माझ्याकडे तीनचार वर्षे जुना सॅमसंग गॅलक्सी ऑनफाईव्ह आहे. मोबाईलमधे स्टोरेज स्पेस कमी आहे. मेमरी कार्डमधेच सर्व डेटा मी सेव्ह करते. मात्र internal storage अतिशय कमी राहिले आहे. एकही नविन अॅप किंवा मोठी फाईल डाऊनलोड होत नाही. Settings-->storage--> अशा पाथने गेल्यास कॅश डेटा आणि miscellaneous असे दोन टाईप्स दिसतात. त्यापैकी कॅश मेमरी डिलिट करता येत आहे आणि नंतर स्पेस वाढलेलीही दिसतेय. मात्र miscellaneous या ऑप्शनपुढे जवळपास 1 GB डेटा use केल्याचे दिसतेय मात्र त्यावर क्लिक केल्यास आतमधे एकही फाईल दिसत नाही. त्यामुळे काही डिलिट करताच येत नाही. याशिवाय हा miscellaneous चा used space दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि मोबाईलची internal memory space कमी होत आहे. हा miscellaneous चा डेटा क्लिअर कसा करावा? आणि मुळात ही miscellaneous memory काय असते कुणी सांगू शकेल काय?
प्रतिक्रिया
16 Jul 2020 - 5:34 pm | वेलांटी
ते राॅकेट क्लिनर वगैरे अॅपही वापरून पाहिले पण त्यानेही हा डेटा क्लिअर होत नाहीय.
16 Jul 2020 - 6:44 pm | कंजूस
"All cleaner apps are hoax. Do nothing as required but only collect your data"
( नेटज्ञान)
16 Jul 2020 - 6:58 pm | मराठी कथालेखक
महत्वाचा डेटा backup करुन मग factory reset करुन बघा.
16 Jul 2020 - 8:03 pm | कंजूस
१) पण पुन्हा त्या फाइल्स वाढतच राहणार त्या कोणत्या ते कसं कळणार आणि घालवणार?
२) factory reset ने मेमरी कमी होते का?
17 Jul 2020 - 5:43 pm | गामा पैलवान
कंजूसकाका,
जातस्थ ( = फ्याक्टरी रीसेट ) केल्यावर निर्मितीच्या वेळेस असलेली उपरिस्तंभ ( = ऑपरेटिंग सिस्टीम) जशीच्या तशी परत उगवते. सगळे योजकप्रक्रम ( = युजर अॅप्स) नाहीसे होतात.
जेव्हा आपण एखादा प्रक्रम स्थापित करतो ( = अॅप इन्स्टॉल करतो), तेव्हा सोबत निर्माण होणारे बदल नोंदविदागारात ( = जर्नल डेटाबेस मध्ये) टिपून ठेवले जातात. तुम्ही नंतर तो प्रक्रम विस्थापित (अन इन्स्टॉल ) केला तरी नोंद व तदनुषंगिक धारिका तशाच राहतात.
माझ्या अंदाजे माहितीप्रमाणे अवांतर साठा ( = miscellaneous storage ) वाढण्याचं कारण अनेक प्रक्रम अनेकदा स्थापविस्थापन केल्याने तदनुषंगिक नोंदविदा ठेवणारी धारिका फुगंत आहे. हा प्रकार आयफोनावरही दिसतो. यावर सध्यातरी फोन जातस्थ करणे हा एकमेव पर्याय आहे.
आ.न.,
-गा.पै.
18 Jul 2020 - 10:06 am | कंजूस
जातस्थीकरण -
होय.
18 Jul 2020 - 12:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपला प्रतिसाद माहितीपूर्ण आहे.
आपण फोनमधे जेव्हा काही अॅप्लीकेशन इन्स्टॉल करतो आणि नंतर कधी तरी काढून टाकतो पण इंतरनल अथवा एक्सटर्नल मेमरीत त्याचे फोल्डर्स आणि त्या फोल्डर्समधे डाटा तसेच पडून राहतो. काही कचरा इंटरनलमेमरी तसाच राहतो त्यामुळे काढून टाकल्यानंतर सर्व फोल्डर्स तपासून तेही डिलीट केले पाहिजेत. कमी मेमरीच्या फोनमधे जागा हा मोठा प्रॉब्लेम असतो तेव्हा आता इंटरनल मेमरी आणि एक्सटर्नल मेमरीची फ्यासीलिटी असलेले फोन निवडावे त्याचबरोबर दोन्हीसीम चालले पाहिजेत हेही पाहिले पाहिजे.
रीसेट, फॅक्टरी रिसेट, हार्ड फॉर्मेट, फ्लॅशींग, हे सर्व प्रयोग आता फोन पूर्वीसारखा चकचकाट पाहिजे असे जेव्हा वाटते तेव्हा करावे हे करत असतांना बॅकप काँटेक्ट्स आणि फोटो वगैरे सर्व बॅकप घेऊन ठेवावा. मगच हार्डरिसेट फॉर्मेटच्या नादी लागावे, नसता चकचक करत बसावे लागते.
-दिलीप बिरुटे
18 Jul 2020 - 5:03 pm | तुर्रमखान
प्रतिक्रिया तारांकीत करून ठेवलीय.
नै, मोबाईलच्या माहितीसाठी नव्हे, मराठीतल्या पर्यायी शब्दांसाठी. :D
19 Jul 2020 - 1:30 pm | गामा पैलवान
प्रशंसेबद्दल आभार! :-)
-गा.पै.
23 Jul 2020 - 2:51 pm | मन्या ऽ
+१०१ :-D :-D
20 Jul 2020 - 6:41 am | चौकस२१२
गा पै ..श्रम घेऊन मराठी प्रतिशब्द वापरल्याबद्दल आपले कौतिक ( मेहनत हा शब्द वापरणार होतो पण तो अरबी/ उर्दू किंवा फारसीतून आला असावा काय?)
सहज म्हणून विचारावेसे वाटते कि हे आपण पूर्णपणे शोधून काढलेत कि आंतरजालावर सहज सापडले ..?
20 Jul 2020 - 11:11 am | चौथा कोनाडा
मेहनत : कष्ट (बहुधा हा शब्द अरबी/ उर्दू / फारसीतून आलेला नसावा)
(आपण रोजच्या व्यवहारातले जे मराठी शब्द समजून वापरतो त्यातले बरेचसे शब्द अरबी / उर्दू / फारसीतून आलेले आहेत)
20 Jul 2020 - 7:19 pm | गामा पैलवान
चौकस२१२,
कौतुकाबद्दल आभार! :-)
हे सगळं माझंच खटलं. पण कधी अडून राहिलं तर संदर्भासाठी खांडबहाळेवर ( https://www.khandbahale.com/all.php ) शोधतो. जो प्रतिशब्द मिळेल त्याची फोड करून वगैरे पाहतो. त्यातला हवा तो भाग घेऊन आधी ठरवलेल्या गुंफणी (theme ) शी सुसंगत करवून पाहतो.
आ.न.,
-गा.पै.
20 Jul 2020 - 7:55 pm | कंजूस
खांडबहाळे साहेब/ गुरुजींनी खरंच शब्दकोश निर्मिती केली का स्वत: ?
21 Jul 2020 - 1:14 pm | गामा पैलवान
कंजूसकाका,
माझी ऐकीव माहिती सांगतो. त्यानुसार खांडबहाळे हा एक उमदा तरुण आहे. आंतरजालावर मराठीत उच्च दर्जाचा शब्दकोश निर्माण करावयाच्या ध्यासाने पछाडलेला आहे. तो संकेतस्थळ निर्मितीत पारंगत आहे.
आ.न.,
-गा.पै.
24 Jul 2020 - 4:22 pm | मराठी कथालेखक
सावरकरांच्या नंतर तुम्हीच :)
25 Jul 2020 - 1:54 am | गामा पैलवान
__/\__
-गा.पै.
17 Jul 2020 - 10:34 am | संजय पाटिल
सॕमसंगला हा प्रॉब्लेम मलाही आलेला ......
वर सांगितल्याप्रमाणे बॕकप घेऊन फॕक्टरी रीसेट करा .....
17 Jul 2020 - 12:59 pm | चौथा कोनाडा
17 Jul 2020 - 2:11 pm | महासंग्राम
मोबाईल रूट करून त्यातले नको ते ऍप्स उडवले कि बरीच जागा रिकामी होईल. मी सॅमसंग ला करून घेतला होता मला बराच फायदा झाला.
