चिन्यांचा उपद्व्याप (भाग दोन)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in काथ्याकूट
20 Jun 2020 - 5:36 pm
गाभा: 

राम राम मंडळी. चिन्यांच्या उपद्याप या विषयावर मिपावर दोन हजार तेराला चर्चा सुरु होती. आताही तोच प्रश्न नव्याने समोर आला आहे. आपण अगोदरच कोरोनाने परेशान आहोत. रुग्ण वाढत आहेत बरे होत आहेत. आपण आपल्या जींदगीशी व्यक्तीगत पातळीवर समझोता करुन जरा हळुहळु आपलं मार्गक्रमण सुरु करत होतो की चिन्यांनी सीमेवर कुरापती सुरु केल्या. एलएसीवर चीनने जे कृत्य केलं त्यामुळे देशभर संताप उमटला आहे. अशा परिस्थितीत काल पंतप्रधानांची काल जी सर्वपक्षीय बैठक झाली त्यात चिन्यांनी घुसखोरी केलीच नाही अशी सर्वांना माहिती दिली आहे. (बातमी मटा) परंतु भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यात दोन्ही देशांतील सैनिकांमध्ये संघर्ष झाला होता यात भारताचे २० जवान शहीद झाले त्याच वेळी चिन्यांचेही ४३ पेक्षा अधिक सैन्य ठार झाल्याचे म्हटल्या जाते. खिळे असलेले दंडु़क्यांचे चित्र माध्यमात फिरत आहेत. अतिशय संताप यावा असे हे चिन्यांचे कृत्य आहे. मात्र ग्लोबल टाइम्समधे किंवा चिन्यांकडून अशी काही बातमी येत नाही, असे झाले असेल तर चीन्यांना धडा शिकवणे गरजेचेच आहे. चिन्यांना धडा शिकवलाच पाहिजे. काल सर्वपक्षीय बैठकीत अनेकांनी अनेक प्रश्न विचारले आणि मा. पंतप्रधानांनी ”भारताला मैत्री आणि शांतता हवी आहे. पण देशाच्या सार्वभौमत्वाला आणि अखंडतेला ठेच पोहोचू देणार नाही. कुठल्याही परकीय दबावापुढे भारत झुकणार नाही. देशाच्या सुरक्षेसाठी जे काही आवश्यक असेल त्यासाठी वेगाने पावलं उचलली जातील”’ असे म्हटले आहे. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने किंवा आणि अन्य काही कारणांमुळे असेल सर्वच गोष्टी जाहीर सांगता येत नसतील तरीही चिन्यांचा हा किडा ठेचला पाहिजे ही भारतीयांच्या मनातली इच्छा आहे, असे करतांना अनेक गोष्टी असतील येत्या काळात आपण कदाचित काही कार्यवाही करणारही असू पण चिन्यांचं आता पुरे झालं.

मंडळी, चिन्यांच्या एकूणच कोणत्याही गोष्टींवर आपण विश्वास ठेवणार नाही. चिन्यांच्या कुरापतीला वेगवेगळे कंगोरे असतील. गलवान क्षेत्रातील पुलाच्या कामामुळे चीनी भडकले असतील. गलवान खो-यातील काही वादग्रस्त क्षेत्र असेल ते आपल्या परत मिळालेच पाहिजेत असे एक भारतीय म्हणून वाटते. जगाचं लक्ष कोरोनावरुन हटवून अन्यत्र वळवणे असेल किंवा जे काही असेल त्या विषयांची चर्चा धाग्यात अपेक्षित आहेत. उत्तम संदर्भ, लिंका आणि व्हीडीयो टाळत असलेल्या व्हीडीयो-बातम्यांचा मजकूर टंकून एकूण्च चर्चा अपेक्षित आहे. देशातून चिन्यांचे विविध कामांचे कंत्राट, वस्तूंच्या ऑर्डर्स रद्द होत आहेत एका दृष्टीने आता चिन्यांची कोंडी करण्याचा थोडाफार प्रयत्नही होतांना दिसत आहे.

आत्ताच एक जूनला ग्लोबल टाइम्समधे चीनच्या वतीने म्हटलं गेलं होतं की अमेरिका आणि आमच्या वादापासून भारताने दूर राहावे. चीन अमेरिकावादात भारताने फायदा उठवू नये. आणि दोन राष्ट्राच्या (चीन-अमेरिका) वादात भारत पडल्यास भारताला मोठी किंमत मोजावी लागेल असे म्हटले होते त्याच बरोबर भारतात सध्या चीन विरोधात आवाज उठविण्यात येत आहे, मोदी सरकारने देशात चीन विरोधात उठवला जाणारा आवाज कमी करण्याकडे लक्ष द्यायला हवे असे चीनने म्हटले होते. (बातमी- ग्लोबल टाइम्स आणि सकाळ )आणि म्हणून त्यांनी कालचं कृत्य केलं असावं का ?

''भारताला शांतता हवी आहे. पण याचा अर्थ भारत दुबळा आहे असा होत नाही. चीनचा मूळ स्वभाव हा विश्वासघातचा आहे. भारत बलवान आहे आणि दुबळा नाही. शत्रूचे डोळे काढून हातात देण्याची सरकारमध्ये क्षमता आहे'' असे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले त्यात चुकीचं काही नाही. चिन्यांच्या या कृत्याला आता आपण देश एकत्र होऊन चिन्यांंचा योग्य बंदोबस्त झालाच पाहिजे या मतावर येऊन ठेपलो आहोत.

मंडळी, कोमल यांच्या पहिल्या धाग्यातील प्रतिसाद लांबत गेले, दुसर्‍या पानावार जातांना प्रतिसाद लिहितांना अडचणी येत होत होत्या, सर्वाअर्थाने चीन्यांच्या कुरापती, आपले सीमा प्रश्न आणि त्यांच्या बंदोबस्तावर चर्चा व्हावी यासाठी हा धाग्याचा प्रपंच. आपण योग्य अशी माहितीची देवान-घेवाण व्यक्तीगत पातळीवर न जाता तटस्थपणे चर्चा कराल अशी अपेक्षा.

