शिवसेनेचे हे काय चाललय

Primary tabs

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
9 Sep 2020 - 1:12 pm
गाभा: 

मुंबईत ज्या पद्धतीने महापालीकेने कंगना राणावतचे घर पाडले तोडफोड केली त्या वरून शिवसेनेला राजकारणापेक्षा रस्त्यावर मारामार्‍या कर्‍अण्यातच जास्त रस आहे असे दिसतेय.
एक क्षण असे समजूया कंगना ने घरात परवानगीशिवाय बांधकाम केले होते. मात्र हायकोर्टाच्या कोविड च्या काळात डिसेंबर पर्यंत कोणतीही तोडफोड करू नये अशा आदेशानंतरही महापालीकेने तोडफोड केली.
कंगना घरात नसताना तीला नोटीसीला उत्तर देण्यासाठी वेळही न देता ही कारवाई केली गेली. ते देखील ती मुंबई मधे नसताना.
मुंबई महापालीकेला कंगना च्या घरात बाथरून च्या जागी ऑफीस केले ही बातमी मिळते मात्र वांद्रे स्टेशनच्या बाहेरच्या पाच पाच मजली अनधिकृत झोपड्या कधीच दिसत नाहीत.
मुंबई महापालीकेला कंगनाच्या घरावर ज्या तातडीने कारवाई करता आली तितकी तातडी महापालीका रस्ते दुरुस्तीबाबतीत , स्वच्छतेबाबत का दाखवत नाही.
शिवसेनेचे म्हणणे आहे की ही कारवाई शिवसेनेने नाही तर मुंबई महापालीकेने केली आहे. शिवसेनेला अशी स्वतंत्र कारवाई करायचा काय अधिकार आहे का? दुसरे म्हणजे महापालीकेतली शिवसेना ही वेगळी शिवसेना आहे का?
शिवसेना ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळत आहे. ते पहाता स्टॅलीन च्या दडपशाही ची आठवण होते.

या सगळ्या प्रकरणात मविआ चे सर्वेसर्वा तथाकथीत जाणते राजे सोयीस्करपणे मुग गिळून बसलेत.
बी एम सी ही एक सरकारी संस्था आहे. त्यांनी केलेल्या कोर्टाच्या आदेशा विरुद्ध जाऊन अनधिकृत कारवाई च्या विरोधात कोर्टात दाद मागितली तर अधिकार्‍यांवर काही कारवाई होईल असे नाही. त्यामुळे अधिकारी निर्धास्त आहेत. त्यामुळे त्यांना जनतेवर अन्याय करायला परमीट मिळाले आहे असे दिसतेय
शिवसेनेचे हे नक्की काय चालले आहे तेच समजत नाही.
ते स्वतःच्या हातानेच स्वतःचे भवितव्य खणून काढताहेत

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

9 Sep 2020 - 1:13 pm | विजुभाऊ

एक नागरीक म्हणून आपण सेनेच्या या अन्यायाविरुद्ध दाद मागायलाच हवी.

कपिलमुनी's picture

9 Sep 2020 - 1:16 pm | कपिलमुनी

अनधिकृत बांधकामच तोडले आहे ना ?

मुळात कोणीही अनधिकृत काम करावेच का ? आणि केल्यावर तोडले म्हणून रडावे का ?

अगदी कंगणाच्या वक्तव्यामुळे हे पाडले असे मानू या,पण मग तिने जे बेकायदेशीर केले आहे ते योग्य कसे ??
आधी हे पाडा मग ते पाडा म्हणाले, तर चोर म्हणेल आधी माल्या ला पकडा मग मला शिक्षा करा.
ऐसा कैसा चलेगा ?

विजुभाऊ's picture

9 Sep 2020 - 1:33 pm | विजुभाऊ

कपिल मुनी अनधिकृत बांधकाम पाडताना सेनेने हायकोर्टाच्या आदेशाला मानले नाही.
दुसरे म्हणजे कायद्यानुसार कंगनाला महापालिकेने उत्तर देण्यासाठी वेळ द्यायला हवा होता. तो दिला नाही. हे न्याय्य नाही.
एका दिवसात कारवाई करणे सेनेने / पालीकेने ही तातडी इतर बाबतीत दाखवायला हवी.
पूर्ण फुटपाथ गिळंकृत करणार्‍या सिद्धीविनायक ट्रस्ट बद्दल ही तातडी दाखवा ना.
वांद्र्यातील झोपडपट्टीवर कारवाई करा ना
एकूणातच सेनेला शासकीय पद्धतीने दादागिरी करायची आहे. हेच दिसतेय.
मल्ल्या वगैरे विषय हे केंद्र सरकार च्या अखत्यारीत येतात. आणि त्यावर काम चालू आहे.
आपली न्यायसंस्था कसाबलाही बचावाची संधी देते. कंगनाला तीही देण्यात आली नाही.
सेने ची कंपाउंडरच्या साम्गण्यावरून वैयक्तीक पातळीवर दुश्मनी काढायची पद्धत दिसते

कपिलमुनी's picture

9 Sep 2020 - 1:47 pm | कपिलमुनी

मी वाचले त्याप्रमाणे 2018 साली नोटीस दिली होती , आता वचपा काढला.

पण जे मुळातच बेकायदेशीर आहे त्याचा बचाव कसा करावा ? की आधी बाकी सगळे पाडा मग माझ्याकडे या असे असते?

दादा कोंडके's picture

11 Sep 2020 - 1:42 am | दादा कोंडके

आपल्याकडचे सगळे कायदे मुळात ढिसाळ आहेत. ते सगळे पाळणं जिकीरीचं आहे. अशा परिस्थितीत दोष फक्त नागरिकांना देता येत नाही. ते पाळण्यासाठी लोकांमध्ये विश्वास निर्माण करावा लागतो. ते काम सरकारी यंत्रणेकडूनच होणं अपेक्षित आहे. ते होण्यासाठी अजून काही दशकं जावी लागतील.

माझा एक सिए असलेला मित्र म्हणाला होता की जो पर्यंत तुम्ही जाणिवपुर्वक स्वच्छ रहाण्यासाठी दुसर्‍या एक सिएला तुमचे अकाउंट्स सांभाळायला देत नसाल, तर कोणताही सिए फायनँशिअल डिटेल्सबघून तुम्ही टॅक्सचोरी केली आहे ते सिद्ध करू शकतो. म्हणजे उद्या (थोडं वैयक्तीकपणाचा दोष पत्करून) तुम्ही सरकार विरुद्ध काही बोललात तर मला खात्री आहे की तुम्हाला किमान करचोरी प्रकरणात अडकवलं जाइल.

दुसरं एक उदाहरण म्हणून एका सर्वे मध्ये रँडम ठिकाणी रस्त्यावरच्या ५००० दुचाकी धारकांची तपासणी केल्यावर ९५% लोकांकडे सगळी कागदपत्रं (लायसन्स, इन्श्युरन्स, आरसी-टीसी, पियुसी वगैरे) नव्हती. यात फक्त कागदपत्रं तपासली होती. बाकी नंबर प्लेट, दोन्ही आरसे, हेलमेट, सगळ्या लाईट्स वगैरे तपासलच नव्हतं. म्हणजे एकुण कायदे पाळण्यात आपण सगळेच किती उदासिन आहोत. याचं खापर फक्त नागरिकांवर फोडता येत नाही.

दादा कोंडके's picture

11 Sep 2020 - 1:49 am | दादा कोंडके

या तफावतीमुळे ती तपासणारी यंत्रणासुद्धा एखादी घटणा किती बेकायदेशीर आहे त्याचा न्यायनिवाडा त्या वेळची परिस्थिती, गुन्हा करणारी व्यक्ती, गुन्हा किती गंभीर आहे, वरून आलेले आदेश वगैरे बघून घेत असते. असो.

कंगनाच्या घराची तोडफोड , अर्णव वरचा हक्कभंग. गेली ५ वर्षे खिशातले राजीनामे बाहेर काढायची हिम्मत नव्हती, आता एका दिवसात नोटिस आणि कारवाई.
मुजोरपणे सत्ता राबवणे शिवसेनेला फार लवकर जमले. जनता पाहते आहे (अजुन काय पर्याय आहे?)

आणि ह्यांच काय चाल्लय बघा,
म्हणजे सौम्य शब्दात सांगायचे झाले तर झालय असं की, "पक्षाला राहायला राजवाडा दिला तरी तो राहाणार झाडावर घरटे करुनच"!!

प्रसाद_१९८२'s picture

9 Sep 2020 - 2:22 pm | प्रसाद_१९८२

सामनातून इतर राजकिय नेत्यांवर अत्यंत खालच्या भाषेत येथेच्छ टिकाटिप्पणी करायला मागे पुढे पाहात नाहीत हे पेंग्विन. मात्र यांच्यावर कोणी टिका केली, तर मात्र मुंबई, महाराष्ट्र, छत्रपती शिवराय व महाराष्ट्रातील ११ कोटी जनतेचा अपमान होतो. ज्यांना उभ्या आयुष्यात तीन आकडी आमदार निवडणुन आणता आले नाहीत ते अकरा कोटी जनतेच्या अपमानाची भाषा करतात? अर्थात खंडणीखोरांच्या हातात सत्ता दिल्यानंतर त्याचे काय परिणाम होतात याचे जिते जागते उदाहारण आहे आजचे पेंग्विन सरकार.

मागे 'मुंबई तुझा माझ्यावर भरवसा नाय काय' असे गाणे म्हणून मुंबईत पडलेल्या खड्ड्यांवर व साचणार्‍या पाण्याबाबत प्रश्न विचारणार्‍या आरजेच्या घरात डेंगुच्या आळ्या शोधायला पालिकेचे अधिकारी पोहचले होते, त्या 'आरजे मलिष्का'ने कोणते अनधिकॄत बांधकाम केले होते ? एरवी 'मिडीया की आजादी', 'बोलने की आजादी' बद्दल आवाज उठवणारे आता कुठे गायब झालेत ?

टर्मीनेटर's picture

9 Sep 2020 - 2:40 pm | टर्मीनेटर

जनता पाहते आहे... पुढच्या महापालीका आणि विधानसभा निवडणुकीत सेनेला फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे ह्या सगळ्याची.
बाळासाहेब परत या.... तुम्ही मोठ्या कष्टाने उभी केलेली एक सामर्थ्यशाली संघटना तुमचे वारसदार धुळीला मिळवायला निघाले आहेत असा आक्रोश कट्टर शिवसैनीक आता करू लागले आहेत.

नीलस्वप्निल's picture

9 Sep 2020 - 4:10 pm | नीलस्वप्निल

अगदि खर.

आर जे मालिष्का ने 'मुंबई तुझा बीएमसीवर भरवसा नाय का' केले होते तेव्हा दुसऱ्याच दिवशी बीएमसीने तिच्या घरी धाड टाकून कुंडीत डेंग्यूच्या अळ्या तत्परतेने शोधून काढल्या होत्या त्याची आठवण झाली.
सेनेचे राजकीय भवितव्य काही खरं दिसत नाही.

कपिलमुनी's picture

9 Sep 2020 - 2:53 pm | कपिलमुनी

पुढच्या इलेक्शनला भाजप सोबत युती केली म्हणजे पुन्हा झेंडा हाती घ्यायला लागेल तेव्हा दमाने घ्यावे

प्रकाश घाटपांडे's picture

9 Sep 2020 - 3:02 pm | प्रकाश घाटपांडे

हॅहॅहॅ

सागर गुरव's picture

9 Sep 2020 - 3:10 pm | सागर गुरव

त्या वेळेस भाजपाचा झेंडा हाती घेऊ की, सेनेचा झेंडा कोण हातात घेतोय?

शा वि कु's picture

9 Sep 2020 - 4:10 pm | शा वि कु

खरंय...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Sep 2020 - 12:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खरंय.....! भाजपावाल्यांना दमच निघत नै.

-दिलीप बिरुटे

लाचारी ही शिवी नाही ती तडजोड असते वेळ पडेल तेव्हा.

केंद्रात कोणाची ही सत्ता असू ध्या पण केंद्रीय सत्ते.नी नेहमीच महाराष्ट्र चा द्वेष केला आहे.
अगदी ताजी उदाहरण घ्यायचं झाले तर कसाब ला पुरवलेल्या केंद्रीय सुरक्षा दल च खर्च महाराष्ट्र कडून वसूल करावा असे त्या वेळी चालले होते.
मुंबई वरील हल्ल्यात अनेक पोलिस अधिकारी शहीद झाले पण जेव्हा ब्लॅक कॅट कमोंडो कारवाई साठी आले तेव्हा मीडिया स्पष्ट असे .म्हणत होती .
मुंबई मराठी लोकांची आहे असे म्हणता मग परप्रांतीय कॅमोंडो च मुंबई ला वाचवायला बोलवायला लागले.
असे प्रश्न उभे करून जे पोलिस शहीद झाले त्यांचा अपमान केला गेला.
मुंबई,पुण्यात महाराष्ट्र सरकार नी निर्माण केलेल्या infrastructure चे कधीच कौतुक हिंदी मीडिया,इतर राज्यातील नेते ,केंद्र सरकार करत नाही.
त्याच infra चा फायदा घेवून श्रीमंत झालेले मुंबई मध्ये महाराष्ट्र कुठे असा खोचक सवाल करतात.
.मुंबई नसेल तर ते सुद्धा श्रीमंत राहणार नाहीत हे सत्य लपवून ठेवतात.
त्या महाराष्ट्र मध्ये स्थानिक पक्षांचेच सरकार हवे.
Bjp पण नको आणि काँग्रेस पण नको.
सेना राष्ट्रवादी हा उत्तम पर्याय आहे.

सेना राष्ट्रवादी हा उत्तम पर्याय आहे.... एकत्र नको ... एक हाती सत्ता एका पक्षाला... जसे तमीळनाडु, आन्ध्र, वैगरे...

शा वि कु's picture

9 Sep 2020 - 4:16 pm | शा वि कु

ही मोडतोड काय आकस ठेऊन केली आहे ते स्पष्ट आहे.

Gk's picture

9 Sep 2020 - 4:27 pm | Gk

बेकायदेशीर आहे ते पाडले,

कायदेशीर असते तर कंगणाने कायदेशीर उत्तर दिले असते.

कोविड असताना का पाडले , हा बचाव सध्या चालला तरी बेकायदेशीर बांधकाम आहे हेच तिनेही सांगितले आहे.

आनन्दा's picture

9 Sep 2020 - 4:43 pm | आनन्दा

थोडे दिवस थांबा.. कधी मजा येते ती बघा.
प्रतिसाद नोट करुन ठेवतोय.. उद्या जर कोर्टाने थोबाडीत दिली तर इथे नमूद करायला विसरू नका म्हणजे झाले.

सुबोध खरे's picture

10 Sep 2020 - 11:59 am | सुबोध खरे

बेकायदेशीर बांधकाम आहे हेच तिनेही सांगितले आहे.

कुठे सांगितले आहे?

Rajesh188's picture

9 Sep 2020 - 4:40 pm | Rajesh188

कंगना नी अगोदर च बॉलिवूड मधील अनेक लोकांवर खोटे आरोप केले आहे.
येथून पुढे तिला कोण सिनेमात घेईल ह्याची शास्वती कमीच आहे.
आता bjp च्य नादाला लागून राजकीय दुश्मन पण निर्माण केले आहेत.
आणि तिची जुनी केस ओपन करायची सरकार तयारी करेल.
ती राहते त्या घरात सुद्धा तिनी बेकायदा बांधकाम केले आहे .
2018 मध्येच तिला नोटीस दिली आहे.
आता ते पण पाडले जाईल हे नक्की.
ठाकरे च्य रायगड मधील फार्म हाउस मध्ये जबरदस्ती नी प्रवेश केला म्हणून 3 लोकांना ats ni पकडले आहे.
ते aarnav टीव्ही चे पत्रकार होते अशी माहिती आहे.

