डॉक्टर खरेसाहेबांचा धागा वाचल्यानंतर काही प्रश्न/शंका मनात आल्या व हे प्रश्न प्रासंगिक असल्याने वेगळ्या धाग्यात मांडत आहेत.
करोनाने घातलेला धुमाकुळ पाहता आज ना उद्या ह्याने जवळपास सर्वजणच कधी ना कधी संक्रमित होणारच असे एव्हाना वाटु लागले आहे.
जर करोनाची लक्षणे जाणवली तर पुढे काय करावे हे माहीत करावे हा ह्या धाग्याचा हेतु आहे.
संभाव्य करोना रुग्णाकडे काय काय पर्याय असू शकतात?
माझ्या माहीतीनुसार रुग्ण घरबंद राहुन उपचार करवुन घेऊ शकतो.पण एका ऐकिव माहीतीनुसार सरकारी यंत्रणा तुम्हाला तसे करण्यापासुन परावृत्त करते.
सरकारी सेवेबद्दल आदर आहेच पण एकुणच बाधित रुग्णसंख्येची व्याप्ती पाहता तिथे होणारी हेळसांड/दुर्लक्ष इत्यादीबद्दल बरेच उलटसुलट वाचनात आले आहे.
तिच गोष्ट खाजगी वैद्यकिय सेवेबद्दल. एकाबाजुला डॉक्टरांना करोना योध्दे वगैरे नावाजले गेले आहे तिथेच दुसर्याबाजुला खाजगी रुग्णालयात भरमसाठ बिल उकळण्याच्या,मुद्दामुन चुकीच्या केलेल्या टेस्ट ह्याबद्दलच्याही बातम्या वाचनात आल्या आहेत.
अजुन एका सल्ल्यानुसार कोरोना टेस्ट करण्याची घाई करु नये. कारण वर लिहिण्याप्रमाणे टेस्टच्या विश्वार्साहतेवरच शंका आहे आणि जर रुग्ण पॉझिटीव निघालाच तर पुढची सारी प्रक्रिया ह्या सरकारी यंत्रणेमार्फत केली जाते. त्यामुळे ताप खोकला वगैरे लक्षणे आढळली तर विश्वासातल्या डॉक्टरांकडुन घरीच राहुन उपचार करवत राहावेत.हे कितपत ग्राह्य आहे?
अजुन एका माहीतीनुसार तुम्हाला करोना झालेला असू शकतो पण तुम्ही इम्युन असल्याने तुम्हाला लक्षणे जाणवत नाहीत वा पुढे त्रासही होत नाही.ते जाणुन घेण्यासाठी काय करावे? वर लिहिल्याप्रमाणे टेस्ट विश्वार्साह आहेत काय? आणि जरी टेस्ट विश्वार्साह असली तरी एकदा का तुम्ही पोझिटीव आलात तर तुम्ही पुढच्या प्रक्रियेमधले खेळणे बनुन जाता तर हे सर्व टाळायचे असेल तर काय करावे? व्यक्ती करोनाबाधित आहे पण इम्युन आहे हे माहीती करुन घ्यायच्या काही घरगुती टेस्ट आहेत काय?
पुढील प्रशन थोडा आगाऊ वाटेल पण काही शंका राहु नये ह्या हेतुने विचारत आहेत.
जसे डोकेदुखी झाली तर सहसा कोणीही उठुन डॉक्टरकडे जात नाही तर एक क्रोसिन वा तत्सम पॅरासिटॉमॉल घेतो तसे समजा व्यक्ती करोनाबाधित आहे आणि त्रासही होतो आहे तर जे मेडिकेशन दिले जाते ते एक स्टँडर्ड मेडिकेशन आहे कि व्यक्तिनुसार बदलले जाते?
जर स्टँडर्ड असेल तर व्यक्ति स्वतः औषधे घेऊ शकते का? ह्याबद्दलची अधिकृत माहीती उपलब्ध आहे काय?
व्यक्ति करोनाबाधित आहे व खाजगी वा सरकारी रुग्णालयात भरती झालीये तर पुढील मेडिकल इन्शुरन्स प्रक्रिया कशापध्दतीने हाताळावी? अथवा ह्यासंबंधीत काही मार्गदर्शनपर अनुभवाचे सल्ले मिळाले तर मदत होईल.
