हे काव्य कुणाचे आहे ?

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in काथ्याकूट
17 Nov 2008 - 10:16 pm
गाभा: 

हे काव्य कुणाचे आहे ?
वंदना विटणकर की कुणी ?

हिरवा हिरवा ऋतु s s s हिरवा हिरवा ऋतु s s s || कड.||
अधिकच हे मन हिरवे s s जवळी असता तू ||

हिरवा हिरवा ऋतु s s s हिरवा हिरवा ऋतु s s s
हिरवा हिरवा ऋतु s s s हिरवा हिरवा ऋतु s s s || कड.||

(क्रूपया चेष्टा करु नये.)

प्रतिक्रिया

शशिधर केळकर's picture

18 Nov 2008 - 12:32 am | शशिधर केळकर

बहुतेक ही कोण्या रागातील बंदिश असावी.

पाषाणभेद's picture

18 Nov 2008 - 4:42 pm | पाषाणभेद

हे गाणे दूरदर्शनवर बघितले होते.
-( सणकी )पाषाणभेद

पुष्कर's picture

18 Nov 2008 - 1:31 pm | पुष्कर

काव्य कुणाचे आहे हे माहीत नाही, पण माझ्या मते ही कविता नसून ते एक "गीत" आहे. (दूरदर्शनवर पाहिल्याचं आठवतं). ती रागातली बंदीश तर नाहीच नाही.

चौकशी/मदत/माहिती या सदराखाली हे तू लिहिलं आहेस खरं; पण यासोबत त्या गाण्याबद्दल आणखी काही माहिती, त्यातलं तुला काय आवडलं हे जर लिहिलं असतंस तर वाचायला मजा आली असती. कधी कधी एखादं गाणं कोणाचं आहे हे नाही कळालं तरी त्याचा आनंद घेण्यात एक वेगळीच मजा असते.

पाषाणभेद's picture

18 Nov 2008 - 4:39 pm | पाषाणभेद

हे "गीत" कुणी लिहिले आहे ?

हे गाणे दूरदर्शनवर बघितले होते.

मी (लेखी ) गाण्याचा सग्रह करतो. पुर्ण गीत देत असाल तर आभारी राहीन.

(चेष्टा करा पण क्रूपया ख्ररे उत्तर द्या. )

-( सणकी )पाषाणभेद

विजुभाऊ's picture

18 Nov 2008 - 5:03 pm | विजुभाऊ

हे गाणे आषा भोसल्यानी गायले आहे श्रीधर फडके यानी सम्गीतबद्ध केले आहे.
"ऋतु हिरवा" या अल्बम मध्ये हे गाणे आहे

झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Nov 2008 - 8:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मूळ धाग्यात दिलेले
अधिकच हे मन हिरवे s s जवळी असता तू ||
हे शब्द "ऋतू हिरवा" या आशाताईंनी गायलेल्या श्रीधर फडकेंनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यातले नाहीत.
तुम्ही दुसर्‍या गाण्याबद्दल बोलत असाल तर मला माहित नाही. तेव्हा जरा सविस्तर लिहाल का?

आणि मूळ प्रश्नाचं उत्तर मला माहित नाही.

(थोडंसं वेगळं: "युट्यूब", "इस्निप्स", "कूलटोड"सारख्या संस्थळांवर शोधून पाहिलंत का? कदाचित मिळूनही जाईल गाणं!)

लिखाळ's picture

18 Nov 2008 - 8:51 pm | लिखाळ

>>(थोडंसं वेगळं: "युट्यूब", "इस्निप्स", "कूलटोड"सारख्या संस्थळांवर शोधून पाहिलंत का? कदाचित मिळूनही जाईल गाणं!) <<
बरोबर...
मी आठवणीतली गाणी या संकेतस्थळावर वंदना विटणकरांनी रचलेल्या गाण्यांत पाहिले..पण मिळाले नाही..

-- लिखाळ.

हे "गीत" कुणी लिहिले आहे ?
हे काव्य कुणाचे आहे ?
वंदना विटणकर की कुणी ?
माफ करा पण आपण "ऋतु हिरवा ऋतु बरवा" या गीता बद्द्ल तर नाही ना बोलत ?
नक्की
हिरवा हिरवा ऋतु s s s हिरवा हिरवा ऋतु s s s च ना ?

-( सणकी )पाषाणभेद

गीत:
हिरवा हिरवा ऋतू , हिरवा हिरवा ऋतू
अधिकच हें मन हिरवें, जवळीं असतां तूं ||धृ||

वरील गाणे हे वंदना विटणकरांचेच आहे.

वरील संपुर्ण गाणे मी २००८ पासून शोधत होतो. तेव्हां हे गाणे मी दुरदर्शनवर अगदी शेवटले कडवे चालू असतांना पाहीले होते. त्यानंतर हे गाणे मिळवण्याकरता मी अनेक जणांना विचारले. त्यानंतर एकदा आकाशवाणीवर देखील ऐकले. आकाशवाणीला मी हे गाणे वाजल्याचे सगळे डिटेल्स तारीखवार देवून व प्रत्यक्ष फोन करूनही त्यांनी आश्वासनाशिवाय मदत केली नाही.

नंतर असाच शोध घेत असतांना मला सदरच्या गाण्याचा उल्लेख http://www.marathiworld.com/gani/list_action.php?ch=H&sort=1 येथे सापडला. (येथे ते गाणे 59 क्रमांकावर आहे.)

पण त्यावेळी ही लिंक उघडत नव्हती. लिंक ब्रोकन असल्याबद्दल मी तेथील अ‍ॅडमीनला इमेल पाठवला. त्यांचा काही प्रतिसाद आला नाही पण काही दिवसांनंतर ही लिंक ओपन होवू लागली व माझी या गाण्यासाठीची खुप दिवसांपासूनची शोधाशोध थांबली.

गीत:
हिरवा हिरवा ऋतू , हिरवा हिरवा ऋतू
अधिकच हें मन हिरवें, जवळीं असतां तूं ||धृ||

(येथे ते गाणे 59 क्रमांकावर आहे.)

गीत: वंदना विटणकर
गायिका: शोभा जोशी
संगितकार: यशवंत देव

हिरवा हिरवा ॠतू

हिरवा हिरवा ॠतू, हिरवा हिरवा ॠतू,
अधिकच हें मन हिरवें, जवळीं असतां तूं ॥धृ ॥

विळखा घाली वारा, फुलतो वेलीवरी शहारा
लाटा येतां जवळीं होतो अधीर धुंद किनारा
भ्रमर चुंबितां कळीस, माझा वसंत फुलवी तूं ॥१॥

कोसळती जलधारा, नाचे मनांत मोरपिसारा
ओलेती ही धरा, देतसे हिरवा सृजन-इशारा
मेघ भेटतां तिला, प्रिया, मज दे आलिंगन तूं ॥२॥

हिरवी मस्ती रानीं, प्रणयी राघू उन्मन झाले
अशा निथळत्या वेळीं माझें तनमन हरपुन गेलें
चिंब मातल्या बेहोषीचें उधाण सांवर तूं ॥३॥

गीत - वंदना विटणकर
सं. - यशवंत देव
गा. - शोभा जोशी

पाषाणभेद's picture

31 Oct 2020 - 9:12 pm | पाषाणभेद

पार्श्वभूमी: सदर गीत साधारण २००६-०७ च्या सुमारास दुरदर्शनवर पाहिले अन तेव्हापासून हे गीत मी आंतरजालावर शोधत होतो. कुठेही हे गाणे लिखीत अथवा चित्रीत स्वरूपात मिळाले नाही. नंतर एकदा हे गीत नाशिक आकाशवाणीवर ऐकायला मिळाले. ते गाणे तेथून मिळवायचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही. मला नक्कीच खात्री होती की हे गीत वंदना विटणकरांचे आहे. खूप प्रयत्न केले असता सदरच्या गाण्याचा उल्लेख http://www.marathiworld.com/gani/list_action.php?ch=H&sort=1 येथे सापडला. (येथे ते गाणे 59 क्रमांकावर आहे.) (आता बहूदा हि साईट चालत नाहीये.)

पण त्यावेळी ही लिंक उघडत नव्हती. लिंक ब्रोकन असल्याबद्दल मी तेथील अ‍ॅडमीनला इमेल पाठवला. त्यांचा काही प्रतिसाद आला नाही पण काही दिवसांनंतर ही लिंक ओपन होवू लागली व माझी या गाण्यासाठीची खुप दिवसांपासूनची शोधाशोध थांबली. साधारण २०१२ साली हे गीत सापडले. परंतु ते ध्वनी स्वरूपात (गायलेले) आपले मिपाकर डॉक्टर इंद्रनील पाटील सरांंनी २०१९ साली दिले. खूप प्रतिक्षेअंती एका सुमधूर गीताचा शोध संपला. अर्थात या गाण्यावर चित्रीकरण असणारा विडीओ दुरदर्शनच्या लायब्ररीत असणार. पण तो मिळणे दुरापास्त आहे. पण जेव्हा तो मिळेल किंवा तो दाखवतील तेव्हा आपण जरूर पहा. अगदी छान चित्रीकरण असलेले हे गीत आहे. मनास आनंद देईल हे नक्की. एखादे चांगले गीत काळाच्या पडद्या आड जाऊ नये म्हणून हे गीत येथे देत आहे. ऑडीओ अपलोड केल्यास तो देखील देण्यात येईल.

पाषाणभेद's picture

31 Oct 2020 - 10:29 pm | पाषाणभेद

गायलेले गीत खालील लींकमध्ये ऐकता येईल.
हिरवा हिरवा ॠतू (गीत - वंदना विटणकर): Hirawa Hirawa Rutu - Vandana Vitankar

(वरील लींक नाहीशी होऊ शकत असल्याने आपण डाऊनलोड करून घेवू शकतात.)

मराठी_माणूस's picture

1 Nov 2020 - 11:59 am | मराठी_माणूस

गाणे मिळाल्या बद्दल अभिनंदन आणि चिकाटीचे कौतुक.

पाषाणभेद's picture

1 Nov 2020 - 12:42 pm | पाषाणभेद

धन्यवाद.
आपण गाण्याचा आस्वाद घेतला का? कसे वाटले?

मराठी_माणूस's picture

1 Nov 2020 - 3:07 pm | मराठी_माणूस

हो. गाणे ऐकले , छान आहे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Nov 2020 - 2:32 pm | ज्ञानोबाचे पैजार

आपल्या चिकाटीची दाद द्यायला हवी
पैजारबुवा,