एन-९५: दर्जाचा घोळ

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
18 Jul 2020 - 10:18 am
गाभा: 

बरेच डॉक्टर्स आणि हेल्थ वर्कर्स कोविड इनफेक्शनला बळी पडत आहेत. जसे फेल्युअर त्यांच्या संपर्कात येणार्‍या पेशंटेतर व्यक्तींचा निग्लिजन्स जसा असू शकतो तसा एक प्रॉब्लेम भारतात एन-९५ म्हणून पुरवल्या जात असलेल्या सबस्टँडर्ड मास्कचाही आहे. आणि त्याचेही वितरकांकडून अवाजवी दरात विक्री केली जाते आहे.

हा एक न्युज रिपोर्ट एन-९५ मास्क कसे नसावेत याची माहिती देतो जिज्ञासूंनी आवर्जून वाचावा.
.
.
.
.
.
.
.
.

* अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे , व्यक्तिगत टिका आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी अनेक आभार

प्रतिक्रिया

गामा पैलवान's picture

18 Jul 2020 - 12:47 pm | गामा पैलवान

माहितगार,

मुखवट्याचं प्रयोजन नेमकं काय आहे? बाहेरील जंतू आत येऊ न देणे की शरीरातले जंतू बाहेर जाऊ न देणे? की दोन्ही?

उपरोक्त लेखानुसार विषाणू ३ मायक्रॉनपेक्षा छोटे असतात. या विषाणूंना थोपवायला एन-९५ मानकाचा मुखवटा वापरतात. इतक्या सूक्ष्म जंतूंना खरंच थोपवायची गरज आहे का?

आ.न.,
-गा.पै.

Gk's picture

18 Jul 2020 - 1:40 pm | Gk

दोन्ही

कपिलमुनी's picture

18 Jul 2020 - 1:37 pm | कपिलमुनी

उत्तरदायित्वास होकार आहे का ?

माहितगार's picture

21 Jul 2020 - 5:35 pm | माहितगार

अ‍ॅडव्हायजरी हा प्रकार लक्ष देण्याजोगा पण चिमुटभर मिठा सोबत लॉजीक नीट तपासण्याचा असतो असे माझे व्यक्तिगत मत आहे. त्यात न्युज देणारे अजून काय फेरफार करतात हा वेगळ्या संशोधनाचा भाग असावा. असो

अलिकडे टिव्ही न्यूजवर दुधाच्या पिशव्या साध्या पाण्याने धुण्याचा सल्ला देणारी अ‍ॅडव्हायजरी ऐकली पण पटली नाही. अ‍ॅडव्हायजरी देणार्‍यांचा दृष्टीकोण नंतर दुधतर उकळतोच ना असा असावा. पण रेफ्रिजरेटरमध्ये वीषाणू बाधीत पिशवी गेली आणि वीषाणूचे हाताळताना एकावस्तुवरून थंड खाण्याच्या वस्तुवर हस्तांतरण झाले तर च्या जोखीमेचे काय ?; आपल्याकडे गृहीणी दुधपिशव्यांचा छोटा मोठा पुर्न उपयोग करण्याची शक्यता असते. आणि बाकी काहीच नाहीतर आपण फेकुन दिलेल्या कोरड्या कचर्‍यावर अनेक व्यक्तीविलगीकरण करून पोट भरतात गरीब वस्त्यात रोग प्रसार होत असताना कचरा निर्जंतुक न करता फेकणे रास्त वाटत नाही.

अशीच एक अ‍ॅडव्हायजरी valved respirator असलेले मास्क वापरणे टाळण्यासाठी आली आहे. valved respirator असलेले मास्क कशासाठी असतात याची अधिक माहिती मिळावयास हवी. valved respirator मास्क मधून वीषाणू कदाचित येणार नाही पण उत्सर्जन होऊ शकते तेव्हा तो वापरू नये असे हेल्थ मिनिस्ट्रीला वाटते आहे का? वीषाणू उत्सर्जन तर काही प्रमाणात कॉटन मास्कमधूनही होते . वीषाणू उत्सर्जन करणार्‍या मास्क पेक्षा वीषाणू उत्सर्जन न करणारा मास्क अधिक श्रेयस्कर यात वाद नाही पण आरोग्य जोखिम असलेल्या व्यक्तींसाठी कॉटन मास्क पेक्षा कोणता का होईना एन-९५ मास्क अधिक बरा नाही का ? असा एक प्रश्न मनात येऊन गेला. यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा.

उत्तरदायीत्वास नकार लागू

Ujjwal's picture

27 Jul 2020 - 10:22 am | Ujjwal

कचरा निर्जंतुक?

माहितगार's picture

27 Jul 2020 - 10:33 am | माहितगार

गरीब वस्त्यातून कोरोना पोहोचण्याचे एक प्रमुख कारण संसर्गीत कचरा हाताळला जाणे आहे, तशी ही समस्या जुनीच आहे आताचा वीषाणू गंभीर असल्याने नेहमी पेक्षा अधिक गंभीर समस्येस तोंड द्यावे लागते आहे.

म

चरखा वापरून स्वातंत्र्य मिळाले का , असे म्हणून फिदीफिदी हसणारे भाजपे व संघे आता मोदींच्या फोटुवर चरखा लावत आहेत,