एखाद्या विभागातील क्वारंटाईन केंद्रे/करोना उपचार केंद्रे ह्याची माहीती मिळवण्याची काही व्यवस्था आहे काय?
पुढे जसे प्रश्न/उत्तर पडतील त्याप्रमाणे प्रतिसादात लिहित जाईन.
इतरांनीही करोना उपचारसंबंधित सर्व माहीती जमा करण्याच्या हेतुने मदत करावी.
प्रतिक्रिया
13 Sep 2020 - 12:37 pm | शा वि कु
प्रश्न अगदी महत्वाचे आहेत. तज्ञांच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत.
13 Sep 2020 - 4:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डॉक्टर आणि तज्ञ मंडळीच्या उत्तराच्या प्रतिक्षेत.
-दिलीप बिरुटे
13 Sep 2020 - 5:35 pm | Gk
Test गरजेनुसार करणे
सिरीयस लक्षणे नसतील तर घरी उपचार करावेत
पेशन्ट सिरीयस असेल तर जवळच्या डॉकटरला विचारा, तो सरकारी खाजगी दोन्हीं पर्याय सुचवले , त्यांना फोन करून बेड विचारणे व एमबुलन्सने घेऊन जाणे , हे तुम्हालाच करावे लागेल, आपोआप होत नाही,
औषधे डॉकटरच्या सल्ल्यानेच घ्यावीत, कारण ही औषधे दोक्तरांच्याही रोजच्या वापरातील नाहीत , त्याचे डोस , ड्युरेशन प्रत्येक एक्स्पर्टनुसार मागेपुढे होऊ शकतात
13 Sep 2020 - 6:00 pm | कानडाऊ योगेशु
जीकेजी प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
करोना झालाय पण इम्युन असल्याने त्रास होत नाही अथवा लक्षणे प्रकर्षाने दिसत नाहीत ह्याची पडताळणी कशी करायची?
कारण लेखात लिहिल्याप्रमाणे टेस्ट केली व ती पॉझिटीव आली तर पुढील कोर्स ऑफ अॅक्शन तुमच्या हातात राहत नाही असे ऐकले/वाचले आहे.
ह्याचा दुसराही उद्देश असा कि व्यक्तीला आपण इम्युन आहोत ही जाणीव झाली तर विनाकारण भीतीच्या छायेत वावरायची गरज राहणार नाही.
13 Sep 2020 - 10:31 pm | Gk
माझे मत , लक्षणे असतील किंवा सिरीयस पेशनतच्या संपर्कात असलेल्याने टेस्ट जरूर करावी , वैद्यकीय सल्ल्यानुसार
इंटिबॉडी आहेत का, मी केरियर आहेत का, अशा शंका घेऊन हेल्दी लोक विविध टेस्ट करायला गर्दी करू लागले तर रिसोर्सेस वाया जातील, ह्यातून ह्यांचे रिजलट तसेही 100 % नाहीतच
त्यातून कुणी टेस्ट करणार असेल तर त्याची मर्जी आणि त्याचा पैसा.
माझी तर स्वेब टेस्ट एकच केली , तीही निगेटिव्ह होती , श्वास घेण्याला त्रास होता, 2 च्या वर जिने चढता येत नव्हते , त्या बेसवर उपचार झाले, लक्षणे कमी झाल्यावर डिस्चार्ज डायरेक्त मिळाला, रिपीट टेस्टही केली नाही.
13 Sep 2020 - 6:08 pm | कुमार१
प्रमुख चाचण्यांसंबंधी तुलनात्मक तक्ता :
गैरसमज असल्यास दूर व्हावेत हा हेतू
13 Sep 2020 - 6:24 pm | कानडाऊ योगेशु
कुमारजी धन्यवाद.
घरच्या घरी टेस्ट करण्यासाठी टेस्टकिट्स हि आता उपलब्ध आहेत असे वाचले आहे. खरे आहे का हे?
13 Sep 2020 - 7:43 pm | कुमार१
होय,
अशी किट्स निघाली आहेत पण त्यांच्या अचूकते बाबत साशंकता आहे
13 Sep 2020 - 7:02 pm | चौकटराजा
समजा मी अॅन्टीबॉडी चाचणी करून घेतली तर माझा प्रश्न असा आहे की ती निगेटिव्ह आली तर याचा अर्थ मला करोना होउन गेला असेल व आता अॅन्टीबोडीचेही जीवन सम्पले असेल . किंवा करोना झालाही नाही त्यामुळे अॅन्टीबॉडी सापड्ण्याचा सवालच नाही.
समजा माझी अॅन्टीबॉडी चाचणी पोझिटिव्ह आली तर करोना सध्या आहे ,लक्षणे नसली तरी व अॅन्टीबॉडी चे उत्पादन चालू झाले आहे. किन्वा मला करोना होऊन गेला पण
अॅन्टीबॉडी ना काही जीवन असल्याने त्या अजून शिल्लक आहेत.
आत शेवटचा प्रश्न - माझ्या मधे अॅन्टीबॉडी सापडल्या पण करोनाशीच लढा देणार्या अॅन्टीबॉडी कशावरून ? प्रत्येक विषाणूची निस्चित अशी अॅन्टीबॉडी चाचणी असते का ?
13 Sep 2020 - 7:14 pm | शा वि कु
माझ्या माहितीनुसार अँटिजेन चाचणी पॉसिटीव्ह आल्यास कोरोना होऊन गेलाय/झालाय असा निष्कर्ष निघतो. निगेटिव्ह आल्यास काहीही निष्कर्ष काढता येत नाही. त्यामुळे कोणत्याही त्रासाशिवाय तुम्ही अँटिजेन मध्ये पॉसिटीव्ह आला तर आनंदाची बाब. निगेटिव्ह आल्यावर नुसतं ओम फस्स,बाय बाय मनी.
या चाचण्यांची अचूकता फारशी नाही असे वाचले आहे. त्याचे कारण तुम्ही म्हणता तेच आहे. ह्या अँटिबॉडीज कोरोनाच्याच आहेत याची खात्री नसते, त्यामुळे हा केवळ अडाखा असतो.
13 Sep 2020 - 7:22 pm | कुमार१
माझ्या या कोविड धाग्यात २३ नेहमीच्या प्रश्नांची उत्तरे आहेत.
https://misalpav.com/node/46973
ती जरूर बघवीत.
13 Sep 2020 - 7:47 pm | कुमार१
>> तरी जर लक्षणे असतील तर molecular चाचणी करतात
वरील तक्ता नीट पहावा
13 Sep 2020 - 9:31 pm | शा वि कु
हे लक्षात नाही घेतले मी.
14 Sep 2020 - 4:11 am | चित्रगुप्त
माझा मुलगा आणि सून या दोघांचीही कोविड टेस्ट पॉझिटिव्ह येऊनही कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत. त्यांना चौदा दिवस सुट्टी घेऊन घरी रहावे लागले, परंतु कोणताही त्रास झाला नाही.
बाकी मी आणि माझी पत्नी दोघांना कोविड बाधा झालेली असूनही कोणतेही औषध न घेता घरीच राहून यातून मुक्त झालेलो आहोत. या बद्दल सविस्तर माहिती - 'कोविड : एक इष्टापत्ती ?? (गेल्या दोन महिन्यातील स्वानुभव)' या धाग्यात मी दिलेली आहे.
14 Sep 2020 - 6:28 am | चौकटराजा
@ चित्रगुप्त , तुमच्या चौघांच्या मुक्तीचे तार्किक कारण मला असे दिसते की ... त्यातील दोन माणसे तरूण आहेत व दोन ६० चे वरची माणसे आहेत त्याना उच्च रक्तदाब , कर्करोग, कोणताही आटोइम्युन रोग ( जसे सन्धिवात ),मुत्रपिन्ड विकार व मधुमेह नाही.
मला राहून राहून असे वाटते की जगातील ५० टक्क्याचे वर लोकसंख्येने कोविडवर नैसर्गिक रित्या मात केलेली आहे. त्याना सोशल डिस्टन्सिन्ग्,मास्क, ते कोणत्या हवामानात ,किती गर्दीत राहातात या गोष्टीचा फायदा नैसर्गिक कारणा बरोबर झालेला आहे. भारत देशात मुळात सरकारच भयभीत झाले असल्याने दिसला पोझिटिव्ह की उचल बेफिकीर कोविड सेंटर मधे टाक किंवा प्रायवेटला पाठवून लुटा त्याला असा खाक्या दिसत आहे.
माझ्या सारखा एकादा को- मॉर्बिड पण सौम्य लक्शणे असेल - ज्येष्ठ नागरिक असेल ( तशी मला नाहीत अजून तरी ) त्याला 'होम क्वारन्टाईन विथ मेडिसिन सप्लाय अॅन्ड क्लोज मोनिटरिन्ग ओफ सिम्टम्स " याचा पर्याय देऊन वेळ पडली तर राखीव बेड वर रवानगी " असे केल्यास व्यवस्थेवरचा ताण नक्कीच कमी होईल.
14 Sep 2020 - 6:33 am | कंजूस
१))>> जर करोनाची लक्षणे जाणवली तर पुढे काय करावे हे माहीत करावे हा ह्या धाग्याचा हेतु आहे.
संभाव्य करोना रुग्णाकडे काय काय पर्याय असू शकतात?>>>
• ताप आला किंवा थकायला होऊ लागले विनाकारण, सर्दी, घसा दुखणे - तर जवळच्या करोना तपासणी केंद्रात जावे लागते. यावर कोणताही खाजगी डॉक्टर सेवा देणार नाही किंवा फारतर एकदोन दिवसांचे औषध देऊन नंतर माझ्याकडे येऊ नका म्हणतो.
----------------
२) >>> व्यक्ती करोनाबाधित आहे पण इम्युन आहे हे माहीती करुन घ्यायच्या काही घरगुती टेस्ट आहेत काय? >>>
* वरील साध्या उपायाने गुण येत नाही तेव्हा आरोग्यसेतू app वर माहिती - नाव ,पत्ता वय,लक्षणं, फोन नं भरुन पाठवणे हे करणे. कारण आता करोनाच झाला आहे का माहीत नाही आणि काय करायचे माहीत नाही किंवा आरोग्य केंद्र दूर आहे. आणि जो काही सौम्य त्रास आहे तो जात नाहीये.
म्हणजे तुम्ही संभाव्य करोनाबाधित रुगण आहात आणि सरकारी केंद्रीय व्यवस्थेला कळले पाहिजे.
३) >>> जसे डोकेदुखी झाली तर सहसा कोणीही उठुन डॉक्टरकडे जात नाही तर एक क्रोसिन वा तत्सम पॅरासिटॉमॉल घेतो ....>>>
* उत्तर .डॉक्टरने दिलेले दोन दिवसांचे औषध किंवा तुमचे घरगुती काढे, वगैरेनी कमी न होणे म्हणजे धोक्याची घंटा वाजते आहे। स्वत: काही करू नका. याव्यतिरिक्त ब्लडप्रेशरमुळे डोके दुखते. त्याची औषधे चुकली आहेत का? बीपी चेक कराययला हवे. पोट साफ आहे ना?
डोके उगाच दुखत नाही.
४) >>> एखाद्या विभागातील क्वारंटाईन केंद्रे/करोना उपचार केंद्रे ह्याची माहीती मिळवण्याची काही व्यवस्था आहे काय? >>>
आजुबाजूस विचारा. किंवा कचरा गोळा करणाऱ्या नगरपालिका गाडीवाल्यांना विचारा.
५)>>> तसे समजा व्यक्ती करोनाबाधित आहे आणि त्रासही होतो आहे तर जे मेडिकेशन दिले जाते ते एक स्टँडर्ड मेडिकेशन आहे कि व्यक्तिनुसार बदलले जाते? >>>
● हे तुम्ही ठरवू शकत नाही. करोना केंद्रातील लोक तुमची माहिती घेऊन ठरवतात. आता त्यांना अनुभवाने करोना संशयित किंवा बाधित रुग्ण रोगाच्या कोणत्या स्तराला गेला आहे ते कळते आणि त्याप्रमाणे उपाययोजना करतात.
