अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्धतेच्या समस्या (माहितीच्या देवाणघेवाणीसाठी धागा)

Primary tabs

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
17 May 2020 - 12:44 pm
गाभा: 

पुण्यात अ‍ॅम्ब्युलन्सवाले कोरोनाच्या धास्तीने श्वसन विकार रुग्णांना सेवा देण्यात येण्यात कशी गंभीर टाळाटाळ आणि विलंब करताहेत याचा माझ्या परिचितांनी नोंदवलेला अनुभव मागच्या वीषाणू म्हणती कितवा दिवस? धाग्यात लिहिला होता. कदाचित तो एक्कड दुक्कड प्रसंग वाटण्याची शक्यता आहे पण कालची ही बातमी समस्येचे स्वरुप गंभीर असल्याचे दर्शवते. अगदी शासकीय रुग्णवाहिका सेवेचा क्रमांक अर्जन्सीमध्ये बर्‍या पैकी निरुपयोगी ठरत असावा असे दिसते. पुण्यातील कोरोना मृत्यूदर अधिक येण्याचे हे सुद्धा अप्रत्यक्ष कारण नाही ना असा प्रश्न पडतो ?

कालच्या वृत्तातील केस मध्ये शेवटी पोलीसांनी हस्तक्षेप करुन भाजीचा टेंपो वापरावयास लावला असे दिसते ! आता हे ही कसे आदर्श आहे ?

स्व आयुष्याच्या सुरक्षेचा जेवढा आधिकार इतर नागरीकांना आहे तेवढाच रुगणवाहीका सेवेतील चालकांनाही आहे हे ही लक्षात घ्यावयास हवे. त्यांना विश्वासात घेणे आणि त्यांना एन -९५ मास्क आणि इतर पर्सनल प्रोटेक्तीव्ह इक्विपमेंट उपलब्ध करण्यास काय हरकत आहे ?

आधीच्या धाग्यातून इतर मुद्द्यांसोबत चर्चा केलेली असूनही रुग्णवाहीकांच्या उपलब्धतेच्या समस्येची चर्चा होऊन अधिक विश्वासार्ह रुग्णवाहीका सेवांच्या माहितीची देवाण घेवाण व्हावी असा या धागा लेखाचा उद्देश आहे.

* अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे , शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी आणि चर्चा सहभागासाठी अनेक आभार.

प्रतिक्रिया

अ‍ॅम्ब्युलन्सची उपलब्धता.... हा विषय कायमच संवेदनशील राहिला आहे. शासकीय किंवा नगरपालिका रुग्णालयांच्या अ‍ॅम्ब्युलन्सेस सर्वसाधारणपणे कधीच उपलब्ध नसतात किंवा क्वचितच उपलब्ध असतात हा मुंबईतील तरी अनुभव आहे. COVID -19 पुर्वीच्या काळात खाजगी अ‍ॅम्ब्युलन्सेस सहज उपलब्ध होत असत आणि दोन ते पाच किलोमीटरच्या अंतरासाठी किमान बाराशे रुपये ते कमाल कितीही रक्कम आकारत असत. सुमारे अडीच किमीच्या अंतरासाठी एका मित्राने गेल्या वर्षी एप्रिल मध्ये तीन हजार रुपये मोजलेले पहिले आहेत. इतके करूनही स्ट्रेचर धरायला एकच माणूस आहे, तुम्ही एकजण पकडाल ना ही अट होतीच.
टाळेबंदीच्या या काळात ज्यांचे व्यवसाय ठप्प झाले ते रडत आहेतच ज्यांना संधी मिळते ते दामदुप्पट उकळतायत. मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे सर्वकालिक आणि सार्वत्रिक आहेत...