बिन स्प्राऊट कोंबडी

Primary tabs

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in पाककृती
7 Jun 2020 - 3:55 pm

साहित्य:
- बिन स्प्राऊट
- कोंबडी ( लांबट काप करावे )
- कोरडी तांबडी मिरची
- ताजी मोठी तांबडी मिरची ( शक्यतो तिखट नसावी ...)
- पातीचा कांदा
- लसूण काप
- लांबट कापलेला कांदा
- काजू
- शेंगदाण्याचे तेल
- सोया सॉस

कोंबडी लसूण आणि थोडे सोया सॉस मध्ये भिजवूं १-२ तास ठेवावे

प्रथम मोठ्या वॊक मध्ये मध्यम आचेवर तेल तापवून त्यात कोरड्या मिरची चे तुकडे तळून घावेत व बाजूला काढून ठेवावे ( तेलास मिर्चांचा स्वाद लागेल )
नंतर या तेलात काजू तळून घायवेत व बाजूला काढून ठेवावे, जे थोडे तेल उरले आहे ते हि बाजूला काढावे
- आच चांगली मोठी करावी आणि वॊक चांगलाच तापवू द्यावा ..
एका पाठोपाठ एक तेल, कांदा , लसूण , ताजी मिरची आणि पातीचा कांदा भरभर परतवून घ्यावा .. व
थोड्या वेळाने यात बिन स्प्राऊट घालून आच मोठीच ठेवत सगळे चांगले परतावे ... आणि काढून घ्यावे ..
तेल थोडे वाढवून त्यात आधी तळलेली कोरड्या मिरच्या परत घालून लगेच कोंबडीचे तुकडे घालावे व भराभर परतावे झाकण ठेवून नये , तुकडे / काप बारीक आणि लांबट असल्यामुळे पटकन शिजतील ..
सर्व गोष्टीत एकावर एक घालून अर्ध एकत्र कराव्यात ( दाखवल्याप्रमाणे )

- वाढणे :
फडफडीत भाताबरोबर ( पाहिजे तर थोड्या नारळाच्या दुधात शिजवलेला ) याबरोबर हे वाढावे वरती उरलेली ना परतलेल्या बिन स्प्राऊट भुरभुरव्या
IMG_7700[1]

IMG_7711[1]

IMG_7704[1]

IMG_7707[1]

IMG_7708[1]

IMG_7709[1]

प्रतिक्रिया

सौंदाळा's picture

7 Jun 2020 - 7:26 pm | सौंदाळा

एक नंबर

विंजिनेर's picture

9 Jun 2020 - 1:23 am | विंजिनेर

घरगुती कढईतला स्टर फ्रायला चायनीज रेस्टॉरंटतल्या स्टरफ्रायची सर येणार नाही.
स्वयंपाकघरातील गॅस शेगड्या ४०० ते १८,००० बीटीयू देतात. त्यामुळे उत्तम दर्जाच्या स्टरफ्राय ला वापरावी - अर्थात, जपून आणि स्वयंपाकाचा भक्कम अनुभव आणि जागा/साधनं असतील तरच! नाहीतर उत्साहाच्या भरात कोळश्यावर स्टर फ्राय करायला जाल आणि तो खायला फक्त अग्निशमन दलाचे जवान आणि तुमचे डॉक्टर उपस्थित असणार असं होईल... त्यापेक्षा आपलं उबर ईटस् नाहीतर स्विग्गी वगैरे बरं

विंजिनेर's picture

9 Jun 2020 - 1:24 am | विंजिनेर

काहीतरी गडबड झाली वाटतं.
हा दुवा वरच्या प्रतिसादात आलाच नाहीये वाटतं
https://www.seriouseats.com/2012/06/the-food-lab-for-the-best-stir-fry-f...

चौकस२१२'s picture

9 Jun 2020 - 3:17 am | चौकस२१२

चान्गली माहिती दिलीत , जमेलतास करतो चांगला पातळ वोक वापरतो , बाकी रेस्टारंट एवढे जमणे कठीण आहेच

वीणा३'s picture

9 Jun 2020 - 2:24 am | वीणा३

मस्तच पाकृ !!!

निनाद's picture

9 Jun 2020 - 4:29 am | निनाद

जोरदार आहे!

अर्धवटराव's picture

8 Jul 2020 - 6:57 am | अर्धवटराव

कसलं भारी दिसतय.