बिनडोकपणे रस्ता तोडला (BRT)

टवाळचिखलू's picture
टवाळचिखलू in काथ्याकूट
22 Nov 2008 - 10:10 am
गाभा: 

बी आर टी म्हणजे बस रॅपीड ट्रान्झीट असे पुणे पालिकेला वाटते पण माझ्या मते हे बी आर टी म्हणजे बिनडोकपणे रस्ता तोडला असेच आहे.
मी रोज हडपसर ते नळस्टोप असा प्रवास करतो(दुचाकीने). पण कधी कधी बस ने जाण्याचा योग येतो (म्हणजे मी आणतो ) तेव्हा लक्षात येते की या बी आर टी प्रयोगाला मान्यता देणारा खरंच अभियंता होता काय ? असेल तर कुठल्या शाखेचा ?
विचार करण्यासारखे काही मुद्दे असे .
१. बस स्टोप रस्त्याच्या मध्यभागी आहे म्हणजे प्रत्येक प्रवाशाला रस्ता ओलांडणे भाग पडते (प्रवास सुरु करताना आणि संपल्यावर).
२. बी आर टी रस्त्याचे दुभाजक (की विभाजक ?) म्हणजे एक ते दिड फुट उभारलेल्या छोट्या भिंती. या भिंती कुठेही सुरु होतात आणि कुठेही संपतात.(या भिंतीवर अनेक चारचाकी गाड्या चढुन अपघात झालेले आहेत आणि होतीलही.)
३. आतापर्यंत सव्वा दोन हजार कोटी रुपये मान्यता (कात्रज ते हडपसर) आणि आज नाशिक फाटा ते वाकड आणि काळेवाडी ते देहु-आळंदी मार्गासांठी ४४२ कोटी ६० लाख रु. मान्य.
४. येवढा खर्च करूनही बी आर टी रस्त्यावरुन सगळीच वाहने वापरत असतात आणि प्रवाशी जीव मुठीत धरुन बस स्टोप नावाच्या शेडखाली बसलेले असतात.
५. दुपदरीच रस्ता पुन्हा दुभागल्यामुळे ट्रॅफिक जॅम होतात.

असे एक ना अनेक मुद्दे आहेत पण काही ठळक मुद्दे मांडुन माझे मन हलके करतोय.
ता. क. : मनपापुणे हा शब्द मनाप्रपाणे च्या समानाअर्थी वापरला तर चालेल.

प्रतिक्रिया

झकासराव's picture

22 Nov 2008 - 10:42 am | झकासराव

बीआरटी म्हणजे
*****(फाइव्ह स्टार म्हणजे..... पुणे कट्ट्यात ठरलेला शब्द) रोड ट्रॅफिक सिस्टीम
मुळात जवळपास ४ पदरी असलेला रस्ता कधी कधीच धावणार्‍या पीएमटीच्या डब्यासाठी पेशल राखुन नेहमी धावणार्‍या बाकीच्या गाड्याना उरलेल्या छोट्याशा रस्त्यावरुन जायला भाग पाडणे.
वैताग आहे नुसता.
कात्रजच्या घाटापात्तुर जायला यष्टी लयी येळ घेते राव.
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao

पाषाणभेद's picture

22 Nov 2008 - 7:24 pm | पाषाणभेद

होणार्‍या अपघाताला मनपा जबाबदार राहील. हा प्रोजेक्ट फार दिवस चालणार नाही.
पैसे खायचे धंदे सारे.

(मागे एकदा नाशिकला मायको सरकल बांधत होते. त्या सरकल च्या टोकदार जाळ्या बांधकामानंतर थेट रस्त्यावर येणार होत्या. हे बेसीक ज्ञान त्यांना नको का ? मी खिशाला चाट लावत हे संबधीत यंत्रणेला कळवत राहीलो. नंतर ते डिझाईन बदलले.)

-( सणकी )पाषाणभेद

कपिल काळे's picture

22 Nov 2008 - 8:49 pm | कपिल काळे

बी. आर टी ही कन्सेप्ट खूप चांगली आहे. पण ती पुण्यात अयोग्यरितीने कार्यवाहीत आली आहे. प्रवाशांनी रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या थांब्याकडे जाण्यासाठी सिग्नल किंका वाहतूक पोलिस/ सहाय्यक अशी व्यवस्था असेल असे प्रस्तावित होते. पण सध्या भारनियमनामुळे वीज नाही मग सिग्नल तरी कसा चालायचा?

शिवाय बी आर टी ची लेन इतर वाहनांनी वापरणे ही भानगड आहेच. रस्तेच पुरेसे रुंद नाहीत तर वाहनचालक तरी काय करतील?
समस्येचे मूळ हे शहरांचा बेसुमार विकास, त्यामुळे निर्माण झालेला विकासाचा असमतोल आणि त्यामुळे येणारे लोंढे हा आहे.
विकासाचे विंकेद्रीकरण करुन गवोगावी रोजगाराची संधी प्राप्त करुन दिल्यास असे अनेक प्रश्न सुटू शकतील.

http://kalekapil.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Nov 2008 - 9:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

विकासाचे विंकेद्रीकरण करुन गवोगावी रोजगाराची संधी प्राप्त करुन दिल्यास असे अनेक प्रश्न सुटू शकतील.
अगदी! मुंबईचीही तीच कथा आहे, आणि इतर सर्व मोठ्या शहरांचीही!!

बी. आर टी ही कन्सेप्ट खूप चांगली आहे.
दर अर्ध्या तासानी बस येणार असेल तर अर्थातच वाईट संकल्पना आहे. बाणेर, सातारा रस्ता, या भागांमधे बसेसच मुळात दिसत नाहीत. आता तुमच्या भागात किती वारंवारिता आहे तेही बघणं महत्त्वाचं आहे.

शिवाय मधल्या लेनमधे बस असलेली बरी, दोन्ही बाजूंनी वापरता येईल लेन! शिवाय, इतर वाहनांना वळायचं असल्यास त्याचा त्रास होणार नाही.

अदितीचा मुद्दा योग्य आहे. म्हणूनच म्हणतो बी आर टी ची " संकल्पना" चांगली आहे. " संकल्पनेमध्ये" मध्ये वारंवारिता जास्त आहे. पण पुण्यात संकल्पनेची अंमलबजावणी योग्य रितीने झालेली नाही. त्यामुळे असे प्रश्न आहेतच.

सार्वजनिक जागेचा खाजगी वाहनांकडून वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारे अनेक प्रश्न ह्यावर उत्तम उपाय म्हणजे बी आर टी.

पुण्यात हा प्रकल्प हाती घेतला तेव्हा बोगोटा, कोलंबिया येथील बीआर टी चे उदाहरण डोळ्यासमोर ठेवले गेले होते. १३ लाख जनता रोज बोगोटासारख्या शहरात बीआरटी चा वापर करते. पुण्याची लोकसंख्या ३० लाखाच्या आस्पास असेल त्यातील रोज कामानिमित्त बाहेर पडणारे लोक इतकेच किंवा अजून पाच- सहा लाख.

पण खालील दुव्यावरुन जर बोगोटामधील बीआरटी बघितली तर पुण्यातील बीआर टी प्रकल्पात
किती घिसाडघाइ आणि संयोजनातील भोंगळपणा झाला आहे ते लक्षात येइल.

बोगोटा बीआरटी ची माहिती ...
http://www.streetsblog.org/2008/01/28/streetfilm-brt-in-bogota/

सचिन बडवे's picture

22 Nov 2008 - 10:13 pm | सचिन बडवे

पैसे खायचे हेच उद्दिष्ट बाकि रस्ता काय ज्याला जायचे आहे तो शोधेलच कि......

सचिन

सुक्या's picture

23 Nov 2008 - 12:04 pm | सुक्या

अतिशय चांगल्या सकल्पनेचं मातेरं कसं करायचं ते आपल्या इंजिनियर लोकांना सांगा. साले दारु पिउन प्लॅन बनवतात कि काय कोण जाने. रस्त्याच्या मध्यभागि असलेल्या थांब्यावर जाण्यासाठी फूट ओवर ब्रिज (मराठी शब्द सापडला नाही. जाणकारांनी मदत करावी) केला तर बरेच प्रश्न सुटतील.
बाकी लोकांचा विचार कोण करतो? अपघातात २०/२५ मेले तरी कुनाच्या बापाचे काय जाणार आहे. ज्याला पैसा कमवायचा असतो तो मेलेल्याचे पन भांडवल करतो.

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

टवाळचिखलू's picture

23 Nov 2008 - 9:23 pm | टवाळचिखलू

नमस्कार,
प्रतिक्रियेबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार.

अदितीचा मुद्दा योग्य आहे. म्हणूनच म्हणतो बी आर टी ची " संकल्पना" चांगली आहे. " संकल्पनेमध्ये" मध्ये वारंवारिता जास्त आहे. पण पुण्यात संकल्पनेची अंमलबजावणी योग्य रितीने झालेली नाही. त्यामुळे असे प्रश्न आहेतच.

खरं आहे " संकल्पना" चांगली आहे. पण ती कीती मुर्खपणे राबवली गेली आहे हे जेव्हा कळंत तेव्हा तळपायाची आग मस्तकाला जाते.

३. आतापर्यंत सव्वा दोन हजार कोटी रुपये मान्यता (कात्रज ते हडपसर) आणि आज नाशिक फाटा ते वाकड आणि काळेवाडी ते देहु-आळंदी मार्गासांठी ४४२ कोटी ६० लाख रु. मान्य.

बीआरटी ची सद्यस्थिती पाहीली तर इतके पैसे कुणाच्यातरी घशात गेलेत हे कुनीही (मी काय शेंबडं पोर पण ) सांगेल.
पण टॅक्स भरुन आपला पैसा कसा वापरला जातोय हे कळल्यावर पश्चातापाशिवाय दुसरे काही करता येत नाही.

पण तुमच्या सगळ्यांजवळ मन मोकळे करुन बरं वाटले.

- चिखलू
( पुसणार कुणी असेल तर डोळे भरुन यायला अर्थ आहे, रडणार कुनी नसेल तर मरणही व्यर्थ आहे)
पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार.