धागाचर्चा लेखक या विषयाचा जाणकार नसल्यामुळे खालील चर्चीत माहितीत त्रुटी चुका असण्याची शक्यता असू शकते, म्हणूनच अधिक चर्चा आणि माहिती मिळावी म्हणून हा धागा प्रपंच आहे.
झिंक zinc (जस्त) सूक्ष्म पोषक द्रव्याचा आहारातील समावेश कसा करावा ?
सध्या कोविड-१९ चा संसर्ग झालेल्यांना झिंक सूक्ष्म पोषक द्रव्य (Micronutrient) प्रतिकारशक्तीस साहाय्यकारी ठरावे म्हणून दिले जात असल्याचे वाचनात आहे. म्हणून आंतरजाल चाळण्याचा प्रयत्न केला. जरासे अधिक वाचन करताना आधी सहज सुलभ वाटणारी झिंक सूक्ष्म पोषक द्रव्याची गोष्ट अधिक काँप्लेक्स गोंधळकारी आहे हे जाणवल्या नंतर हा चर्चा धागा काढण्याचे मनावर घेतले.
आंतरजालावर वाचताना ज्या स्वल्प गोष्टी मला जाणवल्या
* सूक्ष्म पोषक द्रव्य (Micronutrient) मानवी शरीरास अत्यंत कमी प्रमाणात लागत असली तरी अत्यंत महत्वाची असतात त्यात झिंक (जस्त) मानवी शरीरातील असंख्य महत्वाच्या क्रियांकल्पांवर परिणाम करत असल्याने सुयोग्य मात्रेतील काळजीपुर्वक केलेला वापर गुणकारी महत्वाचा आणि आवश्यक असू शकतो.
* गरज असलेल्या व्यक्तींना झिंक औषध अथवा गोळ्यांच्या स्वरुपात लिहून देणे डॉक्टरांच्या दृष्टीने सहज साध्य असलेली बाब असली तरी पोषक आहार द्रव्य म्हणून झिंक समाविष्ट आहार घटकांचा आहारात समावेश कसा करावा हा प्रत्यक्षात गोंधळात टाकणारा प्रकार आहे.
* वयस्क पुरुषांना झिंक ''''''दररोज''''''च्या आहारात ११ मिली ग्राम एवढे लागते स्त्रीयांना प्रेग्नंन्सीच्या आधी आणि बाळ दुध पिण्याच्या काळात जरासे अधिक लागते इतरवेळी २ मिली ग्राम कमी लागते.
* यातील '''दररोज''' हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे, कारण मानवी शरीर झिंकचा साठा करुन ठेऊ शकत नाही त्यामुळे ते रोजच्या आहारात असणे गरजेचे असते.
* * ११ मिली ग्राम हे प्रमाण प्रथमदर्शनी अत्यंत क्षुल्लक वाटले तरी प्रत्यक्षात ते मिळ्वण्यासाठी आणि पचवण्यासाठी मानवी शरीराला ईतपत बरीच कसरत करावी लागत असावी की बर्याच मोठ्या मानवी लोकसंख्येस प्रत्यक्षात त्याची उणीव भरली जात नसावी खास करुन शाकाहारीं तसेच कोंबडीखाऊंसाठी प्रथिने आणि बी-१२ व्हीटॅमीनपेक्षाही कदाचित हा अवघड प्रकार असावा.
* विशेष करून झिंकचे पचनसंस्थेतील शोषण (अॅबसॉर्प्शन/पचन) व्यवस्थित होण्यासाठी विशीष्ट परिस्थिती आणि इतर आहार घटक असण्या नसण्याचा महत्वाचा संबंध असावा आणि तो बारकाईने नीट समजून घेणे महत्वाचे असावे.
* केवळ एका प्रकारच्या शिंपल्यातून याचे मुबलक प्रमाण सोडल्यास लाल मांसाहार '''दररोज''' घेणार्यांना झिंकची गरज काही प्रमाणात पुरवली जाऊ शकते. पण अगदी आदर्श आहारात लाल मांस हे आठवड्यातून दोन-चार वेळाच सुचवलेले असते हे लक्षात घेतले तर त्यांचा प्रश्न शाकाहारी पेक्षा सोपा असला तरी पुर्णतः सोपा नसावा. त्यांच्याही झिंक सेवनास इतर आहार घटकांसोबतची स्पर्धा करावी लागतेच.
