गाभा:
सध्या मुद्रित माध्यमात वृत्तपत्रे निघतात. त्यांच्या वेब आवृत्तीही निघतात. दोन्ही आवृत्ती वाचल्या जातात. वेब आली आहे म्हणून मला आता मुद्रित वृत्तपत्रे अजिबात नको, असे अजून तरी कोणी म्हणत नाही. त्यांचा वापर कमी झाला आहे पण संपलेला नाही. कागदावरील छापील मजकुराचे आकर्षण संपलेले नाही.
मुद्रित वृत्तपत्रे टिकतील अशीच शक्यता आहे. प्रश्न असा की, त्यांचा आकार थोडा कमी होईल का ?
प्रतिक्रिया
28 Aug 2020 - 4:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपण म्हणता त्या विचारांशी सहमती आहेच. वृत्तपत्रांचे आकार काळानुरुप बदलत गेलेत. पूर्वी जवळ जवळ दोन हात असे लांब सरळ रेषेत यावेत असे ते वृत्तपत्राचे जोडपान उघडले जात होते. आता फार लहान आकार झाले आहेत. अगदी हातभर वृत्तपत्र. संपूर्ण देशाच्या महाराष्ट्राच्या तपशीलवार बातम्या असायच्या. आता आकारही लहान झालेत. खर्च वाढला. पूर्वी छापखण्यातले वृत्तपत्रे असायची. मला तर असा त्या छापायच्या शाईचा एक ओळखीचा वास यायचा. कधी कधी काही पानं काळी यायची. पण चालायचंच. आता तालुक्याच्या बातम्या असणारी आवृत्ती येते. इतका लहान तो पेपर झालाय. आता पीडीएफ आवृत्तीने त्या पेपरं वाचायची मजा गेली. आता देश आणि राज्याच्या महत्वाच्या बातम्या असलेले एक मुख्य पान बाकीच्या त्या त्या तालुक्यातल्या बातम्या. बाकी, जिल्ह्यात तालूक्यातल्या घडामोडी अजिबात आता कळत नाहीत. अर्थात काळ आणि माध्यमं बदलली त्यामुळे हे सर्व आलेच. आमच्याकडे आमच्या लहानपणापासून ते आत्तापर्यंत वृत्तपत्र येते, वाचायला उड्या पडायच्या. वडील सगळी पानं ठेवून घ्यायचे आम्हाला एखादे पान द्यायचे. आम्ही त्यांचे वाचून व्हायची वाट बघायचो. आम्ही क्रिडापानापासून सूरु करायचो. आता पहिले पानापासून वाचन सुरु झालं. वयपरत्वे आवडी विचार बदलतात तसे वृत्तपत्राचे आकार बदलत गेले असेच म्हणावे लागते.
केदारसेठ, पूर्वी एसटीत असे दैनिक उघडले की त्याची घडी घालतांना अशी तारांबळ उडायची की विचारु नका. एखाद्याने वृत्तपत्र वाचायला काढले की त्याचं पान हातोपर हाती असे लांब कोणत्या तरी प्रवाशाकडे जायचे. कधी कधी तो ते घेऊन उतरुनही जात असे. एखाद्याने वृत्तपत्र विकत घेतले की फुकटे वाचक त्याच्या आजूबाजूला बसायचे. हळूच एक पान मागायचे, ए टू झेड बातम्या वाचून घेतला की समाधानाने परत द्यायचे. काही प्रवासी ढुंगाखाली असे वृत्तपत्र लपवून ठेवायचे, खरं तर कोणी मागू नये अशी ती आयडीया. सॉरी मूळ विषयापासून जरा दूर गेलो पण वृत्तपत्र म्हटले की अशा आठवणी ओघळतात. दिलगिरी व्यक्त करतो. लॉकडाऊनमधे सर्वच वृत्तपत्राच्या पीडीएफ फायली यायच्या. कोणत्या तरी कोर्टाने यावर बंदी घातली आणि ती पेपरं बंद झाली. विकत घेणारच नसतील तर वृत्तपत्रांचा काय फायदा. तसेही सरकारच्या आशिर्वादाने, कोण्या मोठ्या उद्योगपतींची आपापल्या विचारांची पाठराखण चालू आहेत, ही क्षेत्रेही काळानुरुप विचारानुसार बदलत गेली.
बाकी, लिहिता लिहिता असा पांगून गेलो. लांबलचक लिहिल्याबद्द्ल दिलगिरी व्यक्त करतो. विषयापासून दूर गेलो असू पण वृत्तपत्रे त्याचा आकार, ऊकार, इतिहास, भूगोल सर्व माहिती इथे.
बाकी, लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
(छापील वृत्तपत्र टू पीडीएफ वृत्तपत्र वाचक)
28 Aug 2020 - 4:55 pm | कंजूस
आकार लहान म्हणजे कमी पानांचे हरकत नाही. पण टेब्लॉइडही काही वाईट नाही.
बिरुटे सर ती पिडिएफ पाठवणारे किती असतील? ती उगाच हुल्लडबाजी वाटते. ज्याच्याकडे पिडिएफ उघडणारे app आणि स्मार्टफोन आहे तो स्वत:च नाही का डाउनलोड करणार.?
