सिम्पल (पा)फाइन ऍपल केक!

Primary tabs

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in पाककृती
22 May 2020 - 6:08 pm

नाम माहात्म्य..केकामध्ये पाइन एपलला फाइन करून म्हंजे रस करून वापरला आहे.. म्हणून अशे णाव दिले!

साहित्य:-मैदा 300 ग्रॅम, पिठीसाखर दीड वाटी(कडक गोड हवे असल्यास अडीच वाटी),बेकिंग पावडर व बेकिंग सोडा 1चहाचा चमचा, 1चिमूट मीठ, अर्धी वाटी सनफ्लॉवर किंवा सोयाबीन तेल,अननस रस अर्धी वाटी, अननस इसेन्स 1चमचा, दूध अर्धी वाटी, आंबट दही 1ते 2चमचे.

कृती:- मैदा,पिठीसाखर, बेकिंग सोडा ,बेकिंग पावडर,मीठ हे सर्व "एकत्र करून" मग चाळून घ्यावे.
नन्तर एका पातेल्यात अगर मोठ्या बाउलमध्ये अर्धी वाटी सनफ्लॉवर किंवा सोयाबीन तेल,अननस रस अर्धी वाटी,हे 4मिनिट नीट एकत्र फेटून घ्यावे(फेसाळले तरी काळजी करू नये,खराब होत नाही.)नन्तर अननस इसेन्स 1चमचा घालून पुन्हा 1मिनटंभर फेटावे,उदबत्ती लावल्यासारखा इसेन्सचा सुगन्ध पसरेल मग,चाळलेले सर्व(मैदा इत्यादी जिन्नस)हळू हळू घालून फेटत रहावे मध्ये मध्ये 1/1चमचा दूध घालत रहावे.शेवट दही घालून फेटावे. (दूध अर्धी वाटी च्या वर जाऊ देऊ नये,आपल्याला केकचे पीठ थिकनेस किंवा टेक्श्चर च्या दृष्टीने जिलबीच्या किंवा इडलीच्या भिजवलेल्या पिठाजवळ जाईल इतपत जाडीचे करायचे आहे.)
कुकर मध्यम आचेवर 5मिनिट आगाऊ तापण्यास (प्री हिट)ठेवावा. आत 1इंच उंची पर्यंत मिठाचा थर द्यावा. यामुळे उष्णता समतोल साधण्यास उत्तम मदत मिळते.( हे मीठ नंतर काढून ठेवावे पुढच्या वेळेस पुन्हा वापरता येते .असे 8/10 वेळा पुनःपुन्हा वापरता येते)
आता केकच्या भांड्याला (बेकिंग ट्रे ला) आतून तेलाचा हात लावावा, मग त्याला सुक्या मैद्याचा थर (कोटिंग) होईल अश्या रीतीने आतून मैदा भुरभुरावा. (सदर बेकिंग ट्रे अगर भांडे कुकरला आत जाऊन बसते आहे ना?याची आधीच खात्री करावी.नाहीतर महागुरू होतो! असो.!!! )
आता या भांड्यात केकचे पीठ हळूहळू सोडावे,मध्ये मध्ये भांडे जमिनीला ठोकत आपटत रहावे,म्हणजे पिठात बुडबुडे रहात नाहीत.
आता कुकरमध्ये आत मिठात कळशी खाली असते तशी स्टील रिंग किंवा 2 ते 3 इंच उंचीचा स्टॅन्ड ठेवावा.त्यावर सरकणार नाही अशी बुड न हलणारी, नीट बसणारी ,जाड ताटली ठेवावी.त्यावर केकचे भांडे ठेवावे. आणि वरून कुकरचे झाकण (शिट्टी काढून!) लाऊन घ्यावे.
आता पहिली 5मिनिट मध्यम आचेवर गॅस ठेवावा. आणि नन्तर 30 मिनिटे (सलग) बारीक आचेवर गैस ठेवावा. 30 मिनिटांनंतर परत पुढे 5मिनिट मध्यम आचेवर गॅस ठेवावा. नन्तर गॅस बंद करून कुकर खाली उतरून 15 ते 25 मिनिट तसाच सोडून द्यावा. नन्तर झाकण सावकाश काढून घ्यावे.मग कुकर मध्ये आत लांबून जोरात फुंकर मारावी. आणि नन्तर आतील केक पहावा,केक फुगून वर आलेला दिसेल आता वरून 1सुरी केकच्या मध्यभागात आत पर्यंत हलकेच घालावी. व काढावी. सुरी आहे तशी "साफ" निघाली तर केक 100% झाला असे समजावे.
(नाही तर पुन्हा झाकण लाऊन 15 ते 25 मिनिटे मंद आचेवर गॅस वर ठेवावे.या प्रयत्ननात झाला नाही,तर नाद सोडून द्यावा.अजून खेळ करु नयेत.नाहीतर "केक आला,पण कुकर गेला!" अशी अवस्था होईल.)
केकचे भांडे बाहेर काढून गार होऊ द्यावे. मग भांड्याच्या आतून चारही बाजूंनी सूरी फिरवून घ्यावी व केक एखाद्या ताटात हळूच उलट करून काढावा. हवी तशी व हवी ती सजावट करावी.
https://scontent.fnag1-1.fna.fbcdn.net/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/99161535_2958613044224962_3672946767571189760_n.jpg?_nc_cat=102&_nc_sid=8024bb&efg=eyJpIjoiYiJ9&_nc_ohc=qLXuTYXOWS0AX8Xr99-&_nc_ht=scontent.fnag1-1.fna&_nc_tp=14&oh=756e09ee2eb574983381380043617413&oe=5EECF14D
जमलाय का? पहा ब्रे!
https://scontent.fnag1-2.fna.fbcdn.net/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/100710917_2958612817558318_1678079284876410880_n.jpg?_nc_cat=107&_nc_sid=8024bb&efg=eyJpIjoiYiJ9&_nc_ohc=wH3SPmKQCdgAX-D3tp1&_nc_ht=scontent.fnag1-2.fna&_nc_tp=14&oh=e0860c648762a6160838f4a981d4021b&oe=5EEC44F2
======================================================================
(जाता जाता:-- अननसाचा केक आणि त्यात अननसाचे तुकडे कसे नाहीत? असा अचाट प्रश्न पडणाऱ्यांसाठी:--टीप:-अननसाचे पाकवलेले किंवा पकवलेले तुकडे घालण्याचा प्रयोग गृहशांती नष्ट होण्याचा धोका लक्षात घेऊन स्वबळावर करून पहावा,यशस्वी झाल्यास पत्रानी सदर पात्रास कळवावा. आपला विनम्र:- अत्रुप्त आत्मा.पुणे30.)

प्रतिक्रिया

कंजूस's picture

22 May 2020 - 6:44 pm | कंजूस

फोटोसकट सर्व झकास.

चांदणे संदीप's picture

22 May 2020 - 6:59 pm | चांदणे संदीप

येक लंबर दिस्तोय फाईन अ‍ॅपल केक. कसा लागतोय ते तुम्ही सांगा.

एक अतिअचाट प्रश्नः साक्षात अननस घातल्यावरही त्यात अननस इसेन्स घालावा लागतोय का?

सं - दी - प

अत्रुप्त आत्मा's picture

22 May 2020 - 7:33 pm | अत्रुप्त आत्मा

@एक अतिअचाट प्रश्नः साक्षात अननस घातल्यावरही त्यात अननस इसेन्स घालावा लागतोय का? :-- देवालयात नुसती देवमूर्ती असून भागत नाही, तिचा (अधि)वासही असावा लागतो. तैसेचि ते आहे.

चांदणे संदीप's picture

22 May 2020 - 8:09 pm | चांदणे संदीप

शंकानिरसनाबद्दल धन्यवाद. हे माहिती नव्हते.
लॉकडाऊनच्या कृपेमुळे मागच्या आठवडयात मीही बड्डेसाठी केक बनवला होता. खाण्यालायक झाला होता म्हणून खाल्लाच. ;)

सं - दी - प

पैलवान's picture

22 May 2020 - 8:33 pm | पैलवान

आमची मजल ओरिओ केकपर्यंत ...

त्यामुळे हा मैदा वगैरे पासून केलेला (बऱ्यापैकी) ओरिजनल केक भारी वाटतोय.
व्हेज केल्याने +१ एक्सटरा एक गुण.

कंजूस's picture

22 May 2020 - 8:48 pm | कंजूस

पण आता एक प्रश्न - झणझणीत पदार्थ केव्हा करणार?

अत्रुप्त आत्मा's picture

22 May 2020 - 9:15 pm | अत्रुप्त आत्मा

पनीर महोत्सव लवकरच सुरू करत आहे.

गणेशा's picture

22 May 2020 - 9:42 pm | गणेशा

वा वा.. भारीच

जेम्स वांड's picture

23 May 2020 - 9:45 am | जेम्स वांड

अन रेसिपी त्याहून थोर कारण मुळात आत्मुस गुर्जीच थोर, तिच्यायला "महागुरू होतो" हे लैच आवडून गेलेले आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

23 May 2020 - 1:05 pm | अत्रुप्त आत्मा

=))

निरनिराळ्या विषयावरचे लेख पुन्हा सुरू करा ना! ( जुना बाजार,
अत्तरे,
पुस्तकांच्या दुकानातले अण्णा, ( शब्दचित्रे)
मंत्रपठण,
वेदोच्चार,
टु आणि फोर विलर,
हरेश्वर, आणि
बायकोसाठी केलेली पुण्यातली खरेदी,

अत्रुप्त आत्मा's picture

23 May 2020 - 4:19 pm | अत्रुप्त आत्मा

करतो प्र-यत्न! :)

प्रचेतस's picture

23 May 2020 - 3:47 pm | प्रचेतस

हम्म
ओक्के

रुपी's picture

24 May 2020 - 12:06 pm | रुपी

वा. छान दिसत आहे केक :)

उपेक्षित's picture

24 May 2020 - 1:28 pm | उपेक्षित

गुरुजी १नम्बर झालाय केक बघा, (तुमच्याकडून अशा आणि अजून चांगल्या धाग्यांची अपेक्षा आहे बघा)

अत्रुप्त आत्मा's picture

24 May 2020 - 10:53 pm | अत्रुप्त आत्मा

:) :) :)

अत्रुप्त आत्मा's picture

28 May 2020 - 11:14 am | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/smile/free-happy-smile-smiley-emoticon.gifलेख वाचलेल्या, प्रतिसाद दिलेल्या, आणि लेखन आवडलेल्या अशा सगळ्यांचे मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद