अव्हेंजर्स endgame: ऍक्शन च्या आवरणाखाली इमोशनल आणि रम्यता (फॅण्टसी) ची भेळ

Primary tabs

Prajakta२१'s picture
Prajakta२१ in काथ्याकूट
20 May 2020 - 11:38 pm
गाभा: 

परवाच अव्हेंजर्स एन्डगेम पहिला. खूप उत्सुकता होती टायटॅनिक चा उत्पन्नाचा विक्रम मोडणारा चित्रपट म्हणून.
आधी थोडक्यात कथा सांगते
पूर्वीच्या भागात (अव्हेंजर्स :इन्फिनिटी वॉर ) मध्ये सुपर खलनायक थॅनॉस ने त्याच्या दुष्ट स्वभावाला अनुसरून ब्रह्माण्डाचा भार कमी करण्यासाठी ६
अनंतमणी (इन्फिनिटी स्टोन्स चे मराठी रूपांतर ) मिळेल त्या मार्गाने धारकांकडून हिसकावून घेतले त्यासाठी स्वतःच्या दत्तक मुलीचा पण निर्दयीपणे बळी दिला आहे आणि एका चुटकीसरशी निम्म्या ब्रह्माण्डाचा नाश केला अव्हेंजर्स च्या फौजेने निकराचा प्रतिकार करून पण त्यांना अपयश आले आणि त्यांचेही निम्मे वीर धारातीर्थी पडले (ह्यात antman आणि कॅप्टन मार्वल सामील नव्हते)
आत्ता ह्या भागात -
वाचलेले अव्हेंजर्स खिन्नपणे जीवन कंठत आहेत त्यापैकी आयर्न मॅन अंतराळात नेब्युला (थॅनॉस ची दुसरी यंत्रमानव मुलगी )आणि रॉकेट (एक अस्वल टाईप जेनेटिकली मॉडिफाइड जीव )सोबत एका अंतराळयानात जगेल तितके दिवस काढत आहेत त्याचा प्राणवायू पुरवठा संपत आलेला असताना कॅप्टन मार्वल त्याला शोधते आणि त्या सगळ्यांना घेऊन पृथ्वीवर येते आणि सगळ्यांना सामील होते तिथे थॅनॉस ला शोधून परत सगळे अनंतमणी मिळवून जे गेलेले आहेत त्यांना परत आणण्याचा प्लॅन होतो
सगळी टीम थॅनॉस चा माग काढत एका ग्रहावर निम्म्या जळालेल्या आणि शक्तिहीन थॅनॉस ला शोधून काढते थॅनॉस ने परत कोणी ते इन्फिनिटी स्टोन्स चोरून
रिकव्हरी करू नये यासाठी आधीच ते सर्व नष्ट केलेले असतात त्यात त्याचीही सगळी शक्ती नष्ट होते खिन्नतेच्या अतिरेकात थॉर थॅनॉस चा शिरच्छेद करतो
सगळे निराश होऊन आपापल्या जगात परततात
त्यानंतर ५ वर्षांनी antman (मुंगीमानव )हा अव्हेंजर quantam realm मधून वास्तविक जगात परत येतो त्याला झालेल्या घटनांचा काही पत्ताच नसतो
सगळ्यांना शोधल्यावर तो त्यांच्यासमोर time ट्रॅव्हल ची कल्पना मांडतो इथली पाच वर्षे त्याच्या qunatum रेलम मध्ये त्याला पाच तास असतात
मग बरेच प्रयोग करून,सगळे विखुरलेले अव्हेंजर्स शोधून सगळी टीम वेगवेगळ्या भूतकाळात जाऊन ते सर्व मणी हस्तगत करते ह्यात एका ठिकाणी नेब्युला च्या रचनेमुळे भूतकाळातील थॅनॉस ला ह्या सगळ्या कारस्थानाचा सुगावा लागतो आणि तो पण त्याच्या फौजेसह आत्ताच्या वर्तमानकाळात परत येतो आणि आत्मा मणी (soul स्टोन ) मिळवायला मिळवणाऱ्या व्यक्तीला स्वतःची प्रिय व्यक्ती बलिदान द्यावी लागत असते त्यात तो मिळवायला नताशा (ब्लॅक विडो)आणि hockeye गेलेले असता नताशा स्वखुशीने बलिदान करते
