डॉक्टर की कंपाउंडर

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
16 Aug 2020 - 4:12 pm
गाभा: 

काल एका मुलाखतीत शिवसेनेचे सर्वात महत्वाचे तोंड ( म्हणजे प्रवक्ते) हे नक्की काय बोलतात हेच समजत नाहीत.
ते बोलल्यामुळे शिवसेनेचे सरकार आले हे नक्की. त्यावेळेस संजय राऊत इतके बोलले की त्यामुळे शिवसेना फुटतेय की काय इतकी शंका आली होती
पण त्यांनी आपला मुद्दा मागे घेतला नाही. आणि उद्धव ठाकरेंचे सरकार स्थापन झाले . हा खरे तर चमत्कारच होता.
पण संजय राउतंनी त्या नंतर करोना आणि सुशांत सिंग या बाबतीत अनेक उलटसुलट उड्या मारल्या.
त्यांच्या बोलण्यात कसलीही संगती नसते. पण सनसनाटी असते. राज्यसभेचे सदस्य असलेले संजय राउत त्यांचा शहाण्पणा विसरलेत की तो त्यांना अगोदरपासूनच नव्हता अशी शंका येतेय. या असल्या माणसाला आपण जनतेचा प्रतिनीधी आहोत हे तरी समजते का? आणि आपले नेते हे असे आहेत याची लाज वाटायला लागते.
बरे ते इतकी पोरकट भाषा वापरतात याची त्यांना कधीच लाज वाटणे सोडा पण कधी खेदही वाटत नाही.
दोन वर्षांपूर्वी सामना च्या एका अग्रलेखात अजित दादा पवारांना " मुतर्‍या तोंडाचे अजित दादा" असे म्हणाले होते ही भाषा अर्थातच अश्लाघ्य आहे.
याच अग्रलेखात त्यांनी अजित पवारांना " गटारी किडा' रिकामी खोपडी असेही म्हंटले आहे.

https://www.saamana.com/saamana-editorial-on-ajit-pawar-statement-on-shi...
https://youtu.be/qbO9SkWHLfQ?t=18

अर्थात बाळासहेब ठाकर्‍यांकडून " स्वतःची मैद्याचे पोते आणि बारामतीचा म्हमद्या " अशी अवहेलना आनंदाने सहन करणार्‍या शरद पवारांना त्यात काहीच वाटले नव्ह्ते हे पुढे दिसून आलेच.
अत्यंत हिडीस भाषा हे संजय राउतांचे वैशिष्ट्य आहे. त्याची त्यांना अर्थातच काहीही लाज नाहिय्ये.
राजकारण सोडून ते कोणत्या प्रांतात शिरतील हेही सांगता येत नाही.
म्हणातात की डॉक्टर पेक्षा कम्पाउम्डरला जास्त कळते. डब्ल्यू एच ओ या जागतीक संस्थेवरही त्यांनी अशीच मूर्खपणाची कॉमेंट केली आहे.
याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर सर्वत्र पसरतोय.

या अशा मूर्ख माणसाला मराठी जनता का सहन करतेय तेच कळत नाहिय्ये.
अशा मूर्ख आणि तोंडाळ लोकांचे काय करायचे जनतेला ठरवायचे स्वातंत्र्य ज्या दिवशी मिळेल तोच खरा स्वातंत्र्यदिन असेल.

प्रतिक्रिया

राउत हे राज्यसभेचे सदस्य आहेत ( विधानपरिषदेचे सदस्य असे चुकून लिहीले गेलेय)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

16 Aug 2020 - 4:41 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

या अशा मूर्ख माणसाला मराठी जनता का सहन करतेय तेच कळत नाहिय्ये

हे लोक निर्लज्जपणे जबरदस्तीने खुर्चीत जाऊन बसलेत. मुळात यांना कोणीही निवडून दिलेले नाही.
पण सध्या जनतेकडे काहीही पर्याय नाही, पुढच्या निवडणूकीची वाट पाहणे इतकच करु शकतात लोक.

