सांबार मसाल्याची पुर्वतयारी:
* दोन मध्यम आकाराचे कांदे
* एक टोमॅटो
* कोथींबिरीच्या ३-४ काड्या
* १०-१५ काळ्या मिर्या
* २ दालचिनी (१")
* ६-८ लवंगा
* १ चमचा हळद
* २ चमचे तिखट
* २ चमचे धने-जिरे पुड
* ४ चमचे सांबार मसाला (माझी एक तामिळ सहकारी हा घरगुती मसाला कोइंबतुर येथुन आणते)
* ४-५ सुक्या लाल मिरच्या
* १" आल्याचा तुकडा
* ५-६ लसुण पाकळ्या
* भरपुर कडिपत्ता
* १ चमचा गुळ
* वरिल सगळे साहित्य वाटणयंत्रातुन वाटुन एकजीव करुन घ्यावे
सांबारात घालायच्या भाज्यांची पुर्वतयारी:
* लाल भोपळा, दुधी भोपळा, वांगी, नवलकोल, दोडका, शेवग्याच्या शेंगा (लाल भोपळा मिळाला नाहि म्हणुन वापरलेला नाहि!)
* भाज्या सोलुन आणि चिरुन घेणे (एकदम लहान तुकडे करु नये नाहि तर गळुन जातात)
* भाज्या वाफवुन घेणे
* वाफवलेल्या भाज्या थंड पाण्यात काढुन ठेवणे.
* वाफयंत्रातले पाणी बाजुला ठेवावे (नंतर सांबार मधे टाकायच्या कामी येते)
सांबारात घालायचे छोटे कांदे:
* सांबार कांदे आख्खे ठेवुन सोलुन घ्या
* एका छोट्या पॅन मधे कांदे छान परतुन घ्या (हलके सोनेरी होउ पर्यंत)
* परतत असतांना कांद्यावर थोडि साखर घालंणे
* परतलेले कांदे बाजुला काढुन ठेवणे
सांबार फोडणी/इतर साहित्यः
* फोडणी साठी:
> भरपुर मोहरी (फोटोमधे राहुन गेल्या)
> १ चमचा प्रत्येकी - मेथी डाळ, उडिद डाळ, मुगाची डाळ
> अर्धा चमचा हिंग
> भरपुर कडिपत्ता
> एक टोमॅटो आणि कांदा मोठ्या तुकड्यांमधे चिरलेला
> १०-१२ पाकळ्या लसुण
> ४-५ सुक्या लाल मिरच्या (फोटोमधे राहुन गेल्या)
* १ वाटि शिजवलेली तुरिची डाळ
* वरुन घालायला बारीक चिरलेली कोथींबीर
सांबार बनवायची कृती
* एका मोठ्या कुकर अथवा भांड्यामधे ४ मोठे चमचे तेल गरम करणे.
* तेल व्यवस्थित गरम झाल्यावर हिंग, मोहरी टाकुन फोडणी करणे
* मोहरी व्यवस्थित तडतडली कि तेलामधे कडिपत्ता घालुन चांगला परतुन घेणे
* कडिपत्ता झाला कि तिन्ही डाळी आणि लसुण घालुन परतुन घेणे
* लसुण थोडा सोनेरी रंगाचा होत आल्यावर मिरच्या टाकुन तडतडु देणे
* कांदा आणि टोमॅटो घालुन थोडा वेळ परतुन घेणे
* वाफवलेल्या भाज्या पाण्यातुन काढुन (निथळुन घेणे) परतुन घ्या
* वर तयार केलेला सांबार मसाला घालुन छान परतुन घेणे
* शिजवुन घेतलेली डाळ आणि थोडे पाणी घालुन एक उकळी येउ देणे
* उकळी आली कि कमी-जास्त पातळ पाहिजे त्या प्रमाणात पाणी घालणे (भाज्या वाफवायला आणि थंड करायला वापरलेले पाणि)
* एक चमचा चिंचेचा तयार कोळ घालणे (चवीनुसार कमी/जास्त)
* सांबाराला ऊकळी आली कि गॅस बारीक करुन झाकुन ठेवणे
* वाढायच्या आधी बारीक कापलेली कोथींबीर घालणे.
मंडळी येताय ना मग, गरमा-गरम - झणझणीत इडली आणि सांबार खायला!!
(बेंगळुरु मधे एक-दोन दिवस झाले पाउस पडत आहे. पावसाळी थंड हवेत गरमागरम झणझणीत सांबार म्हणजे अहाहा काय वर्णावा तो आनंद!!!)
आपले अभिप्राय जरुर कळवा!
प्रतिक्रिया
23 Nov 2008 - 6:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
झकास दिसतंय ... मला जाम भूक लागली आहे हे इडली-सांबार बघून!
आणि सचित्र पाकृबद्दल धन्यवाद.
अदिती
23 Nov 2008 - 6:25 pm | बिपिन कार्यकर्ते
हॅस्साला.... बघूनच मजा आली राव... करायला कुठं जमतंय अजून...
