केरळ कढीलिंब झिंगे
खुलासा: मी यात आळस केला आहे , तयार मदर्स रेसिपी ( देसाई बंधू पुणे किंवा "परंपरा ") या नावाचा "केरळ झिन्गा फ्राय" हा तयार मसाला वापरला आहे त्यामुळे १० पैकी मला २ च गुण.
हा मसाला कोरडी पुड नसून मासात तेलात घोळलेला , कांडा परतून घातलेला असा असतो त्यामुळे खरे तर त्यात इतर काहीही अधिक घालण्याची जरुरी नसते परंतु मी एक दोन फरक केले
- सोललेले झिंगे ( बिनसोललेल पण जगात वापरले जातात म्हणून हा खास उल्लेख)
- कांदे बटाटे, लसूण मिरची चे वाटण ( केरळात यात बटाटे वापरात नसावेत, माझी बुंदेलखंडातील पाकृ आहे असे धरा हवेतर जिथे तिथे बटाटा !)
- नारळाचे दूध ( नारळाचे दूध आणि क्रीम अश्या दोन वेगळल्या गोष्टी मिळतात तुम्ही दोन्ही वापरून बघूशक्ता )
- लोणी ( केरळात यात बहुतेक तेल आणि कदाचित नारळाचे तेल वापरात असावेत!, )
- भरपूर कढ़ीलिबची पाने
कृती:
झिंगे थोडा लिंबाचा रस आणि हळद आणि अर्धे पाकीट तयार केरळ मसाला लावून मुरत ठेवून दयावे ( अर्धा तास, जास्त नको)
लोण्यावर थोडे लसूण मिरची वाटण परतावे , त्यावर मग कढीपत्त्याची पाने चांगली परतावी आणि मग कान्दा / बटाटा
- कोरडे होऊ लागण्याआधी थोडे गरम पाणी घालावे
- बटाटा अर्धा शिजला कि त्यात झिंगे सोडावे
- थोडे परतून त्यात उरलेला केरळी मसाला घालावा
- थोडे परतून त्यात गरम पाणी घालावे आणि झाकून ५-६ मिनिटे शिजवावे,
जरुरी असल्यास मीठ घालावे
- वाढणे:
१> आहे तसे ( तांबड्या रश्याचे)
२) नारळाचे दूध घालून
सोबत भात
- नारळाच्या दुधात शिजवलेले भात ( आंबेमोहोर असेल तर उत्तम )
आशय वफळलेलंय भाताचा आणि झिंग्यांचा एक मस्त सुगंध स्वयंपाक ग्रेट दरवळत असतं एकादी छान शेत वारुणी ची बाटली उघडावी ( गोडसर नको)
प्रतिक्रिया
8 Aug 2020 - 3:38 pm | चौकस२१२
https://flic.kr/p/2jub1om
https://flic.kr/p/2ju9DtM