वर्तमानकाळात सगळे मणी एकत्र करून सगळ्यांना परत जिवंत करण्याचा प्रयोग हळूहळू यशस्वी होत असतानाच थॅनॉस आक्रमण करतो मग परत जिवंत झालेले सर्व आणि आत्ताचे मिळून थॅनॉस आणि त्याच्या सैन्याचा खात्मा करतात शेवटच्या निकराच्या लढाईत आयर्नमॅन सगळी शक्ती एकवटून थॅनॉस चा खात्मा करतो पण त्यात त्याला त्याचे प्राण पण गमवावे लागतात त्याला निरोप देऊन बाकीचे परत जिवंत झालेले आणि वाचलेले अव्हेंजर्स परत आपले जीवन जगायला सुरवात करतात hulk,कॅप्टन अमेरिका ,वॉर machine ,सॅम फाल्कन हे परत भूतकाळात जाऊन सगळे मणी त्यांच्या जागी ठेवण्यासाठी कॅप्टन अमेरिकेला पाठवतात तो जातो पण परत येतो तो एक वृद्ध झालेला कॅप्टन अमेरिका त्याची ढाल तो त्याच्या शिष्याला फाल्कन ला देतो (भूतकाळात जाऊन तो आपल्या प्रेयसीसोबत नॉर्मल आयुष्य जगतो) असा शेवट केला आहे
स्टोरी बरीच मोठी तरी अपूर्ण लिहिली आहे (खूप बारीकसारीक डिटेल्स लिहिले नाहीयेत)
जास्त डिटेल साठी https://en.wikipedia.org/wiki/Avengers:_Endgame (विकिपीडिया वरून साभार ) इथे सर्व माहिती मिळेल
Box office :$2.798 billion हे बघून चाटच पडले ह्यात मुख्यत्वे special effects चा सिंहाचा वाटा असावा असो
पूर्ण चित्रपट बॉलीवूड सारखीच सगळ्याची भेळ पुरी आहे खूप ठिकाणी बघताना हिंदी चित्रपट बघितल्याचे फीलिंग आले
काहीसा overrated आणि overhyped वाटला उत्तम मार्केटिंग,सोशल मीडियाचा प्रभावी वापर आणि visual effects ह्यामुळे सामान्य चित्रपट पण किती कमाल करू शकतो ह्याचे उदाहरण. एवढ्या कलाकारांची मोट बांधणे ,visual effects साठी तंत्रकुशलता आणि ह्यातून पूर्ण चित्रपट बनवण्याचे आव्हान चांगले पेलले असले (त्याचे कौतुक आहेच )तरी पण कुठंतरी कथा/पटकथा कमी पडल्यासारखी वाटते
शेवटातला विरोधाभास जाणवला
पूर्ण अव्हेंजर्स सिरीज मध्ये कर्तव्यपरायणेतेचे प्रतीक असलेला आणि सारखी त्यावर भाषणे देणारा कॅप्टन अमेरिका शेवटी संधी मिळताच स्वतःचे जीवन जगण्याचा निर्णय घेऊन त्याची ढाल त्याच्या अन्य एका शिष्याला देतो आणि त्याच पूर्ण सेरीजमधील एक स्वार्थी,बिघडलेला श्रीमंत ,गर्विष्ठ असणारा आयर्न मॅन स्वतःचे बलिदान देतो तसेच नताशा (ब्लॅक widow) हि सुधारून चांगली कामे करून उर्वरित आयुष्य जगत असताना केवळ तिला कोणी नाही म्हणून तिचे बलिदान पटले नाही
अव्हेंजर्स सिरीज मधले काही चित्रपट खरेच चांगले आहेत सुपरहिरोंना पण वास्तविक आयुष्यातल्या समस्या,आव्हाने आणि त्यांची पण मानवी भावनिक बाजू ,त्यांचा गोंधळ दाखवून सेरीजने अपेक्षा वाढवल्या होत्या पण हा चित्रपट निराशा करतो (कदाचित टीव्ही वर २d मध्ये बघितल्याचा परिणाम असेल)

अजून कोणाला चित्रपट कसा वाटला?

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

21 May 2020 - 9:18 am | प्रचेतस

ही सर्वच मालिका आवडली. एन्डगेम पण आवडला. थॉरल मात्र वाया घालवला आहे. ा

आयर्नमॅन's picture

21 May 2020 - 11:56 am | आयर्नमॅन

Inifinity war च्या पुढे तर फारच रददड होता. आवडला नाही.

टाईम ट्रॅव्हल प्रकरण क्लिशे आहे काहीतरी वेगळे हवे होते नवीन काहीच हाती मिळत नाही. मार्व्हल कधीच DC प्रमाणे डार्क मोड मधे ऑपरेट होत नाही त्यांची सर्व महत्वाची युध्दे स्वच्छ सूर्यप्रकाश व रंगांची मुक्तहस्ते उधळण यात होत असतात, मूर्खा सारखे endgame चे युद्ध DC च्या धर्तीवर अंधारात कसे चित्रित केले गेले हे मला आजही न उलगडलेले कोडे आहे ? तिथेच घोळ झाला म्हटले तर चूक नाही म्हणता येणार कोणीही endgame चे अंतिम युद्ध पुन्हा पुन्हा बघत नाही

एक अवांतर:- मार्व्हल युनिव्हर्स च्या घटना earth वर नाही तर earth 606 मधे होत असतात

प्रचेतस's picture

21 May 2020 - 12:07 pm | प्रचेतस

इन्फिनिटी वॉर पेक्षाही द एव्हेंजर्स खूप सरस आहे.
बाकी डिसी बद्दलच्या आपल्या मताशी सहमत. मात्र नोलनने डिसी फारच उंचीवर नेऊन ठेवलंय. आता परत वंडर वूमन, जोकर द्वारे डिसीला सोन्याचे दिवस येत आहेत.

चांदणे संदीप's picture

21 May 2020 - 12:15 pm | चांदणे संदीप

वंडर वूमन आपली फेवरेट्ट! :)

बाकी, चालूद्या!

सं - दी - प

टवाळ कार्टा's picture

27 May 2020 - 7:52 pm | टवाळ कार्टा

ब्लॅक विडोसमोर वंडर वूमन झक मारते ;)

आयर्नमॅन's picture

21 May 2020 - 12:20 pm | आयर्नमॅन

इन्फिनिटी वॉर पेक्षाही द एव्हेंजर्स खूप सरस आहे.

नक्कीच. कारण तेच, स्वच्छ सूर्यप्रकाशात रंगांची मुक्त उधळण व infinity war मधे असलेला काळा अंतराळ वगैरे वगैरे त्यामुळे द Avengers सर्वोत्तम आहेच पण कथा इन्फिनिटी वॉर ची जास्त रोचक आहे

DC ला यामुळेच aquaman Marvel color pallate मधे काढावा लागला, तीच बाब वंडर वुमनची त्याची कलर थीम कॅप्टन अमेरिका सोबत व्यवस्थित जुळते. थोडक्यात DC is going for compromises over creativity.

नॉलन ने DC न्हवे फक्त बॅटमॅन ला उंचावर न्हेले, इतके की आता खाली उतरायचे वांदे झालेत. DC ने परत बेन अफलेक सोबत खायचे ते सर्व खाल्लेच की :)

जोकर जबरदस्तच हो, ही इज नो मोर जस्ट a सुपर व्हिलन character any मोर.

कानडाऊ योगेशु's picture

21 May 2020 - 1:06 pm | कानडाऊ योगेशु

ह्यायला हे टाईम ट्रॅवल करुन भूतकाळात जाणे परत वर्तमानकाळात येणे हा प्रकारच आता हास्यास्पद वाटतो मला तर. म्हणजे जो मेला आहे तो मेला नाही आणि जो मेला नाही तो कधीतरी मेला होता. आयर्न मॅन मेला आहे त्यामुळे त्याची पुढील सिरिज येणार नाही असे गृहीत धरायचे का? पण हे परवडणारे नाही. पुन्हा काहीतरी असाच आचरट प्रकार काढतील आणि त्याला जिवंत करतील. एकेका सुपरहिरोचे चित्रपट सुरवातीला पाहणे मनोरंजक वाटायचे पण अ‍ॅव्हेंजर सिरिज नंतर अचानकच इंटरेस्ट गायब झाला. सर्वात जास्त हानी स्पायडरमॅन सिरिजची झाली असे वाटते. स्टार्क स्पायडरमॅनच्या जीवनात आला आणि स्पायरडमॅन मूवीज आपली ओरिजिनॅलिटी हरवुन बसली असे वाटते. पण ह्या मूविजनी केलेला बिझनेस पाहता असे वाटते कि माझे वय झाले असावे.

त्याची कारणे कायदेशीर आहेत...

पण सोनीने स्पायडरमॅन एकटाच इतका भव्य बनवला होता की त्याला मार्व्हलला Avenger मधे घुसडायची गरजच न्हवती त्यासाठी विनाकारण त्याला बच्चा बनवणे भाग पडले अन एकुणच सगळा खेळ चुकला

जर मेलेली गमोरा जिवंत होऊ शकते, तर ब्लॅक विडो आणि स्टार्क का नाही ? जर टाइम ट्रॅव्हल करून भविष्य बदलत नसेलच, तर मानवी जीवनातले सगळे प्रश्न सुटलेच की ! भूतकाळातील सगळी साधनसम्पत्ती आपल्या हाताशीच. उद्या कोणीही भूतकाळात जाऊन पुन्हा इन्फिनिटी स्टोन्स आणले तर ?
स्कोर्सेजी म्हणतो ते ठीकच. मार्व्हलचे सिनेमे सिनेमे कमी आणि अम्युसमेंट पार्क जास्त असतात.

चित्रपटात कुठेच अर्थ ६०६/६१६ चा उल्लेख नाही
गूगल केले तर अर्थ ६१६ होते
DC बद्दल जास्त माहिती नाही त्यामुळे पास
मार्वल बद्दल पण पिक्चर मधूनच कळलंय

जर मेलेली गमोरा जिवंत होऊ शकते, तर ब्लॅक विडो आणि स्टार्क का नाही ?>>>>>>>>> ह्याच्याशी सहमत
इन्फिनिटी वॉर बघताना बऱ्याच ठिकाणी ते जिंकत असलेले युद्ध हरतात असे वाटते
१. पीटरquill -स्टारलॉर्ड ,आयर्न मॅन ,डॉ strange आणि थॅनॉस बरोबरच्या युद्धात गमोरा मेल्याचे कळताच पीटर quill एकदमच युद्ध सोडून देतो,
डॉ .strange ironman च्या बदल्यात time स्टोन ठाणोस ला देतो -----इथे एंडिंग बदलता आले असते
२. वांडा मॅक्सिमोफ (scarlet witch ) vision आणि त्याच्या स्टोन ला वेळेत नष्ट करून थॅनॉस ला हरवू शकली असती तिथे उगीचच time buying केल्यासारखे वाटते
३. थॉर देखील इन्फिनिटी वॉर मध्येच थॅनॉस चा शिरच्छेद करू शकला असता
केवळ दुसरा भाग काढण्यासाठी वरचे बदल केल्यासारखे वाटतात

स्पायडर मॅन ला उगीचच ह्याच्यात आणून छोटे केल्याशी सहमत
द अव्हेंजर्स चांगलाय ह्या दोन्हींपेक्षा
age ऑफ ultron पण ह्या दोन्हींपेक्षा चांगला वाटतो
काही काही सुपरहिरोज चे सिंगल पिक्चरच चांगले वाटतात ह्या भेळे पेक्षा . उदा. थॉर ,spiderman ,कॅप्टन marvel

प्रचेतस's picture

24 May 2020 - 10:49 pm | प्रचेतस

कारण सोल स्टोन कॅनॉट बी रिव्हर्सड. आणि डॉ स्ट्रेंजला मिलियन्स भविषयांमध्ये जिंकण्याची एकच शक्यता दिसते ती म्हणजे स्टार्कचे बलिदान देऊनच. कदाचित नंतर स्टार्कला परत आणले असते तर नव्याने काही consequences निर्माण होऊ शकले असते.

अनिरुद्ध.वैद्य's picture

24 May 2020 - 11:01 pm | अनिरुद्ध.वैद्य

ती मेलेली गमोरा नसते, तर भूतकाळातून वर्तमानात आलेली असते. हल्क सांगतो की सोल स्टोन साठी बळी दिलेल्या लोकांना परत आणता येत नसते.

मला अजुनेक प्रॉब्लेम आढळतो.

गमोराच आत्ता अस्तित्वात असलेलं व्हर्जन हे टाईम जम्प करून आलेलं असत. ह्या टाईममध्ये थॅनॉसला सगळे मणी मिळालेले नसतातच, त्यामुळं त्यानं अर्ध विश्व नष्ट केलेलं नसत. म्हणजेच सगळे अव्हेंजर्स जिवंत असतात.

त्यामुळे हल्क जे लोकं स्टोन्स वापरून परत आणतो, ते नेमके कोणते? टाईम लुप्स आर स्ट्रेंज!!

बालिशपणा तर बालिशपणा-शेवटी TV,रिमोट आणि वेळ आपला असतो मर्दानी २ बघून अस्वस्थ व्हायचे का हे बघून जरा करमणूक करायची हे आपल्याच हातात असते कृपया हलकेच घ्या

