गणपतीचे आगमन होणारच आहे, तेव्हा बर्याच पाककलाप्रेमी ह्यांना मोदक करून पहायची उबळ असेलच.
पण होतं काय, हजार पाककृती मध्ये, पारंपारीक पद्धतीने कृती करायची तरी कशी हि अडचण असते, खास करून जे पहिलटकर असतात आणि त्यांना स्वःतच करून बघायचे असते.
तांदूळ कुठला घ्यावा? पीठी कशी करावी? नक्की पीठी कशाने कोरडी वा चिकट होते? मोदक कसे वळावे?
ह्याचे सविस्तर चित्रण खालील लिंक मध्ये आहे.
लिंक, माझ्या आईने खास ह्या कारणासाठीच केली आहे. आशा आहे, सर्वांना पसंत पडेल.
पारंपारीक पद्धतीने हळदीच्या पानातले मोदक-अथ पासून इति पर्यंत टिपांसह
प्रतिक्रिया
13 Aug 2020 - 10:50 pm | रातराणी
वौव.. मस्तच.. व्हिडियोत इतके सोपे वाटतायत उकडीचे मोदक. यंदा पुन्हा एकदा प्रयत्न करून बघणेत येईल.
14 Aug 2020 - 9:36 am | देवीका
धन्यवाद. खरेच करून पहा. काही कठिण नाही. प्रमाण पण फक्त एका वाटीचेच आहे.
आंबेमोहोर तांदूळ मिळाला तर उत्तम. नाहिच मिळाला तर, अर्धा बासम्ती आणि अर्धा सोनामसुरी किंवा
अर्धा बासमती आणि अर्धा सुरती कोलम सुद्धा चालेल.
आंबेमोहोरची खासियत हिच आहे की, मोदक खुप मुलायम होतात, बर्याच वेळ छान रहातात. कडक होवून फुटत नाहीत.
तुम्हाला शुभेच्छा!
14 Aug 2020 - 2:54 pm | Bhakti
छान
17 Aug 2020 - 6:42 am | देवीका
ईथे फोटो कसे द्यायचे?
22 Aug 2020 - 6:49 pm | मदनबाण
मोदकाच्या पाकृचा व्हिडियो मस्त बनवला आहे !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ranjan gavala | Female version | new song | by kartiki
23 Aug 2020 - 2:18 pm | नीलस्वप्निल
धन्यवाद पाक्रु बद्दल :)
24 Aug 2020 - 1:41 am | देवीका
धन्यवाद सर्वांना