मोदीजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

Primary tabs

खेडूत's picture
खेडूत in काथ्याकूट
17 Sep 2020 - 12:44 pm
गाभा: 

आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र दामोदरदास मोदींचा आज सत्तरावा वाढदिवस. त्या निमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा!
मोदींचं व्यक्तिमत्व मुख्यतः खूप वादग्रस्त आहे. त्यांची कारकीर्द खूप कष्टाची राहिली आहे. सतत आव्हानांचा सामना करत त्यांनी खूप काही साध्य केले आहे. जे काहीच शक्य वाटत नव्हते, ते मुद्दे सोडवले गेले आहेत. काही नवे मुद्दे वाढले आहेत. अजून खूप काही करायचे बाकी आहे. काहीही केले किंवा न केले तरी विरोध होतोच.
नव्या माध्यमांमुळे सजगता वाढली आहे.
बाकी इतिहास आपल्या सर्वांसमोर आहेच. त्यामुळे पुनराव्रुत्ती टळत आहे.

यानिमित्ताने मनात काही प्रश्न येतात..

१. त्यांनीच सुरू केलेल्या प्रथेनुसार पुढील निवडणुकीनंतर ते पद न घेता ते सल्लागाराच्या भूमिकेत राहतील काय? त्यांना नातलगांची सोय लावायची नसल्याने चिकटून राहणार नाहीत असे वाटते.
२. त्यांच्यानंतर त्यांच्या पक्षात सक्षमपणे देशाचा कारभार कोणता नेता सांभाळू शकेल?
३. पुन्हा भाजपला सत्ता न मिळाल्यास दुसरा कोण पंतप्रधानपद योग्य प्रकारे भूषवू शकेल?
४. वरील मुद्दा तीन नुसार स्थिती मुळात येऊ शकते का? आणि त्यामुळे त्यांनी केलेले चांगले काम बंद तर होणार नाही ना?
५. त्यांच्या काय चुका झाल्या असे वाटते आणि उर्वरित साडेतीन वर्षांत कुठले मुद्दे त्यांनी  प्राधान्याने हातात घ्यायला हवेत?

मिपाकरांना काय वाटते जाणून घ्यायला आवडेल.
(अवांतर टाळण्यासाठी आधीच धन्यवाद..कारण सर्वच मिपाकर जबरदस्त सूज्ञ आहेत! )

प्रतिक्रिया

शाम भागवत's picture

17 Sep 2020 - 12:51 pm | शाम भागवत

👍

मोदीजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

मदनबाण's picture

17 Sep 2020 - 1:25 pm | मदनबाण

सध्या मोदी सरकार चीन,ठप्प झालेली अर्थव्यवस्था आणि माचो लिब्राडु / देशद्रोही झुंड / डावे या तीन आघाड्यांवर एकाच वेळी लढत आहे असे दिसते आहे.
मा. मोदींना उदंड आयुष्य लाभुन वरील तीनही आघाड्यांत त्यांना यश मिळो ही प्रार्थना करतो !
हर बार मोदी सरकार !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बुढ्ढी गुड्डी सठिया गई है !

कपिलमुनी's picture

17 Sep 2020 - 1:25 pm | कपिलमुनी

धुरळा व्हणार

१. वयाच्या ७५ व्या वर्षी ते पदावरून दूर होतील...
कदाचित पंतप्रधानपदाची टर्म पुरी करतील. व दूर होतील.
२. आत्ता सांगणे कठीण आहे. अमित शहा यांच्यावर ती जबाबदारी सोपवली जाईल.
३. तशी वेळ येईल असे सध्या वाटत नाही.
४. जसे शेषन यांनी घालून दिलेल्या वाटेने पुढील निवडणूक आयोगाला जावे लागते. तसेच होऊन नव्या रुळांवरून सत्तेची गाडी पुढे चालू राहील. सामान्य जनतेला पूरक राज्य कारभारात सुधारणा जरूर होतील. पण जर मी आणि माझे कुटुंबीय या चक्रात उच्च पदांसाठी शर्यत सुरू झाली तर मात्र परिस्थिती झपाटय़ाने बिघडेल.
५. अद्याप चूक झाली असे म्हणता येईल असे वाटत नाही. हां काही गोष्टी एरर ऑफ जजमेंट म्हणून धराव्या लागतील. साहसी निर्णय घेण्यात असे घडते.
या पुढे अर्थिक घडी नीट बसवणे आणि देशाच्या सीमांचे संरक्षण करणे ही प्राथमिकता असेल.

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदिजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची माझ्या वकुबानुसार उत्तरे देतोय. ती उत्तरे सर्वांना पटतीलच असे नाही आणि कोणी ती पटवून घ्यावीत असा आग्रहही नाही 😀

१. त्यांनीच सुरू केलेल्या प्रथेनुसार पुढील निवडणुकीनंतर ते पद न घेता ते सल्लागाराच्या भूमिकेत राहतील काय? त्यांना नातलगांची सोय लावायची नसल्याने चिकटून राहणार नाहीत असे वाटते.

माझ्या माहितीप्रमाणे भाजप मध्ये वयाची पंच्चात्तर वर्षे पूर्ण झाल्यावर उमेदवारी दिली जात नाही. पुढची लोकसभेची निवडणूक २०२४ साली होणार आहे. त्यावेळी मोदिजींचे वय ७४ वर्षे असेल, तेव्हा त्यांना उमेदवारी मिळण्यास तांत्रिक अडचण नसावी. आणि ती निवडणूक जिंकून पुन्हा तेच पंतप्रधानपदी विराजमान व्हावेत यासाठी त्यांना परमेश्वर चांगले आरोग्य आणि उदंड आयुष्य देवो हि प्रार्थना.

२. त्यांच्यानंतर त्यांच्या पक्षात सक्षमपणे देशाचा कारभार कोणता नेता सांभाळू शकेल?

आजघडीला त्यांचा उत्तराधिकारी होऊ शकेल असा एकही नेता मला तरी त्यांच्या पक्षात दिसत नाही. काही जणांना नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ, अमित शहा वगैरे मंडळी त्यासाठी योग्य वाटतात पण त्यांच्याबद्दल काही न बोललेलेच बरे असे माझे वैयक्तिक मत!

३. पुन्हा भाजपला सत्ता न मिळाल्यास दुसरा कोण पंतप्रधानपद योग्य प्रकारे भूषवू शकेल?

भाजपला सत्ता न मिळाल्यास विरोधी पक्ष म्हणून ज्या काही टोळ्या आजघडीला राजकीय पटलावर दिसत आहेत त्यांच्यातही कोणी पंतप्रधानपद योग्य प्रकारे भूषवू शकेल असा नेता निदान आजघडीला तरी दिसत नाही असे माझे वैयक्तिक मत!

४. वरील मुद्दा तीन नुसार स्थिती मुळात येऊ शकते का? आणि त्यामुळे त्यांनी केलेले चांगले काम बंद तर होणार नाही ना?

अजून पुढच्या निवडणुकांना साडेतीन वर्षांपेक्षा जास्त अवकाश आहे त्यामुळे अशी स्थिती येऊ शकते का ह्यावर आत्ता भाष्य करणे थोडे घाईचे ठरेल. परंतु जर अशी स्थिती आलीच तर त्यांनी केलेली चांगली कामे बंद वा स्थगित होण्याची शक्यता वाटते. (महाराष्ट्रात असा अनुभव आला आहे.)

५. त्यांच्या काय चुका झाल्या असे वाटते आणि उर्वरित साडेतीन वर्षांत कुठले मुद्दे त्यांनी प्राधान्याने हातात घ्यायला हवेत?