प्रतिक्रिया

ऋतुराज चित्रे's picture

31 Aug 2020 - 1:18 pm | ऋतुराज चित्रे

पुन्हा कशी असेल ? कोणी येत नाही , कोणी जात नाही . असं मागे म्हटले होते ना ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Aug 2020 - 4:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आता चाइनिज फोन सर्विस सेंटरचे फ्रान्चायजी लायसन संपल्यावर रिन्यु करतील असे वाटत नाही.
विवो,ओप्पो,एमआई दुकानदार माल काढून टाकतील. सगळीकडे 'offer' चे बोर्ड लागले आहेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Sep 2020 - 8:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

करोना को हराना है सारखं, चीनला धडा शिकवणार. भावा कधी...एकतर ते आत आलेच नै म्हणत होते. लावून धरासेठ. chaina

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

5 Sep 2020 - 11:14 am | सुबोध खरे

दोन देशांच्या प्रत्यक्ष ताब्यात असलेल्या सीमा रेषा याच्या मध्ये NO MAN ' S LAND म्हणजे मोकळा सोडलेला परिसर असतो.

त्या भागात चीनचे सैनिक जास्तच पुढे आले होते. त्यामुळे हा वाद सुरु झाला आहे. "भारतीय हददीत" घुसखोरी झालेली नाही

पुणे महापालिकेच्या उंदीर मारायच्या विभागात कामाला असलेल्या लोकांच्या आपल्या "पूर्वग्रह दूषित" टिप्पण्या पाहून हसू आवरले नाही

प्रचेतस's picture

5 Sep 2020 - 11:38 am | प्रचेतस

पुणे महापालिकेच्या उंदीर मारायच्या विभागात कामाला असलेल्या लोकांच्या आपल्या "पूर्वग्रह दूषित" टिप्पण्या पाहून हसू आवरले नाही

आपणाकडून अशा हीन वैयक्तिक पातळीवरील प्रतिसादाची अपेक्षा नव्हती.

सुबोध खरे's picture

5 Sep 2020 - 5:59 pm | सुबोध खरे

कोणत्याही विषयात श्री मोदींविरुद्ध गरळ टाकणे हे चालतंय म्हणा की?

बरं तेही असायला हरकत नाही.

निदान वस्तुस्थिती ला धरून तरी असायला हवं कि नाही?

अशी हीन भाषा मी कधी वापरली ते दाखवा, मिपा सोडून देतो.

शिवाय इतर कुणी अशी गरळ टाकली असेल तरी त्याने तुमच्या हीन भाषेचं समर्थन होत नाही.

सुबोध खरे's picture

5 Sep 2020 - 7:20 pm | सुबोध खरे

पुणे महापालिकेच्या उंदीर मारायच्या विभागात कामाला असलेल्या लोकांच्या हे वाक्य माझा नसून पुलंच आहे

ते तुम्हाला हीन वाटलं हा आपला दृष्टिकोन आहे.

बाकी पूर्वग्रह म्हणाल तर तो कोणत्याही धाग्यात स्पष्टच दिसतोय

आणि धड माहिती नसताना ठोकून देणे याबद्दल पुलं नि केलेली टिप्पणी आठवून मला हसू आलं.

बाकी चालू द्या

तुम्हीच वारंवार उद्धृत करत असलेली एक सुप्रसिद्ध म्हण आठवली.

असो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Sep 2020 - 11:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मराठी संस्थळावर मिसाइल ते ते मुळव्याध एक्सपर्ट वीथ करोना जागतिक एक्सपर्ट, विशेष अर्थ तज्ञ, धुरंदर निरपेक्ष राजकीय विष्लेषक, अर्थशास्त्रीय पंडित, थोर सामाजिक संशोधक, सद्यस्थित सरकारचे अनौपचारिक सल्लागार आणि अजून अशा खूप विशेष बाबी ज्या सुरक्षेविषयक कारणाने कदाचित लिहिता येणार नाही, अशी आपली ओळख आहे. काही मुल्यवान नोंदी राहील्या असतील तर चूक भूल क्षमस्व. लोकांनी चूकीच्या मांडलेल्या मतांकडे आपण दूर्लक्ष करुन आणि आपले हसू आवरुन योग्य ते लिहून ज्ञानात भर घालावी ही नम्र विनंती.

आपण जगाचे गुरु आहात. आपण वेळोवेळी सतत मार्गदर्शन करीत राहीला आहात. आपणास शिक्षक दिनाच्या खुप खुप शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे
(नम्र शिष्य)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Sep 2020 - 6:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चिनी लष्कराने रेंजागला परिसरात घुसखोरीचा प्रयत्न केला. चिनी सैनिकांकडे भाले, लोखंडी सळया, अशी शस्त्रे होती. चीनी सैनिकांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतीय सैन्याच्या सतर्कतेमुळे त्यांची दाळ शिजली नाही. चिनी सैनिकांनी जाता हवेत गोळीबार केल्याच्या बातम्या वाचनात आल्या. चिन्यांची एकदा खोड मोडली पाहिजे.

संदर्भ : बातम्या १) सामना.
२) द हींदू

-दिलीप बिरुटे

नक्की चीन नी काय केले हे अजुन पर्यंत समजले नाही.
सीमेवर चीन नी भारताचे काय नुकसान केले आहे.
सीमेवरचे कोणते राज्य बळकावले आहे.
किती भारतीय सैनिक वर सर्व शास्त्र निषी हल्ला केला आहे.
ह्या मधील काहीच घडल नाही.
मग bjp चे केंद्रातील सरकार आणि त्यांची बटिक मीडिया अशी का बोंब ठोकत आहेत की चीन नी हल्लाच केला आहे.
युध्दात चीन भारताला भारी पडेल हे उघड सत्य आहे.
आकाराने भारता पेक्षा तिप्पट असलेला चीन,शास्त्र अस्त्र मध्ये भारता पेक्षा खूप ताकत वान असलेला चीन भारताचे प्रचंड नुकसान करेल आणि चाढवणारी अमेरिका मदतीला येणार नाही ना रशिया मदतीला येईल.
कारण नसताना युद्धाची खुमखमी कशा साठी.
रशिया नी 50 वर्ष पूर्वी घेतलेल्या बॉम्ब स्फोटचे परीक्षण आता उघड केले .
कोणताच देश त्यांच्या कडे कोणती शस्त्र आणि
अस्त्र आहेत ह्याची जाहीर माहिती देत नाही.
आणि आपली अती मूर्ख मीडिया लहान मुलांसारखे बघा भारत कसा चीन ची खोड मोडेल आमच्या कड
हे क्षेपणास्त्र आहे,ही पाणबुडी आहे,हे विमान आहे,( सर्व दुसऱ्या देशांनी निर्माण केलेली इथे ak 47 pan बनवली जात नाही).
असल्या बालिश धमक्या चीन ल देत आहे.
दुर्दैवने युद्ध झाले तर ?
भारत अंतर्गत समस्येने ग्रस्त आहे,सर्वात जास्त गरीब भारतात राहतात,राज्य राज्यात प्रेमाचे संबंध नाहीत.
युद्ध झाले तर भारताची काय अवस्था होईल.
का विनाकारण युद्ध ओढवून घेत आहात.