बिपिन कार्यकर्ते
23 Nov 2008 - 10:04 pm | रेवती
सचित्र कृती मस्त आणि झणझणीत, अगदी सांबारासारखीच.
मेहनत घेऊन आमच्यापर्यंत ही कृती पोहोचवल्याबद्दल धन्यवाद!
24 Nov 2008 - 1:52 am | नंदन
सहमत आहे. सचित्र पाकृ मस्तच!
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
23 Nov 2008 - 10:30 pm | प्राजु
जबरदस्त.
रेसिपीपेक्षा.. फोटोमुळे जळजळ झाली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
23 Nov 2008 - 10:49 pm | टारझन
वरिल पाकृ पाहून आमची पण प्राजुतैंसारखीच आवस्था झाली. .. आम्ही खालिल उपाय केला..
- टारझन
23 Nov 2008 - 10:53 pm | शितल
फोटो क्लास,
आणी पाककृती ही मस्तच.
:)
23 Nov 2008 - 11:53 pm | पांथस्थ
मंडळी,
आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद! आणि जळजळीबद्दल क्षमस्व :)
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
23 Nov 2008 - 11:56 pm | ललिता
साग्रसंगीत फोटोसहित कृती.... आता पुढच्या रविवारी सांबार व इडली! :)
फार मेहनत घेता बुवा तुम्ही!
24 Nov 2008 - 12:38 am | भाग्यश्री
किती सुंदर फोटोज!! तुमच्या पेशन्सला मानलं.. प्रत्येक स्टेजचे फोटो काढत जायचं म्हणजे तसं कंटाळवाणं काम आहे!
सांबार भारीच दिसतंय.. नक्की करून पाहणार! :)
http://bhagyashreee.blogspot.com/
24 Nov 2008 - 2:50 am | सुक्या
पांथस्थ राव. झणझनीत सांबाराचा ठसका इथपर्यंत आला. एक दोन फोटो ठिक आहे. २९ फोटो पाहुन अंमळ जास्तच जळ्जळ झाली. मिपावरच्या बल्लवाचार्याच्या / सुगरणींच्या क्रुपेने घरातला इनोचा स्टोक पन संपला आज. सांबार खाल्याशिवाय ही जळजळ थांबनार नाही.
बाकी रेसिपी मस्तच. (जळजळी मुळे जास्त कौतुक करत नाही)
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
24 Nov 2008 - 6:11 am | चकली
वाह मस्तच पाककृती !! आणि फोटोही सुरेख
चकली
http://chakali.blogspot.com
24 Nov 2008 - 7:40 am | मदनबाण
फोटो युक्त मस्त पाकृ !! :)
मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर
24 Nov 2008 - 11:23 am | विसोबा खेचर
अरे पांथस्था, तुझं कौतुक तरी किती करू बाबा! :)
इतकी देखणी चित्र आणि अगदी पद्धतशीर पाकृ..! वा..! क्या बात है भिडू..साला, दिल खलास झाला!
सर्व फोटू केवळ देखणे आणि संग्राह्य..!
पहिलाच टामाटू/कांदा/कोथिंबिरीचा फोटू मी माझ्या संगणकावर वॉलपेपर म्हणून लावलाय! त्यामुळे संगणकाचा स्क्रीन अत्यंत देखणा दिसतो आहे! :)
जियो..!
तात्या.
24 Nov 2008 - 12:28 pm | पांथस्थ
सगळं पोटासाठीच आहेना!!
बायको आणि मुलींच्या पेशन्सला पण!! माझ्या फोटो काढत पा.कृ. करण्यामुळे जेवायला अंमळ उशीरच झाला!!!
मित्रा अभी तो शुरुवात है! आगे देखो आता है क्या!!! थोडक्यात रिस्टॉक करा ;)
पोट्भरुन करु नका नाहि तर इडली-सांबार खायला जागा रहायची नाहि :)
प्रतिक्रियांबद्दल सगळ्याचे मनःपुर्वक आभार! आणि हो, सगळ्यांना एक नम्र विनंती - एकेरी वर या!
-पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
24 Nov 2008 - 2:23 pm | सुप्रिया
वा ! मजा आली ! सचित्र पाकृबद्दल धन्यवाद. आ़ज रात्री सांबार-भात ! बाकि टी.व्ही. वरच। कु़करी शो बघितल्यासारखे वाटले.
24 Nov 2008 - 1:26 pm | जयवी
तुमच्या पेशन्सला मानावं लागेल बॉ..... कसली जबरी चित्रं टाकली आहेत. ही कृती नक्की करुन बघेन.
25 Dec 2008 - 1:26 am | साना
=D> पन्थस्ता साम्बार झक्कास !पन हा केलाय कोणी?आणि फोटो कधले कोणी?
दोन्ही कमे जर एकाच माणसानी केली असतील तर मानल बुवा तुम्हाला!
25 Dec 2008 - 7:35 am | दवबिन्दु
तुमचा गुल बाटलीतला कसा? ढेप नाय काय? आता तुमी इत्क डिटेलमदी दिलय त करुनच पाहतो आनि सांगतो कसं झालय ते. पाहुन त छान वाटुन राह्यलं.