भाग २ एबा कोच दि कंप्लीट ताजमहाल पुस्तक परिचय. १०. ताजमहाल प्रमाणे इतर कोणाच्या कबरी असलेल्या इमारती यमुनेकाठी आज आहेत का? ११. त्या कबरींच्या तळघरातील मजल्यात खरी आणि वरच्या मजल्यावर ओघानेच खोटी कबर मिळते का?

Primary tabs

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
27 Jun 2020 - 10:55 pm
गाभा: 

भाग ४ एबा कोच दि कंप्लीट ताजमहाल - पुस्तक परिचय

1

1
एबा कोच


कै. ओकांच्या लेखनातून ताजमहालाच्या वास्तूतील काही भागावर भाष्य केले नाही. त्यातील खालील वास्तूंवर एबा कोच यांच्या पुस्तकात काय म्हटलेले आहे ते सादर करत आहे.

१०. ताजमहाल प्रमाणे इतर कोणाच्या कबरी असलेल्या इमारती यमुनेकाठी आज आहेत का?
११. त्या कबरींच्या तळघरातील मजल्यात खरी आणि वरच्या मजल्यावर ओघानेच खोटी कबर मिळते का?

...

१०. ताजमहाल प्रमाणे इतर कोणाच्या कबरी असलेल्या इमारती यमुनेकाठी आज आहेत का?
या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पान ३१ वरील खालील चित्र पहायला लागेल.

1

1

यमुनेच्या डाव्या तिरावरील बागा ज्यात कबरी आहेत. कंसातील संख्या वरील नकाशाशी संबंधित आहेत.

(३) राम बाग किंवा ए नूर अफसान - इथे कबर नाही. एबा कोच यांनी पान ३७ वर आवर्जून म्हटले आहे की सध्या या बागेला राम बाग असे संबोधतात. पण मी तिला बाग ए नूर अफसान म्हणणार आहे. (नूर अफसान कोणी खान नव्हता. नूरजहाँने लाटलेल्या हवेलीतील ती एक असावी कालौघात तिचा प्रभाव संपल्यावर पुन्हा जनमानसात रामबाग हे नाव रूढ आहे.) आता न दिसणाऱ्या त्या बागेत मेजवानी दिली होती. (इति एबा कोच - पान३७) ( बागेतली हवेलीत किंवा महालात ती असणार)

1

(६) चिनी देशाचा - रौझा ए अफ़झल खान - हा एक सरदार होता. त्याचा भाऊ अमानत खान सिराझी याने ताजमहालाच्या वेगवेगळ्या भागात कुराणच्या आयतींच्या सौंदर्यपूर्ण लेखन पट्ट्या पहायला मिळतात. (उजवीकडे) ‘नक्ष’ लेखन शैलीत आहे तर सही ‘सुलूस’ नावाच्या लिपीत सादर केली होती) (French word - cartouches - उच्चार कारतूश - सही किंवा नावासाठी दिलेली जागा) डावीकडे या कबरीच्या जीर्ण इमारतीच्या भिंतीवरील लेखन केलेले आढळते.

1

(९) मकबरा ऐतमाद उदौला - ऐतमाउदौला तेहरानी हा जहांगिराचा सासरा. (इराणहून वाळवंटात मुलीला एकटी टाकून निघून गेला पण नंतर ती परत मिळाली. त्याचे नशीब फळफळले. त्याने अकबराच्या काळात सन १६०५ मधे प्रतिष्ठा मिळवली व जहांगिराच्या राजवटीत तो वजीर झाला. काश्मीरच्या सहलीत १६२२ साली तो वारला त्या आधी काही दिवस त्याची पत्नी (एबा कोच यांनी ते नाव या पुस्तकात सांगितलेले नाही) - अजमत बेगम - निवर्तली होती. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ मुलगी नूरजहाँ, जहांगिराच्या राणीने ही कबर बांधायला घेतली. सन १६२८मधे ती पूर्ण झाली. या ‘बेबी ताज’ कबरीतून ताजमहालातील मुगल कलापुर्ण बांधकामाची प्रेरणा मिळाली असे मानले जाते. खुद्द नूरजहाँ व जहांगिराची कबर लाहोरला आहे. बाप जहांगिराने राजकुमार खुर्रमला शाहजहान हा खिताब - पदवी सन १६१७ मधे दिली. (इमारत खूप सुंदर पण कबरी त्या मानाने अगदी सामान्य असे जाणवते.) (कंस माझे)

1

1

उजव्या काठावरील बागा ज्यात कबरी आहेत.

