मागच्या वेळी ५९ आणि आत्ता पब्जी आणि ११८ ऍप बॅन केले.
म्हणजे अख्खा भारत चीन चे ऍप्लिकेशन वापरतो.
असं असेल तर भारतातले पंधरा वीस कोटी आणि पुण्यातले पाच पन्नास लाख जे सॉफ्टवेअर डेव्हलपर आहेत, रताळ्यांनो तुम्ही काम काय करता?? का जन्म नुसता हिंजेवाडीला जाऊन वाकड ब्रीज ला ट्रॅफिक जॅम करायला घेतलाय?
म्हणे सॉफ्टवेअर डेव्हलपर : ) ; )
-------------------------------------------------
हा मेसेज सध्या सगळीकडे फिरतो आहे.भाषा जरा हेटाळणीची असल्याने हिंजवडीतल्या कोणातरी चिडलेल्या संगणक अभिनेत्याने त्याला प्रत्युत्तरही दिले आहे.म्हणजे तसा प्रत्युत्तराचा WhatsApp मेसेज फिरतो आहे.खखोदेजा.
"आम्ही काम करणार्या लोकांसाठी कामाचे सॉफ्टवेअर्स बनवतो. रिकामटेकड्या वळूंच्या टाईमपाससाठी नाही."
---------------------------------------------------
प्रत्युत्तराचा संदेश हा समजा प्रातिनिधिक मानला तर तथाकथित रिकामटेकड्यांसाठी अॅप्स किंवा गेम्स बनवणे हे भारतीय अभियंत्यांना मानहानीकारक का वाटत असावे? सदर रिकामटेकड्यांसाठीच्या अॅप्स म्हणजे टिकटॉक किंवा पब्जी गेम असतील तर खालील दोन बातम्या वाचल्या असतीलच.
https://www.google.com/amp/s/maharashtratimes.com/business/business-news...
रिकामटेकड्यांच्या अॅपसाठी (जिची उलाढाल इन्फोसिसपेक्षाही मोठी आहे)मायक्रोसॉफ्ट आणि वॉलमार्टसारख्या 'दर्जेदार' कंपन्यांची चढाअोढ का लागली असावी?
दुसरी बातमी पब्जीबद्दलची
https://m.timesofindia.com/companies/money-game-the-growing-biz-of-pubg-...
एकूणच गेमिंग उद्योगाची उलाढाल हजारो कोटींची असावी.
असाच विचार WhatsApp बद्दलही आहे. WhatsApp म्हणजे इकडचा माल तिकडे, ढकलगाडी, WhatsApp युनिव्हर्सिटी असा विचार करणारेही बरेच लोक आहेत. पण तेच WhatsApp झुकेरबर्गला विकत घ्यावे लागले. झुकेरबर्ग फालतू ,आर्थिक फायदा नसलेली अॅप का विकत घेईल?
ह्या आणि अशाच इतर काही अॅप्स किंवा गेम्स रिकामटेकड्यांचे टाईमपास जरी मानले तरी त्यातून मिळणारा अफाट पैसा पाहूनदेखील अशी अॅप किंवा गेम बनवणं हे भारतातल्या अभियंत्यांना महत्वाचे का वाटत नसावे? आपणही अशी अॅप बनवून अब्जाधीश व्हावेसे का वाटत नसावे?
ही रिकामटेकड्यांच्या अॅप्सची महती.
भारताने याआधी बंदी घातलेल्या अन्य काही चिनी अॅप्समधे कॅम स्कॅनर , शेअरइट , UC ब्राऊजर , इ एस फाईल एक्स्प्लोरर , पॅरलल स्पेस अशी प्रसिद्ध आणि उपयोजनाच्या दृष्टीने दर्जेदार अशी अॅप्स आहेत. यांच्या सक्षम रिप्लेसमेंट प्ले स्टोअरवर असूनही याच अॅप्स इतक्या मोठ्या प्रमाणावर का वापरल्या जायच्या? की दुसरं कारण म्हणजे जाहिरातबाजीत या बंदी घातलेल्या अॅप्स अग्रेसर होत्या असं आहे का? तसं असेल तर चिनी अॅप्सच्या तुलनेत भारतीय अॅप्स जाहिरातीत कुठे कमी पडतायत?