मदनबाण's picture

9 Sep 2020 - 5:04 pm | मदनबाण

मुंबईत हजारो अनधिकृत बांधकामे आहेत, ती कोण्याच्या नजरेस कशी काय पडत नाहीत ? कंगना म्हणते की तिचे बांधकाम अनधिकृत नव्हते, पण इथे हे गृहित धरुन चालुया की ती खोटे बोलत आहेत. पण आज अचानक बीमएसीने ती मुंबईत नसताना का पाडले ? तिच्या वकिलाने तिच्या वतीने कायदेशीर उत्तर दिले असुन देखील तिला तिची बाजु मांडायचा वेळ आणि अधिकार का नाकारला गेला.याच बरोबर मुंबई उच्च न्यायालाचा ३० सप्टेंबर कोणतेही बांधकाम पाडता येणार नाही असा आदेश दिला असताना देखील बीएमसी ने या आदेशाचे पालन का केले नाही? याच बरोबर माननिय न्यायालयाच्या आदेशाचा आणि पर्यायाने न्यायालयाचा अपमान / अनादर करत आहोत हे बीएमसीला लक्षात आले नाही का ?
संदर्भ :-
कंगनाच्या वकिलाने बीएमसीच्या नोटिसला दिलेले उत्तर :- https://pbs.twimg.com/media/EhZDpPrUcAMWbU4?format=jpg&name=large
टिवटिव दुवा :- https://twitter.com/KanganaTeam/status/1303303598730702849
मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश :- https://twitter.com/adv_chandnishah/status/1303594876655738881/photo/1
टिवटिव दुवा :- https://twitter.com/adv_chandnishah/status/1303594876655738881
याच बरोबर कंगनाने मुंबई पोलिसांचा अपमान केल्याचे सातत्याने बोलले गेले आहे, याच मुंबई पोलिसांच्या बद्धल माजी मुख्यमंत्री यांनी सध्याच्या मुखमंत्र्यांनी काय उद्गार काढले होते ते खालील व्हिडियोत कळेल.

जाता जाता :- सत्तेत असलेल्या एका पक्षाच्या मुंबईत आणि संपूर्ण महाराष्ट्रात जागो-जागी शाखा आहेत, या सर्व शाखा अधिकृत आहेत का ? याची माहिती कुठे मिळेल का ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- #TwoBinsLifeWins [ मेरा बाबा देश चलाता है ]

चिर्कुट's picture

9 Sep 2020 - 5:25 pm | चिर्कुट

१. तिला २०१८ पासुन अनेक वेळा नोटिसा दिल्या गेल्या होत्या असं वाचलं
२. ती स्वतःच ट्विट करून "जो उखाडना है उखाड लो' असं आव्हान देत होती, त्यामुळे आता उखाडल्यावर रडायची काही गरज नाही
३. तिच्या मागे, सुशांतसिंग केस मागे लपून महाराष्ट्र राज्य सरकारची बदनामी कोण करतंय हे सगळ्यांना चांगलंच माहिती आहे
४. इथे फक्त अनधिकृत बांधकाम पाडलंय... फॅसिझम कशाला म्हणतात बघायचं असेल तर डॉ. काफील खान, संजीव भट्टची केस पाहून घ्या असं सुचवतो.

बाकी फॅसिझम वाईट, लोकशाहीची किंमत वगैरे बर्याच लोकांना आज कळतंय हे बघून आनंद झाला.

शेवटी माझं मत -
राज्य सरकारनं चुकीचं धोरण निवडलं. यांच्याकडे दुर्लक्ष करायला पाहिजे होतं. करोणाच्या काळात तरी असल्या फालतू राजकारणाची गरज नाही. भले समोरचे सगळी ताकद तुम्हाला फेल करण्यासाठी लावत असले तरी.

शा वि कु's picture

10 Sep 2020 - 10:45 am | शा वि कु

+१

हा धागा मधेच बोर्डावरून गायब झाला होता.. नेमकी भानगड काय होती?

विजुभाऊ अप्रकाशित झालेला धागा परत प्रकाशित झाल्या बद्धल अभिनंदन !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Rafale Jets Induction Live: Boost for IAF amid India China feud, 5 Rafale jets formally join Indian Air Force

सुबोध खरे's picture

10 Sep 2020 - 12:08 pm | सुबोध खरे

We find the above conduct of the MCGM highly deplorable, more so since
the MCGM was well aware that a Writ Petition would be filed
by the Petitioner before
this Court at any time, and an application seeking urgent orders will be moved by the
Petitioner, and MCGM had therefore filed a Caveat before this Court. We therefore,
informed Senior Advocate Shri Sakhare that such conduct on the part of the MCGM
is totally unacceptable to the Court. However, Shri Sakhare immediately arranged to
bring the Assistant Municipal Commissioner as well as the Executive Engineer (B&F)
ssp 7/10
wpl_3011_of_2020__09.09.2020__PART_I.doc
of H/W Ward of MCGM online to answer the queries raised by the Court.
7. In response to the queries put to the Assistant Municipal Commissioner, H/
W Ward as well as the Executive Engineer, they have informed the Court as follows:
7.1 That on 5th September, 2020 i.e. Saturday, the Building Mukadam whilst he
was in the H/West Ward, noticed some work going on in the said Premises and also
certain debris lying outside the said Premises.
7.2 The Mukadam informed about the same to the Assistant Engineer (B&F) of
the MCGM.
7.3 The Assistant Engineer (B&F) of the MCGM, who is the Field Officer,
informed about the same to the Designated Officer, (B&F), who is the Executive
Engineer of H/W Ward of the Corporation.
7.4 The Executive Engineer along with others visited the said Premises on 7th
September, 2020 at 11.00 a.m. (Monday), where Shri Nikhil Surve, Manager of the
premises of the Petitioner was also present. After Shri Nikhil Surve took permission
from Ms. Rangoli, sister of the Petitioner over the phone, the Executive Engineer and
others were given access to the said Premises. The Executive Engineer and others
inspected the said Premises and prepared inspection notes, inspection report and also
notice under Section 354A, addressed to the Petitioner, on the same day i.e. 7th
September, 2020, and pasted the Notice on the outer door of the said Premises on 8th
September, 2020 (Tuesday) at 10.03 a.m.
ssp 8/10
wpl_3011_of_2020__09.09.2020__PART_I.doc
7.5. Exactly after 24 hours, MCGM started the demolition work, which is
stopped few minutes back in view of the oral directions of this Court.
8. Section 354A of the Act (which is invoked by the MCGM by issuing the
impugned Notice dated 7th September, 2020), sets out the ‘power of Commissioner to
stop erection of building or work commenced or carried on unlawfully.’ From the works set
out in the Notice, it is clear beyond any doubt that the works which are ‘unauthorised’
have not come up overnight. However, all of a sudden, the Corporation appears to
have overnight woken up from its slumber, issued Notice to the Petitioner, that too
when she is out of the State, directing her to respond within 24 hours, and not
granting her any further time, despite written request, and proceeding to demolish the
said Premises upon completion of 24 hours. Though the manner in which the
MCGM has proceeded to commence demolition work of the said Premises, prima
facie does not appear to be bonafide and smacks of malafide,
we are giving an
opportunity to the MCGM to explain its stand / conduct on Affidavit by 3.00 p.m.
tomorrow.
9. We cannot help but mention here that if the MCGM would act with similar
swiftness qua the numerous unauthorized constructions in this City, the City would be
a completely different place to live in.

10. In the circumstances, we pass the following Order :
(i) We allow the Petitioner to carry out necessary amendments to the Petition.
ssp 9/10
wpl_3011_of_2020__09.09.2020__PART_I.doc
(ii) We direct the MCGM to file its Affidavit in Reply by 3.00 p.m tomorrow.
(iii) In the meantime, the MCGM is restrained from carrying out any further
demolition qua the said Premises mentioned in the impugned Notice.
(iv) Stand over to 10th September, 2020 at 3.00 p.m.
11. This Order will be digitally signed by the Private Secretary of this Court. All
concerned will act on production by fax or email of a digitally signed copy of this
Order.

मा उच्च न्यायालयाच्या कालच्या अंतरिम निकालाचे शेवटचे पान येथे शब्दश: देत आहे.

अवांतरा पासून सुरुवात करतोय मग मुद्द्यावर बोलतो -

एप्रिल पासून बातम्या पाहत नव्हतो आणि नाही, त्यामुळे यावेळेस काय काय घडले हे नक्की नीट पाहिलेले वाचलेले नाही..

मध्ये सुशांत सिंग मेला आणि त्या अगोदर इरफान दोघे गेल्याचे दुःख वाटले.. ऋषी. कपूर वय होते म्हणुन इतके काही वाटले नव्हते, बच्चन तिकडे गेलेला आवडले होते.. जुनी मैत्री विसरायची नाही..

कंगना चे दरवेळेस चे स्टान्स मला आवडले होते, वाटायचे ही बिनधास्त तोंड देते, ऋत्विक आवडत असूनही मी कंगना ला पाठींबा दिला, कारण मला तिचे बोलणे खरे वाटत होते..

पण सुशांत च्या केस मध्ये ती पडली त्यानंतर तीचा वापर केला जातोय किंवा ती करून देते हे मला वयक्तिक वाटते आहे...

आता मुद्द्यावर येतो
-

शिवसेना, तसे पाहिले तर शिवसेना शांत, कायदेशीर कधी नव्हती, त्यांनी आता ही कुठलेही y security कोणाला दिली तरी विमान पण उतरवून नसते दिले..
उलट कायदेशीर मार्गाने त्यांनी उत्तरे द्यायला सुरुवात केली आहे हे मला जास्त चांगले वाटले.. आणि हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या संगतीने झालेय असे वाटते.. आणि सेनेचा हा बदल मला योग्य वाटतो..
सरकार बनवताना हि उद्धध्व यांनी एक स्टेटमेंट दिले होते, इतके वर्ष आम्ही धर्मावर आधारित राजकारण केले ती चूक होती.. हे हि वाक्य खुप जबाबदारीने आणि हिमतीने म्हणले गेलं आहे.. आणि हा बदल हि मला योग्य वाटतो..

उद्धव ठाकरे मला कधीच आवडत नव्हते, पण ज्या पद्धतीने ते वागत आहे, ते अतिशय योग्य वाटत आहे, कोविड नसता तर त्याचे मुख्यमंत्री पद जास्त उठून दिसलेच असते असे मला 100% वाटते.

कोर्टाचा आदेशा विरोधात अनुधिकृत बांधकाम पाडले असेल तर कंगना ने कोर्टातर्फेच शिवसेनेला आव्हान द्यावे..

शिवसेनेचे हे बदललेले रूप मला आवडलं आहे.. कोणाला आवडू वा ना आवडू..

शाम भागवत's picture

10 Sep 2020 - 1:16 pm | शाम भागवत

भाजप व राष्ट्रवादी यांचना अपेक्षीत असलेले ध्रृविकरण छान चाललंय अस माझं मत आहे. दोधांनाही आपली मतदान टक्केवारी वाढवायची आहे. त्यासाठी कोणाला तरी घरी बसवायला लागते.
महाराष्ट्रात समाजवादी, प्रजा समाजवादी, माकप, भाकप, शेकाप वगैरे सगळ्यांना घरी बसवून झालंय.
आआप जन्म होता होताच खाली बसलाय. बसपा पण फारसा राहिला नाहिये. राठा यांना घरी बसवून झालंय.

आता उठा यांना घरी बसवून त्यांची मते भाजप व शिवसेना वाटून खाणार. खाण्यासाठी फक्त तेवढंच शिल्लक आहे म्हटल्यावर ते दोधे करणार तरी काय?

पण सामान्यांना हे कळू नये म्हणून मग सुशांत, कंगनाची फोडणी द्यायची. शिवाय या फोडणीमुळे फोडाफोडीला/फाटाफूटीला चांगली गती मिळून काम सोपे होते.
असो.

आपला अनुभव जास्त आहे, आणि राजकारण बद्दलची मते हि जास्त अभ्यासू असतात,
मला यावेळेस मात्र भाजपा आणि राष्ट्रवादी ला मिळून हे अपेक्षित असे काही वाटत नाही..
आणि उद्धव ठाकरे ना घरी बसवायचा वगैरे मुद्दा कदाचीत भाजपा मनात ठेवून असेल राष्ट्रवादी नक्कीच नाही..

सुशांत कंगना ची फोडणी, अर्णब चे शो ह्या सगळ्यामागे राष्ट्रवादी नक्कीच नाही हे कोणीही सांगू शकते..

मी जर भाजपा समर्थक असतो तर पार्टी with diff, व्यक्तिपूजा, चुकीला हि झाकून ठेवणे, आमदार फोडून आणि नाही जमले तर राहुल गांधीला पप्पू म्हणुन बाजार उठवला तसा jr. ठाकरे याचा बाजार उठवू पाहणे.. हे सगळे मला वयक्तिक खुप खालचे राजकारण वाटते.. आणि ह्या पक्षाचे समर्थक होणे मी बंद केले असते..

सरकार पडणार, फोडाफोडी होणार हे सगळे स्वप्न आहे, असले काहीच होणार नाही..
आणि झाले तरी भाजपा चे हात जे अनेक फोडाफोडी करून काळे झालेत ते कधीच पांढरे होणार नाहीत.

भाजपा ने जे विकासाचे, पार्टी with diff चे, acche din चे जे स्वप्न दाखवले होते त्यात ते कुठेही खरे उतरले नाहीत..
परवा कुठे तरी वाचत होतो मिपावर, कोणीतरी लिहिले होते
राहुलगांधी, mim यावर लिहून हे बदलले अजुन काय acche din पाहिजे..
अरे तुम्हाला हे acche din दाखवण्यास सत्तेत आणले होते का? हा प्रश्न मतदार स्वतःला पण विचारत नाहीये..

मला तर एका पक्षाची तळी भरणारेच आजकाल सगळ्यात जास्त दोषी वाटतात.. जे चूक ते चूक जे बरोबर ते बरोबर यात पवार, मोदी, उद्धव, शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप येतोच कुठे?

पण कितीही चूका केल्या तरी आपण समर्थन करणारे पक्ष योग्य आणि इतर भिकार असे समजणारे मला आजच्या या परिस्थित तितकेच दोषी वाटतात..

त्यात देश नही बिकने दूंगा म्हणत.ज्या संस्था pravite करताना त्याची भागीदारी विकली जात आहे त्याचे हि कोणाला काही नाही..
उलट हेच कसे बरोबर हे सांगितले जातेय.. मग हे बरोबर असेल तर देश नही बिकने दूंगा काय होते? कोण देश विकत होते?
हिंदू खतरे मे? अरे इतक्या वर्षात जो खतरा नव्हता तो आत्ता आला का?

असल्या राजकारणाचा वीट आलाय..

चला थांबतो, मार्च पासून राजकारण पार बाजूला ठेवले hote, असे राजकीय धाग्यावर एक रिप्लाय दिला की मग विचारांच्या अश्या लाइनीच्या लाईनीच उगाच लिहिल्या जातात..

थांबवतो.. राजकारणावर ण बोललेले बरे..

कन्गना ने बन्गला शरद पवार ह्यान्च्या जवळ्च्या माण्साकडुन विकत घेत्लेला आहे

अथांग आकाश's picture

10 Sep 2020 - 2:21 pm | अथांग आकाश

माफ करा पण
>>>यात देश नही बिकने दूंगा म्हणत.ज्या संस्था pravite करताना त्याची भागीदारी विकली जात आहे त्याचे हि कोणाला काही नाही..
उलट हेच कसे बरोबर हे सांगितले जातेय..>>>

यात देश नही बिकने दूंगाचा आणि Privatization च कनेक्शन समजल नाही.

हो, पुढच्या लाईन मध्ये हेच विचारले आहे..

देश नही बिकने दूंगा काय होते? कोण देश विकत होते?
हि घोषणा नक्की कशा साठी होती, या आधी कोणी देश विकला होता?
देश विकणे म्हणजे मग नक्की काय?

खाणी, तेल, रेल्वे, विमानतळे, defense या सारखी आणि इतर सरकारी संस्था किंवा त्यातील भागीदारी विकणे म्हणजे देश विकणे नाही का? आणि नसेल तर देश नही बिकने दूंगा काय होते?

बाकी private करणे म्हणजे, आपली सरकारी हिस्सेदारी विकणे होय..
देश नही बिकने दूंगा म्हणजे मग नक्की काय होते हाच प्रश्न मला पण पडलाय

शाम भागवत's picture

10 Sep 2020 - 2:39 pm | शाम भागवत

गणेशाजी, मी पुढची मुंबईची मनपाची निवडणुक झाल्यावर निवडणूक टक्केवारी पाहून नक्की काय ते सांगेन. माझ्यामते ती निवडणूक व्हायच्या अगोदर २-३ महिने शिवसेनेचे नगरसेवक राजिनामा देऊन बाहेर पडायला लागतील.