======================
आमचे एक वयस्कर नातेवाईक ( ८० ,७५ ) आणि आमच्या इमारतीमधील एक तरुण (३०) बाधीत यांना प्रश्न विचारून माहिती घेतली होती. घरीच राहण्याचा किंवा ठेवण्याचा निर्णय नगरपालिका नागरी केंद्राचा होता. औषधं त्यांनीच ठरवली.
वयस्करांना फक्त बी कॉम्प्लेक्स गोळ्या दिल्या. दूध, प्रोटिनेक्स आणि भाज्या सूप घ्या सांगितले होते. बरे होऊन एक महिना झाला.
तरुणालाही काही गोळ्या दिल्या होत्या व रोग 'नॉमिनल' आहे असे सांगितले होते. त्याची बायको आणि तो घरात राहिले, तिला झाला नाही. तीन वर्षाच्या मुलाला आजीकडे ठेवले होते.
14 Sep 2020 - 10:06 pm | कानडाऊ योगेशु
असे करणे व्यावहारिक शहाणपणाचे ठरणार नाही. मुळात प्रत्येकजण संशयी झाला आहे. उगाच विचारायला गेलो आणि आरोग्यकेंद्रात तक्रार केली गेली तर करायला गेलो एक झाले भलतेच असे व्हायचे. डॉ.खरेसाहेबांचा अनुभव पुढच्यास ठेच ठरु शकतो.
15 Sep 2020 - 4:38 am | कंजूस
आरोग्यकेंद्रात तक्रार ?
आरोग्यकेंद्रात कळवणे बंधनकारक आहे. ते ठरवतील काय करायचं. मुळात सध्याच्या काळात करोनासारखी लक्षणे असल्यास कुणीही योग्य मार्गानेच जायचे आहे. तिकडे नोंद होणे मुख्य आहे. त्याला तक्रार कसे म्हणता?
कारण संसर्गजन्य रोगी कोणी आहे का आणि आणि रोगाचा प्रसार थांबवणे सरकारचे काम आणि जबाबदारी आहे ती त्यांना पार पाडणेस सहकार्य करायचे आहे.
14 Sep 2020 - 6:40 am | चित्रगुप्त
@ चौरा:
परंतु कोविड वर जर औषधच नाही, तर मेडिसिन सप्लाय कसला ??
हेच आम्हाला अमेरिकेतील डॉक्टरने सांगितले होते - "कोविडवर औषध नाही, तेंव्हा उगाचच दवाखान्यात जाऊ नका, घरीच फक्त योग्य ती काळजी घेत आराम करा, बरे व्हाल" आणि तसेच झाले.
याचेशी पूर्णपणे सहमत.
14 Sep 2020 - 6:56 am | चौकटराजा
कोविड वर औषध नाही असे नाही तर अजून मेडिकल कम्युनिटीने पूर्ण पणे सुरक्शित व परिणामकारक म्हणून स्वीकारलेले औषध नाही. अन्टीव्हायरल, इम्युनो मोड्युलेटरी औषधे वापरून पाहिली जात आहेत.
14 Sep 2020 - 10:10 pm | कानडाऊ योगेशु
कंपनीतल्या एका सहकार्याच्या कुटुंबाला करोना झाला पण तो वाचला.त्याने त्याचे कारण हे सांगितले कि कुटुंबातील सदस्य रोज भूमिआवळ्याचे चूर्ण घेत असत. ह्याने एके दिवशी जास्त घेतले त्यामुळे त्याला छातीत पित्ताचा वा तत्सम त्रास झाला. प्रचंड जळजळ. दुसर्या दिवशी एकेक कुटुंब सदस्य करोनाबाधित होऊ लागला. ह्याला झाला नाही. ह्याने सांगितलेले स्पष्टीकरण असे कि मी जास्त चूर्ण खाल्ले त्यामूळे छातीत उष्णता निर्माण झाली. तेव्हा त्रास झाला खरा पण करोना त्या उष्णतेत होरपळुन मेला :).
खरे खोटे डॉक्टर जाणे.
14 Sep 2020 - 11:10 pm | बाप्पू
:D :D
काहीही.. !!
16 Sep 2020 - 5:34 am | चामुंडराय
😇
16 Sep 2020 - 5:38 am | चामुंडराय
विषयात "ईमोजी" 😇 दिसत नाही का?