टाईमपासच्या अॅप्स बनवणं हे अपमानास्पद असेल तर निदान कॅम स्कॅनर , शेअरइट , UC ब्राऊजर , इ एस फाईल एक्स्प्लोरर , पॅरलल स्पेस यांच्याइतक्या दर्जेदार, कामाच्या अॅप्स भारतीयांनी या चिनी अॅप्स प्ले स्टोअरवर येण्यापूर्वीच का बनवल्या नाहीत? की इथेही चिन्यांची जाहिरातबाजीच जिंकली?
भारतातले अभियंते जर कामाच्या अॅप्स किंवा सॉफ्टवेअर बनवत असतील तर यातल्या किती अॅप्स किंवा सॉफ्टवेअर्स ही जागतिक स्तरावर नावाजलेली आहेत?
साधारण याच विषयावर https://www.misalpav.com/node/20710 हा धागा आला होता.यालाही ८ वर्षे झाली.इथल्या एका प्रतिसादात "नुकतेच इंजिनीअरींग होउन बाहेर पडलेले रस्त्याच्या कडेला गळ्यात बॅज अडकवून, स्मार्टफोनशी चाळा करत कंपनीच्या बसची वाट बघत आठ-दहा लाख पॅकेज घेणारी मुलं-मुली बघितली की च्यायला (बिचार्यांचा काय दोष, पण) डोक्यात सणक जाते." असा उल्लेख आहे.
८ वर्षांनंतरही पॅकेजचा आकडा वगळता तीच परिस्थिती आजही आहे का? की बदललीय? ही परिस्थिती कधी बदलेल का?
उहापोह व्हावा! _/\_
प्रतिक्रिया
4 Sep 2020 - 5:17 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
थोडे मागे जावे लागेल रे उपयोजका त्यासाठी.
माहिती तंत्रज्ञन भारतात आले ते ८०च्या दशकात. संगणक व संबंधित आज्ञाप्रणालीचा उपयोग समाजातील गरजेची कामे करण्यासाठी व्हावा हे तत्कालीन सरकारचे उचित धोरण होते. म्हणजे रेल्वे/बस/बॅंकांचे सॉफ्ट्वेयर व रोजच्या व्यवसायासाठी लागणारे सॉफ्ट्वेयर.
इन्फोसिसचे फिनॅकल काय किंवा टॅलीचे सॉफ्ट्वेयर , एच सी एल्/विप्रोचे संगणक असोत वा सी-डॅकचे 'परम' महासंगणक, सॉफ्ट्वेयर लिहिणे ही ग्राहकाची गरज असली पाहिजे हा विचार प्रबळ होता. त्यामुळे "गंमत वा पॅशन का काय म्हणतात ते डोक्यात ठेउन लिहिणार्यंची संख्या अत्यल्प होती.
लोकप्रिय अॅप बनवुन विकण्यात खूप पैसा असेलही , भारताता अनेकानी अशी अॅप्स बनवली आहेत पण चीन निश्चित पुढे आहे.
4 Sep 2020 - 5:59 pm | उपयोजक
प्रिसादाबद्दल धन्स !
चीन निश्चित पुढे आहे.
जाहिरातबाजीमुळेच का? की दर्जा?
4 Sep 2020 - 6:17 pm | Rajesh188
आम्हा भारतीय ना साचेबद्ध काम करायची सवय आहे ती प्रतेक क्षेत्रात दिसेल.
शेतकरी सोयाबीन तर सोयाबीन चीच लगवर करतील जिकडे बघावे तिकडे सोयाबीन.
नाही उस .
नवीन काही प्रयोग करणार नाहीत.
दोन चाकी गाड्या फक्त बजाज बनवत होती तेव्हा एकच मॉडेल किती तरी दिवस बाजारात होते.
बाहेरच्या कंपन्या आल्या नी विविध प्रकारच्या दोन चाकी गाड्या रस्त्या वर दिसू लागल्या.
तेच खेळण्या विषयी मी जेव्हा लहान होतो तेव्हा एकाच प्रकारची खेळणी होती.
Kachakdya चे ट्रक आणि 1 min निघणारी त्याची चाक.
चीन कडून खेळणी आयात सुरू झाले आणि विविध प्रकारच्या खेळण्याची ओळख झाली.
Light च्या माळा,मोबाईल,आणि अशा किती तरी क्षेत्रात आपण विविधता आणलीच नाही.
आणि चीन शिरजोर झाला.
आता मोबाईल गेम्स,ऍप मध्ये पण नवीन काही आपण करू शकलो नाही त्यांनी केले.
5 Sep 2020 - 12:43 pm | चौथा कोनाडा
+१
12 Sep 2020 - 1:06 pm | चौकटराजा
एकूणात तुमचे प्रतिसाद पहाता एकूणच तुमचा कल वास्तवाकडे आहे , ईझम कडे नाही याचा अनुभव येतो. मिपावर मी तुम्हाला "बुकमार्क" केले आहे असे समजा !
4 Sep 2020 - 6:36 pm | शा वि कु
मुळात भारतीय गेम डेव्हलपमेंट मध्ये नाहीत हे गृहतक कितपत सत्य?
कारण पुण्यात युबिसॉफ्ट चे ऑफिस आहे. तिथे बरेच लोक गेम बनवतात.
4 Sep 2020 - 6:40 pm | शा वि कु
गूगल केल्यावर एकूण आपल्याकडच्या गेमिंग स्टुडिओ कळून काय पबजी टाईप हिट्स नाहीत असे दिसते.
4 Sep 2020 - 6:49 pm | कंजूस
नवीन भारतीय apps चे स्वागतच आहे. एवढे बोलून खाली बसतो
4 Sep 2020 - 7:04 pm | Rajesh188
मोबाईल वर गेम सर्वच खेळतात ,काही त्याचा अतिरेक करतात तर काही त्या गेम मधून काही वेळ आनंद घेतात.
मग game वाईट आहेत की त्याचा वापर करणारे वाईट आहेत.
4 Sep 2020 - 8:53 pm | कोहंसोहं१०
हे फक्त गेम्स किंवा ऍप्स पुरते मर्यादित नाही. आज भारतात अनेक सॉफ्टवेअर दिग्गज कंपन्या आहेत पण बर्याचश्या फक्त सर्व्हिस देतात. वेळीच या कंपन्यांनी प्रयत्न केले असते तर फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम किंवा कामाचे सॉफ्टवेअर जसे की ओरॅकल, एसएपी, किंवा क्लाऊड वरील प्रोडक्ट्स यांच्यापैकी एक किंवा अनेक आज भारतीय असते.
भारताकडे इतके कुशल मनुष्यबळ असूनपण चीन टेक्नोलॉजी मध्ये आपल्या खूप पुढे गेला आहे कारण आपल्या भारतीय कंपन्यांनी संधीच्या काळात फक्त सेवा पुरवून गुलामगिरी पत्करली. बिसिनेस इंनोव्हेशन शून्य.
मजेची गोष्ट म्हणजे परदेशातील दिग्गज कंपनीत कोड करणारे बहुसंख्य भारतीयच आहेत. याला मुख्य दोषी म्हणजे दिग्गज सॉफ्टवेअर कंपन्यांची गुलामगिरी मानसिकता वाटते.
4 Sep 2020 - 10:24 pm | बाप्पू
IT क्षेत्रात नेमके काय काम चालते किंवा एखादा व्यक्ती IT इंजिनिअर आहे म्हणजे तो नेमके काय करतो. भारतातील IT कंपनी नेमके काय बनवते हे कित्येक सामान्य माणसांना माहिती नसते. पण तरीही भारत IT क्षेत्रात बाप आहे अशी त्यांची ठाम समजूत असते तर फक्त अश्या नॉन IT लोकांना समजावे म्हणून खाली एक सोपे उदाहरणं देत आहे. -
XYZ ही एक परदेशीं कंपनी आहे आणि ती चारचाकी गाड्या बनवते.
तर गाडी, तिचे इंजिन, सर्व पार्टस, महत्वाच्या पार्टस चे डिझाईन, चाके, टायर इ इ सर्व काही बाहेरच्या देशात बनवले जातात. गाडी पूर्ण पणे असेम्बल पण तिकडेच होते आणि गाडी कस्टमर ला विकली जाते.
आता एकदा प्रोडक्ट विकल्यानंतर त्यासंबधीची इतर कामे जसे कि -
गाडी चे ऑइल बदलणे,
सर्व्हिसिंग करणे,
छोटी मोठी कामे करणे,
हवा भरणे, पंक्चर काढणे
डेन्टीन्ग पेंटिंग
वायरिंग चेंज करणे
व्हील बॅलेन्स आणि अलाईनमेंट
गाडी धुवणे, vacume करणे
इ इ
कामे भारतातील गाड्यांच्या कंपन्या करतातं.
भारतात अश्या पद्धतीची कामे करण्यासाठी भरपूर मॅनपॉवर उपलब्ध आहे. गल्लो गली कॉलेजेस उघडलेली आहेत. किंबहुना बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी फक्त तेच काम करू शकतो. कारण नवीन गाडी बनवण्यासाठी नेमक काय पाहिजे आणि गाडी कोणत्या market मध्ये विकली जाते हे त्यांना शिकवले जात नाही. प्रॅक्टिकल मध्ये सुद्धा 1950 च्या जमान्यात ली एखादी गाडी असते आणि त्याच्या पार्टस ची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते. त्यामुळे आत्ता रस्त्यावर धावणाऱ्या गाड्यांची माहिती त्यांना कधीच नसते.
भारतामध्ये फार कमी कंपन्या आहेत ज्या स्वतःची गाडी बनवतात आणि बाजारात विकतात.
बाकी सगळ्या कंपन्या या इतर परदेशीं कंपन्यांनी बनवलेल्या गाडीची वर नमूद केलेली कामे करून देतात. जर सर्व्हिसिंग करताना एखादा पार्ट खराब झाला किंवा मेजर काही प्रॉब्लेम असेल तर तोदेखील ते स्वतः बनवत नाहीत. मूळ परदेशीं कंपनी कडे त्या प्रॉब्लेम बाबत मदत मागितली जाते..
काही कंपन्या म्हणतात कि आम्ही स्वतः गाड्या तयार करतो पण प्रत्यक्षात ते आधीच तयार केलेल्या गाडीला कलर देणे, इंजिन चे स्क्रू आवळणे, गाडीमध्ये इतर ऍक्सेसरीज जसे कि सीट कव्हर म्युसिक सिस्टीम इ बसवणे हीच कामे करतातं पण भाव असा खातात कि आम्ही मर्सेडिज किंवा ऑडी च्या लेवल च्या गाड्या बनवतो.
काही कंपन्या अपवाद आहेत. त्या खरोखरच त्यांच्या गाड्या अगदी स्क्रॅच पासून बनवतात आणि एन्ड कस्टमर ला विकतात पण अश्या भारतीय कंपन्या खूप कमी आहेत आणि त्यांनी बनवलेल्या गाड्या market मध्ये खूप कमी लोकं खरेदी करतात. त्यांनी बनवलेल्या गाड्यांची नावे बऱ्याचदा आपल्याला माहिती नसतात.
अशी जर एकंदर परिस्थिती असेल तर मग भारताला तुम्ही ऑटोमोबाईल किंवा कार कम्पन्यांचे हब म्हणू शकता का..
5 Sep 2020 - 8:10 am | उपयोजक
मार्मिक , नेमकी माहिती सोप्या शब्दात!
आयटीत भारत नक्की कुठे आहे हे समजले.
5 Sep 2020 - 12:55 pm | चौथा कोनाडा
अतिशय मार्मिक !
एकंदरीत पाश्च्यात्य / परदेशी ते भारी असं सर्रास गृहित धरून इथले राज्यकर्ते / उद्योजक स्वतःची फरफट करून घेतात !
त्यांचं अनुकरण करतात, त्यांची सेवा करण्यात धन्यता मानतात ! इथल्या संकल्पनांना अडगळीत ढकलतात !
आपल्या देशातील गरजा परदेशी सिस्टिम्स प्रमाणे "अॅडॉप्ट" करतात !
5 Sep 2020 - 2:22 pm | तुषार काळभोर
मिसळपाव वरच्या सर्वात मार्मिक अन उपयोगी प्रतिसादांपैकी!!