*कोंबडी खाऊंच्या कोंबड्यांना झिंक पुरक आहारातून निश्चितपणे दिले असल्यास त्यांना झिंक आहारातून पोहोचणे जरासे सोपे जाते पण इतर वेळी झिंकच्या बाबतीत त्यांचीही गत शाकाहारींप्रमाणेच असावी.
* शाकाहारी आहाराच्या बाबतीत मी वाचलेल्या शाकाहारी पदार्थ नावात केवळ 'तीळात' झिंकचे प्रमाण बरे आढळले; दुसर्या क्रमांकावर बहुधा लाल भोपळ्याच्या बियांचा क्रमांक लागत असावा, पण या दोन्हींच्या दोन समस्या दिसतात
* एक समस्या सर्व शाकाहारास समान आहे, शाकाहारी वनस्पतींची वाढ होते त्या जमिनीतही झिंक पोषक द्रव्ये असतील तरच ती सक्षम वनस्पतीत जसे की तीळ लाल भोपळ्याच्ता बीया इत्यादीत उतरतील, आहेत असे गृहीत धरले तरी पुढे अजून एक समस्या येते
* शाकाहारी पदार्थात फायलेट का काय घटक असतो तो झिंकच्या मानवी पचनसंस्थेतील शोषणास आंतर-विरोध करतो - आणि मी जसे वाचले तो फायलेट का काय तीळ आणि लाल भोपळ्याच्या बीयात बर्या पैकी मात्रेत दिसला. - मग यावर उपाय काय तर मोड आणलेल्या आणि आंबलेल्या पदार्थात फायलेट का कायचे प्रमाण कमी होते - आता लालभोपळ्याच्या बीयांना मोड आणणे एक वेळ समजता येऊ शकेल पण तीळाला आंबवावेलागेल का माहित नाही. (माहिती बद्दल चुभूदेघे)
* माझी शंका: तीळात फायलेट का काय ते नाही असे गृहीत धरले तरी दररोजची झिंकची आवश्यकता पुर्ण करण्यासाठी प्रती माणशी तीळाचा आहार समावेश १०० ग्रॅमपेक्षा जरासा अधिकच असावा लागेल.
आणि तसे प्रॅक्टीकली खरेच शक्य आहे का?
** फायलेट आहे असे गृहीत धरले आणि त्याच्या स्पर्धा करायची तर मग तीळाचे प्रती माणशी प्रमाण काय घ्यावे लागेल?
** किंवा तीळ आंबवून कोणत्या पाककृती करता येतील?
***एनी वे या निमीत्ताने कुणास तीळ असलेल्या पाकृं शेअर करता आल्यास पहावे.
* लाल भोपळा आणि सोललेल्या लाल भोपळ्याच्या बीयांच्या बाजारभावात ३६ चा आकडा आहे. मी कालच पाव किलो १८० च्या दराने घेतल्या म्हणजे किलोचा दर ७२० रुपये किलोचा झाला.
बाकी आपल्याकडे व्हिटॅमीन आणि पोषक मुलद्रव्यांच्या गप्पा रंगवताना नसलेल्यात असल्याचे सांगितले जाणे आणि ज्यात तोंडाला पान पुसण्याईतपत किरकोळ प्रमाण असले तरी भरपूर असल्या प्रमाणे बोलण्याची अहम अहमीका असते. बहुसंख्य भारतीय तांत्रिक दृष्ट्या मांसाहारी असले तरी आहारात प्रभाव शाकाहाराचाच असतो आणि जगातील पूर्ण शाकाहारींचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे हे बघता अन्नद्रव्यांबाबत गप्पा अधिक संशोधन कमी अशी अव्यवस्था असावी, याचे एक उदाहरण म्हणजे तीळाच्यातेलात किंवा एकुणच इतर शाकाहारी तेलात सूक्ष्म पोषक मुलद्रव्ये असतात किंवा नसतात या विषयावर आंतरजालावर काहीच माहिती दिसली नाही तेव्हा तीळाच्या तेलात झिंक नाही असे धरुन चालायचे की आहे असे धरुन चालायचे?
* शिवाय झिंकचे आयर्न कॅल्शियम आणि इतर काही घटकां सोबत वितुष्ट असल्या प्रमाणे शक्यता दिसते, त्यांच्याशी सांभाळून सेवन करायचे तर नेमके कसे करायचे ?
** विद्यार्थिनींच्या आहारातील झिंकचा समावेशच्या संदर्भाने शोधगंगावर दोनेक शोध निबंधातून त्यांचा झि़कचा समावेश कसा कमी होता आणि झिंकचा आहार समावेश वाढवल्यानंतर कसा सकारात्मक बदल झाला याचे पुणे आणि तामिळनाडूतील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेले शोध निबंध दिसतात पण झिंक प्रमाण वाढवण्यासाठी वापरलेल्या पाकृंच्या बाबतीत दोन्ही शोध निबंध मौन दिसले.
* https://en.wikipedia.org/wiki/Zinc#Nutrition
* झिंक बद्दल मिपावर सविस्तर चर्चा दिसलेली नाही पण जाणकारांच्या लेखनात जे अनुषंगिक उल्लेख गुगल शोधच्या माध्यमातून दिसले त्यांचे दुवे सुलभ संदर्भासाठी खाली देत आहे.
https://www.misalpav.com/node/43285
** https://www.misalpav.com/node/45738
** http://www.misalpav.com/node/42597
*** मिपावरील अनुषंगिक उल्लेख
** https://www.misalpav.com/node/41739
** https://www.misalpav.com/comment/354404#comment-354404
* अनुषंगिका व्यतरीक्त आवांतरे, व्यक्तिगत टिका, शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी आणि धागा विषयास अनुलक्षून चर्चा सहभागासाठी अनेक आभार.
प्रतिक्रिया
11 Aug 2020 - 2:37 pm | कुमार१
इथे चांगली माहिती आहे.
https://www.mja.com.au/journal/2013/199/4/zinc-and-vegetarian-diets#:~:t....
१.धान्ये, टोफू, शेंगा (legumes), कठीण कवचाची फळे, दूधदुभते.याचा समन्वय साधणे.
शाकाहारींना आहारातून ते कमी प्रमाणात पुरते कारण अधिक शोषण. (adaptation).
11 Aug 2020 - 4:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
श्रावण असल्यामुळे चिकन-अंडी बंद आहेत, याचा काही उपयोग होईल का ते सांगावे.
कसंही करुन करोनाचा बंदोबस्त झाला पाहिजे. अंडीमधे बरेच झिंक असतं आणि चिकन मधेही असे वाचनात आले.
एका माणसास किती अंडी आणि एका माणसास अंदाजे किती चिकन लाभदायक आहे हेही सांगावे.
मासे चालतात का ?
फायद्याचं असेल तर श्रावण महिन्याला टाटा करुन टाकू हाय काय आणि नाय काय.
-दिलीप बिरुटे
11 Aug 2020 - 7:06 pm | कंजूस
विकिपिडियावर सहजच / या निमित्ताने एक शोध घेतला की कोणती मूलद्रव्ये भारतात अधिक आहेय आणि कुठे. ( https://en.m.wikipedia.org/wiki/Natural_resources_of_India ) तर राजस्थानात आणि आन्ध्रात झिंक आहे. आन्ध्रात तिळाचा वापर खाण्यात खूप करतात म्हणजे तिकडच्या लोकांना करोना टाळत असणार. हे जे झिंक तिकडे सापडते ते एखाद्या खाणीत खूप आणि आन्ध्राच्या मातीतच सर्वदूर पसरले आहे का माहिती नाही.
इतर राज्यांत झिंक साठे नाहीतच. त्यांनी स्पेशल आन्ध्राचे तीळ आणून खायला पाहिजेत.
महागड्या भोपळ्या बियांपेक्षा तीळ बरे.
12 Aug 2020 - 12:06 am | अनुप ढेरे
डॉ रेड्डी कंपनीची बिको झिंक या नावाची गोळी २८रु मध्ये २० गोळ्या या दराने मिळते. याने रोजची निम्म्याहुन अधिक तरी गरज भागवली जाते. उगाच झिंकसाठी रोज दोन तीन अंडी कोण खाणार?
12 Aug 2020 - 1:35 am | वीणा३
***एनी वे या निमीत्ताने कुणास तीळ असलेल्या पाकृं शेअर करता आल्यास पहावे.>>
पोळी - भाकरी धिरडं यात पीठ मळतानाच तीळ टाकावेत.
12 Aug 2020 - 7:41 am | रागो
तिळाचे दूध आणि दही
https://www.milletplanet.org/how-to-extract-milk-make-curd#:~:text=SESAM....
12 Aug 2020 - 11:47 am | Rajesh188
1 आवळा आणि 3 खजूर रोज आहारात ठेवले तर शरीराला आवश्यक सर्व मिनरल शरीराला मिळतील.
आवळा मध्ये जस्त असते.