बुंदीचे लाडू ....

Primary tabs

पियुशा's picture
पियुशा in पाककृती
5 Aug 2020 - 6:32 pm

बुंदीचे लाडू हा आमचा आवडीचा लहानपणापासूनचा सवंगडी :)
सध्या कोरोनामुळे बाहेरच खाण टाळत रक्षाबंधनासाठी घरीच लाडू केले . लहानपणी जवळ जवळ बऱ्याच लग्नात बुंदी किंवा बुंदीचे लाडू सगळ्यांच्याच खाण्यात आले असतीलच, आताशी लग्ना मध्ये वेगवेगळ्या मेनुच्या गर्दीत बुंदी न बुंदीचे लाडू जणू हद्दपारच झालेत असो .
हे लाडू मी न आईने मिळून बनवले , एकाला दोघे असतील तर काम सोप्प होत न शक्यतो बिघडत नाही
आम्हाला घाई असल्याने लाडू गरम गरम वळले त्यामुळे आकार गोल गरगरीत नाही आला त्याबद्दल क्षमस्व !
तुम्ही निवांत करा घाई गडबडीत करायचा प्रकार नाही हा :)
साहित्य :
१) दीड कप बेसन
२) चिमुटभर खाता सोडा
३) तळण्यासाठी तेल
४) घरातला तळणीचा झारा / गोल किसणी /बुंदीचा झारा

कृती : बेसन पाण्यात कालवून घ्यावे , गुठळी राहता कामा नये आणि मिश्रण चमचाने खाली सोडले कि टपटप थेंबासारखे खाली पडेल इतके पातळ ठेवा छान एकजीव फेटून झाले कि चिमूटभर सोडा घालून पुन्हा एकदा फेटून घ्या त्यामुळे मिश्रण हलकं होत.
एकीकडे तळणासाठी एखाद्या पसरट भांड्यात किंवा मोठ्या कढईत तेल गरम करा गॅस फ्लेम शक्यतो हाई असावी ,गरम झालेल्या तेलातले २ चमचे तेल मिश्रणात टाका न हलवून घ्या याने बुंदी क्रिस्पी होते
आता झारा शक्यतो अर्धा फूट उंचीवर ठेवून त्यात चमचाने मिश्रण घालत झारा पूर्ण तेल भर फिरवा त्याने बुंदी सुटसुटीत होते एका जागी मिश्रण जास्त पडलं तर मोठे गोळे तयार होतील अशी सर्व बुंदी तळून ताटात काढून घ्या
(तुम्हाला जर कलर हवा असेल तर वरील मिश्रण वाट्यामध्ये काढून त्यात खाण्याचा कलर घालून तळून घेणे )

आता पाक बनवूया
त्यासाठी दीड वाटी साखरेत एक वाटी पाणी घालून उकळत ठेवावे आपल्याला एक तारी किंवा दोन तारी पाक नाही करायचा फक्त पाक मधासारखा थोडा चिकट वाटला कि गॅस बंद करावा

आता गरम पाकात बुंदी घालून २ मिनिट झाकण लावून गॅस वर एक वाफ काढा याने बुंदी पाक छान शोषून घेते
आता मिश्रण छान मिक्स करून त्यात पिस्ते ,मनुके , बदाम काप,घाला (हे कम्पलसरी नाही )
आणि मिश्रण कोमट झाले किती हाताला तेल किंवा तूप लावून लाडू वळून घ्या
नुसती बुंदी पण लै भारी लागते तशी पण खाऊ शकता
A
B
C
E
G

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

5 Aug 2020 - 9:41 pm | तुषार काळभोर

अशी चमकदार बुंदी लई भारी लागते!!

लाडू कशाला करत बसायचे? नुसती बुंदीच एक लंबर लागेल!!

पियुशा's picture

5 Aug 2020 - 10:15 pm | पियुशा

@ पैलवांन दादा
तेच लीवलय न शेवटल्या ओ ळी त नुसती बूंदी पण भारी लागते ,पण राखी बाँधल्यावर गोड़ म्हणून लाडू वळलेत :)

मस्त.. तायडे फुल फॉर्म मध्ये आहेस तू..

आम्ही जास्त करून दिवाळीत कळीचे लाडू (शेव पाडून त्याचे लाडू ) करतो.. गरम गरम पहिली चव मीच पाहतो..

सौन्दर्य's picture

5 Aug 2020 - 10:53 pm | सौन्दर्य

मिपावर माझ्यासारखे मधुमेहाचे मरीज असताना इतके सुंदर, खाऊखाऊ वाटणाऱ्या लाडूंची कृती व लोभस फोटो पाठवल्याने आमच्या जिभेवरचा ताबा ढळेल त्याला जबाबदार कोण ?

(मस्त लाडू, करून पाहायला हवेतच)

@ गणेश दादूस तुझ्या लाडवांची पाकृ येऊ दे , आम्हाला नवीन रेसेपी कळेल @ सौंदर्य जी शुगर फ्री जमेल ना ? तसे ट्राय करून बघा :)

श्वेता२४'s picture

5 Aug 2020 - 11:41 pm | श्वेता२४

बुंदीचे लाडू घरात आवडीने खात नाहीत. पण फोटो आवडले

अभ्या..'s picture

6 Aug 2020 - 12:50 am | अभ्या..

हायला पिवशे, अ‍ॅप्रेन्टीसपणा अधून मधून सोडला तर अगदी प्रो सुगरण झालीस हं.
लगे रहो.
ते घेवरची पण प्रतिक्रिया हिच समजून घे. आवाडल्या दोन्हि पाकृ. गोड असलेने जास्तच.

Gk's picture

6 Aug 2020 - 7:59 am | Gk

थोडी खारी बुंदीपण करावी

कंजूस's picture

6 Aug 2020 - 9:17 am | कंजूस

झक्कास.

बुंदीचे लाडू आणि ताकातल्या गरमा गरम जिलेबी करायची आहेत.लाडू छान झालेत आहेत. मस्त गोड गोड.

मदनबाण's picture

6 Aug 2020 - 4:30 pm | मदनबाण

मस्त !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Avrodh – The Siege Within | SonyLIV Originals |

लै कुटाण्याची कामं करतीयेस बाई! तो घिवर बघून पण असंच गहिवरून आलं होतं मग आम्ही आयता मैसूर पाक आणून तो खाल्ला आणि दुधाची तहान ताकावर भागवली. पाकृ विभाग करोना संपेपर्यंत बंदच ठेवावा असं वाटायला लागलंय :)

ह्याला जोरदार हणूमोदन,
हे लाडूंचे जिवघेणे फोटो पाहून तर लैच जळजळ झाली, अरे प्रत्येक फोटो बादली भर लाळ गाळत पाहिला.
अरे आजूबाजूची इतकी मुलं दहावी आणि बारावी पास झाली पण एकानेही कोरोनाच्या नावाखाली पेढे वाटले नाहीत.
त्या दु:खातून बाहेर येतो आहे तोपर्यंत हा धागा मनाला डागण्या देउन गेला.
संपूर्ण बंदी जमत नसेल तर किमान पियुशा ताईंना तरी असे धागे टाकायला काही दिवस बंदी घाला.
पैजारबुवा,

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Aug 2020 - 5:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बुंदी आणि बुंदीचे लाडू नंबर एक झालेत. बुंदी आणि बुंदीचे लाडू आता केवळ आठवणीत उरतील इतके कमी झाले. पूर्वी लग्नकार्यात-कोणत्याही प्रवचन किर्तन महाप्रासाच्या कार्यक्रमात असे लाडू भारी लागायचे. बुंदी पानात आली की दमच निघायचा नाही, आजूबाजूचे बघत आहेत हे विसरुन हळुहळु बुंदी खाणे सुरु व्हायचे. लाडूही असाच भारी लागायचा. फ़ोटो नेहमीप्रमाणेच जीवघेणे.

-दिलीप बिरुटे

झामा

नूतन सावंत's picture

7 Aug 2020 - 10:01 pm | नूतन सावंत

पियू,उत्तम लाडू

काय भारी आहेत लाडू! काय करायचा गोल गरगरीत आकार!!

पण मी फक्त दाद देणार. करून बिरून बघणार नाही ;)

कोणीतरी बादली आणून द्या रे लाळ गाळायला....

अत्रुप्त आत्मा's picture

13 Aug 2020 - 12:38 pm | अत्रुप्त आत्मा

=))
प्लस वण! अशीच काहिशी भावना!

सगळ्यांच्या खुसखुशीत ,गोग्गोड़ प्रतिसादा बद्दल मनापासून आभारी आहे, @ पैजारपबुवा,रातरानी, रुपी तुम्हाला कामला लावनार बघा मी एक दिवस रेसीप्या टाकून टाकून ;)☺

ज्ञानोबाचे पैजार's picture

15 Aug 2020 - 7:37 pm | ज्ञानोबाचे पैजार

स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून आज शेवटी बुंदी पडलीच,

घरातल्या झाऱ्या ने पडल्याने थोडी जाडसर पडली होती, त्यामुळे लाडू न वळता नुसती गोडी बुंदी खाऊन तोंड गोड केले

घरी बायको सकट सगळ्यांनी आवडीने खाल्ली आणि फस्त केली आणि परत बनव अशी ऑर्डर सोडली

पैजारबुवा,

अरे वा वा वा, बघा लागले की नै कामाला, सगळ्यानी बूंदी आवडिने खाण म्हणजे करणार्याची कौतुकाची पोचपावती असते ☺