(२०) रौझा ए शहाजहान - (मुमताझ असे म्हटलेले नाही) उर्फ ताज महाल.
(१८ व १९) ह्या हवेल्या आता कालाच्या ओघात दिसत नाहीत. मात्र जपुरनकाशात तो दाखवला आहे. एका १८५० सालातील फोटोत त्या कशा अस्तित्वात होत्या ते लक्षात येते.१८६० च्या सुमारास तिथ श्री देवजी ( Shri Daoji Maharaj Mandir) आता तिथे दशेरा (स्मशान) घाट आहे. ताजमहालाच्या नदीपात्रा समोरील‘महताब बाग’ पासून तिथे नावेतून जाता येते.

1

(३८) रौझा ए सासत (शायिस्ता) खान - १६६४ ते १६८८ बंगालचा सुभेदार म्हणून तो ढाक्यात राहात होता. आयुष्याच्या शेवटी तो आग्र्यात परतला. तिथे त्याची हवेली (३६) मधे होती. याची कबर (३८) मधे आहे. शिवाजीशी तितकासा यशस्वी लढा दिला नाही. ( fought not very successfully against the Maharatta leader Shivaji) ( त्याच्या मृत्यु नंतर त्याची प्रचंड मालमत्ता सरकार जमा झाली.)

(४४) जफर खानाची कबर - (याने आपल्या पत्नीची कबर निदान आपल्या कबरी शेजारी का बनवली नाही असा प्रश्न पडतो. कारण) याची हवेली (३७) मधे होती, ती १६३७ सप्टेंबर ३ ला बांधून पुर्ण झाली त्या निमित्ताने एका मेजवानीसाठी शाहजहान तिथे आला होता. सन १८२५ पर्यंत कालौघात ती नष्ट झाली. हा जफर खान कोण? शहाजहानचा साडू - मुमताजची बहीण फरझाना बेगमच्या हा नवरा. दुःखात व्याकूळ ‘शहाजहान फरझानाकडे इतका यायला लागला कि त्याच्या चर्चा गावभर होऊ लागल्या. असे मनुचीने नमूद केले आहे’ असे एबा कोच म्हणतात. तो १६४७ -४८ सालात पंजाबचा सुभेदार झाला. नंतर दिल्ली, मुलतान, बिहारचा सुभेदार झाला. १६५८मधे त्याने शहाजहान विरुद्ध औरंगजेबाची बाजू घेऊन माळव्याचा सुभेदार झाला. त्याच्या नावाची यमुना नदीकाठी आगऱ्यात एकाला एक लगतच्या तीन हवेल्या होत्या. १६७० साली तो दिल्लीत असताना वारला त्यावेळी फरजानाच्या (मावशीच्या) सांत्वनार्थ औरंगजेबाने आपली दोन मुले पाठवली होती.

1

(४५) जसवंत सिंह राठोड़ची छत्री - जोधपुरच्या राजाची समाधी. ज्याला आपल्या पुढच्या रांगेत उभा असलेले पाहून शिवाजी महाराजांचा पारा चढला होता तो. तो १६७८मधे वारला. जिथे छत्री आहे तो भाग आता राजवाडा म्हणून ओळखला जातो. बारादरी ( १२ दरवाज्यांची इमारत) फतेपुर-सीक्रीच्या दगडी साखळी व घंट्यांच्या नक्षीदार कमानींची आठवण करून देतात. सीलचंद यानी जयपुर नकाशात ती दाखवली आहे.

1

११. ताजमहाल शिवाय इतर कबरींच्या तळघरातील मजल्यात खरी आणि वरच्या मजल्यावर ओघानेच खोटी कबर मिळते का?

एबा कोच यांनी दोन कबरीची जोडीचे वर्णन केले आहे. मात्र अशा एक खाली व एक वर दोन दोन कबरी बांधायचे कारण काय असावे? याला कुराणात काही आधार आहे का? किंवा बादशाहनामा किंवा तत्सम ग्रंथात काही स्पष्टीकरण दिले आहे का? यावर लिहित नाहीत. ‘खाली जायचा मार्ग मना’ केला आहे. (साधारण ८ मीटर खाली उतरायला २४ पायऱ्या आहेत. तळघर साधारण १५ मीटर लांबीचे असावे.)

