नेट वरच्या मालिका

रणजित चितळे's picture
रणजित चितळे in काथ्याकूट
27 May 2020 - 1:01 pm
गाभा: 

पाताळलोक, मिर्झापूर सेक्रेड गेम्स आपल्या येथील नेटवर चालणाऱ्या मालिका कलेच्या दृष्टिकोनातून खूपच वाईट आहेत. निर्मात्यांना कलाकृतीच्या नावाखाली विकृती दाखवण्यात जास्त रुची दिसते.
त्याचे पडसाद आपण अनुभवत आहोतच. समाजात क्रूरता, आततायीपणा व विकृतीची झलक सभोवार दिसते. आपल्या शत्रूचे कौतुक करताना दुःख होते पण काही पाकिस्तानी मालिका (हमसफर, सदके तुम्हारे, जिंदगी गुलजार है इत्यादी) इतक्या चांगल्या तऱ्हेने रेखाटल्या आहेत हे पाहून आपल्या 'सास बहू' व बाकीच्या मालिकांच्या निर्मात्यांनी व दिग्दर्शकांनी त्यांच्या कला कौशल्याचा पूनर्अभ्यास करून स्वतःला बदलणे जरूरी आहे. थोडा 'हमसफर' किंवा 'जिंदगी गुलजार है' अशा मालिकांचा अभ्यास केला तर दर्जेदार मालिका तयार करता येते हे आपल्या इकडील दिग्दर्शकांच्या लक्षात येईल.
भारतात दर्जेदार चित्रपट व मालिका पूर्वी बनत होत्या व तशाच दर्जेदार मालिका तयार करण्याची भरपूर क्षमता आजही आहे. पण भरकटलेल्या निर्मात्यांनी विकृत मालिका तयार करून कलेचा गळा घोटला आहे. एवढेच नाही तर त्यामुळे बघणाऱ्यांचा दर्जेचा स्तर पण खालावला आहे. हल्लीच्या बहुतांश प्रेक्षकांना विकृत बघणे हे सामान्य वाटायला लागले आहे. विकृत हे सामान्य वाटायला लागणे हे समाजाच्या मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने घातक आहे. वरचेवर विकृती बघून मेंदू सरावतो व माणूस कधी विकृतीच्या अधीन जातो ते त्याचे त्यालाच कळत नाही. नेट वर सेंसॉर (नियंत्रण) लागू होऊ शकणार नसेल तर आपल्या येथे चित्रपटांसाठी सेंसॉरचा (नियंत्रणाचा) काय उपयोग. नियंत्रण लागू होऊ शकत नाही म्हणून चालू द्यावे ह्याला काय अर्थ आहे. माहिती प्रसारण मंत्री काही करू शकतात का. करतील का.

http://rashtravrat.blogspot.com/2020/05/a-song-which-transcends-boundari...

http://rashtravrat.blogspot.com/2019/11/relative-civility.html

प्रतिक्रिया

Prajakta२१'s picture

27 May 2020 - 7:49 pm | Prajakta२१

नेमके लिहिलेय
धन्यवाद
जिंदगी गुलझार है आवडती मालिका आहे शेवटचा scene तर ATF (पूर्वीच्या DD वरच्या चांगल्या मालिकांची आठवण होते)
अवांतर-सध्या मधून मधून बुनियाद बघत होते पिरियड drama असल्याने थोडे बोअर होते पण ओव्हरऑल चांगलीये

मराठी कथालेखक's picture

27 May 2020 - 8:29 pm | मराठी कथालेखक

मी पण झी जिंदगीवर पुर्वी काही पाकिस्तानी मालिका. त्या मालिका वेगवान, कमी भागांत संपणार्‍या होत्या आणि सहसा विकृत चित्रीकरण नसायचं. खासकरुन आपल्याकडच्या मालिकांतील खलनायिका वा तत्सम नकारात्मक भुमिका वठवणारी स्त्रीपात्र, तिचे अंगविक्षेप, भडक मेकअप (खासकरुन चित्रविचित्र टिकली) हे सगळं अगदी डोक्यात जायचं. तसं पाकिस्तानी मालिकांत सहसा आढळलं नाही. मला हमसफर फार आवडली. भुमिकेतली स्त्रीपात्रं त्यात पण आहेत पण नकारात्मक आहेत म्हणून त्यांना सवंग दाखवलं नाही. बाकी इतर पाकिस्तानी मालिका फारशा आठवत नाहीत , एका मालिकेत एका वयस्कर स्त्रीला मूल होतं (त्या जोडप्याला एक तरुण मुलगा व मुलगी असतात) ती बरीच रंजक होती, संवाद चटपटीत होते. पण नंतर बर्‍याच मालिकांत काही गोष्टी समान वाटू लागल्यात आणि मग कंटाळा येवू लागला जसे घरगुती भांडणे, घटस्फोट (तलाक) ई. पण तरी आपल्याकडच्या डेली सोप पेक्षा बर्‍या होत्याच.
आता वेबसिरीज भडक दाखवत आहेत हे खरे, सेन्सॉरचे नियंत्रण नसल्याने काहीही दाखवता येत आहे. तुम्ही वर दिलेल्या यादीत आणखी एक भरः मिर्झापूर.
पण मला वाटतंय काही दिवसांनी प्रेक्षकांना इतक्या भडक मालिका नकोशा वाटतील.

शशिकांत ओक's picture

27 May 2020 - 10:25 pm | शशिकांत ओक

या तत्त्वावर भडक रंगरंगोटी व उत्तान पोषाख आणि दुष्टपणा करण्याच्या नवनवीन कल्पना पहायला ज्यांना आवडते ते पहात असावेत...
प्राणी जगतातील चॅनेलवरील त्यांच्या जीवनातील रंजक माहिती पहायला बरे वाटते.

निनाद's picture

28 May 2020 - 10:40 am | निनाद

नेटफ्लिक्स असेल तर ते साधरणपणे भंपक कथानक घेऊन त्याला उत्तान फोडण्या टाकते असे दिसून येते.
मुळ कथाबीज भंगार असते असेच वाटले.

प्रसून जोशींनापण लिहिन म्हणतो. थोडतरी काही तरी कल्पनेसाठी सोडायला पाहिजे. अगदीच काहीतरी आहेत मालिका

थोडतरी काही तरी कल्पनेसाठी सोडायला पाहिजे. >>>>

हे वाक्य म्हणजे epic आहे.

मराठी कथालेखक's picture

28 May 2020 - 8:02 pm | मराठी कथालेखक

थ्रिलर, गुन्हेगारी बघून कंटाळा आलाय. आता बारिश नावाची एक रोमँन्टिक सिरीज बघणार आहे. यात शर्मन जोशी सोबत आशा नेगी ही सुंदर अभिनेत्री आहे. अजून बघायला सुरवात केली नाहीये. एका सीजन मध्ये ३० मिनटांचे २० भाग आहेत.

मराठी कथालेखक's picture

1 Jun 2020 - 8:35 pm | मराठी कथालेखक

मालिका ठीक आहे. निदान भडकपणा नाही ही चांगली बाब.
एकता कपूरने "बडे अच्छे लगते है" मालिकेची थीम पुन्हा एकदा वापरली आहे.

टवाळ कार्टा's picture

28 May 2020 - 8:02 pm | टवाळ कार्टा

चुकूनपण GoT बघायला जाऊ नका, अगदी ट्रेलरपण नका बघू =))

स्टोरी वा प्लॉट बारा असला तरी मालिका बघवत नाहीत कारण अनेकदा अनावश्यक उत्तान दृश्ये आणि असांसदीय भाषेचा मुक्तपणे वापर केलेला आढळून येतो. खलनायक किंवा पोलीस ही भूमिका असेल तर वाक्यावाक्याला आई-माईचा उद्धार हा केलाच पाहिजे असे तत्व असावे. नायक नायिकांमधील हळुवार व भावनिक प्रेमाचे उत्कट क्षण वगैरे आजकाल झेपतच नसावेत. प्रेम म्हणजे फक्त शारीरिक हे समीकरण झाले आहे. काही सन्माननीय अपवाद असतीलही.. पण मोजकेच.

समाजमनाचे आधारस्थंभ हे प्रसार माध्यमं आहेत , पण ते आरसा असतात असं बाष्कळ विधान करून काहीच्या काही मनावर बिंबवलं जातंय ,
गुलशन कुमार मारले गेले अन चित्रपट प्रसार माध्यमं चक्क हातातून गेली , असो
पाताळलोक ची निर्माती ही अनुष्का शर्मा आहे हे वाचून खूपच वाईट वाटले , या मालिकेतील काही सीन मध्ये अनुष्काच असायला हवी होती अशी विधाने वाचल्यावरही थक्क व्हायला होते , हे तिला समजल्यावर तिला काय वाटेल आणि तिची काय प्रतिक्रिया असेल हे पहायला आवडेल , ( तिला फरकच पडणार नाही हे माझे व म)...

रणजित चितळे's picture

30 May 2020 - 11:56 am | रणजित चितळे

कमी वेळात भरपूर पैसे मिळवण्यासाठी काही नट नट्या काहीही करू शकतील

उज्वल कुमार's picture

1 Jun 2020 - 2:06 pm | उज्वल कुमार

त्यातल्या त्यात एक बराय यात अजून रिऍलिटी शो ची फोडणी नाही... अत्यंत खालच्या दर्जाचे संभाषण ज्याला शिवीगाळ म्हणता येईल आणि अत्यंत इंटिमेट सीन्स हे जरा जास्तच होतंय... पुढे मागे सेन्सॉरशिप करावी लागेल असे वाटतंय

एखाद्याला वर्षभर पुरणपोळी, श्रीखंड, गुलाबजाम फक्त खायला दिले आणि वर्षानंतर मोकळीक दिली तर जसं तो तिखट तेलकट खात सुटेल ना तसं झालाय या नेट मालिकांचं. इतकी वर्ष सेन्सॉर मध्ये अडकल्यामुळे एखाद्या सीन ची गरज असेल तरी दोन फुलं आपटावा, दोन पक्षी दाखवा करायला लागत होतं. एकदम पूर्ण मोकळीक मिळाल्या मुले वाटेल ते सीन, वाटेल ती भाषा दाखवता येतेय त्यामुळे एकदम सुटलेत. बहुतेक १-२ वर्ष अशाच मालिका जास्त बघायला मिळतील, पण हळू हळू लोक वैतागले कि येतील जरा नॉर्मल ला.

चौकस२१२'s picture

2 Jun 2020 - 6:20 am | चौकस२१२

समाजात विकृती आहे ती उघडपणे मालिका किंवा चित्रपटातून बघण्याची सवय भारतीय मनाला नसल्यमुळे आता अस्वस्थ वाटत असेल ... मान्य
पण "सगळं फक्त विकृती साठी चाललंय हे काही पटत नाही ,
"फुलनदेवी " मध्ये पहिल्यांदा शिव्या ऐकल्या तेव्हा हि असाच "धक्का " बसला होता.. परंतु पुढे असे वास्तव पण भारतीय चित्रपट आले पाहिजे हे मत झाले. नुसतातच नेहमीची घासी पिटी कथा किंवा फालतू विनोद याचाही कंटाळा आला होता

आणि हे हि खरे कि सतत जर फक्त "मिर्झापूर " सारखया मालिका निघत राहिल्या तर कंटाळा येऊ शकतो पण त्याच बरोबर पंचायत सारख्या मालिका पण निघत आहेत
आणि आपण काय पाहायचे हे आपण ठरवू.. उद्या जर एकाच प्रकारचा अतिरेक झालं तर लोक बघणार नाहीत ...

