शेअर ख्ररेदिबाबत......

उम्मि's picture
उम्मि in काथ्याकूट
18 Nov 2008 - 12:21 pm
गाभा: 

हल्लि मार्केट पुन्हा खालि येतय...

बेकीग सेक्टर तर धडाधडा कोसळ्तय, कशामुळे?

मन्दिचा परिणाम्? कि डोमेस्टिक बायर चि विक्रि?

खरेदिस हि योग्य वेळ आहे कि अजुनहि डीप फिशीग करता येइल???
बेकीग सेक्टर खरेदिस कसे वाटते?

मिपा च्या रथिमहारथिनो,
आपल्या पार्थाला थोड मार्गदर्शन कराल काय?

(मरेपर्यत शेअर मार्केट हा विषय न सोडणारा)

उम्मि.

प्रतिक्रिया

पिवळा डांबिस's picture

18 Nov 2008 - 12:30 pm | पिवळा डांबिस

मार्केट जरा बॉटम हिट होईपर्यंत असेल तो रोकडा घेउन गप्प बैस....
त्यातच तुझं कल्याण आहे......

विनायक प्रभू's picture

18 Nov 2008 - 12:34 pm | विनायक प्रभू

रोज थोडी खरेदी कर. काय पण रेट असु दे.
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे.

पिवळा डांबिस's picture

18 Nov 2008 - 1:35 pm | पिवळा डांबिस

काय पण रेट असु दे.
काय पण रेट असू दे?
काय विप्र, पोराला मारताय काय!!!!:)
अहो डोलर कॉस्ट ऍव्हरेजिंग वगैरे ते रेग्युलर मार्केटमध्ये ठीक आहे, पण आत्ताच्या मारकेटमध्ये?
अहो पोरगं व्होलाटिलिटीनेच कफल्लक होईल ना!!!!

अवलिया's picture

18 Nov 2008 - 12:35 pm | अवलिया

शेअर मार्केट म्हणजे काय व हे कुठे असते?

(अडाणी) नाना

पिवळा डांबिस's picture

18 Nov 2008 - 12:46 pm | पिवळा डांबिस

लोकल घेञ्न छशिटला उअतरायचं!!
थितं फुले मंडई ( मराठीत "क्राफर्ड मारकिट") इचारायचं.....
त्येच्या शेजारीच बसतंय पघा ह्ये शेअर मारकिट!!!
जरा घासाघिस कराया लागतीय पन हिथल्या कोळणी मात्र आगदी झक्कास हो!!!!
:)

अवलिया's picture

18 Nov 2008 - 12:50 pm | अवलिया

घासाघिशिला आपण नाय घाबरत...
पन काय वो ते करताना थुकल तर चालतयं नव्हं ...का की सातारी जर्दा ठासुन भरल्या बिगर दिवस चालु नाय व्ह्त आपला.

बाकी कोळ्णीच टेन्शन नका घेवु ... लय पोचलेल्या कोळ्णींचे फडफड्णारे मासे खाल्ले हाय.. ;)

नाना

पिवळा डांबिस's picture

18 Nov 2008 - 12:58 pm | पिवळा डांबिस

पन काय वो ते करताना थुकल तर चालतयं नव्हं ...का की सातारी जर्दा ठासुन भरल्या बिगर दिवस चालु नाय व्ह्त आपला.
आता तुमचं मारकिट, तुमची तमाखू...
जी चाहेस्तवर थुंका....
आमची कायबी हरकत नाय......

बाकी कोळ्णीच टेन्शन नका घेवु ... लय पोचलेल्या कोळ्णींचे फडफड्णारे मासे खाल्ले हाय..
त्ये बरं हाय....
पन जरा सांबाळून र्‍हावा...
येकदा कोळणीनं तुमचा फडफडणारा मासा जर धरला, तर तुमची काय खैर नाय!!!!!
त्येंच्याकडं धारदार कोयती आसतिया...
तुमचा जॉन बॅबिट व्हायचा!!!!
नाय म्हनजे दोस्त म्हनून सल्ला दिला हो, राग मानू नका.....

अवलिया's picture

18 Nov 2008 - 1:03 pm | अवलिया

आता तुमचं मारकिट, तुमची तमाखू...
जी चाहेस्तवर थुंका....
आमची कायबी हरकत नाय......

हांग अस्स... आता कस्स बोल्लात. नाय तर आपल सारख बोलायाचे
ह्यो भारतात कसा लय थुकतो अन त्यो बघा बाहेर कसा थुकुन थुकी कोटात ठिवतो.... अन काय काय. असो

तुमचा जॉन बॅबिट व्हायचा!!!!
नाय म्हनजे दोस्त म्हनून सल्ला दिला हो, राग मानू नका.....

खि खि खि
अव काही कालजी करु नका.... भारतातल्या कोल्नीला माहित हाय कंचे मासे कापायचे अन कंचे नाय कापायचे ;)
अन तुमचा राग आला तर कस व्हायच आमचं
अजाबात राग नाय
अन तुमी बी मानु नका.
:)

पिवळा डांबिस's picture

18 Nov 2008 - 1:11 pm | पिवळा डांबिस

ह्यो भारतात कसा लय थुकतो अन त्यो बघा बाहेर कसा थुकुन थुकी कोटात ठिवतो....
आमी कशाला आस बोलू?
आता पुढच्या येळंला भारतात आलू की तुमी आमाला तुमच्या हातानं पान खिलवा...
मग पघा! तुमची विच्छा आसंल तर आमीबी पचापच थूंकू...
:)
(व्हेन इन रोम, बिहेव्ह लाइक रोमन्स!!!)

