ग्रामीण भागात अधिक प्रांजळपणा असतो का ?

केदार पाटणकर's picture
केदार पाटणकर in काथ्याकूट
3 Sep 2020 - 10:27 pm
गाभा: 

शहरी माणसे बरेचदा खोटेपणा, बेरकीपणा इत्यादी 'गुणांचा' आधार घेत जीवन जगत असतात. ग्रामीण भागात बरेचदा प्रांजळपणा, दिसून येतो. जितका ग्रामीण भाग अधिक तितका खरेपणा प्रत्ययास येतो.
हे खरे मानले तर तसे का आहे?
शहरी माणसे खरी वागू शकत नाहीत का?

प्रतिक्रिया

दादा कोंडके's picture

4 Sep 2020 - 1:09 am | दादा कोंडके

ग्रामीण भागातल्या लोकांवर तुमचा राग दिसतोय. खोडसाळ धागा आहे. पण मिपाकर बेरकी आहेत. चार पाच ओळींच्या लेंढ्या बघून मोठमोठाले प्रतिसादाचे 'पो' घालून टिआरपी वाढवणार नाहीत. ;)

योगी९००'s picture

4 Sep 2020 - 9:47 am | योगी९००

खोटेपणा, बेरकीपणा हे ज्या त्या मनुष्याच्या जडणघडणीवर आणि स्वभावावर अवलंबून असते. तिथे शहरात काय किंवा गावात काय...सर्व ठिकाणी सर्व प्रकारची माणसे आढळून येतात...

मी आतापर्यंत जी काही छोट्या गावातली किंवा खेडेगावातली माणसे बघितली त्यातली बरीचशी लबाड, कामचुकार व बेरकी अशीच बघितली. दिवसभर टाईमपास करणे, कामात टंगळ मंगळ आणि संध्याकाळी कोठे तरी चकाट्या पिटत बसणे असे आरामात जीवन घालवत होती. आता मोबाईल, टिव्ही मुळे हा ही टाईम पास त्यांना करता येतो. जे काही उत्पन्न मिळते त्यात त्यांचे आरामात भागते. पण या मुळे ही सर्वच गावातली लोकं तशीच असतात असे मी म्हणणार नाही.

केदार पाटणकर's picture

4 Sep 2020 - 9:56 am | केदार पाटणकर

दादा,
माझा प्रश्न प्रांजळ आहे.
तुम्हाला यात खोडसाळपणा व राग कसा दिसला, हे तुमचे तुम्हाला ठाऊक. तुमच्या नावाला शोभेल असा 'इनोदी' प्रतिसाद दिलात. मोठे पो नाही पण प्रतिसादाची दोन ओळींची लेंडी पडते कधी कधी.

ज्या ठिकाणी मोकळा वेळ असलेली लोक असतात त्या ठिकाणी च बेरकी पना,खोटारडे पना जास्त असतो.
ज्यांना कामातून वेळ च मिळत नाही नेहमी कशात ना कशात गुंतलेले असतात त्यांना फुकटच्या उठाठेवी करायला वेळ च नसतो.
ग्रामीण भागात मोकळा वेळ जास्त म्हणून तिथे हे उद्योग जास्त.
शहरात मोकळा वेळ कमी त्या मुळे शहरात त्याचे प्रमाण कमी.