मोहमाया - फोटोग्राफी

पॉइंट ब्लँक's picture
पॉइंट ब्लँक in मिपा कलादालन
9 Sep 2020 - 9:31 pm

चार वर्षांपूर्वी फुलांच्या फोटोमध्ये काय काय प्रयोग करता येतील ह्यावर एक लेख लिहिला होता.  http://misalpav.com/node/34757गेल्या चार वर्षात जितकी प्रगती फोटोग्राफीमध्ये केली नसेल तेवढी कसर लॉक-डाऊन  ने भरून काढली. बाहेर जाऊन फोटो काढणं शक्य नसल्यामुळं घरी बसून जुन्या फोटोसोबत खेळखंडोबा करत बसणं इतकंच हातात उरल होता. आणि त्यात चालू झाले प्रयोग . नवीन फोटो काढता येत नसले म्हणून काय झालं , नवीन बनवायला कुणी बंदी घातली आहे?. अशाप्रकारे कॉम्पोझिट्सच्या जगातला प्रवास सुरु झाला.  फोटोकडे जाण्याआधी  कॉम्पोझिट्स  म्हणजे काय ह्यावर थोडा ऊहापोह करू .  एका पेक्षा अधिक फोटो जोडून, त्यांची  भेसळ करून बनवलेला  नवीन फोटो म्हणजे कॉम्पोझिट.    कॉम्पोझिट ची गरज का पडते ह्याचा आधी उत्तर शोधू . १. तुम्हाला ज्या गोष्टी एकाच फोटोमध्ये दाखवायच्या आहेत त्या एकाच वेळेस एका ठिकाणी उपलब्ध नसनं २. एका फ्रेम मध्ये जरी उपलब्ध असल्या तरी  Exposure Differene आणि    depht of field च्या मर्यादांमुळे  आपल्याला हव्या तशा  फोटोमध्ये उतरवता न येणं ३. सगळ्यात महत्वाचा - जे दिसत त्यात समाधान न मानता उगाच  कल्पनेच्या नावाखाली  खेळखंडोबा करत भिरभिरनारं वेडं मन ;)  ह्या तिन्हींची पूर्तता करणाऱ्या काही फोटोंची उदाहरण आपण पाहू. 
१. कळी  आणि फुल  हे समपातळीत मिळणं  तसं  थोडा कठीण . म्हणून इथे दोन वेगवेगळ्या फोटोमध्ये त्यांना पकडून त्यांचा कॉम्पोझिट  बनवला आहे 

DSC_4352_composit

२. Exposure Differene  - ढगांच्या पातळ थराखाली आणि ढगांनी वेढलेला चंद्र हे फारच मोहक दृश्य . पण हे एका फोटोमध्ये पकडणं  अवघड काम. कारण चंद्र नीट पकडायचा प्रयत्न केला तर ढग फ्रेम मधून गायब आणि ढग नीट पकडायचा प्रयत्न केला तर चंद्राची पांढरी चकती  बनते . त्यावर साधा उपाय दोन्ही एका मागे एक वेगवेगळ्या फोटोमध्ये उतरवायचे आणि मग चंद्राला अलगद उचलून ढगांच्या मध्ये ठेवायचं. त्याआधी ढगांना आग लावली तरी चालते. मग उगाच चंद्र चिडल्यासारखा दिसतो 

DSC_5975_1

३. Exposure Differene  च अजून एक  उदाहरण . बेंगलोर च्या जवळ शिवरापटना  हे शिल्पकारांचं  एक छोटंसं गाव आहे. पूर्ण गावभर नवीन बनलेल्या दगडांच्या बनलेल्या मुर्त्या दिसतात.  अशीच एक भव्य मुनिश्वरची मूर्ती . दक्षिण भारतात बऱ्याच ठिकाणी हा शंकराचा अवतार ग्रामदैवत म्हणून पूजला जातो.  चार वर्षांपूर्वी सूर्यास्ताच्या वेळेस मस्त सूर्य बॅकग्राऊंडला ठेवून फोटो काढला होता. पण आकाशातले सगळे रंग ओव्हर एक्सपोज झालेले आणि सूर्य होता तिथं पांढरा भगदाड पडला होता फोटोमध्ये .  त्यावर तोडगा   मिळवून दिला  कॉम्पोझिटने .  मुनिश्वरची आणि उगवत्या सूर्याची गाठभेट घडवणारा हा फोटो 
DSC_0556_2

  कॉम्पोझिटची निर्मिती साठी किंवा एखादी संकल्पना प्रत्यक्षात  उतरवण्यात कशी मदत घेता येते ह्याची काही उदाहरणे पाहू   

४.  राधेची द्रुष्टी -  श्रीकृष्णाने राधेला वचन दिल होतं - तुला माझी  जिथे आठवण येईल तिथे मी तुला दिसेन.  आणि राधेच्या मनात सदानकदा  कृष्ण राहू लागल्यामुळे तिला तो कणाकणात दिसू लागला . तिला  कृष्णाला प्रिय असणाऱ्या मोरपिसामध्ये काय दिसत असेल ह्याची कल्पना करण्याच्या केलेला एक छोटा प्रयत्न .  नीट लक्ष देऊन पहा 

feather_with_kirshna_1

५. ज्यांना काहीच दिसला नाही त्यांच्यासाठी झूम इन केलेला आणि  ब्राईटनेस  वाढवलेला फोटो 

feather_with_kirshna_close_up
 
६. सूर्य शशांक वह्नि नयनं - सूर्य, चंद्र आणि अग्नी हे शंकराचे तीन नेत्र मानले जातात . ह्या तिन्हींचा शंकराच्या फोटोमध्ये केलेला उपयोग . हि चोला काळातील नटराजाची मूर्ती  तंजावरच्या रॉयल पॅलेस म्युझियम मधील आहे .  मूर्तीच्या मागे दिसणारा तो गोळा  अर्धा चंद्र आणि  अर्धा सूर्य मिळून बनलेला आहे . सूर्य असलेली बाजू अग्नीने प्रज्वलित झाली आहे असा आभास निर्मान केला आहे 

DSC_0183_5

७. हिरण्यकश्यपु वध - दाखवणारी हि सुंदर मूर्ती अवदूर कोईल   येथील आत्मनाथर मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळील आहे. पण तो खांब जवळपास शेजारच्या इमारतीमध्ये घुसला आहे. फारच विदारक दृश्य होता ते . आहे तसा फोटो काही छान वाटेना आणि आजूबाजूची किचकित काढून टाकली तर फोटोला काही अर्थ राहीन. मग परत  कॉम्पोझिट बनवायला एक निमित्त झाला . हिरण्यकश्यपुच्या वधाच्या तीन  अटी  होत्या - ना दिवस ना रात्री , ना पृथ्वीवर ना आकाशात  आणि  तिसरी  ना  घरात ना घराबाहेर .  पहिला दोन तरी पूर्ण करता आल्या  :)

Narsimha

८.  अपेक्षांच्या ओझ्यानं  दबलेला बिचारा चंद्र.  सगळ्या जगाच्या चंद्राकडून अपेक्षा फार.  म्हणजे आकाशात भला मोठा चंद्र दिसला पाहिजे , त्याचा तसाच सुंदर प्रतिबिंब पाण्यात दिसला पाहिजे. पण  प्रत्यक्षात त्याला काही त्या पूर्ण करता येत नाहीत. पण त्याचे  कॉम्पोझिट्स    बनवून  सुपरमून च्या नावाखाली फसवणुक बरिच केली जाते .  खालील फोटो सूर्योदयाच्या वेळेस  पश्चिम दिशेच्या  तळ्या काठाच्या आकाशाचा आहे.  चंद्र क्षितिजावर नव्हताच मुळी  तेंव्हा.  आणि फोटोमध्ये जो चंद्र दिसतोय तो त्याच्या प्रत्यक्ष आकारापेक्षा तीस पटीने मोठा केला आहे.  आणि चंद्राच इतका सुदंर प्रतिबिंब प्रत्यक्षात कधी पडू शकत नाही .  असो पण कल्पना करायला कुणी बंदी घातली नाही   आणि  कॉम्पोझिट मध्ये तरी चंद्र त्याच्या अपेक्षा पूर्ण करू शकतो 

DSC_5662_with_reflection

मनात येणाऱ्या विचित्र कल्पनेचं  एक उदाहरण . 

९. चन्द्र आपलं  सौंदर्य न्याहाळायला  पाण्यात बघतो. पण पाणी त्याला आरसा दाखवत तिथे चंद्राऐवजी सूर्य दाखवाते .  अशी कल्पना का केली  ह्या प्रश्नाला काही उत्तर नाही , कृपया विचारू नका . पण कॉम्पोझिट  बनवायला सगळ्यात आवाहनात्मक संकल्पना आहे हि . पाच तास वाया घालवून साकार झाली 

DSC_8413-hdr_moon_sun

१०. टाईमपास  म्हणून बनवलेले एक कॉम्पोझिट .  मोहरीच्या फुलांचा एक टेबलटॉप क्लोजअप  फोटो काढला आणि त्यावर रंग विसकटलेली एक फ्रेम सुपर-इम्पोज  केली .  बनला एक मजेशीर फोटो 

DSC_6185_2

  कॉम्पोझिट  हि कला आहे कि नाही माहिती नाही.  बरेच लोक   कॉम्पोझिट   फोटो  नैसर्गिक फोटोच्या नावाखाली खपवतात . त्यामुळे कॉम्पोझिट्स  कडे फारसा आदारान पहिला जात नाही.  जर प्रामाणिकपणे  फोटो कॉम्पोझिट आहे हे सगळ्यांनी सांगितलं तर थोडा आदर मिळेल कमितकमी प्रायोगिक फोटो म्हणून.  असो. हे वरील सर्व कॉम्पोझिट्स   बनवण्यासाठी  GIMP चा उपयोग  केला आहे .  Youtube वर  हजारो ट्युटोरियल उपलब्ध आहेत त्यामुळे  त्यावर जास्त विवरन केला नाही. 
मराठी मध्ये लेखन करून बरीच वर्ष झालीत त्यामुळे अशुद्ध -लेखन झाला असेल बरेच.  सांभाळून घ्या . 

 

प्रतिक्रिया

पॉइंट ब्लँक's picture

6 Dec 2020 - 11:07 am | पॉइंट ब्लँक

धन्यवाद _/\_