पण भाजपा असो की राष्ट्रवादी असो, किंवा आणखीन कोणी असो. कोणितरी मोठे होण्यासाठी कोणत्यातरी एका राजकीय पक्षाला आत्महत्या करायलाच लागणार आहे. ती काळाची गरज आहे.

सध्यातरी उठा कार्यक्षम मुम बनू शकत नाहीत एवढे जरी सिध्द झाले तरी पुढच्या निवडणुकात राष्ट्रवादी व भाजपाला त्याचा फायदा होईल एवढे साधे गणित आहे असे माझे मत आहे. जर शिवसेना झटकन चिडत असेल तर तिला राग येईल असे करायचे की झाले. मग ते आपणहून चूकीची पावले किवा भाषा वापरतात. जेवढ्या प्रमाणात हे घडेल तेवढ्या प्रमाणात अजीत पवार चांगले मुम बनतील असं पुढच्या निवणुकीत सांगता येऊ शकते. भाजपाचा मुम चेहरा तयार आहेच. काॅंग्रेसकडे तर चेहरेच चेहरे आहेत!

हल्लीच्या निवडणुकांत मुमच्या चेह-याला जास्त महत्व आलंय. हा खूप मोठा बदल आहे. हे लक्षात आल्यामुळे राठांनी देखील मुम बनण्याची घोषणा मागे कधीतरी केली होती!!

उठा मुम झाल्यावर इथे बरेच जण त्यांच्याबद्दल चांगले बोलत होते. आता ते प्रमाण कमी होतंय. याचा अर्थ या राजकारणाला यश येतंय असा मी घेतला आहे.

आपले पक्षीय प्रेम बाजूला ठेवता आले तर कोणीच वाईट किंवा चांगले असे न दिसता ही लोकं फक्त बुध्दीबळ खेळताहेत असंच दिसेल.

शाम जी, तुमच्या पेक्षा मी अर्ध्या वयाचा असेल, त्यामुळे जी वगैरे नका बोलू.
गणेशा बोला फक्त..

बाकी तुमचा टक्केवारीचा धागा आणि विश्लेषण वाचेलच.

उद्धव ठाकरे माझ्या मते जास्त चांगले मुख्यमंत्री आहेत असे वाटते मला.. अजित पवार कसे हि असले तरी काम कारण्याचा धडाका त्यांचा जबरदस्त आहे.. रोखठोक.. पण मुख्यमंत्री उद्धव जास्त शोभतात आणि हे मला वाटेल असे कधी वाटले नव्हते..
बाकी प्रतिमा मलिन करणे हे भाजपा 2014 पासून करते आहे.. सोशल मीडिया, it cell ह्या काळातच विक्राळ रूप घेऊन आलाय..

पण हे बुमरँग पण होते, आणि त्याची फळे त्यांना पण मिळतीलच..

कानडाऊ योगेशु's picture

10 Sep 2020 - 3:24 pm | कानडाऊ योगेशु

माझ्यामते ती निवडणूक व्हायच्या अगोदर २-३ महिने शिवसेनेचे नगरसेवक राजिनामा देऊन बाहेर पडायला लागतील.

पण ते जातील कुठे?
माझ्या मते आयारामांना पक्षात घेऊन देवेंद्रजींनी फार मोठी चूक केली आहे आणि ते पुन्हा अशी चूक करणार नाहीत.

जागावाटप शिवसेनेला त्रासदायक असणारेय. तिघांत वाटण्या करायच्या आहेत. तर भाजपाला कोणाला फारसं काही वाटायचं नाही. त्यामुळे भाजपात नाराजी नसणरेय. तर शिवसेनेत असणारेय. आपल्या जागा टिकवायच्या व शिवसेनेच्या वाट्याच्या जास्तीत जास्त मिळवायच्या हे धोरण भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेसचे असणारेय असं मला वाटतेय. त्यामुळे शिवसेनेचा आत्ताचा नगरसेवक मिळत असेल तर भाजप संधी सोडेल असं वाटत नाही.
शेवटी हे नगरसेवकांच्या संख्येचे राजकारण आहे. हे असेच चालणार.

अथांग आकाश's picture

10 Sep 2020 - 4:22 pm | अथांग आकाश

बरोबर आहे! पटतंय!!

राघव's picture

14 Sep 2020 - 11:15 am | राघव

फक्त हे २-३ महिने अगोदर न होता एक-दीड वर्ष अगोदर होईलसं वाटतं.

- कॉ+राकॉ समवेत जाऊन सेना मतं मागायला लोकांकडे जाईल असं वाटत नाही. तसंही ते केलं तर भाजपला ध्रुवीकरणाचा सरळसोट फायदा होईल.
- सेना वि भाजप वि कॉ+राकॉ असं झालं तरीही भाजपलाच सगळ्यात जास्त फायदा होईल. त्यामुळे अशीच वेळ आली तर कॉ आणि राकॉ पण वेगळे लढतील. चौरंगी लढतीचा आधीचा निकाल पाहता आणि नंतरचा कालखंड पाहता, संपूर्ण बहुमतानं कोणताही पक्ष जिंकणार नाही. त्यामुळे पुन्हा तडजोडीचेच राजकारण. फरक शून्य.

यात भाजप आणि सेना एकत्र येऊनच पुढे गेल्यास सगळ्यात योग्य आहे.
सध्याची चिखलफेक बघता ते सहजशक्य नाहीच. त्यात पुन्हा आग लावून नामानिराळे राहणारे जाणते राजे आहेतच.
पण राजकारणातल्या राजकीय लाभासाठीच्या कोलांटउड्या अनाकलनीय असतात. त्यामुळे हे अगदीच अशक्य आहे असंही नाही. :-)

आनन्दा's picture

14 Sep 2020 - 12:11 pm | आनन्दा

आता शिवसेनेशी युती भाजपचे मतदार सहन करतील असे वाटत नाही..

सध्या
परत सत्ता नाही अली तरी चालेल, अजित पवार पण चालेल, पण शिवसेना नको असाच सूर बहुतांशी पारंपरिक मतदारांचा आहे.

Sample सेट मर्यादित

काही जण, हिन्दुत्ववादी युती सोडुन शिवसेना गेल्यावर पण शिवसेनेबद्दल शांत होते.
शिवसेनेच्या सोबतीने आघाडी मध्ये जर हिन्दुत्ववादी राजकारणाची सुरुवात होणार असेल काय हरकत आहे, हा त्या मागचा विचार. नाहीतरी सध्या हिन्दुत्ववादी मते भाजपला एकट्यालाच मिळत आहेत.

शिवाय एका मराठी प्रादेशिक पक्षाने, राष्ट्रिय पक्षाला धक्का दिल्याचा नाही म्हटले तरी आनंद होताच. अर्थात हा आनंद काही फार काळ टिकला नाही. भाजपवर सेना गुरकावत तरी होती. इथे काँग्रेस समोर शिवसेना गप्प बसते.

पण सत्ता स्थापनेपासुन शिवसेनेच्या निधर्मी होण्यासाठी चाललेल्या कोलान्टऊड्या, कंगना प्रकरणाची हाताळणी आणि नौदल अधिकार्‍याला मारहाण, ह्याशिवाय शिवसेनेवर टीका केली म्हणुन इतर हिन्दुत्ववादी कार्यकर्त्यांनावर दाखल होणारे गुन्हे यातून गेलेला संदेश म्हणजे शिवसेनेने हिन्दुत्ववादी राजकारणाला दिलेली सोडचिठ्ठी, त्यामुळे परत सेना नकोच.

खरे आहे.. पण गोची अशी आहे की, थोरले पवार असेपर्यंतच राष्ट्रवादी आजच्या स्वरूपात राहील..
त्यामुळे अजून ५ वर्षांनी जेव्हा ते फारसे सक्रिय नसतील तेव्हा राष्ट्रवादीचे नेमके स्वरूप काय असेल? त्यांच्यात अंतर्गत देखील खूप कुरघोडीचे राजकारण चालू आहे.
सबब, वादासाठी मान्य केले तरी शिवसेना आणि काँग्रेस यांची मते आटत जाऊन विभागली जाईल असे मला वाटत नाही.

अवांतर -
शिवसेना राष्ट्रवादी विलिनीकरण कसे वाटेल बघायला? शिवसेनेतल्या मोठ्या नेत्यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश द्यायचा.. उरलेल्यांना मनसेत पाठवायचे.. काँग्रेसमधले असंतुष्ट पण गळाला लावायचे, की झाले काम.

पण उत्तराधिकारी कोण?

महाराष्ट्रीय दृष्ट्या ने विचार केला तर,
शरद पवार, गोपीनाथ मुंडे, विलास राव देशमुख, नितीन गडकरी, बाळासाहेब ठाकरे, दिघे यांच्या नंतर ह्या जागा लवकर कोणी भरेल असे मला वाटत नाही..
शिवसेनेतील इतर नेते मला अजिबात अनुभव आणि कामाचा तडाखा असलेले वाटले नाहीत.. कामाच्या बाबतीत राष्ट्रवादी आत्ता सर्वात पुढे अ
आहेत असे मला वाटते तरी प्रतिमेच्या बाबतीत ते मागे पडतात..
भाजपाचे नेते, देवेंद्र, महाजन आणि चंद्रकांत पाटील हे नेते आणि आयात केलेले काही नेते यांना लोकनेता म्हणता येऊ शकते? हा प्रश्न त्यांना हि पडला पाहिजे..

राष्ट्रवादी मध्ये जयंत पाटील आणि नविन नेतृत्व रोहित पवार मला दिलखेचक वाटतात.. रोहित चे त्याच्या मतदार संघातील काम भारीच वाटतेय (काय केले विचारू नये, वेळोवेळी follow केले आहे, लोकांशी बोललो आहे तिथल्या.. येथे तो मुद्दा नसावा )
पण एकंदरीत असे नेते होणे नाही..

जसे देशाला अलीकडच्या काळात मिळालेले अटल बिहारी जी आणि मनमोहन सिंग यांच्या सारखे चांगले नेतृत्व मिळाले तसे देशात हि पुन्हा नेतृत्व मिळेल का असे वाटत नाही, पण माझा अवाका महाराष्ट्रा पुरता असल्याने कोणी तसे असेल अशी आशा करतो..

बाकी महाराष्ट्रात नंतर, पक्ष विलीन होतील का नाही माहित नाही, पण भविष्यात केंद्रातील बड्या नेत्यांपुढे महाराष्ट्राला कायम नमते घ्यावे लागेल, महत्वाची कॉन्ट्रॅक्ट,नविन उद्योग धंदे आणि इतर नविन project महाराष्ट्रात येण्याला अवघड होईल हे नक्की..
बऱ्याच लोकांना, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनेच कामे करावी लागतील..
महाराष्ट्रातल्या नेत्यांना कोणी विचारणार नाही.. आणि बरेच..

चार-पाच दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या DPIIT विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या व्यवसाय सुधार कृती आराखड्या (BRAP) अंतर्गत Ease of Doing Buissness २०१९ चं राज्यांना देण्यात आलेलं रँकिंग जाहीर करण्यात आलं. या रँकिंगमध्ये महाराष्ट्र तेराव्या क्रमांकावर आहे. याबाबत राज्याच्या विरोधी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी फेसबुकवर विस्तृत पोस्ट लिहून राज्य सरकारवर टीका केली.

महत्वाचं म्हणजे Ease of Doing Buissness २०१९ चं जे रँकिंग जाहीर केलं ते मुळातच केंद्र सरकारने सांगितलेल्या सुधारणा कशाप्रकारे अंमलात आणल्या या आधारावर केलेलं असून २०१९ साठीचं आहे. दुसरं म्हणजे २०१६ मध्ये या रँकिंगमध्ये महाराष्ट्र १० व्या क्रमांकावर होता, तर २०१७-१८ मधील रँकिंग मध्ये १३ व्या क्रमांकावर घसरला आणि २०१९ मध्येही हा १३ वा क्रमांक कायम आहे. आता यामध्ये महाविकास आघाडी सरकारचा काय संबंध? आणि समजा सबंध असेल तर मग यात फक्त सध्याच्या सरकारचीच जबाबदारी आहे का? मागच्या सरकारची जबाबदारी नव्हती का?

त्यामुळे विरोधाला विरोध न करुण आपण मुळ प्रश्न विचारात का घेत नाही, की आपली अधोगती का होतीये..

असो..

परवा कामासाठी चिपळूणला जाणे झाले. तिकडे परिचितांच्या घरी जवळच्या गावचे वयस्कर सरपंच आले होते. हे गृहस्थ हाडाचे शिवसैनिक. त्यांच्या व्यथा ऐकल्यावर असं होण्याची शक्यता जास्त वाटत्ये. त्यातले काही मुद्दे भावनिक असले तरी ते बरोबर वाटले. निवडणूक प्रचारादरम्यान प्रतिस्पर्धी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी झालेले राडे आणि राजकीय भूमिकेतून निर्माण झालेले शत्रुत्व यांचा चांगला फटका पक्षाला बसला आहे. शिवसेनेचे पद्धतशीर खच्चीकरण सुरु असून निवडून आलेला लोकप्रतिनिधी त्यांना सहकार्य करत नाही. त्यामुळे कामे होत नसल्याने गावकरी आणि कार्यकर्ते नाराज आहेत. आणीआमचे नेते मात्र ज्यांच्या विरोधात आम्ही रान उठवले होते त्यांच्या मांडीला मांडी लाऊन सरकारमधे बसले आहेत. ज्या छगन भुजबळांनी त्यांच्यासाठी देवासमान असलेल्या बाळासाहेबांना अटक करायला लावली होती त्यांच्या मुलाच्या मंत्रिमंडळात भुजबळांना दिलेले स्थान. त्यावरून पण नाराजी आहे.मला वाटते अशी लोकभावना राज्यात अनेक ठिकाणी असावी.अशी नाराज मंडळी भाजपा किंवा राष्ट्रवादी कडे वळण्याची शक्यता आहे.

कपिलमुनी's picture

10 Sep 2020 - 12:36 pm | कपिलमुनी

राज ठाकरेनी मोदी विरोधात लाव रे तो व्हिडीओ म्हणून सभा घेतल्या की लगेच त्यांना ईडी ची नोटीस येते , चौकशी मागे लागते , तेव्हा तुझा धर्म कुठे जातो राधेसुता ! हॅ हॅ हॅ ..

हे राजकारण आहे हे असेच असते.

राघव's picture

14 Sep 2020 - 11:25 am | राघव

राठांची तर जाणत्या राजांनी पार गोची करून टाकलेली आहे. इतकं पेटवलं रान, फायदा शून्य.
आता सेना भाजपसोबत नाही तरीही यांना भाजपसोबत जाण्यासाठी तोंड ठेवलेलं नाही. त्यामुळे न आड न विहिर.. इथं फक्त रुक्ष माळावरची पायवाट उरली आहे.
पण खरंतर आता त्यांनी संधी साधून भाजपसोबत हातमिळवणी करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावेत. सेनेचे भाजपसोबत पुन्हा सूत जुळायच्या अगोदर असे केले तर मनसेला जीवदान मिळण्याची चांगली शक्यता आहे.

Gk's picture

10 Sep 2020 - 12:43 pm | Gk

उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्राचे नेहरू झाले आहेत
दिल्लीवाल्या भाजपयाना काही विचारले की नेहरूंकडे बोट दाखवतात

महाराष्ट्र भाजपे ठाकरेंकडे बोट दाखवतात

राहता राहिला शिवसेना - कंगना आणि सुशांत चा विषय..

कंगना एक स्त्री असून तिला हरामखोर म्हणणाऱ्या संजय राऊत यांचा राग आला पाहिजे आणि कंगना ने मुंबई म्हणजे pok ची तुलना केल्याचा हि राग आलाच पाहिजे

अर्णब ज्या पद्धतीने बातम्या देतोय, जसे बडबड करतोय त्याचा हि राग आला पाहिजेच.. ज्या पद्धतीने दूरदर्शन ऐवजी बातम्यांचे क्रूरदर्शन चालू आहे ते हि नक्कीच आवडले नाही पाहिजे..

ड्रग पुरवणाऱ्या ला शिक्षा व्हावीच पण ड्रग घेणाऱ्या सुशांत ला पण त्या अनुशंघाने ड्रग घेणारा म्हणुन बघितलंच पाहिजे..
भले तो प्रतिभा संपन्न अभिनेता होता. आवडायचा.. पण तरीही..

कंगना एक स्त्री म्हणुन तिच्या विषयी आदराने बोललेच पाहिजे हे मला वाटते, तसेच दोषी सिद्ध न होता हि रियाची जी अवस्था पत्रकार, सोशल पोस्टकर्ते आणि इतर ठिकाणी केलेली आहे त्याबद्दल पण वाईट वाटलेच पाहिजे

ड्रग समूळ नष्ट झाले पाहिजेत, त्या ऐवजी त्या मागून चालणारे राजकारण पण संपले पाहिजे असे हि वाटलेच पाहिजे.
नाहीतर, कुठल्याही पद्धतीने आपल्या आवडत्या नेत्याचे, पक्षाचे समर्थन करताना, आणि विरुद्ध पक्षाला, नेत्यांना बोल लगवताना
आपण नक्की सगळीकडे सारखी भूमिका घेतोय हे आपल्याला तरी पटलेच पाहिजे..

चांदणे संदीप's picture

10 Sep 2020 - 5:05 pm | चांदणे संदीप

प्रतिसाद प्रचंड आवडलाय. जास्त लिहित नाही. भेटल्यावर बोलूच.

सं - दी - प

Gk's picture

10 Sep 2020 - 2:39 pm | Gk

ग

सागर गुरव's picture

10 Sep 2020 - 3:26 pm | सागर गुरव

प्रधानसेवक झालेच ना ते?

खूप मोठ्या प्रमाणावर आणि चुकीच्या पद्धती नी राजकीय पक्ष नेत्या वर सर्व माध्यमातून टीका झाली की लोकांची सहणभुती त्या नेत्याला पक्षाला मिळते.
गुजरात दंगली मध्ये माध्यमांनी मोदी ना टार्गेट केले होते त्याचा उलट परिणाम झाला आणि ते निवडणुका जिंकत च गेले.
कंगना ,आणि मीडिया च्या आडून जेवढे आरोप bjp आघाडी सरकार करेल त्याचा परिणाम म्हणून पुढच्या निवडणुकी नंतर सुद्धा आघडी सरकार च राज्यात सत्तेवर असेल.

सागर गुरव's picture

10 Sep 2020 - 3:46 pm | सागर गुरव

आघाडी सरकार मुळात सत्तेतच धोकेबाजी करुन आलेले सरकार आहे. मते युतीच्या नावाने मागायची आणि नंतर इतरांशी चुंबाचुंबी (हा शिवसेनेचाच शब्द) करुन सत्तेत बसायचे असा प्रकार आहे तो.

जनतेने हे ही पाहीले आहे...

Gk's picture

10 Sep 2020 - 4:19 pm | Gk

ऑप्रेषण लोचटचे महाराष्ट्रात मढे उठवले

सागर गुरव's picture

10 Sep 2020 - 4:49 pm | सागर गुरव

कधी झाले म्हणे?

सागर गुरव's picture

10 Sep 2020 - 4:54 pm | सागर गुरव

त्याच "ऑप्रेषण" ने मध्य प्रदेशात कोणाचे मढे उठवले?

Gk's picture

10 Sep 2020 - 4:57 pm | Gk

बाय इलेक्शन बाकी आहेत,

ते झाल्याशिवाय तुमचा तात्या विंचू उठणार नाही

माझा आत्मा तुझ्यात
तुझा आत्मा बाहेर

ऑपरेशन लोचटचा आद्य पितामह तात्या विंचू

सागर गुरव's picture

10 Sep 2020 - 5:22 pm | सागर गुरव

म्हणजे अंतिम संस्कार बाकी आहेत अजुन....

मग तुमच्या मते अजित पवार plus भाजपा यांनी जो शपथ विधी केला त्याला काय म्हणायचे?

सागर गुरव's picture

10 Sep 2020 - 4:50 pm | सागर गुरव

तो ही मुर्खपणाच होता..

आनन्दा's picture

10 Sep 2020 - 5:58 pm | आनन्दा

हे कधी?
जर सेना शांत राहून सहानुभूती encash केली तर..

हे म्हणजे समोरच्यालाच सहानुभूती मिळावी असे वागतात.

कसं होणार अश्याने?

नेताच कोणत्या ही राज्यातील जनतेला आवडतो.
पण जेव्हा काँग्रेस ची सत्ता महाराष्ट्रात होती तेव्हा सुद्धा तेव्हाचे मुख्यमंत्री केंद्रीय सत्ता आणि नेते ह्यांच्या दबाव खाली च काम करायचे. .
ह्याचे कारण फक्त मानसिक दुर्बलता हे नसून आपले अती देशप्रेम ( हा गुण की अवगुण मराठी लोकात आहे).
त्या मुळे केंद्र सरकार म्हणजे भारताचे सरकार त्यांचे ऐकावेच लागेल देश पहिला नंतर राज्य अशी विचारसरणी.
पण बंगाल पासून दक्षिण मधील अनेक राज्य राज्य फर्स्ट नंतर देश असाच विचार करतात त्या मुळे ह्या राज्यातील नेते,सरकार कधीच केंद्राच्या दबावात येत नाहीत सरळ विरोध करतात.
ही आपली वृत्ती वर विचार करण्याची वेळ आली आहे म्हणजे बंड करायचे नाही पण राज्य हिता च्या आड देश हित येवू धायचे नाही .
पोकळी निर्माण झाली की ती नक्की भरून निघेल शरद पवार नंतर त्यांची जागा नक्कीच भरून निघेल.
बाळासाहेब गेले म्हणून सेना संपली नाही.
दिघे गेले म्हणून ठाण्यात सेना संपली नाही.
इंदिरा जी गेल्या म्हणून काँग्रेस संपणार नाही एक दिवस नक्कीच राहुल गांधी भक्कम नेतृत्व देतील.

इंदिरा जी गेल्या म्हणून काँग्रेस संपणार नाही एक दिवस नक्कीच राहुल गांधी भक्कम नेतृत्व देतील.

lol त्या दिवसाची अधिरतेने वाट बघतोय

सागर गुरव's picture

10 Sep 2020 - 11:21 pm | सागर गुरव

भारत तर फार छोटा आहे हो, रा गा तर अमेरिकेसह चीनचेही नेतृत्व करतील हा विश्वास आहे...

सुबोध खरे's picture

11 Sep 2020 - 10:07 am | सुबोध खरे

भारत तर फार छोटा आहे हो, रा गा तर अमेरिकेसह चीनचेही नेतृत्व करतील हा विश्वास आहे...

हो ना

डॉकलाम प्रकरणाचे वेळेस त्यांनी चिनी राजदूताशी गुप्त खलबते हि केली होती.

सागर गुरव's picture

11 Sep 2020 - 11:07 pm | सागर गुरव

दम दिला असेल बहुदा.....दाऊदला जसा मुखपत्राच्या कम्पाउंडरनी...आपलं ते....संपादकांनी दिला होता तसा..

शा वि कु's picture

10 Sep 2020 - 3:56 pm | शा वि कु

दोन्ही धाग्यावरील प्रतिसाद आवडले.

धन्यवाद.. राजकीय मते मांडणे बंद केली होती, पण एक प्रतिसाद दिला की मग लिहिले 2-3 :-)

शा वि कु's picture

10 Sep 2020 - 5:27 pm | शा वि कु

.

BJP सेना युती मुळे मराठी मत शिवसेना मुळे.
मारवाडी आणि गुजराती लोकांची मत bjp मुळे युती ला हक्कानी मिळत होती.
Bhaiye ,बिहारी लोकांची गरजच लागत नव्हती सत्ता मिळवण्यासाठी.
पण bjp बरोबर नसेल तर मुस्लिम ,मराठी आणि मिळाली तर बाकीचे थोडेफार ह्याच मता वर अवलंबून राहवे लागेल .
मुंबई मध्ये सत्ता मिळणे आघाडी ला अवघड जाईल पण बाकी भागात राष्ट्रवादी मजबुत आहे

रविकिरण फडके's picture

10 Sep 2020 - 5:31 pm | रविकिरण फडके

आजचा प्रश्न:
विजुभाऊंचा मुद्दा काय आहे ते लक्षात न घेता आणि तेव्हढ्याचपुरते आपले प्रतिसाद मर्यादित न ठेवता लोक भरकटतात का?
असो.

गोंधळी's picture

10 Sep 2020 - 9:41 pm | गोंधळी
Gk's picture

10 Sep 2020 - 9:45 pm | Gk

वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लगीन करणार नाही , असेही ते तरुणपणी म्हणत होते म्हणे

Bjp la Kangna प्रकरण महागात पडणार हे नक्की.
आघाडी सरकार च हवं इथे असे लोकांना वाटत आहे.
Bjp fakt भावनिक प्रश्नात च लोकांना गुंतवून ठेवत आहे ह्याची जाणीव हळू हळू होत आहे.

सागर गुरव's picture

11 Sep 2020 - 9:27 am | सागर गुरव

Shivsena चे स्पेलिंग चुकीचे लिहीले आहे राजेश दादा ;)

गामा पैलवान's picture

11 Sep 2020 - 1:44 am | गामा पैलवान

विजुभाऊ,

कट्टर शिवसैनिक असूनही कंगणाच्या घराची तोडफोड मला खटकली. ती जर मुंबईस पाकव्याप्त काश्मीर म्हणंत असेल तर तिला प्रत्युत्तर द्यायचे इतर अनेक मार्ग होते. कोणते ते मला माहित नाही, पण उठांना माहित असणार.

असो.

या निमित्ताने कंगणास एक फुकट सल्ला देतो. तिला जर मुंबई पाकव्याप्त काश्मीरासारखी वाटंत असेल तर तिने लवकरात लवकर सोडलेली बरी.

आ.न.,
-गा.पै.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

11 Sep 2020 - 8:27 am | माईसाहेब कुरसूंदीकर

तिचे पूर्ण ट्विट काय आहे, ते पाहू ते रे पैलवाना
Sanjay Raut Shiv Sena leader has given me an open threat and asked me not to come back to Mumbai, after Aazadi graffitis in Mumbai streets and now open threats, why Mumbai is feeling like Pakistan occupied Kashmir?

https://www.opindia.com/2020/09/tylerstreetart-instagram-mumbai-deface-p...
म्हणून तिने पी ओ के म्हंटले आहे.
"असुरक्षित वाटत असेल तर ह्या देशात राहू नका" असे सल्ले भाजपावाल्यांकडुनही दिले गेले आहेत. तसे बोलणही चुकीचेच होते. असो.
मुत्सद्देगिरीचा अभाव सेना नेत्रुत्वाकडे दिसतो. घडली घटना की दे प्रतिक्रिया. उद्धव संयमी व विचार करणारे म्हणून ओळखले जातात. मात्र आजुबाजुचा त्यांचा गोतावळा कसा आहे माहित नाही. त्यात काँग्रसची अवस्था 'सहन होत नाही व सांगताही येत नाही " अशी.

गामा पैलवान's picture

12 Sep 2020 - 1:22 pm | गामा पैलवान

माईसाहेब,

गोष्ट उलगडून सांगितल्याबद्दल आभार! पण मग पाकव्याप्त काश्मीरपेक्षा जम्मू-काश्मीर ही उपमा चपखल ठरली असती (वैम).

आ.न.,
-गा.पै.

Gk's picture

11 Sep 2020 - 7:16 am | Gk

कंगणाने कवारणताईन व्हायलाही नकार दिला,

हिच्यासाठी हा नियम का लागू नाही ?

महाराष्ट्रात तुम्ही बाहेरच्या राज्यातून आलात आणि ७ दिवसाच्या आत परत जाणार असाल तर तुम्हाला महाराष्ट्रात क्वारंटाईन होण्याची गरज नाही असा नियम आहे.

मदनबाण's picture

11 Sep 2020 - 6:32 pm | मदनबाण

Kangana Ranaut tests Covid-19 negative, leaves Himachal home for Mumbai
कोव्हिड टेस्ट देखील करुन मुंबईत शिरल्या होत्या.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Rafale induction stern signal to adversaries, says Rajnath

मराठी_माणूस's picture

11 Sep 2020 - 7:38 pm | मराठी_माणूस

महाराष्ट्रातच एका जिल्ह्यातुन दुसार्‍या जिल्ह्यात गेल्यास काय नियम आहे ?

विजुभाऊ's picture

11 Sep 2020 - 9:45 am | विजुभाऊ

राऊत वाचळ पणाला शौर्य समजतात. इतरांच्या सौजन्याला त्यांचा कमकुवतपणा समजतात.
२७ ऑक्टोबर २०१८ साली राउतांनी अजित दादंवर एक अग्रलेख लिहीला होता त्यात अजित दादांचा उल्लेक इतक्या खालच्या पातळीवर केला होता की बोलवतही नाही.
https://www.saamana.com/saamana-editorial-on-ajit-pawar-statement-on-shi...
या अग्रलेखातली हिणकस भाषा राऊत वापरतात. कंगनाने तर एकही अपशब्द वापरलेला नाहिय्ये.
राउत कोणाच्या संरक्षणार्थ हे बोलत आहेत हे लपून राहीलेले नाहिय्ये.
पण राउतांना स्वतःला एक न्याय लावतात आणि इतरांना दुसरा न्याय .
ते जे बोलतात ते बिंधास्त असते आणि बाकीचे बोलले की मराठी माणसाची अस्मिता दुखावते.
खरे तर कंगना जे काही बोलली ते मुंबईत येवू नये म्हणून शिवसेना धमक्या देत असेल तर हे पी ओ के मधील अतिरेक्यांसारखेच आहे.
ती बोलली यात काही गैर आहे असे वाटत नाही.
राउतांनी मी तीला लहान मुलाचे कौतूक करताना आपण कधीतरी त्याला ' हरामखोर" असा शब्द वापरतो त्या अर्थाने हरामखोर म्हणालो.
अर्थात अजित दादांना गटारातला कीडा , मुतर्‍या तोम्डाचे असे म्हणणार्‍या राउत बहुतेक घरातही मुलाबाळांशी असेच बोलत असतील.
पण शिवसेना , संजय राउतांच्य तोंडाळपणामुळे स्वतःचीच नाचक्की करुन घेतेय हे नक्के.
शिवसेनेचे हे प्रकरण त्यांच्या सहकारी पक्षांना हे भोवणार आहे

विजुभाऊ's picture

11 Sep 2020 - 10:09 am | विजुभाऊ

आत्ताच आर टीव्ही वर पाहिले. राउतांच्या भावाने केबल ऑपरेटर्स ना रीपब्लीक चॅनेल दाख्वू नका म्हणून सांगितलय.
ही गळचेपीच आहे की.
अगदी पी ओ के सारखी

सुबोध खरे's picture

11 Sep 2020 - 10:23 am | सुबोध खरे

मला एक कळत नाही.

कंगना राणाउत काय बोलायचं ते बोलू द्या कि. तिच्या प्रत्येक वक्तव्याला बेफाट प्रत्युत्तर देण्याची शिवसेनेच्या प्रवक्त्याने काय गरज आहे / होती.

श्री राऊत यांनी तिला हरामखोर म्हणणे हे अत्यंत अशोभनीय आहे.

तर कंगणा राणाउत यानि श्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणे हेही चूक आहे.

पण एका बॉलिवूड च्या नटीच्या तोंडाला लागू नये एवढे तारतम्य शिवसेनेच्या प्रवक्त्यांमध्ये नाही?

आणि त्यानंतर

मुंबईत ६० हजारच्या आसपास बेकायदा बांधकामे असताना, कंगणा उपस्थित नसताना, उच्च न्यायालयात प्रकरण प्रविष्ट असताना, एवढी घाई करून सुडाने तिच्या कार्यालयाचा बेकायदेशीर भाग घाईघाईने पाडून स्वतःची प्रतिमा मलीन मात्र करून घेतली.