रात्रीचे चांदणे's picture

9 Sep 2020 - 10:44 pm | रात्रीचे चांदणे

सीमेवर चीन नी भारताचे काय नुकसान केले आहे.?......…......
आपले 22 जवान काय उगच झाले काय?
सीमेवरचे कोणते राज्य बळकावले आहे…..…
चीन ने status quo बदलला आहे, कदाचित तुम्हाला हे साधं वाटत असेल पण सरकार आणि मिलिटरी ला नाही.

मग bjp चे केंद्रातील सरकार आणि त्यांची बटिक मीडिया अशी का बोंब ठोकत आहेत की चीन नी हल्लाच केला आहे..........
22 जवान शहीद होऊन सुद्धा काहीच वाटत नसेल तर अवघड आहे, ह्या 22 पैकी तुमचा घरातला एक आहे असं समजून विचार करून बघा. फक्त मीडिया च नाही तर आर्मी चे प्रमुख नरवणे सुद्धा लडाख ला दोन वेळा भेट देऊन गेलेत का ते पण bjp साठी काम करत आहेत?

का विनाकारण युद्ध ओढवून घेत आहात........
म्हणजे युद्ध आपण जाणून बुजून ओढवून घेतोय तर.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Sep 2020 - 10:05 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सदरील धाग्यात बरीच प्रश्नांची चर्चा सुरु आहे, तरीही एक प्रयत्न करतो. मी काही या विषयाचा तज्ञ नाही. पण, एक भारतीय म्हणून देशाच्या सीमा अखंड राहाव्यात, त्यात कोणीही घुसखोरी करु नये. चीन नी काय केले हे अजुन पर्यंत समजले नाही.दिनांक १६ जून २०२० रोजी. चीनी सैनिकांनी एलएसीवर भारतीय सैन्याशी झटापट झाली. आपले भारतीय २० सैनिक शहीद झाले. चिन्यांचेही सैनिक मारले गेले. भारतीय सैनिकांवर खिळे असेलेल्या दंडु़क्यांनी ही मारहाण केली असे वृत्त तेव्हापासून ते आतापर्यंत अधून मधून येत असतात. सीमेवर चीन नी भारताचे काय नुकसान केले आहे.भारतीय सीमेवर पूर्वी चीन कधी तरी एखाद्या भागात घुसखोरी करायचा आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषा बदलविण्याचा प्रयत्न करीत असायचा, आता चीनने कोणत्या एका जागी नव्हे तर संपूर्ण सीमारेषेवर चीन तणाव निर्माण करुन छोट्या छोट्या भागात घुसून आपली सिमा बदलण्याचा प्रयत्न करीत असतो. लडाखमधे घुसखोरी केली, लष्करातील निवृत्त जवानही सांगत आहेत की, एक नव्हे तर तीन ठिकाणचा भूभाग चिन्यांनी बळकावला आहे. २०१३  पासून भारताचा ६४० चौरस किलोमीटर भूभाग चीनने बळकावला असल्याचे सरकारनेच नेमलेल्या उच्चस्तरीय समितीच्या अहवालात म्हटले होते, असा आरोप आज पक्षात असलेल्या तेव्हाच्या विरोधी पक्ष भाजप आणि यूपीएचा घटक असलेला समाजवादी पक्ष यांनी केला होता. आजही परिस्थितीत फ़ारसा फ़रक नाही. गलवान, पेंगाँग, या परिसरात चीन आजही ठाण मांडून बसला आहे. सीमेवरचे कोणते राज्य बळकावले आहे चीन अरुणाचल प्रदेशाला दक्षिण तिबेट समजतो आणि तो आमचा भाग आहे असे म्हणतो, अजून तरी त्यांचे सैन्य अरुणाचलप्रदेशात दिसत नाही, योग्य धडा दिला नाही तर चीनच्या कुरापती तिथे सुरुच राहतील. एकेक गाव आपलं म्हणत राहील. चीन अरुणाचलमधील सुंदर शहर तवांगवर आपला हक्क सांगतो त्याची कथा पुन्हा कधी तरी सांगेन. आज तरी चीनने कोणते राज्य बळकावले नाही. मात्र अरुणाचल प्रदेशापासून ते अक्साइ चीनच्या सीमेपर्यंत चीनी सैनिक आक्रमकपणे इंच इंच पुढे सरकतच आहेत. युद्ध झाले तर भारताची काय अवस्था होईल.भारताची काय अवस्था होईल माहिती नाही पण आपण चिन्यांच्या चिंध्या चिंध्या करुन टाकू यात मला काही शंका वाटत नाही. जागतिक घडामोडीत मजबूत देश भारताच्या बाजूने येतील. चीनची वाट लागेल. का विनाकारण युद्ध ओढवून घेत आहात.विस्तारवादी चीन सर्वच दृष्टीने कुरापतीखोर असून जगाला सर्वात अधिक धोका चीनकडून आहे, म्हणून चीन्यांची खुमखुमी एकदा जीरवली पाहिजे,  डिझेल पेट्रोल दोनशे रुपये लिटर झाले तरी चालेल पण या चिन्यांचे नाक एकदा कापले पाहिजे असे मनापासून वाटते.
 
मी या विषयातला एक्सपर्ट नाही. काही चुकभूल होऊ शकते.
 

-दिलीप बिरुटे
(भारतीय)

राघव's picture

10 Sep 2020 - 11:09 am | राघव

पण सध्याच्या घडीला तरी चीन स्वतः युद्ध सुरू करेल असं वाटत नाही. दुसर्‍यांना भरीला पाडून सुरुवात करायला लावायची आणि मग आम्हीच कसे आक्रमणाचे बळी आहोत हे जगाला ओरडून सांगायचे, जमले तर युद्ध करून आणिक काही भाग बळकावून सीमा बदलताहेत काय ते बघायचे.. असा हा प्रकार दिसतोय.
हे सगळे सरकारला समजलेच पाहीजे. कदाचित आणिक बर्‍याच गुप्त गोष्टीही असतील. म्हणून तर भारत सर्व जगाला या न त्या मार्गाने कळवतोय की चीनच कुरापतखोर आहे. उद्या युद्ध झाले तरी चीनच्या मागे कुणी उभे राहणार नाही याची खबरदारी घेण्याचा तो प्रकार आहे.

अमेरिकेतील निवडणूक
जिनपिंगवर स्वपक्षातून वाढणारा विरोध
चीनमधील इतक्यातीलच झालेल्या नैसर्गिक आपत्ती
ज्यांचा व्यवसाय डुबतो आहे अशा कंपन्यांचा जिनपिंगवरील दबाव
पाकिस्तानातून तयार होणार्‍या रस्त्याला होणारा बलुचिस्तानातला विरोध आणि त्या विरोधाला अप्रत्यक्षपणे असलेला ईराण आणि भारताचा पाठिंबा
रशियासोबतचा मोडलेला एक छोटा संरक्षण करार
श्रीलंकेतील बदललेली राजवट आणि त्यांचा भारताशी जवळीक साधण्याचा होणारा प्रयत्न
दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेच्या वाढलेल्या हालचाली
हाँगकाँग मधील वाढता विरोध
तैवानने नुकत्याच केलेल्या क्षेपणास्त्र चाचण्या
व्हिएतनाम सोबत सतत चाललेल्या भारताच्या वाटाघाटी
युरोपीय देशातून भारताला वाढत असलेला पाठिंबा

ह्या सर्व गोष्टी चीनवर एकत्रीत दबाव निर्माण करताहेत असं चित्र दिसतं. डिसेंबर २० पर्यंत घोळ चालूच राहणार असं सध्यातरी वाटतंय.

कोहंसोहं१०'s picture

10 Sep 2020 - 8:49 pm | कोहंसोहं१०

चीन खूप महत्वाकांक्षी आहे परंतु गेल्या काही वर्षात अमेरिकेबरोबरचे व्यापारी युद्ध आणि सध्याच्या करोनामुळे चीनच्या जागतिक व्यापार केंद्र होण्याच्या स्वप्नांना खीळ बसली आहे. व्यापारी युद्धात चीनसाठी भारत एक मोठा अडसर त्यांना वाटतो. त्यातच बऱ्याच परदेशी कंपन्यांनी करोनामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून चीनमधून बस्तान गुंडाळून भारतात आणि अन्य देशात जायला सुरुवात केली आहे ज्यामुळे चीनला बरेच नुकसान होत आहे.

कदाचित यासाठीच सध्या त्यांचे कुरापत काढण्याचे प्रकार सुरु असावेत जेणेकरून युद्धजन्य परिस्थिती निर्माण करून आपला व्यापार दुसऱ्या देशात सहजपणे जाऊ नये.

इथे कोण कोणाचा मित्र नसतो आणि कोण कोणाचा शत्रू नसतो.
प्रतेक देश स्वतःचा फायदा बघत असतात.
हत्यार विकणारे युद्ध कसे होईल असेच राजकारण करणार त्यांना त्यांचे सामान विकायचे आहे.
भारत जर चीन च्या डोळ्यात खुपत असेल तर तो अमेरिकेच्या डोळ्यात पण खुपत असणार.
दोन्ही देश कसे बरबाद होतील असेच राजकारण जगातील महत्वाचे देश करणार.
आमच्या कडे राफेल आहे,अमक आहे तमका देश आमच्या पाठी आहे ह्याला काही अर्थ नाही.
भारताकडे काय शस्त्र आहेत आणि त्याचा उपयोग करण्यास भारतीय सेना सक्षम आहे का याची कुंडली शत्रू राष्ट्र म्हणून चीन नी नक्कीच गोळा केली असेल हिंदी मूर्ख न्यूज चॅनेल नी ती सांगायची गरज नाही
आज भारताचे सर्व शेजारी भारताचे दुध्मान आहेत एका पण शेजारी देशाशी भारत प्रेमाचे संबंध ठेवू शकला नाही ह्याल कारण जागतिक राजकीय डावपेचात भारत कमजोर पडला आणि त्याला मूर्ख बनवून आपल्या तालावर जगाने नाच्वला असा अर्थ पण असू शकतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Sep 2020 - 12:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भारताचे सर्व शेजारी भारताचे दुध्मान आहेत एका पण शेजारी देशाशी भारत प्रेमाचे संबंध ठेवू शकला नाही ह्याल कारण जागतिक राजकीय डावपेचात भारत कमजोर पडला

आपले सेठ काय नुसते सहलीला जात होते की काय मग नुसते ? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी २०१९ च्या शेवटच्या दौर-यापर्यंत, एकूण ९३ दाैऱ्यात वेगवेगळ्या देशांशी एकूण ४८० करार केले, काही उपयोग झालाच नै असे वाटायला लागले आहे.

च्यायला, ते एवढं एवढं नेपाळ आपल्याला नाक वर करुन बोलतंय. तेही शेतीच्या बांधासारखं थोडी थोडी भारतभूमी कोरतय. चड्डीत राहा म्हणा भौ. आपली साली दहशतच नै जगभर.