देशाचा कारभार चालवणाऱ्या व्यक्तीकडून झालेल्या चुका काढण्या एवढी माझी लायकी नक्कीच नाही, तरी ज्या बाबतीत अनुभव आले त्यावरून सांगू शकतो कि, श्रीमती निर्मला सीतारामन ह्यांना अर्थमंत्री पदी बसवणे हि त्यांची दुसरी चूक आहे. पहिली चूक त्यांना याआधी MCA (Ministry Of Corporate Affairs) चे मंत्रिपद देऊन मोदिजींनी केली होती. अर्थात मुळात त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आणि हि खाती त्यांना देण्यात स्वतः मोदिजींना रस होता कि पक्षाच्या किंवा कुठल्या लॉबीच्या दबावामुळे ती द्यावी लागली ते माहिती नाही.
तसेच पुढील साडेतीन वर्षांत त्यांनी रोजगार निर्मितीवर आणि ते पंतप्रधान होण्यापूर्वीपासून अजूनही अस्तित्वात असलेला भ्रष्टाचार नष्ट करावा आणि देशातील अंमली पदार्थांचा व्यापार आणि विक्री थांबवावी. आणि हो, त्यांचा उत्तराधिकारी होऊ शकेल असा एखादा ताज्या दमाचा नेताही घडवावा.

बाकी कुठल्याच राजकीय पक्षाशी/विचारसरणीशी माझी बांधिलकी नसल्याने २०२४ साली ते रिपब्लिकन पार्टी, बहुजन समाज पार्टी किंवा ओवैसिंच्या MIM पक्षाकडूनही निवडणुकीला उभे राहिले तरी माझे मत त्यांनाच 👆

धन्यवाद.

नीलस्वप्निल's picture

17 Sep 2020 - 2:32 pm | नीलस्वप्निल

मोदीजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

Gk's picture

17 Sep 2020 - 3:00 pm | Gk

शुभेच्छा

प्रसाद_१९८२'s picture

17 Sep 2020 - 3:44 pm | प्रसाद_१९८२

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
--

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाबाबत काहीच शंका नाही. ते मोठे मोठे निर्णय अगदी सहजरित्या घेतात. नोटबंदी, सर्जिकल स्ट्राईक, जिएसटी, कलम ३७०, तीन तलाख किंव्हा मग राम मंदिर असो, वर्षोन वर्षे प्रलबिंत असणारे प्रश्न त्यांनी अवघ्या सहा वर्षात सोडवले. मात्र त्यांना बोलबच्चनगिरी करण्याची वाईट खोड आहे.

नोटबंदीची घोषणा करतेवेळी त्यांनी 'देशातील काळा पैसा नष्ट होईल, दहशतवादी कारवाया संपतील, भ्रष्टाचार व काळाबाजार संपून जाईल व करचुकवेगिरीला आळा बसेल'असे अनेक फायदे नोटबंदी करण्यामागचे त्यांनी सांगितले. मात्र आजघडीला त्यांनी सांगितलेल्या वरिल सर्व गोष्टी जैश्या तैस आहेत.

हिच गत जिएसटीच्या वेळी झाली. आजही राज्य व केंदात जिएसटीच्या पैश्यासाठी मारामारी सुरु असते. त्यांच्या बोलबच्चनगिरीचे अलिकडचे उदाहरण द्यायचे तर लॉकडाऊनचे देता येईल. ऐके दिवशी संध्याकाळी टिव्हीवर अचानक येऊन "मित्रो आज रात आठ बजेसे पुरे देश मे २१ दिन लॉकडाऊन लगने जा राहा है, (इथवर ठिक आहे पण हे पुढचे वाक्य बोलायची काय गरज होती) 'अगर ये २१ दिन के लॉकडाऊन का पालन हमने नहि किया तो देश २१ साल पिछे चला जायेगा" २१ काय १५० दिवसांचा लॉकडाऊन ठेऊन केस कमी झाल्याच नाहीत उलट दिवसागणिक वाढतच आहेत. आरोग्य व्यवस्था उभारुन महिन्या दिड महिन्याने लॉकडाऊन उठवला असता तर आजची परिस्थिती नसती.

चौकटराजा's picture

17 Sep 2020 - 4:50 pm | चौकटराजा

१. त्यांनीच सुरू केलेल्या प्रथेनुसार पुढील निवडणुकीनंतर ते पद न घेता ते सल्लागाराच्या भूमिकेत राहतील काय? त्यांना नातलगांची सोय लावायची नसल्याने चिकटून राहणार नाहीत असे वाटते.
भा ज प मधील अलिखित नियमानुसार नरेन्द्र मोदी हे राजकारणात तून निवृत न होता सत्ताकारणातून निवृती पत्करतील आसे वाटते .याचा अर्थ ते राजकीय मार्गदर्शकाचे काम स्वीकारतील .
२. त्यांच्यानंतर त्यांच्या पक्षात सक्षमपणे देशाचा कारभार कोणता नेता सांभाळू शकेल?
जर एक पायलट अचानकपणे प्रधान मन्त्री होऊ शकतो व शाहाबानू व बोफोर्स असे मुद्दे सोडता अनेकाना दखल घ्यावसा पी एम वाटू शकतो तर भा जपा मधेही असे एखादे तरूण नेत्रुत्व उभे राहू शकेल.

३. पुन्हा भाजपला सत्ता न मिळाल्यास दुसरा कोण पंतप्रधानपद योग्य प्रकारे भूषवू शकेल?

पुन्हा भा ज पा ला सत्ता न मिळणे हे तसे अवघड आहे पण जर आताच्या महाराष्ट्राप्रमाणे स्थिती होऊन जर भा ज प ची गोची झाली तर राहुल गान्धी पी एम होतील.

४. वरील मुद्दा तीन नुसार स्थिती मुळात येऊ शकते का? आणि त्यामुळे त्यांनी केलेले चांगले काम बंद तर होणार नाही ना?

फार मोठा मुर्खपणा करून भा ज पा ने सत्ता गमावावी अशी घोडचूक ते करणार नाहीत. माझ्या मते चान्गले काम म्हणजे ज्युडीशियल रिफॉर्म , इलेक्टोरल रिफोर्म , राजकारणी लोकान्च्या वरील केस साठी खास न्यायालये .ई कार्य्र मोदी ही कामे करणारच नाहीत. त्यान्ची जरी कितीही मनोकामना असली तरी राजकीय लोक ते होऊन देणार नाहीत. पी एम हे पद तसे दुबळे आहे एका अर्थाने !
५. त्यांच्या काय चुका झाल्या असे वाटते आणि उर्वरित साडेतीन वर्षांत कुठले मुद्दे त्यांनी प्राधान्याने हातात घ्यायला हवेत?
नोटबदली ( नोटबन्दी ) ही काही लोकांचे नुकसान करून गेली असे काही म्हंणतात . असे जर आहे तर ती परिणामशून्य नव्हती हे सिद्ध होते. पण त्याने फायदा नक्की काय झाला हे मोदीना अद्याप सिद्ध करता आले नाही.
५ लाखाचे ठेवीना विमा संरक्षण हे काम जरी झाले तरी खाजगी क्षेत्रातील लोकाना पेंशन अगदीच मामुली मिळत आहे .ती देण्यासाठी पी एफ कडे पैसा भरपूर आहे पण सरकारची त्यासाठी काही करायची इच्छा नाही.
शेतीमालाचे चढ उतार याचा त्रास उत्पादक व ग्राहक दोघानाही होतो. सबब कायमस्वरूपी काहीतरी किंमत नियन्त्रण सर्कीट ब्रेकर सारखी यन्त्रणा सरकारने राबविली पाहिजे वा शेतीमालाच्या सर्वच कारभारातून सरकारने लक्श काढून शेतकर्याना पूर्ण स्वातंत्र दिले पाहिजे. फुल लिबरल पॉलिसी.

शुभेच्छा !

नुकतच एक WA फॉरवर्ड आलंय. लोकांच्या प्रकृतीची काळजी असल्याने थोडाच भाग इथे टाकतो.
अधिक रस असल्यास शोध घेणे.

जय नरेन्द्र ग्यान गुन सागर | 
जय मोदी तिहुँ लोक उजागर ||
राष्ट्रदूत अतुलित बलधामा |
दामोदर पुत्र नरेन्दर नामा ||
तुम उपकार राष्ट्र पर कीन्हा |

डीप डाईव्हर's picture

18 Sep 2020 - 12:35 am | डीप डाईव्हर

मोदी चालीसेची झलक आवडली 👍
मी हल्ली whatsapp वापरत नाही, पूर्ण दिली अस्तीत तर बरे झाले असते 😔 आता जालावर शोधून बघतो.