शा वि कु's picture

11 Sep 2020 - 10:44 am | शा वि कु

एका बेताल मुंगीला चिरडण्यासाठी (तितक्याच बेताल) हत्तीने सगळे बळ वापरले आहे.
आणि मुंगीला काही झालं नाहीच. तिला उलट आणखी बळकटी आली.

Rajesh188's picture

11 Sep 2020 - 10:49 am | Rajesh188

मुंगी कडे दुर्लक्ष च केले असते तर पुढचे महाभारत घडले नसते.
ती पण बोलून बोलून थकली असती आणि आपल्या बोलण्याचा सरकार वर काहीच परिणाम होत नाही हे बघून वारुळात गेली असती.
ज्या 7 आयपीएस ऑफिसर नी मीडिया बद्द्ल कोर्टात केस टाकली आहे त्या वर न्याय मुर्तीनी मीडिया कंट्रोल करण्यासाठी काही प्रमाणात राज्य सरकार ला अधिकार देणे गरजेचे आहे अशी टिप्पणी केली आहे आणि ती योग्य च आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

11 Sep 2020 - 11:01 am | माईसाहेब कुरसूंदीकर

"मुंबईवर पहिला आणी शेवटचा हक्क फक्त आणि फक्त आमचा" ही शिवसेनेची भूमिका राहिलेली आहे. वादग्रस्त चित्रपट प्रदर्शित करणे असो(मणीरत्नम-बॉम्बे) वा मोठाअवजड उद्योग/कारखाना असो किंवा टाडा लागलेल्या अभिनेत्याला सोड्वणे असो, 'मातोश्री'वर जाउन 'आशीर्वाद' घेतल्याशिवाय ह्या गोष्टीची पूर्तता होत नसे. बाळासाहेब असेपर्यंत हे लोकानी खपवुन घेतले. कारण नरसिंह राव्/वाजपेयी/अडवाणी, आधीच्या पिढीतील नेत्रुत्वाने दुर्लक्ष केले कारण तेव्हा शिवसेनेला जनाधार होता. आधिच्या पिढीतील अभिनेते- देवानंद वगैरे , व अमिताभ चित्रपट प्रदर्शित होण्याआधी मातोश्रीवर जाउन 'सदिच्छा' भेट घेत. आता काळ बदलला आहे.
'अरे ला कारे' करणारी ही पिढी आहे.. सर्वच क्षेत्रांमध्ये हा बदल झाला आहे. तेव्हा कंगना माफी मागेल व शिवबंधनाचा धागा बांधून घेइल ह्या भ्रमात असण्याचे कारण नाही.

जुन्या चित्रपटात दिसणारी सुंदर मुंबई ,सुंदर समुद्र किनारे आणि आत्ताची मुंबई .
गर्दी नी ओसंडून वाहणारी,चौपाटी म्हणजे कचरा पेटी,मोकळी जागा , बगीच्छे ह्यांचा दुष्काळ असणारी
गटारे,रस्ते ,रेल्वे पटरी ह्या वर सुद्धा अनधिकृत बांधकाम असलेली.
मुंबई गुदमरत आहे तिचा जीव कधी जाईल सांगता येणार नाही.
तरी मुंबई ची धर्मशाळा झाली पाहिजे सर्वांना भंडारा मिळतो असे विचारधारा असलेली देशातील मंडळी.
मुंबई म्हणजे नावडती प्रेयसी झाली आहे रात्री झोपायला जवळ पाहिजे पण तिची कोणतीच जबाबदारी नको जबाबदारी मात्र तिच्या कायदेशीर नवऱ्यानी ची घेतली पाहिजे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

11 Sep 2020 - 12:44 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

"गटारे,रस्ते ,रेल्वे पटरी ह्या वर सुद्धा अनधिकृत बांधकाम असलेली"
ही अवस्था कोणी होउ दिली? राज्याचे राज्यकर्ते कोणत्याही पक्षाचे असले तरी मराठीच होते ना? निवडुन आलेलेच होते ना? महापालिकांमध्ये काम करणारे बहुतांशी अभियंते मराठीच ना?मुंबई सोडा, पुणे,नागपूर्,नाशिक्,अनेक जिल्ह्यांची ठिकाणे ही बकाल का दिसतात? आपल्या एस.टी.बसेस ईतर राज्यांच्या तुलनेत मळलेल्या व जुनाट का?
msrtc

ksrtc

कर्नाटक शी तुलना नको ते राज्य महारष्ट्र सारखेच प्रगत आहे.
मुंबई ,पुणे,नाशिक ची ही अवस्था उत्तर दिशेनी असलेल्या बेशिस्त londhya मुळे झाली आहे.
तरी सुद्धा महाराष्ट्र मधील कोणती ही शहर उत्तरे च्या कोणत्या ही शहरं ना पेक्षा हजार पट सुंदर आणि स्वच्छ आहेत.

कर्नाटक चे फोटो देवू नका ते प्रगत राज्य आहे.
बंगलोर,मंगलोर सारखी अती उत्तम शहर त्यांच्या कडे आहेत आणि कर्नाटक सुद्धा महाराष्ट्र सारखे उत्तरेच्या londhya मुळे त्रस्त आहे .
तिथे सुद्धा विरोधी आवाज उठात आहे.
राज्यांतर्गत migration वर नियंत्रण ठेवले तरच देशातील सर्व शहर वाचतील .
नाही तर भयंकर लोकसंख्या असलेला उत्तर भारतीय लोक देशातील सर्वच शहरांची कचरा कुंडी करून टाकतील.

सागर गुरव's picture

12 Sep 2020 - 11:09 pm | सागर गुरव

इतरांकडुन चांगले ते घेतलेच पाहिजे.
केएसआरसीटीच्या ऐरावत/अंबारी वोल्वो सेवेला उत्तर देणारी सेवा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची सेवा कोणती आहे? शिवशाही (टाटा/अशोक लेलँड)?
शिवशाहीची सेवा किती बेभरवशाची आहे हे सांगायला नको..ब्रेक फेल, इंधन गळती, चढणावर एसी बंद.....
शिवनेरी/अश्वमेध सेवा मुंबई-पुणे मार्गाव्यतिरिक्त बाकी मार्गांवर का विस्तारत नाहीत? आहे काही उत्तर?

चांगल्या गोष्टींचे पंख महाराष्ट्रात लगेच कापले जातात.

Rajesh188's picture

12 Sep 2020 - 11:39 pm | Rajesh188

महाराष्ट्र मधील st सेवा ठरवून खिळखिळी केली गेली काही वर्ष पूर्वी उत्तम स्थितीत असलेलं महामंडळ बिकट अवस्थेत गेले .
मुंबई मधील बेस्ट बस सेवा देशा समोर एक उत्तम उदाहरण होते त्या बस सेवेची पण ठरवून वाट लावली.
महाराष्ट्र मधील अनेक संस्था मोडकळीस आणल्या गेल्या.
पण महाराष्ट्र मधील त्या त्या वेळच्या विरोधी पक्षांनी कधीच सरकार ल ह्या विषयावर धारेवर धरले नाही.
सभागृह अशा विषयासाठी कधीच बंद पाडले गेले नाही
.
जसे विरोधी आणि सत्ता धारी मध्ये एकमत झाले आहे.
ह्या अशा विषयात विरोधी पक्षांनी रान उठवयचे सोडून एक साध्या केस साठी आणि एका अभिनेत्री साठी महाराष्ट्र हिताची आपल्याला सुद्धा कदर नाही हेच दाखवून दिले आहे.

मुंबई महानगर परिसरात की बेकायदा बांधकाम आहेत हे सर्वांना माहीत आहे.
अगदी काटेकोर परीक्षण केले तर पूर्ण मुंबई महानगर परिसर बेकायदा आहे.
कोणत्या न्या कोणत्या स्वरूपात प्रतेक बिल्डिंग मध्ये अनधिकृत बांधकाम आहे,फूट पथ वर अनधिकृत अतिक्रमण आहे.
सरकार ची हजारो एकर जमीन वर अनधिकृत बांधकाम आहेत.
अधिकृत भिंग घेवून शोधावे लागतील.
पण बिल्डिंग च्या मुळ स्ट्रक्चर मध्ये बदल करणे धोकादायक आहे ते बिल्डिंग कोसळू शकते.
ते मोठे गंभीर आहे.
त्या साठी क्रिमिनल कोड च वापर करून जेल ची हवा मिळायला हवी.

सुबोध खरे's picture

11 Sep 2020 - 11:53 am | सुबोध खरे

बिल्डिंग च्या मुळ स्ट्रक्चर मध्ये बदल करणे

हे कुणी केलंय ?

आनन्दा's picture

11 Sep 2020 - 3:02 pm | आनन्दा

असु द्या हो, ते राहुल गांधीमध्ये भविष्यातील नेता शोधतात.

विटेकर's picture

11 Sep 2020 - 5:22 pm | विटेकर

गीदड की मौत आती है तो वो शहर की तरफ भागता है ! ... ही शिवसेनेच्या अंताची सुरुवात आहे.

आणि शिवसेनेसारखे पक्ष संपलेलेच बरे ! राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारांना राजकीय नेते बनावण्याचा आद्य मान शिवसेनेचा आहे .. त्यानंतर बाकीच्यानी त्याची री ओढली कारण तोपर्यत तोच नोर्म झाला होता .. तोच यशाचा राजमार्ग झाला होता..

एक लोकशाही समर्थक म्हणून शिवसेना लवकरात लवकर संपावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे ... कसलिही नीतीमत्ता नाही , तत्वे नाहीत , धोरण नाही , केवळ खंडणीखोरी , घराणेशाही आणि राडा ! अर्वाच्य बोलणे आणी शिवराळ भाषा ! कधी मराठी झेंडा, कधी हिन्दुत्व आणि आता मुस्लिम लांगूलचालन ! यांच्यापेक्षा कोन्ग्रेस बरी , नपुसक सौभाग्यापेक्शा ढळढळीत वैधव्य बरे !

ज्याकाळात शिवसेना मुम्बईत फोपावली त्याकाळात मराठी मनामध्ये एक प्रचंड पोकळी होती .. बाळ ठाकरे या चतुर आणि चाणाक्ष मनुष्याने टायमिंग साधले आणी ते गॉडमन झाले ! अर्थात हे सारे काण्ग्रेसच्या आशीर्वादाने आणी क्रुतीशील साह्यानेच घडले .. बाकी मराठी माणासाचे कल्याण .. अस्मिता वगैरे अंधश्रद्धा आहेत ! त्यानी आपले आणि आपल्या घराण्याचे पद्धतशीर कल्याण करुन घेतले .. त्या ओघात काही गुंडानीही आपले उखळ पांढरे करुन घेतले .. मराठी माणसाचे काही भले झाले असेल तर तो साइड इफ्फेक्ट आहे.

गीदड की मौत आती है तो वो शहर की तरफ भागता है ! ... ही शिवसेनेच्या अंताची सुरुवात आहे.
अगदी ! हे गीदड तर फार माजलेले असुन त्याला मरायची घाई झालेली दिसते हे त्याच्या कृतीतुन स्पष्टच आहे. कंगानेने काडी केली आणि हे गीदड गेले लगेच धावुन.
तेल लावलेल्या पैलवानाने जशी विधाने करण्यास सुरुवात केली आहे त्यावरुन हे सरकार जास्त काळ टिकणार नाही हे कळुन येते.

हे कमी होते म्हणुन एका न्यूज चॅनल त्यांच्या २ पत्रकारांनाच्या सुटकेसाठी आता National Human Rights Commission (NHRC) कडे गेले आहेत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Rafale induction stern signal to adversaries, says Rajnath

विरोधी पक्षाच्या राज्यसरकार वर दबाव निर्माण करण्यासाठी केंद्रीय एजन्सी चा गैर वापर होत आहे.
भारत हे संघ राज्य आहे ह्याचा विसर पडू नये.
राज्य मानवी हक्क आयोग सुद्धा असतो त्या साठी केंद्रीय आयोग कडे जाण्याची गरज नाही.

आनन्दा's picture

11 Sep 2020 - 7:12 pm | आनन्दा

मी 100 वा

शतकपूरतीबद्दल अभिनंदन

सुबोध खरे's picture

11 Sep 2020 - 6:15 pm | सुबोध खरे

श्री उद्धव ठाकरे यांची संपत्ती १४३ कोटी आहे असे त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेस दाखल केलेले शपथपत्रात लिहिलेले आहे.

प्रबोधनकार पासून ते बाळ ठाकरे, श्री उद्धव ठाकरे ते श्री आदित्य ठाकरे यांचा कोणता असा व्यवसाय आहे ज्यात एवढी संपत्ती निर्माण होऊ शकते?

असा व्यवसाय आहे ज्यात एवढी संपत्ती निर्माण होऊ शकते?
फोटोग्राफितुन त्यांनी बक्कळ पैसा कमावला असणार बघा ! :)))
बाकी इडी मुंबइत आलेली आहेच तर याचाही शोध घेण्यास हरकत नसावी !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Rafale induction stern signal to adversaries, says Rajnath

Rajesh188's picture

11 Sep 2020 - 6:26 pm | Rajesh188

शिवसेना नी हे प्रकरण योग्य पद्धती नी हाताळला की अयोग्य ह्याचे मोजपट्टी काय.
राजकारणी लोकांच्या खेळी एवढ्या सरळ पण नसतात की त्या मधून आपल्या सारखी सामान्य लोक काही अर्थ पटकन काढू.
पवार सारखे नेतृत्व सत्तेत सहभागी आहे त्यांच्या सल्ला नक्कीच घेतला असेल.
अजित दादा,फडणीस एकत्र येवुन काही तासात केंद्र सरकार ला राष्ट्रपती राजवट हटवयला लावली नाही तर राष्ट्रपती राजवट हटलीच नसती.
सुशांत च्या आत्म्हत्ये चे राजकारण होणार ह्याची खात्री नक्कीच त्यांना असणार.
अजुन सुद्धा मुंबई पोलिस नी काय तपास केला हे गुलदस्त्याच आहे.
आता ncb ची दिशा आत्महत्या करायला प्रवृत्त केले हे सिद्ध करणे अशी आहे.
म्हणजेच ते प्रकरण संपल्यात च जमा आहे.
.
कोणाला काय साध्य करायचे ह्याचा अंदाज प्रतेक जन वेगळा लावतोय.

Rajesh188's picture

11 Sep 2020 - 6:26 pm | Rajesh188

शिवसेना नी हे प्रकरण योग्य पद्धती नी हाताळला की अयोग्य ह्याचे मोजपट्टी काय.
राजकारणी लोकांच्या खेळी एवढ्या सरळ पण नसतात की त्या मधून आपल्या सारखी सामान्य लोक काही अर्थ पटकन काढू.
पवार सारखे नेतृत्व सत्तेत सहभागी आहे त्यांच्या सल्ला नक्कीच घेतला असेल.
अजित दादा,फडणीस एकत्र येवुन काही तासात केंद्र सरकार ला राष्ट्रपती राजवट हटवयला लावली नाही तर राष्ट्रपती राजवट हटलीच नसती.
सुशांत च्या आत्म्हत्ये चे राजकारण होणार ह्याची खात्री नक्कीच त्यांना असणार.
अजुन सुद्धा मुंबई पोलिस नी काय तपास केला हे गुलदस्त्याच आहे.
आता ncb ची दिशा आत्महत्या करायला प्रवृत्त केले हे सिद्ध करणे अशी आहे.
म्हणजेच ते प्रकरण संपल्यात च जमा आहे.
.
कोणाला काय साध्य करायचे ह्याचा अंदाज प्रतेक जन वेगळा लावतोय.

कानडाऊ योगेशु's picture

11 Sep 2020 - 10:32 pm | कानडाऊ योगेशु

पवारांचे राजकारण कपटाचे असते हे एव्हाना उघड गुपित आहे.
ह्यात बी.एम.सी मध्ये सत्ता शिवसेनेची आहे त्यामुळे पवारांनी सल्ला जरी दिला असला असता तरी आता ह्या कृत्याची जबाबदारी शिवसेनेकडे पक्षी उ.ठांकडेच जाते.मला तर वाटते हा सल्ला नक्की पवारांनीच दिला असावा.ह्यानिमित्ताने शिवसेनेला नवीन काही जनाधार तर मिळाला नाहे पण बर्याच जणांची नाराजी ओढवुन घेतलीये.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

11 Sep 2020 - 7:21 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

"पवार सारखे नेतृत्व सत्तेत सहभागी आहे त्यांच्या सल्ला नक्कीच घेतला असेल."
ज्येष्ठ म्हणून सल्ला घेतला असेल तर ठीक अन्यथा देशाच्या राजकारणात ममता बॅनर्जी,अखिलेश यादव पवारांपेक्षा उजवे ठरतील रे राजेशा. असो.
"अजुन सुद्धा मुंबई पोलिस नी काय तपास केला हे गुलदस्त्याच आहे."
हाच तर प्रोब्लेम आहे रे. तपास चोख असायला हवा होता. तो असता तर ही वेळ आली नसती असे आमचे मत.

नीलस्वप्निल's picture

11 Sep 2020 - 7:25 pm | नीलस्वप्निल

स्वतःच्या हाथाने पायावर धोन्डा मारून घेतायेत... राउत सूड उगवतोय की काय असेच वाटते आहे. :)

हरामखोर म्हणजे नॉटी गर्ल.. या निमिताने एक नवीन शब्दार्थ समजला..!

आनन्दा's picture

11 Sep 2020 - 9:04 pm | आनन्दा

जाम नॉटी बुवा तुम्ही!!

आयला काहीतरी घोळ झालेला दिसतोय. हरामखोर म्हणावं तरी प्रोब्लेम. आणि नॉटी म्हणावं तरी प्रोब्लेम.. काय करू आता?

निवृत्त नौदल अधिकार्‍यास मारहाण झालेचे समोर आले आहे ! जर देशासाठी सेवा करणारे वयोवृद्ध या राज्यात सुरक्षित नसतील तर माझ्या सारख्या सामान्य जनतेला हेच गुंड ठार करायलाही मागेपुढे पाहणार नाहीत ! राष्ट्रपतींनी या घटनेची त्वरित दखल घेउन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Rafale induction stern signal to adversaries, says Rajnath

राजकीय वैमनस्यातून यूपी आणि बिहार मध्ये खुले आम् दिवसा ढवळ्या राजकीय नेत्यांच्या किती तरी हत्या झाल्या आहेत आणि अजुन सुद्धा होतात तरी त्या दोन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा असा सूर निघत नाही.
Maharashtra मधे राजकीय विरोधकांचा हत्या केल्या जात नाहीत त्या महाराष्ट्र ला हे हिंदू भाषिक नेते शहाणपण शिकवत असतात ते नीतिमत्ता मध्ये बसते का.?
त्यांना तो नैतिक अधिकार आहे का?

सागर गुरव's picture

12 Sep 2020 - 9:15 pm | सागर गुरव

हत्या केल्या जाईपर्यंत वाट बघावी असे म्हणताय का?

मदनबाण's picture

11 Sep 2020 - 10:38 pm | मदनबाण

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जावी ही मागणी आता सगळ्या जनतेनी केली पाहिजे, कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे त्याची प्रतिष्ठाच आज मातीमोल करण्यात आली आहे. हे लोक आता दंगल घडवुन आणायला देखील मागे-पुढे पाहणार नाहीत अशी भिती सामान्य जनतेला वाटत आहे !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Rafale induction stern signal to adversaries, says Rajnath

केंद्रीय सत्ता मुजोर होवून हुकुमशाही कडे देश जाईल ह्याची शक्यता राज्य घटना लीहताना विचारात घेतली आहे.
राष्ट्रपती राजवट कधी लावली जाते,किती दिवस जास्तीत जास्त लावली जाते ह्या विषयी नियम आहेत.
काँग्रेस नी सुद्धा हे खेळ खेळले आहेत मनमानी पना गृहयुद्ध कडे घेवून जाईल.
अर्णव म्हणतो म्हणून आणि कोणी तरी निवृत्त अधिकारी ज्यांनी आता bjp स्वीकारली असेल राष्ट्रपती राजवट लावता येत नाही
.सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाईल आणि मतदार ची सहनभुत bjp हरवून बसेल हे न समजण्या एवढे bjp चे केंद्रीय नेतृत्व मूर्ख नाही..
अर्णव मूर्ख सारखी बडबड करत आहे .
फक्त प्रांतीय द्वेष मुळे महाराष्ट्र सरकार विरूद्ध उत्तर भारतून अर्णव ला समर्थन मिळत आहे.
तो मोठा शहना आहे म्हणून नाही.

म्हणजे सेने जे केले आणि राउत जे बोलले त्यात काहीच चूकले नाही असे म्हणायचे आहे का तुम्हाला?
सेनेच्या धाकामुळे ( भीतिमुळे ) मराठी चॅनेल्स या बाबत फारशी चर्चा करत नाहियेत.

कपिलमुनी's picture

12 Sep 2020 - 12:03 am | कपिलमुनी

कारभारी दमाने घ्या !
राष्ट्रपती राजवट कधी लागते याचा अभ्यास करा, महाराष्ट्रातील क्राईम इंडेक्स, इतर राज्यातील क्राईम इंडेक्स यांची तुलना करा, त्याचे व्हिडीओ इथे पोस्ट करा, मग जनतेला ठरवू द्या

Rajesh188's picture

12 Sep 2020 - 12:34 am | Rajesh188

राष्ट्रपती राजवट न्यायालय च्या पूनारलोकान कक्षात येते आणि मनमानी पद्धती नी लादलेली राष्ट्रपती राजवट न्यायालय रद्द करू शकते.
आणि त्याच सरकार ची पूनारस्थपणा करू शकते
राष्ट्रपती राजवट विषयी dr Babasaheb Ambedkar बोलले होते अगदी शेवटचा पर्याय म्हणून राष्ट्रपती राजवट लादली जावी .
आणि ती लोकशाही वाचवण्या साठी असावी लोकशाही चा गळा घोटण्यासाठी नाही.
1994 मधील बोंबई घातल्या नंतर राष्ट्रपती राजवट लावण्या वर सर्वोच्च न्यायालय नी बंधने घातली आहेत.

राष्ट्रपती राजवट कधी लागते याचा अभ्यास करा, महाराष्ट्रातील क्राईम इंडेक्स, इतर राज्यातील क्राईम इंडेक्स यांची तुलना करा, त्याचे व्हिडीओ इथे पोस्ट करा, मग जनतेला ठरवू द्या
मुनी राष्ट्रपती लागवट कधी लागते याचा नक्कीच अभ्यास करावयास हवा. महाराष्ट्रातील क्राईम इंडेक्स, इतर राज्यातील क्राईम इंडेक्स यांची तुलना करुन मागिल राष्ट्रपती राजवट लागली नव्हती हे आपणास माहित नाही याचे मात्र नवल वाटले नाही ! महाराष्ट्रात सरकार स्थापन झाले नाही म्हणुन ११ दिवस याच राज्यात राष्ट्रपती राजवट लागु होती.
घटनात्मक शासनव्यवस्था नीट चालत नसेल तरी राष्ट्रपती राजवट लागू केली जाउ शकते.

त्याचे व्हिडीओ इथे पोस्ट करा, मग जनतेला ठरवू द्या
नेहमी प्रमाणेच तुमच्या सवयी नुसार दिलेला व्हिडियो न पाहताच तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे, कारण मी दिलेल्या पहिल्या व्हिडियो मध्येच माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्या मुलीने त्यांच्या वडिलांना झालेल्या अमानुष मारहाणी नंतर घाबरलेल्या / भेदरलेल्या अवस्थेत राष्ट्रपती राजवटीची मागणी केलेली आहे. माझ्या निरिक्षणा नुसार मी दिलेले एकही व्हिडियो न पाहता तुम्ही नेहमी प्रतिसाद देता आणि वर मलाच कधी व्हिडियो पोष्ट करावेत या बद्धल सुचना करता हे हास्यास्पद आहे.
ज्या राज्यात छत्रपतींच्या नावाचा वापर करुन राजकारण केले जाते त्याच राज्यात साधुंना पोलिसांच्या समोरच ठार केले जाते, एका स्त्रीवर सुडात्मक पद्धतीने कारवाई करुन तिचे घर / ऑफिस उध्वस्त केले जाते, पत्रकारांना तुरुंगात टाकले जाते आणि ६२ वर्षाच्या माजी नौदल अधिकार्‍यास डोळा लाल होइ पर्यंत अमानुष मारहाण केली जाते त्या राज्यात घटनात्मक शासनव्यवस्था नीट चालते आहे का ? हा प्रश्न नक्कीच विचारला जाउ शकतो आणि म्हणुनच राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी देखील केली जाउ शकते.

जाता जाता :- दुसर्‍यांना अभ्यासाचे सल्ले देण्याच्या आधी स्वतःचा काय अभ्यास आहे याचे आत्मपरिक्षण करावे !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Jaishankar, Wang agree: Let’s keep talking, quickly disengage, ease tensions along LAC

सुबोध खरे's picture

12 Sep 2020 - 9:43 am | सुबोध खरे

चार गुंडानी एखाद्या निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण केली म्हणून राष्ट्रपती राजवट लावणे समर्थनीय कधीच होणार नाही.

कारण असे झाले तर लोकनियुक्त सरकार पाडायला चार गुंड पुरेसे होतील.

या ऐवजी अशा गुंडाना अटक करून अशी अजामीनपात्र कलमे लावून चार सहा महिने आत टाकावे कि कोणताही गुंड केवळ आमच्या नेत्याला कोणी काही बोलले म्हणून कायदा हातात घेण्याचे धारिष्ट्य करणार नाही.

( ज्या तर्हेने मारहाण केली आहे त्यावरून ते अधिकारी गंभीर रित्या जखमी झालेले आहेत हे दिसतेच आहे).

आपल्याच पक्षाच्या गुंडाना अटक करून असे धारिष्टय हे सरकार दाखवेल का हाच प्रश्न आहे.

सुबोध खरे
निवृत्त नौदल अधिकारी.

त्या गुंडांना पोलीसांनी चार तासातच जामिनावर सोडलेय अशी बातमी येतेय.

चिर्कुट's picture

14 Sep 2020 - 12:08 pm | चिर्कुट

मर्चंट नेव्ही अधिकारी आणि भारतीय नौदल अधिकारी यातला फरक समजत असेलच. मग विनाकारण नौदलाला यात आणायची गरज का आहे?

गामा पैलवान's picture

12 Sep 2020 - 2:07 pm | गामा पैलवान

अवांतर :

मारहाण झाल्याने डोळा आतून लाल होतो? की बाहेरून काळानिळा पडतो?

---------------------------------------------------------
माजी नौदलाधिकारी मदन शर्मा यांचा लाल डोळा :
https://images.news18.com/ibnlokmat/uploads/2020/09/shivsena-goons.jpg?impolicy=website&width=496&height=330
---------------------------------------------------------
पारंपरिक ब्लॅक आय :
https://i.imgur.com/cE5mhhs.jpeg
---------------------------------------------------------

वाचकांनी काय ते ठरवावं.

-गा.पै.

Rajesh188's picture

12 Sep 2020 - 2:25 pm | Rajesh188

फक्त डोळा आतून लाल झालाय बाहेरून मारहाण केल्याची काहीच निशाणी नाही.
कुछ तो गडबड हैं?

कपिलमुनी's picture

13 Sep 2020 - 4:35 am | कपिलमुनी

पत्रकारांना तुरुंगात टाकले जाते ??

त्यांना न्यायालयाने रिमांड दिली आहे. बाकी कसेही लिहिलेत तरी न्यायव्यवस्थेचा आदर करा.
त्यांच्या वर ट्रेसपासिंग आणि एसॉल्टचे चार्जेस आहेत. प्रथमदर्शनी पुरावा बघून न्यायालयाने त्यांना तुरुंगात टाकले आहे.

गेली किती तरी दशक दाऊद underworld चा डॉन आहे.
किती तरी आर्थिक व्यवहारात त्याचे पैसे भारतात गुंतले आहे त.
केंद्रात,राज्यात अस्तित्वात असलेल्या सर्व पक्षांची सरकारे येवून गेली दाऊद चा 1 केस पण कोण वाकडा करू शकला नाही.
त्या मुळे bjp ni किंवा कोणत्याच पक्षांनी नाकाने कांदे solu नयेत

शिवसेना सारखा राजकीय पक्ष ज्यांनी मराठी माणसाचा स्वाभिमान जगावला.
मराठी माणसाच्या पाठी संघटित ताकत उभी केली.
अगदी रिक्षा वाला असू नाही तर ट्रेन मधील भांडण फक्त सेनेचे नाव घेतले की संघटित परप्रांतीय हजार वेळा विचार करायचे मराठी माणसावर हात उचलायला .
सेना प्रमुख च्या एका इशाऱ्यावर हजारो लोक जीव देण्यास तयार होती.
ती ताकत मोदी मध्ये पण नाही.
बाळासाहेब ठाकरे च्या एका इशाऱ्यावर सर्वस्व अर्पण करणारे हजारो होते आणि आज पण आहेत.
देशातील एकमेव नेता ज्याला मना पासून
लोकांचे प्रेम मिळाले
त्या सेने ची किमंत भंगार हिंदी मीडिया.आणि
बॉलिवूड मधून बाहेर हाकलले ली सुमार
दर्जा ची अभिनेत्री कंगना ठरवणार की मूर्ख चा बादशाह अर्णव ठरवणार.

सागर गुरव's picture

12 Sep 2020 - 9:01 am | सागर गुरव

सेनेची किंमत कमी करण्यासाठी बाकीच्यांना काही करायची गरजच नाही, असा कारभार करून सेना आपली किंमत स्वतःच कमी "करून दाखवत" आहे.

चौकस२१२'s picture

14 Sep 2020 - 4:04 pm | चौकस२१२

राजेश तुम्ही म्हणताय तो सेनेचा सुवर्णकाळ आणि त्यावेळेस बाळासाहेबांबरोबर इतकं हि लोक चांगले होते ( कुठे नवलकर, जोशी आणि कुठे राऊत ) आता काय झालाय सेनेचं?
नुसतं उत्तर भारतीयांवर आग पाखड करून तुम्ही सेनेची मराठी माणसाच्या मनातील गेलेली इज्जत परत अनु शकत नाही ..
मराठी माणसाच्या मनातूनच सेना उतरली आहे .. याचा जरा करा गंभीर विचार, राज्य पातळीवर म्हणून मराठी म्हणून सेनाला पाठिंबा देणारा मराठी jar दूर जातोय तर !

प्रतिमा मलिन करणे हे भाजपा 2014 पासून करते आहे>>> २०१४ मधे फडणवीस मुम झाल्यापासुन शिवसेना व भाजपा युती असली तरी ऊठा नेहेमी त्यान्च्या विरुद्ध बोलले आहेत.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

12 Sep 2020 - 9:18 am | माईसाहेब कुरसूंदीकर

निव्रुत्त नौदल अधिकार्याला मारहाण करणे निषेधार्ह आहे. कधी मराठीप्रेमाचे नाटक तर कधी हिंदुत्वाचे, सेनेने मराठी माणसाला फक्त मूर्ख बनवायचे काम केले.सगळीकडून होणार्या हल्ल्यांमुळे शिवसेना नेत्यांचा संयम सुटलेला दिसतो.
दंगल सद्रुश परिस्थिती निर्माण करून सामान्य माणसाचा बळी घेऊ नका हीच उद्धव ह्यांना विनंती

चौकटराजा's picture

12 Sep 2020 - 9:32 am | चौकटराजा

पी ओ के म्हणजे पाक व्याप्त काश्मीर म्हणजेच एक आमचीच लाडकी भूमी जी चुकीच्या लोकानी शासित आहे .मी जर कन्गनाच्या जागी असतो तर अशी फोड करून सांगितली असती ज्यायोगे मी मुम्बईला पाकिस्तान म्हटले नसून पाक्व्याप्त काश्मीर म्हणजेच भारतभूमी असे म्हटले आहे .पण कंगना .....

आता सूड्बुद्धीने शिवसेना शासित मनपा ने बान्धकामावर कारवाई केली आहे यात कायदेशीर चूक काही नाही. नैतिक आहे असे म्हणता येईल, सम्बन्धित कायद्यात कोणत्या प्राधान्य क्रमाने बान्धकामे पाडायची अशी काही यादी दिलेली नसावी त्याचा गैरफायदा घेउन हा सूड उगविण्यात आला आहे वा कंगनाच्या चिथावणीला प्रत्यूत्तर देण्यात आले आहे असे म्हणता येईल.

चाणक्य साहेबाना सत्ता व कोन्ग्रेस या दोघाचीही आजन्म गरज भासणार आहे सबब त्यानी ३५६ चा फायदा घेऊन केंद्रातून राष्त्रपति राजवट येऊ नये म्हणून ही कारवाई पालिकेच्या कायद्यानुसार झाली आहे राज्यसरकारचा त्यात काही संबन्ध नाही हे स्पष्ट केले आहे ही भीती सेनेलाही पटली आहे सबब आता कंगनाला भिडायचे ते ठाकरी पद्धतीने नाही तर बारामती पॅटर्न वापरून हे धोरण सेनेने स्वीकारले आहे . सबब आता कंगना ड्रग प्रकरण सेनेतर्फे हाताळले जाणार असून त्याचा कन्ट्रोल साहजिकच गृहमन्त्री यान्चेकडे असेल एकीकडे कायदा ( ३५६) खूष दुसरीकडे सेनाही खूष असा तो पॅटर्न असणार आहे.

डीप डाईव्हर's picture

12 Sep 2020 - 10:31 am | डीप डाईव्हर

एक नंबर प्रतिसाद.

नैतर पीओके वर कारवाई झाल्यावर

पहिली बार सर्जिकल स्त्राईक

मोदीने पाकिस्तान को अंदर घुसकर मारा

वगैरे व्हॅटसपवर ऊत आला नसता

सागर गुरव's picture

12 Sep 2020 - 9:40 pm | सागर गुरव

आता तुमच्या काळात झालेल्या सर्जीकल स्ट्राईक (झाल्या असतील तर) तुम्ही देशवासीयांना सांगीतल्या नाहीत त्यात भक्तांचा काय दोष?
मातोश्रींची परवानगी नव्ह्ती मिळाली का देशवासीयांना सांगायला??

सुबोध खरे's picture

12 Sep 2020 - 10:17 pm | सुबोध खरे

त्यांच्या काळात झालेले सर्जिकल स्ट्राईक इतके गुप्त होते की लष्करी अधिकाऱ्यांना सुद्धा कळले नाहीत केंव्हा केले गेले ते.

सध्याच्या राजकीय वातावरणात विचार केलं जेव्हापासून शिवसेना राजकीय दृष्ट्या घरोबा बदलला, राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन केले तेव्हापासून भाजपा नेतृत्वाने आपल्या भावी राजकारणाची दिशा कृतीत आणणे सुरू केले. मुळात एक समजून घेतले पाहिजे भाजपाला एक राजकीय पक्ष म्हणून राज्याची एक हाती सत्ता आवश्यक वाटते. कोणतेही राजकीय पक्षासाठी हे लक्ष योग्य आहे, परंतु महाराष्ट्रात चार वेगवेगळे पक्ष काम करतात त्यामध्ये वैचारिक दृष्टीने काँग्रेस राष्ट्रवादी आणि सेना भाजप हे दोन गट कार्यरत दिसतात. महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपले मतदार वाढवायचे असतील तर आपल्याच मित्रपक्षाला आपल्यात सामील करणे अथवा आपल्यात सामील करणे आवश्यक आहे. तसा प्रयत्न शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करून प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला आहे, तथापि त्यास यश आलेले नाही तोच प्रयत्न भाजपा आता सेनेसोबत करीत आहे. विरोधी मताचा मतदार बदलण्या पेक्षा समविचारी असलेल्या मतदाराला एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षांकडे अधिक सोपे असते. आमदाराने पक्षांतर करणे आणि मतदाराने पक्ष बदलणे यामध्ये फार फरक असतो शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मराठी अस्मितेचे राजकारण केले असते, आणि आपल्या शिवाय राजकारणात सत्ता मिळवणे अशक्य असल्याचे निदर्शनास आणून दिले असते तर दक्षिण भारताप्रमाणे महाराष्ट्रात शरद पवारांना एक हाती सरकार स्थापन करणे शक्य झाले असते. वर्तमानाचा विचार केला तर केंद्रात भाजप राजकीय दृष्ट्या अत्यंत परिणामकारक खेळी करून जनमत फिरवण्यासाठी हुशार झालेला आहे. त्यात विरोधी पक्ष भाजपाला आवडेल आणि सोईची होईल अशी राजकीय भूमिका घेऊन मदत करत आहे याचे सगळ्यात चांगले उदाहरण काश्मीर, मध्यप्रदेश आणि आता महाराष्ट्र ज्याप्रमाणे मेहबूबा यांनी राजीनामा देणे, राज्यपालांच्या हाती सत्ता देणे, त्यावेळी अब्दुल्ला सांगत होते आपण एकत्र येऊ पण भारताच्या जनतेचे नशीब थोर त्यांनी तसे केले नाही आणि भाजपाने कायदाच बदलला. आपण महाराष्ट्राचा विचार केला तर यामध्ये भाजपाला पूर्ण राज्य मिळवणे शक्य झालेले नाही तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला एका मोठ्या आणि सत्ताधारी समाजाचा पक्ष असून सुद्धा एक हाती सत्ता मिळवणे शक्य होत नाही. महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपा आणि विदर्भ मराठवाड्यामध्ये राष्ट्रवादी पाहिजे तसं स्थान मिळू शकत नाही यासाठी जातीय समीकरण बदलणे आवश्यक आहे यात सगळ्यात मोठा बदल म्हणजे भाजपासाठी सेना आणि राष्ट्रवादीसाठी काँग्रेस नामशेष होणे आवश्यक आहे कारण हे दोन्ही पक्ष सध्या इतरांच्या जीवावर म्हणजे भाजपा आणि राष्ट्रवादी वर जगत आहेत, यांना यापुढे कधीही स्वत: च्या अथवा एकत्र येऊन सत्ता प्राप्ती शक्य नाही. यासाठी भाजपाने सेनेचा मतदार आणि राष्ट्रवादीने काँग्रेसचा मतदार मिळवणे सर्वात आवश्यक आहे. पूर्वीच्या फडणवीस आणि अजित पवारांच्या सरकार स्थापनेत हाच मुद्दा दोघांच्या मनात असावा अजित पवार यापूर्वीदेखील अशा प्रकारची मांडताना दिसतात मात्र पवार साहेबांना हे प्रत्यक्षात आणणे सहज शक्य वाटत नसावे. त्यासाठी पवारांना सेनेला मुख्यमंत्री पदी विराजमान करणे ही एक राजकीय खेळी असू शकते कारण एकदा सेना राज्य करण्यास लायक नाही हा मुद्दा जनतेच्या मनात ठसला की ते मतदार आपोआप भाजपाच्या बाजूने झुकतील. राष्ट्रवादी हा तुलनेने तरुण नेत्यांचा त्यांना आपल्या भवितव्याची काळजी वाटू शकणाऱ्या नेत्यांचा पक्ष आहे. तसेच राजकीय तडजोडी करण्यासाठी राष्ट्रवादी अधिक लवचिक आहे.
सेनेच्या स्वभावानुसार सेनेतील नेते यापेक्षा वेगळे काही करतील अशी अपेक्षा पवार आणि मोदी यांना नव्हती त्यासाठी सुशांत सिंग प्रकरण हे महत्त्वाचे ठरले. सुशांत सिंग मृत्यु हे तत्कालीन कारण अपेक्षेपेक्षा लवकर मिळाले त्यात साठ पासष्ठ दिवस वाया घालवून केंद्राला हस्तक्षेप करण्याची सुवर्णसंधी सेनेने मोदी आणि शहा यांना दिली. जोडगोळी याचा लाभ घेणार नाही अशी अपेक्षा कशी करू शकतो? राजकारणात आपला फायदा झाला नाही तरी चालेल पण विरोधकाला वाट देऊ नये हा नियम असतो. त्यातच सुशांत सिंग प्रकरणाच्या निमित्ताने बॉलिवूड सरळ होत असेल तर सोयीचे होणार कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की बॉलिवूड मध्ये भाजपा आणि हिंदू विचारांचे विरोधाचा फार प्रभाव आहे आणि त्यास राजकारणातील काही मोठ्या नेत्यांचा पाठिंबा आहे. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्व साठी सुशांत सिंग प्रकरणाचा याहून चांगला उपयोग करणे शक्यच नव्हते. त्यात शिवसेनेने काँग्रेसच्या मागे जाऊन अर्णव गोस्वामी यांच्या विरोधातील लढाई आपली लढाई करून घेतली आणि सोबत कंगना अंगावर घेणे म्हणजे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन.

चौकटराजा's picture

12 Sep 2020 - 11:15 am | चौकटराजा

भाजपासाठी सेना आणि राष्ट्रवादीसाठी काँग्रेस नामशेष होणे आवश्यक आहे कारण हे दोन्ही पक्ष सध्या इतरांच्या जीवावर म्हणजे भाजपा आणि राष्ट्रवादी वर जगत आहेत, या बाबतीत माझा असा अन्दाज आहे की येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सेनेची बरीच मते भाजपाकडे वळण्याची शक्यता आहे. भाजपातील काही मवाळ भाजपा वाले कामगिरीच्या जोरावर राष्ट्रावादी कॉन्ग्रेसकडे वा कॉन्ग्रेसकडे वळण्याची शक्यता कमीच कारण तसा या दोन पक्षान्चा कार्यक्रम ही नाही वा संयुक्त सरकार असल्यानी तशी सन्धीही नाही. साधारण पणे ब्राह्मण द्वेष्टे मतदार कदापीही भाजपा ला मत देणे शक्य नाही व संघाच्या प्रभावाखाली असलेले कदापिही भाजपेतर पक्षाला मत देण्याची शक्यता नाही. अत्यन्त उदारमनस्क नेतृत्व जर बविआ ला मिळाले व ते कॉन्ग्रेस बरोबर आले तर काही नवी मान्डणी होउ शकते. बाकी ममता दीदी सारखा चमत्कार पवारांचे बेभरवशी नेत्रुत्व कधीच करून एकहाती सत्ता स्थापन करून शकणार नाहीत हे लिहून घ्या !

जेव्हा काँग्रेस पूर्ण फॉर्म मध्ये होती ,इंदिराजी पंतप्रधान होत्या तेव्हा पूर्ण महाराष्ट्र काँग्रेस अधिपत्य खाली होता.
त्या पाठची कारण पण फक्त भावनिक नव्हती
महाराष्ट्र मध्ये सहकारी क्षेत्र उदयास येत होते काँग्रेस च्या नेतृत्व खाली.
नव नवीन सहकारी साखर कारखाने उभे राहिले,बँका उभ्या राहिल्या ,सहकारी तत्वावर दूध डेअरी उभ्या राहिल्या.
कर्मवीर सारख्या नेत्यानं मुळे शिक्षण क्षेत्रात विकास झाला,धरण बांधली गेली शेती पाण्या खाली आले.
विद्युत वितरण आणि निर्मिती मध्ये महाराष्ट्र आघाडीवर राहिला.
एकंदरीत विकासाचे राजकारण काँग्रेस चे झाले आनी लोक त्या विकास च्या माध्यमातून काँग्रेस ची पाठी राखी झाली मूळ तळागाळात रोवली गेली.
ग्रामीण क्षेत्रात विकास झाला .
नेतृत्व उत्तम दर्जाचे होते आणि भावनिक राजकारण न करता विकासाचे केले gele.
शरद पवार पण त्याच संस्कृती मध्ये वाढले राज्य साठी काय करायला हवं हे त्यांना चांगले माहीत आहे .
इंदिराजी गेल्या आणि सर्वच बदललं.
काँग्रेस नी काही केले नाही असे आपण बोलू शकत नाही..
सेने ची निर्मिती च भावनिक प्रश्नावर झाली मुंबई सारख्या शहरात मराठी लोकांवर होणाऱ्या अन्यायाला तिनी हवा दिली काँग्रेस नी छुपा पाठिंबा दिला ह्या मागचा काँग्रेस चा उध्येश जात होता हे मला सांगता येणार नाही.
पण कामगार चळवळी शी संबंधित काही तरी असावे आणि कामगार संघटना पासून उद्योगपती चे रक्षण करण्याचा कुटील हेतू पण असू शकतो..
पण सेने मुळे मुंबई सारख्या शहरात मराठी लोकांना आधार मिळाला हे कोणीच नाकारू नये.
नोकऱ्या मध्ये सेने च्या दबाव मुळे मराठी लोकांची संख्या वाढली.
मराठी लोकांवर दादागिरी जे परप्रांतीय लोक करत होती त्याला चाप बसले .
लहान धब्दे सेने च्या संरक्षण खाली चालू केले गेले.
आणि एक प्रकारचे आत्मिक बळ मिळाले .
राज्याचे हित शिवसेना चांगली समजते असा विश्वास निर्माण झाले आणि सेने ला जन आधार मिळाला.
गुंडागर्दी करणे त्या वेळी गरजेचे होते संवेधनिक मार्गाने काहीच साध्य झाले नसते ते सेने नी गुंडागर्दी करून साध्य केले पण गुंडागर्दी मराठी लोकांच्या हिता साठी होती.
काँग्रेस राष्ट्रवादी चे मतदार एकाच आहेत आणि ते सहकारी क्षेत्र शी संबंधित आहे आता काही वर्षात सहकारी क्षेत्र भ्रष्टाचार मुळे संपले,आर्थिक संस्था दबघाईला आल्या आणि काँग्रेस राष्ट्र वादी च जनाधार कमी झाले.
Bjp ni हिंदुत्व चे राजकारण केले मुस्लिम समाज विषयी हिंदूंना भीती दाखवून हिंदू ना वेगळे केले आणि बहुसंख्य हिंदू मत विभागली गेल्या मुळे bjp सत्तेत आली.
पण विकासाचे राजकारण bjp ni कधीच केले नाही त्यांचा पायाच भावनिक आहे .
भावनिक पायावर उभी असलेली bjp ची इमारत जशी लवकर उभी राहिली तशी लवकर कोसळू पण शकते.
कमीत कमी हिंदू ना तरी आर्थिक क्षेत्रात
संधी निर्माण करणे गरजेचे होते ते bjp नी केले नाही.
आर्थिक संध्या फक्त ठराविक उद्योगपती नच देवून बाकी बहुसंख्य हिंदू चा आर्थिक आधार तोडण्याचे उपत्याप bjp ni केले.
किती ही चुकीची काम केली तरी हिंदू हिंदू करून जिंकून येवू असा त्यांना आत्मविश्वास आहे पण उपाशी पोटी लोक जास्त दिवस हिंदू म्हणून bjp च्या पाठी जाणार नाही.
त्यांची मोठी काम कोणती
तर kashmir चे विभाजन,370 रद्द,राम मंदिर.
एवढीच.
काश्मीर चे विभाजन करून काश्मिरी लोकमत बदलणार नाही.
त्यांना हा देश आपला वाटला पाहिजे त्या साठी आर्थिक विकास हाच एकमेव मार्ग आहे.
हा देश बहुधर्मिय आहे हे सत्य बदलणे शक्य नाही सर्व धर्माच्या लोकांना सोबत घेवून आर्थिक क्षेत्रात उत्तुंग भरारी मारण्याची कुवत bjp madhye नाही.
हे सत्य लोकांना जाणवू लागले आहे.. त्या मुळे आलेल्या सत्तेचा उपयोग धार्मिक तेढ आणि जहाल राष्ट्रवाद साठी न करता आर्थिक,सामाजिक प्रश्नांना प्राधान्य देणे गरजेचं आहे तरच bjp टिकेल नाही तर .
काँग्रेस,लालू,मुलायम सारखी अवस्था तिची सुधा होईल हे नक्की.