आपला सर्व वेळ अभ रिया घरसे निकली, कंगनाने यव कहा आणि त्यव कहा. सुशांतसिंहचा तपास भारतीय लोकांच्या जीवनमरणाचा ज्वलंत प्रश्न झालाय. आपला सगळा फ़ोकस हिंदु, मुस्लीम यावर त्यांच्या मतांवर आहे. जाने दो.

बाय द वे, चिनशी आपल्या बाता सुरु असून. चीनी मीडियाने म्हटले -

लडाखच्या पँगॉन्ग त्सोमधून भारताने तात्काळ सैन्य हटवावे, जर युद्ध झाले तर त्यांचे सैन्य जास्त काळ टिकू शकणार नाही. भारत-चीन वाद सोडविण्यासाठी 5 कलमी योजनेवर सहमती दर्शविली गेली आहे. गुरुवारी संध्याकाळी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी मॉस्कोमध्ये चर्चा केली. त्यात म्हटले आहे की सीमावर्ती भागातील सद्य परिस्थिती कुणाच्याही हिताची नाही. दोन्ही देशांच्या जवानांनी बातचित चालू ठेवून तात्काळ डिसएंगेजमेंट (विवादित भागातून सैन्य काढून टाकणे) चालू केले पाहिजे.

(संदर्भ :बातमी तपशीलवार आहे, नक्की वाचा.

चालू द्या चर्चेच्या फ़े-या....!

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

11 Sep 2020 - 10:29 am | सुबोध खरे

आज भारताचे सर्व शेजारी भारताचे दुध्मान आहेत एका पण शेजारी देशाशी भारत प्रेमाचे संबंध ठेवू शकला नाही

बेफाट वक्तव्य

भूतान म्यानमार श्रीलंका यांच्याशी आपले संबंध अत्यंत सौहार्द्रपूर्ण आहेत. पाकिस्तान आणि चीनबद्दल संबंदहनबद्दल बोलायची गरज नाही.

राहिली गोष्ट नेपाळची सध्या तेथे कम्युनिस्टांचे सरकार( लाल छत्री वाले) आहे त्यामुळे ते बीजिंग मध्ये पाऊस पडला तर काठमांडू मध्ये छत्री उघडतात.
पण त्यांना पण चीनने इंगा दाखवला असल्याने त्यांची स्थिती केविलवाणी झाली आहे.

After snubbing India on border clash, Nepal faces reality-check as Beijing encroaches its territory to construct roads in Tibet

https://www.firstpost.com/india/after-snubbing-india-on-border-clash-nep...

शाम भागवत's picture

16 Sep 2020 - 1:09 pm | शाम भागवत

👍

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Sep 2020 - 10:47 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चीन्यांनी सीमेनजिक बांधकाम केले आहे, तसेच चीनी सैनिक एलएसीच्या जवळ असेल्याचे निरीक्षण भारताने नोंदवले असून आपण त्यांच्या बांधकामाची गंभीर दखल घेतली आहे. काल परवा याच धाग्यात म्हटलं होतं की चिन्यांचा फोकस आता अरुणाचलमधील काही भागांवर आहे, असफिला, तुतिंग, चांग त्सेच फिशटेल०२ सेक्टरमधे (माहिती संदर्भ दैनिके) चीनच्या सैनिकांनी जमवाजमव सुरु केली आहे. प्रत्यक्ष एलएसीपासून वीस किमि अंतरावर चिन्यांनी बांधकाम सुरु केले आहे. चीनने कोणतीही आगळीक केली तर भारत त्याला चोख उत्तर देईल असे म्हटले आहे, लडाखजवळील स्पांगूर मधेही अशीच स्थिती निर्माण झालेली आहे, तिथे चीनने रणगाडे, तोफा, व सैनिकांची तैनाती केली आहे.

सारांश काय, चीन्यांची सीमेजवळ मस्ती सुरु आहे, योग्य बंदोबस्त करण्यासाठी भारतीय सैनिकांना, सरकारला शुभेच्छा आहेतच.

-दिलीप बिरुटे

प्रसाद_१९८२'s picture

16 Sep 2020 - 12:11 pm | प्रसाद_१९८२

सारांश काय, चीन्यांची सीमेजवळ मस्ती सुरु आहे

--

मस्ती फार काळ सुरु राहिल असे वाटत नाही, लडाख भागात -३० अंश तापमानात राहायची सवय चीन्याना नाही (तिबेटी जनतेला ती आहे, मात्र पिएलए मधे तिबटी जनतेची भरती चीन करत नाही) तर भारतीय सैन्याला आहे. कडाक्याच्या थंडीत चीनी सैन्य मागे हटण्याची शक्यता जास्त आहे.

शाम भागवत's picture

16 Sep 2020 - 1:07 pm | शाम भागवत
शाम भागवत's picture

16 Sep 2020 - 1:08 pm | शाम भागवत

👍

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Sep 2020 - 1:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपण अपेक्षा करु या की चीनी सैनिक मागे हटतील परंतु त्यांना सीमारेषाच मान्य नाही, त्यामुळे त्यांच्या कुरापती भविष्यातही सुरुच राहतील. काल संरक्षणमंत्री म्हणाले की '' लडाखमधील अंदाजे ३८००० चौरस किलोमीटर भूभागावर चीनचा बेकायदा ताबा कायम आहे. तसेच चीन-पाकिस्तान यांच्यातील १९६३ च्या कथित सीमा करारानुसार पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमधी ५१८० चौरस किलोमिटर जमीण चीनला दिली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले''

प्रश्न असे वरवर येत राहतील आणि चिन्यांची खुमखुमी सुरुच राहील. राजनाथ सिंह म्हणाले की '' चीन सीमावाद शांततेच्या मार्गाने सोडवला पाहिजे, असे भारताचे मत आहे. मात्र देशाच्या सार्वभौमत्वाला आणि भौगोलिक एकतेला बाधा आणण्याचा कोणताही प्रयत्न आक्रमकपणे मोडून काढला जाईल'' राजनाथ सिंह. ( संदर्भ लोकसत्ता बातमी)

देश सैन्यदलाच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभा असऊन यापुढेही राहील. पण मोदीजी तुम्ही चीनविरोधात कधी उभे राहात ? आपली जमीन चीनकडून परत कधी मिळवणार ? - राहुल गांधी ( संदर्भ लोकसत्ता)

चीन जगातल्या विविध प्रश्नांकडून लक्ष तिसर्‍याकडेच वेधू इच्छित असेल म्हणून अशा कुरापती करीत असेल तर, एकदा आर-पार तोडगा निघाला पाहिजे. एकीकडे आपली चर्चा सुरु असतांना दुसरीकडे त्यांची घुसखोरी सुरुच असते, याचाच अर्थ चीनवर कोणताच भरवसा ठेवता येत नाही. सर्व परिस्थिती पाहता चीन काहीतरी आगळीक करेल असे वाटत आहे.

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

17 Sep 2020 - 10:13 am | सुबोध खरे

चीन भारतीय सीमेपासून दूर हटेल यावर लष्करी तज्ञ आणि सरकार यांचा कुणाचाच विश्वास नाही.

याचे कारण

१) चीन मध्ये करोना मुळे एक कोटीच्या आसपास लोक मृत्युमुखी पडले आहेत अशी वदंता आहे.( सत्य कधीच बाहेर येणार नाही). शिवाय चीनमध्ये असंख्य कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत आणि अनेक परदेशी कंपन्या तेथून गाशा गुंडाळत आहेत यामुळे लक्षावधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत यामुळे तेथील जनमत शी जिनपिंग विरुद्ध कलुषित झाले आहे. हे जनमत दुसरीकडे वळवण्यासाठी काही तरी करणे आवश्यक आहे.

२) भारताने ३७० कलम रद्द करून काश्मीरला भारताचा अविभाज्य भाग करून टाकले आहे आणि पुढचे लक्ष्य पाकव्याप्त काश्मीर आहे असे जाहीर केले आहे तेंव्हा पासून चीन बिथरला आहे कारण पाकव्याप्त काश्मीर वर ताबा मिळवून तेथून जाणारा काराकोरम महामार्ग जर भारताने बंद केला तर शी जिनपिंग यांचे स्वप्न असलेलाअब्जावधी डॉलर्स खर्च करून चालू केलेला आणि आजतागायत मोठ्या तोट्यात असलेला चीन पाकिस्तान आर्थिक मार्ग ( CPEC ) पूर्ण बंद पडेल आणि त्यात गुंतवलेले सर्व भांडवल पूर्ण वाया जाईल. हे चीनला अजिबात परवडणारे नाही.

३) २०१३ पासून शी जिनपिंग यांनी इतिहासातील चीनची समृद्धी आणि भव्य साम्राज्याचे पुनरुज्जीवन करून राष्टाला संपन्न करण्याचे आणि सुवर्णयुग आणण्याचे स्वप्न लोकांना दाखवले. त्या स्वप्नापायी चीन एकदा भरकटला आहे कि राष्ट्र म्हणून सकल राष्ट्रीय उत्पन्न /चीनची संपत्ती बरीच वाढली आहे परंतु हि संपत्ती तेथील उद्योगपती( जे कम्युनिस्ट पक्षात वरच्या पदांवर आहेत) आणि सरकार यांचीच वाढली आहे. तेथे मध्यमवर्गात संपत्ती वाढली आहे हे खरे परंतु सामान्य माणसाच्या जीवनात फारसा फरक पडलेला नाही.

मुळात चीन मधील दोन पिढ्याना स्वातंत्र्य म्हणजे काय ते माहितीच नाही. कारण सरकारविरुद्ध बोलणे हे पूर्वीच्या सुलतानाविरुद्ध बोलण्यासारखे आहे. सरकारची मर्जी खप्पा झाली कि माणसाला मंगोलिया सारख्या दूरच्या प्रदेशात पांडाच्या उवांवर संशोधन करायला पाठवतात आणि त्याच्या गावी असलेल्या कुटुंबाची वाताहत करून ठेवतात. तेथे आंतरजालावर कोणतीही विदेशी ऍप चालत नाहीत . गुगल ट्विटर इंस्टाग्राम यु ट्यूब व्हाट्सएप्प जीमेल कोरा(QUORA) गुगल मॅप्स सारखे कोणतेही ऍप्प तेथे चालत नाही. त्यामुळे बालहरच्या जगात काय चालले आहे हे चिनी माणसांना समजतच नाही.

अशा जनतेला कायम समृद्ध चीनचे स्वप्न दाखले जाते आणि हे स्वप्नच भंग पावताना दिसले तर शी जिनपिंग याना पायउतार व्हावे लागेल.

या तिन्ही कारणांसाठी चीन भारताच्या सीमेवरून कुठूनही माघार घेईल हे कोणत्याही धोरणकर्त्याला (लष्करी / राजकीय) अजिबात वाटत नाही.

२०१४ पूर्वी भारताने कधीही इतकी कडक भूमिका घेतलेली नव्हती. आज भारताने राजनैतिक पातळीवर चीन विरुद्ध अनेक राष्टांबरोबर सामंजस्य केल्यामुळे चीन एकटा पडला आहे. चीनच्या पाकिस्तान वगळता त्याच्या सगळ्याच्या सगळ्या शेजाऱ्यांबरोबर सीमावाद आहे. त्यामुळे एकही शेजारी त्याच्या मदतीस येणार नाही.

आज चीनला भारतावर हल्ला करणे फार कठीण होऊन बसले आहे.

कारण हल्ला केला तर मिळणारी जमीन आणि त्यासाठी द्यावी लागणारी किंमत हे प्रमाण फार व्यस्त असेल.

भारताने मलाक्काच्या आखातातून होणारा चीनचा व्यापारच बंद केला तर त्यासाठी चीनला मिळणाऱ्या लष्करी विजयापेक्षा व्यापारी नुकसानीमुळे फार प्रचंड किंमत चुकवावी लागेल.

यामुळे भुंकणारी कुत्र्याप्रमाणे ते भुंकत राहणार पण चावण्याची हिम्मत सहसा करणार नाही

प्रसाद_१९८२'s picture

17 Sep 2020 - 10:27 am | प्रसाद_१९८२

छान विश्लेषण !
--

चीनने आगळीक केली तर लढाईसाठी भारताने देखील जय्यत तयारी LAC वर केली आहे.
असे सर्व माध्यमातून सध्या दाखवत आहेत.