1

याचे उत्तर एतमाउदौलाच्या कबरीकडे पाहून हो असे येते. त्या ठिकाणच्या खरी व खोटी कबरीचे फोटो वर दिलेत. त्यात तळघरातील पिवळ्या रंगातील डाव्या बाजूच्या खऱ्या दोन्ही कबरीवर काही चित्रित केलेले नाही. जसे (उजव्या बाजूच्या) ताजमहालातील तळघरातील मुमताजच्या खऱ्या कबरीवर अल्लाहची ९९ नावे वगैरे कोरलेले आहेत.

1

डाव्या बाजूच्या ताज महालातील शहाजहानच्या वरच्या मजल्यावरील (खोट्या) कबरीवर अफू (भांगे)च्या झाडा, पानांचे चित्रे आहेत. (१६* ३= ४८ * २ =९६ ३ =९९?) उजव्या बाजूच्या चित्रात एतमादउदौलाची कबर ओकीबोकी आहे.

1

( फिरदौस आशियानी (शहाजहान यांनी निधनोपरांत पदवी) चिरंतन शांतीत राहायला रिझवान कबरीत आहेत. रजब महिन्याच्या २६व्या रात्री १०७६ हिजरीत स्वर्गातील मेजवानी प्रित्यर्थ त्यांनी देह सोडला. असे बाजूकडील भागात कोरले आहे.) (स्वैर अनुवाद)

...
पुढे चालू...
१२. फारसी भाषेत कोरून लिहिलेल्या पट्टीवर कारागिरांनी आपली नावे त्यात लिहिली आहेत?
१३. कारंंजी उडवायला पाण्याची काय सोय होती?

प्रतिक्रिया

योगविवेक's picture

28 Jun 2020 - 5:59 pm | योगविवेक

बऱ्हानपुरच्या मुमताज़च्या कबरीला मोजले तर ३ होतात.
त्या तीनही बांधीव थडग्यात मुमताज महल चे काय अवशेष असावेत?
खरे तर मला वाटते की जहांगीर आग्ऱ्याच्या लाल किल्ल्यात राहात असताना आग्रा शहर मुघलांची राजधानी होती म्हणून सर्वांत जास्त बांधकाम त्याच्या काळात सुरू झाले होते. शहाजहानने राजधानी दिल्लीत नेली. म्हणून आग्ऱ्याच्या महत्त्वाला ओहोटी लागली होती. औरंगजेब दिल्लीतून राज्य करत होता. नंतर दक्षिणेकडे आल्यावर दिल्ली व आग्रा दोन्ही शहरांना राजधानीचा दर्जा नाममात्र राहिला होता.

योगविवेक's picture

29 Jun 2020 - 11:04 pm | योगविवेक

वाटले की ते कुंवर रामसिंहाच्या मालकीची जागा होती म्हणून नाव पडले का प्रभू रामचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिले होते म्हणून टिकले?

अभ्या..'s picture

29 Jun 2020 - 11:24 pm | अभ्या..

उत्तम प्रश्न ओकसाहेब.

योगविवेक's picture

30 Jun 2020 - 11:46 pm | योगविवेक

या मुघल सम्राटांच्या कबरी आहेत कुठे कुठे?
यावर प्रकाश टाकला जावा ही विनंती.

१. झहिर उद्दिन मोहम्मद बाबर (फेब्रुवारी १४, इ.स. १४८३ - डिसेंबर २६, इ.स. १५३०) हा मुघल साम्राज्याचा संस्थापक आगऱ्यात वारला.
काही काळ त्याची कबर राम बागेत ठेवली होती. नंतर काबूलला नेऊन पुन्हा कबर उभारली.
बाहेरून ती अशी दिसते...

1

आतून अशी भकास दिसते... जी भिंतींवर भोके दिसतात ती बंदुकीच्या गोळ्यांच्या वर्षावाची असू शकतात.

1

तो जिथे जन्मला त्याच्या स्मृती प्रित्यर्थ उझबेकिस्तानात अदिजान शहरात हा चौक आहे.

1

गामा पैलवान's picture

1 Jul 2020 - 2:24 am | गामा पैलवान

शशिकांत ओक,

इमारत खूप सुंदर पण कबरी त्या मानाने अगदी सामान्य असे जाणवते.

याचा अर्थ ही वास्तू मुघलांनी हिंदूंकडून ढापलेली दिसते.

आ.न.,
-गा.पै.