+१२३४५६७८९०!
आईशप्पथ, या अॅनॉलॉजीने पहिल्यांदा क्लियर झालंय की भारतात अन भारताबाहेर काय होतं ते!
6 Sep 2020 - 12:42 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
"आम्ही मर्सेडिज किंवा ऑडी च्या लेवल च्या गाड्या बनवतो."
छान उदाहरण दिलेस रे बाप्पु. पण मग मर्सेडिज किंवा ऑडी ह्यांच्या ज्या भारतात कंपन्या आहेत तेथे आपले अभियंते काय करतात ?काहीतरी डिझाईन करण्यात हातभार लावत असतिल ना ?
8 Sep 2020 - 1:29 pm | बाप्पू
हो माईसाहेब. खरं आहे तुमच... हातभार लावतात पण त्यांचे कर्तृत्व फार नसते. तुलनात्मक हलक्या दर्जाची कामे जसे कि - इंजिन चे टेस्टिंग करणे, इंजिन मध्ये एखादा नवा पार्ट जोडणे, गाडीमध्ये कस्टमर च्या requirement नुसार एखादी ऍक्सेसरी ऍड करून देणे etc.
इंजिन design करणे, raw मटेरियल पासून पूर्ण नवीन गाडी बनवणे आणि ती विकणे हे मुखत्वे ऑनशोर वरून च मॅनेज केले जाते.
------------------------------------------------------
इंडिया मधील प्रॉडक्ट बेस्ड IT कंपन्या (ज्या स्वतः चे प्रॉडक्ट स्वतः इंडिया मध्ये बनवून पूर्ण जगात विकतात) अश्या फारच कमी आहेत.
जवळपास 70% हुन अधिक IT इंडस्ट्री ही सर्व्हिस बेस्ड आहे.
काही विदेशी प्रॉडक्ट बेस्ड IT कंपन्या देखील इंडिया मधून फक्त ऑपरेशन्स सेंटर चालवतात. महत्वाची सर्व कामे आणि खरेदी विक्री व्यवहार हा विदेशातूनच होतो, आणि फायदा पण तिकडेच होतो.
अगदीच स्पष्ट आणि रोख ठोक बोलायचं झाले तर ---> प्रॉब्लेम हा आहे कि आपले इंजिनियर फक्त महिन्याच्या शेवटी येणाऱ्या रक्कमेवर लक्ष ठेवून असतात. फारच कमी पडायला लागले कि मग दुसरी कंपनी बघतात..
R&D is ZERO.
5 Sep 2020 - 7:30 am | प्रमोद देर्देकर
आपल्याकडे बुद्धिमत्ता आहे कि पण तिचा आत्ताच आपल्याला उपयोग नाही म्हणून इतरांकडून अडगळीत टाकली जाते आणि 20 वर्षानंतर बाहेरून आली कि भरपूर उपयोगी वाटते म्हणून वापरली जाते.
एकाच उदाहरण 1980 च्या दशकात हॉटमेल भारतातल्या भाटियाने बनवले आणि इथे कोणाला उपयोगी पडेल कि नाही म्हणून बाहेर विकलं.
आता ते जर इथेच राहिलं असतं तर gmail आलंच नसतं.
तेव्हा नुसती बुद्धिमत्ता असून काही होत नाही तिचा उपयोगात कुठे करून घेता येईल हे आपल्याला कळत नाहीये अजून.
म्हणून आपल्याकडे शिकून लोक बाहेरच्या देशात नोकरी करतात.
आणि आपण बढाया मारतो कि सिलिकॉन दरीत भारतीयांचं वर्चस्व आहे. खरं तर आपल्या ज्ञानाला ते उद्योजक लोक वापरून घेतात.
5 Sep 2020 - 8:21 am | उपयोजक
मग ही परिस्थिती बदलणार कधी? ८ वर्षात काडीचाही बदल होत नसेल तर कोणीतरी , कुठेतरी नक्की चुकतंय.
6 Sep 2020 - 12:34 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
हॉटमेल १९९४-९५ च्या सुमारास. सबीर भाटिया हे १२ वी नंतर अमेरिकेतच शिकायला गेले. हॉटमेल नंतर त्यानी माय्क्रोसोफ्टला विकले.