वरती उल्लेख केल्या प्रमाणे काही मिपाकरांच्या प्रकृतीच्या काळजीपोटी येथे सगळा भाग दिला नाही परंतु गोगोलदेवाला शरण गेलात आणि त्याला नेट पॅक चा नैवेद्य दाखवला तर तुमची सगळी माहिती गोळा करण्याच्या बदल्यात तो तुम्हाला "मोदी चालीसा" त्याच्या पोतडीतून काढून देईल.

Gk's picture

17 Sep 2020 - 5:18 pm | Gk

रावणाचा प्राण बेंबीत होता, तिला बाण लागल्यावर तो मेला

370 , 3 तलाक , राम मंदिर ही भाजपाची बेंबी आहे , एकदा हे झाले की भाजपे गडगडणार

सुबोध खरे's picture

18 Sep 2020 - 11:02 am | सुबोध खरे

काय सांगताय?

खरंच कि काय?

कुमार केतकरांनी सांगितलं का?

Gk's picture

18 Sep 2020 - 11:26 am | Gk

गावभर ऑपरेशन लोचट करावी लागत आहेत

नैतर एक हाती सत्ता दिली असती की राज्यात

Gk's picture

18 Sep 2020 - 11:28 am | Gk

महाराष्ट्रात 122 वरून 105 वर आले
युतीची एकूण टोटलही कमीच आली

सागर गुरव's picture

18 Sep 2020 - 12:18 pm | सागर गुरव

आणि मग raul vinci सत्तेत येणार....

मग काय...बटाटेच बटाटे आणि सोनेच सोने....

Gk's picture

18 Sep 2020 - 2:37 pm | Gk

मशीनची किंमत 15 लाख आहे
मोदींना द्यायला सांगा

सुबोध खरे's picture

18 Sep 2020 - 2:44 pm | सुबोध खरे

तुमच्या काँग्रेस वाल्यांना आपला काळा पैसे देशात आणायला सांगा.

प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये येतील.

(मोदी हेच म्हणाले होते)

सागर गुरव's picture

18 Sep 2020 - 2:48 pm | सागर गुरव

बोफोर्स अकाउंट मधून वजा करायला सांगा...

सागर गुरव's picture

18 Sep 2020 - 2:50 pm | सागर गुरव

कमी पडले तर 2G अकाउंट आहेच..

Gk's picture

18 Sep 2020 - 2:53 pm | Gk

2014 पूर्वी मोदींकडे काळ्या पैसेवाल्यांची यादी होती म्हणे
त्यांना पकडायला सांगा

2 जी घोटाळा घडलेलाच नाही ( असे कोर्ट बोलले )

सागर गुरव's picture

18 Sep 2020 - 3:03 pm | सागर गुरव

मग इतक्या कंपन्यांची (टेलिनॉर, एटिसालॅट वगैरे) लायसन्सेस कोर्टाने कँसल का केली म्हणे?

Gk's picture

18 Sep 2020 - 3:15 pm | Gk

कोर्टाने कायतरी केन्सल केले एव्हढ्यावरून कुणीतरी दहा करोड खाल्ले हे सिद्ध होते का ?

सागर गुरव's picture

18 Sep 2020 - 4:09 pm | सागर गुरव

कोर्टाने कायतरी केन्सल केले एव्हढ्यावरून कुणीतरी दहा करोड खाल्ले नाहीत हे तरी सिद्ध होते का ?

शा वि कु's picture

18 Sep 2020 - 4:28 pm | शा वि कु

हि बातमी माहितीपूर्ण आहे.
https://www.indiatoday.in/india/story/2g-spectrum-verdict-what-happens-n...

सागर गुरव's picture

18 Sep 2020 - 4:11 pm | सागर गुरव

कोर्टाने कायतरी केन्सल केले एव्हढ्यावरून कुणीतरी दहा करोड खाल्ले नाहीत हे तरी सिद्ध होते का ?

मुळात कँसल करण्याची परिस्थीती का आली???

Gk's picture

18 Sep 2020 - 4:13 pm | Gk

गुन्हा घडला तर गुन्हा घडला हे सिद्ध करावेच लागते

नुसत्या कुजबूजीवर चालायला कोर्ट म्हणजे रेशीमबाग नव्हे

सागर गुरव's picture

18 Sep 2020 - 4:23 pm | सागर गुरव

गुन्हा करण्यासाठी काहीतरी उद्देश असतोच ना... कोणी टाइम पास करायला गुन्हा थोडीच करतो??

आता गुन्हा झालाच आहे, तर त्याचा फायदा कोणाला तरी झालाच असेल ना...

Gk's picture

18 Sep 2020 - 4:32 pm | Gk

कोर्टच बोलले काही घडले नाही

मोदी , बेदी , रामदेव , अण्णा, केजरीवाल ह्यांना 2 जी नावाचा भास झाला होता

सागर गुरव's picture

18 Sep 2020 - 4:57 pm | सागर गुरव

काही घडलेच नाही, पण काहीतरी करायचं म्हणून लायसन कॅन्सल केली आणि काही जणांना आत घातले....

हा मूळ विडीओ पहा :

Rahul Gandhi's viral video on potato turning into gold was a sarcasm on PM Modi

अशीच बनवाबनवी करुन आणि तुमच्यसरख्यांना उल्लू बनवून हे सत्तेत आले. घटनेला २ वर्ष झाली तरी तुम्हाला पत्ता नाही. सुशिक्षितांची ही परिस्थिती तर अडाण्यांना काय म्हणावं ?

सागर गुरव's picture

18 Sep 2020 - 5:06 pm | सागर गुरव

अज्ञानाचं बोलायच झालं तर १५ लाख मागणार्या अडाण्यांना काय म्हणणार आहात आपण??
जरा त्यांच्यासाठीही आपल्या अगाध ज्ञानाचे ४ थेंब उडवा की..

संजय क्षीरसागर's picture

18 Sep 2020 - 5:24 pm | संजय क्षीरसागर

आधी तुम्ही चुकीची पोस्ट टाकलीये हे मान्य करा. घटनेला २ वर्ष होऊन सुद्धा तुम्हाला विडीओ एडीट केला आहे हे माहिती नव्हतं.

मतदार सतर्क नसेल तर काय लायकीचे सरकार निवडून येणार ?

सागर गुरव's picture

18 Sep 2020 - 5:32 pm | सागर गुरव

१५ लाखाच्या मुद्द्याला बगल देण्याची कला फार चांगली जमली तुम्हाला...

संजय क्षीरसागर's picture

19 Sep 2020 - 12:21 pm | संजय क्षीरसागर

तुमचा आलू-सोना प्रतिसाद आजही तुमचं अज्ञान दर्शवतो आणि अशाच बनवाबनवीतून सरकार सत्तेवर आलं हे उघड होतं.

सागर गुरव's picture

19 Sep 2020 - 12:32 pm | सागर गुरव

चमच्यांचे १५ लाखांबद्द्लचे प्रतिसाद ज्ञानाचा फार मोठा उजेड पाडतात नाही का?? त्या बनवाबनवीबद्द्ल तुमच्या प्रतिसादातुन चकार शब्द निघत नाही यातही बरंच काही उघड होतं.

सुबोध खरे's picture

19 Sep 2020 - 2:37 pm | सुबोध खरे

अहो आपटर्ड लोकांचं असंच आहे!

मोदींचे स्वच्छ भारत अभियान विफल करण्यासाठी रस्त्यावर टमरेल घेऊन बसणाऱ्या लोकांबद्दल का चिंता करताय?

संजय क्षीरसागर's picture

19 Sep 2020 - 3:42 pm | संजय क्षीरसागर

जरा तारतम्य बाळगा.

तुमच्यात खरंच हिंमत असेल तर मी वर स्पष्टीकरणार्थ दिलेला विडीओ (जो बिजेपीनी प्रचारात निर्लज्जपणे वापरला) तो खोटा आहे हे सिद्ध करा.

सुबोध खरे's picture

19 Sep 2020 - 7:07 pm | सुबोध खरे

विषय काय आणि लिहिता काय ?

श्री मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा धागा आहे.

सज्जन पणे श्री मोदींना या धाग्यावर शुभेच्छा द्यायच्या ऐवजी त्यात तुम्ही आपल्या द्वेषाच्या विषाची गरळ ओकताय वर मलाच विचारताय कि धागा कोणता?

हे केवळ "अरे ला का रे" उत्तर आहे एवढेही समजेनासे झाले, इतका द्वेष?

निश्चलनीकरणाचा फटका जरा जोरात बसलेला दिसतोय?

संजय क्षीरसागर's picture

19 Sep 2020 - 7:17 pm | संजय क्षीरसागर

मोदींच्या वाढदिवसाला तुम्ही पंचारती ओवाळा.

आधी जो विषय चालू होता त्यामधे तुम्ही नाहक पडलात आणि आता पाचर बसल्यावर नेहेमी सारखे काहीही मुद्दे चालू केले.

सुबोध खरे's picture

19 Sep 2020 - 7:20 pm | सुबोध खरे

मोदींच्या वाढदिवसाला तुम्ही पंचारती ओवाळा.

वाढदिवसाला पंचारती ओवाळणे हि तर आपली संस्कृतीच आहे. त्यात नवे ठेवण्यासारखे काय आहे बुवा?

पण वाढदिवसाच्या दिवशी उखाळ्या पाखाळ्या काढणे आणि दूषणे देणे हि नक्कीच आपली संस्कृती नाही.

घाव वर्मी बसलेला दिसतोय.

सुबोध खरे's picture

19 Sep 2020 - 7:21 pm | सुबोध खरे

मोदींच्या वाढदिवसाला तुम्ही पंचारती ओवाळा.

वाढदिवसाला पंचारती ओवाळणे हि तर आपली संस्कृतीच आहे. त्यात नवे ठेवण्यासारखे काय आहे बुवा?

पण वाढदिवसाच्या दिवशी उखाळ्या पाखाळ्या काढणे आणि दूषणे देणे हि नक्कीच आपली संस्कृती नाही.

घाव वर्मी बसलेला दिसतोय.

संजय क्षीरसागर's picture

19 Sep 2020 - 7:32 pm | संजय क्षीरसागर

तो तुमचा प्रष्ण आहे.

इथे ज्या आलू-सोना विडीओवर चर्चा आहे त्यावर बोला.

Gk's picture

19 Sep 2020 - 7:49 pm | Gk

वाढदिवसाच्या दिवशी दूषणे देण्याची पद्धत गांधी नेहरू विरोधकांनीच सुरू केली , आता 2 ओकतोबर आणि 14 नोव्हेम्बर येतीलच

ह्यांच्या स्वतःच्या कुणाचातरी बर्डे 1 एप्रिलला आहे , पण ते कधी तो साजरा करत नाहीत

आणि गांधी नेहरूंच्या केकवर मारायला मात्र तत्पर असतात

मोदींच्या बर्डेला हेच सगळे पेरलेले उगवून आले

Gk's picture

19 Sep 2020 - 5:20 pm | Gk

https://www.hindustantimes.com/india-news/no-water-in-60-toilets-built-u...

60 % टॉयलेंटात पाणी नाही

सुबोध खरे's picture

19 Sep 2020 - 7:03 pm | सुबोध खरे

मोगा खान

The government provides an incentive of ₹12,000 (US$170) for each toilet constructed by a rural family

घरी शौचालय बांधण्यासाठी पैसे दिले. आता पाणी आणण्यासाठी पण पैसे सरकारनेच द्यायचे?

सत्तर वर्षात सर्व काही सरकारनेच फुकट पुरवायची सवय काँग्रेसने लावली आहे याचा हा परिणाम.

मुली स्त्रियांना साधे सॅनिटरी नॅपकिन बदलायला आडबाजूला जायला लागत असे. शौचाला जाण्यासाठी अंधार पडण्याची वाट पाहावी लागत असे. आणि ते सुद्धा बलात्कार अत्याचार होऊ नये म्हणून तीन चार बायकांनी एकत्र जायला लागायचे.

हे फायदे तुमच्या कडून डॉक्टर असून एकदाही कधी उच्चारले गेले नाहीत.

केवळ द्वेष करायचा ठरवले तर त्याचा परिणाम स्वतःच्या शरीरावर आणि मनावर पण होतो एवढे लक्षात ठेवा.

Gk's picture

19 Sep 2020 - 7:45 pm | Gk

पाण्याची व्यवस्था नसताना सेफ्टी संडास बांधून देणे हे म्हणजे एनेस्थेटीस्ट अजून आलेलाच नसताना सर्जनने हातभार पोट फाडून ठेवण्यासारखे आहे

आता पेशन्ट विव्हलणार तर तुम्ही म्हणणार सर्जनची काय चूक ? सर्जन तुमचा लाडका आहे

सागर गुरव's picture

19 Sep 2020 - 7:55 pm | सागर गुरव

संडासच्या पाण्याची व्यवस्था करणे हे केंद्र सरकारचे काम आहे असा शोध लावल्या बद्द्ल Gk काकांचे अभिनंदन....आणि १ चमचा पाण्याची भेट....

नेशनल रुरल ड्रिंकिंग वोटर सप्लाय स्कीम केंद्र सरकारही चालवते

( MBBS च्या पी एस एम च्या पुस्तकात यादी असते अशा स्कीमची)

आता म्हणशील , संडासाच्या पाण्याचा विषय आहे म्हणून.

भारतात सगळ्या प्रकारच्या पाण्याला एकच कनेक्शन असते

प्यायला वेगळे , कमोडला वेगळे हे मालदीवमध्ये मी पाहिले आहे , इथे एकच कनेक्शन असते

सागर गुरव's picture

19 Sep 2020 - 8:34 pm | सागर गुरव

आणि ते कनेक्शन देण्याची जबाबदारीही फक्त केंद्राचीच का?
मग महापालिका वगैरे काय काम करतात?? फक्त जेसीबी घेउन तोडकाम??

स्थानीक स्वराज्य संस्था नावाचा काही विषय शिकला की नाहीत तुमच्या डिग्र्या मिळवताना??

भारतात सगळ्या प्रकारच्या पाण्याला एकच कनेक्शन असते

प्यायला वेगळे , कमोडला वेगळे हे मालदीवमध्ये मी पाहिले आहे , इथे एकच कनेक्शन असते

ऑ....पण मी तर भारतातच, महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यात राहतो. आमच्या बिल्डीन्गीत तरी प्यायला वेगळे आणि कमोडला वेगळे पाणी येते बुवा. महाविकास आघाडी सरकारने आमचा भाग मालदीव मधे नेऊन ठेवला कि काय आता? जाणता राजा काहीही करू शकेल बुवा! लई पावरबाज माणूस हाये त्यो!

Gk's picture

19 Sep 2020 - 10:49 pm | Gk

सोसायटीला नगरपालिका एकच कनेक्शन देते , त्यातून शुद्धच पाणी देते

आता सोसायटी इतर वापरायला तेच पाणी टाकीत साठवून ठेवते
आणि पुरवते आणि प्यायचे पाणी मात्र पालिकेच्या वेळेतच बेसिनच्या नळातून तुम्ही घेत असणार , सोसायटीही तेंव्हाच आपली टाकीही भरून घेत असणार

किंवा अजून कायतरी यंत्रणा असेल , पण 2 प्रकारचे पाणी नगरपालिका पुरवत नाही

Gk's picture

26 Sep 2020 - 12:01 pm | Gk

Public sector units claimed to have constructed 1.4 lakh toilets in government schools as part of a Right to Education project, but almost 40% of those surveyed by the Comptroller and Auditor General of India (CAG) were found to be non-existent, partially constructed, or unused. In an audit report presented in Parliament on Wednesday, the CAG said over 70% did not have running water facilities in the toilets, while 75% were not being maintained hygienically

https://www.thehindu.com/news/national/40-of-toilets-surveyed-by-cag-in-...

**

मराठवाडा मुक्ती दिनाच्या सुद्धा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

संजय क्षीरसागर's picture

18 Sep 2020 - 3:03 pm | संजय क्षीरसागर

१. Modi took birth twice – first on 29th August 1949 (on his degree) and second on 17th September 1950 (available in public domain).

२. He sold tea at the age of 6 years in Vadnagar railway station, But Vadnagar only had tracks passing through it. The actual railway station was built in 1973, when Modi was 23 years old.

३. He was underground during emergency but did his graduation from Delhi University in 1978. Before his degree in 1978 and even 10 years thereafter, degrees were hand written by the University staff. The font that was patented by Microsoft in 1992, was used to print his degree in 1978. His degree was printed on a Sunday, when offices were closed.

४. He did Masters of Entire Political Science from Gujarat University in 1983 without the graduation certificate from Delhi University.

५. He took admission in the Masters’ of Entire Political Science degree alone, gave the exam alone, and took the degree alone. So far, no student or professor has claimed to have studied with Modi.

आणि मोदीजींच्या एमए असल्याचा हा उघड पुरावा > लिहून दिलेल्या कागदावरचं स्पेलींग वाचतायंत Modi Spells Strength as 'STREANH.

अर्धवटराव's picture

18 Sep 2020 - 8:07 pm | अर्धवटराव

झोपलेला समाज, झोपल्याचं सोंग घेतलेल्या अधिकारी वर्ग, स्वतः मुद्दाम जागरण करुन दुसर्‍याच्या आरामाचं मातेरं करणारे उपटसुंभ, आणि सीमेच्या आतुन-बाहेरुन देशाला पोखरणारे वाळवी सदृश जीव.. या सर्वांना आवष्यक ति मात्रा आवष्यक त्या प्रमाणात देण्याचं शहाणपण दाखवणारा नेता भारताला योग्य वेळी लाभला.

थँक्स मोदिजी.
जीवेत शरदः शतम्

सुबोध खरे's picture

19 Sep 2020 - 2:39 pm | सुबोध खरे

आपल्या अतिशय लायक उमेदवाराला केवळ 750 मते मिळाली हे पाहून काही लोकांची फार म्हणजे फारच जळजळ होते आहे.

सुबोध खरे's picture

19 Sep 2020 - 2:39 pm | सुबोध खरे

आपल्या अतिशय लायक उमेदवाराला केवळ 750 मते मिळाली हे पाहून काही लोकांची फार म्हणजे फारच जळजळ होते आहे.

सुबोध खरे's picture

19 Sep 2020 - 2:40 pm | सुबोध खरे

आपल्या अतिशय लायक उमेदवाराला केवळ 750 मते मिळाली हे पाहून काही लोकांची फार म्हणजे फारच जळजळ होते आहे.

Gk's picture

19 Sep 2020 - 7:01 pm | Gk

#ऑगस्टावेस्टलैंडहेलीकॉप्टर
नरेंद्र मोदी ने 2018 में अगस्ता वेस्टलैंड मामले में क्रिश्चियन मिशेल के भारत प्रत्यर्पण के वक्त कहा था कि 'राज़दार आ गया है अब सारे राज़ खुलेंगे'......

उस वक्त मिशेल के प्रत्यर्पण को ऐसे प्रस्तुत किया गया था जैसे कि उसके बोलते ही सोनिया गाँधी ओर राहुल गाँधी जेल में होंगे.....….

सीबीआई ने आज अगस्ता वेस्टलैंड वीवीआईपी हेलीकॉप्टर घोटाले में सप्लीमेंटरी चार्जशीट दाखिल कर दी है इस चार्जशीट में एक भी नेता का नाम शामिल नहीं है।

( Girish Malviya )
#vss
https://www.jansatta.com/national/cbi-files-supplementary-chargesheet-in...

भक्तो ताली बजाव

कोहंसोहं१०'s picture

19 Sep 2020 - 7:31 pm | कोहंसोहं१०

आपल्याकडे एक म्हण आहे - हाथी चले बाज़ार कुत्ते भोके हज़ार
हजारो भुंकणाऱ्यांकडे लक्ष न देता ज्या अविरतपणे मोदी देशसेवा करत आहेत त्याबद्दल त्यांचे आभार आणि त्यांना दीर्घायु लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

Rajesh188's picture

19 Sep 2020 - 8:43 pm | Rajesh188

देशाचे राजकारण ज्या प्रश्नावर अखंड चालू शकते ते प्रश्न भिजत ठेवण्याची काँग्रेस ची रित मोदी सरकार नी बंद केली
१,) काश्मीर प्रश्न
हा असा प्रश्न जो पाकिस्तानी आणि भारतीय राजकारण्यांना खूप उपयोगी पडतो ..
हा प्रश्न देशातील सर्व प्रश्न विसरायला लावतो.
370 रद्द करून आणि काश्मीर चे विभाजन करून हा प्रश्न पुढे भविष्यात सौम्य होवून संपुष्टात येईल..
हिंदू चे काश्मीर मध्ये स्थलांतर होत जावून धार्मिक समतोल निर्माण झाला की स्थानिक पातळीवर पाकिस्तानी सैन्य ला मदत मिळणार नाही.
2) राम मंदिर हा प्रश्न नव्हताच पण त्याला गंभीर स्वरूपाच्या प्रश्नात रूपांतर केले गेले तो भिजत ठेवला असता तर राजकारणी लोकांना जन्म भर निवडणूक जिंकायला दुसऱ्या मुद्धा ची गरज लागली नसती.
पण तो प्रश्न मोदी सरकार नी निर्णायक पने सोडवला.
3) तीन तलाक विषयी कायदा करून मुस्लिम स्त्रिया वरील अन्याय दूर केला..
ही तीन महत्वाची काम मोदी सरकार नी केली.
पण आर्थिक बाबतीत मोदी सरकार साफ
अपयशी ठरले.
बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली.
देशाची अर्थ व्यवस्था कधी नाही एवढी घसरली.
आर्थिक स्तरावर हे सरकार पूर्णतः अपयशी ठरले.
उत्तम अर्थ मंत्री न मिळणे हे कारण असावे किंवा.
उद्योग पती नी जी bjp ची पाठराखण केली होती त्याची परतफेड करण्यासाठी मोदी नी ठाम निर्णय घेतले नसावेत.

शाम भागवत's picture

19 Sep 2020 - 9:47 pm | शाम भागवत

आपण गेली ५० वर्षे भारतातील शेवटच्या गरीबापर्यंत बँकसुविधा देण्यासाठी मनापासून प्रयत्न करत होतो. पण वाढत्या लोकसंख्येमुळे कायम ३० कोटी लोक बँकसुविधेपासून लांब रहावयाचे.
हे काम मोदींनी २ वर्षात पूर्ण केले. याचे महत्व अजून लोकांच्या लक्षात आलेले नाही. पण २०-२५ वर्षांनी हा एक मैलाचा दगड समजला जाईल.
“₹१ मधले फक्त १४ पैसे लाभार्थींपर्यंत पोहोचतात.” या राजीव गांधींच्या सुप्रसिध्द वाक्यावर हा खऱ्या अर्थाने रामबाण उपाय आहे. मोदींच्या काळात लाभार्थींना मिळणऱ्या १४ पैशांत वाढ होण्याची शक्यता मला जास्त वाटते. सोनिया गांधी, राहूल गांधी, ममता बॅनर्जी वगैरेंच्या कारकिर्दीत हे होऊ शकणार नाही असेही वाटते.

हीच अपेक्षा माझी देवेंद् फडणवीस यांचेबाबत आहे. इतरांकडून ती पुरी होणे अशक्य वाटते. अपवाद फक्त पृथ्विराज चव्हाण यांचा. पण त्यांना बहुमत मिळणे अवघड व पक्षश्रेष्ठींकडून पूर्ण स्वातंत्र्य मिळणे अवघड.

मोदींनी २०२४ ची निवडणुक लढवावी. पहिल्या ३ वर्षात उत्तराधिकारी निवडून त्याला उपपंतप्रधान बनवून तयार करावे. त्यानंतर होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीतून राष्ट्रपती बनावे.

Gk's picture

19 Sep 2020 - 10:18 pm | Gk

फडणवीस म्हणजे डाळ प्रकरणात शोभा झालेल्यांचे कोण म्हणे ?

जनधन योजना काढून अकाउंट काढले तरी अशा कोणत्या योजना आहेत ज्यात डायरेक्त पैसे मिळतात ?