29 Aug 2020 - 12:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
संपूर्ण वृत्तपत्र डाऊनलोड करता येत होता, पण आता ती फॅसीलिटी काही वृत्तपत्रांनी लॉकडाऊनच्या काळानंतर बंद केली. मी स्वतः लॉकडाऊनमधे लोकमत डालो करायचो पण आता तो होत नाही. लोकमतच्या साइटवर एखादी बातमी डालो करता येते पण संपूर्ण पेपर आता डालो होत नाही.
अशी काही वृत्तपत्रीय पीडीएफ डालो करता येत असेल तर लिंकवा.
-दिलीप बिरुटे
29 Aug 2020 - 4:02 pm | कंजूस
पिडिएफ डाऊनलोड - लोकमत.
होतंय. जिओन्युज app वर आहे लोकमत . App घ्या आणि कुणाच्या जिओ नंबरवरचा ओटिपी घेऊन सुरू करा. हायकायनायकाय.
28 Aug 2020 - 5:25 pm | Rajesh188
आता बातम्या चा विस्फोट झालेला आहे
चुकीच्या धांधात खोट्या बातम्या इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि समाज माध्यमातून पसरवल्या जातात.
त्यांचा दर्जा खूप खाली आलेला आहे.
परिपक्व पना बिलकुल नाही फक्त उथळ पना.
त्या मुळे खूप लोक वर्तमान पत्रकाकडे खूप आशेनी बघत आहेत.
परिपक्व पना,सत्यावर आधारित वार्तांकन,समतोल आणि परिपक्व विचाराच्या लोकांचे लेख ह्या वर वर्तमानपत्र नी जोर दिला तर त्यांचे वेगळेपण लगेच नजरेत भरेल.
आणि किती ही मोठी vavatal आली तरी ते टिकून राहतील आणि वाढतील सुद्धा.
1 Sep 2020 - 5:30 pm | चौथा कोनाडा
बरोबर. लॉक डाऊन मध्ये वृत्तपत्रांच्या बाबतीत एक चांगली गोष्ट घडलीय. (बिनकामाच्या) जाहिराती कमी झाल्यात, उथळ बातम्या/विषय कमी झालेत. वृत्तपत्रे आटोपशीर झालीत. हा बदल सुखद वाटतो. हे असेच टिकायला हवे.
7 Sep 2020 - 10:18 pm | रामदास२९
खरं आहे
28 Aug 2020 - 5:37 pm | चौथा कोनाडा
लॉकडाऊन संपताना मटाच्या पानांची संख्या कमी झालीय. सध्याचा आकार ठीक आहे, वृत्तपत्र आणि छपाई उद्योगाला सरावाचा झालेला. पुढे मागे आकार कमी देखील होईल असं वाटतंय !
सध्याच्या अंकीय युगात कमी पानं हाच उत्तम पर्याय व्यवहार्य आहे, जाहिराती वाढल्यातर सणासुदीला / प्रासंगिक कारणांसाठी पानांची संख्या वाढु शकते.
28 Aug 2020 - 6:01 pm | Gk
रोज रात्री घरी आले की रोजचा मास्क गुंडाळून टाकायला म्हणून कधीतरी वर्तमानपत्र आणून स्टोक करून ठेवतो
29 Aug 2020 - 8:11 am | दुर्गविहारी
वर्तमानपत्र कदाचित पूर्ण नष्ट होणार नाहीत पण कालौघात प्रत्येक गोष्टीत होतो तसा बदल इथेही अपेक्षित आहे.
29 Aug 2020 - 2:26 pm | केदार पाटणकर
धन्यवाद प्रतिसादकांना.
2 Sep 2020 - 11:10 am | निनाद
न्युयॉर्क टाइम्स आणि वॉशिंगटन पोस्ट सारखी वृत्तपत्रे बंदच पडली तर बरे!
भारतातही एक्सप्रेस आणि टाईम्स वगैरे वर्तमानपत्र बंद पडली तर मला अजिबात वाईट वाटणार नाही...
2 Sep 2020 - 11:10 am | निनाद
द हिंदु हे कम्युनिस्ट वार्तापत्र पण बंद व्हायला हवे असे वाटते.
7 Sep 2020 - 10:16 pm | रामदास२९
वृत्तपत्र online वाचा नाहीतर छापलेलं त्याचा दर्जा महत्वाचा आहे.. काही वृत्तपत्र ही सरळसरळ सत्ताधाऱ्यांचं किंवा महत्वाच्या राजकीय पक्षांच गुणगान करत असते .. सोईस्कर बातम्या लपवल्या जातात, अर्धी पाने जाहिरातींनी भरलेली असतात, त्यापेक्षा पाने कमी करा पण दर्जा वाढवा, भाषा शुद्ध ठेवा.. लोकांना सनसनाटी बातम्या नका देऊ, दर्जेदार द्या..भले breaking news मध्ये तुम्ही मागे पडाल, पण सर्व बाजूंचा विचार करणारे आणि संतुलित वृत्तपत्र म्हणून तुमची ओळख होईल ..शेवटचं एक .. स्थानिय भाषिक वृत्तपत्र चाललीच पाहिजेत..कारण ती लोकांच्या दैनंदिन गोष्टींशी निगडित असतात