(येथे सबीर ह्याना कमी लेखायचे नाही पण हॉटमेलआधीही ई-मेल होताच. सबीर ह्यानी 'ई-मेल'चा शोध वगैरे लावला नाही. याहु-मेल वगैरे होतेच. पण हॉटमेल खूप लोकप्रिय असल्याने मायक्रोसोफ्टने ती कम्पनी विकत घेतली)
6 Sep 2020 - 1:44 pm | शाम भागवत
त्यांनी बनवलेलं सर्च इंजीन अफलातून होतं. त्यासाठी तो व्यवहार करण्यात आला असं त्यावेळी वाचल्यासारखं वाटतंय.
7 Sep 2020 - 10:13 pm | भुजंग पाटील
हॉटमेल (आणी रोकेटमेल) हे पहिले वेब बेसड ईमेल होते.
त्यापुर्वी इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइडर चे ईमेल क्लायंटस वापरावे लागत.
इंटरनेट अकाऊंट हे कस्टमरच्या फोन नंबरशी संलग्न असल्याने ईमेल वापर आपापल्या घरूनच करावा लागे.
हॉटमेल लोकप्रिय झाले कारण वेब बेस्ड असल्याने जगात कुठूनही वापरता येत होते.
रोकेटमेल चे पुढे याहु-मेल झाले.
व्हनिला ई-मेल प्रोटोकोल १९७० पासून अस्तित्वात आहे.
5 Sep 2020 - 7:46 am | कंजूस
आपल्याकडे सर्वर आहेत का ? आपला आधार वगैरेचा डेटा कुठे ठेवलेला आहे?
5 Sep 2020 - 8:49 am | Rajesh188
भारत हे राष्ट्र म्हणून अजुन सुद्धा उदयाला आले नाही ..
दिसत नसला कागदावर तरी भारत अनेक तुकड्यात विभागलेला आहे.
एकमेकांनी पाणी पाजण्यात च सर्व ताकत वाया जात आहे.
ह्या मधून वेळ मिळाला तर चीन ,पाकिस्तान आहेच परत व्यस्त ठेवण्यास भारताला.
5 Sep 2020 - 1:24 pm | शाम भागवत
साधा बदाम सात किंवा भेंडीकोट खेळता येईल असा ऑनलाइन प्रोग्रॅम बनवला तरी लोकांना तो आवडू शकेल!!!
पैसे लावून पत्ते खेळण्याबद्दल मी बोलत नाहीये.
लाॅकडाऊनमधे मुलाने हा उद्योग केला व आम्ही भेंडीकोट खळलो. ६ जणात काॅन्फिडन्स खेळलो. जाम मजा आली. पत्ते वाटणे, हात गोळा करणे, मार्क लिहिणे, रिझल्ट लावणे वगैरे कामे संगणक करत होता व तेही तात्काळ. सोबत ग्रुप चॅटिंगची तात्पुरती सोयपण दिली होती.
भारताला अशक्य काही नाहीये. न्यूनगंड प्रथम घालवायला पाहिजे.
पण हा प्रोग्रॅम अजून तो सुधारायला हवा. बघू या मुलगा कधी मनावर घेतोय ते. ते
5 Sep 2020 - 5:37 pm | चौथा कोनाडा
+१
भारतीय खेळांचे संकलन आणि त्याचे गेमींग अॅप यावर कोणी विचार केला आहे असं वाचण्यात आलं नाहीय !
खुप मोठं मार्केट असेल हे !
5 Sep 2020 - 7:02 pm | उपयोजक
फार छान! अशी मुले नक्कीच भारताचं नाव पुढे जाऊन आयटी क्षेत्रात आदराने घ्यायला हातभार लावतील.
5 Sep 2020 - 10:00 pm | शाम भागवत
_/\_
5 Sep 2020 - 2:26 pm | Rajesh188
काही वर्षा पूर्वी लोकल बाजारात मोबाईल वरून शेतातील विहरी ची मोटर बंद चालू करण्याचे तंत्र उपलब्ध झाले होते .
पण ते तंत्र बाकी गोष्टी साठी बाजारात मोठ्या प्रमाणात वापरले गेले नाही.