जेव्हा काँग्रेस पूर्ण फॉर्म मध्ये होती ,इंदिराजी पंतप्रधान होत्या तेव्हा पूर्ण महाराष्ट्र काँग्रेस अधिपत्य खाली होता.
त्या पाठची कारण पण फक्त भावनिक नव्हती
महाराष्ट्र मध्ये सहकारी क्षेत्र उदयास येत होते काँग्रेस च्या नेतृत्व खाली.
नव नवीन सहकारी साखर कारखाने उभे राहिले,बँका उभ्या राहिल्या ,सहकारी तत्वावर दूध डेअरी उभ्या राहिल्या.
कर्मवीर सारख्या नेत्यानं मुळे शिक्षण क्षेत्रात विकास झाला,धरण बांधली गेली शेती पाण्या खाली आले.
विद्युत वितरण आणि निर्मिती मध्ये महाराष्ट्र आघाडीवर राहिला.
एकंदरीत विकासाचे राजकारण काँग्रेस चे झाले आनी लोक त्या विकास च्या माध्यमातून काँग्रेस ची पाठी राखी झाली मूळ तळागाळात रोवली गेली.
ग्रामीण क्षेत्रात विकास झाला .
नेतृत्व उत्तम दर्जाचे होते आणि भावनिक राजकारण न करता विकासाचे केले gele.
शरद पवार पण त्याच संस्कृती मध्ये वाढले राज्य साठी काय करायला हवं हे त्यांना चांगले माहीत आहे .
इंदिराजी गेल्या आणि सर्वच बदललं.
काँग्रेस नी काही केले नाही असे आपण बोलू शकत नाही..
सेने ची निर्मिती च भावनिक प्रश्नावर झाली मुंबई सारख्या शहरात मराठी लोकांवर होणाऱ्या अन्यायाला तिनी हवा दिली काँग्रेस नी छुपा पाठिंबा दिला ह्या मागचा काँग्रेस चा उध्येश जात होता हे मला सांगता येणार नाही.
पण कामगार चळवळी शी संबंधित काही तरी असावे आणि कामगार संघटना पासून उद्योगपती चे रक्षण करण्याचा कुटील हेतू पण असू शकतो..
पण सेने मुळे मुंबई सारख्या शहरात मराठी लोकांना आधार मिळाला हे कोणीच नाकारू नये.
नोकऱ्या मध्ये सेने च्या दबाव मुळे मराठी लोकांची संख्या वाढली.
मराठी लोकांवर दादागिरी जे परप्रांतीय लोक करत होती त्याला चाप बसले .
लहान धब्दे सेने च्या संरक्षण खाली चालू केले गेले.
आणि एक प्रकारचे आत्मिक बळ मिळाले .
राज्याचे हित शिवसेना चांगली समजते असा विश्वास निर्माण झाले आणि सेने ला जन आधार मिळाला.
गुंडागर्दी करणे त्या वेळी गरजेचे होते संवेधनिक मार्गाने काहीच साध्य झाले नसते ते सेने नी गुंडागर्दी करून साध्य केले पण गुंडागर्दी मराठी लोकांच्या हिता साठी होती.
काँग्रेस राष्ट्रवादी चे मतदार एकाच आहेत आणि ते सहकारी क्षेत्र शी संबंधित आहे आता काही वर्षात सहकारी क्षेत्र भ्रष्टाचार मुळे संपले,आर्थिक संस्था दबघाईला आल्या आणि काँग्रेस राष्ट्र वादी च जनाधार कमी झाले.
Bjp ni हिंदुत्व चे राजकारण केले मुस्लिम समाज विषयी हिंदूंना भीती दाखवून हिंदू ना वेगळे केले आणि बहुसंख्य हिंदू मत विभागली गेल्या मुळे bjp सत्तेत आली.
पण विकासाचे राजकारण bjp ni कधीच केले नाही त्यांचा पायाच भावनिक आहे .
भावनिक पायावर उभी असलेली bjp ची इमारत जशी लवकर उभी राहिली तशी लवकर कोसळू पण शकते.
कमीत कमी हिंदू ना तरी आर्थिक क्षेत्रात
संधी निर्माण करणे गरजेचे होते ते bjp नी केले नाही.
आर्थिक संध्या फक्त ठराविक उद्योगपती नच देवून बाकी बहुसंख्य हिंदू चा आर्थिक आधार तोडण्याचे उपत्याप bjp ni केले.
किती ही चुकीची काम केली तरी हिंदू हिंदू करून जिंकून येवू असा त्यांना आत्मविश्वास आहे पण उपाशी पोटी लोक जास्त दिवस हिंदू म्हणून bjp च्या पाठी जाणार नाही.
त्यांची मोठी काम कोणती
तर kashmir चे विभाजन,370 रद्द,राम मंदिर.
एवढीच.
काश्मीर चे विभाजन करून काश्मिरी लोकमत बदलणार नाही.
त्यांना हा देश आपला वाटला पाहिजे त्या साठी आर्थिक विकास हाच एकमेव मार्ग आहे.
हा देश बहुधर्मिय आहे हे सत्य बदलणे शक्य नाही सर्व धर्माच्या लोकांना सोबत घेवून आर्थिक क्षेत्रात उत्तुंग भरारी मारण्याची कुवत bjp madhye नाही.
हे सत्य लोकांना जाणवू लागले आहे.. त्या मुळे आलेल्या सत्तेचा उपयोग धार्मिक तेढ आणि जहाल राष्ट्रवाद साठी न करता आर्थिक,सामाजिक प्रश्नांना प्राधान्य देणे गरजेचं आहे तरच bjp टिकेल नाही तर .
काँग्रेस,लालू,मुलायम सारखी अवस्था तिची सुधा होईल हे नक्की.

चौकटराजा's picture

12 Sep 2020 - 1:00 pm | चौकटराजा

वरील लेख बरचसा वास्तवाला धरून आहे ! कोणताही अभिनिवेश नाही याबद्द्ल आभारी आहे !

कामगार चळवळीत सेनेने नेहमीच सोयीस्कर भुमीका घेतली आहे.कामगार चळवळीला पहिला सुरूंग लागला तो कृष्णा देसांई या कम्युनिस्ट कार्यकर्त्यच्या खुनानंतर. बाळासाहेब ठाकर्‍यांनी कृष्णा देसाईंच्या मारेकर्‍यांचे अभिनंदन केले होते.
दुसरी वेळ म्हणजे डॉ दत्ता सामंतांनी केलेल्या गिरणी कामगार सम्पात ठाकर्‍यांनी त्यांची भूमिका अचानक बदलली.
पुण्यातल्या टेल्को च्या सम्पाच्यावेळेसही ती अगदी तळ्यात मळ्यात अशीच होती.
कामगार चळवळीत सेनेला कोहीनूर मिल फिनीक्स मिल या मील्स च्या जागांच्या ठिकाणी कामगाराम्ना वसवणे सहज शक्य होते. जे त्यानी कधीच अजेंड्यावर ठेवले नाही.
छगन भुजबळ सेनेत असताना बेळगाव चा प्रश्न त्याम्नी बेळगावात जाऊन स्टंट करत अटक करुन घेतली होती. पण सत्तेत येताच तो प्रश्न सोयीस्करपणे अजेंड्यावरून पुसून टाकला. त्या नंतर सेनेने त्याचा उच्चारही केला नाही.
कोकणात दाभोळ वीज प्रकरणात सेना तो प्रकल्प समुद्रात बुडवायला निघाली होती. रेबेका मार्क बाळासाहेबाना एकदा भेटली आणि त्या नंतर त्या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन झाले तेही जास्तीच्या दरानुसार.
बीजेपी चे कसे होईल यापेक्षाही आता मुळात प्रश्न निर्माण झालाय तो सेनेच्या आस्तित्वाचा. आडमुठ्या आणि गुंड दहशतवादी भूमीका घेवून मिळालेली लोकप्रियता सवंग असते. याचे भान सेना नेतृत्वाला ज्या वेळेस येईल त्या वेळेस फार उशीर झालेला असेल.
म्हणावे असे एक दोन अपवाद सोडले तर सेनेला तारून नेतील असा जनाधार असलेला तळागाळातला कोणताच नेता त्यांच्याकडे नाहिय्ये.
उद्धव ठाकरेंच्या मर्यादा उघड्या पडल्या आहेत. आदित्य ठाकरे अगदीच अननुभवी आहेत.
दरवेळेस राष्ट्रवादीच्या कुबड्या घेऊन राज्य मिळवणे हाच एकमेव मार्ग चोखाळला तर आत्ता आहे तेही जनमत विरोधात जाईल

चौकटराजा's picture

12 Sep 2020 - 1:48 pm | चौकटराजा

विजुभौ , बाळासाहेब हे उमदे कलाकार वगैरे होते पण सुमार राजकारणी होते. मॅनेज करता येणारे गॉडफादर होते असे म्हणायचे का ..... ?

बीजेपी चे कसे होईल यापेक्षाही आता मुळात प्रश्न निर्माण झालाय तो सेनेच्या आस्तित्वाचा.

तुमच्या धाग्याला हे वाक्य बरोबर बसते आहे आणि त्यानुसारच धागा पुढे चालला आहे..
परंतु थोडे अवांतर वाटेल पण हे मुद्दे मांडतो..

--=>

प्रश्नच पडायचा असेल तर या देशाचे काय होईल याचाच पडतोय आता..
1.

आता केंद्र आणि राज्याकडे कोविड मुळे पैसे कमी आहेत, निदान अश्या वेळेस काही गोष्टीत tax वाढवून सरकार पैसे जमवू पाहतेय.. पेट्रोल dizel हे त्याचे मुख्य स्रोत, तसेच नुकतेच zee business ला ऐकले sanitizer वर gst जादा आकारणार आहेत म्हणुन त्याच्या किंमती वाढणार, आता ज्या गोष्टीला tax free असायला हवे त्या पेक्षा जास्त कर लावला जातोय..
पेट्रोल वर जास्त कर घेण्या विरोधात मी होतो, परंतु देशाच्या गरजेसाठी आणि पैसेच नसल्याने ते पैसे आता गोळा करत असले तर माझा आता त्याला विरोध नाही..
परंतु जे खरे आहे ते चित्र जनतेला दिसले पाहिजे, आणि गरज नसताना जास्त कर आधी आणि नंतरही आकारला नाही पाहिजे..

2. बर अश्या अनेक सरकारी किंवा निमसरकारी संस्थे तुन करोडो रुपये मिळतात तरी, पण या मधील भागीदारी खुप वेगाने विकली जात आहे, आणि नंतर भविष्यात हे स्रोत ही private झाल्यावर सरकार ला असा पैसा वापरता येणार नाही.. पेट्रोलियम, lic, रेल्वे, विमानतळ डीफेंस अश्या अनेक संस्था आता हळू हळू विकल्या जातायेत..
उद्याचे रोजगार हे कंत्राटी आणि अश्या दिग्गच busineman कडेच असणार आहेत, याचा दूरगामी परिणाम होणारच..

3. कोविड मुळे अर्थव्यवस्थेवर खुप परिणाम झाला आहेच, पण त्या अगोदरच अर्थव्यवस्था डबघाईला आलेली होती.. तिला जोराचा झटका कोविड ने दिला पण त्या आधी?
त्यामुळे हे अपयश सरकार कोविड च्या नावाने खपवत असले तरी ते अपयश त्यांचे आधी आहे.. यावर कोणी बोलत नाही..

4.. करोना आधी महाराष्ट्रात जास्त वाढला, मग मुख्यमंत्री, आघाडी कशी हाताळू शकत नाही गोष्टी असे पसरवले गेले, आता देशात वाट लागली आहे, यावेळेस पंतप्रधान परिस्थिती हाताळू शकत नाही असे मेसेज किंवा सोशल डंका कुठेच वाजत नाही, आणि मग मात्र अश्या काही घटना वगैरे कडे लक्ष वळवले जातेय असे मला वाटते..

5. धार्मिक भेग अधिक वाढवून, त्याच्यावर आपली पोळी भाजण्याचे काम चालू आहे, पण देशात दंगली झाल्या तरी हिंदू मुस्लिम ह्या मुद्द्यावर राजकारण करून देशात दुफळी माजवली जातेय..
याचे पाडसाद उद्या जगात पडतील आणि हा देश हि सुरक्षित नाही असे उद्या जग बोलू शकते, पण याचे कोणालाच काही पडले नाही..
कुरेशी जनगण किंवा भारत माता बोलला किंवा राहुल गांधी नीट बोलला कि अजुन काय acche din पाहिजेत असे म्हणणारी जनता, acche din ला इतक्या level वर आणतील वाटले नव्हते..

त्यामुळे bjp, काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना यांच्या पेक्षा देशाचे काय होईल, रोजगारआणि अर्थव्यवस्थेचे काय होईल, देशाच्या प्रतिमेचे काय होईल, संस्था विकल्याने देश भविष्यात कुठल्या संकटातून जाऊ शकेल आणि या अनुषंगाने देशाचे काय होईल हा प्रश्न पडतो..
परंतु, हे प्रश्न पडू नये म्हणुन
6. लोकशाही चा चौथा खांब स्वतःच्या पद्धतीने वापरून असे प्रश्न लोकांना पडूच नयेत म्हणुन त्यांना वेगवेगळे मुद्दे चघळायला दिले जातायेत असे मला वयक्तिक वाटते..

शिवसेना, पवार, मोदी, काँग्रेस यांचे काही हि झाले तरी जनतेला काडीचा फरक पडत नाही, पण देशाच्या नुकसानीने सगळ्यांचे आयुष्य बदलणार आहेच आणि पुढील पिढी असल्या अराजक, धार्मिक स्थिती मध्ये आपण ढकलणार आहोत हे नक्की...

#India deserves better पुढचा भाग लिहावा म्हणतोय आता.. वेळ आलीये..

देशाची स्थिती गंभीर होत आहे.
Bjp सरकार ला विकासाची दिशा अजुन मिळत नाही.
मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या संस्था नष्ट करण्याचे काम ती मन लावून करत आहे.
फक्त दिखावा केला जात आहे विकासाचा पण विकास फक्त काही लोकांचाच होत आहे..
मीडिया लोकांना वेगळ्याच विश्वात घेवून जात आहे मीडिया जे विषय मांडत आहे आणि सरकार चे अपयश लपवत आहे हे पहिल्यांदा च घडताना दिसत आहे.
लोकांच्या सर्व अनुभवाने लक्षात येत आहे फक्त हिंदू चे राजकारण करून सत्ता मिळते हे गणित चुकीचे ठरू शकते.
ठोस असा कोणत्याच क्षेत्रात bjp ni काहीच केले नाही.

केवळ कोणी एक व्यंगचित्र काढले तर त्यासाठी एका ६५ वर्षाच्या नौदल अधिकार्‍यास मारहान करणॅ हे सेनेच्या कोणत्या संस्कारात बसते.
बाळासाहेब ठाकर्‍यांनी मार्मीक मधे अशी अनेक व्यंगचित्र काढली असतील याचाही सेनेला विसार पडलाय.
दुसरे म्हणजे ज्याला मारले तो नौदल अधिकारी होता हे लगेच समजणे शक्य नाही. पण एखाद्या ६५ वर्षाच्या माणसाला मारहाण करणे म्हणजे सेनेच्या लोकांनी त्याम्च्या अहंगंडामुळे साधी माणूसकीही सोडली आहे याचे ठळक उदाहरण आहे.
आता यावर सेना म्हणू शकेल की ज्यानी त्या अधिकार्‍याला मारले ती सेनेची अधिकृत भूमीका नव्हती.
दुसरे म्हणजे राऊत कोणालाही काहिही बोलले तरी ते चालते. अजितदादांना " मुतर्‍या तोंडाचे ' गटारातला कीडा असले शेलके शब्द वापरतात त्यावर राउतांना काय न्याय लावायचा. राउताना अक्कल नाही असे एकवेळ समजले तरी राउताचा धनी उद्धव ठाकरे यानीही त्या विरोधात कधी चकार शब्द काढला नाही.
कम्गना हा विषय सम्पला असे म्हणताना सामना मधे राऊत लिहीतात " उखाड दिया" . म्हणजे यानी जीभ उचलून टाळ्यालाच काय अगदी पायाच्या तळव्याला लावायची मात्र इतर कोणी त्यावर काही बोलले की म्हणायचे की हा विषय आमच्यासाठी सम्पलाय.
पूर्वी बाळासाहेब असताना सेने बद्दल ममत्व होते. मराठी माणसाचा आवाज अशी एक आशा वाटायची ( तीही फोल ठरवली गेली होती ) त्याम्च्या नंतरची इतकी भेक्कड भित्री असेल असे कधीच वाटले नव्हते