माफ करा परत "पाश्चिमात्यांशी तुलना करतो " पण हॉलिवूड मध्ये जेवढी विषाची विविधता आणि प्रगल्भता आहे तेवढाही भारतीय कला सृष्टीत कमी होती आत्ता चित्र पालटले आहे
हॉलवूड धर्मगुरू सारखया विषयांवर उघडपणे ( "टू पोप" बघा ) चित्र निर्माण करते आणि कोणताही आदळ आपट ना करता लोक बघतात .. तो मकोळेपणा जर भारतात येत असेल तर स्वागतच आहे .. मुद्डमून त्रास द्यायला कोणी जर विकृत निर्माण करीत असेल तर चुकीचे परंतु फक्त गोड गुलाबी दाखवा हि मागणी पण चुकीची वाटते

रणजित चितळे's picture

2 Jun 2020 - 9:22 am | रणजित चितळे

"फुलनदेवी " मध्ये पहिल्यांदा शिव्या ऐकल्या तेव्हा हि असाच "धक्का " बसला होता.. परंतु पुढे असे वास्तव पण भारतीय चित्रपट आले पाहिजे हे मत झाले. नुसतातच नेहमीची घासी पिटी कथा किंवा फालतू विनोद याचाही कंटाळा आला होता

मग मन बोधट व बधीर होते.

ह्यालाच ---- वास्तव दाखवावे असे मत म्हणतात का

चौकस२१२'s picture

2 Jun 2020 - 9:43 am | चौकस२१२

रणजित चितळे..मला आपली प्रतिक्रिया काही पूर्णपणे कळली नाही...
सारखे असे दाखवले तर कदाचित मन बधिर होईल.. असे आपण म्हणता त्यात तथ्य आहे पण
आहेत समाजात वाईट गोष्टी आहेत ..मग ते महाभारत पासून ते २०२० पर्यंत ..
त्या बद्दल दाखवणे पूर्वी अगदी अमान्य ठरले जायचे पण आता तरी आपला समाज जरा परिपकव झाला असावा म्हणून हे अगदी दाखवूच नये / असे विषयच असू नयेत असे मला वाटत नाही एवढेच म्हणणे आहे .
"हाथोडा त्यागी" दाखवून लगेच देशभर हाथोडा त्यागी निर्माण होतील असे वाटत नाही... अर्थात कोणत्याही गोष्टीवर लक्ष असावे हे हि खरे म्हणा .. सतत मारामारी चे पाहून १० पैकी एक जण तसे प्रत्यक्ष वागत असेल का? असेल हे हि मान्य ..पण एकूण एवढा परिणाम होतो का? यावर मानसोपचार तज्ज्ञच सांगू शकतील
सध्या तरी पूर्वीच्या टोकाचया सेन्सॉरशिप पेक्षा जरा तरी खुली झालेली [परिस्थिती स्वागतार्हच वाटते

रणजित चितळे's picture

2 Jun 2020 - 3:34 pm | रणजित चितळे

पण जसे घराचे आहे तसेच समाजाचे. घरात जर का सतत वाढत्या पिढी पूढे शिविगाळ मारहाण होत असेल तर नक्कीच तरूण मुले पहिल्यांदा धक्का मग बधीर होऊन त्यांचा दृष्टीकोण बदलतो असे वाटते.

चौकस२१२'s picture

2 Jun 2020 - 6:36 am | चौकस२१२

एक तांत्रिक प्रश्न
जर नेटफ्लिक्स सारख्या उद्योगांची कार्यालये/ सर्वर भारत भूमीत असतील आणि पैसे भारतीयां कडून घेतले जातात तर मग भारतीय सेन्सर त्यांना कसे काय लागू होत नाहीत?
उदाहरणार्थ नेफलिक्स ऑस्ट्रेलियात जे दिसतंय तेच अकाउंट मी जेवहा सिंगापुर मध्ये वापरले तेव्हा आपोआप काही मलिक दिसत नवहत्या म्हणजे सिंगापोर छाया सेन्सर ने कात्री लावली असणारच कि!
बर नेटफ्लिक्स चे भारतातील दार काय आहेत कोणी सांगेल काय?

रणजित चितळे's picture

2 Jun 2020 - 9:23 am | रणजित चितळे

ह्यावर विचार व्हायला पाहिजे. जर करता येत असेल तर निदान काही तरी सीमा पाहिजे threshold पाहिजे असे वाटते

उज्वल कुमार's picture

2 Jun 2020 - 10:13 am | उज्वल कुमार

Starts with 800 per month depending on how many devices you want to add ..199 pm for single mobile..