Skip to main content

श्रीगणेश लेखमाला २०२० - || श्री गणराया ||

लेखक Giriratn Raje यांनी शनिवार, 22/08/2020 08:00 या दिवशी प्रकाशित केले.
1 जय देव, जय देव श्री गणराया, हो स्वामी गणराया, आरती ओवाळू, भावार्थी ओवाळू तुज बाप्पा मोरया ||ध्रु. ||जय देव जय देव...... मस्तकी विराजे मुकुट रत्नांचा | गळी साजिला तू हार दुर्वांचा || हस्ती धरिला पास अंकुशाचा | नेवैद्य दावी तुज मोदक लाडूंचा ||1|| जय देव जय देव...... कटी शोभते हे तव पितांबर | पायी घागऱ्या वाजती सुंदर || लंबोदर तुझे हे रूप मनोहर | वाहन तव झाले हे मामा उंदीर ||2|| जय देव जय देव...... चौदा विद्या आणि चौसष्ट कला | अर्पती सुमने श्री गणरायाला || विद्येने भांडार हा तुज समर्पिला | ऋद्धी, सिद्धी वसे तुज संगतीला ||3|| जय देव जय देव...... भक्तीने पूजती सारे तुज मोरया | चरणी लीन होऊन दास तुझिया || उद्धारी निर्वाण जीवास माझिया | शरण तुज आलो मी हे श्री गणराया ||4|| जय देव जय देव...... नाव - स्वप्नील विलास अमृतकर गाव - धुळे (बंगलोर ) भ्रमणध्वनी - 8884287110 2

वाचने 13840
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया