हिंदी भाषेच्या ज्या बोली आहेत त्यामधे खडी बोली सर्वात प्रभावी असल्याने तिचा वापरही सर्वाधिक आहे.विशेषत: दिल्लीसारख्या महानगरात आणि आसपासच्या प्रदेशात.
देवनागरी लिपीत ै या दोन मात्रांचा उच्चार ऐ असा केला जातो.पैलवान , दैव इ.
पण याच दोन मात्रांचा खडी बोलीतला उच्चार मात्र इंग्रजीतल्या ॲ सारखा आहे. यामुळे आपल्याला बँकेच्या नावाच्या पाट्यांवर 'बैंक' असे लिहिलेले दिसते.ते आपणा मराठी लोकांच्या दृष्टीने ब+ऐ+न्+क = बैंक असे असले तरी हिंदी भाषिकांच्या दृष्टीने ते ब+ॲ+न्+क = बँक असेच आहे.
स्मार्टफोनवर मराठी आणि हिंदी या देवनागरी लिपीत लिहिल्या जाणार्या दैनंदिन वापरातल्या दोन भाषांपैकी हिंदी ही मराठीपेक्षा तुलनेने अधिक वापरली जाते.साहजिकच जी भाषा जास्त वापरली जाईल तिच्याकडे अधिक लक्ष हे कळफलक निर्मात्यांकडून दिले जाणार आणि तसेच घडले देखील.
गुगलपोषित इंडीक हा कळफलक स्मार्टफोनवर वापरताना शब्द सुचवणीत अनेकदा चुकीचे शब्द सुचवले जातात. यातले बहुतांश शब्द ॲ किंवा ऑ हा ध्वनी समाविष्ट असणारे आहेत.म्हणजे ॲप , डॉक्टर याऐवजी अँप , डाँक्टर हे पर्याय सुचवले जातात.ॲ ध्वनी असणारे मराठी शब्द गुगल इंडीकवर सहजपणे लिहीता येत नाहीत. ते सहजपणे का लिहिता येत नाहीत किंवा सुचवणीत का सुचवले जात नाहीत हे आता लक्षात येईल.
इंग्रजीतले ॲ आणि ऑ ध्वनी असलेले शब्द अचूक लिहिता येण्यासाठी मराठी भाषेने ॲ आणि ऑ हे दोन ध्वनी या आधीच स्विकारले आहेत.शिवाय आता शाळेतही बाराखडीऐवजी चौदाखडी शिकवली जात आहे.पण ही माहिती गुगलला त्यांच्या मराठी कळफलकासाठी मदत करणार्यांनी दिलीच नसावी असे आता वाटते आहे; किंवा त्यांची मराठी कळफलकासाठी मदत करणारी टीम पुरेशी माहितगार नसावी अशी शंका येते आहे.म्हणजे जगातल्या सर्वाधिक बोलल्या जाणार्या भाषांमधली एक असणार्या मराठीने इंग्रजीतले जे ध्वनी स्विकारले त्याची खबरबातच गुगलला अद्याप नाहीये.
इंडीक कळफलकातला मराठी भाषा वापरातला हा दोष दूर व्हायला हवा. जे शब्द मराठीत नाहीच आहेत ते सोसावे लागतायत.शिवाय यातून अजून एक संदेश जातो तो म्हणजे मराठीला गृहीत धरलं तरी चालतं; किंवा मराठी ही हिंदीची बोलीभाषा आहे वगैरे.
माझ्या कितीतरी दक्षिण भारतीय मित्रांना मला मराठी ही स्वतंत्र भाषा असल्याचं सांगावं लागलं आहे. त्यांच्या मते देवनागरीत फक्त दोनच भाषा लिहिल्या जातात; हिंदी आणि संस्कृत.
असाच गैरसमज गुगलचा व्हायला नको.
गुगल ट्रान्स्लेटरवरही हीच समस्या आहे.मराठीला गृहीत धरले जाते.
मराठीला गृहीत धरणे यापुढे न थांबल्यास मराठीसाठी स्वतंत्र लिपी बनवावी असा विचार कट्टर मराठीप्रेमींकडून लावून धरला जाण्याची शक्यता भविष्यात नाकारता येणार नाही.
प्रतिक्रिया
25 Jul 2020 - 4:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ॲ किंवा ऑ आले पाहिजे. शब्दांवर आले पाहिजेत. तोच कळफलक सोपा आहे, स्वतंत्र गूगल मराठी इंडिक यायला हवा, सुचवणीत सांगून पाहू.
-दिलीप बिरुटे
25 Jul 2020 - 4:23 pm | Gk
मला हे मिळाले
ऍ
आमच्या गुर्जिनि शिकिवले नव्हते
25 Jul 2020 - 4:53 pm | भीमराव
मी फक्त एवढंच म्हणेन की, एक तर Google keyboard अपडेट करा किंवा प्लेस्टोअर वर जाऊन डाउनलोड करा. माझा keyboard चार टॅब मधे आहे, त्यामध्ये मुळाक्षरांसोबत जोडाक्षरे सुद्धा रेडिमेड आहेत.
25 Jul 2020 - 5:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आत्ताच चालवून पाहिलं. अॅ काही दिसलं नाही. असेल तर कसं, स्क्रीनशॉट टाकून माहिती सांगितलं तर उपयोग करुन पाहता येईल.
-दिलीप बिरुटे
25 Jul 2020 - 6:20 pm | मराठी_माणूस
मृद्गंध हा शब्द , पोटफोड्या द आणि गं असा वेगळा दिसावयास हवा आहे तर कसे टंकीत करावे ?
26 Jul 2020 - 5:13 am | सुमो
दिसायला हवाय का?
मृद्गंध
26 Jul 2020 - 1:58 pm | मराठी_माणूस
हो असेच
25 Jul 2020 - 8:57 pm | चौथा कोनाडा
मराठी भाषा आणि टंकन तज़्न्य एकत्र येउन (उदा. सर्व मराठीप्रेमी संस्था, मिसळपाव, मायबोली संस्थळ इ. सर्वांनी मिळून गुगलमध्ये मराठी भाषा विभागाकडे संपर्कून आपल्या गरजा त्यांच्यापुढे ठोसपणे मांडायच्या ! गुगल इंडियाला आगामी काळासाठी प्रकल्प ठरेल, आणि हे लवकर केले नाही तर "मी तुझी मदत करतो" सारखंच "अॅ" ची हकालपट्टी करून "ऍ" त्याची जागा बळकावेल ! एकदा गुगलनी या सुधारणा केल्या की बाकीचे कळफलकवाले सुद्धा करतील.
25 Jul 2020 - 11:37 pm | Gk
कायच्या क़ाय आहे हे
गोल्ड माइन वाले तमिली चित्रपट हिन्दीतच डब करतात , मराठीवर अन्याय करतात , असेही कुणी म्हणेल,
खुद्द मराठीच्याच 30-40 बोली भाषा आहेत व त्याना स्वतन्त्र नावेही आहेत, सगळी नावे अन शब्द समोरच्याने घालून द्यावेत काय ?
26 Jul 2020 - 12:48 pm | उपयोजक
इतके वैतागण्यासारखे काहीच नाहीये.मराठी प्रमाणभाषेने स्विकारलेले शब्दच मागतो आहे.जे आपल्या सर्वांना शाळेत मराठी विषयात शिकवले आहेत ते.बोलीभाषेतले शब्द द्या असे म्हणतच नाहीये.
ॲप ,डॉक्टर असे शब्द मराठीत असताना अँप , डाँक्टर असे लिहायला लागणे किंवा सुचवणे हा गुगलचा दोष आहेआसे नाही वाटत?
26 Jul 2020 - 1:55 pm | Gk
ऑटो सजेशन डिसेबल करावे आणि आत्मनिर्भर व्हावे
26 Jul 2020 - 12:20 am | रुपी
ऑ / डॉक्टर तर मला फार सहज दिसत आहेत.
पण एक ॲ कीबोर्ड वर दिसत नाही म्हणून मराठी साठी स्वतंत्र लिपी?
26 Jul 2020 - 8:17 am | Gk
हे कसे उमटते ?
26 Jul 2020 - 10:18 am | कंजूस
खूप वर्षांपूर्वी मी एका साइबर क्याफेत गेलो आणि त्याला विचारले की map कसे येतात स्क्रीनवर? म्हणजे चांगले उत्तम पाहण्याची साइट वगैरे?
तर त्याने छान माहिती दिली होती त्याची आठवण झाली.
-----------–-
तर विषयाकडे वळतो. त्या नकाशांचे आणि कीबोर्डांचे साम्य आहे ते म्हणजे गूगल किंवा नोकिया वगैरे कंपन्या या गोष्टी 'अधिकृत मालकांकडून' लायसन मिळवून घेतात. ते स्वत: काही खटपट करून कुणाकडून इम्पिरिकल डेटा ( वापरण्यास योग्य, सुगम) घेत नाहीत.
महाराष्ट्र सरकारने दिलेलीच बाराखडी, मुळाक्षरे घेतली आहेत. आपण खटपट करून काही घडणार नाही.