खारे मफिन

Primary tabs

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in पाककृती
13 May 2020 - 2:44 pm

खारे मफिन
मफिन म्हणले कि डोळ्यासमोर गोड चॉकोलेट चिप किंवा ऑरेंज पॉपी सीड ( काळी खसखस ) येतात
खाऱ्या पद्धतीचे पण करता येतात
साहित्य : कंसामध्ये भारतात सहज उपलब्ध असलेले जिन्नस सुचवले आहेत
- २ कप सेल्फ रेझिंग फ्लावर ( मैदा + बाई कर्रब सोडा + बेकिंग पावडर )
- १ कप ताक
- २-३ टी स्पून ऑलिव्ह तेल ( लोणी)
- सन ड्रॉइड टोमॅटो ( टोमॅटो च बारीक तुकडे तिखट मिठावर परतून वापर किंवा गाजराचे अगदी बारीक तुकडे तिखट मिठावर परतून घ्या)
- १ अंडे
- पार्सली ( कोथिंबीर)
- ऑलिव्ह ( ?)
- टेस्टी जातीचे चीज ( कोणतेही खारट चीज शक्यतो मोझ्झरेला जातीचे चिवट चीज नको )

कृती:
- मैदा , चीज, पार्सली एकत्र करून ठेवावे
- वेगळ्या भाड्यात ताक, अंडे , तेल, टोमॅटो इत्यादी एकजीव करून घयावे
- वरील ताक मिश्रण मैद्यात हळू हळू ओतत एकजीव करून घयावे ,,फार जोराने मिसळणं करू नये ..

- ओव्हन १८०° अंश सेल्सिय ल आतापवून घ्या
- मफिन ट्रे किंवा कप केक च्या कागदी द्रोणात मिश्रण ओतावे ( मी दोन्ही नव्हेत म्हणून रामिकें वापरले आहेत ( जपानी वाट्या )
- २५-३० मिनिटामध्ये मफिन होतील
IMG_7653[1]

IMG_7657[1]

IMG_7661[1]

IMG_7662[1]

IMG_7665[1]

प्रतिक्रिया

पैलवान's picture

13 May 2020 - 4:28 pm | पैलवान

मस्त स्नॅक्स !

शेवटच्या फोटोत गाभा मऊ वाटतोय..

चौकस२१२'s picture

13 May 2020 - 4:44 pm | चौकस२१२

हो थोडासा मऊ किंवा फुसफुशीत म्हणा हवे तर .. स्पॉंज केक सारखा .. मी शंका होती म्हणून सेल्फ रेझिंग मध्ये पण सोडा वैगरे घातले म्हणून कदाचित

वामन देशमुख's picture

13 May 2020 - 10:18 pm | वामन देशमुख

गोड मफिन्स् माहित आहेत, तिखट मिठाचे पहिल्यांदाच पाहतोय.‌

सादरीकरण आवडलं आहे.

चौकस२१२'s picture

14 May 2020 - 5:33 am | चौकस२१२

करून बघा खाऊन बघा... आपल्याला हवे ते मसाले घालू शकता जिऱ्याचे, भरडलेल्या धन्याचे, बारीक काजू चे काप घाला..
प्रथम जिभेला आणि मेंदूला ला गोड केक ची सवय असल्यामुळे कदाचित विचित्र वाटेल पण गरम गरम खमंग , अर्धे कापून त्यावर लोणी लावून खाताना मज्जा येते
मफिन चा चुलत भाऊ म्हणजे इंग्लिश स्कोन्स ते तर अगदी साधे मैदा, थोडी साखर , बस.. गरम गरम आणि त्याला लोणी आणि जॅम लावून खातात
मफिन ची चुलत बहीण म्हणजे "किश" शोधा आंतरजालावर सापडेल