अवलिया's picture

18 Nov 2008 - 1:12 pm | अवलिया

केव्हाही या.
तुमच्या स्वागताला तयार आहे.

नाना

घाशीराम कोतवाल १.२'s picture

18 Nov 2008 - 12:51 pm | घाशीराम कोतवाल १.२

लोकल घेञ्न छशिटला उअतरायचं!!
थितं फुले मंडई ( मराठीत "क्राफर्ड मारकिट") इचारायचं.....
त्येच्या शेजारीच बसतंय पघा ह्ये शेअर मारकिट!!!
जरा घासाघिस कराया लागतीय पन हिथल्या कोळणी मात्र आगदी झक्कास हो!!!!
=)) =))
=))
=))
=))
=))
=))
=))
=))
जबर्या हाणलाय नाना ला

मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...

पिवळा डांबिस's picture

18 Nov 2008 - 1:06 pm | पिवळा डांबिस

आमी कसलं ठोकतोय?
नाना आमचा जुना मार्क्सवादी मित्र हाय!!
तेच्याशी जरा जुगल्बंदी केली, इतकंच!!
बाकी काय नाय!!!!

अवलिया's picture

18 Nov 2008 - 1:08 pm | अवलिया

मार्क्सवादी मित्र म्हणुन मारा आमचीच...च्यायला तुम्हालाच जमतय बर का हे ;)
अहो निदान सांप्रदायिक तरी म्हणा पण मार्क्सवादी नका म्हणु

नाना

सागर's picture

18 Nov 2008 - 1:35 pm | सागर

थांब रे बाबा जरा

एवढी घाई करु नकोस... बॉटम अजून यायचा आहे...सेन्सेक्स ७५०० ला गेल्यावर सुरु कर... एवढ्यात नको...
अगदी धीर-दम निघत नसेन तर किमान ८००० ची तरी वाट पहा...

बँकींग आणि फायनान्स क्षेत्रात जरा जपूनच हात घाला, कारण मंदीची पहिली तलवार त्यांच्यावरच कोसळते...

रिलायन्स कॅपिटल
एडेलवाईस
कोटक महिन्द्रा बँक
एस.बी.आय.
एचडीएफसी

हे त्यातल्यात्यात कॅपिटल-फायनान्स व बँकींगमधले भंरवशाचे स्टॉक्स आहेत

बाकी दीर्घ मुदतीसाठी आणि चांगल्या लाभासाठी पावर आणि इंजिनिअरींग स्टॉक्स चांगले आहेत.
जसे एल एन्ड टी, पुंज लॉयड, रिलायन्स पावर, एनटीपीसी

सागर

उम्मि's picture

18 Nov 2008 - 2:33 pm | उम्मि

विनायक प्रभु, पिवळा डाबिस,सागर

आपल्या बहुमोल मार्गदर्शनाबद्द्ल आभारी आहे...

अजुन एक विचारतो,
अक्षरावर अनुस्वार कसा द्यावा?

नाना,पिवळा डाबिस (मिपाचि शान)
बाकी चालु द्या.

(योग्य वेळेचि वाट पहाणारा)

उम्मि

घाटावरचे भट's picture

18 Nov 2008 - 2:36 pm | घाटावरचे भट

अनुस्वार देण्यासाठी कॅपिटल एम अर्थात शिफ्ट + एम की वापरावी...

सखाराम_गटणे™'s picture

18 Nov 2008 - 2:51 pm | सखाराम_गटणे™

सागर शी सहमत,

राजेना पण बरेच माहीती आहे.

सेन्सेक्स ९१०० ते ९२०० वर १ महीना राहीला तर वर जाईल, नाही तर ७२००/ ७३०० ही लाष्ट लेव्हल आहे.
संबालुन रा. येडापना करु नका.

-( सणकी )पाषाणभेद

अजुन तळ गाटायला खुप येळ हाय. पुढच्या वर्शाला विलेक्शन हायत. त्यामुळ विकत घ्यायच असल तर मार्च एप्रिल नंतर घेत बस्.अजुन ह्यो पैशाचा घोळ सायबानी घातला हाय तो पुरता कुनालाबी उमगला नाय.पान्यात घान केली की ती वर यायला टैम लागतो लेका. म्हणुन दम धर हळुहळु सगल वर येत हाय. पानी संथ झालं की जाळं फेकाय सुरु कर.पैस गुंतवताना तात्याला ईचार.आजकाल तात्याला लय नट्यानी पैसा वाट्याने गुंतवाय दिलाय ( तो म्हन त्याना त्यातन शेतात घर बांधुन देनार हाय) .तुलाबी त्यो मदत करिल.
वेताळ

उम्मि's picture

18 Nov 2008 - 6:39 pm | उम्मि

वेताळकाका, पाषाणभेदभौ,

आभारी आहे.

तात्याआजोबा,

आपल्या नातवाला काही सुचना वा सल्ला?

आपला आज्ञाधारक,

उम्मि..

सखाराम_गटणे™'s picture

18 Nov 2008 - 7:09 pm | सखाराम_गटणे™

>>तात्याआजोबा,

गप रे,
काहीही