लेपाक्षी -हम्पी व परत भाग अन्तिम

चौकटराजा's picture
चौकटराजा in भटकंती
9 May 2020 - 3:18 pm

भाग 1
भाग 2
भाग 3
भाग 4
भाग 4 वरून क्रमश: पुढे
.

.

.
सूर्योदयाच्या आधीच बाहेर निघालो. विरूपाक्ष देउळ आतून न पहाताच हम्पी बाजार रस्त्याने मतंग टेकडी चढण्यासाठी निघालो. हम्पी बाजार चा रस्ता ए़का नन्दी मन्दिरापाशी संपतो . एका बाजूला धोंडे मधे पायऱ्या पायऱ्या व एका बाजूला मतंग टेकडी अशा त्या जागी खरोखरच एखाद्या वेस्टर्न चित्रपटाचे शूटिन्ग घेणे शोभेल इतकी ती जागा राकट आहे. पायऱ्या चढून मधल्या बेचकीतून वर सरकू लागलो की एक कमान आहे. त्या कमानीतून हम्प्पी बजार च्या टोकाला असलेले भव्य विरूपाक्ष मन्दिर नजरेस पडते. पुढे गेलो
.

.

.

.

.

.
गुगलमधे अच्युतराय मन्दिराकडून टेकडी वर जाण्यासाठी पायऱ्यानी बनलेली वाट दिसली होती. तिच्या अन्दाजाने एक वाट धरली . तीच वाट वर घेऊन जाणारी होती . पाठीवरची पिशवी , कँमेरा , मोबाईल ई सावरत एका एक पायरी चढू लागलो . अजूनही पावसाचे दिवस असल्याने पायऱ्या घसरड्या झाल्या होत्या व वाटे भोवती असणाऱ्या काटेरी फांद्यामधून वाट काढीत जावे लागत होते. दूरवर या किष्किंधा परिसरातील दगड धोंड्याच्या टेकड्या दिमाखाने उन्हात चमकत होत्या.खाली अच्युतरायाचे मंदिर लहान लहान होत होते.

.

.

.

पायर्‍या एकतर वाकड्या तिकड्या कशाही झाल्या होत्या व रायझर काही ठिकाणी अक्ष्ररशः एक फूटाचा .त्यामुळे चढाकडे तोंड न करता पाठ करून वर वर जावे लागत होते. अखेर अशा एका जागी आलो की तिथे पायरी अशी नव्हतीच . एक शिळा ४५ अन्शाच्या कोनात वर जायला असल्यासारखी. बरोबर कोणीही नव्हते . सबब पुढे जाण्याचा व टेकडीच्या माथ्यावरून , विरूपाक्ष मन्दिर व हम्प्पीचे एकून विहंगम दृश्य पहायचा बेत रद्द झाला. खाली येताना देखील काही ठिकाणी निसरडेपाणामुळे जपून यावे लागत होते.

.

.

.

.

.

.

.

.
हम्पी अलविदा

अच्युतराय देवळाची एक कमान लागली व उतार सम्पला. उन काहीसे तापदायक ठरू लागले होते.
मन्दिरात प्रवेश करून काही फोटो काढले. अच्युतराय मन्दिर ते वराह मन्दिर असा भव्य रस्ता आहे. तो पार करीत. पुन्हा तुन्गभद्रेच्या काठाकाठाने हम्पी बाजार मार्ग पकडून होटेल वर गेलो.

सामान उचलले व रिसेप्शनला जाऊन पोटपूजा करून बेल्लारीला जाण्यासाठी बस स्टॅन्ड गाठला . पाचेक मिनिटात होस्पेट रेल्वे स्टेशनला ला नेणारी बस आली.

पूर्वी होस्पेट वरून हंपीला जायला रिक्षा खेरीज साधन नव्हते पण आता या मार्गावर वस्ती वाढली आहे . काही मुलं मुली बसचा पास काढून होस्पेटला ज्युनियर कॉलेजला येताच . त्यामुळे हंपीत फारशी न भरलेली बस पुढे खच्चून भरली. ११ वाजता बस रेल्वे स्टेशन समोर येती झाली. मला बेल्लारी येथे जाण्यासाठी लगोलग हुबळीहून येणारी पॅसेंजर गाडी होती .तीमध्ये स्वार झालो. गर्दी फारशी नव्हती. हंपी बेल्लारी मार्गावर काही शेती , काही खनिज व्यवसाय होता असतो.दोन तीन रेल्वे स्थानके त्या अनुषंगाने विकसित होत आहेत. एकचे सुमारास गाडीतून लांबूनच बेल्लारीचा किल्ला बेल्लारी आल्याचे सुचवीत होता. बेल्लारी स्थानकात क्लोकरूम मध्ये मोठी बॅग टाकून मोकळा झालो. विचारत व विचारात उन्हातून चालत किल्याच्या गेट पाशी येऊन पोचलो.

