भारतीय कंपनी

चौकटराजा's picture

21 Sep 2020 - 10:33 pm | चौकटराजा

सकाळी सर्व जण एकत्र खायला बसलो की तपमान व ऑक्सीजन लेव्हल पहातो. दोन्हीत काही गफलती आहेत असे वाटते . पण फार आचरट रिडिन्ग येत नाही. हे पूर्ण बोगस प्रोडक्ट आहे का हे तपासण्यासाठी मी माझी बी पी ची बिटा ब्लॉकर गोळी घेण्याअगोदरची पल्स व नंतरची पल्स पहातो तर ती नक्की कमी झालेली आढलते. आता त्या यंत्राला काय माहीत के मी गोळी घेतली आहे म्हणून . थर्मो गन साधारण पणे तेच टेम्परेचर दाखवते जे मर्क्युरी थर्मॉमीटर वर दाखवले जाते. अतः एखादे प्रॉडक्ट फार बोगस असेल असे मला वाटत नाही. जसे टी व्ही चे चित्र कसे दिसते हे त्याच्या स्पेक्स पेक्शा महत्वाचे असते. तसे हे आहे !

चामुंडराय's picture

22 Sep 2020 - 3:13 am | चामुंडराय

हि O२ ची पातळी ९० / ९५ पाहिजे म्हणे. म्हणजे काय?
काय युनिट आहे ह्याचे ?

कुमार१'s picture

22 Sep 2020 - 10:54 am | कुमार१

पल्स ऑक्सिमीटरवर जे रीडिंग असते त्याला SpO2 असे म्हणतात. त्याचा अर्थ :

S = saturation

P = peripheral ( हे बोटावर मोजले जाते म्हणून peripheral).

O2 = oxygen

निरोगी व्यक्तीत याचे प्रमाण ९५ – ९९ % या दरम्यान असते.
.......
प्रचेतस,
शुभेच्छा !

प्रचेतस's picture

22 Sep 2020 - 8:39 am | प्रचेतस

सर्वांचे आभार.
आता अशक्तपणा वगैरे काहीच जाणवत नाहीये, लवकरच बाहेर पडेन यातून.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Sep 2020 - 10:28 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लवकरच ठणठणीत व्हाल....! शुभेच्छा....!

-दिलीप बिरुटे

शरद's picture

22 Sep 2020 - 11:31 am | शरद

एखाद्या भटकंतीचा विचार मनात आणा. झटकन बरे व्हाल.
शरद