चारीमुंड्या चित

Primary tabs

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जे न देखे रवी...
2 Sep 2020 - 8:44 pm

दारु पुरती प्रतिभा याची केवळ मर्यादित,
रोज ढोसतो आणि होतो, चारीमुंड्या चित ॥१॥

कर्म दुविधेने तापुन हा झाला, पुरता संभ्रमित,
जना विचारतो कर्मफले हा चारीमुंड्या चित ॥२॥

सकाळी होती वांधे याचे, त्याचे गातो गीत,
हा खातो का पितो कळेना, चारीमुंड्या चित ॥३॥

वडा-पावच्या भंपक कविता, ना कोणी वाचित,
सुमार विडंबने पाडी त्याचू, चारीमुंड्या चित ॥४॥

र ला ट जुळवून करतो हा विषयांचे भरीत,
कसा निपजला थुकरट कवि हा चारीमुंड्या चित ॥५॥

किती मारल्यास उड्या तरी तुझी उंची मर्यादित,
घेशी कुणाशी होड रे फट्टू चारीमुंड्या चित ॥६॥

शब्दक्रीडा

प्रतिक्रिया

Rajesh188's picture

2 Sep 2020 - 10:47 pm | Rajesh188

तुमच्या कविता पेक्षा तुमचे धडाकेबाज धागे
आणि त्या वर तुम्हीच दिलेले आत्मविश्वासूर्वक प्रतिसाद च आवडतात.
तुम्ही त्याच भूमिकेत योग्य आहात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Sep 2020 - 11:18 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

व्यक्तिगत न होता, तुमचे धडाकेबाज धागे आणि त्या वर तुम्हीच दिलेले आत्मविश्वासूर्वक प्रतिसादच आवडतात.

कवितेतही तो दम नाही. ओढून ताडून तो प्रयत्न केल्याचे स्पष्ट दिसते. बाकी जालावर चारीमुंड्या चीत करण्याची करण्याची संधी प्रत्येकाला मिळते, फक्त धीर सूटता कामा नये.

ता.क. आता किलो दोन किलोचे उपप्रतिसाद टाकून कविता कशी योग्य, हिशेब कसे योग्य ते पटवून देऊ नये. (ह.घ्या )

-दिलीप बिरुटे

संजय क्षीरसागर's picture

3 Sep 2020 - 12:55 pm | संजय क्षीरसागर

माझे धागे वाचून लोकांना इतका वाईड स्पेक्ट्रम सहन होत नाही > बघा :

नॅशनलाइज्ड बँकेशी एकाहाती फाईट देऊन कुणी न्याय मिळवू शकेल ही कल्पनाच तुम्हाला असह्य झाली ! मग तुम्ही सरळ मी बोगस पोस्ट टाकली आहे असा आरोप केला ! मी कॉन्फोनेटची लिंक देऊन संपूर्ण दावा सगळ्यांना बघायला मोकळा केला होता. अशी जबरदस्त थोतरीत बसल्यावर तुम्ही माफी मागितली. शिवाय आता इथेही माझ्या लेखनाला दाद दिली आहे. हा झाला फेअरनेस.

पण इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स आलेले स्वतःचा व्यासंग वाढवण्याऐवजी भिकार विडंबनं टाकतात, ज्यांचा इतरत्र पुरता कोच्या झाला आहे असे त्या विडंबनांना लटकतात आणि सगळे पराभूत एक भंपक विजयोत्सव साजरा करतात. यात ना संकेतस्थळाचा काही फायदा न पराभूत सदस्यांची काही प्रगती. पुन्हा असल्या थर्डक्लास मनोवृत्तीचे लोक जेंव्हा आवर्जून काही महत्त्वाचं विचारतात तेंव्हा मी त्यांना फाटा दाखवण्याची शक्यताच जास्त.

या विडंबनाबद्दल म्हणाल तर कुठल्याही लेखनाला बेसिक कंटेंट चांगला लागतो. मी अशा सदस्याची पूर्णलेखन कारकिर्द अभ्यासतो. इथे इतका भिकार कंटेंट होता की ३ दिवस मी पूर्ण दुर्लक्ष केलं. पण जसजसे इतर पराभूत तिथे येऊन नाचायला लागले तेंव्हा काही तरी दखल घेणं भाग होतं. तरीही चारीमुंड्या चित ही टॅग लाईन नक्कीच वेधक आहे. आता या चारीमुंड्या चिताला किमान स्वतःच्या लेखनाची लायकी कळली तरी उद्देश साधला म्हणायचं !

अरे वा ! जमली आहे हि कवितारुपी उत्तराची कल्पना.

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Sep 2020 - 9:08 am | ज्ञानोबाचे पैजार

नाही जमले,

उगाच ठरवून घाईघाईने ओढून ताणून अट्टाहासाने लिहिल्या सारखे वाटते आहे

अभ्यास कमी पडला आहे त्यामुळे वाचताना जागोजागी अडखळायला झाले,

इथे टाकायच्या आधी जर एकदा शांतपणे वाचली असती तर बरे झाले असते.

पुढच्या वेळी सुधारणा व्हावी म्हणून जरा स्पष्टच लिहिले आहे, राग मानू नका.

पैजारबुवा,

संजय क्षीरसागर's picture

3 Sep 2020 - 1:01 pm | संजय क्षीरसागर

अभ्यास करण्यासारखं काय आहे त्या पोस्टसमधे ? सगळा तद्दन भिकार प्रकार आहे. त्यामुळे विडंबनाला मटेरियल उपलब्ध नव्हतं. ज्यांना पोस्टवर समोरासमोर भिडता येत नाही ते असले बायकी प्रकार करतात; त्यामुळे मला असल्या फालतू प्रकारात अजिबात रस नाही. तरीही टॅग लाईन भारी आणि रिदम बरोबर आहे.

डॅनी ओशन's picture

3 Sep 2020 - 1:34 pm | डॅनी ओशन

जसजसे इतर पराभूत तिथे येऊन नाचायला लागले

हहह. :)
कविता छानच आहे. पण कविता इतकी खास नाही म्हणल्यावर ती चांगली कशी आहे हे सांगणे मात्र बिनतोड! असा कॉन्फिडन्स असावा व्यक्तीत.
तर तुम्हाला प्रत्युत्तर मिळो आणि हा विडंबन सिलसिला असाच चालू राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना.

कोहंसोहं१०'s picture

4 Sep 2020 - 1:07 am | कोहंसोहं१०

नाही जमली एवढी. उगाच लिहिण्याचा दबाव पडला आहे आणि कवितेतूनच उत्तर देणे अनिवार्य आहे या समजुतीतून ओढून ताणून लिहिल्यासारखी वाटते.

शेवटी काव्य आवडणे किंवा न आवडणे हे वैयक्तिक. पण या धाग्यावरील तुमच्या प्रतिसादातून मूळ विडंबन काव्य लेखकावर आणि इतरांवर ज्यांना ती आवडली आहे त्यांच्यावर ओकलेली गरळ आणि तुम्हाला पलटवार काव्य विशेष न जमल्यामुळे आलेली अगतिकता स्पष्ट दिसते.

अर्थात हे मा वै म

सतिश गावडे's picture

5 Sep 2020 - 5:26 pm | सतिश गावडे

कोणत्या कवितेचे विडंबन म्हणायचे हे? क्रांतिकारी कवीने विडंबन लिहीताना विडंबनाच्या सुरुवातीला प्रेरणेचा दुवा द्यायचा संकेत मोडला आहे.

सुबोध खरे's picture

5 Sep 2020 - 6:34 pm | सुबोध खरे

अगदीच केविलवाणे विडंबन आहे.

पहिलीच ओळ पहा म्हणजे लक्षात येईल

कविता हा आपल्याला झेपणारा विषय नसेल तर उगाच प्रयत्न का करावा?

गामा पैलवान's picture

5 Sep 2020 - 6:38 pm | गामा पैलवान

अवांतर खुसपट :

ते चित नसून चीत हवं ना? अर्थ बदलतो म्हणून खुसपट काढलं. चारीमुंड्या चित म्हणजे चारही डोकी चित धारण करून आहेत.

-गा.पै.

संजय क्षीरसागर's picture

5 Sep 2020 - 7:58 pm | संजय क्षीरसागर

आयएनएस चक्र ही नवी अत्याधुनिक पाणबुडी आज भारतीय नौदलात दाखल होणार आहे. ही पाणबुडी दाखल झाल्यामुळं नौदलाची ताकद कितीतरी पटीनं वाढणार आहे. वेगानं धाऊन शस्त्रूला चारीमुंड्याचित करण्याची क्षमता या पाणबुडीमध्ये आहे. बघा !

शिवाय विडंबनकर्त्याशी ते बेमालूम जुळलंय !

संजय क्षीरसागर's picture

5 Sep 2020 - 8:04 pm | संजय क्षीरसागर

त्यामुळे ओरिजिनल विडंबनकर्त्याच्या सुमार लेखनाचा आलेख पाहिला की तुम्हाला एकेका कडव्याची खुमारी कळेल !

सुबोध खरे's picture

7 Sep 2020 - 12:04 pm | सुबोध खरे

२०१२ च्या एक भिकार बातमी मधून एक शब्द शोधून काढलाय.

बातमीदार पण आहे

अणू पाणबुडीची शक्ती १००० हॉर्स पॉवर लिहिली आहे. सध्या WDM २ डिझेल इंजिनाची शक्ती २५०० हॉर्सपॉवर असते.

WAG १२ या आधुनिक इंजिनाची शक्ती पण १२ हजार हॉर्सपॉवर आहे

चक्रच्या अणुभट्टीची शक्ती १९० मेगावॅट म्हणजे १९ कोटी वॅट आहे. म्हणजे २ लाख ५४ हजार हॉर्स पॉवर.

But INS Chakra, propelled by a 190 MW nuclear reactor for a maximum speed of around 30 knots

https://economictimes.indiatimes.com/infrastructure/ins-chakra-inducted-...

चारीमुंड्या चित चा अर्थ हा मुद्दा आहे. पाणबुडीची हॉर्सपॉवर किती हा नाही.

सुबोध खरे's picture

9 Sep 2020 - 12:27 am | सुबोध खरे

चारी मुंड्या चित हा वाक्प्रचार शोधण्या साठी 2012 सालची तद्दन भिकार बातमी शोधून काढली?

हे म्हणजे डोंगर पोखरून झुरळ काढण्यासारखं आहे!

पण अर्थ सांगणारी लिंक दिली; विषय संपला.

तुमचा वैचारिक गोंधळ असा की मुद्दा लक्षात न घेता तुम्ही सगळ्या बातमीचा निष्कारण उहापोह केला. आत तोंडावर आपटल्यानं तुम्ही काहीही मुद्दा रेटतायं.

त्यापेक्षा माझे प्रतिसाद नीट वाचायची सवय लावून घ्या, बुद्धी योग्य दिशेनं काम करेल.

शिवाय जिथे तिथे अशी शोभा करुन घेण्यापेक्षा माझ्याशी पंगा घेणं सोडा.

सुबोध खरे's picture

9 Sep 2020 - 10:35 am | सुबोध खरे

तुमच्याशी पंगा ?

भलतंच ?

सर्वज्ञ माणसाशी कोण पंगा घेईल?

अहो तुम्ही संताना अध्यात्म शिकवता, मनोविकार तज्ज्ञांना नैराश्याबद्दल त्यांच्या बेसिक्स मध्येच लोच्या आहे हे सांगता.

तुमच्या शी पंगा?

तोबा तोबा ! !