दूध हळद आणि Arsenicum Album 30C

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
16 May 2020 - 8:45 pm
गाभा: 

आधीचे शीर्षक : " कोविड १९ आणि होमीओपॅथीक ईम्युनीटी बूस्टर्स माहिती हवी"

काडीचा आधार घेण्यासाठी एखाद्या दूध हळद आणि आल्याचा रस आणि मध यांच्या महतीशी अपरिचीत उरुग्वे देशातील एखाद्या माणसाने ते घ्यावे की नाही हा प्रश्न विचारल्या नंतर त्याचे केमिकल पृथःकरण करून काही धोका संभवतो का फायदा झाला तर झाला नाही तर नाही पण आरोग्याला सेफ आहे ? तुमचा स्वतःचा अनुभव काय आहे ? तुमच्या पैकी कुणी घेतले आहे का ? घेतल्यावरही लागण झालेले कुणि आहेत का ? (इथे जसे दूध हळदी संबंधाने प्रश्न विचारुन दाखवले तसे होमीयोपथीची योग्या योग्यता ठेवा बाजूला आणि हळद किंवा आल्याच्या रसा सारखे केमिकल खालील होमियोपथी रसायने म्हणून काय शारिरीक धोक्याचे नाही ना ? या गोळ्यांचे उत्पादना दरम्यान स्वच्छतेच्या दर्जाची नेमकी काय काळजी घेतली जाते - उत्पादन मॅन्यूअल होते की यांत्रिक होते ? असा चर्चेचा स्तर उंचावल्यास बरे पडेल किंवा कसे ?)

कोविड १९ च्या निमीत्ताने होमीओपॅथीक ईम्युनीटी बूस्टर्स ची चर्चा चालू आहे. त्यात माझ्या कानावर तुर्तास

* Arsenicum Album 30C

आणि

* Camphora 1M

ही दोन नावे कानोकानी आणि ऑनलाईन बातम्यातून वाचनात आली. (चुभूदेघे)

माझे मन तरी अद्याप साशंक आहे. मिपा जाणकारांच्या सल्ल्यांच्या प्रतिक्षेत

असा धागा किंवा प्रतिसादातून चर्चा आधीच झाली असल्यास कृ. दुवे द्यावेत.

* अनुषंगिका व्यतरीक्त चर्चा आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी अनेक आभार
* उत्तरदायीत्वास नकार लागू

प्रतिक्रिया

काल माझा आरोग्यखात्यातील मित्र म्हणत होता, ही सगळी फेकाफेकी आहे.
कसले ही प्रुवन नाहिये.. आणि विनाकारण हे पसरवले जातेय.

हा फार तर ट्रायल म्हणुन घ्या असे कंपणीने सांगावे, हे क्युअर करते किंवा इतर फलाना नसावे,

बाकी आपल्याला काही इतर माहित नाही..
बाकीचे बोलतील

शकु गोवेकर's picture

17 May 2020 - 1:09 am | शकु गोवेकर

आयुश ने मान्य केले का हे माहित नाही
खरे आहे का ०६ मार्च २०२० ची माहिती अशी आहे
Claim: Homoeopathy drug Arsenicum album 30 Is a ‘prophylactic medicine’ for Coronavirus.
Claimed by: WhtasApp Forwards
Fact check by The Logical Indian: False
याबद्दल येथे पहावे दुवा - thelogicalindian.com › Fact Check

तसा काही अपाय नाही. शिवाय गोळ्या गोड असतात.
फक्त बाकीचे उपाय सोडून देऊ नयेत म्हणजे झालं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 May 2020 - 12:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भारी होता प्रतिसाद. =))

-दिलीप बिरुटे

मदनबाण's picture

18 May 2020 - 4:59 pm | मदनबाण

Arsenicum Album मला सर्दीसाठी माहित होते, सध्या सुंठ आणि व्हिटॅमिन डी बद्धल ऐकतो आणि वाचतो आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Samjho Na Kuch To Samjho Na...

धर्मराजमुटके's picture

18 May 2020 - 9:24 pm | धर्मराजमुटके

सर,
आपल्या मातीतल्या आयुर्वेदाला तुम्ही मानत नाही आणि आज चक्क होमिओपॅथीच्या औषधांवर चर्चा ? इथे बर्‍याच चर्चांमधे अगोदरच ठरलयं ना की होमिओपॅथी ही पॅथी नाहीच मुळी म्हणून ?

माहितगार's picture

26 May 2020 - 8:24 pm | माहितगार

सरजी आपण तिकडचेही प्रतिसाद नीट वाचले असते तर आयुर्वेदाच्या भोंगळपणावर टिकाकरताना त्याचा अनुभव मान्य केलेले दिसले असते. आणि या लेखात चर्चा टाकली तरी सोबतचा शब्द 'साशंक' असा आहे.

वैद्यक शास्त्र हे डोळस राहून करण्याची गोष्ट आहे भावनांच्या आधारावर नव्हे.

प्रसाद गोडबोले's picture

28 May 2020 - 12:42 pm | प्रसाद गोडबोले

अंधश्रध्दा निर्मुलन समीतीचे होमिऑपॅथीविषयी काय मत आहे ह्याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.

'अंधश्रध्दा निर्मुलन समीतीच्या बुडत्याने काडीचा आधार घ्यावा की नको ?' असा तो प्रश्न आहे.

चौकस२१२'s picture

29 May 2020 - 4:42 am | चौकस२१२

होमिओपॅथी हि अनेक देशात वैध मानली जात नाही, अर्थात याला आपण ऍलोपॅथी च्या लोकांना स्पर्धा नको म्हणून ते सरकार वर दबाव आणत असतील असे कोणी म्हणू शकते.
परंतु एक सर्वसामान्य नागरिक म्हणून असे वाटते कि जेवढे संशोधन अँलोपॅथी मध्ये दिसते आणि होमिओपॅथी हि ऍलोपॅथी प्रमाणे सर्व प्रकारच्या रोगांवर वापरात येत नाही आणि जिथे शस्त्रक्रिया जरुरी आहे तिथे होमिओपॅथी चा काय उपयोग? या कारणामुळे आपली धारणा तर " त्या गावाला जायलाच नको" अशी आहे .. जे काही राजमान्य. लोकमान्य आहे ते म्हणजे ऍलोपॅथी हेच बरे ..मग जे व्हायचे ते होईल

चर्चेचा दिशा आणि स्तर बदलायला हवा . चर्चेचा उद्देश लेखात स्पष्ट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला आहे, सर्दी झालेल्या माणसाने आल्याचा काढा घ्यावा की नाही या विषयावर आयुर्वेदाच्या योग्या योग्यतेची चर्चा नव्हे बेसिक प्रश्नांच्या उत्तरांची अपेक्षा असते. इथे लाखो लोकांना औषध रिकमंड केले जातेय त्यांच्या बेसिक साशंकतांना उत्तरे देणारी चर्चा इथे अभिप्रेत आहे. होमिओपथीच्या योग्यायोग्यतेच्या चर्चेने धागा हायजॅक करण्यात सर्वसामान्यांचे नुकसान होणार नाही हे पहावे म्हणजे झाले.

मला सांगा की होमिओपथीवाले ( आणि आयुर्वेदवालेही ) कशाच्या जोरावर सांगणार की अमुक औषध आहे कोरोनावर म्हणून?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 May 2020 - 1:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोरोनाचं जाऊ द्या.  हळद, आलं, उकळलेले दुध आणि जे काय काय असेल त्या त्या घटकांना एकत्रीत करुन पिल्यानंतर  सर्दी आणि घसा खवखव बरे होते. असे समजू. अटी लागू ★ हळदीचं प्रमाण किती, अद्रक किती घ्यायची, उकळलेले दुध किती घ्यायचं आणि  किती लोकांवर हा प्रयोग केला आणि किती लोकांना त्याचा उपयोग झाला त्यावर ठरेल की हे औषध सर्दीवर उपयोगी आहे किंवा  नाही त्यावर ते ठरेल असे वाटते.
★ प्रतिसादकर्ता अशा कोणत्याही काढा आणि तत्सम गोष्टीचं समर्थन करीत नाही. प्रतिसाद वाचून कोणी काही प्रयोग केल्यास, काही अपाय झाल्यास अथवा उपयोगी असल्यास असे वाटल्यास प्रतिसाद कर्ता त्याची जवाबदारी घेत नाही.

-दिलीप बिरुटे

माहितगार's picture

29 May 2020 - 2:03 pm | माहितगार

हे कसं झ्याक मांडलत ! जमलीना एकदाची निसटत्या बाजूची आयडीया :)

आमची अपेक्षा Arsenicum Album 30C आणि Camphora 1M बद्दल अशा मुद्देसूद उत्तराचीच आहे. मोस्ट वेलकम

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 May 2020 - 2:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माणसाच्या ठणठणीत शरीरात विषाणुचा प्रतिकार करणारे जे घटक आहेत त्याला या विषयाचे अभ्यासक आरएनएचे जे लहान अ‍ॅसीडचे तुकडे असतात त्याला मायक्रो आरएनए असे म्हणतात (संदर्भ पेपरातल्या बातम्या) शरीरातल्या प्रथिनीनिर्मितीत त्यांचा सहभाग असतो की नसतो ते माहिती नै पण बाहेरुन आलेल्या त्या विषाणुच्या आरएनएवर हल्ला करुन त्याची वाढ ते रोखतात. (संदर्भ-विदा नाही) आता जेव्हा असा विषाणु शरीरात प्रवेश करतो तेव्हा नैसर्गिकरित्या शरीरात त्याला प्रतिबंध होतो.(संदर्भ नाही) पण नैसर्गिक रित्या शरीरात असलेल्या घटकांना मदत करणारी जी औषधे बाहेरुन दिल्या जातात. त्या शरीरात असलेल्या सैन्याला दारुगोळा आणि तत्सम गोष्टींचा सपोर्ट करणारे घटक त्या अशा औषधांमधे असतात का ते मला माहिती नाहीत. किती लोकांवर त्याचा प्रयोग केला गेला त्याचं यशस्वीतेचं प्रमाण किती ? किती उपयोगाचं आहे, त्याबद्दल शास्त्रीय विदा विश्लेषण प्रतिसादकर्त्याकडे नसल्यामुळे उत्तरदायित्वास नकार.

-दिलीप बिरुटे

गवि's picture

29 May 2020 - 3:02 pm | गवि

३० c बद्दल

सिरीयल डायल्यूशन, म्हणजे शंभर भाग पाण्यात एक भाग मूळ पदार्थ मिसळून विशिष्ट (शास्त्रीय) पद्ध्तीनं ते मिश्रण हलवून हलवून ढवळायचं. मग परत त्यातला एक भाग घेऊन अजून शंभर भाग पाण्यात असाच डायल्यूट करायचा. असा शंभर शंभर पट विरळ विरळ द्राव बनवत जायचा. एकदा हा प्रकार झाला की १C नं औषधाची पोटेन्सी वाढली. २C म्हणजे एकदा शंभरपट डायल्यूशन आणि त्यातला एक भाग घेऊन परत शंभरपट डायल्यूशन.

पुढे तुलना सोपेपणासाठी:

१२ C सोल्यूशन (डायल्यूशन) म्हणजे एक चिमूट मीठ संपूर्ण अटलांटिक (उत्तर अटलांटिक आणि दक्षिण अटलांटिक एकत्र) महासागरात मिळून विरघळणं.

१३ C सोल्यूशन म्हणजे एक छोटा थेंब पदार्थ पृथ्वीवरच्या सर्व, एकूणएक पाणीसाठ्यात विरघळणं.

या संपूर्ण विश्वात (सर्व माहीत असलेले ग्रह, तारे वगैरे मिळून) १०‍^८० (दहावर ऐंशी शून्ये) एवढे अणू आहेत. ४०C वालं होमिओपथिक सोल्यूशन म्हणजे एक रेणू सर्व विश्वाइतक्या पदार्थात मिसळणं.

असं.

आणि, जितकी c जास्त तितकं ते अधिक स्ट्रॉंग.

मुळात १२C च्या डायल्यूशनपेक्षा जास्त डायल्यूशन केलं तर मूळ पदार्थ त्यात एक रेणूही शिल्लक राहू शकत नाही*. त्यामुळे कोणत्याही पद्धतीने ते डिटेक्ट होणे शक्य नाही. होमिओपॅथी थियरीनुसार पदार्थ उरला नसला तरी त्याचा इफेक्ट तो पाण्याला / द्रावणाला देऊन जातो.

* Avogadro's number विषयी वाचू शकता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 May 2020 - 3:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आदरणीय गविसर, पृथ्वीला चक्कर मारायला निघालेल्या त्या कार्तिकीय सारखं इतकं वर्णन करण्यापेक्षा सरळ चारपावलात माता पित्याला नमस्कार करणार्‍या गणेशाप्रमाणे स्पष्ट सांगितलं असतं की 'मूळ घटकच' शिल्लक राहात नाही त्यामुळे ते उपयोगाचं नाही तर विषयच संपला असता असे वाटते.

-दिलीप बिरुटे

श्री रा रा मा.गा.साहेबांना सविस्तर लागतं ना सर. म्हणून.

बाकी उपयोगी आहे किंवा नाही हे ठरवणं जातकावर अवलंबून आहे. मी फक्त भौतिकशास्त्रीय काय ते लिहिलं.

सतिश गावडे's picture

29 May 2020 - 3:46 pm | सतिश गावडे

जातक म्हणजे जोतिष्यी (की ज्योतिषी?) लोकांचा ग्राहक ना?

माहितगार's picture

29 May 2020 - 6:03 pm | माहितगार

गवि सर अनेक धन्यवाद, माझ्या यात अजून जराशा शंका ( यासाठी विचारतोय की हे बर्‍याच ठिकाणी मोफतही वाटले जात आहे. नुकसान नाही तर घेऊन का पाहू नये असा एक मत प्रवाह असू शकतोच पण त्या बद्दल तुर्त्सास मला माहित नसल्यामुळे वाटणार्‍या शंका)

* मी पाहिलेल्या काही या मोफत वाटलेल्या बाटल्यांवर ब्रँड वगैरेची काही माहिती नाही काही डॉक्टरांची नावे आहेत. आता डायल्यूशन बरोबर झाले का आणि मुख्य म्हणजे स्वच्छतेची काळजे घेतली गेली का याची खात्री करण्याची काही व्यवस्था असते का ? नाही तर उत्पादन, पॅकेजींग , वितरणातील एखाद्यास कोरोना बाधा झालेली असेल तर ती या औषधातून पोहोचू नये

* अशी जोखीम इतरही क्षेत्रात असू शकते पण मी बहुसंख्य खाद्य वस्तू पुन्हा गरम करता येतील किंवा गरम पाण्यात पुर्नप्रक्रिया जसे की विरघळवणे करता येतील अशाच घेतो आहे तर मुख्य प्रश्न ह्या गोळ्या कडत पाण्यात विरघळवून गरम पाण्यासोबत घेतल्यातर चालू शकतात का ?

निसटत्या बाजू ( न ) झ्यकास.

माहितगार's picture

1 Jul 2020 - 10:11 am | माहितगार

* हा एक या पुर्वी तरी सिद्ध झालेले नाही म्हणणारा पद्धतशीर लेख वाचनात आला.

पण एवढ्या काळात प्रॉपर टेस्टींग होऊन जाऊ शकले असते . असो.