बाहेरच्या देशाचे ऑटोमेशन आपण घरातील वस्तू बंद चालू करण्यासाठी वापरतो .
पण पूर्ण भारतीय ,भारतात तयार झालेलं तंत्र वापरून ऑटोमेशन चा घरगुती वापरासाठी वापर करून रोजची घरगुती वापराची उपकरण आपण बनवत नाही.
उद्या चीन नी अशी उपकरण बाजारात आणली तर चीनच्या नावांनी बोटे मोडण्यात काही अर्थ नाही.
6 Sep 2020 - 2:59 pm | Gk
सगळेच उद्योजक झाले तर त्यांच्याकडे नोकर्या कोण करणार ?
7 Sep 2020 - 6:06 pm | चौथा कोनाडा
जीके साहेब, सगळेच कसे उद्योजक होतील ? आधी सगळ्यांमधले २०% तरी होऊ द्या, मग बघू !
8 Sep 2020 - 12:55 am | शकु गोवेकर
तळेगावला चीन कंपनी ग्रेट वॉलमार्ट कारखाना काढते आहे व कालच त्यांना परवानगी दिली व तुम्हाला चिनी लोकांना पूर्ण सहकार्य मिळेल व पायघड्या घालतो असे सांगितले गेले हि योजना रुपय ४०००० कोटीची आहे व हळूहळू हिंजवडी येथेही चिनी कंपन्या येणार असे वाटते
12 Sep 2020 - 1:31 pm | चौकटराजा
मी सध्या स्पेन ,इटाली. हंगेरी , पोर्तुगाल , मेक्सिको चीन अशा देशावरचे व्हिडिओ एकामागून एक असे पहात आहे. भारताविषयी उगीचच अभिमान वगरे असलेली मंडळी मिपावरही आहेत. भारतात शून्याचा शोध लागला, वैदिक गणित , अजिन्ठा वेरूळ वगैरे मुद्दे त्यासाठी पुढे केले जातात . भारत देशातही अनेक भव्य वास्तू आहेत त्यातील अनेक देवळेच आहेत. बाकी तलाव , घाट , अक्विडक्ट , धर्मशाळा, मोठे चौक ,आदर्शाकडे जाणारी शहररचना या बाबतीत भारतात २००० वर्षात फारसे काम झालेलेच नाही .वेरूळ, अजिंठा ,हळेबीड ,बेलूर ई ई ई ना मी वास्तू रचना म्हणायला फारसा तयार नाही. मोठमोठ्या स्पॅन असलेली देवळे नसल्याने भारतातील देवळे ही बाहेरून कितीही देखणी असली तरी आत गेल्यावर वावरास बरी वाटत नाहीत. हे सगळे इथे सांगण्याचे कारण असे की एकतर येथील शासकानी देवळाखेरीज फारसा भाव इतर कोणत्याही वास्तूरुपाला दिला नसावा ! एक देऊळ किंवा दुसरा राजवाडा. तीच परम्परा भारत देशात उद्यूग जगतात देखील चालू आहे. माझ्या सोसायटीत काही इन्जिनिअर आहेत . पण गेले पाच वर्षे त्याना जिन्यातील., कोरेडोर मधील , पार्किन्ग्मधील दिवे, पाणीपुरवठा यावर आटो कन्ट्रोल बसविण्याचे काम जमलेले नाही ! ( ते पदवीधर आहेत बरे ! काही सी ओ ई पी चे ही असतील) असे इन्जिनियर बजाज , टाटा मोटर्स , महिन्द्रा मधील असतील तर काय करत असतील कप्पाळ ?
13 Sep 2020 - 7:32 am | शकु गोवेकर
चौकराजा यासी तुमचे बरोबर आहे कारण गोव्यातील पोर्तुगेज लोकांनी बनवलेला पूल अजून भक्कम आहे पण बिहारमध्ये मागील महिन्यात ऑगस्ट २०२० मध्ये बांधलेला पूल उदघाटनाची वेळ आली त्यावेळी पडला आहे
15 Sep 2020 - 7:46 pm | उपयोजक
https://www.google.com/amp/s/www.indiatvnews.com/amp/news/india/scientis...