आणि मग काँग्रेस असे पैसे वाटत होती तर म्हणे करदात्यांचे पैसे बरबाद होत होते म्हणे

शाम भागवत's picture

20 Sep 2020 - 12:44 am | शाम भागवत

फडणवीस म्हणजे डाळ प्रकरणात शोभा झालेल्यांचे कोण म्हणे ?

पुतणे.

या फडणवीसबाई महाराष्ट्रात शिवसेना + भाजप सरकारात पुरवठा मंत्री होत्या. त्यांना रेशनिंगमधे कसा भ्रष्टाचार होतो हे साधारण माहीत होते. मंत्री झाल्यावर त्यांनी अभ्यास करून अशी एक पध्दत तयार केली की, त्यामुळे कोणाला भ्रष्टाचार करताच येऊ नये. त्यामुळे हितसंबंधीयांचे धाबे दणाणले. या नवीन पध्दतीने डाळ घोटाळा झाल्याचा बिनबुडाचा आरोप त्यांचेवर केला गेला. एका वर्तमानपत्राने केलेला आरोप बाकी वर्तमानपत्रांनी उचलून धरला. त्यावेळी सोशल मिडिया वगैरे काही नव्हते.

मग एक मखलाशी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांकडून बाईंना असे सांगण्यात आले की, आपण न्यायालायीन चौकशी करू. त्यात तुम्ही निरपराध ठरणार हे नक्कीच आहे. पण सरकारची प्रतिमा मलीन होत आहे. तेव्हा तुम्ही तो कोर्टाचा निर्णय होईपर्यंत राजीनामा द्या. बाईंनी राजीनामा दिला. भ्रष्टाचार चालूच राहीला.

२० वर्षांनी खटल्याचा निकाल लागला. कोर्टाने बाईंना नुसते निर्दोष सोडले नाही तर कोर्टाने बाईंची तारीफ केली. निकालपत्रात स्पष्टपणे म्हटले की, बाईंनी सुचवलेली योजना परिपूर्ण आहे. ही जर अंमलात आणली तर भ्रष्टाचार होऊच शकत नाही. ही योजना फक्त महाराष्ट्रात नव्हे तर देशभर लागू केली जावी.

बाईंना मंत्रीपदाचा राजीनामा जरूर द्यावा लागला. पण बदल्यात पुतणा मुख्यमंत्री बनला आणि त्याने पाच वर्षे पूर्ण की हो केली.

ही जुनी गोष्ट तुमच्यामुळे मला मांडता आली तसेच डाळ प्रकरणात कोर्टाने बाईंच्या चांगल्या कामाची प्रशंसा करून त्यांच्यावरचा कलंक पुसला हेही मांडता आले याबद्दल तुम्हाला धन्यवाद.

🙏

बाप्पू's picture

20 Sep 2020 - 4:34 am | बाप्पू

धन्यवाद शाम भागवत..
आपण सांगितलेली गोष्ट बऱ्याच राजकारणी लोकान्कडून ऐकली आहे.

बाकी आता मोगाभाऊ काही प्रतिसाद देणार नाहीत कारण त्यांना फक्त काडी टाकून मजा बघण्यातच जास्त रस असतो..

Gk's picture

20 Sep 2020 - 6:47 am | Gk

कायच्या काय.
घोटाळा 1997 सालचा ना ?

वीस वर्षांनी म्हणजे 2017 ला कोर्टाचा निकाल लागला का ? कोणत्या कोर्टाने निकाल दिला ?

देशासाठी आजवरचे सर्वाधिक उपयुक्त ठरलेले लोकनेते, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना, त्यांच्या वाढदिवसानिमित्त दीर्घायुरारोग्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

जय जवान जय किसान

जय जवान जय किसान जय विज्ञान

||जय जवान जय किसान जय विज्ञान जय श्रीराम ||

चौकटराजा's picture

20 Sep 2020 - 10:10 am | चौकटराजा

आपण कोणी तारणहार आहोत अशी मोदी यांनी स्वतः:ची प्रतिमा अनावश्यकपणे निर्माण केली ही त्यांची खूप मोठी चूक झाली आहे. भारत देशात खास करून पी एम हे पद भारताचे सर्वेसर्वा पद आहे वा भारताची राज्यघटना डॉ आंबेडकर यांनी एकहाती लिहिली आहे हे दोन मोठे गैरसमज आहेत . त्यामुळे काही चांगले झाले की पी एम पदाचा उदोउदो करायचा , आंबेडकरांना देवाच्या पातळीला नेऊन सोडायचे वा काही विपरीत घडले की या दोन्ही गोष्टीबद्दल नापसंती व्यक्त करायची असा खाक्या भारतीय जनतेचा दुर्दैवाने आहे.

भारत देशाची प्रमुख समस्याच लोकशाही व लोकसंख्या ही आहे . काही विद्वान लोक ह्या दोन गोष्टी भारताची बलस्थाने आहेत असे मानतात. स्वातंत्र्य आधी की समाजसुधारणा आधी असे वाद पूर्वी झाले आहेतच . त्यासाठी काही वर्षे तरी लोकशाहीचे विसर्जन हा मार्ग आहे जरी ती जगातील एक उत्तम राज्यपद्धती असली तरी . भारताचे आर्थिक प्रष्ण २००० वर्षाचे जुने आहेत. ते असे एकाएकी संपणारे नाहीत. भारत व चीन यांची लोकसंख्या फार पुर्वीपासूनच अतिरिक्त आहे हे सत्य नाकारता येत नाही.

आता काळानुसार हिंदू मुसलीम संघर्ष वगरे कमी झाले असले तरी वर्ग संघर्ष वाढले आहेत. आर्थिक निकषावर आरक्षण झाले नाही ही सर्वात मोठी घोडचूक भारत देशाने केली आहे ! तिचा गुंता आता सोडवणे ब्रह्मदेवालाही शक्य नाही ! आर्थिक वाटचालीत सरकार हा एक फक्त अनेक खेळाडूपैकी एक खेळाडू असतो हे अर्थशास्त्राचे मूळ तत्वच भारतातील कित्येकाना मान्य नाही ना राजकारण्यांना , ना नोकरशाहीला , ना उद्योगपतींना , ना कामगारांना , ना सामान्य लोकांना ! त्यामुळे मी आता काहीतरी जादू करून भारताला कसे सामर्थ्यवान करतो पहा अशी दर्पोक्ती पी एम पदावरून केली गेली आहे. इथे इतके अंतरविरोधी गट आहेत की लोकशाहीत एकाचा उद्धार करावा तर दुसरा गट तुमचा उद्धार करायला मोकळा.कामगार लोकांबरोबर उत्तम पगाराचे करार करून आर्थिक विषमता दूर करणारे उद्योजक , कार्यक्षम कर्मचारीव कामगार ,कायद्याचे पालन करणारे राजकारण्याच्या दबावाखाली ना येणारे नोकरशहा , पैसे ना बुडविणार्या बँका ,राजकारण हे करियर आहे पण धंदा नव्हे हा फरक समजणारे लोकप्रतिनिधी देव व धर्म या कल्पना आहेत पण जोपर्यंत जगात सर्व देश एकत्र येत नाहीत तोवर तरी राष्ट्र हे एक वास्तव आहे हे स्वीकारणारे सामान्या जन या साऱ्या मानासिक समस्या आहेत .त्या एखादा पी एम काय सोडवणार कप्पाळ ?

शाम भागवत's picture

20 Sep 2020 - 10:44 am | शाम भागवत

कुठलीच जुनी समस्या सुटत नाहीये का?
समस्या फक्त वाढतच चालल्या आहेत का?
माझ्या हयातीतच सगळ्या समस्या सुटल्या पाहिजेत असं काही बंधन स्वत:वर घालून घेतले आहे का?

मी फक्त कुतूहल म्हणून विचारतो आहे. तुमच्या प्रामाणिकपणावर तसेच भारतावरच्या प्रेमावर शंका अजिबात घेत नाहीये.