माझ्या एका नातलगाला आर्सेनिक अल्बम चा ३ दिवसाचा डोस घेऊनही झाला
आयुष्य मंत्रालयाचा काढा हि चालू होता (त्यांच्या सूचनेप्रमाणे )
हळदीचे दूध जेव्हा बरे वाटत नव्हते तेव्हा चालू केले होते आधीपासून नियमित नव्हते
(दुसऱ्या शहरात असल्यामुळे केवळ फोनवर संपर्क)
चांगली गोष्ट म्हणजे ते सर्व बरे झाले आहेत एक आठवडा कोविद सेन्टरमध्ये उपचार घेऊन जेव्हा नॉर्मल आले तेव्हा सोडले
तिथेही व्हिटॅमिन च्या गोळ्या आणि hydroxychloroquine देत होते
यावरून alternate मेडिसिन चा फक्त रोग झाला तर रिकव्हरी होण्यास उपयोग होत असावा असे वाटते

माहितगार's picture

13 Jul 2020 - 9:47 am | माहितगार

@ प्राजक्ता, आर्सेनिक अल्बम आणि इतर अल्टरनेट मेडीसीन घेऊन पहाणार्‍यांचे अनुभव आपण शेअर केलात तसे अधिक शेअर व्हावयास हवेत.

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून विषाणू संसर्गाचा शक्यता / प्रभाव कमी करण्यात जलनेती कितपत प्रभावी ठरू शकेल या बद्दल शास्त्रीय पद्धतीने तुलनात्मक अभ्यास चालू आहे. (या बद्दल सर्जन धनंजय केळकर यांच्या व्याख्यानाचा युट्यूब व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होतोय.) . जलनेतीच्या शास्त्रीय अभ्यासाप्रमाणे आर्सेनिक अल्बमचा शास्त्रीय अभ्यास केल्याने गेल्या सहा महिन्यात करून पूर्ण सुद्धा करता आला असता. पण संशोधक आणि अ‍ॅलोपॅथीचे डॉक्टर्सही पूर्वग्रहात बरेच अडकलेले असतात. दुर्दैवाने अ‍ॅलोपॅथी आणि अल्टरनेट मेडिसीन दोघेही वेगवेगळ्या पद्धतीने अडेलतट्टूपणा करून एका अर्थाने मानवी आयुष्यांशी आणि भावनांशीही अस्पृहणीय खेळ खेळतात. अल्टरनेट मेडिसीनने अ‍ॅलोपॅथीसाईडचा शास्त्रीय प्रयोगांचा दृष्टीकोण अधिक आत्मसात करावयास हवा त्यात ते हयगय करतात दुसरीकडे 'अबकड अल्टरनेट वैद्यक प्रणालीची आहे म्हणून आम्ही त्यावर संशोधनच करणार नाही, हा पुर्वग्रहदुषित अडेलतट्टूपणा अ‍ॅलोपॅथी आणि आधुनिक संशोधकांकडूनही होताना दिसतो.
'अबकडचा परिणाम होत असल्याचा आमच्याकडे पुरावा नाही. याचा निश्कर्ष अबकडचा परिणाम होत नाही असा कोणत्या बळावर कथित आधुनिक तज्ञ काढतात ते माहित नाही. किंवा तार्कीक दृष्ट्या जे केल्याने सामान्य व्यक्तींना अधिक सेफ्टीची शक्यता असेल ते सुस्पष्ट सांगण्यातही ही मंडळी कमी पडतात ' काळाच्या ओघात केव्हातरी सुधारणा होतील तो पर्यंत सामान्यांनी रामभरोसे असावे. किंवा एकमेकांना अनुभव शेअर करावेत. असो.

पण हे जास्त खरे नाही का कि अ‍ॅलोपॅथी मध्ये जास्त "प्रमाण चाचण्या" करण्याची प्रथा आहे , अल्टरनेट मेडिसीन च्या मानाने!
आणि त्यामुळे अ‍ॅलोपॅथीत दावा केलेलया गोष्टी जास्त कणखर पणे तपासून घेतल्या गेल्या असतील यावर लवकर विश्वास बसतो जनतेचा ..
आता हेच बघा "आमची वास्तुशास्त्रावर श्रद्धा आहे" म्हणणारे जेवहा अंगाशी येते म्हणजे स्वतःचं घराचे छप्पर असो कीव मालकीची दुसरी काही वास्तू असो ती निर्माण करण्याच्या वेळी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिर्स चा प्रमनमान्य इंजिनीरवरच विस्वास ठेवतात ना?

माहितगार's picture

27 Jul 2020 - 9:57 am | माहितगार

मालेगाव 'काढा' हा काय प्रकार आहे ?