वॉरंटी /  गॅरंटी

रानरेडा's picture
रानरेडा in तंत्रजगत
10 Jul 2020 - 11:31 am

वॉरंटी /  गॅरंटी

( गॅरंटी सहसा कोणी देत नाही - कायदेशीर व्याख्या आहे काहीतरी, आणि इतर ही लफडी असावी. )

वॉरंटी  चे काही  प्रकार असतात

१ ) ऑन साईट - तुमच्या जागी / घरी / ऑफिस मध्ये येवून सर्व्हिस दिली जाते

२ ) कॅरि इन - तुम्हाला सर्व्हिस सेंटर मध्ये जावे लागते.

३ ) लॅपटॉप ला पाहिली नाही पण काही गॅजेट ना रिपलेसमेंट वॉरंटी असते - त्यात

अ ) वस्तु बदलून दिली जाते - किंवा
ब ) वस्तु बदलायला नसेल तर क्रेडिट नोट -  इतर गोष्टी मधून पैसे वगळले जातात .
क) काही कंपनी पैसे ( इंनव्हॉईस किमत ) परत करतात .

४ ) काही कंपनी आता मनी बॅक गॅरंटी  देतात - यांच्या अटी वाचून घ्या .

कारण काही वेळा सामान्य वॉरंटी / मनी बॅक गॅरंटी / मनी बॅक वॉरंटी ( ही असते की नाही माहीत नाही ) मध्ये प्रो रेटा बेस वर पैसे / क्रेडिट नोट मिळाली आहे . म्हणजे ठराविक काळाला एक या प्रमाणे घसारा ( depriciation)   वजा करून रक्कम मिळते .

५ ) लॅपटॉप  कंपनी वाढीव वॉरंटी विकतात - यात १ वर्षांच्या वॉरंटी वर १/२/३ वर्षे वॉरंटी वाढते . याच्या अटी एकदा वाचून घ्या - बहुतेक वेळा चार्जर आणि बॅटरी यात येत नाही . पण स्क्रीन / मदरबोर्ड / किबोर्ड येत असल्याने बराच फायदा होतो .

६ ) वॉरंटी च्या अटी नुसार कंपनी जास्तीत जास्त वस्तु बदलून द्यायला किंवा किमत द्यायला बांधील असते . ही पण नीट लक्षात घ्या . म्हणजे तुम्ही एक महान कादंबरी लिहिली आणि हार्ड डिस्क खराब झाली तर हरड डिस्क कंपनी ची जबाबदारी हार्ड डिस्क दुरुस्त करणे / बदलून देणे / पैसे परत करणे इतकीच असते . जर असा दावा केला की मला नोबेल प्राइस मिळणार होते पण कादंबरी गायब झाल्याने टे हुकले म्हणून करोडो चा दावा लावला तर तो *सहसा* उभा रहात नाही .

आता खराब क्वालिटी ने काही मोठे नुकसान झाले - जसे की १५ एक वर्षांपूर्वी डेल ( आणि इतर ) कंपनी च्या बॅटरी पेट घेत होत्या - असे होवून इजा झाली , मृत्यू आला किंवा इतर गोष्टी जळाल्या तर *भारतीय कायदा* काय म्हणतो ही माहीत नाही.

७ ) अजून एक म्हणजे काही वेळा काही मेकॅनिकल गोष्टी साठी लाईफ टाइम / लिमिटेड लाईफ टाइम - सर्व्हिस / रीप्लेसमेंट वॉरंटी / गॅरंटी असते - अटी समजून घ्या . ही महाग पेना ला वगैरे असते . काही वेळा म्हणे लोका न २० वर्षांनी ही सर्व्हिस मिळाली आहे . अनुभव नाही !

८ ) काही कंपन्या वस्तु वॉरंटी / गॅरंटी काळात विकली तर काय होते यांचे ही नियम बनवतात . काही कंपनी ट्रान्सफरेबल वॉरंटी /  गॅरंटी असा स्पष्ट उल्लेख करतात . माहितीतीत मर्सिडिज चे ४-५ वर्षांची वॉरंटी / सर्व्हिस पॅकेज असेल , आणि गाडी त्या कालावधीत विकली तर ती नवीन मालकाकडे ट्रान्सफर होते . याचे काही चार्ज अस्तीत तर माहीत नाही., ऑडिओ मध्ये ब्रायस्टन म्हणून एक कंपनी २० वर्षांची    ट्रान्सफरेबल वॉरंटी देते , ती तशाच उत्तम  क्वालिटी आणि सर्व्हिस साठी प्रसिद्ध आहे!

९ ) *बहुतेक कंपनी वॉरंटी काळात जर अनधिकृत ठिकाण हून  सर्व्हिस करून घेतली तर सर्व्हिस नाकारतात* . आणि करून घेतली ही बघायला विविध उपाय असतात.

अ ) गाडी साठी हा नियम काय आहे ते नीट समजून घ्या. आणि आणीबाणीच्या वेळी काय करावे ते नीट समजून घ्या.
ब ) आता करोंना च्या वेळी यावर कंपनी चे काय धोरण आहे ही माहीत नाही - कारण अनेक ठिकाणी सर्व्हिस सेंटर बंद आहेत - लोक येत नाहीत . त्यामुळे अनेक लोकानी मिळेल तिकडे आणि मिळेल तशी सर्व्हिस करून घेतली आहे .

अजून काही असेल तर लिहिन.
 
- हेमंत वाघे.

(हा लेख असलेल्या माहितीवर लिहिला आहे. काहीही तांत्रिक अडचण झाल्यास बरोबर दिलेल्या अटी वाचाव्या किंवा कंपनी च्या सेवा केंद्रा शी - सर्व्हिस सेंटर शी संपर्क करा. कायदेशीर अडचणी असल्यास - काही नियम समजत नसल्यास *योग्य त्या* सल्लागारा चा / वकिलांचा सल्ला घ्यावा. लेखकाणे माहितीसाठी लेख लिहिला आहे आणि त्याची माहिती चुकीची / अपूर्ण असू शकते. किंवा समज (interpretation) चुकीची असू शकते. त्यामुळे कोठल्याही प्रकारच्या नुकसांनीला लेखक जबाबदार नाही )

*नोकरी शोधणे* या विषयास वाहिलेला  *Hunt My Job .in* हा ग्रुप टेलिग्राम वर बनवला आहे . नोकरी कशी शोधावी , कशी करावी आणि या अनुषंगाने होणाऱ्या इतर गोष्टी जसे कि रेस्युम, प्रोफाइल बनवणे, अर्ज करणे, इंटरनेट वरून शोध, शोधले जाणे, मुलाखत आणि तंत्र, पगार , फसवणूक , करिअर बदलणे, मंदी , मार्केट आणि संधी या आणि इतर संबंधित विषयावर माहिती आणि चर्चा केली जाईल . नोकऱ्या हि पोस्ट करण्याचा प्रयत्न केला जाईल . महत्वाची माहिती huntmyjob.in या साईट वर अपडेट करण्याचा विचार आहे. जॉईन व्हायचे असेल तर खालील लिंक ने जॉईन होऊ शकता  https://t.me/huntmyjob

प्रतिक्रिया

चौकस२१२'s picture

10 Jul 2020 - 4:58 pm | चौकस२१२

यात अजून दोन मुद्दे लक्षात घेणे आव्यश्यक आहे
- प्रत्येक देशातील नियम वेगळे असू शकतात आणि काही देशात ग्राहकांचे अधिकार चांगलेच जपलेले असतात .. उदाहरणार्थ काही देशात 'रंगाची गॅरंटी नाही ' अश्या बोलीवर कपडे विकूच शकता येत नाहीत .. काही देशात काहीही चालते
- लेबल ( कपडे असो किंवा खाद्यपदार्थ ) यावर काय माहिती लिहिणे सक्तीचे असते याचे हि नियम महत्वाचे असतात
- अंतर्रष्टत्रीय वॉरंटी.. जपून टाका पाऊल .. हे धोरण वापरा... खास करून महागड्या वस्तूंवर.. जरी आपण दुबई किंवा सिंगापिर मधून जगप्रसिद्ध नावाची वस्तू घेत असाल तरी सर्वच " आंतरराष्ट्रीय ख्यातीचे " उद्योग "जागतिक वॉरंटी" देत नाहीत .. १००% खात्री करून घ्या ,,,
- समांतर आयात "पॅरलल इम्पोर्ट" ,,, उदाहरण तुम्ही समजा कॅनडा मध्ये सॅमसंग चा फॉरेन घेतलात तर त्याला सॅमसंग कॅनडा अधिकृत पणे आपली वॉरंटी देऊ करेलच असे नाही .. याचाच अर्थ ते फोन खोटे किंवा तस्करी करून आणलेले असतात असे होत नाही तर काही मोठाले आयातदार आपली जबाबदारी वर ते आयात करतात व स्वतःची अंतर्गत वॉरंटी देतात ..

कंजूस's picture

11 Jul 2020 - 7:50 am | कंजूस

इलेक्ट्रॉनिक्स वस्तू डिपार्टमेंट स्टोर किंवा मॉल मधल्या दुकानात घेतले तर पुढे कटकट करत नाहीत पण कंपनीकडे पाठवतो सांगतात. म्हणजे वेळ आणि पैसे गेलेच. आणि गैरसोय.

सुबोध खरे's picture

11 Jul 2020 - 9:54 am | सुबोध खरे

सोनी हि कंपनी जर आपले उपकरण भारताच्या बाहेरून विकत घेतलेले असले तर येथे दुरुस्तीला दुप्पट पैसे लावत असत.

क्रॉस हा कंपनीचे पेन विकत घेतले तर त्याची आयुष्यभराची गॅरंटी देतात.

दुर्गविहारी's picture

17 Jul 2020 - 11:05 pm | दुर्गविहारी

मराठी भाषेत अशी माहिती आंतरजालावर उप्लब्ध होणे आवश्यक आहे,धन्यवाद.