विजुभाऊ's picture

16 Aug 2020 - 4:45 pm | विजुभाऊ

हा तर जनतेवर बलात्कार म्हणायचा

Gk's picture

16 Aug 2020 - 5:10 pm | Gk

गेल्या वर्षी महामहिम ही बोलले होते की डॉकटर कमिशन खातात वगैरे

स्वतंत्र पासून भारतात जी राजकीय संस्कृती त्या नुसारच संजय राऊत बोलणार ना.
ते काही वेगळे बोलत नाहीत.
अनेक पक्षांचे अनेक प्रवक्ते काय काय बोलत असतात त्या मानाने संजय राऊत खूप व्यवस्थित बोलले आहेत.
सुशांत सिंग आत्महत्या ही काही मोठी घटना नाही अंसंख्य लोक देशात रोज आत्महत्या करतात .
पोलिस तपास करत आहेत ना त्यांचा तपास पूर्ण होण्या अगोदर विविध तर्क,विविध लोकांना आरोपी कोणी केले मीडिया नी समाज माध्यमातील अती मूर्ख लोकांनी.
आणि bjp ni hya प्रकरणाचा स्वतःच्या फायद्या साठी(बिहार निवडणूक) वापर केला हे सत्य आहे.
Who hi संघटना आहे ,corona madhye सर्वात जास्त कोलांट्या udya,चुकीची माहिती त्यांनी सुरवातीला पसरवली होती.
वूहान व्हायरस असे नाव ह्या साथी ला देणे गरजेचे होते पण काही तरी हितसंबंध असल्या मुळे त्यांनी ते दिले नाही .
ट्रम्प ह्यांनी अनुदान बंद केले त्यांचे आणि जाहीर फटकर पण लगावली.

शब्दानुज's picture

18 Aug 2020 - 2:29 pm | शब्दानुज

जेव्हा तथाकथित हार्ट अटॅक आला होता तेव्हा कुठल्या कंपाउंडरने उपचार केले होते हेही आता स्पष्ट करून टाकावे. बिचवा भेट देऊन त्या कंपाउंडरचा जाहीर सत्कार करावा.

बाकी डब्लू. एच. ओ. नी म्हणावी तितकी निर्णायक भूमिका बजावली नाही हे सरळ दिसून येत आहे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

18 Aug 2020 - 4:49 pm | राजेंद्र मेहेंदळे

संजय राऊत किती गांभिर्याने घेण्यासारखा माणूस आहे? काही दिवसांपुर्वी हेच म्हणाले होते की उद्धव ठाकरेंनी आता देशाचे नेतृत्व करावे.

दर काही दिवसांनी माध्यमात चमकण्यासाठी काहितरी बोलतात झाले.

भीमराव's picture

18 Aug 2020 - 5:37 pm | भीमराव

उधोजी ठाकरे= डॉक्टर
संजय राऊत = कंपाऊंडर

असं सांगायचं असेल त्यांना.

Gk's picture

20 Aug 2020 - 8:04 pm | Gk

एक माणूस मानसोपचार तज्ञाकडे जातो......

डॉक्टर : बोला काय त्रास आहे तुम्हांला ?

पेशंट : डॉक्टर, मी रात्री बेड वर झोपल्यानंतर मला सतत जाणवतं की बेड खाली कोणी तरी आहे. मी रात्र भर उठून बघतो, पण तिथे कोणी नसतं

डॉक्टर : ठीक आहे, मी तुम्हांला गोळ्या देतो, त्या घ्या, आणी पुढचे सहा महीने आठवड्यातून दोन रात्र दवाखान्यात झोपायला या, म्हणजे मला योग्य निदान करता येईल

पेशंट : ठीक आहे, तुमची एकंदर फी किती होईल ?

डॉक्टर : गोळ्यांचे ५ हजार व सहा महीने दवाखान्यात झोपण्याचे एका वेळचे १५०० रूपये प्रमाणे होतात ७२,००० हजार, एकंदर ७७,००० हजार..

पेशंट: ठीक आहे मी उद्या पासून येतो.

पुढे एक वर्षांनी तो पेशंट डॉक्टरना रस्त्यात भेटतो

डॉक्टर : अरे, तुम्ही आलाच नाहीत उपचार घेण्यासाठी

पेशंट : त्याच दिवशी मी कम्पाउंडर सोबत चर्चा करत बार मध्ये बसलो. त्यांनी सल्ला दिला व मी पूर्ण बरा झालो.

डॉक्टर : काय सल्ला दिला.

पेशंट : तुमचेच कम्पाउंडर म्हणाले, डॉक्टरला ऐवढे पैसे देण्यापेक्षा, बेड आजच विकून टाक, मी तसेच केले व गादी जमीनीवर टाकून झोपायला सुरवात केली, त्यामुळे बेड खाली कुणी तरी आहे, ही भिती गेली व ७७,००० तुमची फी वाचली व बेड चे सहा हजार आले.

सारांश-
डॉक्टर कडे जाण्यापेक्षा कम्पाउंडर कडे डायरेक्ट जा

नीलस्वप्निल's picture

20 Aug 2020 - 9:34 pm | नीलस्वप्निल

हवापुवा :) :)

शाम भागवत's picture

20 Aug 2020 - 9:46 pm | शाम भागवत

:))