नोट : रूट करतांना योग्य पद्धतीने न झाल्यास डेड होण्याचा धोका आहे तेव्हा जाणकार व्यक्तीकडून आपल्या जबाबदारी वर करावा
17 Jul 2020 - 2:49 pm | माहितगार
माझा गॅलक्सी ऑन ७ आहे. मेमरी विषयक सिमिलर प्रॉब्लेम लैकरच येईल अशि शक्यता असताना नेमका उपयूक्त धागा वाचनात आला त्याबद्दल धन्यवाद
माझ्या फोनची गेल्या वर्षाभरापासून नेट थोडावेळ चालू राहीला तरी बॅटरी पहाता पहाता गंडते. त्या बॅटरींकरता एक्स्टर्नल चार्जर न मिळाल्याने एक्सट्रा बॅटरी विकत घेऊन ठेऊनही उपयोग होत नाहीए. कुणि सॅमसंगची ऑरीजनल बॅटरी नवी घेण्यास सुचवले आहे करून पहावे लागेल.
17 Jul 2020 - 5:31 pm | चौथा कोनाडा
पॉवर बँक हा पर्याय वापरून पाहिला नाही का ?
17 Jul 2020 - 4:39 pm | कंजूस
Wifi file explorer app वापरून तुमच्या फोनमधल्या फाइल्स PC वर पाहता येतात. ( जर त्यातून डिलीट करता आल्या तर एक कायमचा सोपा निर्धोक मार्ग सापडेल. )
Apps मधल्या काही युक्त्या फक्त पेड वर्शनमध्ये ठेवल्या आहेत. तरीही शंभर दोनशे रुपयांत एक खात्रीचा आपल्याकडेच चावी असणारा उपाय मिळणे हे चांगलेच.)
----------------
ब्याटरी भराभर डाऊन होणे -
१) ब्याटरी काढता येत असेल किंवा काढण्यासारखी असते त्या फोनासाठी -
ब्याटरीचे लीड्स आणि फोनमधील लीडस यामध्ये टच कॉन्टॅक्टस होतात ते साफ केल्याने ८०% सुधारणा होते.
२) ब्याटरी फिक्स असणारे फोन्स -
- सिन्क्रोनाइजेशन केलेले apps मधले फीचर्स बंद करणे.
- apps नोटिफिकेशन्स बंद करणे
- whatsapp auto download बंद.
- मागच्या बाजूस active राहणारी apps बंद करणे.
- थोडक्यात सर्व apps चा ओटो कंट्रोल काढणे. अगदी ट्रुकॉलरचाही.
याने फरक झाला तर कोणते app खवट झाले ते शोधणे.
23 Jul 2020 - 2:59 pm | मन्या ऽ
- मागच्या बाजूस active राहणारी apps बंद करणे.
हे कसं करायचं? आमचे फोनोबा या कारणासाठी गरम होत असतात.. चार्जिंग सुरू असताना...
18 Jul 2020 - 11:22 am | आवडाबाई
प्रोब्लेम मला पण आला होता. फोन laptop ला जोडल्यावर एका फोल्डर मध्ये बरेच फोटो दिसले, हा फोल्डर फोन वर दिसत नव्हता.
असे एखादे फोल्डर आहे का चेक करता येईल.
18 Jul 2020 - 2:59 pm | कंजूस
Factory reset जातस्थ करणे.
- Jul 2020 - 5:43 pm | गामा पैलवान
------------
काय झालं की माझे दोन विंडोज फोन्स माइक्रोसॉफ्टने सपोर्ट काढल्यावर लटकले. म्हणजे स्टोरचा सर्वरच उडवला. मग मी भराभर अगदी कामाची apps फोन मेमरीत ढकलली. एसडी कार्डावर भाराभर आहेत ( विंडोजवाले करू देत होते.)
तर आता रिसेट मारलं तर माझ्याकडे काहीच राहणार नाही. कारण नंतर कार्डावरची पुन्हा validate करता येणार नाहीत आणि मेमरीतली रिसेटात उडतील.
फोनच्या क्याम्राने काढलेले फोटो/विडिओ एका app मुळे वाइफाइ ट्रान्सफर करता येताहेत यावर सगळा भरोसा आहे. क्याम्रे उत्तम आहेत. शिवाय माइक्रोसॉफ्ट ओफिस सूट अजून सिस्टममध्ये जिवंत आहे.
