कांद्याचे वाटप/ वाटण ..योग्य कृती ?

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in पाककृती
16 Jul 2020 - 6:15 am

मिपावरील समस्त पाककृतीत रमणाऱ्या बल्लवांना आणि बल्लवीनीना ( असा शब्द आहे का?) एक सामान्य प्रश्न
कांद्याचे वाटप /वाटण ..योग्य कृती ?
खाली पैकी कोणती कृती जास्त चविष्ट होऊ शते
१) सोललेला कांदा कच्चा आधी वाटून ( बहुतेकदा मिक्सर मधून ) गेहेने आणि मग तेलात परतणे
२) सोललेला कांदा मोठा किंवा मध्यम चिरून घेणे आणि तेलावर परतणे आणि मग वाटणे
३) रेस्टारंट मध्ये बघितलेला प्रकार (मोठ्या प्रमाणावर) = अख्खा कांदा ( सालासकट ) उकळवणे , मग साले काढून टाकणे आणि उरलेला लगदा मग तेलावर परतणे
यातील एखाद्या पद्धतीत वाटण कडू होण्याची शक्यता असते का ?
दुसरे असे कि यात मी फक्त कांदा वाटप म्हणले आहे त्यात टोमॅटो किंवा इतर मसाले घेतलेले नाहीयेत .

प्रतिक्रिया

mrcoolguynice's picture

16 Jul 2020 - 9:43 am | mrcoolguynice

पद्धत १: रोजच्या रस्सा भाजीसाठी मी वापरतो

पद्धत २: चिकन बिर्याणी, चिकन कोर्मा किंवा मटण करी , व्हेज पुलाव ला, मी वापरतो

पद्धत ३: माहित नाही

कांदा कडू होऊ नये म्हणून ... "हाय अँड फास्ट" पेक्षा "लो अँड स्लो" पद्धत चांगली.

कांदा लो आचेवर, स्लोली परतणे ... भांडे जाड बुडाचे हवे.

कपिलमुनी's picture

16 Jul 2020 - 7:22 pm | कपिलमुनी

कांदा सालासकट गॅसच्या बर्नरवर ठेवावा, , त्यासाठी एक जाळि मिळते. त्यावर ठेवावा . मोठ्या आचेवर ५ -१० मिनिटे ठेवावा उलट सुलट करत राहावे , नंतर जळलेल्या साली काढाव्या.
आत स्मोकी फ्लेव्हरचा शिजलेला कांदा असतो. तो परतून घ्या किंवा डायरेक्ट मिस्कर मधुन काढा , बेस्ट लागतो

श्वेता२४'s picture

16 Jul 2020 - 7:49 pm | श्वेता२४

नुसता कांदा वापरायचा असतो त्यावेळी पद्धत एक चालते कारण नंतर तो तेलात वेगळा परतला जातो पण ज्यावेळी कांदा टोमॅटो, आलं, लसूण किंवा खोबरे यांसोबत वाटायचा असतो तेव्हा मात्र तो तेलात परतून घेऊन मगच इतर जिन्नसांसोबत वाटावा.

अत्रुप्त आत्मा's picture

17 Jul 2020 - 10:49 pm | अत्रुप्त आत्मा

आमच्यासाठी ह्याबाबतीत जसा खेळ, तशी पध्दत! अस गणित आहे.

सूक्ष्मजीव's picture

20 Jul 2020 - 10:13 am | सूक्ष्मजीव

अत्रुप्त आत्मा यांच्याशी सहमत.

पहिली पद्धत ही घरगुती मसाल्यासाठी जिथे कांदा दिसायला नको तिथे ठीक आहे.
दुसऱ्या पद्धतीने तुम्ही चांगली ग्रेव्ही बनवू शकता व काही खास पदार्थ जसे नॉन व्हेज व पंजाबी इ. बनवू शकता.
तिसरी पद्धत ही मखनी ग्रेव्ही साठी वापरली जाते. ज्यामध्ये नजाकतीच्या भाज्या बनवल्या जातात - पनीर बटर मसाला, शाही पनीर इ.
तिसऱ्या पद्दतीत शक्यतो टोमॅटो हा प्रमुख व कांदा कमी, किवा दुय्यम असतो.

नीळा's picture

21 Jul 2020 - 6:30 pm | नीळा

मी कांदा ऊभा पातळ चीरून घेतो...सुरवातीला तेल न घालता कोरडाच हाय फ्लेम वर भराभर परतुन घेतो.....आणि नंतर तेल सोडुन मिडीयम फ्लेम वर छान बदामी होई पर्यंत तळसवतो....

पद्धत क्र. २ वापरुन फार 'निगुतीने' स्वयंपाक केल्याचा फील जरूर येतो.

क्र. ३ च्या पद्धतीत व्हेज स्टॉक चे मटेरियल आपोआप तयार होत असेल असे दिसते. आयडिया अच्छा है.

सरिता बांदेकर's picture

27 Dec 2020 - 10:52 am | सरिता बांदेकर

कांदा पाण्यात उकळून नंतर तेलात परतला तर तेल कमी लागते. डाएटीशियन् हे सांगतात म्हणजे तेल कमी लागतं.
नाहीतर कांदा तेलात परतून परत वाटप परतलं तर तेल जास्त लागतं.
चवीचं म्हणाल तर आपल्या डाएट प्रमाणे चव डेव्हलप् करावी लागते.
पण या प्रकारात तेलाचा वापर खूप कमी होतो. कांदा कडवट लागत नाही पण कच्चट लागणार नाही याची काळजी घ्यावी लागते नाहीतर कांदा उग्र लागतो.

सरिता बांदेकर's picture

27 Dec 2020 - 10:53 am | सरिता बांदेकर

कांदा पाण्यात उकळून नंतर तेलात परतला तर तेल कमी लागते. डाएटीशियन् हे सांगतात म्हणजे तेल कमी लागतं.
नाहीतर कांदा तेलात परतून परत वाटप परतलं तर तेल जास्त लागतं.
चवीचं म्हणाल तर आपल्या डाएट प्रमाणे चव डेव्हलप् करावी लागते.
पण या प्रकारात तेलाचा वापर खूप कमी होतो. कांदा कडवट लागत नाही पण कच्चट लागणार नाही याची काळजी घ्यावी लागते नाहीतर कांदा उग्र लागतो.