राघव's picture

17 Sep 2020 - 2:07 pm | राघव

विश्लेषण आवडले. 👍

याच अनुषंगाने आणिक काही महत्त्वाच्या घडामोडी छीनच्या चीनच्या थयथयाटाला हातभार लावताहेत -
१. जपान-ऑस्ट्रेलिया-भारत यांच्यातील त्रिपक्षीय Supply Chain Resilience Initiative (SCRI) करारासाठीची बोलणी चालू आहेत. त्यांच्या मुख्य हेतूच चीनला काऊंटर करण्यासाठी आहे. लिंक

२. जुलै मधे भारतानं मलबार युद्धसरावात जपान सोबत ऑस्ट्रेलियाला देखील सामील करून घेतलेलं होतं. वरील करारासंदर्भातील बोलणी आणि ह्या युद्धसरावाची वेळ साधारण जवळपासच होती. लिंक

३. मोदींनी ऑगस्ट मधे सबमरीन ऑप्टिकल फायबर केबल (OFC) कनेक्टिव्हिटी योजनेचं लोकार्पण केलं. लांबी २३००किमी. लिंक
हे काम फक्त चांगली कनेक्टीविटी मिळण्यासाठी महत्त्वाचं नाही. त्यात आणिक २ गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर आपण हे आपल्या बळावर साध्य केलंय आणि दुसरं याचं व्यापारी महत्त्व. मजेची बाब म्हणजे या क्षेत्रात चीनची मोठी बाजारपेठ आहे, ज्यात भारताला आता शिरकाव करण्यास वाव निर्माण झालाय.

बाकी व्हिएतनाम सोबत चाललेल्या वाटाघाटी, नेपाळ-भूतान-श्रीलंका-मालदीव यांच्या समवेत चाललेली विविध स्तरांवरची बोलणी, मागच्या सहा वर्षात दक्षिण-पूर्व राष्ट्रांसमवेतचे केलेले विविध सहकार्य करार वगैरे फोडण्या आहेतच.

चीनची ताकद आहे त्यांची हुकुमशाही, लोकसंख्या, उत्पादन, व्यापार, तंत्रज्ञान आणि पैसा. यातून जन्माला आलेली राक्षसी महत्त्वाकांक्षा हा भस्मासूर म्हणावा की नाही हे काळच ठरवेल. पण सद्यस्थितीत भारत एका चांगल्या संधीची वाट बघतोय असं वाटतंय. ती जर चीननं स्वतः उपलब्ध करून दिली तर बर्‍याच गोष्टी होऊ शकतील!

चीन भारतावर का हल्ला करणार नाही ह्याची कारणे डॉक्टर च्या पोस्ट मध्ये आहेतच आणि का चीन भारताला त्रास देतोय ह्याची पण कारण
आहेत.
आता प्रश्न हा आहे जर चीन नी आपली 38000 वर्ग किलोमीटर जमीन ताब्यात घेतली असेल तर ती आपण परत घेण्यासाठी भारताने आक्रमक होवून चीन वर हल्ला करावा का ?
चीन नी L O C chya आत मध्ये येवून आपली जमीन ताब्यात घेतली आहे की
L A C चीन ला मान्य नसल्याने LAC च्या आतमध्ये येवून भारतीय भू भागावर अवैध कब्जा मिळवला आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Oct 2020 - 7:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

''पूर्व लडाख सीमेवर भारतीय आणि चिनी सैन्य आमने-सामने आहे. दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणावाची स्थिती आहे. या स्थितीच्या पार्श्वभूमीवर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांना युद्धासाठी सज्ज रहाण्याचे आदेश दिले आहेत. बातमी''

एकदाचा तुमचा काटा काढून जगाला आम्ही पण एक सन्देश देऊ की हम किसीसे कम नहीं.

-दिलीप बिरुटे

शाम भागवत's picture

14 Oct 2020 - 8:53 pm | शाम भागवत

अगदी. अगदी.
मग मात्र जगाला फारच कठीण जाईल.

यास्तव असं होऊ नये म्हणून सगळे मोठे भारताच्या मागे सर्व शक्तिनिशी उभे राहात आहेत अशी माझी समजूत आहे. यामधे भारताबाबतचे प्रेम कमी व भविष्यकाळातला त्यांना जाणवलेला धोका कारणीभूत आहे. इंडिया टुडे व लोकसत्ताला जे कळतं ते पेटॅगाॅन वगैरेंना कळत नसेल असं मानायला माझं मन धजत नाही.

चिन हा भारताचा कायमचा शत्रू राहाणार आहे. ही लढाई भारताला आज ना उद्या लढावीच लागणार आहे. मग जास्तीत जास्त अनुकूलता असता ती लढणे हेच शहाणपणाचे ठरेल असे वाटते.

“पण नको बाॅ चीनशी पंगा“ असं म्हणून प्रश्न तर सुटणार नाहीच, उलट आपल्या बाजूने उभे राहणाऱ्यांची संख्या मात्र कमी कमी होत जाईल. पण आपण ठाम पणे उभे राहिलो तर मात्र आपल्या मित्रांची संख्या वाढत जाईल.

रशिया, जर्मनी, श्रीलंका बदलत आहेत. चीनच्या मागोमाग जाऊन आपले नुकसान तर होत नाहीये ना? अशी शंका पाकिस्तानी जनतेला येत्या काळात येऊ लागली तरी मला आश्चर्य वाटणार नाही.

सुबोध खरे's picture

15 Oct 2020 - 9:26 am | सुबोध खरे

एकदाचा तुमचा काटा काढून

म्हणजे नक्की काय हो ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Nov 2020 - 12:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चीनने गुपचूपपणे प्रत्यक्षा ताबारेषेजवळ हिमाचल प्रदेशातील कौरिक खिंड ते अरुणाचल प्रदेशातील फीश टेलपर्यंत चीनने पायाभूत सुविधा निर्माण केल्याने भारतीय लषकर चिंतीत असल्याच्या बातम्या वाचनात आल्या आहेत. सैन्यासाठी घरे बांधणे, ड्रोनची संख्या वाढवली आहेत, ठीकठीकाणी रस्ते आणि तत्सम गोष्टी सुरु आहेत.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jan 2021 - 10:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरुणाचल प्रदेशाजवळ चीनने एक नवं गाव वसवले आहे. (बातमी ) भारताच्या इंच इंच जागा बळकावण्यासाठी चीननं चांगलीच कंबर कसलीय. चीनने भारतातल्या अरुणाचल प्रदेशमध्ये एक गाव वसवलंय आणि मिडीयात त्याबद्दलचं एक चित्रही पूर्वीची परिस्थिती आणि आताचे छायाचित्र असे, एका अहवालानुसार, चीननं भारताच्या अरुणाचल प्रदेशमधील एका भागात सुमारे 101 घरे बांधली आहेत.बद्दल सरकारला कल्पना नसावी किंवा सध्या इतर कामात सरकार व्यस्त असावेत.

मा.गप्पूसेठ या प्रकरणात कधी लक्ष घालणार ?

सुबोध खरे's picture

20 Jan 2021 - 12:00 pm | सुबोध खरे

बिरुटे सर

गप्पूसेठ

केवळ मोदीद्वेषातुन तुम्ही स्वतःला हास्यास्पद ठरवत आहात

एक तर त्यांना गप्पूशेठ म्हणण्यासाठी आपण असं काय महान काम केलंय?.

पाच वर्षात एकदा एक मत दिलं कि कुणालाही काहीही म्हणण्याचा आपल्याला अधिकार प्राप्त होतो हे एखाद्या रस्त्यावरच्या पक्याला शोभून दिसेल पी एच डी झालेल्या मराठीच्या प्राध्यापकाला नाही.

चीन भारत संबंधाबाबत कुठेही काहीही झालं कि त्याच्याबद्दलची बातमी येथे टाकून तुम्ही निदान ६० कोटी लोकांनी निर्विवाद बहुमत देऊन निवडून आणलेल्या भारताच्या पंतप्रधानांबद्दल येतेच गरळ ओकून लिहिणे आपल्याला शोभत नाही.

बाकी वरील बातमी बद्दल-- आपल्या संभाजीनगरात १०० झोपड्या अर्ध्या रात्रीत उभ्या राहतात हे आपल्यालाही ठाऊक असणारच.

मग सरकारचे पाठबळ असताना १०० घरे बांधली जातील यात मोठे असे काही हि नाही.

याचा साधा उगम असा आहे. भारताने चीनची प्रचंड गुंतवणूक असलेल्या चीन पाकिस्तान आर्थिक मार्ग (CPEC) ला विरोध दर्शवला आहे आणि त्त्यासाठी जमेल त्या मार्गानी भारत प्रयत्न करत आहे. यात गाल्वन खोऱ्यात आणि दौलत बेग ओल्डी ( बवेल मिळाला तर याबद्दल वाचून पहा) येथे आपली फळी मजबूत केली आहे. याभागापासून सरकारचे लक्ष हटवण्यासाठी सिक्कीम अरुणाचलप्रदेश अशा ठिकाणी काही तरी कुरापत काढणे चालू ठेवणारच.

https://maharashtratimes.com/international/international-news/baloch-reb...

दुर्दैवाने श्री राहुल गांधी यांच्यासारखा अपरिपकव विरोधी नेता ( हि व्यक्ती चीनशी संधान बांधून आहे अशी शंका यावी इतपत काम करते आहे) कायम काही तरी कारण काढून सरकारच्या कामात खोडा घालण्याचे काम करीत आहे.

आणि आपल्यासारखे लोक अपरिपक्वतेचे प्रदर्शन मांडून बसले आहेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jan 2021 - 12:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या नेहमीप्रमाणे व्यक्तीगत रोखाच्या लेखनाकडे दुर्लक्ष करुन, मला असे म्हणायचे आहे की 'जखम गुढघ्याला आणि मलम शेंडीला' त्याचा काही उपयोग नाही असे वाटते. CPEC ला आपण विरोध करतोय हे ठीक असले तरी चीन इतर ठीकाणी आपलं मजबूत असे अतिक्रमण करुन आपल्या भारतीय हद्दीत घुसघोरी करीत आहे, त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, जिथे जिथे अशी घुसखोरी होत आहे तिथे तिथे 'कडा जवाब' देणे गरजेचे आहे. सैनिकांचं मनोबल उंचावणे आवश्यक आहे, नुसत्या बोलक्या तोफा उपयोगाच्या नाहीत तर कधी कधी धाडसही केले पाहिजे असे एक भारतीय म्हणून वाटते.

बाकी, आपल्या 'चीन भारत संबंधाबाबत कुठेही काहीही झालं कि त्याच्याबद्दलची बातमी' इथे टाकतो त्याला कारण असे की भारत देशावर एक नागरिक म्हणून माझे खूप प्रेम आहे, माझ्या देशावर कोणी असे लपून छ्पून आक्रमण करुन जागा बळकावत असेल तर मला त्याचा त्रास होतो, आपणास त्याचे काही वाटत नसेल तर दुर्लक्ष करु शकता असे वाटते. पण, मत मांडले पाहिजे असे वाटते. आपणास ते पटलेच पाहिजे असा माझा काही आग्रह नाही.

बाकी, अपरिपक्व नेता कोण आहे, हे सर्व भारतीय आता हळुहळु ओळखू लागले आहेत. आभार.

-दिलीप बिरुटे

रात्रीचे चांदणे's picture

20 Jan 2021 - 3:21 pm | रात्रीचे चांदणे

ह्या बातमीत सत्यता असेल तर हा धक्कादायक प्रकार आहे. पण ह्यात एक खुलासा होणं अपेक्षित आहे. हा भाग पूर्वी पासूनच चीन च्या ताब्यात होता का अत्ता चीन ने अतिक्रमण करून गाव बसवले आहे. भारतीय सैनिक high alert वर असताना अतिक्रमण शक्य वाटत नाही. कदाचित हा भाग पूर्वी पासूनच चीन कडे असावा. आणि त्या भागावरती आपला दावा असावा. जसा अकसाई चीन वरती आपला दावा आहे पण सध्या तो चीन कडे आहे.