गूगल ड्राइव'वरचे फोटो, ओडिओ, विडिओ वेबसाईटवर देणे.

Primary tabs

कंजूस's picture
कंजूस in तंत्रजगत
22 Jun 2020 - 6:33 pm

गूगल ड्राइववर अपलोड केलेले फोटो,
ओडिओ, विडिओ वेबसाईटवर देणे.

Google Drive प्रत्येक जीमेल अकाउंटला सर्व फोटो,पिडिएफ, ओडिओ, विडिओ फाईल मिडियाचे धरून १५ जीबी फ्री स्टोरेज देते. शिवाय सिक्युअरटी आहेच.

भाग पहिला ) सुरुवात -
प्रथम ब्राउजरमध्ये
drive.google.com/drive/my-drive
साइट ओपन करून आपल्याला हव्या असलेल्या जीमेल अकाउंटने साइन इन करायचे.
मोबाईलवरही साइट उघडा आणि डेस्कटॉप पेज ओप्शन करावे. App नको कारण पुढे शेअरिंग लिंक काढण्यास साइट बरी पडते.

भाग २ ) मिडिया फाईल अपलोड करून शेअरिंग लिंक मिळवणे.
+ new बटण वापरून मिडिया फाइल अपलोड करा.
अपलोड झाल्यावर ती वर दिसेल.
त्यामधल्या मेनूतून 'share' क्लिक करा.
शेअरिंग लिंकचे दोन पर्याय दिसतील त्यातील
"anyone with this link can view" select करा.
जी लिंक येइल ती कॉपी करा. याला आपण मेन लिंक म्हणूया. ती साधारण

https://drive.google.com/file/d/xxxxxxxxxxxxxxxxxxx/view?usp=sharing

अशी दिसेल.
पण ही लिंक वेबसाइटवर चालत नाही. त्यात बदल करावा लागतो. मिडिया फाइलप्रमाणे खालील बदल करून ते वेबसाईटवर वापरता येतात.

अ) फोटो शेअरिंगचे Template
<img src="https://drive.google.com/uc?export=download&id=xxxxxxxxxxxxxxx" width="80%" /><br /><br />

मेन लिंकधला xxxxxxxxxxx ने दर्शवलेला आइडेंटिफायर कोड या टेम्प्लेटातल्या xxxxx ठिकाणी टाका.
मग सर्व कॉपी करून लेखात टाकले की फोटो लेखात उमटेल.

ब) ओडिओ mp3 file प्लेअरचेTemplate

<audio controls ><source src="https://drive.google.com/uc?export=download&id=xxxxxxxxxxx"></source></audio><br />

मेन लिंक मधला xxxxxxxxxxx हा आइडेंटिफायर कोड या टेम्प्लेटातल्या xxxxx ठिकाणी टाकून सर्व कॉपी करून लेखात टाकल्यास ओडिओ प्लेअर लेखात उमटेल.

क) विडिओ प्लेअरचे टेम्प्लेट

विडिओ प्लेअर टेम्प्लेट

<iframe frameborder="0" width="100%" src="https://drive.google.com/file/d/xxxxxxxxxxxxxxxxx/preview" ; allowfullscreen="true" > </iframe>

मेन लिंक मधला xxxxxxxxxx आइडेंटिफायर कोड या टेम्प्लेटातल्या xxxxxxxxx ठिकाणी टाकून लेखात टाकल्यास विडिओ प्लेअर उमटेल.

((
गूगल ड्राइव मिडिया शेअरिंग लिंक मिळवण्यासाठी इथे पाहा.
या साइटचा उपयोग होतो.
https://www.wonderplugin.com/online-tools/google-drive-direct-link-gener...

))

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Jun 2020 - 12:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितीपूर्ण विषय. आभार.

-दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा's picture

25 Jun 2020 - 1:13 pm | चौथा कोनाडा

फोटो टाकण्याचा प्रयत्न केला पण जमले नाही, काही तरी चुक झाली असावी लिंक मध्ये.
https://drive.google.com/file/d/1EKWPuCVBGEMeId15Jg2e1iHfrIMeg-KG/view?u...
हा तो फोटो आहे. काय चुक झाली असावी ?

धन्यवाद कंजुस साहेब, फोटो, ओडिओ, विडिओ वेबसाईटवर देण्याबद्दल हा आणखी एक मार्ग सांगितलात !

कंजूस's picture

25 Jun 2020 - 3:00 pm | कंजूस
कंजूस's picture

25 Jun 2020 - 3:05 pm | कंजूस
चौथा कोनाडा's picture

27 Jun 2020 - 10:32 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद कंजूसजी ! समजायला जरा जड गेलं, खटपटी केल्यानंतर जमलं. आता हे नीट ध्यानात ठेवायला हवं.

पुनश्च आभार कंजूसजी _/\_

चौकटराजा's picture

30 Jun 2020 - 9:14 am | चौकटराजा

हे मान्डूचे आहे का,,,,,, ?

हो, जहाजमहलच्या बाजूचा वाटतोय.

चौथा कोनाडा's picture

30 Jun 2020 - 1:08 pm | चौथा कोनाडा

चौरासाहेब आणि कंजूसजी, बरोबर ओळखलेत !
फोटो मांडू (मांडवगड) मप्र येथील जहाजमहलच्या जवळच्या तलावाचा (बहुधा मुंजा तलाव) आहे !

चौथा कोनाडा's picture

27 Jun 2020 - 10:32 pm | चौथा कोनाडा

हो, हाच !

प्रचेतस's picture

25 Jun 2020 - 3:05 pm | प्रचेतस

एकदम उपयुक्त माहिती

कोड कॉपी करताना तो बऱ्याचदा - पर्यंत अपूर्ण कॉपी होतो.
इथे
Meg-KG असे शेवटी आहे, Meg पर्यंत कॉपी झाले असेल.

चौथा कोनाडा's picture

1 Jul 2020 - 8:51 pm | चौथा कोनाडा

व्हिडो चिटकवायला देखील जमलंय !

कंजूसजी धन्यवाद _/\_ _/\_

गामा पैलवान's picture

2 Jul 2020 - 5:59 pm | गामा पैलवान

कंजूसकाका,

मुख्य दुव्याच्या उजव्या वरच्या कोपऱ्यात तीन उभ्या टिंबांवर टिचकी मारली की embed असा पर्याय दिसतो. तो उघडला की iframe खोचण्याचा कोड मिळतो. तो ही थेट वापरता यावा. हा प्रकार स्थिरचित्रं, चलचित्र व ध्वनिमुद्रण तिन्हींसाठी वापरता येईल बहुतेक.

आ.न.,
-गा.पै.

मुख्य दुव्याच्या उजव्या वरच्या कोपऱ्यात तीन उभ्या टिंबांवर टिचकी मारली की embed असा पर्याय दिसतो.

आँ? फक्त share आणि इतर पर्याय दिसताहेत. पूर्वी "embed" पर्याय मलाही दिसायचा आणि त्यातून फोटोही टाकलेला आठवतो. पण तुमचा ब्राउजर किंवा डिवाइस कोणता?

गामा पैलवान's picture

2 Jul 2020 - 8:55 pm | गामा पैलवान

कंजूसकाका,

मी आगीनकोल्हा म्हणजे फायरफॉक्स वापरतो.

त्रिबिंदू इथे पाहायला मिळतील :

https://i.imgur.com/0n3kuwb.jpg

आ.न.,
-गा.पै.

मी पण आगीनकोल्हा म्हणजे फायरफॉक्स वापरतो.

त्यात हा embed option येतच नाही. पुन्हा खात्री केली. शिवाय अशा नवीन शेअरिंग लिंकस कशा बदलायच्या यावर लोकांनी साइट्सही आल्या.
ब्राउजर आणि ड्राइव अपडेट न केल्याने ते जुने पान दिसत असावे.

नवीन मेन्यु पान असे दिसते

गामा पैलवान's picture

3 Jul 2020 - 1:42 pm | गामा पैलवान

कंजूसकाका,

ते पान तुम्ही मोबाईलवर पाहताय म्हणून बहुतेक वेगळं दिसतंय. मी हेच पान सफारी (आयफोन) वर बघितलं तर फक्त details हाच मेन्यू दिसला. मग सफारीला डेस्कटॉप साईट दाखव म्हणून सांगितलं तर सगळे पर्याय दिसू लागले.

तुमच्या अँड्रॉईडवर डेस्कटॉप साईट दाखवायची युक्ती बघा कुठे मिळते का. सफारीत रीलोड वर बोट दाबून ठेवल्यास request desktop site म्हणून पर्याय उमलतो.

आ.न.,
-गा.पै.

हे डेस्कटॉपमधूनच घेतले आहे.

ठीक आहे. जर कुणाला असेच पान दिसत असेल तर लेखात उपाय दिला आहेच.
मोबाइलच्या गूगल स्टोरमधून तिन्ही ब्राउजरस आणि गूगल ड्राइव नेहमीच अपडेट करतो त्यामुळे ते embed गेलं असेल.

तसं नाही! एंबेड ऑप्शन आहे.

गूगल ड्राइव्ह मधील शेअर्ड टू पब्लिक लिंक कोणत्याही ब्राऊझर मधे डेस्कटॉप मोड वर उघडली की त्या मिडिया लिंकचा एंबेड कोड मिळतो .

वर चौथा कोनाडा यांनी एक फोटो आणि एक व्हिडिओच्या लिंक्स दिल्यात. त्या डेस्कटॉप मोडमधे उघडून बघा.

ही Beethoven Moonlight Sonata ची ड्राइव्ह लिंक. डेस्कटॉप मधे उघडून बघा.

चौथा कोनाडा's picture

4 Jul 2020 - 1:47 pm | चौथा कोनाडा

+१

सुमोजी
(इमोजी सारखं हे सुमोजी छान वाटतंय !)

कंजूस's picture

4 Jul 2020 - 7:32 am | कंजूस

हो आहे.

म्हणजे जी शेअर लिंक येते प्रथम ती नवीन ट्याब/ विंडोमध्ये उघडून पुन्हा तीन टिंबे मेन्यू उघडल्यास embed पर्याय दिसतो.
धन्यवाद गामा पैलवान आणि सुमो.

चौथा कोनाडा's picture

5 Jul 2020 - 1:37 pm | चौथा कोनाडा


embed असा पर्याय वापरणं सोपं आहे.

मी हे क्रोममधून खोचलंय :

ही फीत अलिबाग जवळच्या फणसाड पक्षी अभयारण्याला आम्ही मित्रांनी भेट दिली होती तेंव्हाची आहे !

धन्यवाद गामा पैलवान आणि सुमो