या कारणामुळे मी रिसेट करण्याला फार घाबरतो. दुसरे उपाय शोधतो. Android फोनाचे तसे नाही. Apps उडाली तर पुन्हा घेता येतील.
फोन पिसीला जोडून जेवढ्यास तेवढेच डिलिट मारणे हाच चांगला उपाय वाटतो. इतर नेटवरचे लेख वाचल्यावर रिसेटचा आणखीच बागुलबोवा वाटतो.
18 Jul 2020 - 4:22 pm | वेलांटी
जवळपास 250mb डेटा miscellaneous मधून क्लिअर झाला. अजून पाचशे mb आहे. शिवाय मोबाईलमधे system memory मधे app deta ही खूप दाखवतोय.
आता मोबाईल लॅपटाॅपला कसा जोडायचा आणि त्यासाठी कोणती केबल लागते( मला नविनच घ्यावी लागेल). शिवाय महत्वाचे म्हणजे एकदा लॅपटाॅपमधे मोबाईलच्या फाईल्स आल्या की या टेम्पररी फाईल्स कशा ओळखायच्या जेणेकरून त्या डिलिट करता येतील.
18 Jul 2020 - 5:40 pm | कंजूस
ते आणखी एक app आहे. एकाच wifi वर तुमचा पिसी आणि मोबाईल जोडल्यावर app सुरू करायचे. मग एक address दाखवेल तो पिसीच्या ब्राउजरमध्ये ओपन केला की तुमच्या मोबाईलमध्ये असलेल्या फाइल्स पिसीवर दिसतात. केबल वगैरे नाही लागत. प्रथम निरिक्षणच करा. फाइल टाइप वगैरे. हळहळू एखादी फाइल कोणती कुठे समजले की काम सोपे होईल.
जमलं तर पुढेही हे करता येईल. कारण तशा फाइल्स जमवणे त्या मोबाइलचा गुण असेल. रिसेट मारणे म्हणजे तयारी करा, इकडचे तिकडे फिरवा हे आलेच.
19 Jul 2020 - 12:08 am | Prajakta२१
मिपा फोनवर पाहायला लागल्यापासून storage space running आऊट of space हा message सारखा येतो
मिपा ला जास्त डेटा लागतो का?
अँप्लिकेशन मॅनेजर मध्ये जाऊन बऱ्याच इनबिल्ट अँप चा डेटा सारखा क्लिअर करत राहावे लागते
एवढे ब्राउजिंग नाहीये तरीपण डेटा कुठून येतो काळात नाही you ट्यूब तर बंदच आहे मेल पण नाही
तरी पण एवढा डेटा कसा काय दाखवते ? फोन बदलण्याची गरज आहे वाटते
सॅमसंग मध्ये सध्या १० च्या आत कुठला चांगला येईल?
सॅमसंग m ३१,m २१,m १० मध्ये कुठला चांगला येईल?
चर्चेबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद
19 Jul 2020 - 9:11 am | कंजूस
हे एक छोटे app फोनची RAM किती वापरली जात आहे ते आणि ब्याटरी टेंपरेचर वगैरे दाखवते simple system minister ( by darshan parajuli )
तर available RAM पाहा. वेबसाईटवर लेख edit करण्यासाठी ,किंवा विडिओ editing साठी RAM वापरली जाते.
Memory मध्ये जागा असेल तर app डाऊनलोड करता येईल.
_________________
M series phones मध्ये जाहिरातींना जागा देऊनफोन्स स्वस्त केल्यासारखे केले आहे. क्याम्रा डब्बा. असा रिव्यु आहे.
19 Jul 2020 - 9:12 am | कंजूस
*system moniter*
20 Jul 2020 - 3:19 pm | सिरुसेरि
कधी कधी गुगल क्रोम खुप स्पेस खातो . अशा वेळी settings-->apps-->google chrome--> clear cache --> clear data अशा प्रकारे स्पेस मोकळी होते . norton , 360 हि अॅप वापरुन जंक फाईल्स काढु शकता .
20 Jul 2020 - 3:58 pm | कंजूस
आता android ८ पासून ती क्याश {एकादमात} काढण्याची कामं करणारी apps चालणार नाहीत अशी व्यवस्था केली आहे. असं एकेक app पकडून लोकर ( क्याश) काढावी लागते.