चौकटराजा's picture

20 Sep 2020 - 11:18 am | चौकटराजा

प्रत्येकाला दोन पातळीवर समस्या असतात . एक व्यक्तिगत व एक सामाजिक .व्यक्तिगत पातळीवरच्या समस्या आपण एक तर स्वतः:ची प्रगती करून सोडवू शकतो किंवा आहे ही प्रगती हीच समाधानकारक आहे असे आपण अध्यात्म मांडू शकतो . आपली परिसराविषयी किती संवेदना जागृत आहे याचा एक जन्मजात संस्कार आपल्यावर असतो . काही वेळेस ही संवेदना चांगल्या माणसांच्या सहवासाने देखील येते. उदा घ्यायचे झाले तर बिल गेटस यांचे घ्या. त्यांच्या वयक्तिक काही समस्यां नाहीत पण सम्वेदनाशील मनामुळे त्यांच्यापुढे सामाजिक समस्या मात्र नक्कीच आहेत. अगदी हीच स्थिती काही लहानशा पातळीवर माझी आहे. याचे संवेदनेतून अभय बंग ,प्रकाश आमटे या सारखे वेडे घडतात . भारत देशात समस्या सोडविल्या जात नाहीत असे नाही. नेहरू म्हणत माझ्या समोर ४० कोटी समस्या आहेत . समस्या या सर्वच जगात सर्व च सरकारे सोडवीत असतात . वीज, पाणी . आरोग्य ,दळणवळण या समस्या भारतात सोडविण्याचे प्रयत्न खचितच चालू आहेत. मानसिकतेचे काय ? बाकी मी आणि माझे कुटूंब हाच जगाचा आरंभ व शेवट असे मानणारे जगात काय कमी आहेत ...... ?

चौकटराजा's picture

20 Sep 2020 - 11:45 am | चौकटराजा

भारताचे आर्थिक प्रष्ण २००० वर्षाचे जुने आहेत. ते असे एकाएकी संपणारे नाहीत. हे वाक्य वर आलेच आहे !

चीन चे आकारमान भारताच्या तिप्पट आहे.
आकारमानाचा विचार केला तर भारताची लोकसंख्या जगात सर्वात जास्त आहे.
अमेरिका सारखा देश भारताच्या 7 पट मोठा आहे आणि लोकसंख्या यूपी आणि बिहार ची मिळून आहे तेव्हढीच असेल.
पाकिस्तान उत्तर प्रदेश पेक्षा आकारानं तीपटी पेक्षा जास्त मोठा आहे लोकसंख्या आहे 20 कोटी आणि उत्तर प्रदेश ची 22 कोटी.

लोकसंख्या हाच भारता समोरील सर्वात मोठा प्रश्न आहे.

चौकटराजा's picture

20 Sep 2020 - 11:29 am | चौकटराजा

एकदा जरी आठ दिवस आपण परदेशी जावून आलो की आपल्याला डोंबिवली वा कल्याणासारख्या पुण्यासारख्या शहरातील भेसूर दाटीची भीती वाटायला लागते. योगायोगाने ( योगायोग कसला डोस्क्याचा म्हणा ) हीच शहरे करोनाची माहेरघर झाली आहेत. चीनचे आकारमान भारतापेक्षा मोठे तर आहेच पण कुणालाही कितीही पोरे निर्माण करायची मुभा नाही हे तेथील वास्तव आहे ! भारतात रस्त्यावर जे लोक झोपून भटके जीवन कंठतात त्यांना बहुतेकाना तीन ते चार पोरे असतात . याचा शरीर संबंध ते कुठे करीत असतील याचा ही प्रश्न पडावा ..!! आज माझा कयास इथेच लिहून ठेवतो .. अकटोबर अखेर भारत जगातील सर्वात जास्त करोना ग्रस्त देश असेल हे नक्की .करोना झाला तरी जगायची शक्यता आहे पण उपासमार झाली तर कोण जगवील या प्रष्णाचे मूळ लोकसंख्येतच आहे !

विकास ची गंगा उलटी वाहत आहे काही दशकं पासून असे वाटत नाही का?
जगात इंडस्ट्रियल क्रांती झाली आणि विकासाची फळ सर्वच देशात पडली.
त्या मुळे तेव्हा वीज नव्हती आज वीज आहे.
असला प्रतिवाद नको.
जगातील प्रत्येक देशाची च फरकाने प्रगती झाली त्याला भारत अपवाद नाही.
विकासाची गंगा उलटी वाहत आहे ह्याची काही उदाहरणे.
1) 80 ते 90 च्या दशकात महाराष्ट्र मध्ये सहकारी दूध डेअरी,साखर कारखाने, गुळ उत्पादन हे उद्योग जोरात होते.
आज काय अवस्था आहे .
दूध डेअरी,साखर कारखाने, गूळ उत्पादन हे सर्व उद्योग गैर कारभाराचे शिकार बनून अत्यंत कमजोर झाले आहेत.
2) एक काळ असा होता की st महा मंडळ,मुंबई ची बेस्ट सेवा सर्वोत्तम अवस्थेत होत्या आज त्यांची अशी अवस्था आहे की कधी ही बंद होतील.
3) काही दशकं पूर्वी नद्या स्वच्छ होत्या,जमिनी मधील पाणी प्रदूषण विरहित होते आणि मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होते.
आज काय अवस्था आहे.
नद्या , नाले प्रदूषित झाले आहेत.कारखान्यातून निघणारे विषारी रसायने पाण्यात सोडली जात आहेत,शहरांचे सांड पणी काहीच प्रक्रिया न करता नदीत सोडले जात आहे.
देशातील जवळ जवळ सर्व नद्या प्रदूषित झाल्या आहेत.
काही वर्षातच शुद्ध पाणी मिळणे ही समस्या निर्माण होवू शकते.
4) धरण आणि कालवे निर्माण करून जमीन पाण्या खाली आणली गेली .शेतीला 24 वीज काही दशकं पूर्वी उपलब्ध होती आज काय अवस्था आहे.
कालवे धरण ह्यांची दुरुस्ती नाही.पणी वाया जात आहे,वीज फक्त 12 तास तीन पण रात्रीच उपलब्ध आहे.
ह्या क्षेत्रात नवीन असे काहीच काम झाले नाही.
उद्याही system कधी ही अडचणीत येवून शेतीला पाणी पुरवठयासाठी कठीण होवून जाईल.
5) काही दशकं पूर्वी नोकऱ्या उपलब्ध होत्या,नोकरी लागल्या नंतर ती टिकण्याची शास्वती होती,कंत्राट पद्धत नव्हती .
कामगार हे कंपन्या नियुक्त करायच्या आणि त्यांना सर्व सुविधा दिल्या जायच्या
आज काय अवस्था आहे.
1 जागे साठी 1000 लोक उपलब्ध आहेत.
कामगार ना कंपन्या नियुक्त करत नाहीत कंत्राट दिले जाते.
तिथे नोकरी ची शास्वती नाही ,किमान वेतनाची शास्वती नाही.
६) काही दशकं पूर्वी शिक्षण हे स्वस्त होते ,सरकारी शाळा कॉलेज ह्यांचा दर्जा उच्च होता.
अगदी अती उच्च शिक्षण सुद्धा बौद्धिक क्षमतेवर कमीत कमी पैशात मिळत होते.
टक्के वारी चा फुगा फुगवलेले नव्हता.
आज काय अवस्था आहे सरकारी शाळा ,कॉलेज शेवटची घटका मोजत आहेत.
अगदी kg साठी पण हजारो रुपये लागत आहेत.
उच्च शिक्षण हे फक्त पैसे असतील तरच होवू शकतात.
खर्च वाढला पण शिक्षणाचा दर्जा काय आहे.
तो घसरत चालला आहे.
उत्तम दर्जा चे विद्यार्थी निर्माण च होत नाहीत.
7) एक्स्प्रेस वे झाला काही दशकं पूर्वी आणि मुंबई आणि पुणे,सातारा हा प्रवास जलद झाला.
आज काय अवस्था आहे विविध ठिकाणी अर्धवट काम सोडून दिली आहेत,रडते भयंकर खराब आहेत.
8) लोकसंख्या चा विस्फोट झाला आहे,खेड्या तून शहरात स्थलांतर खूप वाढले आहे.
काही दशकं पूर्वी मुंबई सारखे शहर नितांत सुंदर होते त्याची आज अवस्था काय आहे.
पुण्याची अवस्था काही दशकं पूर्वी आणि आज काय आहे.
बकाल झाली आहेत शहर.
काही ml पावूस शहरांना पाण्यात बुडव त आहे.
खूप आहे संगण्या सारखे.
ही सर्व उदाहरणे बघून विकासाची गंगा परत उलटी वाहत आहे असे का म्हणू नये.?

चौकटराजा's picture

20 Sep 2020 - 1:19 pm | चौकटराजा

विकास ची गंगा उलटी वाहत आहे काही दशकं पासून असे वाटत नाही का?
जगात इंडस्ट्रियल क्रांती झाली आणि विकासाची फळ सर्वच देशात पडली.
त्या मुळे तेव्हा वीज नव्हती आज वीज आहे.
असला प्रतिवाद नको.
मी अगदी हेच म्हणणार होतो ! सांप्रत मी अनेक देशांचे प्रवासाचे व्हिडीओ एकामागून एक पाहात आहे. त्यात असे जाणवते की परदेशात गुन्हेगारी नाही असे नाही पण सामान्य लोकात भारतासारखी बेशिस्त नाही. एकदा ओव्हर ब्रीज बांधा व दहा वर्षात मेट्रो साठी पाडा असा प्रकार नाही ! विकासात गैरव्यवस्थापन हे भारत देशाचे पेटंट ठरावे ! फुटपाथ असेच बांधायचे की लोकांना त्यातील टाईल्स चोरी करून नेता याव्यात. पूल असेच बांधावेत की ते पडावेत . कारखाने असेच बांधावेत जे केमिकल्स नदीत सोडतील . अशीच वीज व्यवस्था असावी जीमध्ये भूमिगत वायर असूनही चार चार तास वीज जावी. रस्ते असेच बांधावेत जे एकाच मोसमात उखडतील ,त्यावर स्पीड ब्रेकर असेच बांधावेत ज्यायोगे वेग कमी होईल पण पाठदुखी वाढीस लागेल. बागा अशा बांधाव्यात जिथे कारंजी बंद पडून पालापाचोळा साठलेला असेल. पूल असे बांधावेत ज्याखाली पार्किंग ना करता कोणीही दुकाने थाटायला मुभा मिळावी . यादी मोठी आहे ...... असे बारीक सारिक गोष्टी सामान्य माणसाला जाणवतात या मन की बात मध्ये का येत नाहीत याचे दु:ख आहे !

Rajesh188's picture

20 Sep 2020 - 1:22 pm | Rajesh188

जीवनास अत्यंत आवश्यकता असलेले घटक.
हवा, पाणी,आणि जमीन.
हवा.
देशातील हवेच्या प्रदूषणाची पातळी सतत वाढत आहे सरकार ठोस पावले उचलत नाही.
पाणी.
जलस्रोत कमी होत आहेत जी काही उपलब्ध आहेत त्यांचे प्रदूषण करणे चरम सीमेवर आहे.
काही दिवसांनी जलस्रोत उपलब्ध च राहणार नाहीत.
जमीन.
नापीक बनत चालली आहे, माती मध्ये अत्यंत घातक रसायने मिसळत आहेत.
काही वर्षांनी त्या जमिनी ची उपजावू ताकत
पूर्ण नष्ट होवू शकते..
ह्या तिनी क्षेत्रात तरी सरकार नी खंबीर आणि ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे.

शाम भागवत's picture

20 Sep 2020 - 2:31 pm | शाम भागवत

मस्त.
मोदींकडून लोक अपेक्षा करताहेत हे पाहून बरं वाटल.

🙂

२०१४ पर्यंत वाट पाहूया.

चौकटराजा's picture

20 Sep 2020 - 3:10 pm | चौकटराजा

२०१४ पर्यंत वाट पाहूया..........? विकासाची गंगा उलटी करायची का शामराव ,,, ? )))))

सर्व साधारण भारतीय समाजाच्या सवयी.
1. वैयक्तिक स्वार्थाच्या जागी जगातील सर्वात कुटील बुद्धी वापरणारा.
2. देश आणि समाज या बाबतीत सर्वाधिक कमी विचार आणि आठवण करणारा.
3. आपल्या खऱ्या शुभचिंतनकारावर सगळ्यात जास्त तक्रार आणि नाराजी व्यक्त करणारा.
4. आपल्या त्रास देणाऱ्या आणि गुन्हा करणाऱ्यास लवकर विसारणारा.
एका ठिकाणी वाचलेले आठवण ठेवले होते. फार आवडले.

AHMEDABAD: As many as 450 school municipal school teachers paraded as fake CEOs to impress international delegates at the Vibrant Gujarat Global Summit 2017.

According to a report published in Gujarat Samachar on Wednesday claimed that several aided school teachers were assigned ‘special duty’ and were told to pretend as corporate tycoon and CEOs.

व्हायब्रन्ट गुजरात च्या जाहिरातीत 450 स्कुल टिचरना सी इ ओ चा ड्रेस घालून बसवले

https://archive.siasat.com/news/fake-cant-make-450-fake-ceos-brought-sit...

बर्‍याच सकारात्मक चर्चेसाठी आभार.
काही लोकांना तेच ते जुने मुद्दे आणण्यातच रस आहे असे दिसते. पण ते एक असो.

बरेच काही चांगले काम होईल आणि देश प्रगती करेल अशी आशा करुया!

Gk's picture

29 Sep 2020 - 2:32 pm | Gk

अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिराच्या निर्णयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काहीही योगदान नाही. सरकारमध्ये असताना त्यांनी यासंदर्भात असं कोणतही काम केलेलं नाही," असं सांगत भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी राम मंदिराच्या प्रश्नावरून मोदींवर निशाणा साधला. विशेष म्हणजे स्वामी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधींना यांचं श्रेय दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या कामाची पायाभरणी करण्यात आली. आता काम सुरू झालेलं असतानाच भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

सुबोध खरे's picture

30 Sep 2020 - 10:02 am | सुबोध खरे

बरं मग ?

मुळात मोदींनी कधी असं म्हटलाय की राम मंदिराच्या न्यायालयाच्या निर्णयात त्यांचा सहभाग आहे?

Gk's picture

30 Sep 2020 - 2:20 pm | Gk

१९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लखनऊच्या विशेष सीबीआय न्यायालयाने आज निकाल दिला. बाबरी मशीदप्रकरणी निकाल येणार असल्याने संपूर्ण देशाचं निकालाकडे लक्ष लागलं होतं. निकाल सुनावला जात असताना २६ आरोपी कोर्टात हजर होते. लालकृष्ण अडवाणी यांनीही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावली होती. बाबरी मशीद पाडण्याचा पूर्वनियोजित कट नव्हता, बाबरी पाडण्याची घटना अचानक घडली असं निरीक्षण यावेळी न्ययाधीशांनी नोंदवलं.

नीलस्वप्निल's picture

30 Sep 2020 - 3:41 pm | नीलस्वप्निल

बाबरी मशीद विध्वंस : त्या दिवशी काय काळी जादू झाली होती का, मग मशीद कुणी पाडली? हा माणुस नेहमी प्रमाणे आरडाओरडा करायला सुरवात करेल आता

सुबोध खरे's picture

1 Oct 2020 - 12:16 pm | सुबोध खरे

२४०० पानांचा निकाल कुणीही वाचलेला नाही.

न्यायाधीशांनी एवढंच म्हटलेलं आहे कि या ३२ जणांनी मशीद पाडण्यासाठी पूर्वनियोजित कट केला असा कोणताही सबळ पुरावा सी बी आय ला देता आलेला नाही.

एखाद्या खुनाच्या आरोपातून आरोपी सबळ पुराव्याच्या अभावी मुक्त झळा तर खून झालाच नाही असे कोणीही म्हणत नाही.

पण येथे सगळे काँग्रेसी, लिब्रान्डु, डावे धाय मोकलून रडताना दिसताहेत कि मशीद पडलीच नाही.

मशीद पडलीच नाही तर बाप मेल्यासारखे रडताय कशाला?

तरी बरं हा सर्व तपास सी बी आय ने काँग्रेस सत्तेत असण्याच्या काळात केला होता. अन्यथा सी बी आय श्री मोदींची बटिक म्हणून असे झाले म्हणूनही यांनी रडारड करायला सुरुवात केली असती.