किल्याला भेट द्यायला फारशी काही माणसे नव्हती. तिकिट काढून आत शिरलो. सुमारे 400 पायऱ्या चढून किल्यावर जावे लागते. पण पायऱ्या व्यवस्थित बांधलेल्या आहेत .अर्थात या पायऱ्या माणसे चढणार आहेत त्याचे भान बांधणाऱ्याना नसावे असे त्यांचे रायझर्स आहेत. मधून मधून एक मिनिटाची विश्रांती घेतच चढावे लागत होते. त्यात मी सकळीच हंपीला अर्धी टेकडी चढल्याने बर्यापैकी दमलेला होतोच ! वाटेत एक तरुण ग्रुप इथेही भेटला. माझे वय ६७ चालू आहे असे सांगताच सर्व थक्क झाले.आम्ही बोलत बोलत वर गेलो इथे त्यांच्यापैकी एकाने माझा मग फोटो काढला .
.

.

.

.

.
चढावरच्या मार्गातील एक पडाव . दोन धोंड्यामधून जिना पार करीत वर किल्यात जावे लागते. पायऱ्या वर क्रमांक टाकलेले दिसत आहेत.
.

.

.

.

.

.

.
किल्यावर बरच मोठे पठार आहे .सर्व एकसंध कातळ तपकिरी रंगाचा.वर सर्वच ठिकाणी विहार करायला परवानगी नाही. आपल्यावर गार्ड नजर ठेवून असतात. गार्डशी गप्पा मारता कळले की त्यांना आता या ४०० पायऱ्या चढायची संवय झालीय. किल्याच्या चढावर मध्यभागी जाताच बेल्लारी शहराचे विहंगम दर्शन होते. या भागातील हे महतत्वाचे शहर आहे . किल्यावर सात जलाशय आहेत .सर्वाचे पाणी निरनिराळ्या रंगाचे दिसते (असते नव्हे !) .आता जे काही शिल्लक आहे ते जुन्या वैभवाची साक्ष देणारे नक्कीच आहे.
.

.

बेल्लारी बाय ! बाय !
सायंकाळी ५ नंतर गार्डचे इशारे चालू झाले, तसा किल्ला लागलो येताना सात मिनटात किल्ला उतरून परिसराबाहेर आलो ,रिक्षावाल्याला थांबवून रेल्वे स्थानका पाशी आलो. अजून गाडी यायला ७ तासांचा अवधी होता. जरा नजीकच्या परिसरात चक्कर मारून जेवण करावे म्हणून किल्यावरच्या गार्डने काही टिप्स दिल्या होत्या त्याप्रमाणे एक उपहारगृह शोधून काढले .पण जेवण एकदम रद्दड होते. कसाबसा अर्धा जेवलो. स्टेशन गाठले .काही तासांच्या लांब प्रतीक्षेनंतर गाडी २ तास उशिरा आली. ( दक्षिण भारतात हे रोजचे दुखणे आहे ! ) .रात्री दोन वाजता परतीचा प्रवास सुरू झाला . आता पुढचे ठिकाणं भोपाळ ,,भीमबेटक,,,ओरछा हा बेत मनात पक्का करीत आडवा झालो.

संपूर्ण

वाचकांना शिफारस - भारतात अनेक ठिकाणे महाराष्ट्राबाहेर देखील पाहण्यासारखी आहेत .महाराष्ट्रापेक्षाही संस्मरणीय . त्यापैकी विजयनगर -हंपी हा परिसर व ओर्च्छा हे परिसर आयुष्यातून एकदा तरी पाहावे असते आहेत. काहींना पुन्हा पुन्हा पाहण्याचे वेड व वेध लागावेत इतके वैभव आज पडझड झालेल्या या गावामध्ये पाहायला मिळते. दोन्ही जागी सरकारने खास लक्ष द्यायला सुरवात केली आहे .एक परिसर तुंगभद्रेच्या तर दुसरा बेटवा नदीतीरी . दोन्ही चे काठावर पाण्यात पाय सोडून बसावेसे वाटते इतके ते रमणीय .एका गावाचे दैवत वीरूपाक्ष दुसऱ्याचे रामराजा . हंपीत कोरीव्ह काम पाहायला मिळते तर ओर्च्छा मध्ये भव्य वास्तुविद्या ! दोन्ही ठिकाणे नोव्हेंबर ते जानेवारी अखेर या काळात चुकवू नयेत अशी.

प्रतिक्रिया

कंजूस's picture

9 May 2020 - 3:41 pm | कंजूस

फारच आवरता घेतला लेख! बेल्लारीत येडीउरप्पा भेटले का ?

प्रचेतस's picture

9 May 2020 - 5:45 pm | प्रचेतस

माझा गणेशा झालाय.
काका, पुढच्या वर्षी आपण दोघेजण जाऊयात.

आता सगळेच फोटो दिसत आहेत, लैच भारी आहे हे, मस्त मस्त मस्त.पावसाळ्यात हंपीचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतंय ह्यात शंकाच नाही.

चौथा कोनाडा's picture

11 May 2020 - 10:38 am | चौथा कोनाडा

व्वा, सुंदर फोटो आणि सुरेख प्रवासवर्णन !
बेल्लारीचा किल्ला पहिल्यांदाच पाहण्यात आला, भारी आहे !
शेवटचा चीअर अप फोटो लै भारी !
चौरा रॉक्स _/\_
जवळजवळ सर्वच फ्रेम्स अतिशय देखण्या आहेत !
तुमच्या फोटोग्राफी डोळ्यांना सलाम !