मी हे पिक्चर TV वर आल्यावरच बघितले त्यामुळे कॉमिक्स मधल्या बऱ्याच गोष्टी माहिती नाहीत पिक्चरमधून जेवढे कळले तेवढेच.
पिक्चर मध्ये सुपरहिरोंची मानवी बाजू पण चांगल्या पद्धतीने दाखवलीये अगदी त्यांच्यातले हेवेदावे ,टोमणे मारणे ,पंचेस त्यांच्या आयुष्यातले
रोजचे प्रश्न ,गोंधळ चांगले दाखवले होते सिंगल/३-४ सुपर हिरोंच्या पिक्चर्समध्ये. पण सगळ्यांची टीम बनवल्यापासून ते सगळे हरवून गेले
आणि जास्तच भावनिक केले (उदा. वरचे प्रसंग ) आणि गंडले
ट्रान्सफॉर्मर series /XMEN अति तांत्रिक आणि action ओरिएंटेड
हॅरी पॉटर,twilight series -अति कल्पनारम्य आणि भावनिक
ह्या दोन्हींचा चांगला सुवर्णमध्य marvel ने काही प्रमाणात साधला होता त्यांचे हिरोज कोणीतरी लांबचे न वाटता relate व्हायचे
पण इन्फिनिटी वॉर आणि endgame मध्ये भावनिकता जास्त वाढवून गंडवले(मानवी बाजू जास्त दाखवायच्या नादात मूळ गाभा हरवल्यासारखे झाले)
आणि सगळ्यांची series करण्याच्या नादात छोटे छोटे लूपहोल्स वाढले

स्वलिखित's picture

25 May 2020 - 9:41 am | स्वलिखित

Pubg वर कोणी धागा काढत असेल तर सांगा

अनिरुद्ध.वैद्य's picture

25 May 2020 - 1:12 pm | अनिरुद्ध.वैद्य

कॉमिक्समध्ये आहे, तर मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये नाही.

इथेच स्कीम गंडली

Prajakta२१'s picture

26 May 2020 - 11:16 pm | Prajakta२१

ओके
प्रतिसादाबद्दल धन्यवाद

बरेच marvel चे पिकचर्स टीव्हीवरच बघितले आहेत पण ते आवडले आहेत
आणि अव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर ३d बघून पण काही गोष्टी खटकल्या (वर लिहिल्या आहेत त्या )
पटकथा चांगली असेल तर २d मॅटर नाही करत
endgame न आवडण्याचे एक कारण असू शकते असे वाटले म्हणून तसे लिहिले फक्त
इन्फिनिटी वॉर मध्येच थॅनॉस चा पराभव दाखवू शकले असते endgame बघून तर हे जास्तच जाणवले असो

कॅप्टन अमेरिका:सिविल वॉर पण असाच गंडवलाय (सुपरहिरोंची खिचडी आणि त्यांच्यातील वैचारिक मतभेद दाखवून)

चर्चा चांगली चालू आहे. मला मार्वल चे सगळेच मूवी आवडतात, कारण चांगली साहसदृश, आणि चुरचुरीत संवाद. पण एन्ड गेम थोडासा कंटाळवाणंच झाला मला पण ठीके. 

हर्मायनी's picture

27 May 2020 - 12:59 pm | हर्मायनी

लॉकडाऊननंतर एप्रिलमध्ये मार्वलचे सगळे (२२) सिनेमे हॉटस्टारवर त्यांच्या व्युइंग ऑर्डरमध्ये बघितले. त्यामुळे त्यांची एकातएक लिंक छान लागली. सिविल वॉर केवळ सगळ्या सुपरहिरोजना एकमेकांशी इंट्रोड्युस करण्यासाठी काढला आहे वाटले. अव्हेंजर सिनेमे आवडले. एंडगेम बद्दल उत्सुकता होती. पण फार नाही आवडला. इन्फिनिटी वॉर जितका जमून आला आहे तितकाच एंडगेम फसला आहे. उगाच ५००रु. देऊन थेटरात नाही पहिला ते बरेच झाले.

तरी एंडगेम मधल्या काही आवडलेल्या मोमेंट्स:
१. आय लव्ह यू ३०००
२. कॅप. अमेरिका "हेल हायड्रा" म्हणून स्टोन घेतो ते.
३. कॅप. अमेरिका थॉरची हॅमर उचलतो ते.
४. आय एम आयर्नमॅन
५. अव्हेंजर्स असेम्ब्ल..

थॉर आणि त्याच्या आई मधला संवाद पण चान्गलाये

इन्फिनिटी वॉर जितका जमून आला आहे तितकाच एंडगेम फसला आहे. उगाच ५००रु. देऊन थेटरात नाही पहिला ते बरेच झाले. >>>>>>>>सहमत

आत्ता टाइम मशीन मध्ये बसून मागे जावे वाटतेय सगळ्या विश्वाला घेऊन
टाळता येण्यासारख्या घटना टाळून नॉर्मल जगणे बहाल व्हावे पुन्हा फिरून